आज नारी समता मंचातर्फे आयोजित केलेल्या या सभेमध्ये मला बोलण्यासाठी आमंत्रित केलं गेलं आहे याचा मला मनापासून आनंद झाला आहे. सभेमध्ये प्रदर्शित करण्याचा हा औपचारिक आनंद नक्कीच नाही. तर या निमित्ताने माझ्या पिढीच्या एकाला, आपण ज्या विचारप्रणालीवर विश्वास ठेवतो, त्या विचारप्रणालीत ग्राह्य घरलं गेल्याचा हा आनंद आहे.
समता, विश्वास आणि शांतता या सूत्रांवर उभ्या राहिलेल्या मानवी नात्यांचा आदर करणारी ही विचारप्रणाली आहे. जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत ही मूल्ये आजच्या काळामध्ये अस्थिर स्वरू पात असताना मानवी नात्यांवरही त्यांचा प्रभाव पडल्याशिवाय राहणार नाही.
मी आज माझ्या पिढीचं - आजचं जगणं तुमच्यापुढे मांडत आहे. माझ्या पिढीच्या जगण्याचं वर्णन सोपी लेबलं लावून करता येणार नाही. कुणी आमच्यापेक्षा थोडं जास्त जगलं असलं तरी त्यांना आमचं जगणं आणि त्यातील गुंतागुंत नक्की कळेल असं मला वाटत नाही. त्यासाठी हे जगणं जगावंच लागेल.
आज रोजचं आयुष्य जगताना अतिशय तीव्र असा सपाटीकरणाचा अनुभव आपल्या सगळयांना येतो आहे. शहरच्या शहरं एकसारखी झाली आहेत. कुठल्याही ठिकाणी जगण्याचा अनुभव हा इतर कुठेही जगण्यासारखा होऊन बसला आहे. तरुण मुलांना जरी वाटत असलं की ते वेगवेगळे आकर्षक व्यवसाय करतायत, तरी प्रत्यक्षात प्रत्येकाचा एकच व्यवसाय आणि एकच कर्तव्य झालं आहे ते म्हणजे `ग्राहक होणे.' आज आम्ही आठवड्यातला प्रत्येक दिवस सोळा सोळा तास उभं राहून काम करता आहोत आणि त्यातून कमावलेले भरमसाठ पैसे शनिवार रविवारी वीस वीस तास खपून खर्च करत आहोत. ह्या सगळयाच्या मध्ये शरीराच्या आणि मनाच्या काही गरजा आहेत. लग्न आहे - मूलंबाळं आहेत- स्पर्धा आहे - गोंगाट आहे आणि प्रदूषण आहे. सगळं आम्हीच तयार करून ठेवलेलं आहे. कारण जगण्यामधले संवेदनांचे कंगोरे नष्ट होत चालले आहेत. साहित्य - कला - संगीत या जीवन समृद्ध करणाऱ्या अनुभवांचं काम हे आता करमणुकीच्या गुदगुल्या करण्यापलीकडे उरलेलं नाही. भाषा हा अनुभव एका वेगवान संक्रमणावस्थेत आहे. कामचलाऊ व उपयुक्त कोडवर्डस्नी भरलेली बेचव-बेरंग भाषा संपर्काचे माध्यम म्हणून घडवली जात आहेत.
हे सगळं पुरेसं दमवून टाकणारं असलं तरी सध्या पैशामुळे आलेला उन्माद हा प्राथमिक अवस्थेत असल्याने त्याचे होणारे दूरगामी परिणाम मान्य करायला आमची नवश्रीमंत पिढी नाकारते आहे.
पण परिणाम व्हायचे थांबत नाहीत. एखाद्या शांत गावाच्या मध्यभागी असलेल्या सर्कसमधील सर्व श्वापदे पिंजरे तोडून बाहेर पडावीत आणि मग त्या गावात हैदोस सुरू व्हावा अशी आपल्या राजकारणाची परिस्थिती आहे. अशा अशांत-अस्थिर जगात आपण समतेचा-शांततेचा विचार करत आहोत. नातेसंबंधांवर या अशा जगण्याचा फार मूलगामी परिणाम होतो आहे. मला आज इथे बोलण्यासाठी जे टिपण देण्यात आलं त्यात लिहिलं होतं की `पुरुष कसा घडतो ?' यावर बोला. मला असं वाटतं की आता पुरुष आणि स्त्री घडणं हळूहळू बंद होऊन असशश्रशीी आणि डशुश्रशीी मानवी रोबोज हळूहळू तयार होणार आहेत.
