एकेका पेशाबद्दल आपल्या मनात काही चित्रे असतात. चित्रकार किंवा कवी म्हणजे हनुवटीवर दाढी, शबनम... पर्यटन व्यवसायातल्या मुली ट्नउजर-शर्ट, अभिनेत्री म्हणजे फॅशनेबल कपडे आणि मेकअपने रंगलेला चेहरा...
`समाजसेविका' म्हटलं की डोळयांपुढे गंभीर, विचारी चेहरा येतो.... समाजाविषयी काळजीनं भरलेला.
`उज्ज्वला परांजपेला' भेटले, आणि ठरवलं की अशी चित्रं मुळीच रंगवायची नाहीत, जी चुकण्याची शक्यता असते. कडेवर एक, बोटाशी एक आणि अवतीभवती एक दोन मुलं आणि त्याचवेळेस दुसरीच्या कडेवरच्या बाळाशी लाडेलाडे गप्पा... उज्ज्वलाला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा ती इतकी `लेकुरवाळी' होती.
सांगलीला गावापासून जरा दूर एक टुमदार इमारत आहे. एक ऑफिसची खोली, बाहेर स्वागतकक्ष, आत पाहुण्यांच्या निवासाला सोईस्कर सुसज्ज खोली. आणि आतली संपूर्ण जागा लहान मुलांसाठीची.
मध्ये हिरवळ लावलेला चौक आणि तीनही बाजूंनी मुलांसाठी खोल्या, स्वयंपाकघर, जेवणघर, खेळघर...
आईवडील नसलेल्या.. (अनाथ नव्हेत कारण त्यांना प्रेम देणाऱ्या उज्ज्वला आणि तिच्या सहकारी आहेत) पन्नास मुलांची इथे सोय होऊ शकते.
मुलांच्या राहण्याची व्यवस्था त्यांच्या वयोमानानुसार केली जाते. नुकती जन्मलेली मुलं पहिला महिनाभर एका वेगळया खोलीत विशेष देखरेखीखाली ठेवली जातात.
नंतरचा टप्पा एक महिना ते चार महिन्याच्या बाळांचा.... या खोलीत बाळांसाठी छोटे पाळणे, सांभाळायला जास्त दाया.. असा सरंजाम. चार महिन्यानंतर बाळं पुढे सरकायला लागतात, बसायचा प्रयत्न करतात, जास्त चळवळ करू पाहतात, अशी एक वर्षांपर्यंतची मुलं वेगळया खोलीत.
एक वर्ष ते तीन वर्षांची मुलं एकत्र आणि तीन ते सहाची. अशा एकूण पाच खोल्या मुलांसाठी आहेत. त्याशिवाय अगदी तान्ह्या, तब्येतीनं अति नाजुक (बरीच मुलं आईनं गुपचूप सोडलेली असल्यानं त्यांची काळजी घेतली गेलेली नसते, तशीच त्यांच्या आयांचीही गरोदरपणात आबाळच झालेली असते) बाळांसाठी `अतिदक्षता' घेण्याची खोलीही आहे.
लहान मुलांसाठीच्या या देखण्या इमारतीचं नाव `कर्ण भारतीय समाज सेवा केंद्र'. या केंद्राच्या संचालिका आहेत उज्ज्वला परांजपे.
समाजाला नको असलेल्या मुलांची जबाबदारी घेऊन, ज्यांना मुलं हवी आहेत अशा कुटुंबांना ती दत्तक द्यायची, हे या संस्थेचं व्रत. नुकत्या जन्मलेल्या बाळापासून सहा वर्षांपर्यंतची मुलं इथे सांभाळली जातात.
उज्ज्वला आणि तिच्या सहकारी, या मुलांची काळजी घेतात. जोजवतात, झोपवतात, भरवतात, रागावतात आणि त्यांच्याशी मस्तीही करतात.
उज्ज्वला मूळची पुण्याची. अहिल्यादेवी शाळेची आणि बी.एम.सी.सी. ची विद्यार्थिनी.
कॉलेजमध्ये असताना तिनं सर्वसाधारण मुलांसारखं `फक्त अभ्यास आणि मजा' यातच अडकवून घेतलं नाही. म्हणजे हेही केलंच, पण त्यापलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकीचाही विचार केला. स्त्रीवादी चळवळीत काम केलं. एन. एस. एस. मार्फत काम केलं. अनेक क्रॅम्पस् मध्ये तिचा सहभाग होता.
