आधी माझ्या आजीने माझ्याशी भांडण मांडलं आणि मग, बहुतेक, मी तिच्याशी ! आमच्या स्वत:च्या आईला आम्ही `अम्मा' म्हणत असल्यामुळे ह्या तिच्या आईला `आई' म्हणायला लागलो. मी तिची खरं म्हणजे पहिली नात. तसे माझ्याआधी तिला दोन नातू होते, पण `नात' मी पहिली. मात्र त्यामुळे काही खास कौतुक माझ्या वाट्याला आलं असं नाही.
तिचं माझ्याशी नेमकं काय भांडण होतं हे आधी मला कळत नसे. पण माझा मोठा भाऊ दीपक हे तिचं पहिलंवहिलं नातवंडं. तो लहानपणी अशक्त होता. अहमदाबादचं टोकाचं हवामान त्याला सोसणार नाही म्हणून असावं बहुधा, ती वर्षभर त्याला स्वत:कडे घेऊन गेली होती. हा आपल्यापाशी राहिलेला, सर्वात पहिला, कौतुकाचा नातू तिचा अगदी लाडका. माझी ह्या गोष्टीला काहीही हरकत नव्हती. हा दीपक लाडका, मग `मुलाचा मुलगा' म्हणून राजीव प्यारा - अगदी हिच्या `आत्म्याचा राम' वगैरे. (म्हणून राजीवचं पाळण्यातलं नाव `आत्माराम' !) आणि मग एकदम नंबर कोणाचा ? तर नीलिमाचा - म्हणजे माझ्यानंतर जन्मलेल्या माझ्या मामेबहिणीचा. म्हटलं तर हीपण `मुलाची' मुलगी. तेव्हा हेही ठीक ! तो काळ होताही `आपल्या' मुलाचा अगदी `बाब्या' करण्याचा. पण यावेळी लाडके-दोडकेपणाचा तिचा जो निकष होता, तो मला बोचणारा होता. अगदी जखम करणारा होता. हा निकष होता गोरे-काळेपणाचा.
ही आजी गोरीपान. दीपक गोरापान. राजीवचं सोडा, तो एकदा `आत्म्याचा राम' ठरला - आणि शिवाय तो गोरा. आणि मग नीलिमा लखलखीत गोरी. मनीषा सावळी ! इथेच मी तिचं घोडं मारलं. किती आणि कसं ? तर -
`तू नको माझ्याजवळ येऊन चिकटू. मला तुझा रंग लागेल.' असं म्हणत मला दूर सरकवण्याइतकं !
लहानपणीच हे एवढं झाल्यावर खरं तर मीही कशाला तिच्या वाऱ्याला फिरकावं ? - एरवी मला माझ्या `गोरे' नसण्याची काही फिकीरच नव्हती. पण व्हायचं नेमकं असं की वर्षातून किमान एकदा तरी सुट्ट्ीत आम्हांला नागपूरला आजोळी जावं लागायचं. बहुधा ह्या सुट्ट्यांमध्ये माझी मावस आणि मामेभावंडंही नागपुरात असायची. कधी आर्मीत असलेल्या माझ्या मामाचं पोस्टिंग नागपूरलगतच्या `कामठी'त असल्यामुळे; कधी टेरिटोरियल आर्मीतल्याच मावशीच्या यजमानांची खुद्द नागपूरलाच बदली असल्यामुळे; किंवा कधी आमच्या मोठ्या माणसांनी सुट्टीला एकत्र यायचं ठरवल्यामुळे.
बडेदादा - आई यांचा मोठा बंगला मग नातवंडांनी गजबजून जायचा. खुद्द आम्ही मुलं एकत्र आल्यामुळे खुश असायचो. ह्या नांदत्या-गाजत्या घरावर आईची निरंकुश सत्ता होती. तिच्या अस्तित्वाचा दरारा घरात असायचा. तिचं व्यक्तिमत्त्वही `भारदस्त' हा शब्दही जरा कमीच पडावा असं होतं. मुळात ती उंच होती. तिच्या लहानपणी ती (त्या काळात) झाडावर चढणं, सूर-पारंब्या, क्रिकेट यासारखे मुलांचे उद्योग आपल्या भावांबरोबरीने करायची असं मी ऐकून होते. झाडावरून पडल्यामुळे झालेल्या खोल जखमेची खूणही ती आपल्या अंगावर बाळगून होती.