हे सगळं घडत असताना आपण अशा एका महान देशात जगत आहोत जो अनेक शतकांमध्ये एकाच वेळी लोळत असतो. भारत देश हे परमेश्वराने घडवलेले एक सर्वोत्कृष्ट आणि अद्भुत टाईम मशीन आहे. मी वर्णन केलेलं आजचं जगणं जगताना मध्येच आदिमानवी व पारंपरिक संस्कृतीचे टाईमबॉम्बसारखे धक्के आपले आजचं जगणं अधिकच मनोरंजक करीत असतात. कुठेही प्रवास न करता एकाच जागी बसून मानवजातीच्या उत्क्रांतीचे अनेक टप्पे भारतात गल्लोगल्ली जिवंत अनुभवायला मिळतात. म्हणूनच बहुधा भारताला भविष्यातली महासत्ता म्हणत असावेत असं मला वाटतं.
या भारतातली ही आमची पिढी अतिशय प्रोटेक्टेड वातावरणात वाढलेली आणि अनप्रोटेक्टेड वातावरणात फेकली गेलेली पिढी आहे.
आजचा पुरुष हा एका द्वैतामध्ये जगत असतो. पारंपरिक कुटुंबपद्धतीतून व त्यातून मिळणाऱ्या नातेसंबंधातून मिळणारे फायदे त्याला हवे असतात तर दुसऱ्या बाजूला स्वतंत्र व ळीेश्ररींशव आयुष्याची खुमारीही त्याला हवी असते. मग तो कोणतीही ठाम भूमिका न घेता वेळ पडेल तसतसे सोयीस्कर निर्णय घेत जातो. मग तो आई म्हणाली म्हणून लग्न करतो आणि बायको म्हणाली म्हणून मुलंही जन्माला घालतो. मी इथे मर्यादित अर्थाने फक्त पुरुषांविषयी बोलत नसून पुरुषी दर्प येणाऱ्या स्त्रियांविषयीही बोलत आहे. अजूनही भारतात एकट्या, स्वतंत्र आयुष्याची जी किंमत मोजावी लागते ती मोजण्याची धमक तरुण पिढीमध्ये आलेली नाही. ती किंमत मोजण्याची वेळ आली की घाबरून जाऊन मुलं-मुली जे पटकन करतात त्याला हल्ली लग्न म्हणतात. आज आजूबाजूला माझ्या सभोवतालच्या लोकांशी गप्पा मारताना मला असं जाणवतं की लग्नालाही ते अतिशय हुशारीने एका सोयीच्या भूमिकेतून बघत आहेत. फार मोजक्या वेळी प्रेमाने - ठाम विश्वासाने आणि सोबतीच्या ओढीने नात्यांचं रूपांतर लग्नामध्ये होत आहे.
लग्न करणे हा एक गोंधळ आहेच मग तो करून झाल्यावर मुलंबाळं - एकमेकांवरचे अन्याय - हक्काची भांडणं - मग ते सोडवायला कायदे - असे अनेक उपगांेधळ नवा गोंगाट तयार करत आहेत. जो आपण अनुभवतो आहोत. ह्या गोंधळात अतिशय शांत संवाद साधून प्रश्न सोडवण्याची जागा व पद्धत दुर्दैवाने आपल्या मनात नाही. आज उद्घाटन होत असलेले `संवाद केंद्र' यासाठी व्यापकदृष्ट्या काम करेल असं मला वाटतं. कारण आमच्या महान कुटुंबपद्धतीत वाढलेल्या गोजिरवाण्या पुरुषांना रडायला किंवा बोलायला शिकवलंच जात नाही. म्हणून ते बिचारे मग हात उचलतात, मारतात, लाथा घालतात. मोजक्या वेळी हुशार मुलीही हे सगळं करण्यात मागे राहात नाहीत.
आपल्यापैकी कुणालाही हे नक्कीच नको आहे. या कशासाठीच आपण जगत नाही. मग असं का घडतं आहे ? आपल्या जगण्याचं भान आणि त्या जगण्याबरोबर पार पाडाव्या लागणाऱ्या मोजक्या जबाबदाऱ्या या तरुण मुलामुलींना का समजू नयेत ? यासाठी काहीतरी करायला हवं आहे.
स्त्रीवादी चळवळीची भूमिका आजच्या जगामध्ये माणूस म्हणून महत्त्वाची ठरणार आहे असं मला वाटतं. मी माणूस म्हणून घडवला जात असता मला हे लक्षात आलं आहे आणि मला हे पटलं आहे की खष र्ूेी वे पेीं हर्रींश र ुेारप ळपीळवश र्ूेी, ेी ुळींह र्ूेी, ींहश श्रळषश र्लेीश्रव लश शुींशीशाशश्रू ुेीींहश्रशीी. आपल्या आत किंवा आपल्यासोबत एका जाणत्या स्त्रीचं अधिष्ठान असायला हवं.
