सनोबर अन्सारी : मी मालवणीमध्ये राहते. ९२ च्या दंग्यानंतर आम्ही इकडे राहायला आलो, माझ्या घरात आम्ही एकूण आठ माणसं ! मला तीन बहिणी आणि तीन भाऊ आहेत. तीनही भाऊ शिकत आहेत. मला पण शाळेत जायला आवडत असे. निदान १२ वी पर्यंत तरी शिकायची माझी इच्छा होती. पर शायद अल्ला को ये मंजूर नही था. इसलिये मैने पढाई को लेकर रोना और पढना भी छोड दिया है. आम्ही तिन्ही बहिणी कामं करून घर चालवतो. मी नववीमध्ये गेले तेव्हा माझी मम्मी टी.बी.मुळे बीमार पडली. त्यामुळे मला शाळा सोडावी लागली. अब्बा फेर्नचर बनविण्याचे काम करतात. त्यांचे काम सध्या ठीक चालत नाही म्हणून मी एका ठिकाणी शिलाईचे काम करून हातभार लावते. मी मुस्लिम आहे आणि मला त्याचा अभिमान वाटतो... मला ईदच्या सणाच्या वेळी आमची जात सगळयात जास्त आवडते... कारण तेव्हा आम्हांला बाहेर येण्याजाण्याची परवानगी असते. पण आमच्या जातीमध्ये मुलामुलीत जो फरक करतात तो मला अजिबात आवडत नाही. म्हणून मला हिंदू जात जास्त आवडते... हिंदू लोकांत मुलींना शिकायला मिळते, लग्न ठरवताना त्यांना विचारले जाते, म्हणून मला आपली जातच बदलावीशी वाटते !
शिल्पा जाधव : आम्ही बाबरेकर नगर झोपडपट्टीत राहत होतो. पण मतदान झाल्यानंतर सहासात महिन्यांनी एके दिवशी आमच्या झोपड्या तोडून टाकल्या... आम्हांला मामाच्या घरी राहायला जावं लागलं ! वडिलांना खूप टेन्शन आलं होतं... पण नंतर समजलं की ज्यांच्याकडे रेशनकार्ड आणि इतर पुरावे आहेत त्यांना दुसरीकडे जागा मिळेल. म्हणून आम्हांला पण हे नवीन घर मिळालं... पण त्या सगळया गडबडीमध्ये माझ्या अभ्यासाची पार वाट लागली... माझं दहावीचं वर्ष होतं..... दहावी फेल झाल्यावर मला घरात बसावं लागलं !... मला टीचर बनायची खूप इच्छा होती. मी थोडे दिवस एका पतपेढीमध्ये काम केले. तिथे माझी सिद्धार्थ सरांशी ओळख झाली. त्यांनी एका संस्थेमध्ये छोट्या मुलांना इंग्रजी शिकवायचे काम आहे असे सांगितले... मला ते काम खूप आवडले... पण त्या संस्थेची जी जागा होती तिथे शेजारीच वस्तीमधले मुलगे क्रॅरम खेळायला येत असत... माझी आई म्हणाली - तू अशा ठिकाणी रोज जायला लागलीस तर आम्हांला लोकांचे चार शब्द ऐकायला लागतील. माझं टीचर बनायचं स्वप्नं काही पूर्ण होऊ शकले नाही.
समीना खान : मी बांद्य्राला राहते... माझे पप्पा ड्नयव्हर आहेत आणि मम्मी टेलर आहे. मी एस.वाय.बी.कॉम. शिकते आहे. मी एका संस्थेतर्फे सेल्फ डिफेन्सचा कोर्स केला होता...तरीपण मला कॉन्फिडन्स आलाच नव्हता... एक दिवस माझ्यासोबत असा हादसा झाला की मला एकदम कॉन्फिडन्स आला ! मला कॉलेजमध्ये एक मुलगा फार त्रास देत असे, जवळजवळ वर्षभर हा त्रास सुरू होता... नाईलाजाने मी डिसिप्लीन इनचार्जकडे गेले. पण काही उपयोग नाही झाला... मग एके दिवशी मीच त्याच्या जोरदार थोबाडीत लगावली... त्यानंतर त्याने मला कधी परेशान केले नाही.
