फार वर्षांपासून एखादं पुस्तक वाचताना त्यातील आवडलेला विचार, कविता लिहून ठेवण्याचा छंद मला आहे. इ.स. १९५२ पासून आजपर्यंत हा छंद जोपासताना असं लक्षात आलंय की त्यामुळे मी दिवसेंदिवस `श्रीमंत' होत आहे. ह्या छंदामुळे मिळणारा आणखी एक लाभ म्हणजे खूप उदास, उन्मनस्क मन:स्थितीत हवा असलेला दिलासा, प्रेरणा, धीर तुम्हाला मिळतो. अगदी अलीकडेच संध्याकाळच्या वेळी एकटीच बसलेली असताना सहज म्हणून १९८० ते २१ डिसेंबर ८६ पर्यंत आवडलेल्या नोंदी असलेली डायरी चाळायला घेतली. ऊर्मिला अवसरीकर यांच्या डिसेंबर १९८५ च्या `स्त्री' मासिकात आलेल्या एका कवितेनं मला पकडून ठेवलं. ती कविता आपण वाचू या.
हिला बोलू द्या
कोणी म्हणतोय अशानं गेली
कोणी म्हणतोय तशानं गेली
हे झालं ! ते झालं !
मला तर वाटतं
हिचे शब्द हिच्या घशात अडकले
म्हणूनच ती गेली.
शब्दांना नाही आकार, नाही उकार
ते कसे अडकतील ?
तसा नाही प्रकार
शब्दांना असते आग, शब्दांचा जाळ
घशात ठेवले तर उरात शिरतात
धुमसत धुमसत काळीज जाळतात,
म्हणूनच, ती गेली तर गेली
हिला जगू द्या, हिला बोलू द्या.
१९८५ च्या `स्त्री' मासिकात आलेली ही कविता मला सादावत होती अॅडि्न्या जॉनस्टनच्या `गर्ल्स स्पीक आऊट' चळवळीत
सहभागी व्हायला. सहभागाचा एक प्रकार म्हणून त्या पुस्तकाची थोडक्यात ओळख करून देऊन तुम्हांलाही आपले विचार व्यक्त करण्याच्या ह्या चळवळीत सहभागी करून घ्यावं म्हणते.
`गर्ल्स स्पीक आऊट'ची ओळख करून द्यायची म्हणजे नेमकं काय करायला हवं ? पुस्तकातली वाक्यं, त्यातले विचार, त्या पलीकडचे विचार, त्या विचारांतून उभी राहिलेली चळवळ, नव्या समाजाच्या उभारणीतला त्या चळवळीचा सहभाग हे पुस्तक वाचताना एक व्यक्ती म्हणून माझ्या मनात उठलेले, स्थिरावलेले विचार, तुलना, प्रश्न..... बापरे! हे करावंसं वाटतंय खरं, पण मला ते कितपत पेलवेल कुणास माहीत, की तटस्थ राहून पुस्तक एके पुस्तक अशी ओळख करून द्यावी ? बघू या काय होईल ते खरं. हे पुस्तक म्हणजे महिलांना सबलता देणाऱ्या चळवळीबद्दलचं रुक्ष कथन नाही. ते तुम्हांलाही त्या चळवळीत सहभागी करून घेतं. कधी गोष्ट सांगून. एखाद्या प्रसंगाचं वर्णन करून. कधी तुम्हांला प्रश्न विचारून तर कधी लिहायला सांगून. मला वाटतं आपली ह्या पुस्तकाची ओळखही अशीच असेल.
लिंगवाद कसा दिसतो ?
एका पुस्तकाच्या दुकानात सात-आठ वर्षांची एक मुलगी आली आहे. आई वडील पुस्तकं पाहात आहेत. काही मुली आणि अँडि्न्या एका कोपऱ्यात बसलेल्या दिसल्यावर ती धिटुकली तिथंच बसली. त्यांचं बोलणं थोडा वेळ ऐकल्यावर तिच्या लक्षात आलं की बाइंर्च्या बोलण्यात कुठला तरी शब्द पुन्हा पुन्हा येतोय. ती त्यांच्याकडे टक लावून पाहत राहाते. त्या बाई विचारतात, ``तुला काय विचारायचंय ?'' ती म्हणते, ``हो. तुम्ही सारखं लिंगवाद असं म्हणताय. तो लिंगवाद कुठे असतो? कसा दिसतो? काय करतो ?'' त्या बाई हसून म्हणाल्या, ``तो आपल्या आजूबाजूला असतो. मुली आणि बायका यांच्यापेक्षा मुलगे आणि पुरुष नेहमीच चांगले असतात आणि ते तसंच असलं पाहिजे असं तो सांगतो.'' मुलगी म्हणाली, ``हे असं असतं ते मला माहीत होतं. पण त्याचं नाव आत्तापर्यंत ठाऊक नव्हतं. मला फुटबॉल फार आवडत असून शाळेच्या मुलांच्या टीममध्ये मला घेत नाहीत याचं कारण तो लिंगवादच असेल काय ?''
इतिहासात मुली का नाहीत ?
जगातील अनेक देशांत पुरुषांना स्त्रियांपेक्षा अधिक चांगली वागणूक मिळते. स्वत:चं कर्तृत्व दाखवायला भरपूर संधी व अधिक अवकाश मिळतो. स्वाभाविकच आजवर जो इतिहास लिहिला गेला त्यात पुरुषाच्या कर्तृत्वाचे , शौर्याचे, बुद्धिमत्तेचे गोडवे गाइले गेले. त्यामुळं इतिहासात बायका फारशा दिसतच नाहीत ! सांगितला आणि वाचला जाणारा इतिहास समजून घेता घेता मुलगे `मी अमुक होणार' `मी तमुक होणार' आणि मुली `मी भाकरी करणार, मी मुलं सांभाळणार, घर सजवणार' म्हणत मोठ्या होतात. पुस्तकात यासंबंधीचा एक फार चांगला प्रसंग आहे. न्यूयॉर्कमध्ये स्पीक आऊट सेशनच्या वेळी नऊ वर्षांची करेन म्हणाली, ``शाळा आणि ग्रंथालयातली सगळी इतिहासाची पुस्तकं आम्हांला वगळून लिहिली गेली आहेत.'' क्रॅलिफोर्नियाची सराह तिला संमती दाखवत उद्गारते, ``मुलांसाठी इतिहास पूर्वीच लिहिला गेला आणि तो त्यांना अनुकूल आहे.'' सत्रात याच्याबद्दल चर्चा होताना मुलींनी असा निष्कर्ष काढला की, कळीींेीू हा शब्दच आपण बदलू या आणि त्याऐवजी कशीीींेीू हा शब्द वापरू या. मुली पुढं असंही म्हणाल्या की, आज इथे जमून जे अनुभव आपण शब्दबद्ध करतो आहोत तो उद्यासाठीचा एकप्रकारचा इतिहासच नव्हे का ? सत्राच्या पुढील भागात लहान लहान शब्दसुद्धा लिंगवादानं कसे पछाडलेले असतात याचा शोध घेतला गेला. हिस्ट्नी शब्दाचं उदाहरण आपण वाचलंच. असाच दुसरा शब्द इेूलेींीं. त्याऐवजी मुलींनी ऋळीश्रलेींीं असा शब्द वापरला. चेअरपरसन हा शब्द रूढ होण्यासाठी कुणीतरी असंच ताणून /रलं असेल ना ? स्वत:ला जे वाटतं आणि पटतं ते उघडपणानं बोलण्याचं सामर्थ्य देणारी ही चळवळ सहभागी मुलींच्यात एक प्रकारचा सर्जनशील ताण निर्माण करते. तो ताण सहन करण्याचं सामर्थ्य देते आणि आवश्यक वाटणारे सामाजिक बदल होण्यासाठी संघर्ष उभा करण्याचं धैर्यही देते.