माझ्या आजूबाजूला अतिशय जाणत्या व बुद्धिमान स्त्रिया अतिशय महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पेलून आज अनेक व्यवसायाचं स्वरूप बदलत आहेत. पण काही वेळा त्यांच्याशी होणारा संवाद मला अतिशय कोड्यात टाकतो की स्वतंत्र आणि यशस्वी होण्यासाठी पारंपरिक पुरुषी अरेरावी आणि दाणादाण करून आपल्या जगण्याचा खरा उद्देश सार्थ होणार आहे का ?
दुर्दैवाने स्वातंत्र्य या संकल्पनेचा फार चुकीचा अर्थ लावला जातो आणि खऱ्या अर्थाने शांत व स्वतंत्र होण्याच्या दुसऱ्या टोकाला जाऊन आपण वागायला लागतो. मला हे सांगायला ूार वाईट वाटतं पण माझ्या वयाच्या आजूबाजूला वावरणाऱ्या मुली आज खरोखर स्वतंत्र व सक्षम नाहीत. त्या फक्त हुशार आहेत आणि केव्हाही गरज पडताच परंपरागत स्थैर्य व सुरक्षितता देणारी सर्व कृत्ये करायला त्या उत्सुक आहेत. ज्या स्त्रियांच्या बौद्धिक मेहनतीमुळे व त्यांनी चुकवलेल्या आयुष्याच्या किमतीमुळे या मुली हे मुक्त जीवन जगतात त्या कुणाहीबद्दल त्यांना भानच काय पण माहितीही नाही.
सगळयात चिंतेची गोष्ट ही आहे की हा सगळा आमूलाग्र व धोकादायक असा बदल जीवनशैलीत घडत असताना त्याने नुकसान होणाऱ्या मुलामुलींना त्याची जाणीवच नाही. आम्हा सर्वांवर उपभोगी वृत्तींमुळे एक धुंदीची साय जमली आहे आणि तत्काळ प्रश्न सोडवण्याकडे सगळयांचा कल वाढतो आहे.
हा भाबडेपणा आहे की दुटप्पीपणा आहे ? खरं तर ह्यातलं काहीही नसून आपल्याच जीवनाचं आकलन होण्याची शक्ती माझ्या पिढीतले अनेक जण घालवून बसले आहेत. मला असं वाटतं की समतेचा विचार करण्यापेक्षा आधी या गुंगीतल्या आणि धुंदीतल्या समाजाला त्यांच्या जगण्याचे आणि नातेसंबंधांचे योग्य ते भान द्यायला हवे आहे. आणि जगण्याचे भान देणाऱ्या गोळया - औषधे किंवा इंजेक्शने नाहीत. सातत्याने कलाकार - लेखक व विचारवंतांनी आपापल्या कामातून मांडलेल्या नव्या जीवनमूल्यांच्या आधारानेच नव्या जगातला सक्षम पुरुष आणि स्त्री घडायला मदत होणार आहे. हा शेवटचा एकच उपाय उरला आहे. आपल्या निर्णयांची आणि जगण्याची संपूर्ण जबाबदारी घ्या हे त्यामधील महत्त्वाचे मूल्य आहे.
आज सर्वच चळवळींचा आवाज अतिशय क्षीण झाला आहे. कारण या वेगवान व बाजारू जगात एकत्र येऊन, एका उद्देशाने काही बदलवण्याच्या मार्गावर कुणाचाच विश्वास राहिलेला नाही. शिवाय काळाबरोबर बदलण्याविषयी जो अनुत्साह सामाजिक संघटना वर्षानुवर्ष दाखवत आहेत त्याचाच हा परिणाम आहे. आज करियर म्हणून केलेल्या सरकारी किंवा छऋज च्या नोकऱ्या सोडल्यास कोणत्याही सामाजिक चळवळीकडे ताजा-नव्या दमाचा आवाज नाही. चेहरा तर नाहीच नाही. आपण सर्वांनी मिळून यासाठी काहीतरी करायला हवे. आधुनिक मानवी अस्तित्व आणि आधुनिक मानवी नातेसंबंध यांचा मूलाधार ठरलेल्या स्त्रीवादी चळवळीने आज फार परखड आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
आज आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या प्रकारे ाळपेीळींू मध्ये जगत आहोत. कारण आपण संवेदनशील आहोत. आपणच फक्त एकमेकांचं बोलणं उत्सुकतेने ऐकायला एकमेकांकडे जात आहोत. मी बोलताना तुम्ही ऐकायचं आणि तुम्ही बोलताना मी ऐकायचं हे आपलं छोटं वर्तुळ तयार झालं आहे. उत्तम चित्रपट, संगीत, नाटकं, सकस साहित्यिक चर्चा, सामाजिक व राजकीय वाद या सर्व गोष्टी जिथे जिथे घडतात तिथे तिथे तीच ती माणसं फिरत असतात. सगळे हॉल भरतात आणि आपल्याला वाटतं की काय गर्दी झाली. पण समाज बदलला. माझं म्हणणं आता प्रभावीपणे पोहोचेल. पण तसं होत नाहीये.
