``माझं म्हणणं ऐकून तरी घे रोशनी !''
``मला काही ऐकायचं नाहीये, अम्मी !'' म्हणत उठून कमीज झटकत रोशनी शिसवीच्या जिन्यावरून पळत पळत वर गेली. तिच्या आवाजात लटका रुसवा नव्हता, राग होता. गोल वळत वर जाणाऱ्या जिन्यावर छतातून खाली लोंबणाऱ्या जाड विजेच्या तारेला लटकवलेल्या चिनी-मातीच्या पांढऱ्या फोकससारख्या शेडमध्ये मिणमिण उजेड पाडणारा चाळीस वॉटचा बल्ब होता. भिंतीवरच्या लाकडी फळीवरचा काळया प्लास्टिकचा स्विच सरकून सैल झाला होता त्यामुळे मधून मधून आपला आपलाच बंदही व्हायचा.
गुडघ्यांवर दोन्ही हात देऊन `या अल्ला !' म्हणत अम्मी कशीबशी उठून उभी राहिली. ताठ उभं राहायला जाता जाता कंबरेची हाडं कडकड वाजली. जिन्याचा कठडा धरून धरून पायऱ्या चढत वर जायचा ती विचार करत होती, तेवढ्यात बाहेरच्या दरवाज्यावर थाप पडली. ``ममदू, बघ बरं - कोणीतरी -''
जे चाललं होतं ते ऐकायचं सोडून मग मिशीला पीळ देत ममदू भराभरा पॉलिश केलेला, जाळीची नक्षी केलेला, बाहेरचा दरवाजा उघडायला गेला. दरवाज्यावर अजूनही कोणीतरी खटखट करतच होतं. जुना मोंगलाईतला दरवाजा कुंई% आवाज करत उघडावा तसा आवाज होत दरवाजा उघडला, तर समोर दिसला रिपोर्टर ! ममदूच्या भुवया नापसंतीनं वर चढल्या. अम्मीच्या अंगाची तर लाहीलाही झाली. डोक्यावरून सरकणारा रेशमी दुपट्टा सारखा करता करता ती रागानं ओरडली, ``ममदू ! दरवाजा बंद कर'' - बोलता बोलता तिचा आवाज चिरकला, खरखरला - ``ह्या हलकटानं माझ्या पोरीचं...''
तेवढ्यात जिन्याच्या वरच्या लॉबीतून रोशनी विजेसारखी कडाडली, ``त्याला जर काही केलंत, तर मी पंख्याला लटकून जीव देईन, सांगून ठेवतेय..!'' हातपाय बांधून कोणीतरी पाणी भरलेल्या मोठ्या टाकीत ढकलून दिल्यासारखं वाटलं अम्मीला.
``जाऊ दे ममदू,'' एवढं म्हणे-म्हणेतो अम्मीचे डोळे लाचारपणे भरून आले. दुपट्ट्याचं टोक तोंडात कोंबून हुंदका दाबत ती बैठकीच्या खोलीत गेली. जाता जाता तिच्या तोंंडातून निघालेले शब्द ममदूच्या कानावर पडले. ``ह्या पोरीनं तर जीव नकोसा केलाय मला...!'' ममदूचे डोळे रागानं लाल झाले. रोजच्यासारखंच मग तो बडबडला, ``बेटी, बेटी म्हणून आणची चढवून ठेवा डोक्यावर!''
रिपोर्टर दरवाज्यातून आत आला तसा ममदू रागानं थरथरत उभा राहिला आणि खाऊ का गिळू अशा नजरेनं त्यानं रिपोर्टरकडे बघितलं. स्वत:शीच हसत, जिभेवरचा तंबाखूच्या पानाचा तुकडा थू: करून बाहेर उडवत, ममदूकडे नजरही न टाकता रिपोर्टर जिना चढून वर गेला.
``हरामखोरानं यायला वेळसुद्धा अशी निवडलीय् की बाकीचे येणारे निराश होऊन परतच जातील !'' असं म्हणत ममदू बैठकीच्या खोलीतल्या शाही झुंबरातले दिवे पेटवू लागला. ``काय दिवस आलेत साले !'' त्याची नजर पितळेच्या पिकदाणीकडे गेली. झुंबराच्या उजेडात ते आणखी लखलखत होतं. त्याचं लक्ष जरा विचलित झालं तशी मशालीची लांब सळई झुंबरावर जराशी आपटली आणि बैठकीच्या खोलीतला झगमगाट थरथरला.