असे हे संशोधनाचे निष्कर्ष -
आजवरच्या स्त्रीविषयक संशोधनातून हाती आलेला एक निष्कर्ष असा की लहानपणी खूप चिवचिवणाऱ्या, प्रश्न विचारणाऱ्या, धडपडणाऱ्या मुली त्यांच्या उमलत्या वयात जणूू स्वत:ला मिटून घेतात. `माझं खरं आहे' असा वाद घालत नाहीत. ऐकून घेतात. निमूट राहतात. स्वत:ला काय आवडतं, काय हवं आहे यापेक्षा आपणाकडून काय केलं जावं अशी इतरांची अपेक्षा आहे, ते त्या करू लागतात ! वर्गावर्गात उत्तरं देण्यासाठीसुद्धा मुली फारसा हात वर करत नाहीत. शिक्षकही मुलग्यांनाच जास्त वेळा प्रश्न विचारतात आणि मुलगेही अहमहमिकेने हात वर करत असतात. चुकलं तर विनाकारण हसं व्हायला नको, त्यामुळे होणारी टिंगल नको असं वाटून लहान वयात धीट असणाऱ्या मुली मोठेपणी वर्गात खालमानेनं उत्तर न देता बसून राहतात. अचूक उत्तर देऊन मुलग्यांचं आणि शिक्षकाचं लक्ष वेधून घेण्यापेक्षा ऐकत राहण्याचा पर्याय स्वीकारतात ! `चल, मारू धडक' हा त्यांच्यातील आत्मविश्वास कुठं हरपत असेल ? उडावंसं वाटायला लावणारे त्यांचे पंख कशामुळं क्षीण होत असतील ? मुलगी ते बाई या वाटचालीत स्वत:च्या भावना, विचार, कल्पना, तर्क, निरीक्षणं आणि ह्या सर्वांच्या मिश्रणातून निर्माण होणाऱ्या मतांची कत्तल कोण करतं ? आपणच ! होय, आपणच ! कुटुंब, शाळा, प्रसार माध्यमं अशा साऱ्यांमार्फत एकजुटीनं ही कत्तल केली जाते आणि तशी ती करणंच मुलींच्या आणि म्हणजेच पर्यायानं समाजाच्या हिताचं आहे अशा ठाम विश्वासानं गेली शेकडो वर्षं ही कत्तल चालू आहे. त्या कत्तलीस पुरुषांच्या बाजूनं टाकला गेलेला समाजमान्यतेचा पासंग बदलायचा असेल तर उमलत्या वयातील मुलींची मानसिकता बदलण्याची, त्यांना धीटपणानं स्वत:चं म्हणणं सांगण्याची, चाकोरीबाहेरचं जीवन जगलेल्या स्त्रियांचे स्वानुभव ऐकण्याची किंवा त्याबद्दलचे कल्पित अथवा सत्य वर्णन पुस्तकांतून वाचण्याची संधी मिळायला हवी. असे प्रयत्न अँडि्न्या जॉन्स्टन आणि ग्लोरिया स्टाईनमन यांनी केले. या प्रयत्नांचं आपल्यापर्यंत येणारं दृश्यरूप म्हणजे `गर्ल्स स्पीक आऊट' हे पुस्तक.
काट्यानं काटा काढायचा -
...चळवळ म्हणून स्थिर होण्यापूर्वीचं या प्रयत्नांचं रूप फक्त ओळखीतल्या मुलींपर्यंत मर्यादित होतं. त्यावेळी अँडि्न्या ही एक शिक्षका होती. शाळेत काम करताना वयात येणाऱ्या मुलींचं मिटलेलं मन अनुभवणारी एक शिक्षिका. मनातल्या अस्वस्थतेनंच ती ग्लोरियाच्या स्त्रीवादी चळवळीकडं ओढली गेली आणि मग आत्मविश्वासाच्या अभावानं विझलेली मुलींच्या मनातील दिवली दोघी प्रज्वलीत करू लागल्या. दिवलीत तेलवात कशाची ? शब्दांची ! कधी पुस्तकातले तर कधी मनातले. गाण्यातले किंवा दृकध्वनीफितीतले. काही शब्द अव्यक्त असूनही चित्रं किंवा छायाचित्रं यांतून प्रकट होणारे. चाकोरी तोडून सार्थकतेचा प्रवास करणाऱ्यांच्या बोलण्यातून अंगावर कोसळणारे शब्द. एकाच वेळी फुलांचा सुगंध आणि अग्नीची आच जाणवून देणारे शब्द. घटितांचा अर्थबोध घेताना सापडणारे शब्द.
युनिसेफ हाऊस बांधताना मुलींचा विचारच नव्हता ! -
...अँडि्न्याच्या घरात मुलींशी संवाद करता करता सुरू झालेल्या ह्या जाणीव-जागृतीच्या रोपट्याचं रूपांतर दोन-तीन वर्षांत `नॅशनल गर्ल्स कोअॅलिशन'मध्ये झालं आणि नंतर पुढील दोन-तीन वर्षांत कोअॅलिशनमार्फत मुलींची पहिली राष्ट्नीय परिषद युनिसेफच्या मदतीनं घेतली गेली. परिषदेपूर्वी ज्या सभा चालू होत्या त्यात एका मुलीनं न्यूयॉर्कमधील युनिसेफ हाऊसमध्ये - जिथं परिषद होणार होती तिथंच मुलींना रात्री झोपता येईल का? असा प्रश्न विचारला होता. ते जमणं अशक्य नसलं तरी अवघड असल्याचं युनिसेफच्या प्रतिनिधीकडून सांगितलं गेलं. हे उत्तर ऐकताच सुकाणू समितीची सभासद असणारी अकरा वर्षांची क्लारा म्हणाली, ``हं. हं. ती इमारत जेव्हा बांधली गेली तेव्हा मुलींचा विचारच नव्हता ! आता आपण तो करू.'' क्लाराकडं पाहात ती प्रतिनिधी म्हणाली, ``खरं आहे. आम्ही जर तुझा किंवा आज ना उद्या त्या इमारतीत मुलींना झोपावं लागेल याचा विचार केला असता तर इतकी युद्धं आणि हिंसाचार झालाच नसता.'' मुलींना स्वत:ची अंत:करणं खोलून पाहायला, जे वाटतं ते बोलायला, जे दिसतं आणि ऐकू येतं त्याबद्दल विचार करून प्रश्न विचारायला आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधायला `गर्ल्स स्पीक आऊट' चळवळ शिकवते असं वरील संवादामुळे तुम्हांला वाटतं?
आम्हा मुलींचे हक्क -
....आपण ज्या पुस्तकाची ओळख करून घेत आहोत त्या पुस्तकाच्या शेवटी एक यादी आहे. पहिल्या राष्ट्नीय परिषदेसाठी जमलेल्या वेगवेगळे जातीधर्म, संस्कृती, वर्ग, वर्ण, आणि शैक्षणिक संपादन असलेल्या एकशेचाळीस मुलींनी आवश्यक वाटणाऱ्या जवळजवळ पन्नास हक्कांची केलेली यादी. त्यापैकी काही आपण वाचून त्याबद्दलचा स्वत:चा प्रतिसाद आजमावूया.
१) आपण जशा आहोत. (काळया, स्थूल, बुटक्या, मंदबुद्धी इत्यादी) तसे स्वत:ला स्वीकारणं.
२) आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक पार्श्वभूमीखातर दूर न सारलं जाणं.
३) स्वत:ला जे योग्य वाटतं त्यावर प्रेम करणं.
४) स्वत:ला मूल होणं अथवा न होणं हे स्वत:च ठरवणं.
५) आपलं मत ऐकलंं जाणं.
६) स्वतंत्र असणं.
७) धीटपणानं नाही किंवा होय म्हणणं.
८) मुलग्यांना ज्या संधी आहेत त्या सर्व मिळवणं.
९) संपत्ती वारसा हक्कानं मिळवणं किंवा स्वकष्टानं संपत्ती स्वत:च्या नावावर विकत घेणं.
१०) संरक्षित आहोत असं वाटणं.
११) सहशिक्षण देणाऱ्या किंवा मुलगे अथवा मुली यांच्यासाठी स्वतंत्रपणे शिक्षण देणाऱ्या संस्थांपैकी स्वत:ला योग्य वाटेल तिथं शिक्षण घेणं.
१२) जगणं.
१३) प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध होणाऱ्या प्रतिमांना नकार देणं.
१४) अशा प्रतिमा स्वीकारल्या जाऊ नयेत म्हणून प्रचार करणं.
१५) मुली अथवा स्त्रिया यांच्या माणूसपणाला नकार देणारे चित्रपट न पाहणं अथवा तशा वस्तूू न खरीदणं.
१६) वास्तव जीवन जगणारी सर्वसाधारण प्रकारची माणसं जाहिरातीत घेतली जावीत असा आग्रह धरणं.
१७) कायद्यानं आपल्याला दिले गेलेले सर्व हक्क वापरणं.
१८) स्त्रियांवर होणारे अत्याचार, हिंसाचार, बलात्कार यांच्याबद्दल उघड बोलणं.
१९) अशा हिंसाचारांना तोंड कसं द्यावं याबद्दल मुली व स्त्रिया यांना प्रशिक्षण देणं.
२०) हिंसाचाराला बळी पडलेल्या स्त्रियांसाठी आधारकेंद्र उभारणं.
वरील यादीतील काही कलमांकडे नजर टाकली तरी जाणीव-
जागृतीचा केवढा लांबपल्ल्याचा प्रवास करून त्या मुली आज कोणत्या टप्प्यावर पोचल्या आहेत हे सहज लक्षात येतं. `गर्ल्स स्पीक आऊट' चळवळीचं हे यश प्रशंसनीय आहे. स्वत:चे हक्क कोणते हे सांगणारी एक यादी तुम्हीही करून पाहा ना !
पावलांशी न जुळणाऱ्या खडावा -
....सुस्तावलेल्या मनांना जाग आणणं आणि जाग टिकवणं तसं सहजसाध्य नसतं. नाना युक्त्या योजाव्या लागतात त्यासाठी. चळवळीच्या अगदी सुरुवातीच्या काळात काही मुली एकदा अँडि्न्याच्या घरातच जमल्या होत्या. मध्यभागी सिरॅमिकची एक छोटीशी सुबक पेटी ठेवलेली होती. एखाद्या जाडजूड पुस्तकासारख्या दिसणाऱ्या त्या पेटीवर भोपळयाचं चित्रं होतं आणि `सिंड्न्ेला १९९०' असं नावही होतं. उत्सुकतेनं मुलींनी पेटी उघडली. आतमध्ये मानवी पावलांच्या छोट्याछोट्या प्रतिकृती होत्या. पावलांचे आकार आणि रंग वेगवेगळे होते. शिवाय काही पावलं नाजूक तर काही केसाळ आणि काहींची नखं रंगवलेली. पेटीत एक खडावाही होती. पण कोणत्याही पावलाचा आकार त्या खडावाशी जुळेल तर शपथ ! त्या दोन्हींचा मेळ घालण्याच्या प्रयत्नात असलेल्या मुलींना एकदम प्रखर प्रकाशकिरण दिसावा तसा त्या दोन्हींतील दुवा अचानक लक्षात आला ! पावलांच्या त्या विभिन्न प्रतिकृती म्हणजे जणू त्यांच्याच व्यक्तिमत्त्वाची प्रतीकं होती; आणि ती खडावा म्हणजे जणू स्त्रीत्वाचा समाजमान्य साचा ! त्या खडावात जसं कोणतंच पाऊल `फिट' होत नव्हतं तसंच खरं तर त्यांच्यापैकी एकीलाही समाजमान्य स्त्रीत्वाचा साचा `फिट' वाटत नव्हता. काही पावलांसाठी तो साचा थोडासा मोठा तर काहींसाठी लहान होता. पण त्या साच्यात पावलांचे आकार कांेबण्याचे ठरवणाऱ्या समाजाशी मुकाबला करून तो साचा `नको' म्हणण्याचं धैर्य आपण एकवटायला हवं हेच जणू अँडि्न्याला त्या सुबक पेटीच्या माध्यमातून मुलींपर्यंत पोचवायचं होतं. अँडि्न्या त्यात यशस्वी झाली म्हणून तर ही चळवळ उभी राहिली, वाढली आणि बहरून पुस्तकरूपानं आपल्यापर्यंत पोचली.
बायकांचे हक्क, नव्हे माणसांचे हक्क -
....अँडि्न्या आणि ग्लोरियानं स्पीक आऊट उपक्रमाची आखणी फार विचारपूर्वक आणि साक्षेपानं केली असावी. ज्या कालावधीत मुली स्वत:ला मिटून घेऊ लागतात त्या वयाच्या मुलींचा समावेश `स्पीक आऊट' सेशन्समध्ये असला तरी पाच-सात प्रौढ स्त्रियांचा समावेश प्रत्येक सत्रात अगत्यपूर्वक केला जातो. भिन्नतेत असणारी एकता लक्षात आणून देण्याचा हा प्रयत्न आहे. नऊ ते पंधरा वर्षांच्या किशोरी, एक दोन युवती व उतरत्या वयाच्या प्रौढा एकत्रितपणानं जेव्हा चर्चा करीत प्रश्नांना भिडतात तेव्हा त्याचा अनेक अंगी परिणाम होतो. `असं का?' `तसं का नाही ?' - असं प्रौढ स्त्रियांना विचारण्याची संधी अशा एकत्रित सत्रांमुळं किशोरींना मिळते. बहुधा त्यांची ती पहिलीच संधी असते ! जीवनातील प्रत्येक टप्प्यावर प्रश्न पडतात आणि ते विचारले पाहिजेत हेही इतरांचे प्रश्न ऐकून मुलींच्या लक्षात येतं. विभिन्न सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्तरांतील किशोरींना स्पीक आऊट सत्रात सहभागी होत असता असंही जाणवतं की आपले रंग, भाषा, परिस्थिती भिन्न असली तरी आपल्याला येणारे अनुभव सारखेच असतात ! समाजानं लादलेलं निमूटपणानं स्वीकारून आपण कोणकोणत्या प्रकारची केवढी किंमत मोजली हे किशोरी व युवतींच्या प्रश्नांना उत्तरं देताना किंवा स्वत:चा अनुभव मांडताना प्रौढ स्त्रियांच्या लक्षात येतं. त्या काळी आपल्यात सुप्त स्वरूपात असलेली `बंडखोर मुलगी' समाजानं दडपून टाकली व आपणही त्या परिस्थितीला शरण गेलो याचा खेद त्यांच्या शब्दाशब्दांत प्रगट होतो. आजच्या किशोरींचंही असं होऊ नये म्हणून अतिशय प्रांजलपणानं त्या जेव्हा प्रश्नांची मांडणी व विश्लेषण करतात तेव्हा त्यांच्या शब्दांना धार आलेली असते. किशोरी, तरुणी आणि उतरत्या वयाच्या प्रौढा अशा सर्वांचीच समाजाकडून जी नाकेबंदी केली जाते ती अशा सत्रात जळजळीतपणानं समोर आल्यानं ुेाशप'ी ीळसहींी रीश र्हीारप ीळसहींी या थेट विचारापर्यंत सर्वजणी येऊन पोहोचतात आणि त्या मुक्कामावर