लहानपणापासून मला नादाचा विलक्षण नाद आहे. आणि तो फुुटकळ शब्दचमत्कृतीपुरता नाही. आसमंतातील सगळे ध्वनी-नाद-लय-ताल-सुरांची कंपनं-आवर्तनं सारखी कानांतून मनात उतरत असतात. जी सुखद वाटतात त्यांची मनातल्या मनात उजळणी होते. जी अप्रिय वाटतात ती विसरण्याचा प्रयत्न होतो, पण जगत असताना आसपासची एक दुनिया असते तशी आवाजाची एक स्वतंत्र दुनिया असते असं वाटतं. आठवतंय तेव्हापासून एखाद्याच्या नजरेतून काही सुटत नाही म्हणतात तसं माझ्या `कानातून काही सुटत नाही' हे खूपदा जाणवायचं. इतरांनाही आणि मलाही.
आताच्या प्रगत विज्ञानाच्या भाषेत अशा व्यक्तीला `ऑडिओ पर्सन' असं म्हणतात. ज्याची ध्वनिसंवेदना तीव्र आहे अशी व्यक्ती. सर्व माणसांना निसर्गाने सर्व संवेदना दिलेल्या असल्या तरी त्यांची तीव्रता सारखी नसते. कोणाची दृष्टी वेधक, कोणाचे कान तीव्र, कोणाचं घ्राणेंद्रिय तीक़्ष्ण, कोणाची स्पर्शभावना तरल वगैरे वगैरे. ज्याची जी संवेदना तीव्र तिचं त्याला होणारं आवाहन मोठं. एक संवेदना अतितीव्र झाली तर दुसरी एखादी मंद असण्याची शक्यता जास्त. हे विश्लेषण माझ्या लहानपणी नसावं किंवा कुठे ग्रंथपोथीत असेल तर ते आमच्यापर्यंत आलेलं नसावं. आसपास कुठे काही खुट्ट झालं तरी आपले कान त्याची नोंद घेतात हे मात्र कळत असे. ह्याची खूप लहानपणची आठवण पाण्याच्या संदर्भातली आहे. तिसऱ्या मजल्यावर राहायचो, तिथे पाणी चढत नसे. आतासारखे पंप, टाक्या वगैरे सोयीही तेव्हा नव्हत्या. त्यामुळे पहाटे उठून म्युनिसिपालटीचं पाणी भरून ठेवण्याचं मोठंच काम घराघरातल्या बायकांना असे. आईची पहाटे चार-साडेचारपासून लगबग चाले. मी अंथरुणात पडल्यापडल्या सांगायची, ``आई, खाली कोल्हटकरांकडे पाणी सोडलंय. एवढ्यात आपल्याकडे येणार नाही. झोप तू.'' किंवा ``अजून सहा नंबरचा नळ ठण्ण कोरडा आहे आपल्याकडे काय जादूनं पाणी येणार आहे?'' पाण्याचा प्रवास फक्त आवाजावरून मी अचूक ओळखायची.
शाळेत पी.टी.च्या एक शिक्षिका होत्या. का कोण जाणे, त्या `भोज्जा' हा शब्द `भोंज्या' असं म्हणायच्या. ``चला गं पोरींनो,चटकन् भोंज्याला शिवून या'' वगैरे. मला `भो'वरचा तो अनावश्यक अनुस्वार फार त्रासदायक वाटायचा. उगाचच भोंदू, भोंगळ असले शब्द
कती निरुपद्रवी होता ! त्याला ही उपाधी कशाला ? एकदोनदा मैत्रिणींमध्ये मी ह्याबद्दल तक्रार नोंदवली. एक मैत्रीण म्हणाली, ``आम्ही मुली बाइंर्चं बोलणं एवढं लक्ष देऊन ऐकतच नाही !'' मी तरी कुठे लक्ष देऊन ऐकायचे ? ते शब्द स्वत:हून माझ्या कानात वस्तीला यायचे.
आईच्या परिचयातल्या एका बाइंर्ना माझ्या रंगरूपाबद्दल सदैव चिंता असायची. पण ``त्यासाठी तिचं काही अडणार नाही. ती फार कामीट आहे'' अशी पुस्ती जोडून त्या सावरून घ्यायच्या. त्यांना `कामसू' म्हणायचं असायचं पण `कामीट' म्हटलं की मला कसंतरी व्हायचं. रागीट म्हटल्यासारखं ! किंवा कटकट, खिटखिट, पिटपिट वगैरे `ट' कारांना शब्दांमधून जशी अप्रियता सुचवली जाते तिची कळा यायची. श-स-ह-ळ सौम्य तर ट-ठ-ड-ढ उग्र-अप्रिय असा काहीतरी ग्रह व्हायचा. हसवाफसवी चालेल एकवेळ पण गंडवागंडवी नको. डोस्कं फिरायला हरकत नाही पण `डांेबला'चं काही व्हायला नको आणि `बोडखं' तर नकोच नको. आषाढ हवाहवासा, आखाड छळवादी आणि आखाडा तर सरळ दोन हात करायला लावणारा. असे अनेक शब्द खुणावत राहायचे. भाषाशास्त्र अशी काही चीज असते हेही माहीत नसण्याच्या वयापासून भाषा मला अशी खुणावत असायची.
आमच्या शाळेचे मुख्याध्यापक हे संस्कृत पंडित होते. भाषेच्या लेखी आणि बोली ह्या दोन्ही रूपांच्या शुद्धतेवर त्यांचा फार कटाक्ष असे. एकेक उच्चार ते घोटवून घ्यायचे. शब्द जराही वेडावाकडा उच्चारला की ते संतापायचे. सध्याचं `रच्ना-याच्ना' छापाचं बोलणं त्यांनी कधी सहनच केलं नसतं; पण पोटफोड्या ष आणि शेंडीफोड्या श हेही अगदी चोख उच्चारले जावेत ह्यासाठी ते रक्त आटवत. मुलांनी `इंद्रधनुष्य'मधला `ष्य' श्यामसारखा म्हणता कामा नये. `नि:शेष' ह्या शब्दाच्या उच्चारावर त्यांनी वर्गाचा एक तास घालवला होता. ऱ्हस्व नि, पुढे विसर्ग, पुढे शहामृग श आणि पुढे पोटफोड्या ष हे उच्चार ह्या क्रमाने असेच आले पाहिजेत. मी तो शब्द चोख म्हणते. उच्चार अगदी अचूक करते म्हणून त्यांनी माझी पाठही थोपटली होती. त्या शाबासकीइतकीच त्यामागच्या साक्षेपाची जाणीव झाली.
