Skip to main content

स्नेह 'तें' चा

गेल्या वर्षीच्या सप्टेंबरचा तिसरा आठवडा. बाजी, सुधा बरोबर तेंडुलकर ३-४ दिवसांसाठी पुण्यात आले होते. इथे आल्यावर मरगळ जाते, ताजंतवानं वाटतं, असं त्यांचं मत.
गेली २-२ ।। वर्ष त्यांना मायस्थेनिया ग्रेव्हिसनं त्रास द्यायला सुरुवात केली होती, आणि पुण्याला आले की डॉ. शिरीष प्रयाग यांच्याकडे चेकअपला जायचं, हे ठरलेलं काम असे. मागच्या वर्षी आले तेव्हा तब्येतीच्या कुरबुरीमुळे त्यांचा मूड जरा वाईटच होता. ते आले की शास्त्रीय संगीत ऐकणं आणि मित्रांना भेटणं, हे ठरलेलंच, असंच एका संध्याकाळी शिरीषला भेटलो, तेव्हा त्यांचा मायस्थेनिया वाढलाय असं शिरीषच्या लक्षात आलं. आणि त्यानुसारची औषधयोजना त्यानी लिहून दिली. परतताना आम्ही औषधं आणली आणि रात्री नेहमीसारख्या गप्पा मारल्या.
दुसऱ्या दिवशी सकाळी बाजीच्या गाडीत बसता बसता त्यांनी मला बाजूला घेऊन म्हटलं,``अशोक, तुला म्हणून सांगतोय, माझं मन म्हणतंय माझ्या शेवटाची सुरुवात झालीय.'' ही तात्पुरती फेज आहे, अशा माझ्या समजावण्याकडे लक्ष न देता, ते गाडीत बसले, निघाले....
दुर्दैवानं पुढच्या काही दिवसांत त्यांची तब्येत बिघडत गेली आणि त्यांना `प्रयाग'मध्ये अॅडमिट करावं लागलं. पुढचे सलग तीन महिने, मग बाजी, सुधाच्या घरी.. बरं वाटलं म्हणून मुंबईला गेले, पण लगेचच परत पुण्याला आणावं लागलं... सगळे प्रयत्न फोल गेले.... त्यांचा आजार वाढतच गेला आणि अखेर १९ मे ०८ला सारं संपलं.
विद्या आपटे आणि मी सतत तेंडुलकरांबरोबर असायचो. विद्यानं ज्या प्रेमानं, ममतेनं, काळजीपूर्वक त्यांची सुश्रुषा केली त्याला तोड नाही. बाकीची औषधोपचाराची आणि इतर काम मी करत होतो. माझी पत्नी चित्रा, घरगुती जबाबदाऱ्या, दवाखान्याचे डबे.. असं सगळं करायची. मित्रांची, स्नेहीजनांची अख्खी फौज जे पडेल ते करायला तत्पर असे.
तेंडुलकर आय.सी.यू.त होते. ट्न्ॅिकओस्टॉमी (कृत्रिम श्वासोश्वास किंवा इतर कारणांसाठी श्वासनलिकेला भोक पाडून एक नळी आत घातली जाते.) मुळे बोलू शकत नव्हते तरी मनाने तल्लख होते. थिएटर, फिल्म्स, राजकारण, समाजकारण या त्यांच्या आवडीच्या विषयातलं जाणून घेत होते. इतक्या गंभीर आजारातही जगण्यातलं त्यांचं कुतूहल बघून आम्ही अक्षरश: थक्क होत असू.
तरुण लेखक, दिग्दर्शक, ज्यांना ज्यांना तेंडुलकरांनी प्रोत्साहन दिलं होतं, ती मंडळी हॉस्पिटलवर सतत यायची. कुणी वाजून दाखवे, कुणी लॅपटॉपवर नवी फिल्म दाखवे, कुणी त्यांना चांगलं संगीत ऐकवे, कुणी राजकारणातल्या चालू घडामोडींवर चर्चा करे. तेंडुलकरांना बोलता येत नव्हतं, पण ते लिहून दाखवायचे. `काय नवीन पाहिलंस? वाचलंस?' हा त्यांचा आवडीचा प्रश्न!