``सांभाळून, ममदू''
मेणबत्त्यांचा स्टँड साफ करता करता म्हटलेले अम्मीचे शब्द त्या थरथरणाऱ्या झगमगाटाबरोबर वहात आले. किमाम भरलेल्या तोंंडानं ममदू हसला. दारूच्या रिकाम्या बाटल्यांवरून त्याची दृष्टी अम्मीकडे वळली. ममदूच्या डोळयांत पुन्हा संतापाची लाली उमटली. अम्मी जाणून होती, की तिनं एक इशारा केला असता
तर ममदूनं पळभरात रिपोर्टरला खलास केला असता, किंवा काही क्षणातच रोशनीला चेचून टाकलं असतं. पण अम्मी गप्प बसून रोशनीचं उद्धट, बेमुर्वत वागणं चालवून घेत होती !
``अम्मी ! ह्या पोरटीला इतकं का डोक्यावर चढवून ठेवलंय तुम्ही ?''
``तुला तर ते ठाऊक असलं पाहिजे, ममदू !''
त्याच्याकडे रागानं टक लावून बघत अम्मी हसली. तिच्या त्या नजरेत असं काही होतं, की तो बैठकीच्या खोलीतून मुकाट्यानं निघून गेला. अम्मीलासुद्धा मग वाटलं, की ती ममदूला उगाचच रागावली. चूक तर तिची स्वत:चीच होती. तिनं मनात आणलं असतं तर रोशनीला तिनं ह्या थराला गोष्टी जाण्यापूर्वीच थांबवलं असतं. पण कित्येक वर्षांनंतर आता पुन्हा अम्मीच्या मनातली एक दुसरी अम्मी पुन्हा जागी झाली होती. रोशनीकडे बघताना कितींदा तरी असं वाटायचं की जणू काही ती स्वत:च समोर उभी होती आणि तिच्यासमोर अमीनाबाई जबाब मागत उभी होती. बोलत असायची रोशनी पण ऐकत असायची अमीनाबाई आणि रोशनीच्या आवाजात अम्मीचेच तेव्हाचे शब्द ऐकू यायचे -
``त्याला काही केलंत तर विष खाऊन जीव देईन मी !''
कितीतरी वर्षांपूर्वी मृत्यू पावलेली अमीनाबाई आज अम्मीला स्वत:च्या आत ठामपणे बसून बोलताना जाणवत होती. त्यात आणि रोशनीनं जेव्हा सांगितलं, की ती आई होणार होती, तेव्हा बसल्या जागीच किती वर्षं मागे जाऊन अम्मी थेट अमीनाबाईसमोर उभी राहून सांगत होती, ``मी आई होणार आहे मावशी.'' मावशीच्या आवाजातली अस्वस्थ घबराट रोशनीनं अम्मीच्या मनात उभी केली होती.
अमीनाबाई म्हणाली होती, ``आपल्यात बायका मुलांना जन्म देत नाहीत, समजलं तुला ?''
``पण मला हे बाळ हवंय्.'' रोशनीसारख्याच भक्कमपणानं अम्मी म्हणाली होती, ``आमचं प्रेम आहे एकमेकांवर.''
``इथं कोणी प्रेेम करायला येत नाही माझ्या बाळे !'' अम्मी म्हणाली, अगदी अमीनाबाई म्हणाली होती तसंच.
``जर त्याला तुम्ही काही केलंत, तर मी ....''
``तो वापरतोय फक्त तुला.''
``नाहीतरी इथं नुसतं वापरलंच जायचं असतं ना !''
``पैसे न मिळता वापरू द्यायचं असलं तर लग्न कर त्याच्याशी!''
अमीनाबाईचेच शब्द अम्मीच्या तोंडून निघाले.
``त्याचं लग्न झालेलं आहे.''
``आणि तरी त्या हमराखोराच्या पोराला जन्म देणार म्हणतेस? नालायक !''
``हो.''
``तुझं डोकं ताळयावर आहे ? तो हरामखोर रिपोर्टर इथं आला आपल्यासारख्या बायकांना इथून सोडवायला म्हणून, आणि तुला तर त्यानं दासीच्याही खालच्या जागी नेऊन ठेवलं !''
