१९२७मध्ये कोलंबोत बोलताना गांधीजी म्हणाले, ``जे लोक आज आपल्या गरजा वाढवण्याच्या वेड्या शर्यतीत भाग घेत आहेत आणि त्यातून आपण जगाच्या खऱ्या ज्ञानात, खऱ्या संपत्तीत भर घालीत आहोत असे उगाच मानीत आहेत, त्यांनी आपली पावलं मागे वळवून `काय केले आम्ही हे' असे विचारण्याचा काळ आता येत आहे. नाना संस्कृती आल्या आणि गेल्या, आपण आपल्या प्रगतीची कितीही बढाई मारत असलो तरी `प्रगतीचा उद्देश काय?' असा प्रश्न पुन:पुन्हा विचारण्याचा मोह मला होतो आहे.''
हा उल्लेख दिलीप कुलकर्णीच्या `वेगळया विकासाचे वाटाडे' ह्यात वाचायला मिळाला. आणि मलाही प्रश्न पडला `नक्की आपल्या आयुष्याचा उद्देश काय? खरंच आपल्याला आयुष्यात काय हवंय?'
ह्या प्रश्नांची उत्तरं तशी लगेच मिळणारी नव्हती. तरीही असं नक्की वाटत होतं की आपलं आयुष्य आनंदी आणि समृद्ध असावं. पण मग ह्या आयुष्याला सुंदर आणि आनंदी करायला कशाची गरज आहे? मला वाटलं, `मूलभूत गरज तर आहे शुद्ध हवेची, शुद्ध अन्नाची, शांत वातावरणाची, चांगल्या निवाऱ्याची, निखळ मैत्रीची!'
मी ज्या पुणे शहरात राहते, तिथे शुद्ध हवेचा तर प्रश्नच येत नाही. ती इथे नाहीच ! अन्न आपण भरपूर पैसे देऊन विकत घेतो. पण ते कुठून येतं आणि किती शिळं असतं? त्यावर काय काय रसायनं फवारलीत? ते जनुकीय तंत्रज्ञान वापरून तयार केलंय का? ह्या सगळयाची आपल्याला काहीही माहिती नसते. शांत वातावरण, निवारा तोही तसा नाही. आणि आपण सगळे फक्त धावतोय. मग खरंच आपण इथे नक्की काय करतोय? कशासाठी धावतोय ? हे प्रश्न मला सारखे भेडसावत होते. मला अस्वस्थ करत होते. ह्यालाच उत्तर शोधायला म्हणून मी बी.एस्सी. नंतर थोडं वर्षभर थांबून बाहेर पडायचं ठरवलं. त्याप्रमाणे खूप ठिकाणी फिरले आणि अनेकांना भेटले. मुळातूनच काही बदलायला हवंय हे कुठेतरी जाणवत होतं.
मी आठवी/ नववीत असताना अंकोलीला `बुनियादी तालीम- विज्ञान साक्षरता अभ्यासक्रम' नावाच्या शिबिरासाठी अरुण आणि सुमंगल देशपांडे यांच्याकडे राहिले होते. तिथे आम्ही शहरी जीवनशैलीचा निसर्गावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास केला होता. गरजांचं ऑडिट करायला शिकलो होतो. तरीही तेव्हा हा विचार सुप्तावस्थेतच होता. त्यानंतर मला आयुष्यात असे अनेक लोक भेटले, ज्यांनी मला याच विचाराच्या दिशेने एकएक पायरी वर यायला मदत केली.
