Skip to main content

कार्यकर्त्यांच्या बायका

विषय तसा जुना आहे. ज्यांच्याविषयी लिहायचे आहे, त्यांची संख्या भारतामध्ये वाघ, सिंह यांच्याप्रमाणेच घटत चालली आहे. काही ठिकाणी तर लुप्त, अदृश्य, नामशेष या श्रेणीत त्यांची रवानगी झालेली आहे. आता ते कार्यकर्ते अन् त्यांच्या बायकाच दुर्मिळ तर लिहून काय उपयोग ? नव्या वाचकांना काही माहितीच नाही तर सांगून काय फायदा ? जेव्हा संागायला पाहिजे होतं, तेव्हा सांगता आलं नाही. फार स्फोटक, जहाल आणि वादग्रस्त विषय वाटला होता तेव्हा. त्याचे सर्वदूर परिणामही झाले असते. कारण कार्यकर्त्याची बायको ही व्यक्तीच मुळी फार वादग्रस्त होती. तिची एकच एक प्रतिमा तयार झाली होती आणि बहुधा तीवर सर्वांचं एकमत होतं. डाव्या, समतावादी, पुरोगामी, परिवर्तनवादी, क्रांतिकारी संघटनांमधल्या व पक्षांमधल्या कार्यकर्त्यांची बायको म्हणजे एक गूढ होतं.
मात्र त्या रहस्यावर सतत चर्चा व्हायची. बायको त्याची, निवड त्याची, त्याचं तिच्यावर प्रेम, साधारणपणे दोघंही समविचारीच, बऱ्याचदा आंतरजातीय विवाहित असं सगळं त्या दोघांच्या संमतीनंच झालेलं असताना संबंधित वर्तुळात मात्र `ती' बऱ्याचदा नावडती आणि नकोशी असे. कार्यकर्ता म्हटला की त्याच्याशी प्रत्येकाचा संबंध कार्यालयात, कार्यक्षेत्रात, आंदोलनात, रस्त्यावर असा कुठेही यायचा. घर म्हटलं की मात्र अंगावर काटा यायचा. कारण घर म्हणजे त्याची बायको आली, तिचं वागणंबोलणं आलं अन् उगाचच नाराजीही आली. वय, सांैदर्य, चारित्र्य, बुद्धिमत्ता, पाककौशल्य आदी गृहिणीछाप गोष्टींची या नाराजीत कसलीही लुडबुड नसे. स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन पुष्कळसा बदललेला असूनही कार्यकर्त्यांच्या बायकोत मात्र असंख्य गोष्टी बघितल्या जायच्या. दोष बघणाऱ्यांचा असे की मुळात त्या बायकोत ? या प्रश्नाची तड कुणी लावायच्या भानगडीत पडलं नाही कारण ते त्या काळी त्या वेळी अडचणीचं असे. चळवळीच्या, विचारांच्या तसंच त्या जोडप्याच्याही. आता करून पाहू कारण अडचणी संपुष्टात आलेल्या आहेत. आता तरी कार्यकर्ते व्हायची शक्यता नाही की तशा बायका.
कार्यकर्त्यांच्या बायकांविषयी जे बोललं जायचं ते एका कादंबरीत मला १९९१ साली बघायला मिळालं. १९४७ सालची ही कादंबरी युजीन डेब्स नामक अमेरिकन कामगार नेत्यावरची आहे. तो समाजवादी होता व त्यानं राष्ट्न्पतिपदाची निवडणूक चारदा लढवली होती. कादंबरी असली तरी तिला वास्तवाचा खूप आधार होता. आयर्विंग स्टोन हा लेखक चरित्र कादंबऱ्या लिहिण्यासाठी प्रसिद्ध. संशोधन, इतिहास, अभ्यास यांचा वापर करून तो एकेका व्यक्तीवर कादंबरी लिहायचा. कादंबरीचं नावच कार्यकर्त्यांच्या बायकांचं `योग्य' वर्णन करणारं होतं. ते होतं `अॅडव्हर्सरी इन दी हाऊस.' म्हणजे घरातला शत्रू अथवा घरातला वैरी. ती वाचल्यावर मला बहुतेक कार्यकर्त्यांच्या बायका घरच्या वैरीच दिसू लागल्या. पुढं त्याच वर्षी मला मी कधीतरी बालपणी नकळत्या वयात वाचलेलं नानासाहेब गोरे यांचं `डाली' हे पुस्तक मिळालं. ते मूळचं १९५६ मधलं. त्यात `उसासा' नावाचं एक कल्पित आत्मकथन नानासाहेबांनी लिहिलं. तेही एका कार्यकर्त्यांच्याच बायकोचं. परंतु त्या कादंबरीसारखं नव्हे तर अगदी विरुद्ध. आता वैरिणीच्या जागी मला समर्पिता दिसू लागल्या. कार्यकर्त्यांच्या बायकांनी आत्मचरित्र न लिहिण्याचा हा परिणाम म्हणावा की त्यांच्याकडे सर्व पैलूंमधून बघूनच
यांच्याविषयी मतं ठरवण्याचा हा अभाव ? स्टोन काय, गोरे काय, आजूबाजूला जे घडत होतं वा घडून गेलं त्यावर लिहीत होते. फरक एवढा होता की स्टोननं स्वत:ची मतं न घुसडता एक पारंपरिक प्रतिमा उभी केली तर नानासाहेब स्त्रीच्या अशा एका कप्प्यात शिरले होते जिथं जायला सर्वांनी अडखळावं. ही दोन्हीही रूपं खरी मानायला मी तयार नव्हतो. नानासाहेबांना स्त्रीचं मन बरोबर पकडता आलं होतं. स्टोननं तपशील खूप भरला होता. मन मात्र त्यालाही सापडलं होतंच.
कार्यकर्त्यांची पत्नी त्याच्यासारखीच असली पाहिजे या आग्रहातून एक प्रतिमानिर्मिती झाली होती. जी तशी नसेल ती तुसडी, माणूसघाणी, स्वार्थी होती. म्हणजेच अंतिमत: त्या कार्यकर्त्याचा घात करणारी, त्याच्या नष्टचर्याची सुरुवात करणारी ठरायची. स्त्रीचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असतं असं मानणाऱ्यांचाही यात मोठा वाटा होता. नवरा जे करतो ते तिला अजिबात आवडत नसेल तर ? हा प्रश्न कोणालाच पडत नसे. कारण तो कार्यकर्ता असल्याचं माहीत असूनही तिनं त्याच्याशी लग्न केलं आहे. त्यामुळं तिला येणाऱ्याजाणाऱ्याचं आगतस्वागत करायलाच हवं, त्याच्यासाठी घरकामाची जबाबदारी उचलायलाच हवी, त्याच्यापुढे पडतं घ्यायलाच हवं हा समज प्रत्येकाचाच पक्का होता. गांधीजींच्या साध्या राहणीचा पगडा साऱ्याच चळवळींवर पडलेला असल्यानं कार्यकर्त्यांचं जगणं, घर, राहणीमान, सगळंच चैनीचं नसावं असा एक रिवाज होता. अमेरिकेत युजीन उर्फ जीन डेल्स (१८५५-१९२६) हा समाजवादी नैतिकतेचा जिताजागता आदर्श होता. तो एका किराणा दुकानदाराचा मुलगा. घरची परिस्थिती बेताची. त्याच्या कार्याचा आरंभ त्याच्या इंडियाना प्रांतातल्या हेरी हॉट या गावातूनच झाला. रेल्वे कामगारांचं संघटन त्यानं सुरू केलं. गावातील ग्लोरिया नावाची मुलगी त्याला आवडायची, तीही याच्यासारखीच सेवाभावी वृत्तीची. पण वेळेवर प्रेम व्यक्त न केल्यानं तिचं लग्न दुसऱ्याशी होतं. बऱ्याच उशिरा मग त्याचं अन् क्रॅथरीन उर्फ केट मित्झेल यांचं प्रेम जमतं अन् ते विवाह करतात. केट एका व्यापारी जर्मन घरातली. (ग्लोरियाशी लग्न करावं की नाही या विचारात तो पडतो. आपण कामगार चळवळीशी पूर्ण जोडले गेल्यावर ग्लोरियाला आपण काय देऊ शकू ? आपलं भवितव्य अस्थिर राहणार मग विवाहाची जोखीम कशी घ्यायची ? पत्नीपेक्षाही जे प्रेमाचं ते काम मग कसं होईल ? असा विचार तो करतो व गप्प राहतो.) तिची राहणी ऐटबाज व खर्चिक. ती खूप महत्त्वाकांक्षीदेखील आहे. तिला तो आवडतो मात्र त्यानं सेनेटर व्हावं, राजकारणात जावं असं ती सुचवते. तो म्हणतो, मी चळवळया आहे. कामगार नेत्याला राजकारणात स्थान नाही. तरीही केट त्याचा प्रचार करते. तो जिंकतो. तू काही दिवसांत वॉशिंग्टनमध्ये असशील असं त्याला म्हणते.
