१९७१ साली मराठवाड्यात दुष्काळ पडला त्यावेळेस मी दहा वर्षांची होते. माझं गाव शिरनेर, तालुका अंबड आणि जिल्हा जालना होय. माझ्या वडिलांनी दोन लग्नं केलेली. पहिल्या आईला तीन मुली झाल्या. माझी आई नंतरची. माझ्या आईला पाच मुलं, तीन मुली व दोन मुलं. दुष्काळ पडल्यावर प्रथम आई एकटीच मुंबईला आली. घाटकोपरला माणिकलाल कंपाऊंडमध्ये तिनं बेग्रामच्या काड्या आणून झोपडं बांधलं. नंतर आम्ही पाची भावंडं मुंबईला आलो. आई कचरा वेचायला जायची. तिच्या मागून छोटी गोणी घेऊन मीबी कचऱ्यावर जायची. तीन वर्षांनी मला बाबांनी गावी बोलवून घेतलं. तिथे विठ्ठल साबळेच्या भावाने मला बघितलं. लग्न ठरविलं. विठ्ठल साबळे हे शिवडीला कंपनीत कामाला आहेत असं सांगून हे लग्न झालं. लग्न गावी झालं. लग्नानंतर मी मुंबईला आले. नवरा काहीच काम करीत नव्हता. त्यामुळे मी परत कचऱ्यावर जायला लागले.
नवरा काहीच काम करीत नसल्याने मी त्यांना `लग्न कशाला केलेत?' असं विचारायची. पण ते काहीच बोलायचे नाहीत. पण मला सोडून गावी निघून जायचे. मग मी आईकडे यायची. दोन तीन महिन्यांनी गावावरून परत आले की आईला मला परत पाठवा म्हणायचे. भाऊ मला मग परत सासरी पाठवायचे. असं जवळजवळ दोन वर्षं चालू होते. विठ्ठल दारू प्यायचे. झोपून राहायचे. सारखे आजारी पडायचे. काम तर काहीच करायचे नाहीत. मला त्यांचा फार कंटाळा यायचा. `हा माणूस असा आळशी कसा ? काम करत नाही. गावी जातो परत येतो.' असं मला वाटायचं.
एकदा ते गावी जायला निघाल्यावर `तू आता परत यायचे नाहीस' असं मी सांगितले. त्यावेळी मी चार महिन्यांची गरोदर होते. आठव्या महिन्यात ते आले व गावी चल म्हणू लागले. पण मी गेले नाही. मी आईकडे आले. मला मुलगा झाला. भावाने मला घेऊन जायचा निरोप धाडला. पण ते आले नाहीत. मुलगा अडीच वर्षांचा झाल्यावर दारू पिऊन घरी आले. मी कचऱ्यावर गेले होते. भावाशी भांडण केले. त्यानंतर गावी गेले ते एकदम १३ वर्षांनंतर आले. मुलगा आठवीला होता. इथेच राहू. खोली भाड्यानं घेऊ, म्हणाले. पण आता तुमच्यावर मी कसा विश्वास ठेवू ? असं मी त्यांना म्हटलं. मला यायचं नाही असंही सांगितलं. ते गावी गेले ते आजपर्यंत आले नाहीत. गावी त्यांनी दुसरं लग्न केले.
आज मुलगा लिप कंपनीत कामाला आहे. शाळेला गेला. चांगला शिकला. कधीही नापास झाला नाही. १०वी पर्यंत म्युनिसिपालिटीच्या शाळेत शिकला. आंबेडकर कॉलेजात १२वी कॉमर्स केलं. बिझनेस मॅनेजमेंटचा तीन वर्षांचा कोर्स केला. हे सारं त्यानं आपल्या मनानं ठरविलं. केलं. कोणाचंही मार्गदर्शन नव्हतं.
मी घाटकोपर, नारायणनगर येथे कचरा वेचायला जायची. कागद, प्लॅस्टीक वेचायची. सकाळी सहाला जाऊन साडेपाचला घरी यायची. दर दिवशी काटेवाल्याला कचरा विकायची. कधी चाळीस कधी तीस रुपये म्हणजे भरपूर कमाई वाटायची.१९९८ साली स्त्री मुक्ती संघटनेचे कार्यकर्ते जागृतीनगर घाटकोपर येथे आले. आमचा पहिला बचतगट झाला. बचतगटामुळे आमची महिना शिल्लक पडू लागली. अडीनडीला कर्ज भेटू लागलं. सावकारीतून सुटका झाली. आमची आरोग्याची कामं होऊ लागली. आजारी बायका दवाखान्यात जायला लागल्या. रेशनची कामं होऊ लागली. आमची मुलं शाळेत जाण्यासाठी संघटना प्रयत्न करून लागली. त्यामुळे बायांना चांगलं वाटायचं. २००० साली संघटनेनंआमचं प्रशिक्षण घेतलं त्यावेळी आलेल्या पाहुण्यांचं आभार मानणं करताना मी बोलायला शिकले. संघटनेनं फेडरेशन करायचं ठरविलं व मला त्याचं अध्यक्ष केलं.