ह्या सगळयाची मुळं अगदी लहानपणापासून सुरू झाली.आम्ही अगदी लहान असताना आई आम्हांला वेगवेगळया ठिकाणी निसर्गनिरीक्षणासाठी घेऊन जायची. तिथं झाडं, पक्षी शेतं पाहायचो. शेतकऱ्यांशी बोलायचो. निसर्गाशी, झाडांशी मैत्री होईल असे कितीतरी प्रकल्प आम्ही बालभवनमध्ये असताना केले. तेव्हा उत्कर्ष घाटे, शोनील भागवत असेही अधूनमधून गप्पांसाठी, कधी काही दाखवायला यायचे. कधी शेतात भातलावणी पण केलेली आठवते. आईही गरवारे बालभवनमध्ये काम करते, त्यामुळे आम्ही तिथे रोज यायचो. लहानपणापासून आम्ही मातीत खेळण्याचा, छोट्या छोट्या गोष्टी हाताने करत निर्मितीचा आनंद घेतलाय. त्यामुळे इतक्या गोष्टी नेहमी चालू असायच्या की आम्हांला कधी इतर तयार गोष्टी, कपडे, टीव्हीमध्ये रसच वाटला नाही. आमची शाळा, रेवाचंद भोजवानी अॅक्रॅडमी पण वेगळीच होती. तिथेही अभ्यास एके अभ्यास असं वातावरण नव्हतं. म्हणून आम्ही मनसोक्त खेळलो, चित्रं काढली, बागकाम केलं, नाटकं केली, छान वाचनालय होतं, तिथली पुस्तकं वाचली, स्वत:चा अभ्यास स्वत: करायला शिकले.
अनेक निसर्गपरिचय शिबिरांना किरण पुरंदऱ्यांबरोबर गेले. निसर्गातल्या घटकांचे परस्परावलंबन, मैत्र जाणवलं, जाळं अनुभवलं. बारावीत गेल्यावर `रानवा'बरोबरही छोटेछोटे प्रकल्प केले. पुण्यातल्या काही बागांमधल्या झाडांचे नकाशे केले. पुढे गरवारे कॉलेजमध्ये बी.एस्सी. सूक्ष्मजीवशास्त्र विषय अभ्यासासाठी घेतला. तेव्हा वाटवे सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि `रानवा'बरोबर छोटी मोठी कामं केली. कामासाठी मदुमलाईत गेले. शोनिलदादाबरोबर कूर्गच्या देवरायांमध्ये हिंडले आणि जंगल खूप आवडायला लागलं.
ह्याचवेळेस, दुसऱ्या वर्षानंतर मी अन्नमलाईच्या जंगलात `व्हाईट बेलिड शॉर्टविंग'(थहळींश इशश्रश्रळशव डहेीींुळपस) ह्या पक्ष्याच्या गाण्यावर अभ्यास करायला गेले. तिथे मला जंगलातल्या वेगवेगळया गोष्टींवर संशोधन करणारे अनेक लोक भेटले. अडीच-तीन महिने एका घनदाट अशा जंगलात राहण्याचा, संशोधनाचं काम करण्याचा अनुभव मिळाला. निसर्गात काम करायचं हे पक्कं झालं. तरीही संशोधन, अभ्यासाच्या बरोबरीनं आपलं रोजचं जगणं ही पर्यावरणाची जपणूक करणारं हवं. जे `वाचवावं' म्हणून काम करतोय त्याचं आपल्या आयुष्यात स्थान हवं. काम पर्यावरणाचे पण स्वत:ची राहणी मात्र तशी नाही असं नको असं प्रकर्षाने जाणवू लागलं.
ह्याच काळात मी इकॉलॉजिकल सोसायटीचा एक वर्षाचा छर्रींीीरश्र ठर्शीेीीलश चरपरसाशपीं रपव उेपीर्शीींरींळेप कोर्स केला. ह्यात माझ्या मनातल्या अनेक प्रश्नांना एक नवीन दिशा मिळाली. अर्थशास्त्र आणि निसर्गाची परिस्थिती, मानवाचा त्याचा वापर आणि विचार करण्याची पद्धत ह्याची जाणीव मला झाली. ह्याच कोर्सच्या काळात आम्ही दिलीप कुलकर्णींकडे गेलो होतो. त्यांची जीवनशैली मला खूप भावली. असंच काहीतरी जगण्याचं स्वरूप असावं की काय असं वाटलं आणि ठरवलं की नक्की काय करायचं हे ठरवायला स्वत:ला वेळ द्यायचा.