प्रियांका भट : माझ्या मॉमने शिक्षणाला नेहमीच महत्त्व दिले आहे. माझे जर्नालिझम पूर्ण झाले की मला जिथे प्लेसमेंट मिळेल तिथे पाठवायलाही ती काही नाही म्हणणार नाही. मला आणि माझ्या बहिणीला लहानपणापासून सगळे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य तिने दिले आहे. इतर मुलींसारखा आम्ही त्याचा गैरवापर करीत नाही. माझ्या किती फ्रेन्डस प्रोजेक्टच्या नावाखाली घराबाहेर पडतात आणि मग एखाद्या फ्लॅटवर जमून त्यांची `मेक आऊट सेशन्स' चालतात... आमच्या क्लासमधल्या एक दोन मुलींवर त्यातून अॅबॉर्शनची वेळ आली होती... का या मुली असं वागतात?
समीना, छाया, सनोबर, प्रियांका, शिल्पा, तेजल - मुंबईतल्या बिनचेहऱ्याच्या गर्दीतले हे काही ठिपके. उभ्या आडव्या रेषांनी आपल्यासारख्याच इतरांना जोडून घेत त्यांनी तयार केली एक रांगोळी ! त्या रांगोळीत खूप सारे रंग होते - हसण्याचे, रडण्याचे, रुसण्याचे, स्वप्नांचे, आकांक्षांचे... आणि होती खूप सारी प्रश्नचिन्हं... प्रश्न होते स्वत:साठीच... स्वत:च्या आयुष्यातले... तरीही एकेकटीच्या अंगणाच्या कुंपणांना ओलांडून जाणारे... या महानगराच्या धावपळीचा पोत घेऊन तयार झालेले प्रश्न... सीध्यासाध्या जगण्याला चक्रव्यूह बनवून टाकणारे अगणित प्रश्न... प्रश्नांच्या या चक्रव्यूहाला छेद देण्याची हिंमत जेव्हा त्यांनी दाखवली तेव्हा उत्तरे शोधता शोधता त्यांचे क्षितिजदेखील आपोआप विस्तारत गेले !
गेली चार वर्षे मी मुंुबईतील मुलामुलींना औपचारिक शिक्षणचौकटीच्या बाहेर सामाजिक संशोधन शिकवण्याचा प्रयोग करीत आहे. संशोधन करण्याच्या निमित्ताने तरुणांनी स्वत:च्या जगण्याकडे जागरूकपणे पाहावे आणि त्यात अर्थपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी विचार करावा असा माझ्या `यूथ फेलोशिप' प्रकल्पाचा एक उद्देश आहे. या प्रकल्पात आजवर १८ ते २५ या वयोगटातील एक हजाराहून जास्त मुलामुलींनी भाग घेतला आहे. साधारण दहा ते पंधरा जणांचा गट तयार करून ही मुले स्वत:च्या आयुष्याला भिडणाऱ्या एखाद्या प्रश्नावर संशोधन करतात. संशोधनाचा विषय ठरवण्यापासून त्याचे निष्कर्ष समाजापर्यंत पोहोचवण्यापर्यंतचे सर्व काम करण्यासाठी वर्षभराचा कालावधी त्यांना मिळतो. बऱ्याचशा गटांमध्ये मुलगे आणि मुली एकत्र काम करतात. माझ्या असे लक्षात आले की ज्या गटांमध्ये ८०% पेक्षा जास्त प्रमाणावर मुलींची संख्या आहे, त्या गटांनी संशोधनासाठी निवडलेले विषय हे `स्त्री' म्हणून महानगरामध्ये येणाऱ्या अनुभवाला अधिक महत्त्व देणारे होते. मागच्या वर्षी अशा आठ गटांपैकी सहा गट कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि कष्टकरी वर्गातल्या मुलींचे होते. विशेष म्हणजे त्यातही तीन गट मुस्लिम मुलींचे होते.