पोचलेल्या व्यक्ती सहसा मागे येत नाहीत असा अँडि्न्या व ग्लोरिया यांचा अनुभव आहे. अशा चर्चांतूनच प्रत्येकजण एक असामान्य र्(ीपळिंर्शी) असल्यानं प्रत्येकानं आपले आगळेपण जसं जपायचं तसंच दुसऱ्याचं असाधारणत्वही जोपासायचं; एवढंच नव्हे, तर असं घडण्यासाठी साहाय्यभूत होणाऱ्या माणसांचे समूहही बांधायचे हेही मुलींपर्यंत सहजतेनं पोचतं. पुरुषसत्ताक समाजरचनेचा परिणाम म्हणून काही बाबी निषिद्ध मानल्या गेल्यानं मनांच्या मुक्त विकासाला त्या बांध घालून मनं करकचून टाकतात. अशी मनं मोकळी करून घुसमटलेेले विचार, भावना, तर्क, कल्पना, निरीक्षणं, मतं यांची खुली अभिव्यक्ती होण्यासाठी चळवळीतील कार्यकर्ते विविध खेळ, कथांचे वाचन व त्यावर चर्चा, बुलंद आवाजातील गाणी व घोषणा जुळवणं, म्हणणं व ऐकणं, प्राचीन काळातल्या कौशल्यपूर्ण वस्तू आज काय सांगतात याबद्दल विचार-विनिमय करणं, स्वत:चे अनुभव लिहिणं, कविता ऐकणं व करणं, टॉक शोत सहभागी होणं असे नानाविध उपाय योजतात. हे सर्व होत असता अधिकारशाहीची कसलीही उतरंड नसलेल्या खुल्या अनौपचारिक वातावरणात सलग दोन शनिवार सकाळी नऊ ते संध्याकाळी पाचपर्यंत सहभागी किशोरी, तरुणी व प्रौढा कार्यकर्त्यांसह एकत्रित असतात व स्पीक आऊट उपक्रमांची किती खोल मुद्रा सर्वांच्या मन:पटलावर उमटते याचा पुरावा पुस्तकाच्या पानापानांवर मिळतो. अबोल, लाजाळू, भित्र्या मुलींची आत्मप्रतिमा पालटताना पाहण्याचा अनुभव कार्यकर्त्यांना मिळतोच. परंतु, ज्या चेतकांचा वापर अपेक्षित बदल रुजावेत म्हणून करताना स्वत:तील काही तणही समूळ उपटले जात असल्याचं त्यांना जाणवतं.
नावात काय आहे ? -
प्रत्येक सत्राला येणाऱ्यांना ठरावीक कालावधीतच आत्मभानातून आत्मसन्मानापर्यंतची अवघड चढण चढायची असते. एकत्रितपणाचा दिलासा मिळवायचा असतो. परंतु हे सारं एकमेकांत जवळीक निर्माण झाल्याशिवाय साधेल कसं ? अँडि्न्यानं यासाठीही खूप छोट्या छोट्या युक्त्या योजल्या आहेत. त्यातली एक सांगू ? सत्रात सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक कागद दिला जातो. त्यावर प्रत्येकीनं स्वत:चं नाव स्वत:ला रुचेल त्या पद्धतीनं लिहावं असं सांगितलं जातं, वेगवेगळया रंगात, लहानमोठ्या अक्षरात किंवा आपल्या नावाचं रूपक म्हणून एखाद्या चित्राची योजना करत नाव लिहून ते रूपक पेहरलेल्या कपड्यांवर लावावं अशी विनंती असते. कुणी ते छातीवर लटकवतात, कुणी मांडीवर, हेअरबँडसारखं कुणी कपाळपट्टीवर बांधतात. अप्रत्यक्षरीत्या अनेक ओतीव साच्यांना यामुळं छेद मिळतो. सारी मंडळी आपल्या नावानिशी सज्ज झाली की मग गोलाकारात उभं राहून प्रत्येकजण पाळीपाळीनं आपलं नाव सांगतात. आपल्या नावाचं उच्चारण स्वत:ला कसं अपेक्षित आहे तेच जणू सांगितलं जात असतं. `मिथिला' हे नाव जर `मिथ्थिल्ला' असं लिहिलं आणि उच्चारलं तर ते एक वेगळचं नाव नाही का वाटत ? ते बरोबर की चूक हा प्रश्न नाही. एखादं मिथक ऐकतो आहोत असंच `मिथ्थिल्ला' ऐकताना वाटतं की नाही ? अशा रीतीनं एकमेकांची नावं समजली तरी पूर्णार्थानं परिचय होतो का? तो व्हावा आणि वातावरणातला अपरिचिततेचा तणाव आणखी सैलावावा म्हणून खेळात आणखी एक वळसा दिला जातो. स्वत: अँडि्न्या किंवा एखादी अन्य कार्यकर्ती गोलाच्या मध्यभागी उभी राहून टाळी वाजवण्याची विशिष्ट लय पकडत उपस्थितांपैकी कुणाचं तरी नाव घेत त्या व्यक्तीकडं बोट करते. त्या व्यक्तीनं सहभागींपैकी आणखी एखादीचं नाव घेऊन टाळीची तीच लय पकडावी किंवा अन्य लय शोधावी. टाळयांचा ताल आणि लय बदलत असते. भराभरा टाळया वाजवून नावं सांगितली जात असतात. खोलीभर निनादणाऱ्या टाळयांच्या आवाजाबरोबर मनामनांत एकत्रिततेची भावना फुलारत असते. अशा त्या `मिळून साऱ्याजणी' सत्रातली पुढची पावलं टाकायला एकदिलानं उत्सुक असतात.
अंतरंगाच्या ओळखीसाठी -
अंतरंगाची ओळख हीच व्यक्तीची खरी ओळख. `स्पीक आऊट' सत्रात एकमेकांची अशी ओळख करून घेण्यासाठी ज्या वाटा शोधल्या जातात त्यांच्यावरून चालताना लक्षात येतं की, कुणी दत्तक गेलेलं असतं की कुणी अपंग असतं. कुणाच्या आईवडिलांचा घटस्फोट झालेला असतो. काळया वर्णाचे बहुसंख्य लोक असलेल्या गावात वाढलेल्या कृष्णवर्णीय मुली दुसऱ्या गावातल्या महाविद्यालयात दाखल झाल्यावर त्यांना मोठ्या होजपाईपमधून केलेला पाण्याचा मारा सहन करावा लागलेला असतो ! तेरा वर्षांच्या स्वत:च्या कन्येशी आपले संबंध अधिक चांगले असायला हवेत याची गरज प्रौढ वयात कुणाला तरी वाटत असते. कुणी घोड्यावर बसण्यात तर कुणी कराटेत पारंगत असतं. काहींना मुलग्यांशी मैत्री करण्याची आस असते तर काहींना मुलग्यांपेक्षा मुलींबरोबर असणं आवडत असतं. वाचन, खेळ अशा तीन भिन्न आवडीनिवडीच्या मुलींची परस्परांशी मैत्री असते. संवादातून अशा बाबी जेव्हा घरंगळतात तेव्हा स्त्रीत्वाचा समान धागा या भिन्नतेतही आपल्याला एकत्रित ठेवतो आहे हे लक्षात आल्याशिवाय राहात नाही. अंतरंगाचा ठाव अशा प्रयत्नांतून घेताना त्या माहितीचं महत्त्वंही समजतं. व्यक्तीचं बाह्यरूप महत्त्वाचं मानलं जाणाऱ्या आजच्या जगात अंतर्यामीचे समाधान, सल किंवा कल्लोळ याचं स्थान नगण्य असतं. पण व्यक्तिमत्त्वाला व्यक्तिमत्त्व लाभतं ते बहुतांशी अंतरंगातील विविध विचार, भावना, कल्पना, आशा-निराशा, इच्छा-आकांक्षा इत्यादींमुळंच ना ? म्हणूनच तर अँडि्न्या, मुलींनी आपलं अंतरंग खोलावं म्हणून `गर्ल्स स्पीक आऊट'ची सत्रं घेत देशभर फिरत असते ! आणि त्या सत्रांमुळे तर गर्ल्स कोअॅलिशन साकारलं आणि मुलींची पहिली राष्ट्नीय परिषद साकारली ! वेलु गेला गगनावरी !