सत्ता व राजकारण हे केटचं उद्दिष्ट, तर कामगारांचे लढे, त्यांचं जीवनमान सुधारणं हा जीनचा मार्ग. राज्य विधिमंडळातलं राजकारण इतकं उबगवाणं होतं की जीन सेनेटपदाचा राजीनामा देतो. त्याचा केटला फार धक्का बसतो. ती रडून आकांत करते. आपल्या राजकीय `करिअर'वर जीननं पाणी सोडलं असं ती सुनावते. आपल्याला राजकारण आवडत नाही असं तो म्हणतो तेव्हा ती माझी सारी स्वप्नं, योजना तू धुळीस मिळवल्या असं त्याला सांगते. तिला नवऱ्याची युनियनबाजी पसंत नसते. तू आयुष्यभर फक्त संघटनेचं काम करणार ? हा तिचा तिरस्कारपूर्ण प्रश्न त्याला फार बोचतो. तुझ्या बळावर तू पैसा कमाव, उद्योगधंदा कर असंही केट जीनला सांगते. तू उच्चवर्गात हिंडशील फिरशील असंही म्हणते. तो म्हणतो, मी तुझ्यावर प्रेम करतो पण कधी कधी तुझा थांगच मला लागत नाही. मग एकांतात तो विचार करतो की, मी माझ्या कामात अन् आईवडिलांच्या सोबत किती सुखी होतो. या लग्नाच्या भानगडीत कुठून आलो ? हे जीवन मोठं विचित्र. ग्लोरियाला मी लग्नाचं विचारलं नाही म्हणून हरलो. इथं मी विचारलं अन् मी हरतोय. स्वातंत्र्य ? तो एक मूर्खपणाच. माणसाला लग्न हवंच. त्याचं स्वत:चं घर आणि मुलं... मुलांचा विचार येताच जीनचं नैराश्य दूर होतं.
केट व जीन यांचा हा पहिला झगडा. जीन तरीही हेरी हॉटपासून खूप दिवसांसाठी चळवळीच्या बांधणीसाठी दूर दूर जात राहतो. केट एकाकी पडते. सासू-सासरे व दीर तिला फारसे आवडत नसतात. पुढं मोठं घर घ्यायचा विचार केट करते. तो प्रसंग जीनच्या साध्या राहणीचा द्योतक आहे. केटनं केलेल्या त्यागाचादेखील. आपल्या नव्या घराचं स्वरूप कसं असेल ते ती एका अल्बममधून दाखवते :
`हे बघ बाहेरून ते असं दिसेल युजीन. सुंदर आहे ना ते?'
पीन अॅने धाटणीच्या बांधकामाचा अडीच मजली आविष्कार जीनच्या डोळयांपुढं आला. त्याच्या पोटात खड्डाच पडला. हे साध्या कामकऱ्याचं घरच नव्हतं. तो तर एक महाल होता.
`हे एवढं बांधायला तुझ्याकडं पैसा कुठून येईल ?'
`ओह, ते सारं तू माझ्यावर सोपव.' ती म्हणाली. `घरबांधणीच्या बॉण्डस्मध्ये मी बरीच रक्कम गुंतवून ठेवलीय.'
`पण हे कसं जमलं तुला ?'
तिनं त्याच्याकडे रोखून बघितलं. तिच्या त्या निर्धाराची त्याला भीतीच वाटली.
`मी पेनी पेनी अन् डॉलर डॉलर वाचवलाय ! मी माझंच शिवणकाम अन् धुणं पुसणं केलं. मी तुझ्याबरोबर मुद्दामच नाही हिंडले नाही तर माझ्या बचतीची खूप रक्कम त्यात गेली असती. तुला कशाचीही चणचण भासू नाही दिली युजीनं; तसं करणं योग्य झालं नसतं. मी तुला चांगलंचुंगलं खाऊ घातलं, नाही का, अन् तुला आरामात ठेवलं ?'
`हो, खरंय केट. पण हे घर माझ्यासारख्याला नको. कळतंय ना तुला ?'
तिनं त्याला मध्येच तोडत म्हटलं, `का नाही ? तू खरा उच्चकुळातलाच.'
`परंतु मी एका संघटनेचा कर्मचारी आहे गं. मला इतक्या बड्या घरात राहणं बरं नाही जेव्हा.....'
`जसं ज्याला परवडतं तसं त्या माणसानं प्रामाणिक काम करून राहावं युजीन. तुझा पगार एक छान घर घेण्याएवढा असेल तर ते तुला का मिळू नये ? तुझ्या पैशाचं तू काय करणारेस, जुगार खेळशील की दारूत घालवशील ?'
`ज्याचं प्रतिनिधित्व तो करतो त्यांच्यापेक्षा चांगल्या स्थितीत कामगार नेत्यानं राहू नये. तो तसा राहू लागला तर तो त्यांच्यापेक्षा जास्त पगार घेतो असा त्याचा अर्थ.'
पुढं केट जीनशी युक्तीवाद करते की तुझा पगार वाढत जाईल. तो त्यानं तिला द्यायचा. ती मग तो स्टॉक्स व बॉण्डस्मध्ये गुंतवेल. ती त्याला खूप श्रीमंत करील. तेव्हा जीन तिला म्हणतो, `आरामशीर जगण्याएवढा पैसाच मी कमावणार.'
`पैसा जगातली सर्वात महत्त्वाची गोष्ट असते यूजीन, कारण ती सगळया गोष्टींचं नियंत्रण करते.'
`हा तर शुद्ध भोगवाद झाला.'
नंतर केट सांगते की होमबिल्डर्स असोसिएशनमध्ये गुंतवलेले पैसे आठ टक्के लाभांश देत असून ते तिनं वाचवले याचा अर्थ तिनं ते कमवले असाच ना असं म्हणून ती जीनला गप्प करते. सबंध कादंबरी दोघांमधल्या अशा विसंवादानं भरलेली आहे. जीनच्या जीवनविषयक कल्पना केटपेक्षा पूर्णपणे भिन्न तर असतातच पण केट पुष्कळदा त्यांच्या विरोधात असते व वागते. पण त्यालाही तिचं जीवनविषयक तत्त्वज्ञान जबाबदार आहे. केटनं त्याला हवं तसं जगावं. मग केटनं का नाही ? जीनला जशी एक वर्तनशैली अंगीकारायची आहे तशी केटलाही आहे. कोणाची योग्य अन् कोणाची चुकीची ?
नेल्सन मंडेला यांच्या आयुष्यातही अशीच एक स्त्री आली. त्यांची प्रथम पत्नी एव्हलीन लग्नानंतर सातव्या वर्षात तिच्या परिचारिकेच्या कामात उच्चश्रेणी प्राप्त करते. ती पुन्हा गर्भवती असते. मंडेला आपल्या `लाँग वॉक टू फ्रीडम' या आत्मचरित्रात तिच्याविषयी असं सांगतात, `नंतरच्या वर्षात एव्हलीन चर्च ऑफ जेहोवाज विटनेसचा भाग असलेल्या `वॉच टॉवर' ऑर्गनायझेशनमध्ये काम करू लागली. तिच्या तेव्हाच्या आयुष्यातल्या नैराश्यामुळे की आणखी कशामुळे मला माहीत नाही. जेहोवाज विटनेस बायबलला श्रद्धेचा एकमात्र मार्ग मानतो व पाप आणि पुण्याच्या भावी लढाईवर विश्वास ठेवतो. एव्हलीन अत्यंत उत्साहानं `वॉचटॉवर' हे चर्चचं प्रकाशन वितरीत करू लागली. ती माझ्याही मागं लागली की माझी संघर्षावरची निष्ठा मी बदलवून परमेश्वरावर निष्ठा ठेवावी. वॉच टॉवर्सच्या काही गोष्टी आकर्षक व उपयुक्त मला वाटल्या तरी मला तिच्यासारखी श्रद्धा ठेवणं आणि बाळगणं शक्य नव्हतं. ती या बाबतीत फारच हट्टी होती. त्यानं मी वैतागलो. माझ्या समजुतीप्रमाणे तिचा भक्तिमार्ग शोषणापुढं शरणागती आणि निष्क्रियता शिकवणारा होता. तो मी कधीच मानला नसता. माझी एएनसी व संघर्ष यांवरची श्रद्धा अविरत होती. त्यानं एव्हलीन अस्वस्थ असे. तिला नेहमी असं वाटे की राजकारण हा तारुण्यातला एक विरंगुळा. मी कधीतरी ट्नन्स्केईला परतून वकिली सुरू करावी. त्याची शक्यता दुरावत चालली तरी जोहान्सबर्ग हेच आमचं घर राहीलं हे वास्तव तिनं कधीच स्वीकारलं नाही. आम्ही सारे उमटाटा इथं परत जाऊ असं वाटून घेणंही तिनं कधी बंद केलं नाही. मी ट्नन्स्केईत माझ्या कुटुंबात परतलो, अन् सबाटाचा मार्गदर्शक म्हणून काम करू लागलो की मला राजकारण आठवणार नाही असं तिला वाटे. मी उमटाटाला यावं यासाठी ती दालीवोंगाला मला पटवण्यास सांगे. आमचे यावर खूप वाद झाले. राजकारण माझ्यासाठी चुकलेली वाट नाही तर सर्वस्व आहे आणि माझ्या जगण्यामधला तो अत्यंत अनिवार्य व मूलभूत हिस्सा आहे, असं मी तिला शांतपणे पटवत राहिलो. तिनं हे काही मानलं नाही. आपापल्या आयुष्याविषयी इतके भिन्न विचार बाळगणारी माणसं फार काळ निकट राहू शकत नाहीत.
