Skip to main content

साथी हाथ बढाना

महाविद्यालयाचं राष्ट्नीय सेवा योजनेचं शिबिर कुठे न्यायचं ही अलीकडे फारच मोठी समस्या झाली होती. उपक्रमांची उद्दिष्टे स्तुत्य होती आणि मी शिकत असल्यापासून आज शिकवायला लागून वीस वर्षं होत आली तरी तशीच होती. उपक्रम राबवताना प्रश्न निर्माण व्हायचे. हे मान्यच होतं की विद्यार्थ्यांना ग्रामीण भागाचा परिचय व्हावा, ग्रामीण भागाशी अर्थपूर्ण संपर्क व्हावा म्हणून अशा शिबिरांचा उपयोग होतो. शिवाय शारीरिक श्रमांचं महत्त्व कळतं. भारत देश किती वैविध्यपूर्ण आहे हे आपलं आपल्यालाही कळतं. वगैरे वगैरे. किती उत्साहानं कॉलेजमध्ये असताना शिबिरांना जायचो- रस्ते बांधायचो, झाडं लावायचो, बौद्धिकं व्हायची, मैत्र्या घडायच्या...
आता संयोजक प्राध्यापक म्हणून वेगळीच आव्हानं - लग्न झालेल्या स्त्री प्राध्यापकांच्या अनंत अडचणी-पुरुष प्राध्यापकांचे मान-अपमान, शिबिराच्या निमित्तानं घडणारे इतर महत्त्वाचे उपक्रम-भेटी-सत्कारसत्रं वगैरे वगैरे.
आमचं महाविद्यालय खेड्यातलंच. पोरं शेती करून कॉलेजमध्ये यायची आणि पोरी धुणं-भांडी, स्वयंपाक करून. त्यामुळे खेड्यांशी परिचय करून द्यायचा म्हणजे काय - यासाठी बराच विचार व्हायचा. रस्ते बांधायला पुष्कळ वाव. कारण दरवर्षी पावसात आदले वर्षी बांधलेला रस्ता वाहून जायचा. उन्हाळयात वृक्षारोपण केलेली झाडं सुकून जायची.
पोरं हसायची-म्हणायची-दोन हात खणलं की खडक लागतो-काय पाणी टिकणार आणि कशी वाचणार ? शेत करताना फेस येतो तोंडाला. राहता राहिले `शैक्षणिक' कार्यक्रम - व्यसनमुक्ती, एड्स जाणीव जागृती, लैंगिक शिक्षण- शिबिरात दिवसभर रस्ते बांधून, खड्डे खणून दमलेली मुलं ते सहन करायची आणि संपल्यावर तातडीनं गाण्याच्या भेंड्या खेळायला लागायची.
अगदी सुरुवातीची वर्षं - उत्साह भरपूर-मुलांना म्हटलं आपण छान कार्यक्रम करू-माझं छान आणि मुलांचं छान यांचे सूर जुळायचे होते.`वक्तृत्व स्पर्धा घेऊयात?' मुलं म्हणाली, `भाषणं नकोत.' `मग काय करूयात?' `मॅडम डान्स स्पर्धा घ्या.' मुली म्हणाल्या, `लावण्यांवर नाचू?' मी म्हटलं, `गॅदरिंगमध्ये नाचताच. इथे वेगळं काहीतरी करू.' पोरं खिदळली. म्हणाली, `गेल्या वर्षीच्या राष्ट्नीय सेवा योजनेच्या राज्यव्यापी शिबिरात लावणी स्पर्धा झाली होती. आपल्या मुलींनी ट्नॅफी जिंकली होती. युनिव्हर्सिटीतल्या सरांनीसुद्धा खूप कौतुक केलं.' मी म्हटलं, `तरीपण नको.' वेगळं काहीतरी करा. नाटक कराल?' मुलं गप्प. `नाट्यवाचन ?' `ते काय असतं?' मग एकदम उत्साहानं मुलं म्हणाली, `माझी बायको चचली'करू?' `तेच तेच काय रे?' `गावात आवडेल?' पिसे म्हणाला. `कसली मजा येते.' ढोरे म्हणाला. `नको - वेगळं करा काहीतरी.' `मॅडम, तुम्हीच सांगा.' `तुम्ही कादंबरी वाचता ?' मुलं हसली. `पवनाकाठचा धोंडी वाचला?' `ते काय ?' `ऐकायच्या क्रॅसेट्स? तुमच्याच परिसरातली गोष्ट आहे.' मुलं बरं म्हणाली.
मी मग क्रॅसेट ऐकवलीच. पोरं धाकानं बसली. बराच वेळ दम धरला. मग म्हणाली, `मॅडम, हा कोंडी कोण ? आणि धोंडी असा काय वागतो ?' मी क्रॅसेट बंद केली. म्हटलं आपण जुने झालो. किंवा आपल्या मनातलं ग्रामीण वेगळंय. काळ पुढे गेला बराच. आता आपण `आमच्या वेळेस सगळं किती चांगलं होतं - आणि आताची ही पिढी !' असे उद्गार काढण्यापूर्वीच मुलांना बोलू द्यायला हवं. आपणच कल्पना केली यांच्या ग्रामीण आयुष्याची. ठरवून टाकलं हे किती रोमँटिक, नैतिक, सुंदर, सात्त्विक !! मी सोडून दिलेल्या मूल्यविवेकाला यांनीच सांभाळावं आता असं म्हणणारी मी ! माझी `उत्तम' अभिरुची यांना देऊ पाहणारी मी ! गप्प बसावं हे खरं !