वयवादाचा विळखा -
.... आपलं नाव हे आपल्या व्यक्तिमत्त्वाचं एक रूप असतं. वय, उंची, जाडी, रंग, नाक, डोळे अशा इतरही बाबी आपल्या व्यक्तिमत्त्वाला चिकटून असतात आणि त्या साऱ्यांशी काही सामाजिक संकेतही घट्ट बांधलेले असतात. एकमेकांशी उघडपणानं ह्या बाबींबद्दल ज्यावेळी बोलणं होतं त्यावेळी ते संकेत लक्षात येतात. लहान वयाच्या मुली आणि म्हातारपणाकडं झुकणाऱ्या बायकांना फारसं महत्त्व न देणाऱ्या आजच्या संस्कृतीत स्त्रियांना वय विचारलं जाणं आणि त्यांनी ते संागणं फारसं सभ्यपणाचं मानलं जात नाही. `हा वयवाद (असशळीा) समजून घ्यायला `स्पीक आऊट' सत्राची फार मदत होते. नाव सांगण्याचा जसा एक सोहळा तसाच वय सांगण्याचा एक वेगळया प्रकारचा सोहळा. तेरा वर्षांची एक मुलगी बरीच उंच असल्यानं तिचं वय ऐकणाऱ्यांना ते फारच आश्चर्यकारक वाटलं. श्रोत्यांची ही प्रतिक्रिया समजल्यावर तिला आपण मोठं असल्यासारखं वाटायला हवं किंवा आपली उंची लोकांच्या लक्षात भरणार नाही असे प्रयत्न करायला हवेत असं वाटलं. त्रेपन्न वर्षांची अँडि्न्या जेव्हा स्वत:चं वय संागते त्यावेळी नऊ ते पंधरा वयोगटातल्या त्या मुलींना तो फार दूरचा टप्पा वाटतो. स्वत: अँडि्न्यालाही इतकी वर्षं आपण अशा छान कशा जिवंत राहिलो याचं आश्चर्य वाटे. म्हातारं होणं म्हणजे साकळल्यासारखं जीवन जगणं अशी समजूत असलेल्या
मुलींबरोबर काम करताना अँडि्न्याला जाणवतं की म्हातारं होत असतानाही जीवन एक नवं रूप घेत असतं. ते साकळतंच असं नाही.
वयात येणं -
....वडीलधारी माणसं आणि समाज यांच्या दृष्टीनं मुलींच्या बाबतीत `वयात येणं' हा एक महत्त्वपूर्ण टप्पा असतो. `स्पीक आऊट' सत्रात जेव्हा अँडि्न्यानं या विषयाला हात घातला तेव्हा तोवर अकथित असलेल्या सत्याचे कितीतरी कवडसे चमकले ! अपेक्षित वयाला पाळी सुरू झालेली नसेल तर ती मुलगी एक प्रकारच्या अपराधीपणानं घेरली जाते. आपल्यात काही न्यून, अपुरेपणा आहे असं तिला वाटत राहातं. एवढंच नव्हे, तर स्वत:चं स्त्रीत्व बावनकशी नाही की काय अशी शंकेची पालही तिच्या मनात चुकचुकत राहते ! `पाळी येणं' यासाठी `शहाणी होणं' असाही एक शब्दसमूह प्रचारात आहे. पण जे शहाणपण पाळी सुरू होण्यापूर्वी मुलीपर्यंत पोचवायला हवं ते वडीलधाऱ्यांनी योग्य शब्दांत शांतपणं पोचवलं नसेल तर त्यासाठी त्या मुलीच्या शरीरातील आतील चक्रं थांबून थोडीच राहतात ! अनेकदा यामुळंच अगदी मोठ्या शहरातल्या सुशिक्षित कुटुंबातील मुलींनाही बाईपणासाठीचं हे `अनमोल देणं' म्हणजे `कटकटच' वाटत असते. ज्याची लाज वाटावी, लपवून ठेवावंसं वाटावं असं काहीतरी! वयात येण्याबाबतची चर्चा सत्रात चालू असताना अँडि्न्यानं `आता माझी पाळी गेली' असं म्हटल्यावर लहान वयाच्या मुलींना फार आश्चर्य वाटलं. पन्नाशीच्या सुमारास पाळी बंद होते आणि मूल होण्याची शक्यता संपते हे ऐकताना मुलींना ते एखाद्या खेळण्याला दिलेली किल्ली संपल्यावर त्याची हालचाल थांबावी तसं ते वाटलं ! नऊ ते पंधरा वर्षांच्या मुलींबरोबर पन्नाशीतल्या स्त्रिया अँडि्न्यानं शिबिरात आग्रहानं का सामावून घेतल्या हे समजलं का तुम्हांला ? या चळवळीतला प्रत्येक दुवा विचारपूर्वक निवडला आणि जोडला असल्याचं पुस्तक वाचताना पुन्हापुन्हा जाणवतं. एकदा तर पाळी येणं आणि ती संपणं याची चर्चा चालू असता मुलींऐवजी मुलग्यांना पाळी येत असती तर ? असा कल्पनाविलासही रंगला ! पितृसत्ताक समाजव्यवस्थेत लहानाचे मोठे झालेले मुलगे त्याही बाबीची फुशारकी मिरवतील असं मुली म्हणाल्या. `किती दिवस आणि किती रक्तस्राव' याच्या कहाण्या कशा रंगतील याचं वर्णन काहींनी केलं. ज्या समाजात पुरुष श्रेष्ठ समजला जातो त्या समाजात पुरुषाला पाळी येणं ही बाबही श्रेष्ठतेचीच ठरणार नाही का ?
