Skip to main content

हरवले ते गवसले का!

आज भयानक वादळवारं सुटलेलं आहे, पावसाच्या झडीवर झडी वेड्यावाकड्या पडताहेत, बरार्ड ब्रिजवरून जाताना त्या वाऱ्याच्या जोरानं माझी गाडी चक्क हालत होती, असं मला जाणवलं. पण त्या वादळवाऱ्याची तमा न बाळगता मी गाडी घेऊन, रिचमंडमधल्या घरातून निघून, दोन पूल ओलांडून व्हँकूव्हरमधील भारतीय वकिलातीत आले आणि दहा वर्षांपूर्वी जे हरवलं होतं, ते आज पुन्हा हाती लागलं. भारताची विदेशी नागरिक म्हणून माझं प्रमाणपत्र आज माझ्या हाती आलं. जानेवारी २००७ मधे नेहमीप्रमाणे मी शिशिरऋतूतली माझी भारतयात्रा करणार आहे, त्यापूर्वी मी केलेल्या अर्जानुसार व्हँकूव्हरातील भारतीय कौन्सुलेटने मला ओ-सी-आय् नामक (र्जींशीीशरी उळींळूशप ेष खपवळर) एक प्रमाणपत्र बहाल केलं. विदेशी भारतीय नागरिक म्हणून मला भारतात मतदान किंवा मळे, शेत वगैरे जमीनजुमला करायला मिळत नाही, किंवा निवडणूक लढवायलाही मिळत नाही. या प्रमाणपत्राचा खरा उपयोग प्रवासाच्या सुविधेसाठी आहे. ह्या कागदामुळे मला आजीवन भारतामध्ये मुक्तद्वार मिळणार आहे. दर खेपेला भारतात जाताना व्हिसा काढायची कटकट नाही. पण एवढंच नव्हे, तर आणखीही बरंच काही शब्दात न सामावणारं या प्रमाणपत्रामुळे मला लाभलं असं मला वाटलं. ज्या मायभूमीशी माझी नाळ कागदोपत्री तुटल्यासारखी झाली होती, तिच्याशी परत एकदा या कागदपत्रामुळे माझी जन्मगाठ जोडली गेली.
एक तळहाताएवढा कागदाचा तुकडा. त्यावर लिहिलेल्या त्या तीन शब्दांनी माझं मन आज इतकं का आनंदलं आहे, कळत नाही. १९६७ साली भारत सोडून अमेरिकेत आले, आणि १९६९ सालापासून क्रॅनडामध्ये प्रवेश घेऊन नंतर तिथेच स्थायिक झाले, तरी आजतागायत मनाने आणि आचारविचारांनी मी भारतीय होतेच की. क्रॅनडाचे नागरिकत्व घेऊन, आणि ब्रिटिश कलंबिया प्रांतातील या रिचमंड शहरात राहतं घर विकत घेऊन, त्याभोवती बाग फुलवून, मुलाबाळांना इथे वाढवून, आणि ब्रिटिश कलंबियातील विद्यापीठात भरपूर वर्षं कनेडियन विद्यार्थ्यांना इंग्लिशमधून शिकवून बाह्यात्कारी जरी मी कितीही कनेडियन झाले असले, तरी माझं भारतीयत्व, आणि मराठीपण मुळीच गमावलेलं नव्हतं. ते होतं तिथं, आतल्या आत आणि पुष्कळ अंशी बाहेरही टिकून राहिलेलं होतंच. घरीदारी आणि अनेक मित्रमैत्रिणींशी बोलत असलेल्या मराठी भाषेत, गेली कित्येक वर्षं भारतातील विविध मासिकांमधून आणि क्रॅनडातील `एकता' त्रैमासिकामधून केलेल्या मायमराठीमधल्या लेखन-संपादनकार्यात, आणि नाटकं, गाणी, रांगोळया वगैरे अगणित सांस्कृतिक कार्यक्रमात ते मराठीपण, भारतीयत्व सतत सोबत होतंच. पण बरीच वर्षं भारतीय पासपोर्ट न बदलता कनेडियन इमिग्रंट या नात्यानेच या देशात राहिल्यावर, अखेर जेव्हा १९९५ साली, `आता हेच माझे, माझ्या कुटुंबाचे सध्या तरी घर' अशी जाणीव झाल्यावर भारतीय पासपोर्टऐवजी कनेडियन पासपोर्ट हाती धेतला, तेव्हा भारताला आपण कागदोपत्री तरी सोडलं असं काहीसं वाटून मन खिन्न झालं होतं, याची अजून आठवण आहे. खरं म्हणजे तसं काहीच गमावलेलं नव्हतं, दोन्ही