पालीजवळ पडसरे गावात एन.एस.एस. च्या माध्यमातून
मत्रशाळा प्रकल्प राबवला जाई. दुर्गम भागातल्या आदिवासी मुलांना शिक्षण घेताना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. पावसाळयात भात लावणीच्या वेळेस पालक मुलांना शाळेत न पाठवता त्यांच्याकडून काम करवून घेतात. त्यामुळे शाळा बुडते. वर्गाला अभ्यास पुढे जातो. दीर्घ गैरहजेरीनंतर वर्गात आलेल्या मुलांना, मास्तर काय शिकवतात ते कळत नाही. मुलं मग मास्तरांच्या शिकवण्याला कंटाळतात असं विचित्र चक्र सुरू राहतं. अशा मुलांचा बुडलेला अभ्यास भरून काढण्यासाठी `मित्रशाळा प्रकल्प'. उज्ज्वलानं जवळजवळ तीन वर्षं या आदिवासी भागात जाऊन मित्रशाळा प्रकल्पात काम केलं. पदवी घेईपर्यंत `समाजासाठी काहीतरी करायचं' हा विचार पक्का झालेला होता. जर तेच काम करायचंय तर त्याच विषयातलं पदव्युत्तर शिक्षण घ्यावं म्हणून कर्वे संस्थेतून एम.एस. डब्ल्यू. पूर्ण केलं. एम.एस. डब्ल्यू. शिकायला येणारे नोकरी मिळवण्याच्या हेतूनं आलेले असतात, उज्ज्वलाचा हेतू केवळ तेवढाच नव्हता. तिला प्रत्यक्ष काम करण्यात रस होता.
पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर, नेमकं काय करायचं याचा शोध घेण्यात थोडा वेळ गेला. अंधश्रद्धा निर्मूलन परिषदेत काम केलं. पथनाट्यात भाग घेतला, संघटक म्हणून काम केलं.
वर्षभर निर्मलाताई पुरंदरेंबरोबर `वनस्थळी' मध्ये काम केलं. त्या कामातून खूप काही शिकता आलं. ग्रामीण भागात जिथे सरकारी बालवाड्या पोचू शकत नाहीत त्या दुर्गम भागात बालवाड्या सुरू करायच्या, लहान मुलांना कसं शिकवायचं त्याचं शिक्षण अंगणवाडी सेविकांना द्यायचं, अशा प्रकल्पांमध्ये उज्ज्वलानं काम केलं. त्यानिमित्ताने ग्रामीण भागात फिरून तिथली परिस्थिती जाणून घेण्याची संधी मिळाली. अशी विविध स्वरूपाची सामाजिक कामं करताना व्यावसायिक सामाजिक कार्येकर्ते आणि कुठलंही औपचारिक शिक्षण न घेता झोकून देऊन स्वेच्छेनं सामाजिक काम करणारे कार्यकर्ते यांच्यातल्या कार्यपद्धतीचा अभ्यास उज्ज्वलानं केला. वेगवेगळी कामं करताना, त्या त्या टप्प्यावर आनंद मिळत होता, शिकायला मिळत होतं, अनुभव मिळत होता, पण संपूर्ण समाधान मात्र नव्हतं.
त्याच सुमारास एका प्रकल्पामध्ये काम करण्याची संधी मिळाली. कुमारी मातांच्या प्रश्नावर अभ्यास करण्याचा त्यांचा उद्देश होता. कुमारी मातांवर आपल्या पोटच्या गोळयाचा त्याग करण्याची वेळ का येते? त्या मुलांचं आणि त्यांच्या मातांचं एकत्र पुनर्वसन करणं शक्य आहे का? कशा स्वरूपाचं पुनर्वसन करता येईल अशा प्रकारचा अभ्यास करण्यासाठी आणि पुनर्वसन करण्यासाठी दोन वर्षांचं र्षीपवळपस मिळालं होतं. पण तो प्रकल्प नीटसा तडीस गेला नाही. दोन वर्षांत अवघ्या दोन कुमारी माता मदत घेण्यासाठी तयार झाल्या. त्या दोन वर्षांत अनेक अनुभव उज्ज्वलाच्या गाठी जमा झाले. तरुण मुलं मुली प्रेमात पडतात, प्रेमात पडताना त्यांनी कोणता विचार (की अविचार) केलेला असतो, परिस्थितीची जाणीव कशी नसते, शरीराच्या मागणीला प्रतिसाद कसा दिला जातो, कधीकधी `आपण शरीर दिलं नाही तर तो प्रेमिक आपल्याला सोडून जाईल या भीतीपोटी तरुणी शरीरसंबंधाला तयार होते' तर कधी परिस्थितीत वाहवून जायला होतं. शरीराचं आकर्षण एवढं जोरदार असतं की पुढचा विचार त्याक्षणी मनातही येत नाही. कधी तो तरुण लग्नाची वचनं देतो आणि हवं ते मिळवतो. शरीरसंबंधानंतर त्या मुलीला दिवस गेले की दोघंही एकदम भानावर येतात. गर्भपात शक्य नसेल तर कुठेतरी लांब जाऊन लपूनछपून बाळंतपण उरकलं जातं आणि तान्ह्या बाळाला सोडून दिलं जातं. त्या सगळया प्रक्रियेत `यातून बाहेर पडणं' एवढंच उद्दिष्ट असतं आणि कदाचित त्यामुळेच तो प्रकल्प कागदोपत्री चांगला वाटत असला तरी सफल झाला नाही.
असे प्रकल्प अनेक असतात, परदेशी संस्थांकडून आर्थिक मदतही मिळत असते, पण या प्रकल्पात काम करण्याचं समाधान उज्ज्वलाला हळूहळू मिळेनासं झालं.