``तू काळजी करू नको , मी त्याच्याशी लग्न करणार नाहीये!''
अमीनाबाई अम्मी म्हणाली तसंच म्हणाली होती - ``मी तुला त्याला इतके वेळा भेटू दिलं, कारण तो हलकट तुला आवडला म्हणून. आणि आता तू त्याच्या पोराला जन्माला घालायला निघालीय्स ? इथं काय पोरांची शाळा काढायचीय् तुला ?''
रोशनीला हसू आलं होतं. - अम्मीही हसली होती, तेव्हा.
अम्मीला वाटलं की मांडीवर थाप मारत रिपोर्टर खदाखदा हसतोय्. ती बैठकीच्या खोलीतून बाहेर आली. रिपोर्टर हसत हसत जिना उतरत होता. अम्मीला बघून जरासा संकोचला. तिरक्या नजरेनं डोळयांच्या कोपऱ्यातून त्याच्याकडे बघून अम्मीनं तोंड फिरवलं. रिपोर्टर जिना उतरून भराभरा बाहेर निघून गेला. रोशनी त्याच्या पाठोपाठच उतरली, पण अम्मी समोर दिसली तशी परत वर जायला निघाली. अम्मीनं `थांब जरा' म्हणून तिला थांबवली. रोशनी धुसपुसत उभी राहिली.
``इकडे ये, माझ्याजवळ.''
रोशनी जिना उतरून तिच्याजवळ आली.
अम्मीनं तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. क्षणभर तिला वाटलं जणू अमीनाबाई अम्मीच्या चेहऱ्यावरून हात फिरवत होती.
``तुला बाळाला जन्म द्यायचाय ना ?''
अमीनाबाई म्हणाली होती, तसंच अम्मीनं विचारलं. रोशनीनं होकारार्थी मान हलवली.
``पण माझं एक म्हणणं तुला ऐकावं लागेल. हवं तर तू त्याला माझी अट म्हण.''
....पण रोशनीचा जन्म झाल्याबरोबर अम्मीच्या ऐवजी अमीनाबाईच `आई' होऊन गेली होती. अम्मी रात्र होटेलमध्ये काढायची तेव्हा रोशनीला दूध अमीनाबाईच पाजायची आणि आता अमीनाबाईच्या जागी अम्मी आली होती.
अमीनाबाईनं अम्मीला आई होण्यापासून थांबवलं नव्हतं तर ती तरी रोशनीला कशी थांबवू शकणार ?
*****
``अम्मी, थांब ना. येईलच आत्ता ती.''
अम्मीची संतापलेली नजर बघितली तशी रोशनी जरा घाबरली, पण तरी तिला बाकावरून उठावंस वाटेना. अम्मीकडे न बघताच तीही रागावून बसून राहिली. आतून नाव पुकारलं गेलं तशी तिच्या शेजारी बसलेली बाई उठली. रोशनीची नजर तिच्या पोटाकडे गेली. आठवा लागलेला दिसतोय, तरी कशाला येत असेल ही सेंटरमध्ये ? कदाचित मूल सरकलेलं वगैरे नाहीये ना बघायला येत असेल.
अम्मीनं परत एकदा चिडलेल्या चेहेऱ्यानं रोशनीकडे बघितलं. रोशनीला वाटलं आता उठावंच लागेल बाकावरून. तिनं `उठू या' अशी अम्मीला खूण केली. तेवढ्यात तिचं लक्ष दाराकडे गेलं. तिच्या चेहेऱ्यावर हसू उमटलं. ती दारापर्यंत धावत गेली.
``आज उशीर केलास ?''
``सासूला बरं नाहीये.''
``तिला पण बाळ होणारे काय ?'' असं म्हणता म्हणता रोशनीला हसू आलं. मग दोघींनी एकमेकींच्या पोटांकडे बघितलं. दोघींच्या हातांची बोटं गुंफली गेली, आणि त्याचबरोबर बाळाच्या हालचालींबद्दल हळू आवाजात एकमेकींना सांगूनही झालं.
``किती अशक्त झालीय्स तू ? डॉक्टरना सांगत का नाहीस, रजनी ?'' फिकं हसू तांेडावर आणत, पोटावरची चामडी ताणली जाऊन त्रास होत असेल तशा आवाजात रजनी म्हणाली, ``औषधापेक्षाही जास्त जरूर माझ्या मनाला शांती मिळण्याची आहे !''