बहुत करून आतापेक्षा त्या काळात वातावरणात एकूणच कमी आवाज असावेत. ना एवढी माणसं, ना एवढी वाहनं, ना त्यांचे कर्णे, ना अष्टौप्रहर गळत राहणारी माध्यमं, ना मोबाईलवरची सततची बडबड. रात्री साडेनऊ, दहानंतर मुंबईतसुद्धा `सारं कसं शांत शांत'असे. त्या शांततेत आणि एरवीही दिवसभर सोबत करणारी महत्त्वाची यंत्रणा म्हणजे रेडिओ. रेडिओचा घड्याळ म्हणून, वेळापत्रक म्हणून, पार्श्वसंगीत म्हणून तसंच करमणूक म्हणून उपयोग करणारी माणसं चौफेर होती. त्यामुळे आसपास एक ना एक रेडिओ सतत लावलेला असे. आताइतका प्रायोजित कार्यक्रमांचा सुळसुळाट नव्हता त्यामुळे जाहिरातींचा व्यत्यय न येता सलग बारा-पंधरा मिनिटांचं भाषण, सलग अर्ध्या तासाचं नभोनाट्य आणि दिवसभर विविध प्रकारचं संगीत कानांवर पडायचं. बोलण्याच्या नाना परी आणि सुरावटीच्या नाना लहरी सतत नोंदवल्या जायच्या. आकाशवाणीच्या मुंबई `ब' केंद्रावर `वनितामंडळ' हा महिलांचा कार्यक्रम सादर केला जाई. ती दुपारच्या जेवणाची वेळ असे. `वनिता मंडळाची' आरंभ धून (सिग्नेचर ट्यून) आणि जेवण ह्याची मनात किती पक्की सांगड बसली असेल ? तर अजूनही एखाद्या भोजनप्रसंगी `वदनी कवळ...' `पार्वतीपते...' वगैरे म्हणताना मला मागे पुसटशी `वनिता मंडळाची' धून वाजते आहे असा भास होतो.
मुद्दा ध्वनिसंस्काराचा आहे. चांगला ध्वनिसंस्कार टिपायला, शोषून घ्यायला, कान आणि मन उत्सुक होतं आणि बाहेरून तो सहजासहजी पुरवला जात होता ह्याबद्दलचा कृतज्ञतेचा आहे. शाळेत शेकडा शंभर मराठी मुलं. सर्व व्यवहारांचं माध्यम फक्त मराठी. मराठी क्रेमक पुस्तकं आणि मराठी अवांतर पुस्तकं ह्यात वाचन सामावलेलं. ह्यामुळे मराठी पद्य आणि गद्यही ध्वनीची कायकाय गंमत करू शकेल ह्याचं वारंवार प्रत्यंतर यायचं. नादासाठी कवितांमध्ये केलेली ऱ्हस्वदीर्घाची ओढाताण, कानामात्रांची फिरवाफिरवी अनेकदा दिसायची. तूझे,तूते, परिमळू, सकळू अशा शब्दांना दुरुस्त करण्याच्या शाळकरी वयातही लयतालाचा त्यातला आनंद जास्त भिडायचा.
तुझ्या महोदार सारस्वताच्या
महासागरीचा जरी मीन मी
झालो तरी गे तृषा मन्मनाची
कधीही कधीही न होणे कमी ।
अशा ओळी विनासायास पाठ तर व्हायच्याच पण माझ्या मनात शब्दखेळ सुरू करून द्यायच्या. (मुळात `माझ्या मनाला' `मन्मन' हा पर्यायच किती सुरेल आहे बरं !) `कधीही कधीही' ह्या शब्दांच्या जागी तेवढ्याच वजनाचे शब्द शोधून बसवून बघायचे. `केव्हाही केव्हाही...' `कदाही कदाही.....' `कदापि...कदापि...' वगैरे वगैरे. हे सगळे पर्याय अर्थाला धक्का लावत नसले तरी नादाच्या बाबतीत फिके पडायचे. `क' नंतर `ध' आणि ह (`ध' मध्ये `ह' असल्याने एका अर्थाने ह ची द्विरुक्ती) ही अक्षरं ह्या क्रमाने आली तरच अर्थातला नकार जास्त गडद होतोय असं वाटायचं. `तुझ्या' ऐवजी `तूझ्या' म्हणताना `तू' खाली दोनतीन रेघा ओढल्याचा भास व्हायचा. `हे अधम रक्त रंजिते' म्हणताना स्वत:च्या अंगातलं रक्तही क्षणभर उसळायचं. `हटातटाने पटा' वगैरे सुरू झालं की आनंदानं मैत्रिणींना पटापटा टाळया द्याव्याशा वाटायच्या. `मुळारंभ आरंभ', `फु काचे मुखी', `चत्वार वाचा', `धीर्धरा धीर्धरा तकवा' वगैरेंनी आपल्यापुरती `आनंदवन' भुवनाची सैर घडायची. थोडक्यात म्हणजे शब्दानुसारी वाचन-पाठांतर व्हायचं. अर्थाकडे, अर्थगर्भतेकडे नंतर लक्ष जायचं.