प्रोजेक्ट रिपोर्ट लिहा, काय काय केलं, त्यातून कोणती माहिती मिळाली, असं पद्धतशीर काम केलं तरी त्यातून फारसं काही हाती लागत नाही, त्याचा थेट उपयोग होत नाही, असं उज्ज्वलाला वाटू लागलं.
तो काळ थोडा अस्वस्थतेचा, नेमकं काय करायचं त्याची दिशा सापडत नसण्याचा होता.
सामाजिक काम एका विशिष्ट निष्ठेनं करण्याची इच्छा असणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांमध्ये ही भावना कधी ना कधी डोकं वर काढत असतेच. कार्यकर्ते अशा विचारांबाबत आपापसात चर्चा करतात, मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यातून काहींशी मैत्री होते, कुणाशी प्रेम जमतं.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीत काम करणाऱ्या डॉ. प्रदीप पाटील यांच्याशी अशीच कामातून ओळख झाली. पुढे मैत्री आणि नंतर प्रेम... १९९२ मध्ये लग्न करून पुणेकर उज्ज्वलानं सांगलीत पाऊल ठेवलं.
डॉ. प्रदीप पाटील यांचा पहिल्या घटस्फोटानंतरचा हा पुनर्विवाह होता पण
घरातल्या सर्वांचा या लग्नाला पुरेसा पाठिंबा होता.
नवं गाव, नवीन वातावरण, वैवाहिक जीवन यात सरावण्यासाठी थोडा वेळ गेला, पण नंतर लगेचच सामाजिक कामाची ऊर्मी उज्ज्वलाला गप्प बसू देईना.
त्याच सुमारास मीना सेशू यांच्या संग्राम या संस्थेत कामाची संधी उपलब्ध झाली. एच. आय. व्ही. एड्सबाधित महिलांसाठी ही संस्था काम करायची. उज्ज्वलानं एच. आय. व्ही. विषयी माहिती करून घेतली आणि त्यानंतरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. एच. आय. व्ही. बाधित महिलांची संख्या मुंबईत सर्वाधिक आहे. त्याखालोखाल नंबर लागतो सांगली जिल्ह्याचा. ही गोष्ट १४/१५ वर्षापूर्वीची. या रोगाचा शिकार होण्याचं दुर्दैव वाट्याला येतं ते जास्त करून देहविक्रय करणाऱ्या बायकांच्या. त्यावेळेस जवळजवळ पाचशे बायका हा धंदा करायच्या. या बायांचे जास्तीतजास्त गिऱ्हाईक हे दिवसेंदिवस, महिनोंमहिने घराबाहेर राहणारे ट्न्कड्नयव्हर. हायवेवर ट्न्क्सची वाहतूक मोठी, साहजिकच गावात जिथेजिथे हायवेला मिळणारे भाग असतात तिथे आडोशाला किंवा चक्क ट्न्क्समध्ये हा धंदा चालतो. सांगलीहून सातारा, सोलापूर, कोल्हापूर, बेळगाव, उस्मानाबाद अशा ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यांवरचे चौक म्हणजे सर्रास धंदा चालणारी महत्त्वाची ठिकाणं.
अशा चौकाचौकात थांबून ट्न्कचालकांना एडस्बद्दल माहिती देणं, बायका शोधून त्यांना माहिती देणं, कंडोम वापरण्याचा आग्रह धरा असं सांगणं, अशी कामं उज्ज्वलानं त्या काळात `संग्राम' मार्फत केली. `सुरक्षित संबंध' हा विषय ट्न्कचालकाशी बोलणं, म्हणजे फार अवघड गोष्ट. ते चालक टिंगलटवाळया करत, उघडउघड बीभत्स बोलत, पण त्याकडे दुर्लक्ष करून मुद्दा त्यांच्या गळी उतरवावा लागे.
बायकांना `सुरक्षित संबंधा'चं महत्त्व पटे, पण त्यांना वाटे की पुरुषांना कंडोम वापरणं आवडत नाही आणि आपण हट्ट धरला तर गिऱ्हाईक दुसरीकडे जाईल.
म्हणून मग अशा बायकांची संघटना बांधायचा निर्णय झाला. सगळया बायकांना शोधून एकत्र करायचं, त्या सगळयांना एकत्रितपणे माहिती देऊन, कंडोम वापरण्याचा आग्रह करा असं सांगायचं ठरलं. सामाजिक काम करताना कागदावरचे निर्णय घेणं सोपं, पण प्रत्यक्ष त्यांची अंमलबजावणी ही महाअवघड बाब असते.
या धंदा करणाऱ्या बायकांना एकत्र आणणं असंच त्रासाचं होतं. कारणं अनेक. या बायका वेगवेगळया ठिकाणी धंदा करणाऱ्या.. वेळा वेगळया, बहुतेक धंदा रात्रीच्या अंधारातला... दिवसाचा वेळ मुख्यत्वे झोप आणि घरकामासाठीचा. राहण्याच्या जागा निरनिराळया, सगळयांना एकत्र एका जागी आणणं महामुष्किल.