पण मग अशी गोष्ट सांगण्याइतकी ओळख रोशनीशी नसल्याचं जणू तिला जाणवलं आणि तिनं ओठ घट्ट मिटून घेतले. रोशनीला ते आवडलं नाही. रजनीच्या घट्ट मिटलेल्या ओठांवरून तिच्या मनातल्या घुसमटीची कल्पना येत होती.
फार ओळख नव्हती त्यामुळं रजनीच्या घरचे लोक तिच्याशी कसं वागत असतील ते समजणं अवघड होतं. जे काही थोडं तिला समजलं होतं तेही ह्या सेन्टरवर येत असल्यामुळे, नाहीतर घरंदाज बायकांबद्दल तिला सांगायला कोणाला वेळ होता?
रजनीला पहिल्यांदा बघितली होती तिच्या सासूबरोबर आलेली. समोरच्या बाकावर बसली होती. आधी तर रजनी नकळतच रोशनीच्या जवळच बसली होती आणि तिच्या सासूचं डोकं फिरलं होतं. समोरच्या बाकावरून उठून ती अंगावर आल्यासारखी येऊन रजनीला म्हणाली होती, ``देव जाणे कुठे बसाय-उठायचं ही अक्कल तुला कधी येणार ?''
तो सुरीसारखा धारदार आवाज सेन्टरचं शांत वातावरण कापत गेला. रजनी तर पार गोंधळूनच गेली होती; तिला समजत नव्हतं की सासूची हरकत होती कोणत्या गोष्टीला ?
तेवढ्यात तर सासूनं तिला बकोटीला धरून उठवलीच होती आणि नाकावर पदर दाबत बडबडली होती, ``कोणाजवळ बसतेयस तेवढं तरी बघत जा !'' मग शेजारच्या बाईकडे डोळयांनी इशारा करत दबक्या आवाजात म्हणाली, ``ही तर `तसली' आहे!''
पण रजनीला समजलं नव्हतं की `तसली' म्हणजे कोण, कसली ?
तेवढ्यात रोशनीनं पावडर, लाली, लिपस्टीक सगळं थापलेला चेहरा तिच्याकडे वळवला, तेव्हा ती समजून गेली, की-
सासूनं रजनीला ओढत नेऊन समोरच्या बाकावर स्वत:च्या जवळच बसवली होती, पण का कोण जाणे, रोशनीला रजनी आवडली होती. रजनीकडे बघून ती मोकळया मनानं हसली. रजनीलाही तिचं हसणं आवडलं. पण सासू जवळ होती म्हणून ती फक्त हळूच हसली. मनातून तिला भीती तर होतीच, की कोणी सांगावं, अशा बायका आपल्यालाही कोठ्यावर ओढून न्यायच्या!
बाजारू बायकांबद्दल तिनं पुष्कळ ऐकलं होतं. रजनी स्वत: त्यांच्या वस्तीजवळच्या भागातच राहातच होती. रोशनीचा जायचा यायचा रस्ताही तोच होता. दोनतीनदा बाजारातून चाललेल्या रोशनीला तिनं बघितलंही होतं. एकदा तर रजनीकडे बघून हात उंच करून ती हसलीही होती. दुसरी कोणी असती तर रजनीनंही हात वर केला असता, किंवा तिला आपल्या फ्लॅटवर घेऊनही आली असती. पण ही तर -
एवढं खरं, की दोघी सेंटरमध्ये मधून मधून भेटायच्या, त्यामुळे समोरासमोर बसण्याच्या ऐवजी शेजारी शेजारी बसायला लागल्या होत्या, पण बोलायची सुरुवात प्रत्येक वेळी रोशनीलाच करावी लागायची. रजनीला तर जणू साधं बोलण्यातही कमीपणा वाटायचा.
``कितवा लागलाय ?''
नवशिक्या माणसाकडे बघावं तसं रजनीनं रोशनीकडे बघितलं. रोशनीनं मग विचारलं, ``पहिलं मूल असेल, हो ना ?''
``तिसरं.''
``आणि तू काही करत नाहीस ?'' रोशनीनं एकदम उसळून विचारलं. ``मी तर पहिल्या खेपेतच बेजार झालेय्, आणि तू --?''