तेवढ्यात आयुष्यात हिंदी चित्रपट, त्याहूनही हिंदी चित्रपटसंगीत आलं आणि उर्दू-हिंदी-भोजपुरी शब्दांची रुणझुण जिवाला त्रास द्यायला लागली. `मोरी सारी अनारी भिगोय गयो रे...' ही गोड तक्रार, तीच `साडी' त्याच `अनाडीने' भिजवल्यानंतर इतकी गोड वाटली नसती असं जाणवायला लागलं. `चांद भी है कुछ मध्धम मध्धम...' ह्या विशेषणातून तो चंद्र कसा आहे हे अचूक दिसतंय असा भास व्हायला लागला. (जसं, दुडकी चाल ह्या शब्दप्रयोगात त्या चालीचं ध्वनिचित्र आहे, तसं) `सैंया निकस गये, मैंना लडी थी' ह्या ओळीतल्या `निकस गये' मधला चटका `निकल गये' मधून बसला नसता असं तर अजूनही वाटतं. `नैहर छुटो जाय' ऐकताना `नैहर'लाच काळजात काहीतरी व्हायला लागतं. `नैहर'मध्ये `न इधर न उधर' असं काहीतरी सुचवलं गेल्याचा भास होतो. भोजपुरीवाल्यांचा मनवा, पिहरवा, बालमवा मधला `वा' कधीकधी मनात उत्स्फूर्तपणे उमटतो. `मुगले आझम' सिनेमा पहिल्यांदा बघितला तेव्हा बरेच संवाद कळले नव्हते पण त्यातल्या नजाकतदार उर्दू भाषेची कानामनावर एक सुखद गुंगी आली होती ती अजूनही स्मरते.
कुठल्या पूर्वपुण्याईनं माहीत नाही पण कानामनावर गुंगी आणणारं मराठी गद्यही मला खूप ऐकायला मिळालं. मराठी नाटकांमधून तसंच भाषणांमधून. पार्ल्याला लहानपण गेलं. तिथे पटांगणावर खुल्या रंगमंचावर मोजकी मराठी नाटकं पाहिली तर लोकमान्य सेवा संघात खूप भाषणं ऐकली. तेव्हा त्याला व्याख्यानं म्हणत आणि एक वक्ता अस्खलितपणे एका विषयाचा तास-दीड तास परामर्श घेई. त्यात त्याचं ज्ञान असे, विचारांचं धन असे, माहिती असे, प्रतिपक्षावर हल्ले असत, वक्रोक्ती-व्यंग्योक्ती असे, श्रोत्यांच्या काळजाला हात घालणारी हृद्यता असे. सावरकर, आचार्य अत्रे, ना. सी. फडके ह्यांची अगदी उतारवयातली व्याख्यानं ऐकायला मिळाली. पुलंची ऐन भरातली, किंचित सानुनासिक पण वेगवान शब्दातली खेळीमेळीची व्याख्यानं ऐकायला मिळाली. यशवंतराव चव्हाण, नरहर कुरुंदकर, य. दि. फडके, स. गो. बर्वे ह्यांची तोलूनमापून केलेली भाषणं ऐकायला मिळाली. दुर्गाबाई भागवत, शांताबाई शेळके ह्यांना समोर बसून सलग ऐकता आलं. प्रत्येकाचा विषय समजला, लक्षात राहिला असं काही नाही पण `भाषेचं हेही रूप असतं' `अशी भाषा पण खिळवून ठेवते' `ह्यांच्या बोलण्यात ही गंमत आहे बरं का' अशी नोंद मनात होत गेली. बोली शब्दांचं सामर्थ्य नाना प्रकारे जाणवलं. कोणी कुजबुजल्यासारखं बोलतं, कोणी गुणगुणल्यासारखं बोलतं, कोणी तलवारीसारखे सपासपा शब्दांचे वार करतं, कोणी बोलता बोलता मध्येच चिमटे काढतं, कोणी वेड्यात काढतं, कोणी आतल्या शहाणपणाला हाक घालतं, कोणी अधूनमधून पालुपदासारखं स्वत:च्या मूळ सूत्राकडे आणत राहतं तर कोणी शब्दांच्या साह्याने सैरावैरा पळत सुटतं आणि स्वत:बरोबर ऐकणाऱ्याचीही दमछाक करतं असे अनेक अनुभव घेतले. बोलीच्या सामर्थ्याचं ते विश्वरूपदर्शन त्या संस्कारक्षम वयात खूप काही देऊन गेलं.
मग वाचतानाही ललितगद्याची लय शोधण्याचा नाद मला लागला. `पद्य नव्हे ते गद्य' ही व्याख्या क्रेमक पुस्तकवाल्यांच्या सोयीची असली तरी इतके हवाबंद कप्पे नसतात, चांगले लेखक ठणठणीत गद्यही पद्याची आंतरिक लय सांभाळत लिहितात हे जाणवलं. र. वा. दिघे, ग. ल. ठोकळ, महादेवशास्त्री जोशी, इरावती कर्वे, थोड्या नंतर शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर, पु. ल. देशपांडे. माधव आचवल ह्यांच्या ललित गद्यातली लय नेहमी भुरळ पाडत असे. त्या लयीने वेढलेला वाचक पानामागून पानं ओलांडणारच. त्या गद्यात शिरेपर्यंत वाचकाला स्वातंत्र्य असे. एकदा शिरला की बाहेर कधी यायचं हे तो ठरवू शकत नसे. कारण लयीच्या मुसक्या बांधून लेखकानं त्याला पुरतं जखडून टाकलेलं असे. स्वत:ला त्याच्या पूर्ण स्वाधीन करण्याखेरीज दुसरं काही वाचकाच्या हातात राहात नसे.