इतर पेशंट्सच्या व्यस्ततेतही शिरीषची सकाळ संध्याकाळ फेरी असे. उपचारांबाबतचे बारकावे तो तें ना आणि आम्हांला सांगे. हॉस्पिटलमधल्या सगळया डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉईजनी तें ची अतिशय मन:पूर्वक सेवा केली. हॉस्टिलमधल्या ट्नीटमेंटबद्दल आणि शिरीषबद्दल त्यांना विलक्षण कृतज्ञ वाटत होतं. डिसेंबर अखेरी ते घरी आले, तेव्हा मला आणि विद्याला म्हणाले,``शिरीष आणि त्याच्या टीमनं मला पुनर्जन्म दिलाय.''
घरी आल्यावर त्यांची तब्येत छान सुधारत होती. ते आमच्या सोसायटीत चकरा मारत, सिनेमे बघत, थोडं थोडं लिहीत. मार्चच्या सुरुवातीला ते मुंबईला गेले. पण जेमतेम महिन्याभरात परत आणावं लागलं.... `शेवटाची चाहूल' खरी ठरली.
शेवटच्या ४-५ वर्षांत आम्ही खूप जवळ आलो होतो. शेवटच्या आजारपणानं आणखीनच जवळ आणलं. जाण्यापूर्वी त्यांनी मला माझ्या आवडीचं पुस्तक आणायला सांगितलं आणि थरथरत्या अक्षरात लिहिलं,``माझा अविभाज्य भाग परममित्र अशोक याला... `तें..'' त्यांचे शब्द माझ्या काळजात रुतून बसलेत.
तेंडुलकरांची माझी ओळख १९६७-६८मधली. तेव्हा मी फायनान्शिअल एक्सप्रेसमध्ये पत्रकार म्हणून काम करीत होतो. तें होते लोकसत्तेत. ससून डॉक्समध्ये आमची ऑफिसेस एकाच मजल्यावर हेाती. माझं वाचन कानडी आणि इंग्रजीतलं. गिरीश (कार्नाड) माझा जुना मित्र.तो मला भेटायला ऑफिसात आला असताना आम्ही तेंडुलकरांना भेटलो. गिरीशमुळेच माझी (सत्यदेव) दुबेंशी मैत्री झाली. दुबेमुळे अमोल (पालेकर), अमरीश पुरी, डॉ. लागू, दीपा, भक्ती बर्वे, सुलभा/ अरविंद देशपांडे, गोविंद निहलानी अशा मराठी, हिंदी रंगकर्मींशी मैत्री झाली. तेव्हापासून मी मराठी नाटकं बघायला लागलो. मराठी नाटकातल्या माझ्या वाढलेल्या इंटरेस्टनं मला आणि तेंडुलकरांना जवळ आणलं. ते रोजच माझ्या ऑफिसमध्ये गप्पा मारायला येत. हळूहळू
मैत्रीकडे प्रवास सुरू झाला.
तो काळ थिएटरसाठी सुवर्णकाळ होता. गिरीश कर्नाड, बादल सरकार, मोहन राकेश आणि तेंडुलकरांची महत्त्वाची नाटकं याच दशकात रंगभूमीवर आली. तेंडुलकरांची `गिधाडे' `शांतता', बादलसरकारांची `एवं इंद्रजित', `वल्लभपूरची दंतकथा', कार्नाडांचं `ययाती', `हयवदन', मोहन राकेशचं `आधे-अधुरे'....
माझी आणि तेंडुलकरांची मैत्री होण्याचं अजून एक कारण होतं. ते म्हणजे `वालचंद टेरेस'चा हॉल. किंबहुना अनेक रंगकर्मींसाठी ते एक सांस्कृतिक भेटीगाठींचं ठिकाण होतं.
वालचंद टेरेसची मालकी होती, विनोद आणि शरयू दोशींकडे. विनोद दोशी प्रिमीअर ऑटोचे डायरेक्टर. ते नाटकांचे निस्सीम चाहते. दुबेंचं एक नाटक बघून ते आत आले आणि दुबेला म्हणाले,`काही मदत करू शकतो का?' दुबेला तालमीसाठी जागा हवी होती. त्यानं मागितली. दोशी म्हणाले, `दिली'... अशा तऱ्हेनं `वालचंद टेरेस'वर नाटकांच्या अॅक्टिव्हिटीज्ची सुरुवात झाली. बघता बघता ती जागा नाट्यकर्मींचा कट्टा आणि दुसरं घर बनली.