``पहिल्या दोन मुली होत्या, गर्भ पाडून टाकले होते.''
``ह्या वेळी पण मुलगी असली तर ?''
``तर आणखी एक बाळंतपण, दुसरं काय ?''
रजनीनं थंडपणानं उत्तर दिलं.
``हाय अल्ला ! मी तर मरूनच जाईन, मला जर---''
``मरेन तर मीही !''
रजनी कडवट हसली. रजनीच्या डोळयांकडे रोशनीला बघवेना.
``तू ऑपरेशन -''
``जोपर्यंत मुलगा होत नाही तोपर्यंत नाही करू शकत.''
``तुला मुलगा हवाय ?''
``माझ््या सासूला मला मुलगा व्हायला हवाय.''
तेवढ्यात रजनीचं नाव पुकारलं गेलं आणि ती बाकावरून उठली. रजनीच्या शब्दांमध्ये आतून पेटून उठलेला तटस्थ थंडपणा होता. रोशनीचा एखाद्या सभ्य घरच्या बाईबरोबर असा संवाद करण्याचा हा पहिलाच अनुभव होता.
*****
दुसऱ्या आठवड्यात रजनी सेंटरमध्ये भेटली तेव्हा रोशनी तिला विचारणार की, ``तुझ्या नवऱ्याचं काय मत आहे ?'' तेवढ्यात रजनीनंच तिला एकदम विचारून टाकलं, ``तू तर `तसली' आहेस ना ?'' `तसली' शब्दाच्या उच्चारात जो सुप्त
तिटकारा होता, त्यानं रोशनी दुखावली होती, पण मग निर्ढावलेल्या निर्लज्जपणानं तिनं उत्तर दिलं होतं, ``हो - ! मी तर `तसली'च आहे -!''
रोशनीनं `तसली'वर जोर नाही दिला पण तिच्या समोर धरल्या गेलेल्या चुरगळलेल्या नोटा बघितल्यावर नाचवायची तसे डोळे मात्र तिनं छान नाचवले.
रजनीला बाकावरून उठून जावंसं वाटलं. तिनं तर ऐकलं होतंं की `अशा' बायका गर्भ वाढूच देत नाहीत. तर मग ही - का ? तिनं लगेच विचारूनच टाकलं, ``तुझ्यासारख्या बायका तर मूल होऊच देत नाहीत - तर मग - ?''
``हो !'' वर्ख लावलेला विडा ओठ पुढे काढून तोंडात कोंबता कांेबता चांदीची डबी टपली मारून रोशनीनं बंद केली आणि ती म्हणाली, ``तू म्हणतेयस ते बरोबर आहे, पण माझा एका रिपोर्टरवर जीव जडला आणि -''
आई होणार असल्याचा रोशनीला वाटत असलेला अभिमान रजनीला स्पष्ट जाणवला, बोचला. मनोमन ती म्हणालीही, ``आई होण्यात काय मोठी धाड मारायची असते, ते एवढं नाक वर करून सांगतेय् ! जळलं मेलं, मला तर दु:खच ह्या गोष्टीचं वाटतं, की''
रोशनीला चार शब्द सुनावायला तिनं तोंड उघडलंही, पण मग तिला तिच्या आनंदावर पाणी ओतावंसं वाटलं नाही, आणि ती सेंटरच्या पायऱ्या उतरू लागली. रोशनीनं तिला थांबवत म्हटलं, ``घरीच जातेय्स ना ?''
रजनीनं मागे वळून बघितलं आणि होकारार्थी मान डोलावली.
``मग थांब ना, आपण दोघी बरोबरच जाऊ या.''
``पण कोणीतरी मला तुझ्याबरोबर बघितली तर ?''
``मग त्यात काय झालं ?''
``माझा नवरा तर रस्त्यातच फाडून खाईल मला'' - आणि नवरा समोर येऊन उभाच राहिला असेल तशी ती नखशिखान्त थरथरली. ``नको ग बाई !''
रोशनीला प्रथमच समजलं की कधी कधी दोन स्त्रियाही एकमेकींना साथ नाही देऊ शकत. तिला हे खटकलं तर खरंच, पण मग ती म्हणाली, ``जाऊ दे, काळजी नको करू, नाही येत मी तुझ्याबरोबर.''
``लावून नको घेऊ हं मनाला, पण तुझ्याबरोबर दिसले तर कोणाला तरी वाटायचं, मीही ----!''