``संघर्षाची किती आवश्यकता आहे हे मी तिला पटवत राहिलो तर ती मला धर्मश्रद्धेचं मूल्य किती महत्त्वाचं आहे ते सांगत राहिली. मी देशसेवा करतो आहे असं मी तिला सांगू लागलो की ती म्हणे, परमेश्वराची सेवा देशसेवेपेक्षा मोठी. आम्हांला एकत्र येण्याची जागाच दिसेना आणि मला वाटू लागले की आता हे लग्न टिकण्याच्या परिस्थितीत नाही. तिनं मुलांच्या मनावरही ताबा मिळवायचा प्रयत्न केला. तिला ती धर्मनिष्ठ व्हावीशी वाटे तर मला ती राजकीय व्हावीत असे वाटे. संधी मिळताच ती मुलांना चर्चमध्ये नेई आणि वॉच टॉवरचं साहित्य त्यांना वाचून दाखवले. गावात वाटण्यासाठी तिनं त्यांना `वॉचटॉवर'ची प्रचारपत्रंही दिली. थेंबी पायोनिअर्सचा सदस्य होता. एएनसीचा हा एक बालविभाग होता. त्यामुळे तो आधीच राजकीय जाणता झालेला होता. माकगाथोला मी समजावून सांगे की गोऱ्या माणसानं काळया माणसाचा छळ कसा केला ते.

``आमच्या घरात रुझवेल्ट, चर्चिल, स्टालीन, गांधी आणि १९१७ साली आमच्या सेंट पीटर्सबर्गच्या विंटर पॅलेसवरचा कब्जा यांच्या तसबिरी होत्या. मी मुलांना प्रत्येकाची माहिती देई व कोणाची तत्त्वे कोणती ते सांगे..... वॉल्टर व अल्बेर्टिना सिसुलू हे एव्हलीनच्या फार जवळचे. आम्ही एकत्र असावे अशी त्यांची फार इच्छा. एव्हलीन अल्बेर्टिनाला सारं काही सांगायची. एके काळी वॉल्टरनं या प्रकरणात हात घातला तेव्हा मी त्याच्यावर फार उखडलो व म्हणालो की त्याचा याच्याशी काही संबंध नाही. माझा आवाज चढला याचा मला फार पश्चात्ताप झाला कारण वॉल्टर मला भावासारखा जवळचा होता आणि त्याची मैत्री व पाठिंबा कधीही डळमळला नव्हता.
``डिसेंबरात आम्हाला अटक झाली व दोन आठवडे आम्हाला तुरुंगात ठेवलं. एव्हलीन फक्त एकदाच भेटायला आली. मी जामीनावर सुटलो तेव्हा ती मुलांना घेऊन घर सोडून गेली होती. मी एका रिकाम्या, मुक्या घरात परतलो होतो. ती पडदेसुद्धा घेऊन गेली होती. हे मला मोडून गेलं. ती तिच्या भावापाशी राहायला गेली.... एव्हलीनमध्ये व माझ्यात अशक्य असणारे मतभेद होते. संघर्षातलं माझं आयुष्य मी सोडून देऊ शकत नव्हतो आणि तिच्याशिवाय व परिवाराशिवाय दुसरीकडे असलेली माझी बांधीलकी सहन होत नव्हती. ती फार छान स्त्री होती. आकर्षक, खंबीर अन् निष्ठावान. एक चांगली आईदेखील तिच्याबद्दलचा आदर मी कधीच गमावला नाही. पण शेवटी आम्ही आमचा संसार वाचवू शकलो नाही. कोणतंही लग्न मोडतं तेव्हा ते फार दु:खदायक असतं. मुलांसाठी तर खूप. आमचा परिवारही याला अपवाद नव्हता आणि सारी मुलं आम्ही विभक्त झाल्यामुळं दुखावली.''
नेल्सन व एव्हलीन यांचा प्रेमविवाह होता. दोघांनाही परस्परांच्या विचारांची पूर्ण जाणीव होती का ? असावी. दोघांनीही एकमेकांच्या आवडीनिवडींचा आदर करायला हवा होता का ? तत्त्वत: हो. पण यूजीनसारखे नेल्सन सोशिक, समजूतदार राहिले असते तर लग्न टिकलं असतं का ? एव्हलीन काय, केट काय, दोघीही नवऱ्यांना जे आवडत नव्हतं तेच करू पाहत होत्या. जीन व नेल्सन दोघंही तुरुंगात जात, दौरे काढत, चळवळी करत, संघटना बांधत. एक गोरा, दुसरा कृष्णवर्णीय किंवा एकाचं शोषण भयंकर अन् दुसऱ्याचं सौम्य अशातलाही भाग नव्हता. तशी तुलना करणं चुकीचं. दोघंही कट्टर व कडवे कार्यकर्ते. दोघांनीही स्वातंत्र्य जपलं. स्वत:चंपण आणि पत्नीचंपण. पुढं विनीशी नेल्सनचा विवाह होतो आणि ते चक्क २८ वर्षं तुरुंगात काढतात. विनी एकट्यानं मुलं वाढवते.
कार्यकर्त्याच्या पत्नीचा एकटेपणा, तिचं एकाकीपण खचितच भयंकर असलं पाहिजे. सतत दूर असलेल्या नवऱ्याची काळजी आणि शेजारी भरभरून जगलं जाणारं दांपत्यजीवन पाहून कोणतीही पत्नी कातावणारच. सहजीवन हक्काचं असूनही ते मिळेनासं झालं की चिडचिड होणारच. त्यात भर म्हणजे काटकसरी व बिनचैनीच्या जगण्याची सक्ती. तरुण वयात अपेक्षा मारणं, भावना दडपणं, स्वभावाला मुरड घालून जगणं अत्यंत अवघड. काही स्त्रियांनी जाणीवपूर्वक गरिबी पत्करली. थोडक्यात सुख मानलं. त्यांनी खूप त्याग केला. तरी त्यांची बदनामी नाही टळली. आपल्या पुरुषप्रधान समाजपद्धतीनं त्यांना अनुगामिनीच व्हायला भाग पडलं, सहचारिणी नाही. विवाह केल्यानंतर संसारत्याग करून कार्य करायला बाहेर पडलेल्या नवऱ्याबद्दल `उसासा'मधली नानासाहेबांची `ती' म्हणते, ``आता मी खरोखरीच एकाकी झाले. गेली पंधरा वर्षे मी एकाकीच होते. परंतु चातकासारखी चोच उघडून तुझ्याकड दृष्टी लावून बसले होते. सूर्याच्या दिशेला सूर्यमुखी तोंड फिरवीत तशी फिरवीत होते. मनात म्हणत होते की, तू प्रेम इतरांना इतक्या मुक्तहस्ताने देतोस ते केव्हाना केव्हा तरी माझ्या वाट्याला येईल. नोकरीवर जाताना तिठ्यावरच्या फळयावर पक्षाच्या सभेची सूचना वाचली आणि तुझं नाव वाचलं की माझं अंग मोहरून जाई. एक मन म्हणे, आज संध्याकाळी तू गावात आलीस की खास घरी येशील. दुसरं मन म्हणे, तू कसला येतोस !... कधी मला वाटे, श्रीला घेऊन तुझा माझा फोटो काढावा. तू नाहीस तर निदान तुझी छाया तरी मिळेल ! कधी इच्छा होई की, आपण तिघांनी चार दिवस कुठं तरी जावं नात्यागोत्याच्या माणसांकडे. तेवढं नाही तर निदान एकत्र हिंडायला तरी जावं एखाद्या संध्याकाळी. तू नवरा, मी बायको आणि हा मुलगा असं हे बिल्वपत्रं जगानं एकत्र पाहावं...