गिरीश कार्नाडनं त्याचं एक पुस्तक `वालचंद टेरेस' ला अर्पण केलंय. ती अख्खी अर्पणपत्रिका इथे देणं शक्य नाही, पण त्यात त्यानं म्हटलंय,``इथे खूप चर्चा झाल्या, वाद झाले... काही विकोपाला गेले, पुष्कळ काही भरीव त्यातून निघालं,भारतीय रंगभूमीवर पुढे घडलेल्या अनेक चांगल्या गोष्टींची बीजं इथेच रुजली. इथे प्रेमं जुळली, प्रकरणं झाली, लग्न झाली, घटस्फोट झाले'' ... तर त्या वालचंद टेरेसवर तेंडुलकरही यायचे. त्यांच्या नव्या नाटकाचं वाचन दोशींकडे व्हायचं. `अशी पाखरे येती'चं नितांतसुंदर वाचन मला अजून आठवतं.
माझं घर तिथून जवळ, ताडदेवला होतं. माझं लग्न व्हायचं होतं. फ्लॅटमध्ये मी एकटाच राहायचो. तालमीनंतर कित्येकदा दुबे माझ्याकडेच राहायचा. तेंडुलकरही गप्पा मारायला यायचे.
एका सकाळी तें आले. म्हणाले, `एक नाटक पूर्ण करून द्यायचंय एकच अंक लिहून झालाय. तू कुलूप लावून ऑफिसला जा, मी लिहीत बसतो.' मी त्यांना चहासाखरेचे डबे वगैरे दाखवायला लागलो तर म्हणाले, मला काहीही लागणार नाही. फक्त शांतपणे लिहायचंय. मी कुलूप लावून गेलो. संध्याकाळी परतलो, तेव्हा `दंबद्वीपाचा मुकाबला' हे नाटक लिहून पूर्ण झालेलं होतं.
तेंडुलकरांशी स्नेह वाढत चालला असला तरी आमच्यात चुकूनही घरगुती विषय निघायचे नाहीत. मी जेमतेम २/३ वेळाच त्यांच्या घरी गेलो असेन नसेन.
२-३ वर्षं बघता बघता गेली आणि मी ७० मध्ये मुंबई सोडून दिल्लीला गेलो. पुढची वीसेक वर्षं मी बाहेरच होतो. मुंबईतल्या मित्रांचा संपर्क जवळपास संपलाच. वर्षात एखादवेळेस भेट होईल तेवढीच. ८३मध्ये मी पुण्यात आलो असलो तरी माझ्या कामातच व्यग्र होतो. नव्वदच्या सुमारास मी जुन्या मैत्रीला उजाळा द्यायला सुरुवात केली. तें चं नाव पहिलं. मध्ये वीस वर्षांचा काळ उलटला होता.`तेंडुलकरां'चं नाव मराठीच्या सीमा पार करून देशव्यापी ओळखीचं झालं होतं., तरीही आमच्यात `ते वलय' त्यांनी कधीच आणलं नाही. ते तसेच होते. वीस वर्षांपूर्वीचे. उलट तेव्हा आम्ही पर्सनल गोष्टींबाबत फारसे बोलायचो नाही. आता तेही विषय बोलण्यात येऊ लागले. `खाजगी कसं बोलायचं?' हा मनाचा अडथळा दूर होताच, आम्ही अधिक मोकळे झालो. सुखदु:खाचं शेअरिंग असं करू लागलो, जणू वर्षानुवर्षं करतोय. म्हणजे वर्षानुवर्षांची मैत्री होतीच पण आता नव्यानं सूर सापडले होते.
या हशरीीं ींे हशरीीं संवादानं तेंडुलकरांना काय मिळत होतं ठाऊक नाही, मी मात्र फार समृद्ध झालो. माझ्या एकूण व्यक्तिमत्त्वातच बदल झाला, असं वाटतं.