मी शाळेत गेलेच नाही. संघटनेत आल्यावर लिहायला वाचायला शिकले. टाटा पवईमध्ये दोन वर्षं साफसफाई व खताचं काम केलं. नंतर संघटनेनं ऑफिसमध्ये घेतले. बचतगट फेडरेशनची अध्यक्ष म्हणून वस्तीत जाऊन विस्कळीत गटाच्या मिटिंग्ज घेते. गट व फेडरेशन यांच्यामध्ये वरची कमिटी असून त्यांच्याही मिटींग्ज घेते. कर्जव्यवहार बघते. वस्तीतल्या बायकांच्या घरगुती अडीअडचणी समजून घेते. कार्यक्रमातून संघटनेची माहिती सांगायचा धीटपणा आला आहे.
आमच्या कचरा वेचकांना अनेक अडचणी आल्या आहेत. आमचे पोट हातावर आहे. सगळया बायकांचे नवरे दारूडे आहेत. चारपाच पोरांचा सांभाळ तीच करते. घरातलं वातावरण बघून मुलं शिकत नाहीत. काम करीत नाहीत. व्यसनी होतात. कचरा भेटत नाही. धंदा कमी होवो की जास्त नवऱ्याला दारूला पैसा द्यावा लागतो. सकाळी जाताना बिडीला पाचदहा रुपये द्यावे लागतात. काही बायकांचे नवरे कामाला आहेत. पण आलेला पैसा दारूवर संपवतात. घरी देत नाहीत. फेडरेशनमार्फत कचरा ठेवायला शेड बांधली आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये आम्ही महिला कँटीन चालवितो. याची देखभाल, सुपव्हिजन मी करते.
मुंबई स्वच्छ हवी असं आम्हालाही वाटतं. महापालिकेनं आम्हा कचरा वेचकांना कामात सामावून घेतलं पाहिजे. लोकांना सुका कचरा वेगळा मिळाला पाहिजे. झाडूवाला, घरकाम करणारी बाई महापालिकेचा माणूस कचरा वेचतो. आम्हांला शेलका कचरा मिळत नाही. लहानपण खूप दारिद्रयात गेले. आई मातीकाम करायची. वडील काही काम करीत नव्हते. कारभारी होते. व्यवहार बघायचे. हुशार होते. आईला बाहेरचा शहाणपणा नव्हता, पण खूप कष्टाळू होती. कष्ट करून तिनं आम्हांला सांभाळलं आहे. समाजात कसं राहावं हे माझा अपंग भाऊ मला सांगायचा. छोट्या बहिणीनं आधार दिला. बहिणीमुळेच संघटनेतून दिल्ली, कलकत्त्यापर्यंत जाऊन आले. मला वाटायचे मी शून्य दगड आहे. संघटनेमुळे खूप शिकले. सुरवातीला बचत गटाच्या मिटिंगमध्ये सगळयात मागं बसायची. आता एकदम पुढे असते. समाजाच्या घडामोडी माहिती झाल्या. भावाच्या प्रॉपर्टीत बहिणीचा अधिकार असतो हे कळलं.
मी इथपर्यंत आले. सगळयांना खायला भेटले पाहिजे. सगळया हुशार झाल्या पाहिजेत. पण हे होईल का असंही वाटतं. पूर्वीचं दु:ख, वेदना मी संघटनेत आल्यापासून विसरले. माझ्यात बदल झाला. दुसऱ्याला सुखी करण्यासाठी धडपडावं असं आता वाटतं.
सुशीला विठ्ठल साबळे
शब्दांकन - वृषाली मगदूम, वाशी
Posted in



पण आता प्रमोद नारगोळकर
पण आता प्रमोद नारगोळकर त्सुनामीमध्ये बेपत्ता आहेत. त्यांचा कारखाना त्यांचा मुलगा आणि सून सांभाळत आहेत. त्यांची मुलगीही इंजीनिअर आहे आणि सध्या अमेरिकेत आहे. वडिलांच्या निसर्ग प्रेमाला आणि वेडाला तिचा पूर्ण हातभार असे, आहे. नारगोळकरांच्या पश्चात त्यांची पत्नी नयना यांचा निर्धार आहे की नारगोळकर यांचं स्वप्नं मला पूर्ण करायचं आहे. नयनाची पूर्ण श्रद्धा आहे, की सुनामीत बेपत्ता असलेले तिचे पती आज ना उद्या परत येणार आहेत. कोकणातल्या महाड गावी जन्म आणि बालपण गेलेल्या प्रमोद नारगोळकरांच्या रक्तातच निसर्गप्रेम आहे. नैसर्गिक आपत्तीनंच त्यांना तडाखा दिला आहे. निसर्ग चमत्कार झाला तर ते परतही येतील. आपण काय करू शकू? वेळ, पैसा आणि आवड असली की त्याचा विनियोग 646-364 braindumps E22-275 braindumps 70-290 braindumps 70-667 braindumps 350-029 braindumps JN0-101 braindumps 650-195 braindumps JN0-660 braindumps Printable GED Practice Test 2012