निदान माझ्यातरी राहिलं नाही. भाषेची लय, ताल, शब्दांचा नाद, नादसाधर्म्य किंवा वैधर्म्य याचा माझ्या मनाला चाळा लागला तो कायमचाच. अर्थात त्यातली कृत्रिमता, हटातटाने लय साधण्याची धडपड हीसुद्धा लगेच ओळखू यायला लागली. तसल्या शब्दकामाठीचा अगोदर तिटकारा आणि नंतर टिंगलही करावीशी वाटली. अलीकडे निवेदक-कॉम्पिअर-नामक जी एक नवीन सर्वसंचारी जमात निघालेली आहे त्यांनी भाषेच्या कृत्रिम गोडव्यानं
हैराण केल्याचे अनुभवही आले. (`चला, आता मारव्यात हरवू या' हे वाक्य मारवा रागातलं गाणं सादर करण्यापूर्वी प्रत्येक सूत्रसंचालकानं म्हणायचंच असा दंडक आहे. अशावेळी हा निवेदक हरवला तर किती बरं होईल असा विचार आल्याशिवाय राहात नाही.) त्या अर्थाने शब्द पिळून-पिंजून धापा टाकत साधलेली लय अभिप्रेत नसते, पण सहजसाध्या शब्दातली नादरूपं मोहवतात. अलीकडे गौरी देशपांडे, प्रकाश नारायण संत, श्रीनिवास कुलकर्णी, मिलिंद बोकील ह्या काही लेखकांनी ती पुरवल्याचं कृतज्ञ स्मरण करावंसं वाटतं.
दुसऱ्या बाजूने कवितेमध्ये आरती प्रभू, ग्रेेस, ना. धों. महानोर, सुरेश भट प्रभृती कवी कानांना खाद्य पुरवत होतेच. रान झिम्माड झालं, मी भिंगरभिवरी त्याची, घनव्याकुळ मीही रडलो, सूर संवादी मिळू दे, उसवून रात्र गेली' अशासारख्या कित्येक ओळींनी त्या त्या वेळी `स्स्...' म्हणायला लावलं.
ह्या मोजक्या आणि मोठ्या लेखककवींखेरीज इतरत्र मात्र हलकेहलके भाषेचा खडखडाट जाणवू लागला. दोन्ही अर्थांनी. एक निश्चित अशी काळवेळ संागता येत नाही पण भाषेच्या लय, तालाबाबत कानांची उपासमार होते आहे, ढीगभर वाचलं-ऐकलं तरी त्यांना सुखसंवेदना देणारं काही सापडत नाही असं व्हायला लागलं. विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकापासून ते जास्त जास्त जाणवू लागलं. व्यवसायाने मी एका मराठी मासिकाशी संबंधित असल्याने अनाहूत साहित्य पुष्कळ वाचावं लागतं. माध्यमांचा महापूर आल्याने कानांवरून सतत निवेदनं-चर्चा-परिसंवाद-मुलाखती वगैरे जात असतात. एवढ्या शब्दजंजाळातून कानाला गुदगुल्या करणारं, कान टवकारायला लावणारं, कान देऊन ऐकावंसं वाटणारं फार काही कुठेच आढळत नाही. जुन्या पठडीतील पल्लेदार-घणाघाती भाषणं तर दूरच. पण हितगूज-हृदयसंवाद वगैरे म्हणवणाऱ्या हुकमी कार्यक्रमांमध्येही तितकंसं गूज-हृद्य काही सापडत नाही तेव्हा जीव चुटपुटतो. खूप जवळचं, हवंहवंसं काहीतरी गमावल्यासारखा शोधायला लागतो, कुठे हरवली ती मराठी गद्याची लय ? संस्कृतप्रचुर भाषा, ग्रामीण भाषा, प्रादेशिक बोली, ऐतिहासिक-पौराणिक छापाच्या भाषा, ह्या सगळयांचा आपण मनसोक्त लुटलेला आनंद कुठे गडप झाला ? आणि ह्या सर्वांतले वैशिष्ट्यपूर्ण आकार-उकार-गमावून एक सपाट भाषा सारखी समोर कशी यायला लागली ?
ह्यामागे एक सहज सुचणारं दिसणारं कारण होतं ते एकूणच जगण्यातल्या मराठीपणाचा संकोच होत चालल्याचं. विसाव्या शतकाच्या पाचव्या-सहाव्या दशकात जसं शुद्ध-भेसळयुक्त मराठी वातावरण आसपास होतं तसं नंतर मिळणं कठीण झालं. बहुसांस्कृतिकता आली. नाना माणसं-नाना संस्कृती त्यामुळे भिन्न जीवनसरणी आणि नाना भाषांच्या धाटणी. नित्य संपर्कात येऊ लागल्या. व्यक्तिगत आणि सामाजिक जीवन एकपदरी-मराठमोळं न राहता संमिश्र झालं. त्याचा परिणाम साहजिकच भाषेवर झाला. शुद्ध-निखळ मराठीवर अनेक भाषांची कुरघोडी झाली.
मल्टिकल्चरॅलिझम : बहुसांस्कृतिकतेचे प्रश्न ह्यावर आता खूप विचारमंथन होतंय. बहुसांस्कृतिकतेमुळे एकूण सांस्कृतिक अवकाश विस्तारत जातो. पण मूळची स्थानिक संस्कृती उपेक्षिली जाते, तिच्यातली नाजूक सौंदर्यस्थळं भरडली जातात आणि करता करता एक भरड पण सर्वसमावेशक संस्कृती आकाराला येते असं तज्ज्ञांचं मत आहे. बहुभाषिकतेचाच एक पैलू असल्याने भाषेबाबतही असेच परिणाम दिसतात. एकाच वेळी एका समाजात नाना भाषा प्रचलित असल्या की त्या एकमेकीत घुसत राहतात. संवादाची सोय जरूर बघतात पण नादाची नजाकत सांभाळतीलच याची खात्री नसते. हे सगळं मराठी भाषेबाबत घडताना दिसलं, कानांना टिपता आलं ते याच काळात. ह्या काळातल्या माझ्या परिसरातल्या मुख्य तीन भाषा म्हणजे इंग्रजी-मराठी-आणि हिंदी. त्यांच्यातली `आवजाव-भाषा तुम्हारी !' रोजचीच बाब झाली. साध्या साध्या उच्चारांनी मराठीपणा झटकला. च आणि च्य, ज आणि ज्य, श्री आणि स्त्री ह्याचा धरबंध उरला नाही. महाप्राणाच्या उच्चारातला प्राण सदैव धोक्यात आला. दही की धई ? वही की व्हई ? ध्रुव की धुफ्, पार्थ-सिद्धार्थ, समर्थ हे सदैव पायमोडकेच का ? असं कोणी कोणाला विचारेनासं झालं.