अन्नमलाईत मी श्री विजयन यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं. त्यांचे काम आणि माझा अभ्यास असं मिळून खपींशीपरींळेपरश्र जीपळींहेश्रेसू उेपषशीरपलश मध्ये िशीीशपींरींळेप होतं.त्यासाठी पहिल्यांदाच भारताबाहेर जर्मनीला एकटी गेले. ह्या परिषदेत मला अनेक वैज्ञानिक, पक्षीअभ्यासक भेटले. एकाच विषयाला त्यांनी आयुष्य दिलंय तरी असंही जाणवलं की काम जरी पर्यावरणातलं असलं तरी सगळयांची जीवनशैली मात्र तशा प्रकारची नाही. बऱ्याच वेळा `वाचवणं' फक्त बोलण्यात, अभ्यास म्हणून, संशोधन म्हणून येतं. पण जर प्रत्येक माणूस बदलणार नसेल तर निसर्गाचं शोषण सुरूच राहील. हा फक्त अभ्यासाचा विषय नाही जगण्याचा विषय आहे, असं वाटत गेलं. बोलण्यात आणि वागण्यात त्याचा संबंध नको का? संशोधनासाठी पैसे मिळवत राहायचे तर मग अनेक बंधने येतात. आणि शेवटी खरं तर ती पर्यावरणापासून लांबच घेऊन जातात.
असे सगळे प्रश्न पडलेले असताना मला एक खास माणूस भेटला. त्याचं नाव िख्र्तास्न लेपर्ट. इतक्या पटकन् मैत्री झाली. जणू काही अनेक वर्षांची ओळख असावी. तो स्वत: आवड म्हणून शेती करतो, पैसे मिळवायला हॉटेल चालवतो आणि निसर्गाची कमीत कमी हानी होईल असं जगण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या चेहऱ्यावरचं तेज आणि आनंद हेच दर्शवित होतं की त्याला ह्या निसर्गाने भरभरून दिलं आहे. हा चिरंतन आनंद मला सर्वात जास्त भावला. मला कुठेतरी जाणवलं की मला पण आयुष्यात हेच हवंय !
ह्यानंतर मी भारतभरात अनेक पर्यावरण संदर्भात काम करणाऱ्या लोकांकडे गेले. हा माझा प्रवास मला अनेक गोष्टी देऊन
प्रवास करणे, जाईन तिथलं खाणं, राहणं यात अॅडजस्ट होणं, पडलेली कामं करणं अशी तयारी झाली होती. त्यामुळे मग नवीन भाषेत, नवीन लोकांत मिसळणं, शिकणं मला जमू शकलं.
जर्मनीनंतर मी राजस्थानात अल्वर येथे राजेंद्र सिंह यांच्या तरुण भारत संघात गेले. त्यांनी गाव, समाज यांना एकत्र करत पाण्यासाठी जोहड बांधायची सामाजिक कला परत सुरू केली. इथेही मी काही प्रत्यक्ष कामं केली. त्यामध्ये बांध कसे बांधतात, त्याचा सर्व्हे, जागा ठरवणं, त्याचप्रमाणे आजूबाजूच्या समाजाबरोबर त्यांचं बोलणं, काम करणं, काम झाल्यावर होणारे परिणाम पण बघायला मिळाले.
केरळच्या वायनाड जिल्ह्यात वुल्फगँग (थेश्रषसरपस) नावाचा जर्मन माणूस अनेक वर्षे राहतोय. तो अनेक दुर्मिळ वनस्पती गोळा करून त्यांच्या संवर्धनाचे काम करतोय असं कळलं. म्हणून मी तिथे गेले. तिथे तो चहाचे मळे विकत घेऊन जंगल वाढवायचं काम करतोय. तो, त्याचा मुलगा आणि बाजूच्या गावातले आदिवासी मिळून सगळी कामं करतात. तिथे त्यांना मी सकाळपासून रात्रीपर्यंत कसून काम करताना पाहिले. ते चहाचे मळे काढून जंगल वाढवायचं अशक्य काम करू शकताहेत. आणि इतकी संवेदनशीलता आहे की प्रत्येक रोपाची अगदी बाळाप्रमाणे काळजी घेतात. तिथं त्यांच्याबरोबर शिस्तीनं, निगुतीनं कामं करताना वेगळीच मजा आली, आणि माझा कसही लागला.