पण उज्ज्वला आणि तिच्या सहकाऱ्यांनी अशी संघटना बांधली. सर्व स्त्रियांनी`कंडोमशिवाय संबंधाला होकार देणार नाही' असं एकमतानं ठरवलं. कारण त्याशिवाय हे काम होऊ शकणारं नव्हतं. हिंदी चित्रपटातल्या नायिका जसं देहप्रदर्शनाबाबत म्हणतात की `मी नाही केलं तर कुणी दुसरी करेल. तिला काम, पैसा मिळेल आणि मी मात्र इंडस्ट्नीबाहेर फेकली जाईन.'
तसंच या बायकांना असुरक्षित वाटू शकलं असतं की मी कंडोम वापर म्हणाले तर गिऱ्हाईक दुसरीकडे जाईल. जर कुठलीच बाई कंडोमशिवाय तयार झाली नाही तरच प्रत्येकीला धंदा मिळेल. हे सर्वांना पटलं, संघटना बांधण्याचं उद्दिष्ट पूर्ण झालं. त्यानंतरचा टप्पा कंडोम मिळवून ते बायकांना फुकट किंवा अतिशय स्वस्तात उपलब्ध करून देणं. शासनाकडून कंडोम मिळवून वाटणं.
या कामातही खूप अडथळे होते. सरकारी कंडोमना भोकं असायची. गैरव्यवहार, भ्रष्टाचार जवळून दिसायचा. एकीकडे सुरक्षिततेचं महत्त्व पटवून देण्याचं काम, दुसरीकडे एच. आय. व्ही. एड्सबाधित बायकांवर औषधोपचाराचं काम. अशा स्त्रियांना दवाखान्यात दाखल करून घेण्यासाठीसुद्धा अनेक खटपटी कराव्या लागत. त्यांना हात लावायला डॉक्टर, नर्स कुणी तयार व्हायचं नाही. संघटना बांधल्याचा खरा फायदा अशा आजारी बायकांच्या सुश्रुषेच्या वेळेस व्हायचा.
सहसा अशा धंदेवाईक बायकांना घरदार नसतं. तरुणपणी निभतं, पण आजारी झाल्यावर सेवेला कोण? संघटनेतल्या इतर बायका एकमेकींना आधार देऊ करायच्या. उज्ज्वलाचा रोजचा दिवस अशा बायकांबरोबर... त्यांची जगण्याची तऱ्हा, अडचणी, आर्थिक तंगी, दुखणी-बाणी हेच विचार सतत सोबतीला.
लग्नानंतरचे नव्या नवलाईचे दिवस खरं तर ढगांवर स्वार होण्याचे... हिंडण्याफिरण्याचे, एकमेकांना समजून घेण्याचे.... त्या दिवसात उज्ज्वला अक्षरश: रात्रंदिवस अशा बायकांबरोबर असे... रात्रंदिवस म्हणण्याचं कारण त्यांचं काम मुख्यत्वे रात्रीचं आणि त्यामुळे त्यांच्यावर संकटं येण्याची वेळही रात्रीचीच आणि त्या हिच्याकडेच धाव घेणार हे ओघानंच आलेलं....
`नवराबायकोच्या नात्यावर याचा परिणाम नाही का झाला?' मनात स्वाभाविकपणे आलेला प्रश्न मी विचारू की नको, असा विचार करत अखेर विचारून टाकला.
``व्हायचा की गं. स्वाभाविकच नाही का ते? त्या बायकांची
ती जीवघेणी दुखणी, दवाखान्यातलं त्यांचं ते असहाय्य रूप... रोगाचं भीषण स्वरूप... बघून मनाची नुसती घालमेल व्हायची. त्या बायकांसाठी जीव तुटायचा, त्यांचं असहाय्यपण बघून गलबलायला व्हायचं, ज्या समाजानं त्यांची ही अवस्था केली त्याविषयी संताप यायचा... या बिचाऱ्या भोगतात आणि आपण सुखात राहतोय याचा किंचित अपराधीपणा यायचा.... अनेक भावनांचं मिश्रण असायचं, खूप त्रास व्हायचा सगळयाचा''. उज्ज्वला मोकळेपणानं सांगते.
त्रास होतो म्हणून काम नको असं तिला वाटलं नाही पण आपल्या कामानं कोणताच फरक होत नसेल तर त्या कामाचा काय उपयोग? सगळं त्याच पद्धतीनं सुरूच राहतं... बायकांचा धंदा, त्यांना होणारे रोग आणि अखेर मृत्यू.... आपण काहीही बदलू शकत नाही या विचारानं नैराश्य येऊ लागलं आणि दुसरं एखादं सकारात्मक काम करण्यासाठी `संग्राम'मधून बाहेर पडण्याचा निर्णय उज्ज्वलानं घेतला. ते वर्ष होतं १९९८.
वेश्यांमध्ये काम करताना त्यांच्या मुलांचे प्रश्नही समोर यायचे. एच. आय. व्ही. एड्स बाधित बायकांची मुलं पोरकी झाल्यावर त्यांना पुण्यात संस्थेत पाठवणं हेही एक महत्त्वाचं काम होतं.