देशांमध्ये आमचे निकटवर्ती नातलग होते, मित्र होते, चाहतेही होते. दोन्हीकडे आम्ही राजरोस जातयेत होतो, चांगली कामे करू शकत होतो, दोन्हीकडच्या समाजालाही आम्ही हरतऱ्हेने मदत करून सामाजिक ऋण थोडंफार फेडत होतो. तरीपण कागदोपत्री आपण भारताला परकं केलं, असं काहीसं जाणवत, जाचत राहिलं होतंच. आज ती खंत दूर झाली. क्रॅनडामध्ये आम्हाला आर्थिक सुबत्तेचं, स्वतंत्र आणि भरपूर सुखासमाधानाचं आयुष्य लाभलं, म्हणून जरी आम्ही या देशाची स्वत:साठी निवड जाणूनबुजूनच केली असली, तरी मनाने आम्ही मराठी, भारतीय असणारच आहोत. या देशाने आम्हाला जे जे काय काय दिलं, त्या सर्वांबद्दल ऋणी राहूनदेखील आम्ही मूळ कोण हे विसरू शकत नाहीच. मग आज नेमकं काय झालं ? आज हाती आलेल्या कागदाचा अर्थ एवढाच, की आमच्या अस्तित्वाची मूळ खूण, जी आमच्यापुरती राहिली होती, ती आता भारतानेदेखील सामाजिक आणि राजकीय पातळीवर मान्य केली.
क्रॅनडा हा देश द्विधा नागरिकत्व मान्य करतो. इंग्लंड, फ्रान्स, इटली वगैरे देशही ते मान्य करतात. क्रॅनडाचा एके काळचा अर्थमंत्री, आणि नंतर काही काळ प्रधानमंत्री असलेला जॉन टर्नर हा देखील क्रॅनडाप्रमाणेच इंग्लंडचाही नागरिक आहे. तसेच सध्याचा लिबरल पक्षनेता स्टेफन डियोन हा क्रॅनडाप्रमाणे फ्रान्सचाही नागरिक गणला जातो. विद्यापीठात प्राध्यापक असलेले आमचे इटालियन मित्र दोन्ही देशांचे नागरिकत्व सुखाने सांभाळतात. आत्तापर्यंत भारताला असे द्विधा नागरिकत्व मान्य नसल्यामुळे क्रॅनडाला चालत असूनही ही मुभा फक्त भारतीयांनाच तेवढी मिळत नसे. त्यामुळे आमच्यासारख्या भारतीय कनेडियनांना मूळ देशाच्या उबेची उणीव भासे. आता मात्र भारताने `पुढचे पाऊल पुढेच' टाकायचे ठरवल्यामुळे आम्हा भारतीयांनाही मूळचे नागरिकत्व जमेला धरूनच पुढे नव्या देशाचे नागरिक म्हणून राहता येणार आहे. सर्वसाधारणपणे भारताबाहेर या ना त्या कारणाने आलेले बहुतेक भारतीय कुठलेही नागरिक बनले, तरी मनात भारताबद्दलचा अभिमान, आपुलकी आणि ओढ कायम बाळगून असतात. सधन बनल्यानंतर तर या सगळया मानसिक आपुलकीकडे जाऊन दुसऱ्या देशात मिळवलेल्या संपत्तीचा
विनियोगही भारताच्या फायद्यासाठी अनेकवार केला जातो. त्यामुळे विदेशी भारतीय ही भारताची भलीमोठी संपत्ती आहे, हे आता भारताने ओळखले आहे. आणि विदेशी भारतीय नागरिकत्वाचा हा दाखला देऊ करून अशा सर्व समाजाची ओढ कायम राहावी, यासाठी पाऊल उचलले आहे. या नव्या धोरणामुळे आमच्यासारखे मनाने भारतीय असणाऱ्या अनेकांना खूपच बरे वाटणार आहे.
याला उपमाच द्यायची तर मुलीच्या बाबतीतल्या सासर-माहेरच्या संबंधांची देता येईल. लग्न करून मुलगी सासरी जाते. पण शरीराने आणि कळत-नकळत मनानेही सासर हेच आता आपले घर हे जरी मानले, तरी मूळचे घर, बापघर किंवा माहेर हे काही मनातून पूर्णपणाने बाजूला जात नाही. पूर्वीच्या काळी लहान वयातच सासरी जाणाऱ्यांची गोष्ट वेगळी असेल कदाचित, पण अलीकडच्या काळातल्या वाढलेल्या, बाई बनलेल्या आणि स्वतंत्र करिअर करणाऱ्या, विवाहित मुलींचा माहेराशी ओढा बहुतांशी