....कथेतून एखादा मुद्दा प्रकर्षानं लक्षात आणून द्यायचा हा `स्पीक आऊट' कार्यक्रमाचा विशेष पैलू आहे. अशा काही सुंदर कथा पुस्तकात आहेत. सेलिना नावाची एक मुलगी आहे. तिची पाळी अजून सुरू झालेली नाही. तिची मैत्रीण बेरिल एकदा तिला म्हणते, ''ख लश्रशशव ीेाशींळाशी.'' सेलिनाला वाटतं, त्यात काय मोठंसं ? कुठं कापलं, खरचटलं तर रक्त येणारच ! तिचं हे म्हणणं खोडून काढण्यासाठी बेरिल तिला पाळी येणं म्हणजे काय काय ते सविस्तर वर्णन करून सांगताना म्हणते, ``प्रत्येक मुलीला अस्संच होतं.'' फणकारून सेलिन उत्तरते, ``माझ्या बाबतीत असं कध्धीच होणार नाही.'' एखाद्या प्रेषिताच्या आविर्भावात बेरिल जाहीर करते, ``नाही. तसं तुझ्या बाबतीतही होईलच ! आणि तसं झाल्यावर त्यामुळं आपल्याला जणू काही विशेष शक्ती प्राप्त झाली आहे असंही तुला वाटेल.'' अंगातून रक्त गळत असताना इकडं तिकडं हालचाल करणाऱ्या माणसाला आपण महत्त्वपूर्ण वाटणं शक्य नाही अशा अर्थाच्या सेलिनच्या वाक्यानंतर बेरिल म्हणते, ``तू अजून बच्ची आहेस. तुला नाही समजणार.'' स्वत:ची न उभरलेली छाती आणि अजूनपर्यंत न मिळालेला मासिक पाळीचा अनुभव याबद्दलची एक प्रकारची उत्सुकता, भीती आणि खंत मनात दाटून येत असताना सेलिन रागावून म्हणते, `` कुणाला बच्ची म्हणतेस ? मी मोठी झालेय....''
...पुस्तकातली ही गोष्ट वाचताना माझा स्वानुभव उसळी मारून वर आला. पाळीमुळं नेसाव्या लागलेल्या त्या गडद रंगाच्या नऊवारी साड्या, आत धरण्यासाठी दिल्या गेलेल्या कपड्याच्या घड्या, काळसर लाल रक्तानं भरलेल्या घड्या धुताना वाटलेली किळस, हालचालींवर आलेले निर्बंध, कुणीही समजावलेलं नसल्यानं नकोसं वाटलेलं ते मोठं होणं - सारं सारं जणू मी पुन्हा अनुभवलं. जी `किशोरी शिबिरं' आम्ही घेतो त्यात या विषयाचा अंतर्भाव केला तर मुली कितपत आणि काय काय बोलतील याचा विचार मनात डोकावला. घटना तीच असली तरी आजच्या मुलींची त्यााबाबतची मानसिकता वेगळी असेल का ? तसं असेल तर ते कशामुळं ? नॅपकिन्समुळं ? की दररोज बाहेर जाणं येणं, वाहन चालवणं अपरिहार्य झाल्यानं ? की दृकध्वनिफिती वापरून कुणी समजावलं म्हणून ? हे सारं तपासायला हवं असं जाणवलं.
स्वत:वरच्या विश्वासाला खतपाणी : टॉक शो -
पुस्तकात `टॉक शो'बद्दल एक वेगळं प्रकरण आहे. सूत्रसंचालन, निवेदन, चर्चेच्या विषयावर बोलणं, प्रश्न तयार करणं, कोणी कोणती भूमिका घ्यावी हे ठरवणं, रंगमंचाची व्यवस्था पाहणं असं सारंच सत्रात सहभागी असलेल्या किशोरीच करतात. अँडि्न्याचे किंवा मुलींचे मित्र, हितचिंतक, पाहुणे म्हणून उपस्थित असतात. सत्रातील प्रौढ स्त्रिया श्रोत्यांची भूमिका वठवतात. थोडक्यात `टॉक शो' केवळ किशोरी संचलित असतो. झालेल्या टॉक शोच्या विषयांकडे नजर टाकल्यावर त्यातले वैविध्य आपल्या लक्षात येते. त्यापैकी काही विषय पाहू - १) मुली आणि त्यांचे शरीर. २) आजच्या जगातील बाईची प्रतिमा, ३) मुलींचे पोशाख, ४) कोणतीही नवी बाब शिकण्यासाठीची वयोमर्यादा, ५) चाळिशीनंतर एखाद्या पदविकेसाठी बाईनं नाव नोंदवणं, ६) चोपन्न वर्षांच्या एका अमेरिकन स्त्रीची मुलं मोठी झाल्यावर तिनं एक चिनी अनाथ मूल दत्तक घेणं, ७) मुला-मुलींचं डेटिंग, ८) शाळांत सहन करावी लागणारी लैंगिक छळवणूक. मुलींनी निवडलेले हे विषय पाहिले की `स्पीक आऊट' सत्रांतून त्यांनी जी परिपप्ता मिळवली ती लक्षात येते. `टॉक शो'मध्ये मुली जे बोलल्या तेसुद्धा फार लक्षवेधक आहे. मुलींच्या पोशाखाबद्दल बोलताना एक मुलगी म्हणाली, ''ख वेप'ीं ुरपीं ींे लश ुळींह र्ूेी ुहशप र्ूेी ुशरी ीशुू र्ीींीषष. र्धेी श्रेेज्ञ श्रळज्ञश र्ूेी ुरपीं लेूी रश्रश्र र्ेींशी र्ूेी.'' असं परखड मत व्यक्त करण्याची ताकद स्पीकिंग आऊटमुळंच मिळाली ना? लैंगिक छळणुकीविषयी एक किशोरी मत नांेदवताना म्हणते , ''डर्शुीरश्र हरीरीीशाशपीं श्ररुी रीश ेपश्रू षेी ुेाशप, ज्ञपेुळपस ऋळीश्र'ी ठळसहींी ळी ोीश ळािेीरींपीं'' याच विषयावर इतर काही मुलींनीही आपली मतं व्यक्त केली. मुलग्यांनी किंवा शिक्षकांनी मुलींचे खांदे, पाठ, डोकं यांच्यावर हात ठेवणं, पार्श्वभाग थोपटणं, पळण्याच्या शर्यतीत भाग घेतल्यावर मुलींचा धपापणारा वक्षभाग न्याहाळत राहणं, ``घट्ट पोशाख तुला छान दिसतो'', किंवा ``बिनहाताचा ब्लाऊज घातल्यावर आकर्षक दिसतेस'' असं बोलणं - यांसारख्या तक्रारी मुलींनी लैंगिक छळणूक या विषयावर बोलताना केल्यावर इतर बऱ्याच मुली हा व असा त्रास निमूट सहन करतात असंही निदर्शनास आलं. याच तक्रारींबद्दल वेगळा प्रतिसाद उमटला होता. ``मुली मोठ्या व्हायला लागल्यावर असं होणारच. मुलगे मुलग्यांसारखे वागणार ! लहान गोष्टीचा बाऊ करू नकोस.'' टॉक शोमध्ये चर्चिल्या गेलेल्या मुलींच्या वेगवेगळया अडचणींबद्दल एका प्रौढ स्त्रीनं फार चांगली सूचना केली. ती म्हणाली, ''खष ख र्लेीश्रव ीरू ीेाशींहळपस ींे सळीश्री, ख'व ींशश्रश्र ींहशा ींे लशश्रळर्शींश ळप ींहशाीशर्श्रींशी. ख ींहळपज्ञ ोीीं ेष र्ीी ज्ञपेु ुहशप ीेाशींहळपस ळी ुीेपस; र्लीीं ुश वेप'ीं श्रळीींशप ींे र्ेीी ळपीींळपलींी.'' टॉक शोचं माध्यम अँडि्न्यानं का उपयोजलं हे तिनं एकाच वाक्यात फार समर्पकतेनं मांडलं आहे. ती सांगते, ''ढरश्रज्ञ ीहेु हशश्रिी र्ूेी ींे शुश्रिेीश िेीळीलळश्रळींळशी ेशिप ींे र्ूेी.''