वर्षं जात होती. शिबिरं होत होती. फाईलींमध्ये हिशोबांसकट चोख रेकॉर्ड जमा होत होतं. मुलांना दरवर्षी नक्की कोणतं काम द्यायचं ज्यामुळे त्यांना आपल्या देशाचा अधिक जवळून परिचय होईल ही चिंता वाटू लागली होती. ज्याला आजवर खेडं म्हणत होतो तिथपर्यंत पंचतारांकित हॉटेल्स, वॉटर पार्कस्, ब्युटी पार्लर्स, क्रॅसिनो येऊन थडकले होते. बाहेरून `खेडं' उपभोगायला गर्दीही वाढू लागली होती. सुट्ट्यांच्या दिवशी मूळ रहिवाश्यांनाच बाहेर पडायची पंचाईत व्हायला लागली होती. राष्ट्नीय महामार्गांनी आणि लेकसिटीज्नी `ग्रामीण' भाग ताब्यात घेतले. विस्थापितांच्या कहाण्या दररोज नवनवीन रूपं घेत होत्या. सुरस आणि चमत्कारिक साक्षात्कारांनी खेडी दचकू लागली. पूर्वी जरा गावाबाहेर पडलो की रानांमधून, देवरायांमधून हिंडता यायचं. मुलंही दाखवायची वेगवेगळी झाडं आणि त्यांच्यावरच्या हडळी/वेताळ/समंध यांच्या गोष्टींची धमाल यायची. `अंधश्रद्धा निर्मूलना'ला काम मिळायचं. आता हा डोंगर धर्मेद्रचा, ही शेती काजोलची, पलीकडचं पठार शाहरूख खानचं अशी नवीन प्रेक्षणीय स्थळं तयार होऊ लागली.
यावर्षीचं शिबिरस्थळं शोधायला मी, कुटे, कांबळे आणि कान्हेरे बाहेर पडलो. मुलाबाळांचे व नवऱ्या-घराचे प्रश्न मार्गी लावून सुटवंग झालेल्या आम्ही दोघीच. बरेच वर्षांनी पुन्हा एकदा शिबिराची जबाबदारी घेता आली. जीप धावत होती. पूर्ण कापलं गेलेलं जंगल, वैराण होऊन गेलेली जमीन, बोडके, भुंडे डोंगर, आटलेल्या, सुकलेल्या ओहोळांच्या पांढऱ्या निशाण्या, जागोजागी चालू असलेली बांधकामं, वॉटरपार्कमध्ये आनंदाने बागडणारी गुटगुटीत गोरी मुलं दाखवणारे मोठे फलक - शहरीकरणाला ना नाही - पण हे कसलं वांझोटं शहरीकरण - बकाल, कंगाल, आपल्याच अस्तित्वाच्या मुळावर उठलेलं! मी मनातल्या मनात तुटत होते.
परवाच मुलांशी नर्मदा विस्थापितांबद्दल बोलणं झालं. पण त्यांचे चेहरे मख्ख. आपण तरी काय - सुरक्षित घरात बसून विस्थापितांविषयी बोलतो -हे खरं नव्हे- असं म्हणत मी पुन्हा गप्प बसले. नर्मदेवरचा माहितीपट दाखवून झाला आणि कुटे सर आत आले. त्यांना गीतगायन स्पर्धेची उद्घोषणा करायची होती. इच्छुक मुलांची नावं घ्यायची होती. ते वैतागलेच होते.
``फारच लांबला तुमचा सिनेमा. इथं माझा खोळंबा झाला. प्राचार्यांनी चारदा निरोप पाठवले. विद्यार्थ्यांची संख्या कळवा म्हणून -'' माझ्यावर तणतणून त्यांनी वर्ग ताब्यात घेतला. नर्मदा विस्थापन क्षणार्धात विसरून मुलांचं मोहोळ त्यांच्याभोवती जमा झालं.
गावांमागून गावं मागे पडत होती. मी अखेरीस न राहवून कुट्यांना विचारलं, ``आधी काही ठरलं आहे का कोणतं गाव निवडायचं ते ? कांबळे म्हणाले, ``ते तर ठरलेलंच असतं ना, मॅडम. आपण आपलं जाऊन अडचणी कमी कशा होतील ते बघायचं.''
मी तरी विचारलंच, ``कोणतं गाव ?''
कांबळे म्हणाले, ``शेरवाडी. पंचायत समितीचे अध्यक्ष आपल्या अध्यक्षांचे लागतात कोणीतरी. निवडणुका तोंडावर आहेत. शोषखड्डे बांधा म्हणतात. घरामागं एक संडास मंजूर झालाय. अनुदान मिळालंय. बी.डी.ओ.शी बोलणं झालंय.''
``गावकऱ्यांशी बोलणं झालं का ?'' मी विचारलं.
``तेच करायचंय आपल्याला.'' कुटे म्हणाले.
डोंगराच्या भव्य
ांगा. `राकट देशा. कणखर देशा, दगडांच्या देशा' म्हणताना ऊर भरून येई. आता दिसतात त्या डोक्यावर हंड्यांची चवड घेऊन पाणी शोधत जाणाऱ्या बाया. भेगाळलेल्या पायांची मुलं. पिचपिचित शेरडं आणि सुकड्या गायी. राजकीय कार्यकर्त्यांच्या, एनजीओज्च्या अधिकाऱ्यांच्या, खाजगी कंपन्यांच्या, बांधकाम व्यावसायिकांच्या भणाणत जाणाऱ्या गाड्या. कॉलेजमध्ये येणाऱ्या अॅनिमिक मुली आणि शिक्षणाचा संदर्भ न लागल्यानं भंजाळलेली मुलं. राजकीय जाणिवा विकसित झालेला विद्यार्थ्यांचा गट असायचा पण त्याचं शैक्षणिक जाणिवांशी देणंघेणं नव्हतं. वाहनं, मनगटावरची कडी, गळयातल्या चेन्स आणि कपडे यातूनच त्या जाणिवा व्यक्त व्हायच्या.