``तुझी सावली म्हणून गेली पंधरा वर्षे माझा सतत प्रयत्न चालला होता. पण लोकांना वाटत होतं की, तुझी पारध करण्यासाठीच मी तुझा पाठलाग चालविला आहे. पण लोकांना कशाला ? तुलासुद्धा तसंच वाटलं नव्हतं का ! तू सावज नि मी शिकारी असा जेव्हा तुझासुद्धा समज झाला, तेव्हा मर्मान्ती तीर लागला तो मला आणि विव्हळत मागे राहिले ती मी, तू नव्हे. आपलं घरकुल थाटावं हा माझा ध्यास आणि दुनियेचा कोसळलेला संसार उभा करावा हा तुझा ध्यास. या तुझ्या महान ध्यासात अंतराय निर्माण होऊ नये म्हणून मी मनाशी ठरविले की तुझ्यावर कसलाही बोजा पडू द्यावयाचा नाही. मनात म्हटलं, मी वणवण करीत पंख तुटून पडेपर्यंत भ्रमेन. दिगंतरातून एक एक काडी गोळा करून आपलं एक चिमुकलं घरटं विणीन... पण घरट्याचा आश्रय म्हणजे आकाशाची बेईमानी अशीच जिथं तुझी धारणा झालेली होती तिथं आपलं घरटं तुला बंदिशाळेसारखं वाटावं यात नवल काय !''
केट आणि ही आपल्या पतीच्या चितेपुढं उभी राहून अंतर्मनात काही बोलणारी स्त्री यांच्यात किती साम्य आहे ! थोडा फरक असा की केटला एक अलिशान घर हवं होतं तर गोऱ्यांच्या स्त्रीला स्वत:चं हक्काचं छोटं. कार्यकर्त्यांनी सर्वसंगपरित्याग करून राजकीय कार्यात उतरावं ही एक अट होती की एक निकष की जनसामान्यांवर प्रभाव पाडण्यासाठी पत्करलेली एक आचारपद्धती ? माझ्या अवतीभवती मी कितीतरी कार्यकर्त्यांचे आबाळ झालेले संसार बघत होतो. कायमची आर्थिक विवंचना आणि ओढगस्तीचा प्रपंच खरं तर कार्यकर्त्याच्या ताकदीवरच आघात करणारा असे. पण गांधीजी, नेहरू, सरदार, विनोबा, डांगे, लोहिया, जयप्रकाश, आदींनी स्वत: स्वीकारलेली जीवनपद्धती त्या काळी इतकी सर्वसामान्य होती की राजकीय कार्यकर्त्यांनी मौजमजा, उपभोग असं सारं वर्ज्य मानायचं ठरूनच गेलं होतं. सध्याचे भारतातले कम्युनिस्ट कार्यकर्ते व सत्ताधारी नेते अगदी साधं जीवन जगतात. म्हणून त्यांना जनसमुदायात स्थान आहे का व म्हणूनच ते सातत्यानं निवडून येत आहेत का ? मग मायावतींचं काय ? पन्नास कोटींची संपत्ती त्या कशा जमवतात अन् तरीही त्या जिंकतात कशा ? गांधी-नेहरू-पटेल जन्मानं उच्चवर्गीय होते. त्यांना खाली येणं भाग होतं. सामान्यांसारखं जगणं त्यांना आवश्यक होतं. बऱ्या घरच्यांना संपत्तीचा त्याग करायला ते सांगतसुद्धा. गांधीजींच्या साध्या राहणीचा अतिरेकी आग्रह अनेकांनी पाळला. राजकीय पक्षांनीही तो स्वीकारला. त्यामुळं राजकीय कार्यकर्त्यांचं जगणंही विशिष्ट जीवनशैलीप्रमाणे `समाजवादी', `गांधीवादी', `सर्वोदयी', `मार्क्सवादी', `नक्षलवादी' होत राहिलं. ब्रिटिशांच्या वस्तूंवरचा बहिष्कार रोजच्या जगण्यात स्वातंत्र्यापूर्वी पाळणं हीही एक राजकीय चाल होती. स्वातंत्र्यानंतर भांडवलदारांची जागा भारतीयांनी घेतली. त्यांच्या शोषणाला, पिळवणुकीला प्रतिकार म्हणून पुन्हा साध्या राहणीचा आग्रह पुढे चालू राहिला. त्याच बरोबर शेतकरी-कष्टकरी-कामगार-गरीब यांना जवळची वाटेल अशी जीवनशैली पत्करण्याचाही क्रम होता. आज असं वर्तन कुठं आढळत नाही. भाजप, शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्न्वादी आदी पक्षांचे तरुण, नवे नेते,कार्यकर्ते असा विचार अन् वर्तन करताना कधीच आढळत नाहीत. असं का ? तरीही त्यांच्या यशापयशावर त्याचा काही परिणाम होताना दिसत नाही असं का ? अमुक नेत्यानं आमदार झाल्यावर खूप धन जमवले म्हणून त्याला मतदारांनी पाडला असं का होत नाही ? त्यांच्या बायकांच्या मनात काय आहे ते सोडा त्याचं स्वत: कधी दिसत नाहीत. कसं असेल अशा राजकीय कार्यकर्त्यांचं वर्तन ? त्यांचं दांपत्यजीवन परस्पर विरोधाचं असतं की सहानुभूतीचं ? त्यांच्या बायका कधी `स्वतंत्र' विचार करत असतील का ?
खुद्द गांधीजींनी काय म्हणून ठेवलंय कस्तुरबाइंर्बद्दल ते आता पाहू. निरक्षरता, परंपरा, धर्म इ.मुळे `बा' पतीमध्ये परमेश्वर पाहणाऱ्या होत्या. तो जसं चाहेल त्याला मान तुकवणारी ती एक `भारतीय आदर्श स्त्री' होती. गांधीजींनी त्यांच्या आत्मकथेत लिहिलं आहे, ``कोणी असे मानण्याचे मात्र कारण नाही की आम्ही आदर्श दंपती आहो. किंवा माझ्या धर्मपत्नीमध्ये कसलाच दोष नाही, किंवा आमचे जीवनाचे आदर्श आता तरी एकच आहेत. कस्तुरबाईचे काही स्वतंत्र आदर्श आहेत की नाही, याची त्या बिचारीला स्वत:लाही खबर नसेल. संभव आहे की आजही माझ्या आचरणातील पुष्कळ गोष्टी तिला आवडत नसतील. त्यासंबंधी आम्ही कधी चर्चा करीत नाही, करण्यात अर्थ नाही. तिला तिच्या आईबापांनी शिक्षण दिले नाही किंवा वेळ होता तेव्हा मीही देऊ शकलो नाही. पण तिच्यामध्ये एक गुण फार मोठ्या प्रमाणात आहे, जो इतर पुष्कळ हिंदू स्त्रियांमध्ये कमीजास्त प्रमाणात असतोच. रुचो न रुचो, कळो न कळो, माझ्या मागून येण्यामध्येच तिने स्वत:च्या जीवनाचे सार्थक मानले आहे; आणि निर्मळ जीवन चालविण्याच्या माझ्या प्रयत्नामध्ये तिने कधी आडकाठी आणलेली नाही. त्यामुळे जरी आमच्या बुद्धिशक्तीमध्ये पुष्कळ अंतर असले, तरीही आमचे जीवन समाधानाचे, सुखाचे आणि उर्ध्वगामी आहे असे मला वाटते.''