चंदा नावाच्या एका बाईची हकीकत उज्ज्वला सांगते. त्या चंदाला रोगानं शिकार केलं. तिला दवाखान्यात दाखल करावं लागलं. ती अखेरच्या घटका मोजत होती. तिला दोन छोटी मुलं होती. आता आईला दवाखान्यात ठेवल्यावर त्या मुलांचं काय? ती मुलं उज्ज्वलानं स्वत:च्या घरी आणली.
`बिचारी शहाणी होती गं मुलं. त्यातली मोठी, जी स्वत:च जेमतेम पाच सहा वर्षांची होती, ती तिच्या धाकट्या भावाची काळजी घ्यायची. काहीही खायला प्यायला द्या, कुठेही झोपायला सांगा, बिचारी चुपचाप ऐकायची. त्यांचं पोरकेपण बघून काळजात तुटायचं, पण करणार काय? त्यांची आई-चंदा जिवंत असेपर्यंत ती मुलं माझ्याकडे राहिली, नंतर कायद्यानुसार त्यांची रवानगी संस्थेत करावी लागली.'' त्या दोन मुलांबद्दल सांगताना उज्ज्वला म्हणाली की अशी अनेक मुलं तिच्या घरात राहून पुढे संस्थेत गेली.
धंदा करणाऱ्या बायकांसाठी काम करता करता त्यांच्या मुलांचा प्रश्न असा समोर आला आणि बायकांमधलं काम संपवलं तेव्हाच अशा पोरक्या मुलांसाठी काहीतरी करण्याच्या इच्छेचं बीज पडलं.
समविचारी कार्यकर्त्यांबरोबर सतत चर्चा सुरू होत्याच. सांगलीमध्ये लहान अनाथ मुलांसाठी संस्था काढावी असा विचार बोलण्यात आला. त्याचा पाठपुरावा सुरू झाला.
डॉ. करमरकर, भावे अशा सहकाऱ्यांबरोबर संस्था कशी असावी त्याचे आराखडे तयार करण्याचं काम सुरू झालं. पुण्यातल्या अनेक संस्थांना भेटी देऊन त्यांचं काम कसं चालतं त्याची माहिती घेतली.
अनेक संस्थांबरोबर कामाच्या स्वरूपाविषयी, आर्थिक तरतुदींविषयी सखोल चर्चा झाल्या आणि `भारतीय समाज सेवा केंद्राची' शाखा सांगली येथे सुरू करावी असा ठराव झाला.
सांगलीला एक ऑफिस आधी सुरू केलं, त्यानंतर आर्थिक गरजांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न सुरू झाले.
स्थानिकांकडून देणग्या, एका मुलाच्या पालनपोषणाचा खर्च मिळवणं, जागेची तजवीज, अशा अनेक पातळयांवरचं काम होतं. एका वृद्धाश्रमाच्या जागेत पहिली तीन वर्षे हे काम सुरू होतं. ज्यांना पालक नाहीत, अशा मुलांचं संगोपन करण्यासाठी सरकारी परवाना लागतो, तो परवाना मिळवला.
अशा मुलांचा थोडा काळ सांभाळ करून नंतर त्या मुलांना दत्तक द्यायचं, असं संस्थेचं काम. दत्तक देण्यासाठीही परवान्यांची आवश्यकता असते, तोही परवाना मिळवला. संस्था रीतसर सुरू झाली. अद्याप स्वत:ची जागा नव्हती. मा. नितीन करीर जिल्हाधिकारी असताना उज्ज्वला त्यांना भेटली आणि संस्थेसाठी जागा हवी असल्याचा अर्ज केला. त्यापुढे सचिवालयापर्यंत पाठपुरावा करावा लागला. मा. जयंत पाटील यांनी जातीनं लक्ष घातलं आणि अकरा हजार चौ. फुटाची जागा मंजूर झाली.
जागा मिळाली. अर्धी लढाई जिंकली. पुढचा भाग इमारतीच्या बांधकामाचा. पुन्हा देणग्या गोळा करायचं काम. चांगल्या कामासाठी पैसे कमी पडत नाहीत असा सार्वत्रिक अनुभव उज्ज्वलालाही आला. जागा मिळाल्यापासून वर्षभराच्या अवधीत सहा हजार चौ. फुटाची टुमदार, मुलांना नजरेसमोर ठेवून बांधलेली देखणी वास्तू उभी राहिली. निशा, वृंदा, अंजना, छाया, सुवर्णा सह एकूण १३ जण इथे काम करतात. आया, नर्सेस, समुपदेशक सगळयाच इथल्या मुलांची पोटच्या पोरांसारखी काळजी घेतात. प्रत्येक खोलीला स्वच्छतागृहाची सोय आहे. खोल्या हवेशीर, भरपूर उजेड असणाऱ्या... पाळणे, खेळणी, थोड्या मोठ्या मुलांसाठी बेबी कॉट्स, स्वच्छ मेणकापडं... चादरी.... पांघरुणं..... आतल्या रॅक्सवर मुलांची नावं लिहिलेले कप्पे, त्यात प्रत्येकाचे कपडे वेगळे ठेवलेले.... सगळा व्यवस्थित, शिस्तशीर कारभार. मुलांना सांभाळणाऱ्या आया मुलांशी गप्पा मारताहेत, त्यांना अंघोळी घालताहेत, दुधाच्या बाटल्या स्वच्छ करताहेत असं दृश्य. स्वच्छ नीटनेटकं स्वयंपाकघर. सगळीकडची स्वच्छता विशेष वाखाणण्यासारखी.