मला कुठेतरी प्रत्यक्ष शेतीचा अनुभव घेऊन बघायचा होता. विदर्भातल्या वसंत आणि करुणा फुटाणे यांच्या शेतीविषयी मला कळलं होतं. त्यांच्याकडे पहिल्यांदा दोन महिने शेती केली. त्या आधीचा माझा आणि शेतीचा अनुभव फक्त कुंडीपुरता, टेरेसवरचा आणि बालभवनमधल्या छोट्या वाफ्यांपुरता ! मोठ्या शेतात काम करण्याचा आणि निसर्गाचं सृजन इतक्या जवळून रोज बघण्याचा माझा हा पहिला अनुभव आणि खरंच इथे माती मला स्वत:ला जवळ बोलावते असं जाणवलं. वसंतभाऊ शेतातलं प्रत्येक काम खूप मनापासून करतात. त्यांचा तणांचा आणि निसर्गाचा अभ्यास मला प्रत्येक वेळा नवी दृष्टी देऊन गेला. करुणाताईबरोबर जीवनशाळा, दारुबंदी ह्या कामांमध्ये सहभागी होऊन त्यांचं गावाबरोबरचं नातं जवळून बघायला मिळालं. इथल्या शेतातल्या गडी माणसांबरोबर काम करून स्वत:ची शारीरिक क्षमताही तपासता आली, वाढवता आली. त्यांच्या दोन्ही मुलांबरोबर अनेक तांत्रिक खटपटी पण करून बघता आल्या आणि शेतीच्या अर्थशास्त्राची पूर्ण कल्पना मला इथे आली. त्यामुळे शेती करायची तर आपल्या घरच्या अन्नधान्याच्या गरजांपुरतीच हे इथं पक्कं झालं. त्यांचं सुंदर `मातीचं घर' आहे आणि मुख्य गोष्ट म्हणजे ही शेती पूर्णपणे सेंद्रिय आहे. त्यांच्याकडे ३५ एकर जमीन आहे. तरीही त्यात ते ट्न्ॅक्टर वापरत नाहीत. बैलांचा वापर करतात. पिकाचं नियोजन करताना फक्त स्वत:च्या गरजांचा विचार न करता मातीच्या गरजेचा पण विचार केला जातो. पुढे मग मी पिकांचं एक चक्र अभ्यासायला परत इथे राहिले. पीक आल्यानंतर करण्याची कामं पण त्यामुळे करता आली.
इथे आयुष्यात शेतीचा समावेश असलाच पाहिजे असं वाटायला लागलं. प्रत्येक वेळी पुण्याला आले की शहरी जीवनातला कृत्रिमपणा प्रखरपणे जाणवायचा. शहर फक्त पैशामागे धावतंय आणि शहरी उत्पादनात काहीही नवीन निर्मिती नसते. फक्त एका वस्तूचे रूपांतर दुसऱ्यात करणे चालू असते. दुसरं म्हणजे दैनंदिन गरजा भागविण्यासाठी आपण काहीच `उत्पादक श्रम' करत नाही, हेही पटायला लागलं आणि भास्कर सावे म्हणतात त्याप्रमाणे, `शेतीत मात्र एका दाण्यापासून हजार दाणे तयार होतात. हे निसर्गाचं सृजन आहे.' शेतीत निसर्गचक्राचा ऋतुचक्राचा तुम्ही खूप जवळून भाग बनता आणि शहरात ऋतूचं काही देणं-घेणंच नसतं, इतकं आपलं आयुष्य कृत्रिम बनतं !