मंग्ला, लोक्शाही, रच्ना, सुल्भा हे कानवळणी पाडून घ्यावं लागलं. थेट `अ आ इ ई..' पासून भाषाशिक्षण देऊनही `औ'चा उच्चार अचूक करणारी माणसं दुर्मिळ झाली. आताच्या मराठीत उच्चारी `औ' हा `अवू' तरी असतो नाहीतर `ऑ' तरी असतो. `गौरी' हे साधं रोजच्यापैकी नाव `गवरी' तरी असतं नाहीतर `गॉरी'तरी असतं. `द्रौपदी'वरच्या एका मराठी चर्चेत एक मराठी सुपरस्टार महिला सतत `द्रौप्दी' किंवा खरंतर `द्रौब्दी' असा काहीतरी उच्चार करत असल्याची (दु:खद) आठवण आहे. शब्दांचं वजन, लय, शब्दरचना करताना त्यांचा अनुक्रम ह्यांंची काहीही बूज न राखता माणसं आपली बोलत असतात.
हे खाजगी बोलण्याइतकंच सार्वजनिक -जाहीर बोलण्यालाही लागू पडतं. तास-दीड तास एका वक्त्यानं श्रोत्यांना अस्खलित भाषणानं खिळवून ठेवलंय असा अनुभव आता दुर्मिळ आहे. अखिल महाराष्ट्नत ह्या ताकदीचे वक्ते मूठभरच असतील. इतरांना चर्चा-परिसंवाद-मुलाखती या तुलनेने पातळ प्रकारांची कास धरावी लागते. तिथे दर दोनचार वाक्यांनंतर विराम असतो. दोनचार मंडळींची तलवारबाजी सुरू असते. प्रश्नकर्त्यांचं संवाद हाकणं सुरू असतं. नुसत्या एका वस्तूचा, एका मालाचा पुरेसा व्यापार होईल की नाही याची शंका असणारी माणसं `जनरल स्टोअर्स' काढतात. त्यातून सर्व प्रकारचा माल पुरवण्याची सोय करतात तशी ही भाषिक सौष्ठवाची `जनरल स्टोअर्स' उघडली आहेत की काय असा संशय मला कधीकधी येतो. असे कार्यक्रम तर संपन्न (उच्चारी `स्यंप्यंन्न' होतात) भाषेची संपन्नता लोप पावलेली दिसते. नाटकांमध्ये शब्दोच्चारण फार काही समजुतीने, जबाबदारीने केल्याचं आढळत नाही. मुळात नाटकात लिहिलेली भाषाही पल्लेदार-पुस्तकी नसते. दैनंदिनीचीच असते. जी असते तीही अमुक अशीच बोलली जावी असा आग्रह नसतो.
आधुनिक नाटकातील संवादांच्या भाषेबद्दल ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू ह्यांनी अशा अर्थाचं विधान केलेलं आहे की जुन्या नाटकाचा नाटकीपणा कमी करण्यासाठी त्यातले संवाद `इन्फॉर्मल' म्हणजे अनौपचारिक करावेत हा विचार ठीकच होता, पण आता बऱ्याच नाटकांमधली भाषा `इन्फॉर्मल'च्या ऐवजी `क्रॅज्युअल' झाली आहे. अनौपचारिकतेवर न थांबता ती आता फुटकळ, उडतपगडी झालेली आहे. म्हणून ते संवाद म्हणताना आणि ऐकतानाही मजा येत नाही इ.इ. मला रंगभूमी-नाट्यशास्त्र हे काहीही कळत नाही. तरी डॉ. लागूंचं हे विश्लेषण मला नेहमीच्या भाषावापरालाही लागू होताना आढळतं. भाषा कृत्रिमरित्या पल्लेदार, आलंकारिक नसावी हे कबूल, पण म्हणून तिच्या वापरात एवढी बेफिेकरी का असावी ? कोणताही शब्द कसाही उच्चारला, कुठेही उच्चारला, कुठेही तोडला-जोडला तरी चालतो. असं का ? ह्याबाबत आधुनिक परस्परसंवादवाले ऊर्फ कम्युनिकेशन स्किलवाले असं म्हणतात की आशय दुसऱ्यापर्यंत पोचणं हे जास्त महत्त्वाचं. व्याकरण-उच्चार-लयताल हे गौण.ह्याच्याइतका फसवा युक्तिवाद दुसरा नसेल. एकतर चांगल्या उच्चारामुळे, शब्दात झुळझुळणाऱ्या नादलयतालामुळे तो ऐकावासा वाटतो आणि दुसरं म्हणजे खूपदा योग्य त्या उच्चाराने अर्थाची छटा गडद होते. स्पष्ट होते. काही वेळा तो अर्थ, तो भाव दृग्गोचर होतो तर काही वेळा त्याच्या आसपासच्या अनेक अर्थछटा, भावछटा सुचवल्या जातात. देहरक्षणासाठी माणसाला अन्नधान्य लागतं ह्याचा अर्थ तत्त्वत: कच्चं किंवा माफक शिजवलेलं अन्नधान्य खाऊनही माणूस जगू शकतो. जगायला हवा. असं असताना आज शतकानुशतकं मानवजात पाकसिद्धीचा एवढा पसारा का घालते आहे ? कारण तिला नुसतं जगणं नको आहे, आनंदाने - इथे चवीढवीने म्हणू हवं तर - जगणं हवं आहे. तोच नियम भाषेला का लावायचा नाही ? आम्हांला नुस्ता संवाद नको आहे. कानामनाला सुख देणारा संवाद आहे. तसा करण्याची आमच्या भाषेची कुवत आहे, आम्ही अडाणीपणाने तिची पायमल्ली करतो आहोत असं कोणीच का म्हणू नये ? किंवा जे म्हणतील ते शिळे-जुने-प्रतिगामी का ठरावेत?