अखेरीस जीप थांबली. बटणं नसलेले फ्रॉक्स आणि चड्ड्यांशिवाय शर्ट घालेली मुलं-मुली गोळा झाली.
``ओय् पोरेहो, राणेसाहेबांचं घर कुठाय ?'' कुट्यांनी विचारलं. पोरं नुसतीच हसली. शेजारीच शांत पडलेल्या झोपडीत डोकावून कांबळयांनी हाक मारली. ``कोन आहे का ?'' रानेसाहेबांचं घर कोनतं म्हनायचं ?'' आतून एक म्हातारी बाहेर आली. तिनं हात केला त्या दिशेला आम्ही चालू लागलो. चांगलं बांधलेलं, आकाशी, पिवळया रंगात रंगवलेलं, दुमजली `सोन्याचा उंबरा' उभं होतं.
चहापाणी झालं. राणेसाहेब तल्लख गडी. अत्यंत चतुर डोळयांनी स्थिर हसऱ्या नजरेनं पाहण्याची सवय. माझ्या डोक्यातला गावचा पाटील म्हणजे निळू फुले ! पँट शर्टमधले राणेसाहेब वेगळेच होते.
``बोला - प्राचार्यांशी बोलणं झालंय सगळं. पन्नास उंबरठ्याचं गाव आहे. पंधरा दिवसात काय काय काम होईल?''
``तुम्ही सांगा-'' कांबळे म्हणाले.
``शोषखड्डे घ्यायचेत. शेतातली थोडीफार कामं आहेत. बांध घालायचेत.शाळेचं मैदान सपाट करायचं. राष्ट्नीय सेवा योजनेत रस्ते बांधणं कंपल्सरी असतं ना ? आमच्या स्मशानाकडे जाणारा रस्ता बांधायचाय. झाडंही लावून टाका चार-दोन. येणाऱ्या पाहुण्यांसाठी काम ! काय ?'' असं म्हणत ते हसले.
``तुमचं शेत शिबिराच्या जागेजवळ ठेवा म्हणजे झालं.'' कुटेही हसून म्हणाले.
``पंचायतीत बायका किती आहेत ?'' मी विचारलं.
``सगळा पार बायांचाच कारभार. बाप्यांना वेळ कुठाय ? तिकडं लेकसिटी उभी ऱ्हातीय. तिकडल्या कामावर जातात सगळे.''
``बायकांसाठी काही कार्यक्रम घेता येईल.'' मी म्हटलं.
``हो, पोरीपण येणार असतील ना तुमच्या ? त्यांना लावून द्या बायांच्या मागं. म्हणजे पोरंपण कामं करतील इकडं आणि बायापण शिकतील तिकडं.सही करायला आली बायांना तरी पुरे. पंचायत समितीत राखीव जागा ठेवतात आणि सरकारी आदेश वाचता येत नाहीत त्यांना. पहा तुम्ही किती शिकवता ते.'' राणे मला न्याहाळत म्हणाले.
``शिबिरासाठी सोय कशी करायची ?'' कांबळेंनी विचारलं.
``शाळा देऊ पोरींना आणि देऊळ देऊ पोरांना.'' राणेंनी सांगून टाकलं. दोन्हींच्या मधल्या मैदानात काय तुमची परेड बिरेड असेल तर होऊन जाईल.
``कशाची परेड राणेसाहेब ? दहा दिवस मुलंमुली सांभाळताना फेस येतो तोंडाला. तेवढ्यासाठी तुमचं गाव घेतलं. लांब पडतंय म्हणताना रोजची येणारी जाणारी बेनी सांभाळायला नकोत. शिवाय तुम्ही आहात स्वत: मग व्यवस्था चोखच होईल.'' कांबळे म्हणाले.
``तुम्ही काळजीच करू नका. पार दमवून टाकू पोरांना. मग काय करतील ?'' म्हणत राणे हसले.
``संडासची पात्रं आणली आहेत का शोषखड्डे केल्यावर बसवायला ?'' मी विचारलं.
राणेसाहेबांनी एक क्षण रोखून पाह्यलं. मग म्हणाले, ``मागितलीत आम्ही कंपनीकडे. त्यांचं म्हणणं सगळाच खर्च सरकार आणि कंपनीनं केला तर लोकांची जबाबदारी काय ? फुकटचं खायला घालू नका . इथं लोकांना खायला नाही मग मोकळं शेत सोडून संडासच्या पात्रांवर पैसे घालतील काय लोक?''
``पण मग शोषखड्डे करून ठेवायचे का नुसते ?'' मी विचारलं.
``हो. पात्रं येतील नंतर. ते माझ्यावर सोडा तुम्ही.'' राणे म्हणाले. ``सध्या शोषखड्डे होणं महत्त्वाचं.''
शिबिराच्या समारोपाला पाहुण्यांना घेऊन येण्याची जबाबदारी माझ्यावर होती. उद्घाटनाचे पाहुणे प्राचार्यांचे, समारोपाचे पाहुणे कुट्यांचे. पाहुण्यांनी स्वत:ची गाडी आणि गाडी भरून माणसं घेतली होती.