शहरात आपण जीवनावश्यक कौशल्यांपासून दूर गेलोय. यातली काही कौशल्यं शिकायला मी बाबा आमटे यांच्या आनंदवनात गेले. तिथे अनेक लघुउद्योग चालतात. पुढे जर आपल्याला आपले जीवन स्वत: मेहनत करत जगायचं असेल तर त्यासाठी अनेक गोष्टी स्वत: करता येणं महत्त्वाचं आहे. याचा थोडा अनुभव यावा म्हणून आनंदवनात मी स्वत:साठी चप्पल बनवली, कुष्ठरोगी बांधवांचं ड्न्ेिंसग केलं, बस्करं बनवली, हातमागावर टॉवेल विणले, हस्तकलेतल्या काही गोष्टी शिकले. ह्या पूर्ण काळात मला बाबा, साधनाताई, विकासदादा आणि भारतीताई यांचा प्रेमळ सहवास आणि मार्गदर्शन लाभलं. बाबा नेहमी मला विचारायचे मी काय केलं ते ! त्यांनी मला एकदा मी केलेल्या वस्तू आणायला सांगितल्या. मी विणलेला टॉवेल घेऊन गेले. टॉवेल उघडून बघितला. आश्चर्याने म्हणाले, ``हा टॉवेल तू केलास ?'' माझे हात हातात घेऊन पुढे म्हणाले, ``मला अत्यानंद होतोय की ह्या हातांना श्रमाचं काम करायची इच्छा झाली. आयुष्यात असं काम करत राहिलीस तर तुझे हात सुंदर होतील!'' बाबा गेले, पण मला माझ्या आयुष्यासाठी उदंड आशीर्वाद देऊन गेले. त्यांच्या ह्या वाक्याने माझा माझ्या मार्गावरचा विश्वास वाढला.
हिमालयात मुनस्यारी ह्या ठिकाणी मी दीड महिना होते. तिथे श्ररपवीलरशि रपव श्रळषशीज्ञळश्रश्री नावाचे शिबिर होते. मल्लिका, थिओ आणि राम हे मार्गदर्शक होते. हे तिघंही मुळात ह्या गावचे नाहीत. पण गेली १५ वर्षे इथेच राहतात आणि अगदी इथलेच झालेत. तिथे आम्ही जंगलाचा, गावातल्या लोकांचा आणि जंगलाचा आणि माणसाच्या नात्याचा अभ्यास केला. तिथली काही कौशल्ये, बांबू काम, लोकरीची बुनाई, लोकरीचे बस्कर हेही थोडं करून बघितलं. तिथे मला असं जाणवलं की जंगलांचं आणि माणसाचं अतूट नातं आहे. जंगलातून ते शेतासाठी खत, गाइंर्चा चारा आणतात आणि जंगल पण वाचवण्याचं काम करतात. पाण्याचे स्रोत वाचवण्याचं काम जंगलं करतात. हिमालयातले कष्ट किती अतिप्रचंड आहेत ह्याविषयी जाणीवही झाली, आणि अनुभवही घेतला. निसर्गाची अवकृपा आणि निसर्गासमोर आपण किती नगण्य आहोत हे तिथे प्रकर्षाने जाणवलं. मल्लिका, थिओ आणि राम यांनी गावातल्या लोकांमध्ये जागृती कशी आणली हे बघायला मिळालं.
हा प्रवास मला अनेक गोष्टी शिकवत गेला. प्रत्येक ठिकाणी स्वत:ची नवी ओळख होत गेली. ह्या सर्व लोकांनी मला वेगळी वाट निवडायचं धाडस दिलं. माझ्या वयाचे अनेक तरुण भेटले जे वेगळा विचार करून नवीन वाटेने जाऊ इच्छितात. हे बघूनही मला थोडाफार धीर आला.
सध्या आपण जो विकास करतोय, त्यात यंत्रांनी मानवी कष्ट कमी करण्याचा आपला प्रयत्न आहे. श्रम करणं याला आपण दुय्यम स्थान दिलंय. `विकास' ह्या शब्दाच्या जन्माबद्दल मी मधे वाचत होते. त्यात असं सांगितलंय की अमेरिकेचे राष्ट्न्पती ट्न्मन यांनी हा शब्द प्रचलित केला. ज्या दिवशी `विकास करणे' हा शब्द वापरात आला त्या दिवशी आपण इतर करोडो लोकांना `मागास' असा शिक्का मारला ! मग `अमर पत्र' लिहिणारा चीफ सिएटल `मागास' का ? का नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास करणारे आपण मागास ? हा प्रश्न आपणच आपल्याला विचारायची गरज आहे.