``कशी लाचारी आहे ना ? मनात असूनही तू मला तुझ्या घरी घेऊन जाऊ शकत नाहीस, आणि माझ्या घरी तू येऊ शकत नाहीस !''
मग दोघीजणी त्याच रस्त्याच्या दोन कडांनी एकमेकींकडे मधून मधून बघत बघत घराच्या दिशेनं चालत राहिल्या.
*****
एकाएकी तिला रोशनी दिसली. नेहमी रस्त्यानं चालत जाणाऱ्या रोशनीला तिची वस्ती जवळ असूनही रिक्षात बसायच्या तयारीत बघून रजनीला धक्काच बसला. पुष्कळदा तिला समोरून येताना बघून रजनी रस्ता बदलायची; पण आज रोशनी हुंदकेे देत रडताना दिसली, तशी ती जवळजवळ धावतच सेंटरजवळच्या रिक्षास्टँडकडे गेली. रिक्षात बसली. अम्मी रोशनीचे हात धरून थोपटत तिला रिक्षात बसायला सांगत होती. रजनीनं रोशनीला नेहमी हसतमुखच बघितली होती. तिला आज अशी कळवळून रडताना बघून रजनीचा चेहरा एकदम उतरला.
``काय झालं रोशनी ?''
एकाएकी समोर उभ्या ठाकलेल्या रजनीला बघून रोशनीला आणखीच रडू फुटलं. पण मग रजनीसमोर असं रडणं बरोबर नाही असं वाटून येणारे हुंदके रोशनीनं प्रयासानं दाबले. चेहरा पुसत तिनं रजनीकडे बघितलं आणि प्रयत्नपूर्वक हसून विचारलं, ``कशी आहेस ?''
``ठीक आहे'' रजनीनं तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, ``पण तुला काय झालं ?''
रोशनीनं तिच्या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या ऐवजी उलट प्रश्न केला, ``तू इथं कशी ? मागच्या वेळी तर डॉक्टरीणबाइंर्नीही तुला पुन्हा यायची जरूर नाही असं म्हटलं होतं---?''
``बस् ! असंच ---'' सवय होऊन गेलेलं हसू रजनीच्या चेहऱ्यावर उमटलं आणि कोण त्रयस्थाबद्दल बोलत असेल तशा आवाजात ती म्हणाली, ``मुलगी आहे, पाडून टाकायचीय. सासू येतेच आहे पाठोपाठ.''
हे ऐकल्याबरोबर अम्मीनं रिक्षातून डोकं बाहेर काढलं आणि रजनीला म्हटलं; ``नको पाडून टाकू मुलीला !''
``पण माझ्या सासूला मुलगी नकोय् !'' मग रोशनीकडे बघत रजनीनं विचारलं - ``तुला - काय झालं ?''
``मीही पाडून टाकूनच ---'' रिक्षा चालू झाली त्या घरघराटात बाकीचे शब्द विरून गेले.
``पण का ?'' रजनीला कमालीचं आश्चर्य वाटलं; ``तीही मुलगीच होती की काय ?''
``मुलगा होता ---'' बोलता बोलता रोशनीनं तोंड फिरवलं.
रागानं पेटून उठलेल्या डोळयांनी रजनीनं अम्मीकडे बघितलं आणि रिक्षा दिसेनाशी होईपर्यंत बघतच राहिली.