``कुटे सरांना सांगितलं ना केवाळेसाहेब, सगळे जेवायला थांबणार म्हणून ?''
``काळजी नको आठवले. सांगितलंय.'' केवाळे हसले.
``नुसती जेवणाची काळजी नाही. इतरही काळजी आहे.'' आठवले म्हणाले.
``राष्ट्नीय सेवा योजनेचं शिबिर आहे. फार अपेक्षा ठेवू नका.'' केवाळेंनी बजावलं.
मी तिथे असूनही नव्हतेच त्यांच्यासाठी. बरंही वाटलं. नाहीतरी कोणत्याही संवेदनाशील विषयाला हात न लावता वरवर काय बोलायचं पाहुण्यांशी हा प्रश्नच असायचा. गाडी एसी होती. केवाळेसाहेबांनी क्रॅसेट टाकून गाणी सुरू केली. ``इष्काच्या दरबारात.''
म्हात्रेंनी ब्रीफकेसवर ताल धरला आणि विचारलं, ``तुमच्या ट्न्स्टचं काम कुठवर आलं केवाळेसाहेब ?''
समोर बघत केवाळे म्हणाले, ``चालू आहे. पवारसाहेबांनी सांगितलंय जातीनं लक्ष घालतो म्हणून. मी म्हटलं आमच्या जातीच्या मागण्यांकडं नेतृत्वानं सातत्यानं दुर्लक्ष केलंय. आता आम्ही एवढी शाळा बांधायचं मनावर घेतलंय तर ट्न्स्टला अडचणीत आणलं या भटांनी. यांची माणसं किती आणि काय खातात हे माहिती नाही काय आम्हांला ? लेडिज हॉस्टेल बांधायला पैसे तर आम्ही सरकारकडूनच, मिळवले ना ? दलितांच्या गरजा कोणाला कधी कळल्यात ?'' केवाळेंनी एक जबरदस्त वळण घेतलं. जीपमधले सगळे एकमेकांवर आदळले. जोरात हसत त्यांनी स्टिअरिंग व्हीलवर ताल धरला. ``आपल्या जागा नीट धरून ठेवा म्हणावं. आणि मग दुसऱ्यांच्या जागांना हात लावा.''
शिबिराची जागा आली. कुटे धावत सामोरे आले. केवाळेंनी त्यांच्या पाठीवर थाप मारली.
``काय सर, शिबिर कसं चाललंय ?''
``छान चाललंय सर. बरं झालं तुम्ही वेळ काढलात.''
``अरे, तुझं शिबिर म्हटल्यावर यायलाच हवं. आपल्या सगळयांना घेऊन आलोय. प्राचार्य आले का तुमचे ?''
``ते नाही येणार आज. त्यांचा दुसरा कार्यक्रम आहे.'' कुटेंनी सांगितलं. केवाळे हसले.
``चालायचंच. चला.'' म्हणत मंडपापाशी गेले.
मोठा मंडप टाकला होता. राणेसाहेब अध्यक्षस्थानी होते. गावकरी आले होते. मुलं दाटीवाटीनं बसली होती. आंबेडकरांचा फोटो खुर्चीवर ठेवला होता. त्याला हार घालून भाषणांना सुरुवात झाली.
``डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित अस्मितांची मशाल पेटवली.ती पुढे नेताना आम्हांला आनंद होत आहे. शिक्षण हे समाजपरिवर्तनाचं मोठं साधन आहे. शिक्षणाचं ध्येय आहे दलितांच्या हाती सत्ता. जी संधी दलितांना रामायण काळापासून नाकारली गेली ती आंबेडकरांनी खुली केली. आता दलित तरुण शिकून स्वतंत्र होतो आहे. तो सत्ता मिळवल्याशिवाय राहणार नाही. ब्राह्मणशाही संपुष्टात येऊन जनतेचं राज्य प्रस्थापित केल्याशिवाय राहणार नाही.
केवाळे बोलत होते. जनतेचं राज्य म्हणजे काय ? शिक्षण खरंच परिवर्तन घडवतं आहे का ? ज्या संधी शिक्षणानं खुल्या केल्या आहेत. त्या नक्की किती आणि कोणत्या ? पारंपरिक कौशल्यांची भाषा ब्राह्मणांच्या इंग्रजीनं घेतली. ब्राह्मणांकडे दुसरं कोणतंच कौशल्य नव्हतं. मग केलं पुष्कळ अवडंबर त्याचं. त्यातून मिळणार काय तर ब्राह्मणांनी सांभाळलेली चाकरमानी क्षेत्रं ! ब्राह्मण त्यातून बाहेर ढकलले गेले तरी मोठ्या उद्योगधंद्यांमधून आंतरराष्ट्नीय ब्राह्मणशाही स्थिरावेल तेव्हा काय? माझ्यासमोर खरंच प्रश्न होते. ब्राह्मणी कोषात वाढून मी उरलेल्या जिवंत समाजात किती निरुपयोगी ठरत होते. ते दिसत होतं. माझं ज्ञान हे ज्ञानही नव्हतं खरं तर. आंबेडकरांचा ज्ञानसाधनेचा आग्रह तितक्याच द्रष्टेपणानं उचलायला हवा होता. ब्राह्मणशाही दीडशे वर्षांची होती फार फार तर. आधी काय होतं ? नंतर काय झालं ? आपण सगळयांनीच काय सोसलं ब्रिटिश राजवटीत? पार खरवडून, धुवून नेला देश. उरलेल्या विध्वंंसावर उकिरडे सांभाळत लढतोय आपण जाती धर्माची भांडणं. कधी शिकणार शहाणपण आपण ? हे मला म्हणायला सोपं होतं. कदाचित - मग अगदीच गप्प व्हावंसं वाटलं.