छोट्या प्रमाणावर, स्वत:च्या गरजा भागवणारी शेती करण्याचा विचार पक्का होत गेला. साकवा, सुरतजवळील गाव. इथे धीरेन्द्र सोनेजी यांच्याकडे गेले. ते स्वत: आपल्या सर्व गरजा दोन एकर शेतीत भागवतात. त्यांच्याकडे गेल्यावर आपल्या गरजांचा विचार करून शेतीचं नियोजन कसं करता येईल ह्याची कल्पना आली. खरंच कुटुंब म्हणून एकत्र काम करून जगायचा अनुभव तिथे मिळाला. `जीवनाचं उद्दिष्ट काय?' ह्यावर त्यांनी विचार करायला लावला. ह्या जीवनशैलीत का पडायचं ह्याचा पूर्ण विचार करायला लावला. ते म्हणाले, ``जोपर्यंत जीवनाचा पूर्ण विचार होत नाही, तोपर्यंत वेगळी वाट चोखाळणं अवघड होतं. निर्णय घेताना सगळया शक्यतांचा विचार केला पाहिजे. निर्णय भावनिक नको. तरंच तो टिकतो.'' त्यांच्याबरोबरच्या चर्चेत तंत्रज्ञानाचा पण विषय आला. आधुनिक तंत्रज्ञान, दूरदर्शन, संगणक, मोबाईल याचा वापर कमी कमी करत टाळता आला तर छान ! तंत्रज्ञान वापरताना विवेकी वापर आणि अधिक वापर यातली सीमारेषा अस्पष्ट असते. त्यामुळे सतत भान ठेवायची गरज असते. ऊर्जा सघन संसाधनं न वापरणं आणि समुचित तंत्रज्ञान यावरही चर्चा झाली. ह्याचा विचार सुरू झाल्यावर असं लक्षात आलं की खरंच आधुनिक तंत्रज्ञान आपल्याला खूप भुरळ घालतं. आपण त्याच्या अधीन होतो.
सध्या मी वेगवेगळया सेंद्रिय शेेती करणाऱ्यांना भेटते आहे. त्यांची तंत्र समजून घेत आहे. त्यात उंबरगावजवळील श्री. भास्कर सावे यांच्याकडे गेले. ते आधुनिक काळातले नैसर्गिक शेतीचे भारतातले प्रणेतेच ! अठ्ठ्याएेंशी वर्षांचे सावे अजूनही स्वत: शेतात काम करतात. निसर्गाला गुरू मानल्यावर माणूस किती शिकतो हे त्यांच्याकडे पाहिलं की कळतं. त्याकाळचे ते सातवी पास. थोडा काळ शिक्षकाची नोकरी केली. मग सोडली. `शेती हा धंदा नाही, धर्म आहे.' ह्या वाक्याने ते नेहमी सुरुवात करतात. निसर्गावर श्रद्धा ठेवा. निसर्ग स्वत:चे संतुलन साधत असतो त्यामुळे त्यात जर ढवळाढवळ केली नाही तर आपल्याला शेतीत काहीच करायची गरज नाही असं ते मानतात. आणि ते अंमलातही आणतात. `निसर्गातल्या एकूण उत्पादनातला फक्त १० ते १५% भाग हा फळं आणि दाण्याचा आहे आणि माणसाचा हक्क फक्त त्यावर आहे. जर आपण हा नियम पाळला तर... शेतात काहीही बाहेरून आणायची गरत नाही. शेती हे एकच सृजनाचं काम आहे. पैसे मिळवणं म्हणजे चार खिसे खाली करणं आणि एक भरणं ! त्यामुळे शेतीत उत्पादन वाढवायचा विचार करू नये. एका दाण्याचे हजारो दाणे होतातंच !' असं ते कळकळीनं सांगतात. त्यांचा एक विशेष पैलू म्हणजे स्वत:च स्वत:ला लागणारी हत्यारं तयार करणं. त्यांनी कमी कष्ट करून पटापट काम व्हावं अशी अनेक अवजारं तयार केलीत. त्यांना स्वत:ला सगळं काम उभं राहून करता येईल अशी हत्यारं तयार केलीत. असा हा हरहुन्नरी माणूस!
फलटणला बाबुलाल गांधी यांच्याकडे गेले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शेती केली. अनेक दुष्काळांना पचवलंय. आणि तरीही त्यांचं शेत आजूबाजूच्या जागेत उठून दिसतं. वसुधा सरदार यांच्याकडे शेतीबरोबर अनेक सामाजिक प्रकल्प चालतात आणि तिथे अनेक लोक मिळून शेती करतात. या दोघांकडेही परत जायचं ठरवलं आहे.