`बा' खाष्ट नव्हत्या, तुसड्या नव्हत्या, इतरांना घर बंद न करणाऱ्या होत्या. आश्रमातच उर्वरित आयुष्य गेल्यावर त्या सार्वजनिक माता बनल्या. त्याहून अधिक त्यांची प्रतिमा बनली नाही. त्यांना आपल्या विषयासक्तीचा कायम त्रास झाला असे गांधीजी नमूद करतात. पत्नीशी संभोग करणं हा गांधीजींच्या दृष्टीनं पुढं पुढं प्रमाद ठरत गेला. त्यांनी स्वत:हून ब्रह्मचर्य पाळायचं ठरवलं. तेव्हा बांचं म्हणणं काय होतं ? अनुमती गृहीत धरलेली होती. पण पत्नीला किंवा स्त्रीला मोहाची पापमय खाण मानणं गांधीजींनादेखील सुटलं नाही. त्यांच्या अशा वर्तनाचा प्रभाव नानासाहेबांच्या `उसासा'मधल्या स्त्रीला फार जाचक झाला. नानासाहेबांनी त्याच अस्पर्श कप्प्याला हात घातला आहे. तिचा पती तिच्याशी संभोग करतो हे त्याला अपराधीपणाचं वाटतं याला कोणाची शिकवण कारणीभूत ? निदान तेवढंही सुख तो कार्यकर्ता आपल्या पत्नीला देऊ शकत नाही ? `उसासा'मधली ती अनामिका म्हणते, ``का हे असं ? संभोगात अमंगळ असं काय आहे ते तरी मला कळू द्या. जेथे बलात्कार नाही तर समर्पण आहे, तेथे फसवणूक नाही तर संपूर्ण समजून आहे, जेथे नुसता स्नेह नाही, तर प्रेमाचा आत्मलोप करणारा प्रकर्ष आहे, तेथे सहवास व संभोग त्याज्य काय म्हणून ठरावा ? स्त्रीला स्तन असतात, नितंब असतात, तिच्या ठायी गर्भधारणेची शक्ती असते, हा तिचा अपराध झाला का ? संयम मलाही समजतो; पण निर्मूलन
मला समजत नाही.''
सर्व सुखांना नकार, तमाम चैनींना मज्जाव हा साध्या राहणीचा अतिरेकच. त्यात पतीपत्नीच्या नैसर्गिक आणि हक्काच्या शरीरसंबंधावर बहिष्कार हा तर निव्वळ नादानपणा. कार्यकर्त्यांनी मधुचंद्र साजरा करणं योग्य की अयोग्य अशा चर्चा खूप झडल्या. केवळ मजा करण्यासाठी कुठं बाहेरगावी जाणं म्हणजे केवढा मोठा गुन्हा असे कार्यकर्त्यांच्या वर्तुळात. कार्यकर्त्यानं शक्यतो एकाच खोलीच्या घरात राहावं असा दंडकच पंचवीस तीस वर्षांपूर्वी होता. परिस्थिती तशी फार वाईट असायची परंतु त्यामागं `काय करायच्यात दोन खोल्या ?' असा एक त्यागी सूरही ऐकू येई. मग व्हायचं असं की तेवढ्याच त्या खोलीत कार्यकर्त्यांचे मित्र, अन्य कार्यकर्ते, नातलग यांची गर्दी होई आणि दांपत्यजीवन आक्रसून जाई. त्याचा ताण कार्यकर्त्याच्या पत्नीवर पडे व ती नको हा जमाव पुन्हा आपल्या घरात अशा पद्धतीनं वागली की तिच्याविरुद्ध मत तयार होई. मग साहजिकच ती तुसडी, फटकळ, उर्मट, माणूसघाणी वगैरे होऊन जाई. समस्या घेऊन आलेल्या ग्रामीण माणसाला कार्यकर्त्यांचं घर हक्काचं वाटे तर पत्नीला ती कटकट वाटे. तिची भावना बरोबर आहे, असं मात्र कोणाला वाटत नसे. बरं, घरात राहायला आलेल्यांच्या भयंकर सवयींनी पत्नी बेजार व्हायची ते वेगळंच. जेवणाची ताटं न उचलणं, अंथरुणाची घडी न करणं, टूथपेस्ट भरपूर घेणं. कंगव्यात घाण ठेवणं, संडासात पाणी न ओतणं, चपला दारातच सोडणं अशा बारीकसारीक कितीतरी गोष्टींनी पत्नीची शिस्त बिघडे आणि ती चिडे. काही कार्यकर्ते अशा वाईट सवयींच्या आपल्या सवंगड्यांना दुखवू इच्छित नसत. त्याचा आणखीनच ताप होई. त्यामुळे बायकोला परखडपणा, स्पष्टवक्तेपणा स्वीकारावा लागे व ती बदनाम, अप्रिय होऊन जाई. `वहिनी, चहा करा बरं.' असं बजावणारे अनेक दीर आणि `कॉम्रेड, काही खायला द्या' असा हुकूम सोडणारे नवऱ्याचे मित्र यांचाही विलक्षण जाच बायकोला सोसावा लागे. उगाच वेळ काढत बसणारे नवऱ्याचे मित्र नवरा नसताना घरात घ्यायलाही अडचण अन् त्यांना परतवणंही अडचणीचं. उसनंपासनं, उधारी अन् तुटपुंजी साठवण यात बेजार झालेली कार्यकर्त्याची बायको थंडपणानं स्वागत करणार नाही तर काय ? पण या गोष्टींकडे काणाडोळा करून कार्यकर्त्याचा फायदा घेणारे प्रचंड.
``मला तू एवढी अडचण लेखून का चालत होतास, ते मला कधीच समजले नाही. तुझ्याभोवती जमणारे तुझे स्त्रीपुरुष मित्र व अनुचर मी जेव्हा पाही तेव्हा त्यामध्ये मला माझ्याहून दुबळे, लंपट, मूढ, बायले असेही लोक दिसत. हे सर्व दगड गळयात बांधून मी पैलतीर कसा गाठणार, अशी शंका तुला आल्याचं कधी दिसलं नाही. तुला कोणी जड शिळा वाटत असेल तर मी ती, आपलं हे घरटं आणि हा लहानगा श्री!'' ही अशी प्रतिक्रिया `उसासा'मधली ती बायको देते. तशी द्यायची बायकांकडे हिंमत असे का कार्यकर्त्यांच्या ? बहुधा भांडण नको म्हणून असे वादाचे मुद्दे कोणी काढत नसे. पण जीनची केट स्पष्ट बोलून माणसं कटवत असे. बायकोचा `पझेसिव्हनेस' म्हणा किंवा एकटेपणाची बोच म्हणा, कार्यकर्त्यांच्या बायका फार काळ पतीच्या सवंगड्यांना पत्करू शकत नाहीत. केटच्या जीवनात एरवीच जीनचा सहवास कमी. त्यात तो पहाटे पाचला उठून थिओडोर (त्याचा भाऊ)सोबत जंगलात फिरायला जाई. सात वाजता परतून स्नान, नाश्ता करून तो कार्यालयाकडे जाई. केटनं संध्याकाळच्या कामावर बंधन आणलं नसतं तर तो मध्यरात्रीपर्यंत काम करीत राहिला असता. त्यावर जीन म्हणतो, ``आता होणार नाही तसं. चोवीस तास राबणारा कामगार मी आता राहिलो नाही.''
``अरे, मला दिवसभर अपेक्षा असते ती आपल्या एकांतातल्या काही तासांची. तू दार उघडल्यावर प्रत्येक वेळी पायरीवर उभा असलेला थिओ दिसू लागला तर...''
``मी थिओला फार कमी वेळा घरी आणलं आहे. अखेर तो माझा भाऊ आहे. आम्ही मिळून ही संघटना उभी केली आहे. आम्ही खूप काम केलं आहे. आम्हीच एक संच आहोत.''
`` तू त्याच्याशीच लग्न करायला हवं होतंस'', केट फाडकन बोलली.
तिच्या स्वरातला संताप पाहून त्याचा राग मावळला. केट बरोबर होती. तिला त्याचा सहवास मिळतोच केवढा ? त्याचे आनंद, त्याचे साहस, त्याच्या योजना व स्वप्नं अन् त्याचं नैराश्य व त्याचे पराभव सगळयांचा वाटेकरी थिओडर असे. या गोष्टी खऱ्या बायकोमुळे घडत होत्या. या गोष्टींनी तर कोणताही विवाह सुखी होत असतो. त्यानं प्रयत्न केले. केटबरोबर त्यानं संघटनेच्या प्रश्नांची चर्चा केली होती... पण केटनं कधी त्यात रस दाखवला नाही. उलट ती त्याच्या विरुद्धच दिसली.