समोर मुलांचे हात प्रश्न विचारायला वर होताना दिसले. प्राचार्य केवाळेंनी भाषण संपवलं आणि हसतमुखानं प्रश्न विचारायची मुभा दिली. प्रशांत उभा राहिला.
``आरक्षणाची सवलत आणखी किती दिवस घेणार दलित? कष्ट करून चांगले मार्क्स मिळवणाऱ्या मुलांवर अन्याय होतो त्याचं काय ?''
प्राचार्य केवाळे म्हणाले, ``इतकी हजारो वर्षं दलितांवर अन्याय झाले ते आपल्याला कधी जाणवले ? आता अवघी पन्नास वर्षं आरक्षणाचं धोरण येऊन झाली तर लगेच अन्यायाची भाषा कशी काय होते ?''
``हजारो वर्षांचे अन्याय आम्ही नाही केले.'' विनोद ताडकन उभा राह्यला.
`` तुम्ही नाही. तुमच्या वाडवडिलांनी केले. गळयात मडकी बांधून आणि कंबरेला झाडोरा बांधून फिरवलं ना दलितांना, त्याचं काय ? केवाळेंनी विचारलं.
``आमच्या वाडवडिलांची शिक्षा आम्हांला काय म्हणून?'' प्रशांतचा आवाज चढला. ``शिवाय गुणवत्तेचा मुद्दा आहे की नाही ? ४०% वाले पुढे आणि ८०% वाले मागे, असले डॉक्टर इंजिनिअर काय कामाचे ?'' विनोद आक्रमक होत होता.
``८०% वाला डॉक्टरही कशावरून चांगला रे ? हे तुम्हा ब्राह्मणांचं कुभांड आहे.'' म्हात्रे म्हणाले.
``साधे दोन शब्द लिहिता येत नाहीत सरळ आणि आरक्षण चालू ठेवताय्.'' विनोद म्हणाला.
मी अध्यक्षीय हस्तक्षेपासाठी राण्यांकडे बघितलं. ते किंचित हसत होते. हात उंचावून त्यांनी मला `चालू द्या' अशी खूण केली. कुटेही गप्प होते. केवाळे म्हणाले, `` दोन शब्द लिहिता येणं म्हणजे शहाणपण नाही ना. भटांनी तेवढ्यावरच तर दाबून टाकलं जनतेला. भटाचं बोलणं, भटाचं लिहिणंच गारद करायचं की आता इतकी वर्षं दडपला दलित तुम्ही, वेळ लागणारच शिकायला. तो बोलायला लागला, लिहायला लागला हेच आक्रित वाटतंय नां तुम्हाला. हे बरं नाही. आणि आता तुम्हांला काही का वाटेना दलितशक्ती जागृत होतीय त्यापुढे तुम्ही काय टिकणार नाही.''
``हा अन्याय आहे.'' प्रशांत म्हणाला.
``इतकी वर्षं अन्याय झालेल्या दलितांना आता सूडच घ्यायचाय भटशाहीवर बोला जय भीम'' म्हात्रे म्हणाले.
आणखी सात आठ मुलं उभी राहिली. आक्रमकपणे बोलायला लागली. न राहवून मी उठले. माईक हातात घेतला.
``प्रशांत खाली बैस. विनोद शांत व्हा. आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांशी वागायची ही पद्धत नव्हे. प्राचार्य केवाळे म्हणताहेत ते बरोबर आहे. माझीही भूमिका आरक्षण चालू राहिलं पाहिजे अशीच आहे. तुम्ही विचार करा ८०% मिळवूनसुद्धा नाही मिळाला प्रवेश तुम्हांला मेडिकल, इंजिनिअरिंगला. काय होणार आहे ? फक्त तेवढीच क्षेत्रं आहेत काय शिकण्याची ? नाही मिळाली सरकारी नोकरी तर काय रस्त्यावर येणार आहात तुम्ही ? स्वत:चे काही ना काही उद्योग सुरू करण्याइतकं भांडवल तुमच्याकडे नक्कीच आहे. घरून मदत आहे. इतिहास नाकारून चालत नाही. तो लक्षात ठेवूनच मार्ग काढावा लागतो. आताच्या टप्प्यावर तुम्ही आणि आम्ही भाषा विसरण्याचा प्रयत्न करायला हवा. म्हात्रेसरांचा राग मला कळतो पण सूडाच्या भाषेतून प्रश्न सुटणार नाहीत. आपली भूमी आहे. आपल्याला दोन वेळचं जेवण पुरवण्याइतकी सक्षम नक्कीच आहे. सगळयांना खायला कसं मिळेल हे बघणं आपली जबाबदारी आहे. काय म्हणून भांडत बसायचं ? कोणत्याच क्षेत्रात कष्टांना पर्याय नाही आणि कष्टांना फळही आहे. परीक्षा ठेवा बाजूला. स्वत:ला काय करता येतं, काय करायचं आहे याचा शोध घ्या.''
मुलं खाली बसली. मी जागेवर गेले. कुटेसरांनी राणेंना बोलण्याची विनंती केली. राणे उठले.