तें ना कुणी आवडलं की त्याचं वय न बघता ते त्या व्यक्तीशी छान मैत्री करून टाकत. माझ्या घरातलंच उदा. माझ्या मुलाची- नीलेशची तें शी ओळख जेमतेम तीन वर्षांपूर्वी मी करून दिली. पुढे त्या दोघांनी ती आपापली जोपासली. नीलेशला ते `मित्राचा मुलगा' नव्हे मित्रच मानतं.
तें प्रयागमध्ये अॅडमिट असताना ट्न्ॅिकओस्टॉमी नं बोलता येत नसल्याच्या काळात डिसेंबरमध्ये नीलेशचं लग्न झालं. तें नी लग्नाला यायची इच्छा शिरीषने पूर्ण केली. र्ऋीश्रश्रू शिंर्ळीिशिव रार्लीश्ररपलश मधून डॉक्टर्स-नर्सेसच्या ताफ्यासहित तें नी रिसेप्शनला हजेरी लावली. तो एक अतिशय हृद्य क्षण होता. तेंडुलकरांनी लग्नाला येऊन लशीीं िशीीशपीं दिलं अशी नीलेश आणि शारिवाची भावना आहे.
तें च्या पिढीच्या लेखकांमधल्या फार कमी जणांना तरुण लेखकांच्या लेखनाविषयी कुतूहल असायचं. तें जवळ कायमच नवीन रंगकर्मींसाठी वेळ असायचा. कथा, नाटकं, एकांकिका, इतर ललित लेखन वाचून तें अत्यंत िेळीींर्ळींश सूचना द्यायचे. बघता बघता हे तरुण तें चे मित्र बनून जात आणि फक्त लेखनच नव्हे तर इतरही गोष्टंीमध्ये त्यांच्याकडूनच्या मार्गदर्शनाची इच्छा करत. तें त्यांचे मित्र, मार्गदर्शक.
आमच्या भेटीगाठींमध्ये प्रामुख्यानं असायचं ते शास्त्रीय संगीत ऐकणं. जेव्हा केव्हा ते माझ्या घरी उतरायला येत, तेव्हा सकाळी तास दीड तास संगीत ऐकण्यात जायचा. गप्पामध्ये राजकारण, समाजकारण आणि आसपास घडणाऱ्या घटनांचे विषय असायचे.. अनेकदा घरगुती प्रॉब्लेम्सबद्दलही बोलणं व्हायचं. बहुतेकवेळा ते बोलायचे, मी ऐकायचो. पण अनेकदा मीही माझे अनुभव सांगायचो. मी अनेक नोकऱ्या केल्या िेषीशीीळेपी बदलले... गावं बदलली, अनेक तऱ्हांच्या माणसांना निमित्तानिमित्तानं भेटलो. वेगळया क्षेत्रातल्या लोकांच्या कामाबद्दल, अनुभवाबद्दल ऐकायला त्यांना आवडायचं.
एक उदाहरण द्यायचं तर माझ्या एका मित्राच्या मुलीचा नवरा एका अपघातात गेला. सहा महिन्याच्या बाळाला घेऊन ती तिच्या सासरी राहात होती. नवऱ्याच्या मृत्यूनंतर सासरच्यांच्या वागणुकीला त्रासून ती तिच्या माहेरी म्हणजे माझ्या मित्राकडे परत आली... मुलगी मोठी धीराची. तिला स्वत:च्या पायावर उभं राहायचं होतं. हे सारं मी तें ना सांगितलं. त्यांना त्या मुलीला भेटावं वाटलं. सासरचं घर सोडावं वाटण्याइतकी नेमकी कुठली परिस्थिती तिच्यावर ओढवली, हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. त्याप्रमाणे आम्ही तिला भेटलो. दीड दोन तासाचं तिचं बोलणं तें नी टेप करून घेतलं.
माझा दुसरा एक मित्र उडुपी इथल्या शिरूर मठाचा स्वामीजी होता. उडुपीतला तो एक महत्त्ेवाचा, नावाजलेला मठ, त्या मठाचे असंख्य अनुयायी. माझ्या मित्रानं तिथला कारभार पाहिला आणि तो हबकलाच. मिथून तो चक्क पळून गेला. पुढे मग त्याने लग्न केलं, एका बँकेत नोकरी मिळवली. हे वर्णन ऐकून तें ना त्याला भेटायची उत्सुकता वाटली. म्हणून मग आम्ही त्याला मुंबईत भेटलो. त्यानं सांगितलं ते तें नी टिपून ठेवलं. त्याला आश्वासन दिलं की ते यापैकी काही उघड करणार नाहीत, फक्त उत्सुकतेपोटीच माहीत करून घेतलं म्हणून.