पुढं केट तिला सांगतो की यापुढं थिओला तो घरी आणणार नाही. तेव्हा केट म्हणते की त्यानं नेहमीच आपल्या घरी यावं, पण तो येण्यापूर्वी तरी मला वेळ देत जा बाजारात जायला. म्हणजे मला तयारीला वेळ मिळेल. एकदा जीन घरी झोपलेला असताना तिघे येतात तेव्हा केट त्यांना `तो घरात नाही' असं सांगून कटवते. झोपेत हे संभाषण ऐकून जीन उठतो व रस्त्यावर पोचलेल्या त्या तिघांना परत बोलावतो. ते गेल्यावर तो तिला जाब विचारतो तेव्हा केट उत्तरते की तू नुकताच थकूनभागून आलेला असताना मी तुला कसं उठवू ? असे कितीरी प्रसंग कार्यकर्त्यांच्या बायकांना पेचात पाडून गेलेले आहेत. नवऱ्याला सांभाळताना जगाची फिकीर करायची नाही कारण त्याच्यासाठी जगाला दूर सारूनच बायको पुढं आलेली. प्रेमविवाह अन् आंतरजातीय विवाह करणाऱ्या बायकांना ना माहेरचे, ना सासरचे अशा परिस्थितीत अनेक वर्षे काढावी लागली. त्यातच नवरा कार्यानिमित्त सतत बाहेर म्हटल्यावर जे एकाकीपण अनुभवास येतं ते फार क्लेशदायक होतं. नोकरी करणारी बायको असली तर तिला नातलगांची बोलणी खाणं फार महाग पडे. नोकरी करणारीकडे खूप पैसा असतो असा समज खूप वर्षे टिकून होता. कार्यकर्त्यांच्या बायका टुकीनं संसार कशा करायच्या याचं मासलेवाईक प्रत्यंतर प्रा. डॉ. सुधा काळदाते यांचं नुकतंच प्रसिद्ध झालेलं `जीवनसुधा' हे आत्मकथन वाचताना येतं. ``आम्ही दोघांनी विवाहबद्ध होण्याचे ठरविले. मी घर सांभाळीन, नोकरी करीन, आपण अगदी गरिबीत जगायचे नाही, किमान स्वास्थ्य आणि समाधान मिळेल अशी जीवनशैली जगायची. त्यासाठी मला सेवादलाचे काम करता येणार नाही, त्याबद्दल तू मला आग्रह करू नये असे मी सांगितले. दरमहा चारशे रुपये आमदारांचे वेतन असे. सेशन चालू असताना उपस्थित राहिल्याचा भत्ता मिळत असे. त्यामुळे मानधनरूपात बापूंना चार पैसे मिळू लागले. आमचा विवाह झाल्यापासून बापूंनी स्वतंत्र बँक अकाऊंट काढायचा प्रश्न नव्हता. प्रथमच त्यांनी बँकेत खाते उघडले. ह्यापुढे स्वत:चे पैसे सांभाळणे आणि त्याचे नियोजन करणे ह्या जबाबदाऱ्या त्यांनी स्वीकारल्याचे समाधान मला झाले.... टेलिफोनचा खर्च सोडल्यास इतर त्यांच्यासाठी सन्मित्र कॉलनीत होणारे खर्च मीच भागवले. पहिली दहा वर्षे पूर्ण आणि नंतर बहुतेक खर्च मी उचलू शकले एवढी माझी आर्थिक कुवत वाढत गेली... आईचे पुढचे साठ वर्षांचे आयुष्य उसने न मागता गेले आणि तिने माझ्यावर जे संस्कार केले ते हेच आहेत, जे मी आजतागायत पाळले आहेत. घरबांधणीच्या वेळी मोठ्या बहिणीकडून तीन हजार रुपये आणि पुन्हा एकदा टाटा मेमोरियलमधील शस्त्रक्रियेच्या बिलाची रक्कम घेतली होती; पण ती लवकरात लवकर फेडून टाकली ! तूरडाळ संपली तर वरण शिजवले नाही; पण उसनवार केली नाही. देवाला फुले माझ्या अंगणात असतील त्यातच भागवणार. आजूबाजूच्या घरांमध्ये तोडायला कधी गेले नाही. मुलींनाही तेच शिकवले.''
खस्ता खाणे पण त्या न दाखवता जगणे हा कार्यकर्त्यांच्या बायकांचा एक गुणविशेष. सुशिक्षित व नोकरी करणाऱ्या बायकांमध्ये तर हा ठळक गुण. आणीबाणीत तर अचानकच संकट कोसळलं. कार्यकर्त्यांचाही तो कसोटीचा क्षण होता. जे जे कार्यकर्ते तुरुंगात गेले त्या सर्वांच्या बायका खरोखर फार धीराच्या. त्यांनी कसे ते दिवस काढले त्याचे त्यांनाच माहीत ! लिहून ठेवलं असतं तर फार क्लेशकारक अन् दाहक कहाण्या आपल्याला मिळाल्या असत्या. बापू काळदाते आणीबाणीत पकडले गेले. त्यांना कुठं नेलं ते माहीत नाही. घरात दोन मुली. सुधाताई लिहितात, ``आई माझ्याकडे आलीच नाही. बापूंची बहीणही भाच्यांची चौकशी करण्यास आली नाही. कारण तिचे पती सरकारी नोकरीत चांगल्या हुद्द्यावर होते. पुन्हा एकदा आयुष्यात एकाकी पडल्याची तीव्र जाणीव झाली. ह्यावेळी परिस्थिती गंभीर होती. सुटकेची खात्री नव्हती. मी नोकरी करीत होते; त्यामुळे मला आर्थिक स्थिरता होती. मला कोणाची सहानुभूती मिळणे तर दूरच; पण इतर स्त्रिया मला हिणवीत असत. म्हणायच्या, ``तुम्हाला काय, बापू दौऱ्यावर जाण्याची सवय आहे. शिवाय आर्थिक काळजी नाही.'' मला एकटी असताना रडू येई. बापू दौऱ्यावर असणे आणि तुरुंगात दूर असणे ही काय मनाला शांतता देऊ शकणारी परिस्थिती असू शकेल काय ? अशा वेळी माझ्या परिपप् समजदारीत आणि इतरांच्या दृष्टीमध्ये खूप तफावत जाणवायची. मला त्यांचा राग येण्याऐवजी कीव येत असे. या सहनशीलतेला कधी न्याय मिळेल ? तुरुंगात गेलेले मोठे होऊन बाहेर पडतील किंवा बाहेर पडलेच नाहीत तर हुतात्मे होतील; पण घरोघर त्यांच्या कुटुंबीयांच्या त्यागाची दखल कोण घेईल ? कधी ? कशी ? असे प्रश्न मला भेडसावू लागले... त्यावेळी मी मराठवाड्यातील पन्नासच्या आसपास कुटुंबांना मदत पाठवीत असे..पैसे नियमितपणे मुंबई येथील डॉ. पी. व्ही. मंडलिक यांच्याकडून येत असत... बापू कार्यकर्त्यांशी तुरुंगामध्ये बोलत आणि त्यांच्या घरी काय प्रश्न आहेत ते मला दर महिन्याला भेटीच्या वेळी सांगत. काही पत्नी त्यांच्या नवऱ्यांबद्दल नाराज होत्या. त्या घरच्या बाबी मोकळेपणाने बोलत नसत. त्यामुळे कार्यकर्तेही नाराज असत. अशावेळी दोघांनीही समजदारी दाखवण्यास हवी हे समजावून सांगावे लागे.''