एका बाजूला ह्या सगळया प्रवासाबरोबर मी आता माझीही शेती सुरू केली आहे. पुण्याजवळ २० कि.मी. अंतरावर सणसवाडीत एक-दोन एकर पडीक जमीन आहे. त्यावर आता शेतीचे प्रयोग करते आहे. ह्या जमिनीवर आम्ही एकत्र मिळून कष्टाची कामं करतोय.
बऱ्याच ठिकाणी दगडाचे बांध घालतोय. माती अडविण्याचं काम करतोय. मातीचे छोटे छोटे वाफे तयार करतोय. आणि माती तयार करायचं काम करतोय ! ह्याच जमिनीवर अनिलकाका (भागवत) यांच्या मदतीने आम्ही बांबू आणि तट्ट्या वापरून स्वत: एक घर बांधलं. शेतात घराच्या गरजेप्रमाणे पेरणी करते आहे. आणि निसर्गानुकूल जीवनशैलीकडे वाटचाल करायचा प्रयत्न करते आहे.
ह्या पडीक जमिनीवर काहीतरी होऊ शकतं ह्याचा विश्वास मला ऑरोव्हिलमध्ये मिळाला. तिथे अगदी उघड्या पडलेल्या दगडावर बर्नार्ड आणि दीपिका यांनी जंगल उभं केलंय. हळूहळू माती तयार करताहेत ते. ते नेहमी म्हणतात, `आमचं काम माती तयार करण्याचं आहे.'' सर्व काम स्वत: करणे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करत राहणं, कामाची श्रद्धा आणि चिकाटी मी ह्यांच्याकडेच पाहिली ! आणि पारंपरिक बियांची शुद्धता टिकवणे आणि त्यांचं संवर्धन करणं हे महत्त्वाचं काम ते करतात.
आपल्या जीवनात आपल्या अन्नधान्याशिवाय काही गरजा असतात. त्यासाठी पैसे लागतात. ती पैशाची गरज भागवण्यासाठी काही कौशल्यं वापरायचा विचार आहे. ह्यात शिकणं-शिकवणं, सकस/पौष्टिक पदार्थ करून देणं असं करता येईल. सध्या आम्ही घरात गहू, तांदूळ कमी करून इतर धान्यांचा वापर वाढवलाय आणि अजून अनेक बदल केलेत, जसं डिटर्जंट वापरणं बंद केलंय. पाण्याची बचत करतोय. आम्हांला, मला आणि माझ्या बहिणीला कौशल्यं शिकायची आहेत. त्यात निसर्गोपचार, मसाज, बांबूकाम, विणकाम शिकायचंय. ह्या सगळयाचा विचार सुरू आहे. पण अजून तर मी पुण्यातच राहते. नजीकच्या चार-पाच वर्षांत पुणे सोडायची तयारी आहे. आणि इंटिरियर भागात जमिनीचा तुकडा घेऊन राहायचंय.
माझ्या डोळयांसमोर बेळगावजवळील देवगिरी भागात राहणाऱ्या भोसलेदादांचा चेहरा उभा राहतो. पंचाऐंशी वर्षांचे भोसलेदादा अजून सायकल चालवत शेतात जातात. अजूनही फक्त आपल्या शेतात पिकलेलंच खातात. त्यांचं आरोग्य उत्तम आहे हे सांगायची गरज नाही. ह्या सगळयांना बघून माझा उत्साह द्विगुणित होतो.
ही नवी वाट चोखाळताना कदाचित अनेक अडचणी येतील. पण कुठल्या आयुष्यात अडचणी नसतात ?
ह्या सर्व लोकांच्या भेटीनं माझ्या आयुष्याला बळ दिलं. माझ्या पंखांना उडायची शक्ती दिली ! मुळांना रुजायला आधार दिला.
शेवटी मला िख्र्तास्न लेपर्टच्या पत्रातल्या ओळी आठवतात. मलाही तसंच जगायची इच्छा आहे.
अदिती संचेती
६, शिवनाथ अपार्टमेंट, १३०४/१०,
शुक्रवार पेठ, पुणे २.