या मुलींनी - प्रश्न विचारणे, माहिती गोळा करणे, तिची मांडणी करणे, तिचा अर्थ लावणे आणि त्यातून निष्कर्ष काढणे - अशी जी प्रक्रिया केली ती मी वर्षभर जवळून पाहात होते. निरनिराळया टप्प्यांवर त्यांच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी त्यांच्या प्रक्रियेत सहभागी होत होते. मदत करीत होते. त्यामुळे मला आजची सर्वसामान्य तरुणी स्वत:बद्दल आणि समाजाबद्दल कसा विचार करते ते पाहायचीही संधी मिळाली. जेमतेम शंभर मुलींची संशोधन प्रक्रिया पाहून मांडलेली माझी ही निरीक्षणे आहेत. तेवढ्यावरून आख्ख्या तरुण पिढीबद्दल विधान करण्याचे धाडस मी करणार नाही ! तरीही मुंबईच्या विविध उपनगरांमध्ये राहणाऱ्या विविध धर्म आणि सामाजिक वर्गातल्या या मुलींच्या अनुभवात असंख्य शहरी मुलींच्या अनुभवांचे आणि दृष्टिकोनांचे प्रतिध्वनी मला ऐकू येत राहिले. त्यांनी संशोधनासाठी निवडलेले विषयच पहा.. !
मुस्लिम मुलींच्या एका गटाने `बुरख्याचा वापर' हा विषय संशोधनासाठी निवडला होता. कष्टकरी वर्गातल्या मुलींनी वस्तीपातळीवर येणाऱ्या अनुभवांना महत्त्व देऊन `कुटुंबातल्या व्यसनी पुरुषांमुळे स्त्रियांवर होणारे परिणाम' या विषयावर अभ्यास केला; तर गिरणगावात कामगार वस्तीमध्ये राहणाऱ्या मुलींच्या गटाने `मध्यमवर्गीय मुलींची निर्णयक्षमता' हा विषय निवडला होता. उच्च मध्यमवर्गीय मुलींच्या दोन्ही गटांनी `वय' हा घटक अधोरेखित करून `किशोरवयीन मुलींची खरेदी' आणि `किशोरवयातील गर्भधारणा' असे विषय निवडले. स्वयंसेवी संस्थांशी ज्या दोन गटांचा जवळचा संबंध होता त्यांनी `हक्क' या जाणिवेतून आपल्या अभ्यासाला महत्त्व दिले होते. दोन्ही विषय हे सार्वजनिक ठिकाणी स्त्रियांच्या वावरण्यावर पडणाऱ्या मर्यादांविषयी होते. त्यापैकी एका गटाने `प्रवासात येणारे लैंगिक छळाचे अनुभव' या विषयावर काम केले तर मुस्लिम मुलींच्या गटाने `मुलींच्या हिंडण्याफिरण्यावर येणारी बंधने' हा विषय अभ्यासासाठी निवडला होता. या सर्व गटांनी संशोधनासाठी जे प्रश्न निवडले त्या प्रश्नांचा या मुलींच्या रोजच्या जगण्याशी प्रत्यक्ष संबंध होता. आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटनांच्या कारणांबद्दल एक कुतूहल तर होतेच, पण कधी त्यात राग मिसळलेला होता आणि कधी परिस्थिती बदलण्याची इच्छा देखील होती !
संशोधन करताना एकप्रकारे नव्या ज्ञानाची निर्मिती करण्याचे काम केले जात असते. संशोधकाची वैशिष्ट्यपूर्ण पार्श्वभूमी आणि जगण्याचे संदर्भ घेऊन हे ज्ञान तयार झालेले असते. म्हणून संशोधन करण्यासाठी कोणत्या विषयाची निवड केली जाते इथपासून संशोधकांचा प्रभाव त्या नव्या ज्ञानाचा पोत ठरवायला मदत करू
लागतो. एकदा विषयाची निवड झाली, की माहिती गोळा करण्याचा टप्पा सुरू होतो.