कार्यकर्त्यांच्या कामाची दखल सारा समाजच घेत असतो. त्यांच्या बायकाही त्यांच्याप्रमाणे लोकसेवक असतील तर गोष्ट वेगळी. परंतु ती तशी नसेल तर तिची प्रतिमा त्याच्यावर जगणारी अशीच होऊन जाते. तीही काही समाजसेवा करीत असते पण त्याकडे कोणाचे लक्ष नसते हे सुधाताइंर्च्या वरील उदाहरणांवरून दिसून येईल. `नेकी कर, दरिया में डाल' अशीच त्यांची अवस्था असते. आपलं एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असून त्याची दखल घ्या असं सांगायची वेळ कार्यकर्त्याच्या बायकोवर येणं ही चांगली गोष्ट नाही. महाराष्ट्नसारख्या पुरोगामी राज्यात तर मुळीच चांगली नाही. तरीही येताजाता सावित्रीबाई, ताराबाई यांची नावं घेणाऱ्या राज्यात कार्यकर्त्यांच्या बायका पिछाडीवर राहिल्या त्या राहिल्याच. पत्नीच्या सत्कार समारंभात `पाठीशी' कायम असलेल्या या स्त्रीचा सर्वांना बळेबळे करावा लागणारा सत्कार असह्य असतो. अपमानजनक असतो. `पन्नालालचा षष्ट्यब्दीपूर्ती समारंभ आखला गेला. त्या बी. एन. देशमुख यांच्या हस्ते दोघांचा
सत्कार करण्यात आला. प्रा. ग. प्र. प्रधान, मृणालताई व महाराष्ट्नच्या सर्व भागातले कार्यकर्ते आले होते. खर्च वजा जाता पाच लाखाची थैली देण्यात आली. समारंभात बोलायची वीणाची इच्छा होती. पुरुष कार्यकर्त्यांनी आपल्या घरातल्या महिलांना बरोबरीची वागणूक द्यावी असे तिला सांगायचे होते. पण वेळेच्या मर्यादेमुळे संयोजक तिला वेळ देऊ शकले नाहीत. तिचे मन थोडे खट्टू झाले.'' असं पन्नालाल सुराणा यांनी `कथन वीणाचे' या पुस्तकात लिहिलं आहे. हे कथनही पन्नालालजींनीच केलं आहे. वीणाताई डॉक्टर होत्या. पन्नालालजी व त्यांचा प्रेमविवाह. दोघांनीही समाजवादी विचार स्वीकारलेला. वीणाताइंर्नी दवाखाना चालवून घर सांभाळावं व पन्नालालजींनी राजकारण असं ठरलं. पण वीणाताई नुसत्या गृहिणी वा डॉक्टर नव्हत्या. त्यांच्या परीनं त्या सामाजिक कार्य करीतच होत्या. आणीबाणीमध्ये त्यांनाही तुरुंगवास पत्करावा लागला. सुराणांनी वीणाताइंर्ची प्रतिमा अगदी अचूक उतरवली आहे. ``आणीबाणीमुळे दवाखान्यावर मंदीची छाया पसरली होती. प्रभास शिक्षणासाठी औरंगाबादला. आरतीचे उमलते वय. तिला कुणी त्रास देऊ नये म्हणून सावधगिरी घ्यायची. अन् पन्नालालचे सतत मुंबई-दिल्ली व इतरत्र दौरे. घरी आला की ही गर्दी असायची. जुन्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी वाट काढणे अवघड जायचे. अन् सगळयांची सरबराई करायची. वीणा कावून जायची. बोलायचे तर कुणाशी ?... तशात महाराष्ट्न् विधानसभेची निवडणूक १९७८च्या मार्चमध्ये लागली. बार्शीची जागा पन्नालाल लढवणार असे जवळपास सगळयांनी गृहीत धरले होते... बार्शीची जागा वीणाने लढवली असे इंदूताई केळकर म्हणाल्या. ते चांगले झाले असते. पन्नालालने वीणाला विचारले. ती म्हणाली, `तू काही आपल्या जुन्या कार्यकर्त्यांशी नीट बोलला नाहीस. मी लढवण्याचा विचार केला नाही. परखड बोलण्यामुळे कार्यकर्ते माझ्यावर नाराज असतात.''
वीणाताइंर्नी हा जो स्वत:च आपल्या स्पष्टवक्तेपणाचा उल्लेख केला तो कार्यकर्त्यांच्या बायकोचा वैतागाचा नव्हे, तर दु:खाचा आविष्कार असतो. मानधनावर काहीतरी कमावणारा फिरता नवरा आणि हिच्यावर सर्व कुटुंबाची पडलेली जबाबदारी यामुळे हिचा जीव कातावून जायचा. पुरुषप्रधान समाजात त्याविषयी सहानुभूती नाही की आदर. फटकळपणा ही आणखी संकटं न येऊ देणारी तटबंदी असायची का ? परखडपणामागं या एकटेपणाची टोचणी असायची का ? या बायकांची थोरवी अशी की समाजकारणात त्या पूर्ण झोकून देऊ शकत नसल्या स्वत:ला तरी अलिप्त ठेवू शकत नसत. त्यांच्याकडून अपेक्षा कोणी केल्या की त्यांना राग येई मात्र स्वयंप्रेरणेनं वाट्टेल तेवढं काम उरकत. नोकरी करणाऱ्या बायकांबाबतचा आणखी एक गैरसमज असा होता की त्या स्वयंपाकघरात कमीच असतात व त्यांना पाकक्रिया कमीपणाची वाटते. एकूणच नोकरदार महिलांबद्दलचा हा राग असे. पण कार्यकर्त्यांच्या बायकांकडून पाहुणचाराची अपेक्षा सदैव करीत राहून नंतर तिची पूर्तता झाली नाही की त्यांची बदनामी करणारे कमी नसत. कार्यकर्त्यांची सुशिक्षित, कमावती बायको म्हणून ती घरात नोकरचाकर ठेवणार असं मी तरी कुठं पाहिलं नाही. केट आणि जीन यांचं घर महालासारखं झालं तरी केटनं एकही माणूस कामाला ठेवल्याचं उदाहरण त्या कादंबरीत नाही. चंपाताई लिमये मुंबईला नोकरी करीत तर मधू लिमये दिल्ली आणि अन्यत्र. दिल्लीत मधू एकटेच राहात. त्यामुळे तेथे त्यांना मदतनीस असत. तेथील दिवसांवर चंपाताइंर्नी `स्मृतिगंध' या आत्मवृत्तात `आवो जावो घर तुम्हारा' असं एक प्रकरणच लिहिलं आहे. त्यात त्या म्हणतात, ``घरी चोवीस तास पाहुणे येत असत. सकाळच्या चहापासून रात्रीच्या जेवणापर्यंत कोण केव्हा येईल याचा नेम नसतो. कधी केलेलं जेवण सर्वांना पुरेसं नसतं. जीव थकून गेलेला असतो. कुणाचं स्वागत करायला त्राणच उरत नाही. आलेल्या माणसाचा गैरसमज होण्याचा संभव असतो. पण काय करणार ? समजूतदार पाहुणेही भेटतात आणि घरात त्या माणसांची पर्वा नसलेले नगही भेटतात... अशा या रणधुमाळीत किती लोकांचा स्वयंपाक करणार ? सकाळपासून रात्रीपर्यंत मधूच्या व इतरांच्या भेटीला येणाऱ्यांची रीघ लागलेली नुसती. काही लोक जाणून सांगत, या गडबडीत आमच्यासाठी जेवण वगैरे करू नका हं. आम्ही बाहेरच जेवू. तर या धांदलीतही `आमचं जेवण राखून ठेवा' असं सांगणारे महाभाग असत. जेवायच्या वेळी असतील त्यांना वाढून, मागून येणाऱ्यांसाठी अन्न राखून ठेवायचं म्हणजे सत्त्वपरीक्षाच होती. द्रौपदीची थाळीच मिळवायला हवी होती!... या सर्व प्रकारानं घरातल्या लोकांना किती मनस्ताप होतो याची कल्पनाही त्यांच्या मनाला शिवत नाही. त्यांच्या दृष्टीनं खासदाराच्या घरी धान्याची कोठारं, साखरेच्या गोणी आणि दारी नोकरांची पलटण उभी असावी !... माझ्या आजारपणात `बाहेर नको, आपण घरीच जेवू. मी स्वयंपाक करतो.' असं म्हणून पंख्याखाली आराम करणारे आणि आजारी स्थितीत मला स्वयंपाक करायला लावणारे एक पाहुणे होते. त्यांचा हा उद्योग पाहून माझ्यावर भडकलेले मधू मला आठवतात. `प्रकृती बरी नसताना तू लोकांचं ऐकतेस का ? असे लोक तुला पिसून काढतील. जरा तू स्पष्टपणे बोलत जा. म्हणून त्यांनी मला बजावलं.''
ब्राह्मण जातीतल्या महिलांनी ज्या ब्राह्मणेतर कार्यकर्त्यांशी लग्न केलं, त्या कार्यकर्त्यांचा सर्वनाश झाला, असा एक प्रचार खूप वर्षं केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून ते आमच्या प्रकाश शिरसट, विष्णू ढोबळे, सुंदर लटपटे यांच्यापर्यंत तो होत गेलेला आहे. काळदाते, सुराणा, सुभाष लोमटे, हुसेन दलवाई हेही त्यात आले. गंमत अशी की ज्यांचा या आरोपाशी संबंध आहे, त्यांनाच तो मान्य नाही ? तो खराही नाही. तरीही ब्राह्मण मुली कार्यकर्त्या नवऱ्याचं नातंगोतं तोडतात, त्यांच्याभोवती पाश गुंडाळतात असा गलिच्छ आरोप होत राहतोच. स्त्रियांविषयीचा जीर्णवादी दृष्टिकोन आणि ब्राह्मणद्वेष याबरोबरच संघ-काँग्रेसविरोधी कार्यकर्त्यांची बदनामी करण्यासाठी योजलेला हा एक डाव होता. तो यशस्वी झाला नाही . मात्र त्यानं नुकसान केलं.