ह्याहूनही त्रासदायक होते ती लेखकांची बंेगरूळ भाषा. वस्तुत: हे लोक जाणीवपूर्वक, भाषेचं माध्यम वापरून काही विचार, काही अनुभव संक्रेमत करायला निघालेले असतात. तरीही ते माध्यम त्याच्या सर्व ताकदीनिशी वापरावं असं त्यांना वाटत नाही. किंवा शब्दांच्या लयीची, नादमयतेची काही ताकद आहे हे त्यांना मुळात जाणवलेलंच नसतं की काय कोण जाणे. कसेतरी कुठेतरी एकापुढे एक शब्द ठेवायचे एवढाच दृष्टिकोन असेल तर पुढचं बोलणंच खुंटलं.
आम्ही एकाहून जास्त भाषा वापरत असतो म्हणून आम्हांला एकेका भाषेचं फार कोडकौतुक करता येत नाही असा फसवा युक्तिवाद याबाबत काही लोक करतात. ह्यात काही तथ्य नाही कारण ज्याला एक भाषा- म्हणजे बहुधा मातृभाषा- चांगली येते, समजते-भिडते त्याला इतर भाषाही इतरांच्या तुलनेने लवकर चांगल्या येतात-समजतात-भिडतात. इतर भाषांचा `लहेजा' लवकर कळतो. त्या त्या भाषेतले शब्द त्या त्या भाषेतल्या वजनाने सहजासहजी उच्चारता येतात. ज्यांच्यापाशी त्यांची मातृभाषाच `दिलाची बात खोलल्या'शिवाय राहते. त्यांना इतर भाषाही साहजिकच दूर ठेवतात. एकदा भाषेनं `आपलं' म्हटलं की क्रमाक्रमानं तिच्यातलं साहित्य-संस्कृती-समाज हेही आपलंसं करायला पुढे सरसावतात.
ह्याचे अनुभवही मला आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर आले. हिंदी-इंग्रजी दोन्हीही भाषांची माफक जाणकारी असूनही त्यांची मर्मं समजली. परदेशात वावरताना ब्रिटिशांचं, अमेरिकनांचं इंग्रजीही भेदरवू शकलं नाही. उलट कित्येकदा मराठीच्या संदर्भात किंवा तुलनेत त्या त्या भाषांमधल्या गंमतीही जाणवल्या. त्यामागे
आहे.नादसाधर्म्यामुळे शब्दांच्या गंमतीजमती जाणवून जाण्याची ही काही उदाहरणं. खूपदा दोनतीन भाषा लखकन् जवळ येऊन चकित करतात. अगदी अशिक्षित माणसंही अनवधानाने ह्याची जाणीव करून देतात. उदा, इंग्रजी भाषेत `ऑफ व्हाईट' असा एक रंग सांगितला जातो. पांढऱ्या रंगापासून थोडासा ढळलेला असा रंग, `ओ एफ एफ' `ऑफव्हाईट रंग' कित्येक कापड दुकानदार त्याला सर्रास `हाफ व्हाईट' असं म्हणतात. `ताइंर्ना हाफ व्हाईट चिकनचा तागा दाखवा' इ. इथे शब्द, अर्थ, नाद सगळयाचं तारतम्य राखलेलं दिसतं. ज्या कोणी हे पहिल्यांदा केलं असेल त्याची भाषिक समज म्हणजे काही औरच प्रकार असणार. एकदा घरी काही लोक जमले होते. पुरुषांचं पेयपान चालू होतं. किती पेयात किती सोडा व बर्फ घालून अचूक हवी ती चव येते वगैरेची चर्चा सुरू होती. तसे प्रयोगही सुरू होते. हातात एक ग्लास घेऊन बसलेले एक गृहस्थ पेयातल्या योग्य त्या मिश्रणाला दाद देत म्हणाले, ``धिस टेेस्ट्स बेटर' हा `बेटर' हा शब्द उच्चारताना त्यांच्या जिभेची- कदाचित अतिगारव्यामुळे गडबड झाली आणि `बे हे ट र' असं काहीतरी कानी आलं. अरे बापरे, हे तर बेहेतरचकी. हिंदीमध्ये सर्रास `बेहेतर' किंवा `बेहतर' म्हणजे `तुलनेने जास्त बरं' अशा अर्थाचा शब्द वापरतातच. कुठल्या लांबलांबच्या दोन भाषा ह्या आणि एका शब्दाच्या संदर्भात कशा लपकन जवळ येऊन गेल्या ! एक्स्प्रेस वे वर- महामार्गावर भन्नाट वेगाने जाणाऱ्या दोन मोटर गाड्या क्षणभर अपघात करण्याइतक्या जवळ येतात आणि काही कळायच्या आत सूं%% करून आपापली सुरक्षित वाट धरतात, त्यावेळी आपण प्रेक्षक असलो तर जसे आपोआप क्षणभर डोळे मिटले जातात तसंच झालं माझं. अशीच एकदा एक साधीशी बाई तक्रारीच्या सुरात सांगायला लागली, ``घरी धापा टाकत पोचलं आणि वीज गेलेली असली ना की माझा अगदी डिसमूड होतो.' `डिसमूड' असाच शब्द तिनं वापरला. जो गोऱ्या माणसाच्या इंग्रजीत नक्की नसणार. पलिफाय- डिसपलिफाय, क्लोज-डिस्क्लोज अशा शब्दांमध्ये विरुद्धार्थ सुचवायला `डिस' हे पूर्वपद लावतात. तसं तिनं `मूड होणे' `मूड जाणे' ह्या अर्थांनी `डिसमूड' हे काहीच्या काही रूप बनवलं असणार ! पण मला त्याच्यात एकाएकी `दिङ्मूढ'च दिसायला लागलं. आणि माझी मीच दिङ्मूढ झाले. `सर्वेक्षण' हा मराठी आणि `सर्व्हे' हा इंग्रजी शब्द हे असंच दिङ्मूढ करणारं प्रकरण आहे. सर्व्हेमध्येसुद्धा सर्व आहे. दोन्हीत एकार आहे. प्रेक्षणाची आठवण करून देणारा `क्षण' आहे. अशी बरीच गंमत आहे.