वर्षाभरापूर्वीची गोष्ट... तें आले असताना, माझे एक मित्र घरी आले. आर्मीमध्ये जनरलच्या हुद्द्यावरून निवृत्त झाले होते. छान गप्पा झाल्या. तें त्यांना म्हणाले,`सैन्यदलातल्या कामकाजाबद्दल जरा विस्तारानं संागा की एकदा. मित्र म्हणाले, `जरूर...' दुर्दैवानं तो योग येण्याआधीच तें आजारी झाले.
योग आला नाही पण ८०व्या वर्षी नव्या गोष्टी जाणून घ्यायची उत्सुकता आपल्याला खरंच चकित करून टाकते.
जगण्याची ही उत्सुकता, इच्छा हॉस्पिटलमध्येसुद्धा तेवढीच टिकून होती. आजार लांबत गेला, हॉस्पिटलमधल्या राहण्याचे महिने वाढत गेले, तेव्हा मात्र त्यांना वाटायला लागलं की आता बास झालं. जिवंत राहण्यासाठीचे प्रयत्न पुरे झाले. मृत्युपूर्वी पंधरा दिवस त्यांनी मला स्पष्ट सांगितलं होतं, की असं दुसऱ्यावर अवलंबून पालेभाजीसारखं जगण्यात काही गंमत नाही. थांबवा आता सारे हे प्रयत्न.
बहुधा तेच आमचं शेवटचं संभाषण असावं. याच प्रकारचा संवाद त्यांनी शिरीष आणि विद्याशीही केला होता.
ते बरे असताना, आजारी असताना आम्ही अनेकदा मृत्यूविषयी बोललेलो होतो. मृत्यूनंतरचे विधी, सुतक पाळणं वगैरे त्यांना अजिबात आवडायचं नाही, त्यांना त्याचा तिटकारा होता. आपल्या मृत्यूनंतर यापैकी कुठलेही सोपस्कार करू नयेत, असं त्यांनी लिहूनच ठेवलेलं होतं. `मी वयाची ८० पूर्ण केली आहेत, तेव्हा आता येणाऱ्या मृत्यूचा शोक कसला... उलट `लशश्रशलीरींश'. आणि माझा हा निरोप सगळयांना सांग' असं ते विद्यापाशी बोलले होते.
त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांना सांगितलं की अशीच इच्छा बाबा आमटेंचीही होती, तरीही राज्य सरकारतर्फे त्यांची भव्य अंत्ययात्रा काढली गेली. शासनाच्या आणि बाबांच्या सुहृदांच्या इच्छेपुढे आमचं काही चाललं नाही, असं बाबांच्या मुलांचं म्हणणं. ते ऐकून तें हसले आणि तत्त्वज्ञान बोलून गेले की ``माणूस जिवंतपणी इच्छा सांगू शकतो, त्या इच्छेचा आदर करण्याचं काम त्याच्या जवळच्यांनी त्याच्या मृत्यू नंतर करायचं असतं.'' आपल्या जवळच्यांनी आपल्या इच्छेचा आदर करावा, असं त्यांना वाटत होतं.
त्यांच्या मृत्यूनंतर ताबडतोब, गाजावाजा न करता, शांतपणे थोडक्यात त्यांचे अंत्यविधी (विद्युतदाहिनीत) करून आम्ही त्यांची अखेरची इच्छा पूर्ण केली हे समाधान आहे.
आता त्यांच्या मृत्यूपत्रानुसारची कारवाई त्यांच्या इच्छेप्रमाणे व्हावी हीच इच्छा!
अशोक कुलकर्णी
२०१ `सदाफुली अ'
जोशी रेल्वे म्युझियमच्या मागे,
कोथरूड, पुणे.
अनुवाद: नीलिमा बोरवणकर

ugg shoes, often leads to

ugg shoes, often leads to young girls and women's charm by its exquisite design, special appearance. In cold weather, this is the first choice for those women like wearing thewomens ugg boots. This pair of exquisite cheap ugg bootsis so comfortable warmth