अनाथ मुलांची संस्था, पण जराही कारुण्यपूर्ण वातावरण नाही.
मुलं छान खेळताहेत, हट्ट करताहेत असा उबदार भवताल. संस्थेतली बहुतेक मुलं बेवारस स्थितीत सोडलेली. नकोशी असल्यानं गर्भात पुरेसं पोषण न झालेली. साहजिकच अशा अशक्त मुलांकडे जास्त लक्ष द्यावं लागतं, ते इथे दिलं जातंही. ५/६ महिन्यांपर्यंत मूल हळूहळू बाळसं धरतं. ज्यांच्या पोटी मूल नाही किंवा एक असताना दुसरं दत्तक घेण्याची इच्छा आहे, असे पालक इथे येऊन बाळ घेऊन जातात. तीन महिन्यानंतरचं बाळ दत्तक दिलं जातं.
उज्ज्वलाचं निरीक्षण असं की सर्वांना निर्व्यंग मूल हवं असतं. परदेशात मात्र सामाजिक बांधिलकी मानून स्वत:च्या मुलांबरोबर एखादं व्यंग असलेलं मूलही दत्तक घेतलं जातं. या संस्थेत एक ओठ फाटका असल्याचं छोटं व्यंग असलेलं बाळ होतं. अर्थात संस्थेतर्फे शस्त्रक्रियेनं तो फाटलेला ओठ शिवला होता. त्या बाळालाही एका जोडप्यानं दत्तक घेतलं, ही आठवण उज्ज्वलाला समाधान देणारी. दत्तक घेऊन आपल्या जीवनात आनंद निर्माण करावा, ही भावना वाढीला लागल्याचं जाणवतं, असं तिचं सांगणं. पूर्वी मालमत्तेच्या वारसासाठी नात्यातल्याच एखाद्या मुलाला दत्तक घेतलं जाई. आता एखाद्या अनाथ मुलाला प्रेम द्यावं, मुलीचं पालक व्हावं, असा दृष्टिकोन दिसतो. संस्थेतून मुली दत्तक जाण्याचं प्रमाणही मोठं आहे. आत्तापर्यंत दोनशे पंचवीस मुलांना हक्काचं घर आणि तेवढ्याच कुटुंबांना बाळाच्या आगमनाचा आनंद मिळालेला आहे.
आटपाडी- विटा - इस्लामपूर- कवठेमहांकाळ अशा ग्रामीण भागातूनही दत्तक घ्यायला पालक येतात, हे चित्र फारच आशादायक वाटतं.
उज्ज्वलाशी तिच्या सहकाऱ्यांशी बोलणं, त्यांचं मुलांबरोबरचं वागणं, लाडंलाडं बोलणं ऐकणं हा एक छान अनुभव होता. आम्ही जवळपास अख्खा दिवस तिथे होतो. अवतीभवती एवढी लहान मुलं, कुणी रांगतंय, कुणी झोपलंय, कुणी कडेवर घे म्हणून हट्ट धरतंय, कुणी दुधात साय आली गाळून दे म्हणतंय आणि वृषाली त्यांना दूध गाळून देतेय.... स्वयंपाकघरात एवढ्या मुलांसाठी वरणभात, कमी तिखट मसाल्याची भाजी बनतेय.... कुणाला आत्ता जेवण नकोय तर कुणाला आत्ताच्या आत्ता पुस्तकातलं चित्र बघायचंय.....
उज्ज्वलाचं लक्ष प्रत्येकाकडे. आमच्या जेवण्याच्या वेळेलाच काय ती शांत बसली असेल, एरवी दर पाच मिनिटांनी तिची पळापळ.. .कुणी कांदेबटाट्याची पोती पाठवतं, कुणी शिधा देतं, कुणी रोख तर कुणी कपडे-खेळणी...
या साऱ्यांबद्दल तिच्या मनात कृतज्ञता आहे. ``आमच्याकडे द्रौपदीची थाळी आहे'', ती हसत सांगते.
सतत हसणं, भरपूर गप्पा मारणं हा तिचा स्थायिभाव. `आपण दोघी पुण्याच्या ए-जा म्हणू बरं का', तिनं आग्रहानं सांगितलं आणि एकदम मैत्रीच वस्तीला आली.