माझं `खरं मीपण' -
बरेचदा आपलं `बाह्य असणं' हा पालक, नातेवाईक, शेजारी, शिक्षक, प्रसारमाध्यमं यांनी एकत्रितरित्या आपल्यावर चढवलेला एक प्रकारचा बुरखा असतो. `असं करायचं नसतं' हे वाक्य बरेचदा ऐकावं लागलं असेल अन् त्या वाक्यानुरूप काय काय करायचं नसतं याचे कटू घोट तुम्ही आत ढकलून ते पचवलेही असतील ! हे सांस्कृतिक संकेत आपल्या वर्तनाचं नियमन करतात आणि आपल्यात असलेली `खरी मी' हळूहळू जणू अदृश्यच होते. वयानं मोठ्या असलेल्या लोकांबरोबर वाद घालायचा नाही. पुरुषांनी बायकांकडं कितीही वेळ किंवा अगदी टक लावून बघितलं तरी बाईनं पुरुषांकडं फार तर तिरपा कटाक्ष टाकायचा ! राग आला तरी बाईनं तो व्यक्त करायचा नाही. नव्यानं परिचित झालेल्याशी स्त्रीनं फारसं बोलायचं नाही. त्यांच्या फार निकट उभं राहायचं नाही. याशिवाय विभिन्न संस्कृतीमध्ये वेगवेगळे संकेत रूढ असतात. अफ्रिकन परंपरेप्रमाणे तरुणांनी वडीलधाऱ्यांशी बोलताना जमिनीकडं पाहाणं शिष्टसंमत मानलं जातं. अमेरिकेत थेट डोळयांकडं पाहात बोलणं प्रामाणिकपणाचं ठरतं. काही देशात स्त्री जननेंद्रियाचे विरूपीकरण केलं जातं. स्त्रीच्या शिस्निकेचा थोडा अथवा संपूर्ण भाग कापून योनीमार्ग शिवला जातो. वयात येणाऱ्या मुली वाममार्गाकडं वळू नयेत आणि संभोगसुखाची चव त्यांना समजू नये हा त्या विरूपीकरणाचा हेतू असतो. अशा विविध संकेतांनी घट्ट बांधलेल्या मुली व स्त्रिया मोकळया व्हाव्यात म्हणून पहिल्या सत्रातील पहिल्या क्षणापासून विविध प्रक्रिया आणि प्रयत्न जारी असतात. दुसऱ्या सत्रात मुली बऱ्याच मोकळया झाल्यावर `माझं खरं मीपण' यावर त्यांनी आपल्या भावना, विचार लिहावेत म्हणजे निदान उद्याच्या इतिहासात मुली अदृश्य असणार नाहीत असं सुचवलं जातं ! ह्या सूचनेला मन:पूर्वक प्रतिसाद मिळतो. पुस्तकात नोंदल्या गेलेल्या अनेक प्रतिसादांपैकी काही आपण वाचू या.
``माझ्या मनात काय आहे आणि मला काय काय वाटतंय ते सांगून टाकण्यावर माझा विश्वास आहे. तोंड शिवून बसायला मला आवडत नाही.'' - साकोइया, वय ११.
``माझ्यातली खरी मी मला अजून गवसलेली नसली तरी माझ्या आत खोल कुठंतरी ती आहे हे मला जाणवतं.
- टोनी, वय १३.
``सत्तेचाळिसावं लागताना माझा पुनर्जन्म होतोय. मी करावं असं जे जे सांगितलं गेलं ते मी करत आले. लग्न केलं. घरीच राहून घराची देखभाल केली. मुलांना जन्म दिला. अचानक एके दिवशी मी विधवा झाले. जणू आता ह्या पृथ्वीवर मी एकटी एकाकी आहे असं वाटलं, पण नाही. नंतर लक्षात आलं की मला मी आहे ना ?'' - रिबेका, वय ४६.
``माझ्या आत एक गायिका दडलेली आहे. तिला व्यक्त व्हायला खूप अडचणी आहेत. `फार मोठ्यानं गातेस.' `मी बोलतोय. आता गाणं नको.' `मी अभ्यास करतोय ना ?' - असे सारे परकोट भेदून मला गायिका व्हायचंय''-लिझी, वय १०.
``माझी मासिक पाळी अजून सुरू झाली नसली तरी मी एक कणखर स्त्री आहे असं मला वाटतं. पाळी येणं ही केवळ एक शारीरिक बाब !'' - एलिझाबेथ, वय १२.
`स्पीक आऊट' सत्रात मुली स्वत:त दडलेल्या मीपणाचा शोध घेऊन त्याबद्दल लिहितात, एकमेकांना सांगतात, आणि चर्चाही करतात. हे सारं होत असता एखाद्या भित्र्या सशाप्रमाणं आत दडून बसलेलं त्यांचं खरं मीपण हळूच बाहेर डोकावून बघायला लागत असेल ! नेमकं हेच व्हावं यासाठीच तर ही
चळवळ आहे ना ?
अशा सत्रांचा लाभ घेणाऱ्या अनेक मुली, युवती असतात. त्यापैकी काहींना कुणी व्यक्ती तर कुणाला पुस्तक आणि एखादीला संस्था अगर प्रत्यक्ष अनुभव स्वत:तील सुप्त मीपण धुंडाळायला मदत करतात. झोरा हरस्टन नावाच्या प्रसिद्ध कृष्णवर्णीय लेखिकेच्या `आतल्या आवाजाला' तिच्या आईनं साद घातली. त्याबद्दल त्याच लेखिकेची `झोरा आणि चायनाबेरीचं झाड' ही कविता आहे. त्यातील काही भाग अनुवादित रूपात आपण वाचूया ?
आईनंच तर शिकवलं होतं तिला
एक एक फांदी वर चढायला.
`हळूहळू पण वर, वर जा
बघ काय दिसतंय ते.' आई म्हणाली.
एक सुंदर निळं तळं
त्या पलीकडं आभाळ निळं निळं.
झोरा केव्हाच पोचायची
त्या निळया तळयापल्याड
त्या निळया आभाळापल्याड
आणि, जणू तिथलीच होऊन जायची.
तिला `हवीशी' झोरा
त्यावेळी तिला सापडायची
...तिचे वडील तिला बजावायचे,
`मुलीनं छान आदर्श बाई होण्यासाठी
राहायला हवं मर्यादेनं..''
...आई सांगायची, `झोरा, अगं ह्या चराचर सृष्टीत
प्रत्येकाला `अगदी आपला' असा एक आवाज आहे.
तो ऐक ग.... ऐक ना.... ऐक.'
...आई हळूहळू चालली दूर, दूर
`आता आई तुला कधीच भेटणार नाही' बाबा बोलले.
ते ऐकताना तिला वाटलं आपलंही जगणं संपलं.
....इतक्यात एक सोनपाखरू चिवचिवलं
`चढणं आता सोडू नको
स्वप्नं पाहणं थांबवू नको
आणखी वर चढ...वर, आणखी वर.
तळयापल्याडल्या त्या नगरीत
सांग तुझी कथा साऱ्यांना
आणि असंही सांग की
सोडणार नाही मी वर चढणं
जन्माला घालीन मी स्वप्नक्षितिजं
जी घालतील हात
खूप पल्याडच्या सूर्याला.'