``माझ्या तरुण मित्रांनो, तुमच्या भावना मी समजू शकतो पण प्राचार्य केवाळे म्हणतात तसं अन्यायाची परतफेड तर झालीच पाहिजे. ब्राह्मणशाहीचे दिवस संपले. शिवशाही आली पाहिजे - जिथं सर्वांनाच अभय मिळेल. मनमानी करता येणार नाही. मराठा मनगटं भक्कम आहेत अन्याय करणाऱ्यांना थांबवायला. केवाळेसाहेब आमचं तुम्हांला अभय आहे. आपण मिळून शिवशाहीचं स्वप्न पूर्ण करू. जो विरोध करेल त्याला कापून काढू. मग तो कोणीही असेल.'' अत्यंत सभ्य, सुशिक्षित चेहरा असलेले आधुनिक पेहेरावातले राणेसाहेब मला एकदम घोड्यावर बसून तलवार उपसून दौडत जाताना दिसले. मुलं गप्प झाली होती. नक्की कोणतं व्यासपीठ होतं हे ? मला प्रश्न पडला.
कुटे आभार मानायला उठले,
``सन्माननीय राणेसाहेब, आदरणीय प्राचार्यसाहेब, माननीय म्हात्रेसाहेब आणि विद्यार्थी मित्रांनो,आजच्या समारोपाचा कार्यक्रम पार पडला याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. प्राचार्य केवाळेसाहेब त्यासाठी वेळात वेळ काढून परमपूज्य, भारतभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सांगण्यासाठी इथे आले याबद्दल महाविद्यालयातर्फे मी त्यांचे आभार मानतो. आमदार राणेसाहेबांनी हा क्रॅम्प पार पाडण्यासाठी दिलेली मदत आणि आम्हांला शेवटपर्यंत केलेल्या मार्गदर्शनाबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.''
स्वागत/आभार सगळयांचेच शब्द ठरलेले असतात. त्यांना अर्थ मिळतो तो बाहेरच्या चौकटीमुळे. भाषा चलाख माध्यम आहे. जितकी जितकी चोख होत जाईल तितका संवाद युद्धाचे पवित्रे घेतो. सभ्यपणे घेतो. व्यवहाराला जास्तीत जास्त पवित्र करत, प्रोटोकॉल पाळत युद्धरेषा आखल्या जातात. युद्धक्षेत्रं ठरवली जातात. युद्धप्रवण क्षेत्रांचं भान न ठेवता निव्वळ शब्दांवर श्रद्धा ठेवून माझ्यासारखे लोक निर्वासित होतात. पण मग मुलांचे काय? कोणत्याच क्षेत्रांचे गुलाम न होता स्वतंत्र विचार करायचा, स्वहिताचा विचार करायचा तर मुलांनी काय करावं ? तिथे फक्त भाषाच असणार. भाषा निर्माण करू शकते नवीन क्षेत्र. मी थकून मुलांकडे पाहिलं. कार्यक्रम संपला. कुटे सगळयांना घेऊन जेवणघराकडे गेले. मी मुलांमध्ये गेले. पाहुण्यांची जेवणं होईपर्यंत गप्पा झाल्या.
बऱ्याच अडचणी होत्या मुलांसमोर. बहुतेकांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. दोन/चार एकरवाले शेतकरी कुटुंब सांभाळू शकत नव्हते. लेकसिटीसारखे प्रकल्प गावांना घेरून टाकत होते. छोट्या छोट्या शेतकऱ्यांच्या जमिनी गिळंकृत करत होते. राष्ट्नीय प्रकल्पांचे विस्थापित दाद मागत हिंडत होते. एक दोन मोठ्या कंपन्यांनी त्यांचे पाय रोवायला सुरुवात केली होती. मॉल्ससाठी जागा मुकर्रर होत होत्या. विमानतळ होण्याच्या बातम्या पसरत होत्या.
``मॅडम, लेकसिटी बघायला यायचंय ?'' मुलांनी विचारलं.
``खूप भारी आहे मॅडम. कोणालाही प्रवेश नाही तिथं. बंदुका घेऊन वॉचमन उभे असतात.''
``मॅडम, मुंबईहून दररोज हेलिकॉप्टर सेवा आहे.''
``कुठे झाली रे नक्की ही लेकसिटी?'' मी विचारलं.
``मनोजला विचारा - त्याच्या नातेवाइकांची शेती होती त्या भागात.''
``काय रे मनोज ?''
``मॅडम, हा नदीचा काठ सरळ भिडतो ना त्या तटाला धरण बांधलंय् पहा- तिथून वरचे डोंगर सगळे लेकसिटीवाल्यांनी घेतलेत. पलीकडचे मुंबई. इकडे कोकण सगळं- एकदम भारी घरं आहेत आहेत, मॅडम. माझा मामा तिथल्या बंगल्यात माळीकाम करतो. नदी अडवून धरण बांधलंय ना - शेती बी करतात आत.''
``मामा आधी काय करत होते ?'' मी विचारलं.
``त्यांची शेती होती थोडी फार. प्रयोगशील शेतकरी होते.''
``मग ?''
``ती लेकसिटीवाल्यांनी घेतली ना. या डोंगरभागात शेती करणं पार जिकिरीचं. राणेसाहेबांनीच पटवलं.''
``मामा आता राहतात कुठं ? आतमध्ये ?''
`` हँ, परवानगीच नाहीये. बाहेर त्या वरल्या अंगाला खोली आहे त्यांची. सकाळी जातात. ओळखपत्र आहे त्यांच्यापाशी. रात्री येतात.''
``मॅडम, आम्ही चार-पाच जण जाऊन आलो आत राणेसाहेबांबरोबर. काय सुंदर आहे ! एकदम सिनेमातल्यासारखं, इंग्रजी सिनेमातल्यासारखं. कारंजी आहेत. पाणी वाहतंय. खेळांची सोय आहे. आठ कोटींचा बंगला आहे एकेक.'' विनोद म्हणाला.