या एवढ्या प्रचंड व्यापात घरचं कसं सांभाळतेस विचारल्यावर पुन्हा हसली. `जमवायचं की जमतं सगळं' हे उत्तर. इतक्या मुलांचं संगोपन करताना `स्वत: जन्म दिला तरच आई होता येतं असं नसतं गं' हे तिचं वाक्य ऐकलं आणि मनातल्या मनात तिला नमस्कार केला कारण उघडपणे तिनं करू दिला नसता. इथे काम करताना माझ्या `मातृत्वाच्या संकल्पनाच बदलल्या' असं ती अचानक गांभीर्याने म्हणून जाते. या मुलांनी माझ्या जगण्याला सुंदर अर्थ दिला.... असं म्हणताम्हणता तिच्या लक्षात येतं, अरे ! आपण चक्क तत्त्वज्ञान बोलतोय....
मग लगेच ती विषय बदलते. मुलांच्या स्नेहसंमेलनाच्या वेळी काढलेली छायाचित्रं दाखवते.... मिनिटामिनिटाला हसते, घाईगडबडीने मुलांकडे लक्ष ठेवून येते, शंभरदा वाजणाऱ्या फोनवर बोलते, आजूबाजूचं वातावरण चैतन्यानं भरून टाकते आणि मला म्हणते, ``तू मला एवढे प्रश्न विचारते आहेस, तू पडलीस लेखक लिहिणार बिहिणार असशील तर मला देवत्व वगैरे देऊ नकोस बरं.... साधं, माहितीपूर्ण लिही.'' मी सांगते, ``लिहिणार तर नक्की. माझ्या मैत्रिणीच्या इतक्या छान सामाजिक कामाबद्दल न लिहिता गप्प कसं बसवेल? आणि काम इतकं देखणं आहे की साधं लिहिलं तरी वाचकांना नक्की भावेल.'' तसं भावलं आणि त्या कामात कोणत्याही प्रकारे सहभागी व्हावं वाटलं तर स्वागत.
- संपर्काचा पत्ता - कर्ण भारतीय समाज सेवा केंद्र,
घन:श्याम नगर, माधवनगर रोड, सांगली ४१६४१६
फोन : (०२३३) २३१४६३९
- नीलिमा बोरवणकर
११, मधुबन, बी अपार्टमेंट,
गणेशनगर, पुणे ५२.
Posted in



Broncos Manning Jersey
Nike Bernard Pollard Jersey Nike Chris Canty Jersey Nike Torrey Smith Jersey Nike Charles Tillman Jersey Nike Visanthe Shiancoe Jersey Nike Devin Aromashodu Jersey Nike Glenn Dorsey Jersey Nike Jarrett Bush Jersey Nike Jonathan Vilma Jersey Nike Scott Fujita Jersey Nike Matt Schaub Jersey Nike Johnathan Joseph Jersey Nike Isaac Sopoaga Jersey Nike Brad Smith Jersey Nike Josh Freeman Jersey Nike Jason Williams Jersey Nike Maurkice Pouncey Jersey Nike Jaiquawn Jarrett Jersey Nike B.J. Raji Jersey Nike Adrian Wilson Jersey Nike Dexter McCluster Jersey Nike Arthur Moats Jersey Nike Matt Forte Jersey Nike Dallas Cowboys Jersey Nike Hakeem Nicks Jersey Nike Desmond Bishop Jersey Nike Earl Bennett Jersey Nike Garrett Hartley Jersey Nike Jonathan Stewart Jersey Nike Percy Harvin Jersey Nike Matt Birk Jersey Nike Kevin Kolb Jersey Nike Brandon Graham Jersey Nike Shawne Merriman Jersey Nike Chase Daniel Jersey Nike Shonn Greene Jersey Nike Mohamed Massaquoi Jersey Nike Shane Lechler Jersey Nike Ryan Clady Jersey
Cheap Barbour Sale
http://www.barbourjacketswomen.biz
http://www.barboursale-2012.net
This season, Barber Jackets will be one of the most popular additions to the wardrobes of the most fashionable people around today. They have already been an admired feature on catwalks throughout the world, whether London, Paris, or New York, are Quilted Barbour Jackets this year's biggest fashion statement. Trendy, stylish, and sophisticated, anyone with even a passing interest in fashion would have heard of this manufacturer of outdoor jackets. To own a Barbour Quilted Jacket is to make a statement to the world: ‘I love fashion, and I know what's hot and what's not'. To wear Barbour Jacket is to imbue you with a feeling of royalty, of an impression of regal greatness; indeed, these Barbour International Jackets truly reflect a high-status in society.To be sure, the Barbour Jackets Women is an expensive way of ensuring you remain fashionable for another season. Nonetheless, the price is a reflection on quality and style, no other manufacturer of clothing has managed to convey the same messages that Cheap Barbour Sale has. The advantages of owning such a prestigious item of Barbour sale clothing far outweigh the expense of doing so.
Because of the natural classic look these Women Barbour Jackets , Barbour Jackets mens ,Childrens Barbour Jackets suggest about the wearer, they are clearly appropriate for many occasions. Whether you wear yours to the pub, or to the wedding of your closest friend, you can be sure that you will not look out of place. Moreover, these Barbour Ladies Jackets are suitable across the seasons, in winter, they Quilted Jacket keep the wearer wonderfully warm, in summer, they keep of the drizzle, a staple favourite of weather systems throughout the UK! Their specialist materials are much like silk in the qualities they provide, providing warmth during a cold spell, but equally, managing to keep you cool during a warm spell – this is no surprise, many ‘country' style devices provide these qualities, just think about the thatched house; cool in summer, warm in winter,that is Barbour Jackets sale.