कायमच राहतो. `जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी रहा !' हे गाणे लहानपणी ऐकतानादेखील `दिल्या घरी' हे शब्द मला जाचत असत. `हेच नाही का माझं घर?' `लोकांचं घर माझं घर कसं होईल?' हे प्रश्न मला जाचत असत. मोठेपणी हवं तिथेच लग्न झाल्यावर थोडं चित्र बदललं. पण फार नाही. आता ते नवीन घर आपलं करता येतं, हे पटलं, पण तरीदेखील जुनं घर आपलं घर राहात नाही, हे पटणं कठीण होतं. मुलींचं लग्न झालं की ती माहेराला मुकते, हे काहीकाहींच्या घरातलं `तत्त्व' मला कधीच पटलं नव्हतं. माझ्या माहेरी तसं मला कुणी, कधीही म्हटलं नव्हतं. उलट, `तू जगाच्या पाठीवर कुठेही जा, कुठेही सुखात रहा, पण आपलं हे घर नेहमीच तुझ्यासाठी उघडे असेल' असे बजावणारी माझी आई होती. बाबाही तसेच. एकूणच, वजाबाकीपेक्षा बेरीज करायला मला अधिक आवडत असल्यामुळे माहेरही माझंच, आणि सासरही माझंच, अशीच वृत्ती मी नेहमी जोपासली आहे. त्याचप्रमाणे, जिथे जन्मले तो देश माझा, तसेच जिथे मी कर्मधर्मसंयोगाने येऊन वस्ती केली, तोही देश माझाच असं म्हणायला मला अधिक आवडतं. `कबीर माझा, तुलसी माझा, ज्ञानेश्वर परि माझाच !' असं म्हणणाऱ्या कवी वसंत बापटांचं मत मला चांगलं समजतं. रेसभर कमीजास्त असेल, पण आपलं ममत्व सदैव दोन्हीकडे पसरलेलं असतं. एनआरआय म्हणजे अनिवासी भारतीय म्हणा, किंवा ओसीआय म्हणजे विदेशी भारतीय नागरिक म्हणा, त्या कोणत्याही पदवीमुळे आपल्या मनातल्या भारतीयत्वाला उणंअधिक लेखलं जातं, असं नाही. पण आजच्या या नागरिकत्वाच्या प्रमाणपत्रामुळे मला माझ्या मनातल्या भावनेवर राजरोसपणे शिक्कामोर्तब झाल्याचा आनंद झाला खरा.
खरं तर अमुकच एका देशाची मी नागरिक असं म्हणण्यापेक्षा मी स्वत:ला विश्वाची नागरिक म्हणणं अधिक पसंत करीन. कारण भारत आणि क्रॅनडाच नव्हे, तर मी जिथे जिथे थोडाबहुत काळ राहिले, अमेरिका, जर्मनी, इटाली वगैरे देशात, त्या त्या सर्वच ठिकाणी मी माझे माया-बंध जोडले. द्रष्ट्या केशवसुतांनी म्हटलेलं खरंच होतं.
`जिकडे जावंे तिकडे माझी भावंडे दिसताहेत,
सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसताहेत.'
पण माझ्या मनात काहीही कविकल्पना जागी असली, तरी जगाच्या नकाशावर आखलेल्या, एकमेकांशी भांडणाऱ्या लहानमोठ्या देशांच्या सीमारेषा जोपर्यंत पुसट होत नाहीत, आणि काही स्वार्थी आणि मूर्ख लोक जोपर्यंत दिलदार देशांच्या उदारपणाचा गैरफायदा घेणं सोडत नाहीत, तोवर आपल्या कुणाच्या आयुष्यभरात आपल्याला विश्वनागरिकत्व मिळेल, अशी आशा करणं व्यर्थच होईल. मग `तुका म्हणे, त्यातल्या त्यात' या न्यायाने, कमीत कमी जन्मभूमी आणि कर्मभूमी या दोन्हींकडे आपली दखल आहे ना, खूप झालं. गंगेत घोडं न्हालं.
काही वर्षांपूर्वी पुण्याच्या एका मासिकात माझ्या जुन्या, माहेरच्या आडनावाने माझी अलीकडची कविता छापली गेली होती. अनवधानाने झालेल्या या संपादकीय चुकीबद्दल त्या संपादकांना लिहिताना मी एका कवितेतूनच ही गंमत कळविली होती. तेव्हा मी म्हटलं होतं, की
तेविसाव्या वर्षी
एका दूरदेशच्या