अशा गंमती न कळण्याने फार काही बिघडत नाही असं कोणी म्हणेल तर ते खरंच आहे. पण त्या कळण्याने संवादाची-जगण्याची लज्जत वाढते हेही तेवढंच खरं आहे. दैनंदिन जगण्यावागण्यातला रटाळपणा, कंटाळवाणेपणा जायला आणि मध्येच एकेका शब्दाची छोटी-मोठी दारंखिडक्या उघडून आनंदाच्या झुळका आत यायला त्यांची नक्कीच मदत होते असा माझा अनुभव आहे. एक नवतरुण एकदा माझ्यासमोर स्वत:चा उजवा हात स्वत:च्या डाव्या खांद्यावर थोपटून म्हणाला होता, `मी तिला सांगितलं, मी मर्द आहे. माझ्यात खूप मार्दव आहे.'
ह्या त्याच्या वाक्याने त्याच्या `ती'वर काय परिणाम झाला हे मला माहीत नाही. माझा तो दिवस मस्त मजेत गेला होता हे पक्कं आठवतं.
ह्या सगळयामागे शुद्धाशुद्धतेचा निकष नाही. आमचं तुमचं, श्रेष्ठ-कनिष्ठ असा तरतमभाव नाही पण शब्दश: सहज बोलताबोलता, खूप आनंद-हृद्यता-उत्कटता असे अनुभव देणारं भाषेसारखं एक अपूर्व साधन आपल्यापाशी आहे हे जाणवण्याचा आहे. आज कॉम्प्युटरच्या भाषा वापरणाऱ्या पिढीला हे जाणवत नसेल तर ते का, याचा शोध घेण्याचाही आहे.
वास्तविक बोलीभाषेचं हे आदिम रूप. उद्गार-उच्चार हीच पहिली अभिव्यक्ती. हाताने लेखन, पुढे यंत्राने लेखन, छपाई ही व्यावहारिक सोयींची रूपं आहेत. लेखनाने भाषा टिकाऊ होते, लांबलांबचा प्रवास करते, संदर्भ-पुरावे वगैरे देण्याची क्षमता बाळगते. ह्या दृष्टीने त्याचं महत्त्व मोठंच आहे पण कानाचा मनाचा कब्जा घेतात ते नाद, स्वर, ध्वनी. म्हणून तर मुलाचं भाषाशिक्षण आधी ध्वनीपासून सुरू होतं. मुलाला जेवताना, झोपताना, फार रडायला लागल्यावरही ध्वनीची सोबत हवी असते. ती देणारी खेळणी मुलांसाठी बनविली जातात. साहित्य निर्माण होतं. जात्यावर दळणं-रहाटाने पाणी काढणं ह्यासारख्या कष्टाच्या कामांनाही सूरलयीची सोबत दिल्यास कष्ट कमी जाणवतात. आजही रेल्वेस्टेशनवर, विमानतळांवर सातत्याने त्याच त्या ठरावीक घोषणा- अनाऊन्समेंट करणारे लोक एका लयीत बोलत असतात. अनेकदा ती हास्यास्पद असते हा भाग वेगळा. अशा अनेक अर्थांनी जीवनव्यवहाराला छापील शब्दापेक्षा उच्चारी शब्द खूप जवळचा असतो. आजच्या आपल्या मुलांच्या भाषाशिक्षणात आपण ह्याला कितपत स्थान देतो हा ह्या दृष्टीने विचार करण्यासारखा प्रश्न आहे. शालेय विद्यार्थ्यांना शिक्षकांनी मोठ्यांदा वाचून दाखवणं नाही, पाठांतर करून घेणं फारसं नाही. एकानं मोठ्यांदा एकेक ओळ म्हणून दाखवणं आणि इतरांनी तिचं अनुकरण करणं नाही. अस्खलित संस्कृत किंवा मराठी वक्तृत्व कानी पडण्याची संधीही फारशी नाही. मुलांमध्ये मराठीचं प्रेम कसं रुजावं ? भाषेचं गारूड काय असतं हे त्यांना कसं कळावं? आणि त्याअभावी केवढ्या आनंदाला त्यांनी मुकावं ?
माझ्या `नादरंगी रंगण्याचं' एक ठोस कारण स्मरतं. ती होती आमच्या पार्ले टिळक विद्यालयाची देणगी. साधारणपणे शाळा भरण्याची घंटा वाजली की मुलं वर्गावर्गात जाण्याची गडबड करतात. त्यांना आपापल्या इच्छित जागी पोचायला, स्थिरावायला काही मिनिटांचा अवधी लागतो. त्या वेळात आमच्या शाळेत १९५५ ते १९६५ ह्या काळात तरी रोज तीन मिनिटांची एक ध्वनिमुद्रिका लावण्याची पद्धत होती. पलुस्कर, ओंकारनाथ ठाकूर, हिराबाई बडोदेकर वगैरेंच्या गाण्याच्या तबकड्या त्या काळात लावल्या जात असत. ही प्रथा त्या संस्थेत पुढे किती वर्षं चालली, आज सुरू आहे की नाही हे मला माहीत नाही. पण ते कोवळं वय, ती रोजची कोवळी सकाळ, ते घनगंभीर सूर ह्या सर्वांचा खूप खोल ठसा मनावर उठला होता जो आजवर पुरतो आहे. आजच्या मराठी शाळा अशाच पद्धतीने दररोज तीन ते पाच मिनिटांचे उत्तम मराठी गद्य उतारे उत्तम प्रकारे वाचून घेऊन ध्वनिमुद्रित करून वाजवू शकतील का ? शिक्षणखातं ही जबाबदारी घेईल का ? मुलांना वाचायचे कष्ट नकोत, शिक्षकांवर वाचून दाखवायचीही जबाबदारी नको. नुसतं सुरेल-नादमय-लयबद्ध मराठी गद्य त्यांच्या कानांवर पडू द्या. गडकरी, नाथमाधव, शि. म. परांजपे, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, दुर्गाबाई भागवत, माधव आचवल, गौरी देशपांडे, प्रकाश नारायण संत, शंकर पाटील ह्यांच्यासारख्यांचे छोटे निवडक उतारे आळीपाळीनं त्यांच्या कानांवर, योग्य त्या शब्दांच्या वजनाने पडले तर काय बहार येईल ? शक्यता आहे की बरीच मुलं हे ऐकणार नाहीत. काहींना ही कटकट वाटेल. काहींना ह्यात शिक्षणक्षेत्रातल्या लोकांच्या खलप्रवृत्तीचं दर्शन घडेल. पण काही थोड्या मनांमध्ये तरी हे नक्की रुजेल. त्यांना त्यातली गंमत-आनंद-उन्नयन त्याच्या/त्यांच्या पातळीवर समजेल. त्यातलेही आणखी थोडे भिडू मूळ पुस्तकं वाचायला जातील. कोणी कोणी नकळत तसं लिहू लागेल. मुख्य म्हणजे त्यातले काही विद्यार्थी तरी पुढे आयुष्यभर नादरंगी रंगतील. माझ्यासारखे ! ह्या सर्व निवेदनात मी-माझं-मला ह्या प्रकारचे शब्द वारंवार आले असतील तरी ते गौण समजावेत. माझा ज्या ध्वनिसंवेदनाकडे ओढा होता तिला पूरक असं खूप भाषिक द्रव्य मला सहज मिळालं. माझ्या कुवतीने ते शोषलं. आज असा कल असणाऱ्या मुलामुलींना देण्यासाठी आपल्यापाशी काय आहे हा विचार अस्वस्थ करतो. त्यांनाही नादरंग जडावा म्हणून हे मंथन.
