Skip to main content

सखी मंडळ

सखी मंडळ, पुणे

सुशिक्षित मध्यमवर्गीय स्त्रियांनी केवळ आपल्या कुटुंबाचा विचार करून न थांबता कुटुंबाबाहेरच्या सामाजिक वास्तवाची ओळख करून द्यावी या वास्तवाचे भान ठेवत, स्वत:ला विचार करायला लावणारे, विचार बोलून दाखविण्याची संधी देणारे, केवळ व्याख्यानांऐवजी सहभागी पध्दतीचा अवलंब करणारे असे कार्यक्रम करावे आणि या सगळयातून परस्परांमधला सखी भाव वाढवत, परस्परांना आधार देते. नव्यानव्या मैत्रिणींना आपल्यात सामावून घ्यावे. अशा प्रकारचे कार्यक्रम हे सखी मंडळाचे वैशिष्ट्य आहे.

मनमोकळया चर्चा आणि तज्ज्ञांची भाषणे
'मिळून साऱ्याजणी' या श्रीमती विदया बाळ यांच्या, स्त्री प्रश्नांना वाहिलेल्या मासिकाशी हे मंडळ संलग्न आहे. सखी मंडळातील चर्चा, भाषणे, कार्यक्रम खालील स्त्री विषयाच्या अनुषंगाने होतात.
- स्त्रियांचे कौटुंबिक नातेसंबंधातील अनुभव.
- स्त्रीचे कुटुंबातील स्थान
- स्त्री चे आरोग्य आणि तिची मानसिकता

प्रसिध्दी माध्यमे आणि स्त्रीया
- साहित्य चित्रपट, चित्रपट, नाटक दूरदर्शन मालिका यामधून होणारं स्त्री दर्शन
- विकासाची नवी साधने, उत्पादने आणि आपणा स्त्रियांशी त्याचा थेट संबंध
- अशा निरनिराळया विषयांवर कधी स्त्रियांची चर्चा तर कधी तज्ज्ञांची भाषणे.
- भाषणानंतर वक्त्यांना प्रश्न विचारण्याचीही संधी असते.

याखेरीज असेही कार्यक्रम
(अलिकडे झालेल्या काही कार्यक्रमांची शिर्षके)
- पुण्यातील वाहतुकीची कोंडी - सुजित पटवर्धन - श्रीकृष्ण साने
- स्त्रियांसाठी व्यक्तिमत्व विकासाची शिबीरे कशी आहेत, असावीत - आशा साठे, विद्या बाळ
- जैविक व रासायनिक शेतीविषयक - गांडूळ खत आणि गच्चीवरील बाग - बागेला भेट - लता श्रीखंडे
- संगणकावर स्वरावली (नोटेशन) श्रुती मराठे
- अमेरिकेतील मराठी माणसे (अमेरिका दौऱ्यानंतर) विद्या बाळ
- 'मीरा' एक अभिनव दर्शन - सरिता पदकी (नाट्य कार्यक्रम)
- आत्मशोधाची आनंद यात्रा - अभिनेत्री दीपा लागू, नयन कुलकर्णी, आशा साठे
- 'मिळून साऱ्याजणी' व इतर दिवाळी अंकावर चर्चा

सहली
वर्षातून १/२ वेळा आयोजित केलेल्या सहली हे सखी मंडळाचे आणखी एक वैशिष्टय आहे.
दिवसमराच्या किंवा मुक्कामाच्या या सहलीत सुनियोजित कार्यक्रम, सखींसाठी मनमुराद मोकळेपणा, गप्पा, चर्चा, विविध गुणदर्शन, जेवण, चहा, नाश्ता या सगळयाची व्यवस्था असते.
नुकतीच यावर्षी अशी एक सहल `कासुर्डी' येथील वृध्दाश्रमाला भेट देऊन आली.

मेळावे
पुण्याखेरीज महाराष्ट्नत व महाराष्ट्नबाहेर मुंबई (दादर-पार्ले) सोलापूर, भुसावळ, हैदराबाद, बँगलोर, भोपाळ अशा असेक ठिकाणी सखी मंडळाच्या शाखा आहेत.
दर दोन वर्षांनी सर्व ठिकाणच्या सखी मंडळांनी एकत्र येऊन एखाद्या गावी भरवलेला `मेळावा' हा सखी मंडळाच्या सभासदांच्या दृष्टिने एक आनंदा अनुभव असतो.
नुकताच दि. १९/२० डिसेंबर ०६ रोजी येथील पौडरोड वरील पुण्याई हॉलमध्ये पुणे मुंबईच्या संयुक्त वतिने सुमारे १५० हून अधिक स्त्रीयांच्या उपस्थितीत भरलेला हा मेळावा अतिशय उत्तम व अर्थपूर्ण रितिने साजरा झाला. त्यासाठी वरील सर्व ठिकाणाहून स्त्रीया आल्या होत्या. यापूर्वीही पुणे, बँगलोर, हैदराबाद, सोलापूर, भुसावळ, भोपाळ यासर्व ठिकाणी यशस्वी मेळावे झाले आहेत.

सखी - कार्यक्रम कधी व कोठे?
दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी कर्वेरोडवरील स्वप्ननगरीमधे डॉ. भूषण शुक्ला यांच्या मोकळया फ्लॅटमध्ये (पहिला मजला) दुपारी ठीक ४.०० वाजता सखी मंडळाचा कार्यक्रम असतो. प्रत्येक सभासदाला कार्यक्रमाचे पत्र पोष्टाने येते. वार्षिक वर्गणी रू. १०० आहे.

सभासद व्हायचे आहे?
मग खालीलपैकी निरनिराळया भागात असलेल्या कोणत्याही फोन नंबरवर फोन करा आणि कार्यक्रमाची माहिती घेऊन कार्यक्रमाला या. आल्यावर वर्गणी भरलीत तरी चालेल.
जरूर या आणि आपल्या मनातल्या विचारांना प्रश्नांना वाट मोकळी करून द्या.

सर्व कार्यक्रमांना मार्गदर्शन असते श्रीमती विद्या बाळ यांचे!

अनुराधा राव
(औंध)
९८२२०६५१९१
३०२२०३१७

नीना भेडसगांवकर
नवी पेठ
९८२२४४५४१०
२४५३८७६३

शशी भाटे
टिळक रोड
२४३३४५६१

अनुराधा खळदकर
बिबवेवाडी
२४३७३९४१