स्वप्नात शिरताना
घर सोडलं,
देश दुणावला,
आणि इतकी वर्षं
मिरवलेलं नाव सोडलं,
गंगेच्या प्रवाहात
वेताच्या थाळीत
फुलांंच्या माळांतून
तेवता दिवा सोडावा तसं.
ते नाव
आज उण्यापुऱ्या
तितक्याच वर्षांनी
मासिकाच्या पानावर
संपादकांच्या अनवधानाने
पुन्हा मिळालं.
तरी एकदा दिलं दान
पुन्हा घेता येत नाही,
मुखवटा इतका घट्ट बसलाय
की मूळचा चेहरा पुन्हा त्यावर चढत नाही,
नावाच्या बाबतीत हे खरं असेल कदाचित्, पण देशाच्या बाबतीत आज गंगा उलटी वाहिली आहे, आणि एके काळी कनेडियन नागरिकत्व स्वीकारताना नाइलाजाने सोडून दिलेलं भारताशी नागरिकत्वाचं नातं, आता पुन्हा भारताच्या उदार धोरणामुळे पदरात पडलं आहे. हे दिलं दान, घेतलं दान करताना `हरवले ते गवसले का? गवसले ते हरवले का?' असे प्रश्न मनात उठत आहेत. एकदा तुटलेलं तुळशीचं पान रुक्मिणीच्या पातिव्रत्यामुळे पुन्हा फांदीला जोडलं गेलं अशी एक कथा कुठेतरी वाचली होती. तसंच हे अघटित काहीतरी घडलं आहे. पण या घटनेत आपल्या चांगुलपणाचा किंवा नैतिक सामर्थ्याचा काही भाग नाही, हा एक आनंददायक योगायोग आहे, एवढंच खरं. पण या योगयोगामुळे माझ्या नावाबद्दलचा एक पुराणा भाग मात्र या प्रमाणापत्रावर पुन्हा एकदा प्रकाशात आला आहे आणि बाई म्हणून मला त्याचं महत्त्व जाणवतं. माझा कनेडियन पासपोर्ट फक्त लग्नानंतरचंच माझं नाव दर्शवतो. सदुसष्ट साली, मराठी विवाहिता म्हणून मी स्वीकारलेल्या, `विद्युल्लेखा अशोक अकलूजकर' अशा माझ्या संपूर्ण नावात माझ्या नवऱ्याच्या व्यक्तिनामाशी आणि कुटुंबाच्या नावाशी माझा संबंध जोडलेला दिसतो, पण `विद्युल्लेखा गजानन वाघ' हे माझं लग्नापूर्वीचं नाव, ते माझं पूर्वाश्रमीचं आयुष्य तिथे पुसूनच गेलेलं आहे. आज मिळालेल्या या विदेशी भारतीय नागरिकत्वाच्या प्रमाणपत्रात मात्र, माझ्या भारताशी असलेल्या संबंधात भारताच्या भूमीवर घडलेला माझा जन्म-योग (दुर्लभं भारते जन्म !) आणि माझ्या भारतीय जननी-जनकांच्या नात्यांचाच संबंध महत्त्वाचा असल्यामुळे माझ्याबरोबरच माझ्या आई-वडिलांची नावंही तिथे नोंदवली गेली आहेत. `कमला गजानन वाघ' आणि `गजानन व्यंकटराव वाघ' ही माझ्या बालपणातली, संरक्षक कवचकुंडलांसारखी सतत आगेमागे असलेली नावं तिथे उमटलेली मला दिसतात. विश्वनागरिकत्वाच्या ध्येयाबरोबरच भारताबद्दलचा वास्तव देशाभिमान ज्यांच्या मनात नित्य जागा होता, असे माझे आई-वडील आता पार्थिव जगात नाहीत. पण माझ्या मनात नित्य जागणारं त्या दोघांचं अस्तित्व आता त्यांच्या दोन संपूर्ण नावांच्या नोंदणीमुळे माझ्या नव्या प्रमाणपत्रावरही माझ्या नावासह प्रकाशात राहणार आहे. ते पाहूनही मला एक अनाकलनीय आनंद झाला.