*****
मूळ गुजराथी कथा - मर्म
लेखक - रवीन्द्र पारेख
अनुवाद - अंजनी नरवणे, पुणे



order cialis online
hdrdoknu order cialis online nyBBR cialis =-] viagra >:-[ viagra 6145 buying cialis online 8]]] viagra pills >:-OOO
order viagra online
ewmgspb order viagra online SxGuF viagra KnwPz order tadalafil online 0333 where to buy tadalafil 9584 alternatives to cialis :-O viagra QPeWFy
viagra
sanjhpy http://gbuplk.com/ vwzebioy [url=http://rhunrt.com/]vwzebioy[/url]
viagra
fafhmvj http://pvjcae.com/ hpbtsjxj [url=http://tflxfg.com/]hpbtsjxj[/url]
viagra
sntsjydp http://myuajp.com/ tjipwbe [url=http://wcoscx.com/]tjipwbe[/url]
khrpoxn
hctajsod
ibzyrix
iyofak
Michael Vick Authentic
Michael Vick Authentic Jersey
DeSean Jackson Authentic Jersey
Nnamdi Asomugha Authentic Jersey
Brent Celek Authentic Jersey
LeSean McCoy Authentic Jersey
DeSean Jackson Jersey
Michael Vick Jersey
Nnamdi Asomugha Jersey
Brent Celek Jersey
LeSean McCoy Jersey
Asante Samuel Jersey
Brandon Graham Jersey
Jeremy Maclin Jersey
Nathaniel Allen Jersey
Randall Cunningham Jersey
Reggie White Jersey
Stewart Bradley Jersey
Wes Hopkins Jersey
Dominique Rodgers-Cromartie Jersey
Customized
LaDainian Tomlinson Authentic Jersey
Darrelle Revis Authentic Jersey
Nick Mangold Authentic Jersey
Mark Sanchez Authentic Jersey
Dustin Keller Authentic Jersey
Jets Jersey
New York Jets Jersey
Cheap Jets Jersey
Antonio Cromartie Jersey
Bart Scott Jersey
Brett Favre Jersey
D'Brickashaw Ferguson Jersey
Darrelle Revis Jersey
Dennis Byrd Jersey
Dustin Keller Jersey
Dwight Lowery Jersey
Joe Klecko Jersey
Joe Namath Jersey
Kyle Wilson Jersey
LaDainian Tomlinson Jersey
Laveranues Coles Jersey
Leon Washington Jersey
Mark Gastineau Jersey
Mark Sanchez Jersey
Muhammad Wilkerson Jersey
Nick Mangold Jersey
Plaxico Burress Jersey
Santonio Holmes Jersey
Shonn Greene Jersey
Thomas Jones Jersey
Vernon Gholston Jersey
Wesley Walker Jersey
the practical components
the practical components encircling the actual watch-face. There are more choices in which the watch??£¤s system is visible because aspect look at or swiss replica watches . I’ve this individual bar, unique Aikan Shu. louis vuitton handbag the trunk now I’ve turn out to be a haven for my guide. Occasionally driving out stroll replica chanel esemblance from the authentic counterparts.Although the watch will probably be known as a fake, it’s all of the essential properties of an authentic watch. swiss replica watches t watches tend to be transporting inside all of the dependability in addition to all of the finesse Cartier usually represented. Consider your own bit of top swiss replica watches designs of watches from the branded ones? It can be now feasible to purchase low cost replica watches and giving us the expertise wearing designer’s collection that chanel replica ed by trustworthy merchants exactly where the first is certain of the greatest high quality at most inexpensive plan for the actual daily st swiss replica watches target of the rip-off.Usually, replica wrist watches cost between $50 as well as $500 or even more. Right now, $500 help to make appear to be a fortun chanel replica s vuitton ought to not be some thing to obtain this kind of a large fuss – and, she did also aims to assist other people. The media have also created this c rolex replica nt options on their behalf. These types of watches appear much like the actual types, plus they attend the cost that’s within the actual achieve as Replica Handbags ses who require not have access to the a pretty tiara attached for their locks in order to seem like 1. These footwear provide you with the addition uk replica watches are replications . of the greatest manufacturers. With one of these footwear obtainable in a number of dimensions for males, ladies and kids style has b uk replica handbags inexpensive replica watch can function as much as numerous many years with out repairing.LV’s style director Marc Jacobs in 2001 co-operation using replica watches enthusiasm that a female selects the woman’s footwear? She would like my way through all of them and it is definitely not likely to give up within this 1 e replica watches uk The examples of Inexpensive Replica watch are replica Cartier Balloon Blue, Replica Rolex Match Grasp watch, Replica Hublot large bang purple carat and l Replica Watches ly, and also the pattern continues to be ongoing.This excellent sequence offers accurate selection within colours, styles, knobs as well as alloys. Th replica watch le princess Diana after which demonstrated because the woman’s the majority of favored purse. Home of Dior had been set up within London, 1946. Within 1950, chanel replica style pattern with regard to both women and men. Replica wrist watches tend to be replicas associated with really high-priced wrist watches. They ap chanel handbags eeded is extremely higher, but stated the wage will be the company’s trade secrets and techniques, an undisclosed quantity. Meanwhile, the official stated la replica watch