मंगला गोडबोले
७, गीताली,
पी.वाय.सी.जिमखाना,
पुणे ४११००४.
Posted in



XpyCRmuxRlUPjfQ
klonopin - buy cheap klonopin
TwQzmYmBbqWOCz
buy xanax online free shipping - purchase uk cheap xanax
FYYUyLaxRHrtFlVN
buy ambien online wthout prescription - canadian generic ambien
NGWYFToCHWwcdbjV
order klonopin cod overnight delivery - buy cheap klonopin usa
xfKAQPIAZbL
buy xanax overnight delivery - xanax online
grsZSsaRIJGMHR
buy ambien sleeping pills online - ambien online cheap insomnia
CVuPvXMOLLwNmiLqvMd
gAwpB0 wscoehqvfcke, [url=http://jejukmticndd.com/]jejukmticndd[/url], [link=http://fwhdtaelnfqd.com/]fwhdtaelnfqd[/link], http://bkzhovifqgsk.com/
OXjrBPTWjZOG
Cheap klonopin now - order cheap klonopin
WlCLUXMpCxHKdtClII
Cheap ambien now - ambien without prescription
TNClgztbOd
ambien - ambien online no prescription
xsAKmPjdJlJiPC
next day tramadol - tramadol hcl
PMZwetjfBzBjSLl
order cheap klonopin - klonopin buy online
grWlVZVFKDONkRyElsq
ambien - online ambien
BhFdFoeHQofn
valium to buy - valium online no prescription
vOSHPpLiUPNnHIsqz
klonopin discount - Buy klonopin online usa
dvDjdCZgKbaEsVkST
cheap tramadol - order tramadol
MfoQaHUJpNhnbKAzhVm
valium buy - valium no prescriptions
ZkPmVdaiJOFzZSxLz
generic klonopin online - Discount klonopin online
lbolfvZdZFT
buy tramadol online overnight - tramadol no prescription
fIgIwJrSlGSLfz
ambien no prescription - buy ambien online
sktwFSzcraYyx
order tramadol - buy tramadol no prescription
wuyXPOAwFQZiGGsUg
Cost ambien online - cheap ambien
cyUmzFNxNusof
xanax delivered overnight - cheap xanax online
nrnAgnsddtncfhj
tramadol cheap - tramadol to buy
BIyCBKFudUTHr
order cheap valium - Buy valium online canada
esBKNkJQuYz
ambien no prescription - Cheap canadian ambien
AlrPnqrTfwaaaB
xanax order - cheap xanax
vBWmzsIEvl
tramadol no prescription - buy tramadol 100mg
snslzLosPVmDVo
Canadian generic ambien - buy cheap ambien
IlNqWMsMDcZMHWkJ
Buy valium uk - Buy cheap canadian valium
kaUqsZyjluT
Discount valium online - valium discount
uSlbVjUMSdES
valium dosages - valium uses
OdJkUEBffToG
discount valium - valium to buy
FjCoQiRJJelZlcEBU
buy discount xanax - Buy xanax online wthout prescription
caLBFVWyIPLulCtqtq
buy real valium online - buy valium online no prescription uk
ZFBtoVFNzqrXWS
order valium online - valium
viagra
ymwizp http://ldlbcg.com/ tdjffdwd [url=http://alfzqt.com/]tdjffdwd[/url]
GjliMAAVVN
Discount xanax online - Generic xanax overnight
viagra
bpxvzj http://gxyxlq.com/ drkkgdln [url=http://xshqud.com/]drkkgdln[/url]
KrihBfqGfAkVAVl
tramadol online 100 mg - buy tramadol
CusxjcWEemJNliXf
Cheap xanax pills - buy xanax online
gxhHhcAZCH
tramadol buy online - tramadol hcl
uKXAuGpMTsoH
buy cheap valium - valium
viagra
akytysx http://ldnjgd.com/ cdjihizi [url=http://evikco.com/]cdjihizi[/url]
KWjGtgjHSMlYHSJ
valium order - valium without prescription
ObtoQAFHfjwK
online tramadol - tramadol cheap
mKpFkATSdbPzTh
Buy cheap online valium - Buy valium online usa
qiCABiLmZclnM
Buy valium online canada - valium
lJqCScktVGSZGHQTc
buy tramadol cod - discount tramadol
qLlTTfveolN
Buy cheap online xanax - xanax buy