संशोधन करणाऱ्या मुलींच्या वैयक्तिक आयुष्यातील अनुभवांचा प्रभाव त्यांच्या माहिती गोळा करण्याच्या पद्धतींवर झालेला दिसला. मालवणी या मालाडच्या उपनगरात राहणाऱ्या कष्टकरी मुलींचा गट... या गटातील मुलींना शिक्षण अर्धवट सोडावे लागले आहे. कुटुंबाची आर्थिक निकड भागवण्यासाठी त्यांना काम करावे लागते. पण त्यानिमित्ताने त्यांना स्वत:मधील क्षमतांचा शोध लागला आहे. ज्या ठिकाणी त्या काम करतात तिथे त्यांना परिस्थितीवर मात करून यशस्वी झालेल्या व्यक्ती पाहायला मिळालेल्या आहेत. अशा या मुलींना आपल्या वस्तीमध्ये भरपूर व्यसनाधीन लोक आणि त्यामुळे त्रासलेली कुटुंबे दिसत होती. यात बदल घडवून आणावा अशी त्यांची मनापासून इच्छा होती. परंतु जी माणसे आपल्या घरातल्या लोकांना जुमानत नाहीत, ती आपले म्हणणे ऐकून तरी कशी घेतील असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. तरीदेखील या कुटुंबातील बायकांशी बोलून पाहावे असा विचार करून त्यांचे म्हणणे समजून घेण्यासाठी त्यांनी संशोधनाला सुरुवात केली. या स्त्रियांना होणाऱ्या त्रासांची नोंद करतानाच - हा त्रास कमी करण्यासाठी तुम्हांला काय करावेसे वाटले ? - असा प्रश्न त्यांनी या महिलांना विचारला. बहुसंख्य महिलांनी या प्रश्नाचा कधी विचारच केलेला नव्हता ! सततची गरिबी, छळ यांनी पिडल्यामुळे त्यांच्यात मोठ्या प्रमाणावर निराशा तयार झालेली होती. पण प्रश्न विचारणाऱ्या मुलींमध्ये स्वत:च्या सक्षमतेच्या जाणिवा जाग्या झालेल्या होत्या. आपण परिस्थितीवर मात करू शकतो हे स्वत:च्या अनुभवातून त्या शिकलेल्या होत्या. त्याच जाणिवेचे प्रतिबिंब त्यांच्या प्रश्नातून पडले.त्याचप्रमाणे, `मुलींच्या हिंडण्याफिरण्यावरील बंधने' या विषयासंबंधी संशोधन करणाऱ्या मुस्लिम मुलींच्या गटातील प्रत्येकीला नोकरी, शिक्षण, छंद या निमित्ताने घराबाहेर पडण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर जाचक बंधनांचा सामना करावा लागलेला होता. पण वस्तीतल्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून या बंधनांना ओलांडण्यात त्यांनी यश मिळवले होते. मुलींच्या विकासात अडथळे आणणाऱ्या मानसिकतेविषयी त्यांना अतिशय रागदेखील होता. आपल्याच वस्तीतील आपल्यासारख्या मुलींच्या भावना अधोरेखित करणारा हा विषय त्यांनी संशोधनाकरता निवडला; तरी त्यांच्या आईवडिलांची बाजू समजून घेण्याचीही त्यांची तयारी होती. म्हणून त्यांनी मुलींच्या पालकांच्याही मुलाखती घेतल्या. आपल्या पालकांच्या वयाच्या व्यक्तींना धार्मिक भावनांना आव्हान देणारे प्रश्न विचारायलाही त्या कचरल्या नाहीत. मुलींना सार्वजनिक ठिकाणी वावरताना जाणवणाऱ्या सुरक्षितता, सोय आणि मोकळेपणा अशा विविध पातळयांवरच्या तरल अनुभवांना स्पष्ट करणारे टोकदार प्रश्न त्यांनी विचारले.
`प्रवासात होणारी लैंगिक छळणूक' याविषयी काम करणाऱ्या गटातल्या प्रत्येकीला अशा प्रकारचा त्रास सहन करावा लागला होता. याच गटाने स्त्रियांखेरीज पुरुषांना आणि ट्नन्सजेंडर व्यक्तींना कशा प्रकारे त्रास दिला जातोय - हे समजून घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले. स्वयंसेवी संस्थेसोबत काम केल्यामुळे सामाजिक न्याय, मानवी हक्क या संकल्पना त्यांना परिचयाच्या आहेत. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांतूनही लोकांना या त्रासावर कोणत्या प्रकारच्या उपाययोजना हव्या आहेत - याकडे लक्ष वेधलेले होते.