Posted in



jcWALxlUrfHHTkEbe
buy klonopin uk generic - klonopin buy pills
hBtjWlPjVB
generic xanax no prescription - canada xanax
VmAJHFexXRhzpIdsd
ambien online purchase 10mg - ambien order
STRuEzVNJWS
buy klonopin - buy klonopin canada
SFUZYzxqWv
buy xanax no prescription online - generic xanax
GDrkbwejapEdacdEvnT
buy generic ambien no prescription - ambien buy generic
TvTSrMxKTYmqhlXh
eqM1gO gvrfcheaxorq, [url=http://uyykdaungyny.com/]uyykdaungyny[/url], [link=http://pcgpyvdukpdv.com/]pcgpyvdukpdv[/link], http://mkkomxajbydy.com/
BwRmVFBnqniR
cheap klonopin - Cheap klonopin usa
aFGCLcRrNHpm
ambien online canada - ambien cheap
cKFPRyMlMppgHJaU
Generic ambien - ambien online canada
oppYOdDIMz
shop tramadol - buy cheap tramadol
KOEcLMApPbzeyimijr
klonopin - klonopin buy
ZWxCGNcTxUvZjBynobr
ambien to buy - discount ambien
SuIUbSXEbjtXZ
Cheap canadian valium - valium lowest price
gGFHGfNnvmN
Discount klonopin online - Cost klonopin online
mceEQmByyJDSjLy
order tramadol online - cheap tramadol online
QdRXRUIerCaDensv
Buy valium online usa - buy cheap valium
tUhZYeBvvmReaeBEd
klonopin - klonopin no prescriptions
AJgEZJDAsc
order cheap ambien - Cheap ambien pills
JxRhOrmSLvBD
tramadol order - generic tramadol online
HIRIFzMNUgHspOjpoF
tramadol medication - buy tramadol cod
WkHUHtOkUS
ambien - ambien no prescription
bmFThwuRynBlvnJjOM
Cost xanax online - buy xanax online
oXyDZbLcbU
buy tramadol 100mg - cheap tramadol
KPPRrnNaphuSci
Buy cheap valium usa - Buy valium online wthout prescription
FVHOzFuldNMYnfSf
Buy ambien uk - ambien drug
yelYaMvVKU
Purchase xanax overnight delivery - xanax drug
oIalSITibIozDVftyZx
buy discount tramadol - buy tramadol cod
USUXPjDikDcVH
Cheap ambien usa - Generic ambien overnight
AEuBUodvzdEE
valium online no prescription - Buy cheap canadian valium
YIXIUhdSeaDmAQUbS
discount valium - valium buy online
WrjvbqeFzOGeOvFUVA
xanax valium - valium for anxiety
RmuOZDggrYZb
valium order - buy discount valium
kAUmtIPXEGFaSpOb
order cheap xanax - xanax online canada
XRZftGrZTSsUzEexKU
cheap valium rx online - buy valium medication online
NrTZwvbPHpMtUGUV
order valium online uk - buy valium online canada
viagra
swmrxd http://gomuhw.com/ skigllzo [url=http://ofhape.com/]skigllzo[/url]
gauHUSARgYiYIyj
Canadian generic valium - buy valium online
VELEUHfSVctBnHiGRf
generic xanax online - xanax delivered overnight
viagra
qvqvwo http://dayjhm.com/ ljqswu [url=http://qdchye.com/]ljqswu[/url]
zKTEHGSQXxZCmT
xanax cheap - xanax buy online
GGYRyjftyBhsXChIBjy
valium online - Cost valium online
EvhdOmZihLNpZYwzl
xanax without prescription - xanax without prescription
fNQIjlDTAHTkiMiEi
xanax - xanax buy online
CZDSpHQlUXDtxWeog
Best valium price - Buy valium online usa
HKYvPqJnjVxyZF
ambien order - discount ambien
GhqCjlVTSUGIJjQs
cheap tramadol online - tramadol online no prescription
VPFcPMIAMGIjccZUfz
ambien discount - buy ambien no prescription
dTVZmTpjPwO
tramadol discount - buy tramadol cod
lHEWrZkbsfHJACGLP
Buy valium online canada - valium