``मॅडम, सगळयांचेच बंगले आहेत तिथं. पार मंत्र्यांपासून, सिनेमावाले, खेळाडू पार सगळयांचे '' प्रशांत म्हणाला.
``केवढा आहे परिसर?'' मी विचारलं.
``आसंल दोनचारशे एकर. मॅडम तुम्ही बघूनच या. राणेसाहेबांना सांगा.'' मनोज म्हणाला.
पाहुण्यांची जेवणं झाली. शिपाई बोलवायला आला.``मॅडम, कुटे सरांनी विचारलंय, तुम्ही पाहुण्यांबरोबर जाताय ना ?''
मी उठले. राणेसाहेबही जीपमध्ये होते. गेल्या आठ दिवसांत न दिसलेला गावाचा परिसर बघायला मिळाला. राणे केवाळेंना सांगत होते,
``या लेकसिटीसारखे प्रकल्प व्हायला पाहिजेत. छोटे शेतकरी काय शेतीवर जगत नाहीत. काही उपयोगाचे नाहीत. सांगतोय सगळयांना शेती सोडून द्यायला पाहिजे. पोरांना शेतीबाहेर पाठवा. आम्ही दोन कंपन्यापण आणल्यात आमच्या भागात. विकासप्रवण क्षेत्र आहे. एक लिकरची कंपनी आणि दुसरी कॉस्मेटिक्सची - कोलॅबोरेशन आहे. लोकांना रोजगार मिळेल. भराभर विकास होईल. आपण जुन्या कल्पना सोडून दिल्या पाहिजेत.''
``लोकांना पैसे मिळाले तरी शेती संपवल्यावर काय खाणार?'' मी माझ्याही नकळत विचारलं. पिंक टाकत राणे म्हणाले, `` आयात करता येतं. हा आपला डोंगराळ भाग. अशी किती शेती पिकणार आणि काय खायला मिळणार ? गाईगुरांचं ते धकत नाही तर माणसं काय खाणार ?''
``आपल्याकडचे लोक हे समजून घेत नाहीत पहा राणेसाहेब, आपण शहरात बसायचं आणि दुसऱ्यांना शेती करा म्हणायचं. शेतीतली ना काडीची माहिती ना रिस्कची माहिती. पण आपलं शेतकऱ्याला भरीला पाडत राहायचं. फुल्यांनी केव्हाच सांगितलं होतं हे.'' केवाळे म्हणाले.
``फुल्यांनी शेतकऱ्याला केंद्रस्थानी आणलं. त्याला राजा बनवायला सांगितलं.''
मी म्हणणार होते. पण आजच्या शहरी नाकर्तेपणानं मला पुन्हा एकदा गप्प केलं. मुलांची युद्धभूमी खरी तर शेतकऱ्यासाठीची होती.
केवाळे राणेसाहेबांना विचारत होते. ``एखादी शिक्षणसंस्था सुरू केली की नाही या भागात ? निदान औद्योगिक प्रशिक्षण केंद्र वगैरे ? आपली माणसं तयार होतात. हातात राहतात.''
राणे हसले, ``वाईनरीजच्या प्रशिक्षणासाठी पाठवलीत आपली पोरं बारामतीला. पण बाकी काही नाही अजून. तुमच्या मदतीनं करून टाकू. कॉलेजबिलेज काढायला काय लागतंय ? आता बाइंर्चे प्राचार्य रागावतील म्हणून थांबलोय. उगा त्यांना कॉम्पिटिशन नको - आपलाच माणूस आहे. सगळयांची पोटं भरायला हवीत, काय ? नेतृत्व करायचं तर सगळयांची चिंता केली पाहिजे.'' राणे हसले. केवाळेही हसले. म्हात्रे म्हणाले, ``गाणी लावा. कामाच्या गोष्टी पुरेत की आता.''
केवाळेंनी टेप सुरू केली. `पान खाये सैंया हमारो.''
म्हात्रेंनी ब्रीफकेसवर ताल धरला.

कॉलेज सुरू झालं. कुटेंनी शिबिर यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल प्राचार्यांनी एक मीटिंग घेऊन त्यांचा सत्कार केला. राणेसाहेबांच्या विविध प्रकल्पांचा अहवालही कुटेंनी त्यांच्या कानांवर घातला. राणेसाहेबांनी खास प्राचार्यांसाठी पाठवलेली भेट कान्हेरेंनी त्यांच्या हाती सुपूर्द केली. कॉलेज परीक्षेकडे चालू लागलं.
स्टाफरूममध्ये खिरे बसले होते. कान्हेरेंना विचारलं, ``काय मग, झाल्या का वाईनच्या बाटल्या पोहोचत्या ? प्राचार्यांच्या मिसेसना पण फार आवडते वाईन.''
``हो ?'' म्हणून कान्हेरे हसल्या.
``समारोप समारंभ चांगलाच जोरात पार पडला असं ऐकलं.''
``मॅडमनाच विचारा ना. त्याच होत्या स्टेजवर.'' कान्हेरेंनी रिपोर्टिंग आणि गॉसिप दोन्हींचा धोका टाळला.
``खरं सांगू का मॅडम. हे दोघंही सारखेच. शिवशाहीवाले आणि आंबेडकरवाले. ब्राह्मणांनाच वाली नाही कोणी.'' खिरे म्हणाले.