ही अशी अन् तमाम कार्यकर्त्यांची लग्नं का झाली असतील ? झाल्यावर ती टिकली कशी असतील ? या प्रश्नाचं उत्तर `मी एस्.एम्.' मध्ये आपल्याला मिळतं. एसेम लिहितात, ``माझ्या जीवनामध्ये ताराबाइंर्ना विशेष स्थान आहे. किंबहुना मला घडविण्यामध्ये त्यांचा वाटा फार मोठा आहे. कित्येक वेळा मनात विचार येतो की माझ्यासारख्या निर्धन आणि भणंग माणसाबरोबर लग्न करायला त्या तयार तरी कशा झाल्या असतील? मला वाटते की त्याचे कारण व्यक्तिगत सुखापेक्षा गोरगरिबांच्या सुखाला मी अधिक महत्त्व देतो हे असावे. समानतेची माझी उपासना आणि स्वत:च्या सुखापेक्षा गोरगरीबांच्या सुखदु:खांना प्रथम स्थान देण्याचा अट्टहासच, माझ्यापेक्षा सधन कुटुंबामध्ये लाडात वाढलेल्या मुलीला आकर्षक वाटला असावा. विरुद्ध टोके परस्परांकडे ओढ घेतात हा तर सृष्टिनियमच आहे... पण त्यातूनच दु:खाची मालिका तयार होत जाते... तुमच्या कुंडलीत श्रमपरिहार नाही' असे म्हणून ताराबाई माझी चेष्टा करीत. तेव्हा आपल्या सार्वजनिकपणामुळे ताराबाइंर्ना किती त्रास सहन करावा लागतो हे मनात येऊन, अनेकदा मी खट्टू झालेलो आहे. पण कधी कधी असे घडले की माझ्या आधी घरी, कोणीही येऊन बसलेले नव्हते. ताराबाईच येऊन हसतमुखाने दरवाजा उघडतात आणि आलं घातलेला चविष्ट चहा काही मिनिटांत पुढे आणून ठेवतात. ते क्षण अविस्मरणीय गोडीचे... मी ताराबाइंर्ना नेहमी म्हणतो की, आपण जमीनजुमला घेऊ शकलो नसलो तरी आपली दौलत म्हणजे आपली मुले चांगली निघाली आहेत.''
तर गाडी `अॅडव्हर्सरी इन दी हाऊस'वरून `दि हाऊस विदिन दी हाऊस' इथवर आली. कार्यकर्ते व त्यांच्या बायका आजही आहेत, पुढंही असतील. परंतु त्यांच्यावर अशा वातावरणात जगावं लागण्याची शक्यता कमी. शिवसेना, भाजप, रिपब्लिकन काँग्रेस, राष्ट्न्वादी काँग्रेस आदींच्या कार्यकर्त्यांवर पूर्वीसारखी नैतिक , आर्थिक, चारित्र्यविषयक, राहणीविषयक बंधनं अन् शैलीचं दडपण आहे का मला माहीत नाही. राजकारण सेवेपेक्षा व्यवसाय-धंदा यामध्ये बदलून गेलं आहे. त्याग, समर्पण, निष्ठा, बांधीलकी यांचे संदर्भ व अंमलबजावणी पालटून गेली आहे. तरीही स्त्रियांची परिस्थिती थोडीफार बदललेल्या काळात कार्यकर्त्यांच्या बायका कशा राहत असतील हे समजून घेण्यात मलाही उत्सुकता आहे. बदलत्या वातावरणात त्यांनाही खडूस, कंजूष, आत्मकेंद्री, नवऱ्याचा घात करणारी आदी विशेषणं बहाल केली जात आहेत का, हे सर्वांना कळलं पाहिजे.

gucci outlet

Business signs up for louis vuitton outlet dispatch (reporter Sun Zhe) equity invests fund (the following abbreviation " PE fund " ) will not get henceforth secure redound to investor acceptance, in the meantime, still must not draw fund with the means of creditor's rights. Yesterday, national hair changes appoint released industry of first national PE to administer a standard, superintend to PE industry make series a certain number of perfecting, the solid chaos louis vuitton outlet stores that the sword points to to the name with PE collects money illegally all right is resembled.

This one is " the announcement that develops about promoting equity to invest industry standard " (the following abbreviation " announcement " ) regulation, PE fund is when capital collect, capital collect person must announce adequately to investor investment risk and potential loss, must not ensure to investor louis vuitton outlet online acceptance disinvestment capital or win fixed get one's own back. In the meantime, hair change appoint the information exposure that still expresses to will augment PE fund. Before this, hair change appoint ever had published similar local PE industry to superintend a standard, the enterprise visitting town such as active countrywide PE Beijing, Zhejiang is brought into superintend. But will superintend this enlarge authentic louis vuitton outlet countrywide limits, still belong to first.

Basis " announcement " , this one standard is carried out formally from November 21. Orgnaization of investment of equity of collect of the illicit before this is cruel grow, collect money illegally and national standard is short of break be considered as this second " announcement " the immediate cause that come on stage.

Since IPO restarted 2009, PE louis vuitton outlet store online industry grows quickly, but because lack the inspect body of uniform standard all the time,be, the elephant of PE industry chaos that is a delegate with collecting money illegally is fascicular. It is with Tianjin exemple, invest fund supreme headquarters as the equity that draws countrywide fund, tianjin attracted many PE fund to come here because of its favourable policy register, but subsequently and louis vuitton 2012 the dispute law that come collects money to erupt of the case centrally. Relevant data shows, was in Tianjin only this year in May one ground, what tens of homes are a name with PE fund is suspected of collecting money illegally to the orgnaization is louis vuitton outlets accepting investigation or already was investigated by put on record.

In addition, be worth what carry is, do not get affirmatory and fixed get one's own back besides requirement PE enterprise outside, this " announcement " the form that still provided equity investor to be able to identify capture with capital only is contributive. Industry thinks, from hair change appoint " announcement " in light louis vuitton wallets of, although government of industry of first national PE is normative the sense that come on stage is great, but actually the core problem to industry of a lot of PE, this standard did not give clear.

With PE enterprise most the profit pattern of core is louis vuitton speedy example, what invest pattern of profit of fund management company to differ with domestic negotiable security is, major PE company is not to pass the means to investor collection administration fee to come gain, however more passing cent of gain of collection project investment is maintained into mode manage, this kind of mode although PE enterprise oneself is very happy with it, but get all the time however academic gucci outlet assail. Accordingly, the profit pattern of PE enterprise is not clear, even can weighs a disorder, this also is PE industry urgently another normative serious core problem. Do not have friendly intercourse " announcement " in light of, superintendency layer did not give out to the profit pattern of PE enterprise clear view. Accordingly, as PE industry ceaseless development expands, the superintendency of this gucci outlet industry still needs to be perfected ceaselessly.

(Article origin: Beijing business newspaper)jingruibmq

मानवजातीने आपल्यापुरते

मानवजातीने आपल्यापुरते पाहण्याचे जरी ठरवले तरी तिचे भवितव्य माकडांना जर बागेत सोडले तर ती जशी नासधूस करतात तसेच असेल. आपण माकडांचे वंशज. पण अक्कल ही तेवढीच किंवा किंचित कमीदेखील म्हणता येईल. कारण माकडे शस्त्रास्त्रांचे कारखाने, अणुऊर्जा, पैसे, वाहने, सिनेमे, नाटके, ध्वनिक्षेपके, युद्धे, महायुद्धे, दहशतवाद, वेश्याव्यवसाय, स्त्रीभ्रूणहत्या, प्राण्यांवर केलेले शास्त्रीय प्रयोग, धर्म, जाती, लग्ने, उत्सव, समारंभ, पारितोषिक वितरणे, कपडे, फॅशन्स, व्यवसाय, कंम्प्युटर, टेलिफोन, हेल्थक्लब इत्यादी गोष्टीतली एकदेखील गोष्ट करीत नाहीत. पण म्हणून ते जास्त नैसर्गिक आणि आपण कमी असे नाही, फक्त आपण जास्त मूर्ख एवढेच gmat practice test gre practice test lsat practice test act practice test buy google plus ones sat practice test cdl practice test cfa practice exam pmp practice exam usmle practice test