...`गर्ल्स स्पीक आऊट' हे पुस्तक म्हणजे जाणीव-जागृतीचा जल्लोष आहे. ते वाचता वाचता प्रश्नांचे भुंगे आपलं मन पोखरू लागतात. आपण अनुभवलेल्या प्रसंगांशी जुळणाऱ्या स्वप्नांचा झपूर्झा सुरू होतो. पुस्तकातल्या कथा, कविता, प्रसंग मनात घर करून राहतात. सर्वात मुख्य म्हणजे समाज बदलण्याची प्रतीक्षा न करता स्वत:च्या आवडीनिवडी, मतं याबद्दल धीटपणानं तुम्ही बोलू लागता. व्यक्त होण्याची ताकद नसणाऱ्यांच्यात बव्हंशी स्त्रियाच असल्या तरी विविध जाती-पाती, गोरगरीब यांचीही अशीच मुस्कटदाबी होत असते. पुस्तकाची ओळख करून घेण्यापूर्वी `हिला बोलू द्या' ही कविता वाचून स्त्रीत्वाचं दाबलं गेलेलं रूप आपण पाहिलं- आता पुस्तक ओळखीच्या शेवटी आपण आणखी एक कविता वाचून दाबलेपण ज्यांना ज्यांना सोसावं लागतं त्यांच्यासंबंधीची मूळ इंग्रजीतील आम्ही अनुवादित केलेली कविता वाचू. मूळ कविता धरीरपे अज्ञळज्ञर यांची आहे.
``डोंगुर पुन्यांदा जागा व्हायलाय, त्यो हलतोय''
मी म्हणालो
पर समद्यांनी मलाच येड्यात काढलं.
मी असं बी म्हणालो
``अरं, आगीचा डोंगुर हाय त्यो. फार दिस न्हाई ऱ्हायचा झोपून
अगुदरच्या येळला तर हे समदं डोंगुरच हलायचं गदागदा
अन् फुलायचा अंगार''
तरीबी त्यंेचा इस्वास न्हाई बसला.
म्हनलं, ``येड्यांनो, जरा ठेवा इस्वास माझ्यावर बी
कुणीच लई येळ न्हाई ऱ्हात झोपून
आता ह्या समद्या बाया-बापड्यांचंच बगा
त्या बी एक दिस व्हतील जाग्या
अन् लागतील चालायला लगालगा.''
प्रा. लीला पाटील
`सौरभ', १७, रुईकर कॉलनी, कोल्हापूर
Posted in



gucci outlet
Famous do snowball of be a guest of Andrew Left gucci outlet of boss of empty orgnaization Citron, why to do with everybody communication in sky without exception, and to strange tiger the topic such as the doubt of 360, it is the conversational memoir with Andrew Left interview below:
It is the conversational memoir with Andrew Left interview below:: In the proposal without exception CEO: Exposure, transparentExposure, transparent
Q: Allegedly you also are the user of gucci outlet store strange tiger, the product such as the safe bodyguard of 360 was installed on his computer, is this true?
A: Yes, but this does not affect us the view of the business to them.
Q: Whether be met and is the administrative layer of strange tiger contacted directly? From the point of your operation skill, more resembling is to pass a few skill to earn fast money.
A: We were not necessary and manage a contact. It (strange tiger) be appear on the market company, and I can pass SEC (American negotiable securities trades committee) the file gets all data.
Q: Since this year, in without exception share price drops quickly, you ought to have a lot of to treat chosen target, why only alone pitch on strange tiger? And, the course is four-wheel after the report, the share price of strange tiger still is stabilized. Whether do this mean Citron not to know Internet gucci handbags outlet industry of China completely?
A: The stock market (rise and fall) the thing that is not in one day... I know Chinese Internet industry very, and believe the share price morning and evening of strange tiger can fall arrive under 10 dollars.
Q: Whether do you know the origin that navigation website is in China and value?
A: I know of course. And read analysts to be opposite when me when all reports of strange tiger, I feel I compare them more understanding (the value of navigation website) .
Q: Longtop is by a company of your success snipe, you are the problem that how discovers it at the outset, decide thorough research?
A: Once I saw the data of Longtop, I incredibly, investor people believed discounted gucci bags unexpectedly above says content, strange tiger also is such by pitch on. If certain plot is too pleasant, it is unlikely it is true. Actually, longtop has been done than a lot of its competitors a lot of, strange tiger also is.
Q: Are you passed make empty China concept what earnings to achieve?
A: Our research is not just about in without exception, also involve American company. Our report also is not just about doing empty, also issue long-term report sometimes.
Q: Be in what be started by you is medium without exception in the center, be done by the success for the most part empty, however, your group encountered strong opponent it seems that recently, for example, new east, peaceful is rich electric He original gucci bags Jihu. Whether to because were you changed,make a way?
A: New east is not to make a holiday, we just are aimed at another case and buy undertake to it appraise is worth. Rich to peaceful electric, we think our research is correct, but their report is strong intervene. We are politic without the change, come 10 years dozen of our law all the time very successful, we can continue.
Q: Whether do you have the office in China? Whether to hire employee in China?
A: Be aimed at specific project and research target, we hired a few adviser in leather gucci bags China.
Q: Appear on the market to China the CEO of the company and CFO, what proposal do you have to give them?
A: Exposure, exposure, transparent... the space that does not let everything existence hypothesis, want to accomplish ten cent clarity to make clear.
Want to accomplish ten cent clarity to make clear.. If market prise of a company is very low, we are to be done innocently emptyWe are to be done innocently empty
Q: ?
A: ? Does of of hesitating hesitating bluff change curtain?
Q: What is the in-house move that you make investigation? Whether does open to the public let us see the quality of the report is pass a barrier?
A: Every report is different, some gucci bags outlet needs a month, some needs a few days only, this depends on the problem that report object exists
Q: How is citron research to do empty of a company? Change character, be had normally by the company of your pitch on what feature?
A: Every company is put in cheat means to differ just, but normally they (mistake) related to a thing: The news that ought to know to investor does not make exposure.
Q: Whether the financial standing that announces you likewise, let us see your income source?
A: We are not one appears on the market company, but we announce us to be able to undertake the stock trades really, this does not mean us to speak the truth without responsibility. We had done 10 years designer gucci bags so.
Q: Be aimed at the company of the sky that be done, be aimed at Chinese concept especially report, whether do you follow proper order?
A: We all operations are will finish by the group, if cannot affirm (accuracy) , we won't publish a report. We have a lot of move, for example, survey a company, consult the analyst's report, and try whether understanding analyst is true " understand " the business gucci bags 2012 of this company, is not a content that retail company tall valve says.
Q: Whether had been because do,sued for nothing?
A: Be in the United States, I once had been sued, but never had lost such lawsuit... I say the fact only.
Q: Whether are you mixed do empty orgnaization otherly to cooperate together? Still do each each?
A: We undertake communicating likely, but can independent operation.
Q: You can be done empty some company, because they have considerable value,be, ability lets do empty person gain profit, are gucci outlet such understanding right?
A: Let me say to be clear about: If market prise of a company is very low, we are do it innocently empty. Because be done in that way,won't let anybody be benefited.
Q: Whether to lock up the louis vuitton outlet goal that decided next hunt to kill?
A: I am sorry, have no comment.
(Article origin: I US stock)jingruibmq
General description: Inside
General description: Inside zip pocket;Prada handbags;Four protective studs on the base; Zip top closure ;Carried on the shoulder or across the body; Signature lining; Original dust bag and authentic card with serial number.
Well-renowned for its simple yet prada women, Prada bags prada hoboelegant with their latest Prada apricot leather shoulder stunning bag clearance 2012. Made out of the high-grade cow skin material, this Prada Shoulder Bags exhibits the charming and women handbags of bright red shading and gold-tone hardware. General description: Inside zip pocket and open pocket . Multi-function pocket;Five protective studs.