शेवटी, आणखी एक पोरकट आनंदाचा भाग माझ्या फोटोबद्दलचा होता. कनेडियन पासपोर्टवरचा माझा फोटो माझ्याच निष्काळजीपणामुळे असेल, पण मला आजिबात न आवडणारा असा निघालेला होता. मी बहुधा सतराशे साठ कामं उरकून, दमून भागून, त्या छायाचित्रकाराच्या पुढ्यातल्या स्टुलावर कशीबशी टेकताच त्याने फोटोचा कार्यभाग साधला असावा. त्यामुळे माझी कांती त्यात खारवलेल्या शेंगदाण्याची असावी तशी दिसत होती. केस विस्कटलेले आणि चेहरा उतरलेला, असा तो माझा सध्याच्या कनेडियन पासपोर्टवरचा फोटो अत्यंत दयनीय वाटत होता. याउलट, या भारतीय प्रमाणपत्रावरील फोटो मात्र नेहमी मी दिसते, तसा उत्साही, हसरा आणि खराखुरा माझ्यासारखा दिसत होता. आणि भारतात आजीव प्रवेशासंबंधीचा माझा व्हिसाचा शिक्का, माझ्या कनेडियन पासपोर्टवर, याच चांगल्या फोटोसह छापला गेला होता. त्यामुळे त्याच्या पहिल्या पानावर आणि सातव्या पानावर अशा माझ्या दोन वेगवेगळया छब्या उमटलेल्या दिसत होत्या. बहुधा पुढे मी करीन त्या कोणत्याही प्रवासात, पासपोर्टवरच्या त्या दोन इतक्या वेगवेगळया फोटोंमुळे बिचारे कस्टमवाले नक्कीच बुचकळयात पडणार होते. हा चेहरा खरा की तो चेहरा खरा, याची शहानिशा करायला त्यांना माझ्या चेहऱ्याकडे पुन्हापुन्हा पाहावे लागणार होते. पण सध्या मला त्याची काळजी नव्हती. माझ्या बावळट फोटोसह त्या चांगल्या फोटोलादेखील माझ्या पासपोर्टावर आणि प्रमाणपत्रावर स्थान मिळाल्यामुळे मी आनंदात होते.
हातात नवीन मिळालेले प्रमाणपत्र घट्ट धरून, अतिशय उत्तेजित मनाने भारतीय कौन्सुलेटमधून मी बाहेर पउले. व्हँकूव्हरच्या डाउनटाउनमधील पाण्यालगतच्या भागातल्या या जुन्या इमारतीत तिसऱ्या मजल्यावर भारताचे कौंसुलेट आहे. व्यायामप्रिय असल्यामुळे, मघाशी वर येतानाही मी एलेव्हेटर (लिफ्ट) बाजूला असताना तीन जिने सटासट चढून आले होते, तशीच आताही उडत्या पावलांनी जिने उतरत मी खाली चालले होते. पहिला अरुंद जिना खाली उतरल्यावर, चौकोनी थांब्यावर मी येताच मला धापा टाकीत वर चढणारी, लांबलचक शाल पांघरून येणारी, एक गोरी बाई दिसली. जिना चढणं जिवावर आल्यासारखा तिचा चेहरा पाहून मी बाजूला थांबून तिला वर यायला वाट देतादेता हसून म्हटलं, `जिना चढणं चांगलं असतं, एलेव्हेटर घेण्यापेक्षा!'
त्यावर ती माझा खांदा पकडून म्हणाली, `पण तुला माहीत नाही, मी का धापा टाकतेय!'
मी म्हटलं, `नाही बाई, का टाकतेयस?' त्यावर ती म्हणाली,
`कसंल झोंबरं वारं सुटलंय बाहेर माहितीय ना? त्या वावटळीत मी ही सगळी फाइल अशी छातीशी धरून चालले होते. हे भारतीय व्हिसाच्या फॉर्मवर इथे मी माझे दोन फोटो लावले होते. या नाठाळ वाऱ्याच्या जोराने माझे ते दोन्ही फोटो चक्क उडून गेले, आणि ग्रॅनव्हिल स्ट्नीटच्या मध्यावर जाऊन पडले, पावसाच्या पाण्यात! आणि वरून बस निघून गेली! आता सांग, म्हणजे मला पुन्हा दुकानात जाऊन फोटो काढून आणायला लागले. आता मी वर जाऊनच ते तिथे चिकटवणार. निष्कारण दमणूक झाली माझी! पुन्हा पार्किंगला जादा पैसे लागणार ते वगेळेच !'
मी मान डोलावली. आणि चुकचुकले, खेद व्यक्त केला. तिला `गुडलक' म्हणून जरासा दिलासा दिला. बिचारीचं नशीब ! बाहेरच्या वाऱ्या-वावटळीच्या धुमाळीत तिचा चेहराच हरवला होता फॉर्मवरचा म्हणून ती वैतागली होती, आणि जन्मभर बारा वाऱ्यांवर घर बांधूनही माझा हरवलेला चेहरा आज पुन्हा मला सापडला होता, म्हणून मी हरखले होते.
डॉ.विद्युल्लेखा अकलूजकर, कॅनडा