आपण हे सगळं करताना आपल्याला कामाच्या आनंदाबरोबरच समाजाचा सहभाग अपेक्षित आहे. तो सहभाग वाचक-प्रेक्षक आणि सहकारी या भूमिकांमध्ये सुदृढ झाला तर आपण जे लिहितो बोलतो आहोत त्या सगळयाला एक भूमिका व उद्देश येईल.
आज समानता आणि विश्वास या नात्यांची रुजवात नव्या काळातल्या नात्यांमध्ये आपण कशी करणार आहोत ? आपण त्यासाठी आपली भाषा बदलायला हवी आणि मुख्य म्हणजे ह्या वळवळीला आलेली एक ोवशीींू सोडून द्यायला हवी. आज आपल्या सगळयांच्या हातांमध्ये ताकदवान माध्यमं आहेत. महाराष्ट्नचा विचार केला तर अजूनही एक दोन वृत्तपत्रं तग धरून आहेत जिथे संपादकीय भूमिकेला व विचारांना स्थान आहे. मराठी चित्रपट आज आशयाच्या पातळीवर एक आश्वासक नवी लाट घेऊन येत आहे. प्रायोगिक रंगभूमीने आज नव्या पिढीमध्ये आपले स्थान बळकट केले आहे. ह्या माध्यमांशी आपली दोस्ती व्हायला हवी. चळवळीतल्या लोकांनी आपापली बेटं बनवून न राहता जास्त समाजाभिमुख व्हायला हवे आहे. अजूनही चळवळीतल्या स्त्री-पुरुषांची प्रतिमा ही आक्रमक, सतत जगावर रागावलेले आणि सडेफटींग अशी आहे. ही प्रतिमा बदलायला हवी. अनेक वेळा आत्मपरीक्षण करा असं कोणत्याही समूहाला सांगितलं की त्यांच्यात एक ीशरलींळेपरीू चीड किंवा स्वत:विषयीची भावूक कणव पाझरते. ह्या गोष्टी जर टाळता आल्या तर एका सीरलश मध्ये आपल्या सगळयांना नव्या जगात आपला आवाज बळकट करता येईल. तो करण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही अन्यथा एक दिवस आपण मूकपटात वावरल्यासारखे एकमेकांना दिसू.
आज या ठिकाणी ज्या `पुरुष संवाद केंद्रा'चे उद्घाटन होत आहे ते या दिशेने चळवळीने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे असं मला वाटतं. विद्याताइंर्सारख्या व्यक्ती अतिशय मोकळेपणाने आपले वय व ज्ञानाचा अधिकार बाजूला ठेवून आम्हा पोराटोरांशी गप्पा मारत असतात. त्यांंचं जगण्याचं स्पिरीट आणि त्यांची भूमिका बाळगणारी पुढची पिढी चळवळीने तयार करावी.
मी अशी अपेक्षा करतो की स्त्रियांवरील अत्याचाराच्या विरोधात जो कायदा अस्तित्वात आला आहे त्याची हाताळणी जबाबदारीने व्हावी. आपल्याला कोणताही एकध्रुवीय समाज नको आहे. पुरुषप्रधान समाज काय किंवा स्त्रीप्रधान समाज काय या दोन्ही आजारी व्यवस्था आहेत. आपलं वय - जातपात, लिंग, आर्थिक स्तर विसरून तयार केलेली मोकळी नातीच आपला समाज बांधून ठेवतील. दुर्दैवाने लग्नसंस्थेमध्ये नव्या काळाबरोबर सामंजस्य व आधुनिकता न येता ती संस्था दिवसागणिक आदिम व ग्राम्य होत चालली आहे. तिच्यातून उद्भवलेले अनेक प्रश्न या संवाद केंद्राच्या माध्यमातून खुलेपणाने व शांततेने सोडवले जातील असा मला विश्वास वाटतो.
विद्या बाळ, गीताली तसेच नारी समता मंचाच्या सर्व कार्यकर्त्यांना व विचारवंतांना मी शुभेच्छा देतो व वारंवार एकमेकांसमोर येऊन हा संवादाचा ओघ चालू राहावा अशी इच्छा व्यक्त करतो.
धन्यवाद !
सचिन कुंडलकर, पुण
Posted in