या संशोधन करणाऱ्या गटांमधील अनेक मुली शिक्षण आणि नोकरी या निमित्ताने घराबाहेरच्या सार्वजनिक अवकाशात पाय ठेवू शकलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांच्या आत्मविश्वासात लक्षणीय वाढ झालेली आहे. ज्या गटातील मुलींनी संघर्ष करून स्वत:चे आयुष्य बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या गटाने मुलाखती आणि सर्वेक्षण यामध्ये जे प्रश्न विचारले ते परिस्थितीमध्ये बदल घडविण्याच्या दिशेने विचार करायला प्रवृत्त करणारे दिसले. परंतु, ज्या गटांमधील मुलींना त्यांच्या सुरक्षित, संरक्षित आयुष्यामुळे अशा प्रकारे संघर्षाचा सामना करावा लागलेला नाही - त्यांच्या प्रश्नांमध्ये अशा प्रकारचा विचार जाणवला नाही.
बहुतेक गटांनी मुलाखती आणि प्रश्नावली यांचा प्रामुख्याने वापर केलेला आहे. त्यासोबत काही विशेष बाबतीतली माहिती गोळा करण्यासाठी गटचर्चा आणि नकाशे काढणे, चित्र काढणे यांचाही वापर केला होता. ही माहिती गोळा करताना त्यामागील लोकांच्या भावनांचा विचार जागरूकपणे केलेला दिसतो. प्रवासात होणाऱ्या लैंगिक छळाविषयी प्रश्न विचारताना - शरीराच्या कोणकोणत्या भागांना छळाचे लक्ष्य बनवले जाते - ह्या प्रश्नाचे उत्तर द्यायचा लोकांना संकोच वाटत आहे; असे लक्षात आल्यावर गटाने प्रश्नावलीसोबत शरीराची एक आकृतीही जोडली आणि त्यावर खुणा करायला सांगितले. मुलींवरील जाचक बंधनांचा विचार करणाऱ्या गटाने वस्तीतल्या कोणकोणत्या ठिकाणी आपण जातो किंवा जाण्याचे टाळतो हे दाखवणारे नकाशे गटचर्चेच्या दरम्यान तयार करून घेतले. तर व्यसनाधीन पुरुषांच्या कुटुंबातील स्त्रियांसोबत घडवून आणलेल्या गटचर्चांमध्ये त्यांच्या संतापाला वाट करून द्यायला मदत झाली होती. `किशोरवयीन गर्भधारणा' याविषयीसंबंधी काम करणाऱ्या गटानेही समाजाच्या विविध घटकांचे विचार समजून घेण्यासाठी फिल्म्स दाखवून त्यावर चर्चा घडवून आणणे, चित्रे आणि खेळ यांच्या माध्यमातून भावनांच्या अभिव्यक्तीला वाव देणे अशा अभिनव पद्धतींचा उपयोग केला. संशोधन करणारा गट आणि ज्यांच्याविषयी संशोधन केले जाते आहे तो गट यांच्यात अनुभवांच्या पातळीवर खूपसे साम्य असल्याने हा परिणाम झालेला आहे. एकप्रकारे स्वत:च्या अनुभवांच्या अभिव्यक्तीलाही वाव देऊन टोकदार बनवण्याची प्रक्रिया म्हणून संशोधनाचे काम उपयोगी ठरले आहे.