Aside from the provision of all things practical – their weather proofing, their warmth and cooling properties depending on the season, the depth of their pockets, their protection from rain, etc – Barbour jackets are also a fantastic fashion accessory. The image they invoke is one of class and sophistication, and by wearing such an item, you will reflect the same sentiment. This season, they are particularly fashionable – given the townie/country look that touted by the fashionista throughout the world at present. Wear with a pair of chinos, or skinny jeans, and perhaps a lumberjack shirt and narrow tie, and you will ‘hit the hammer on the head' by way of fashion this season.
In terms of style and comfort, therefore, there is no better jacket than Barbour jacket, made from the finest quality and in the most fashionable designs; you cannot go wrong when purchasing Barbour jackets.
The Barbour jackets parka is one of the most long lasting types of Barbour sale protecting outfits available. The Barbour Jackets women has several features, that Barbour coats allow certain excess components be taken out. The Barbour international hoody and sleeves could be detached using the zips and buttons that Barbour uk permit reattachment. Each of these ladies Barbour jackets features makes Barbour quilted jacket suitable for everyday wear as well. Parka jackets Barbour bamburgh jacket are large outdoor jackets with hoods. Usually, Barbour men's jacket parka they are stuffed with down or synthetic down, Barbour men's vest are fur or flannel-lined and the hoods Barbour girls beadnell jacket are fur-lined as well. Parkas Rainbow International Jacket are designed to be all-weather-proof, supplying warmness boys chelsea jacket Barbour and rainwater protection. Parka outdoor Barbour Classic Duffle Coat are liked by those who enjoy winter sports.
order sildenafil online
qdfloi order sildenafil online >:-[ cialis 9537 cheapest viagra Nixcn buy cialis 25mg 0240 viagra cDPBly online cialis 6474
viagra
wmwlxv http://qugqvi.com/ zqclasf [url=http://pjvsrl.com/]zqclasf[/url]
viagra
maalhry http://pukqgh.com/ gjwdot [url=http://vrjvru.com/]gjwdot[/url]
ormbekam
gveohkl
if this is the case, you can
if this is the case, you can even be bdfgsrgfsdfcgfghf by the infamous Woman's Mind-Reading Syndrome. it ispossible you boughtd this afflction from a milddiet of reading women's magazines (the onlys with cover blurbs just like the way to CRACK a person'S SECRET CODE and WHY HE CAN'T speak about HIS FEELINGS (AND WHAT you'll be able to DO TO DECIPHER THEM!).or even you boughtd this affliction when someone told you that--because you are a lady--you're naturally more in contact together with your feelings, his feelings, the entire world's feelings, and also you jyjtyurtytyfdhf to take tender care of eachbody else's feelings, lest you harmfeelings, which maymean you are a crappy person.Here's the base line on feelings. You treat a person as you will have him treat you. He treats you as he would have you ever treat him. If he is not treating you as he would have you ever treat him (i.e., letting you wonder about his feelings as opposed to gwerwrdfsdfgdg them, saying he doesn't need a relationship before bouncing into bed with you, lying, not calling or showing up when he says he's going to), then it's time to hit the highway.preventwondering why he does the skinnygs he does. jyjdghdgxvszdfs his mind. God knows, he is not reading yours.
Know this:
ghfdgsdfgsertrttrg
ghdgsdfsdgfdgghth
lkjljohlhkjhjh
ljikgjkhgjfgrfhdr
ghdhdghgjytudhfghj
General description: Inside
General description: Inside zip pocket;Prada handbags;Four protective studs on the base; Zip top closure ;Carried on the shoulder or across the body; Signature lining; Original dust bag and authentic card with serial number.
Well-renowned for its simple yet prada women, Prada bags prada hoboelegant with their latest Prada apricot leather shoulder stunning bag clearance 2012. Made out of the high-grade cow skin material, this Prada Shoulder Bags exhibits the charming and women handbags of bright red shading and gold-tone hardware. General description: Inside zip pocket and open pocket . Multi-function pocket;Five protective studs.
मुलाखत
सहज नेटवर फिरताना ही मुलाखत दिसली. वाचली. वेगळ्याच भावविश्वात घेउन गेली. निलीमा बोरवणकरांचे आभार आम्हाला त्या विश्वात नेल्याबद्दल. मिळुन सार्याजणी नेहमी वाचतोच असे नाही. हा अंक नेटवर नसता तर माझ्याकडून हे वाचलंच गेल नसत. उज्वला परांजपे यांना पुढील कार्यासाठी आमच्या शुभेच्छा जरुर कळवा.
मुलाखत
नीलिमा बोरवणकर यान्च्या सगळ्याच मुलाखती खुप छान असतात. त्याना पुढील लिखाणासाठी शुभेछा....