``मला काय कळतं त्यातलं ?'' कान्हेरेंनी काढता पाय घेतला. खिरे निसरडा माणूस. त्याचं राजकारण कोणालाच कळत नाही. पण सगळयांच्या अत्यंत उपयोगी पडणारा. दुसऱ्यांना नेमकं बोलायला लावून योग्य ठिकाणी पोहोचतं करणारा. मला म्हणाले, ``मॅडम, कोणीतरी आता आपल्या बाजूनं बोलायला हवं.'' मी गप्प बसले.
जाधव तासावरून झाले. डस्टर, खडू टेबलवर फेकत म्हणाले, ``कुटेंचा सत्कार केला पण सगळं काम तर राणेसाहेबांचंच होतं. पार समारोपात केवाळयाला ऐकवण्यापर्यंत, पोरांकडूनही आणि स्वत:ही. तरी सत्कार कुटेचाच.''
``मग कोणाचा करायचा ?'' खिऱ्यांनी विचारलं.
``तेही खरंच म्हणा ! राण्यांकडून हाणून घेतलं म्हणताना सत्कार तर व्हायलाच पाहिजे राव !'' जाधव जोरात हसले. खिऱ्यांनी टाळी दिली. मी तासाला गेले.
वंदना भागवत
१३४/४/२० अशोकनगर
२, व्हाईट फिल्डस् अपार्टमेंटस्,
पुणे ४११००७.

ugg boots sale has become the

ugg boots sale has become the new favorite of many young women, because its fashionable appearance and excellent quality. Once you put on UGG Sheepskin boots, I'm sure you will fall in love with comfort and the warm feeling, bring. Wool is committed to providing comfortable, warm atmosphere for your feet.UGG Sheepskin Cuff Boots our online stores with ugg boots clearance with a lower price and best service to you.

पण आता प्रमोद नारगोळकर

पण आता प्रमोद नारगोळकर त्सुनामीमध्ये बेपत्ता आहेत. त्यांचा कारखाना त्यांचा मुलगा आणि सून सांभाळत आहेत. त्यांची मुलगीही इंजीनिअर आहे आणि सध्या अमेरिकेत आहे. वडिलांच्या निसर्ग प्रेमाला आणि वेडाला तिचा पूर्ण हातभार असे, आहे. नारगोळकरांच्या पश्चात त्यांची पत्नी नयना यांचा निर्धार आहे की नारगोळकर यांचं स्वप्नं मला पूर्ण करायचं आहे. नयनाची पूर्ण श्रद्धा आहे, की सुनामीत बेपत्ता असलेले तिचे पती आज ना उद्या परत येणार आहेत. कोकणातल्या महाड गावी जन्म आणि बालपण गेलेल्या प्रमोद नारगोळकरांच्या रक्तातच निसर्गप्रेम आहे. नैसर्गिक आपत्तीनंच त्यांना तडाखा दिला आहे. निसर्ग चमत्कार झाला तर ते परतही येतील. आपण काय करू शकू? वेळ, पैसा आणि आवड असली की त्याचा विनियोग HP0-S27 braindumps 642-427 braindumps 352-001 braindumps HP0-J48 braindumps 646-656 braindumps E20-361 braindumps 312-50 braindumps 650-177 braindumps ged prep software 2012

Rolex watch replica wrist

Rolex watch replica wrist watches are among the the majority of desired add-ons on the planet. There are a variety of things which makes these types replica watches uk t at a lower Cartier Organization, via hundreds of years, designed all of the luxurious as well as extremity within expenses associated with valuable gemstone uk replica watches zel RM 020 Watches Replica. the consumer is certainly heading to become extremely harm about this. They are scenarios that you simply would by no means rolex replica he compensation 500,000, from the particulars of the business to erect its personal property a higher 300 meters broad, sixty meters of outside billboards, f replica watches acking. Lacking costs indicates the actual fake excellence of the shoes or boots are jeopardized and those that are too costly — will be a waste uk replica watches for that agreement from the model in the organization.Alain Silberstein is really a globe acknowledged brand name with regards to watches. This continues to replica watches ing and stylish watches that an individual needs to select from.1 brand which has a big choice of stunning and stylish watches is Emporio Armani.Armani ar replica watches uk obtain a Rolex watch replica watch with out leading to any kind of stress in your spending budget that is definitely not feasible just in case if you are chanel handbags st-effective ah! That cost will be the praise. My louis vuitton handbag is orange. It seemed extremely large and tall stature, allow my small lady hiding within, replica watches al benefit of elevation where you receive the actual opportunity to be in a position to consider the globe from the various viewpoint. Which is not l swiss replica watches ses can also be probably the most costly nation to almost 50000 RMB, so the individuals of Shanghai would be the most exceptional cough, what distortion concept, Replica Handbags e globe ahs altered by big. Issues that had been prohibited formerly are now the require of numerous and that’s how the planet continues to be operating chanel replica numerous while you want. It’s merely an incredible provide for all you gals and guys available.Existence isn’t as harsh because it seems. We m replica watch ough dealing with may cause them to bend or break.here are a few bezels which are very costly. Harmful certainly one of these will definitely not be u Replica Handbags le in sequence for example M56381, M56882, M93702, as well as M93703 and so forth. These types of design amounts as well as their own title image are ve uk replica watches ich means you see you took the actions and study this bit of content material for your self and consequently you’ve encounter an answer for existence replica watches 1 it is certain you will get the very best there’s on the market if you opt to purchase one of those slinky replica footwear. Along with best manufactu replica chanel simply a duplicate of awesome branded; I wish to inform them that this assumption was accurate many years again although not any much more as well as watches replica