मिळालेल्या माहितीचे जे विश्लेषण केले त्यातूनही त्यांचा स्वत:विषयी आणि समाजाविषयीचा दृष्टिकोन ठळकपणे समोर येतो आहे. मुस्लिम मोहल्ल्यामध्ये मुलींच्या हिंडण्याफिरण्यावर येणाऱ्या जाचक बंधनांची नोंद करताना मुलींचे आणि त्यांच्या पालकांचे जे विचार समोर आले त्यातला विरोधाभास त्यांनी अतिशय टोकदारपणे विश्लेषणातून मांडलेला दिसला. आपल्या मुली घराव्यतिरिक्त कुठेही सुरक्षित नाहीत अशी पालकांची भावना आहे तर मुलींनी मात्र वस्तीतल्या आणि वस्तीबाहेरच्या अनेक जागा सुरक्षित आणि कंफर्टेंबल म्हणून वेगवेगळया नमूद केलेल्या आहेत. कुटुंबातील व्यक्तींसोबतच मुलींनी घराबाहेर पडावे असा पालकांचा आग्रह दिसला. तेव्हा - `कुटुंबातील लोक सोबत असले तरीही आम्हांला त्रास होऊ शकतो हे पालकांना कसे समजत नाही ?'' असा थेट प्रश्न या मुलींनी विचारला आहे. व्यसनाधीन पुरुषांच्या कुटुंबातल्या स्त्रियांना जो छळ सहन करावा लागतो त्याचे वर्गीकरण करून या मुली थांबत नाहीत. दारू पिऊन आलेला पुरुष फक्त आपल्याच बायकापोरांना मारहाण करतो आणि घराबाहेर हाकलूनही देतो, पण त्याचवेळी शेजारी, मित्र यांच्याशी त्याचे वागणे हिंसक नसते असे महत्त्वाचे निरीक्षण त्या नोंदवतात. या संशोधकांनी मिळवलेल्या माहितीतून दिसणारे समाजातले सत्तासंबंध आणि विविध अनुभवातील तरलतेचे सूक्ष्म फरक आवर्जून मांडले आहेत.
या विश्लेषणातून जी उमज तयार झाली तिला त्यांनी तटस्थपणे केवळ अभ्यासाच्या पातळीवर ठेवलेले नाही; तर आपल्या रोजच्या जगण्यामध्ये तिला कसे जोडून घेता येईल याचाही विचार केलेला आहे. प्रत्येक गटाने संशोधनातून जे निष्कर्ष काढले त्यांच्या आधाराने बदलाची दिशा सूचित केली आहे.
प्रवासातील लैंगिक छळाचा अभ्यास करणाऱ्या गटाला जाणीवजागृती आणि सहप्रवाशांनी एकमेकाला मदत करणे यासाठी काम करावेसे वाटते. तर व्यसनपीडित कुटुंबाविषयीच्या संशोधनातून अशा स्त्रियांना मनमोकळेपणाने बोलता यावे अशी जागा तयार करायच्या प्रयत्नाची गरज पुढे आली आहे. `किशोरवयीन गर्भधारणा' या विषयासंबंधी काम करणाऱ्या गटाला वाटत असे की मुलींनी अशी गर्भधारणा होऊ देणे हा तिचा बेजबाबदारपणा आहे पण केवळ मुलीला दोष देण्याऐवजी लैंगिकतेशी संबंधित मुद्द्यांविषयी समाजात असलेली गुप्ततेची कोेंडी फोडण्याचे प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे इथपर्यंत त्यांच्या जाणिवेचा प्रवास झाला. म्हणून या विषयावर मनमोकळी चर्चा घडवून आणता यावी यासाठी त्यांनी एका खेळाची निर्मिती केली आहे. लैंगिकतेसंबंधीच्या एका बंदिस्त मुुद्द्यावर चर्चा करण्यासाठी जे अवकाश उपलब्ध झाले त्याचाच काही भाग समाजापर्यंत पोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. संशोधनाच्या प्रक्रियेच्या निमित्ताने त्यांच्या हातात एक सामाजिक परिवर्तनाचे साधन मिळाले आहे. त्यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर - `अगर हम दूसरोंका दुख बांट लेते है तो अपनी और उनकी भी मदद कर सकते है, ज्यादा नही पर थोडा तो बदलही सकते हैं' ही जाणीव मला सर्वात जास्त मोलाची वाटते.