order viagra

gniiws order viagra >:-OOO cialis rrezMi viagra >:-OOO cialis 8]]] cialis =-] cialis tadalafil :-O

cialis

hppgfhkq cialis %-[[[ cialis for woman XQJDnL viagra iucaX cialis pcAyw generic viagra >:-[ viagra cheap yTPwUP

viagra

njqiqud http://batuke.com/ ulilbc [url=http://zyzlyu.com/]ulilbc[/url]

viagra

qvmpvi http://ddksmd.com/ wybhhyhg [url=http://ipfhrf.com/]wybhhyhg[/url]

viagra

vzmeecn http://hmzzkz.com/ bknapw [url=http://paitdt.com/]bknapw[/url]

ohddigj

mhzeay

iounowc

awbtoy

the practical components

the practical components encircling the actual watch-face. There are more choices in which the watch??£¤s system is visible because aspect look at or swiss replica watches . I’ve this individual bar, unique Aikan Shu. louis vuitton handbag the trunk now I’ve turn out to be a haven for my guide. Occasionally driving out stroll replica chanel esemblance from the authentic counterparts.Although the watch will probably be known as a fake, it’s all of the essential properties of an authentic watch. swiss replica watches t watches tend to be transporting inside all of the dependability in addition to all of the finesse Cartier usually represented. Consider your own bit of top swiss replica watches designs of watches from the branded ones? It can be now feasible to purchase low cost replica watches and giving us the expertise wearing designer’s collection that chanel replica ed by trustworthy merchants exactly where the first is certain of the greatest high quality at most inexpensive plan for the actual daily st swiss replica watches target of the rip-off.Usually, replica wrist watches cost between $50 as well as $500 or even more. Right now, $500 help to make appear to be a fortun chanel replica s vuitton ought to not be some thing to obtain this kind of a large fuss – and, she did also aims to assist other people. The media have also created this c rolex replica nt options on their behalf. These types of watches appear much like the actual types, plus they attend the cost that’s within the actual achieve as Replica Handbags ses who require not have access to the a pretty tiara attached for their locks in order to seem like 1. These footwear provide you with the addition uk replica watches are replications . of the greatest manufacturers. With one of these footwear obtainable in a number of dimensions for males, ladies and kids style has b uk replica handbags inexpensive replica watch can function as much as numerous many years with out repairing.LV’s style director Marc Jacobs in 2001 co-operation using replica watches enthusiasm that a female selects the woman’s footwear? She would like my way through all of them and it is definitely not likely to give up within this 1 e replica watches uk The examples of Inexpensive Replica watch are replica Cartier Balloon Blue, Replica Rolex Match Grasp watch, Replica Hublot large bang purple carat and l Replica Watches ly, and also the pattern continues to be ongoing.This excellent sequence offers accurate selection within colours, styles, knobs as well as alloys. Th replica watch le princess Diana after which demonstrated because the woman’s the majority of favored purse. Home of Dior had been set up within London, 1946. Within 1950, chanel replica style pattern with regard to both women and men. Replica wrist watches tend to be replicas associated with really high-priced wrist watches. They ap chanel handbags eeded is extremely higher, but stated the wage will be the company’s trade secrets and techniques, an undisclosed quantity. Meanwhile, the official stated la replica watch