आज तरुण मुलींवर अनेक प्रकारची दडपणे आहेत, एक व्यक्ती म्हणून विकास होण्यात असंख्य अडथळे आहेत... पण त्यांच्या बरोबरीने दडपणांवर मात करण्याच्या संधीदेखील दिसत आहेत. ज्या मुलींना या संधीची झलक पाहायला मिळाली आहे त्यांना आता सुरक्षिततेच्या नावाखाली लादल्या जाणाऱ्या दडपणाखाली राहायची इच्छा उरलेली नाही ! विकासाची नवनवी क्षितिजे त्यांना खुणावत आहेत. स्वत:च्या क्षमतांची जाणीव त्यांना झालेली आहे. परिस्थितीमध्ये आपण बदल घडवून आणू शकतो ही त्यांच्यातील भावना तेवत ठेवण्यासाठी प्रयत्न करता आले तर त्यांच्या पंखांना मोठी भरारी घेण्याचे बळ मिळेल !
वंदना खरे
पुकार, आय - ४,२ रा मजला, कमानवाला चेंबर्स,
सर पी.एम.रोड, फोर्ट, मुंबई ४०० ००१



nfl jerseys
At that time, the basketball was not preferred within with the USA. The American's preferred complement titles experienced been the NFL (National Football League), MLB (Major League Baseball) and NHL (National Hockey League).
nfl jersey
nfl kids jerseys
kids nfl jerseys
ugg sale, the symbol of
ugg sale, the symbol of classy, deluxe and stylish which has enjoy high evaluation by trendy women all over the world. You will discover its trace everywhere if you spend consideration for the people' feet in winter, in fact, this pair of Ugg boots has turn to be the most popular with its personalized and fashionable design. It is created with the best twin-faced sheepskin, the Boots sale characteristics a removable and replaceable insole which has the capability to retain your feet warm and comfortable."
Rolex watch replica wrist
Rolex watch replica wrist watches are among the the majority of desired add-ons on the planet. There are a variety of things which makes these types replica watches uk t at a lower Cartier Organization, via hundreds of years, designed all of the luxurious as well as extremity within expenses associated with valuable gemstone uk replica watches zel RM 020 Watches Replica. the consumer is certainly heading to become extremely harm about this. They are scenarios that you simply would by no means rolex replica he compensation 500,000, from the particulars of the business to erect its personal property a higher 300 meters broad, sixty meters of outside billboards, f replica watches acking. Lacking costs indicates the actual fake excellence of the shoes or boots are jeopardized and those that are too costly — will be a waste uk replica watches for that agreement from the model in the organization.Alain Silberstein is really a globe acknowledged brand name with regards to watches. This continues to replica watches ing and stylish watches that an individual needs to select from.1 brand which has a big choice of stunning and stylish watches is Emporio Armani.Armani ar replica watches uk obtain a Rolex watch replica watch with out leading to any kind of stress in your spending budget that is definitely not feasible just in case if you are chanel handbags st-effective ah! That cost will be the praise. My louis vuitton handbag is orange. It seemed extremely large and tall stature, allow my small lady hiding within, replica watches al benefit of elevation where you receive the actual opportunity to be in a position to consider the globe from the various viewpoint. Which is not l swiss replica watches ses can also be probably the most costly nation to almost 50000 RMB, so the individuals of Shanghai would be the most exceptional cough, what distortion concept, Replica Handbags e globe ahs altered by big. Issues that had been prohibited formerly are now the require of numerous and that’s how the planet continues to be operating chanel replica numerous while you want. It’s merely an incredible provide for all you gals and guys available.Existence isn’t as harsh because it seems. We m replica watch ough dealing with may cause them to bend or break.here are a few bezels which are very costly. Harmful certainly one of these will definitely not be u Replica Handbags le in sequence for example M56381, M56882, M93702, as well as M93703 and so forth. These types of design amounts as well as their own title image are ve uk replica watches ich means you see you took the actions and study this bit of content material for your self and consequently you’ve encounter an answer for existence replica watches 1 it is certain you will get the very best there’s on the market if you opt to purchase one of those slinky replica footwear. Along with best manufactu replica chanel simply a duplicate of awesome branded; I wish to inform them that this assumption was accurate many years again although not any much more as well as watches replica