आणि मग वयाच्या एका टप्प्यावर ती प्र-चं-ड लठ्ठ झाली. माझ्या जन्माआधीच. बहुधा तिच्या शेवटच्या बाळंतपणानंतर जडलेल्या व्याधीमुळे. तेव्हा मला ती तशीच आठवते. ह्या लठ्ठपणामुळे तिला बाजारात मिळणारी नऊवारी लुगडी पुरायची नाहीत. नागपूर हे विणकरांचं गाव. तर ही स्वत:साठी ह्या त्या रंगाची, काठपदरांची कधी खडीची तर कधी बुट्ट्यांची आणि बहुतेक करून सर्व खऱ्या जरीची साडेनऊवारी लुगडी काढून घ्यायची. (पुढे माझ्या मावशीकडे लखनौला गेली, तर तिथेही हिने साडेनऊवार साडी भरून घेतली - ऑर्डर देऊन, पडेल ती किंमत मोजून !)
तिच्या स्वभावातच `हौस' या शब्दाला लाजवेल एवढी हौस होती. आवड, सुंदर, खास गोष्टींची आवड आणि आवड म्हणजे त्या तशा गोष्टी स्वत:जवळ असण्याची आवड. कपडे, दागिने, क्रोकरी, भांडी, सोनं-चांदी, हिरे-माणकं - जे म्हणून उच्च प्रतीचं, देखणं ते तिला स्वत:कडे हवं असे. सरंजामे मंडळी पट्टीची `चहाबाज'. सवाष्ण जशी कुंकवाला नाही म्हणत नाही, तसे सरंजामे `चहा'ला नाही म्हणत नसत. आईकडे यायचा तो ब्रुक-बाँडचा चहा. त्या काळातली इंग्लिश कंपनी. हा चहा तिथून यायचा. या चहाबरोबर कंपनी कूपन्स पाठवायची; आणि ती ठराविक संख्येची जमा केली की इंग्लिश क्रोकरी, कटलरी इंग्लंडहून पार्सलने यायची. आईने अशी हजारो कुपनं जमवून - कंपनीच्या छापील क्रॅटलॉगमधून निवडून एका डिझाईनचे टी-सेट्स्, डिनर-प्लेट्स्, कटलरी - असं सर्व जमा केलं होतं. हे सारं विकत घेता येत नव्हतं म्हणून नव्हे (कारण ते एरवीही घरात होतंच !) तर हिची हौस म्हणून.
वयाच्या चौदाव्या वर्षी आईचं लग्न झालं. वऱ्हाडात `मालगुजार' म्हटला जाणारा साधारण जमीनदार वर्गात मोडणारा वतनदार असे. अशा एका संपन्न भिडे कुटुंबातून ती तशाच सुखवस्तू सरंजामे कुटुंबात आली. एकत्र कुटुंब असल्यामुळे लगेच फार जबाबदाऱ्या अंगावर पडल्या नाहीत, पण ती घरातली मोठी सून होती आणि चार दीर, दोन-चार नणंदा, सासू-सासरे असं मोठं, नांदतं घर होतं. तशात वयाच्या विशीपर्यंत तिला तीन मुलंही झाली. माझी अम्मा ही तिची मोठी मुलगी. आईच्या सोळाव्या वर्षी तिला झालेली. हळूहळू दीर-नणंदा आपापल्या मार्गी लागले आणि सासू-सासरेही कधी `तळणी'ला शेतावरच्या घरी तर कधी अमरावतीच्या त्या मोठ्या घरी राहू लागले. कर्तेपण आईकडे येत गेलं. तिचा स्वत:चा संसार स्थिरावू लागला आणि त्याची आर्थिक घडीही छान बसत गेली. कारण माझे आजोबा त्या काळात पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून सरकारी नोकरी करत होते. पुढे त्यांची स्वत:ची प्रॅक्टिसही सुरू झाली. प्रतिष्ठा आणि पैसा दोन्ही येत गेले. मी आईला एखाद्या महाराणीसारखी दिमाखातच जगताना पाहिली. रावबहाद्दर र. द. सरंजामे यांची अर्धांगिनी म्हणून समाजात वावरताना पाहिली.
घरावर तर तिची अधिसत्ता होतीच. हे घर तिच्या शब्दावर नव्हे नजरेच्या इशाऱ्यावर चालायचं. आम्ही सुट्टीला जायचो तो नागपूरचा ऐसपैस वऱ्हाडी बंगला. पुढे मोठी बाग. मागे परसदारी मोठं तुळशीवृंदावन, अनेक फळझाडं आणि एक दुमजली आऊटहाऊस. घरात बिसेसर नावाचा खूप जुना छत्तीसगढी नोकर - चोवीस तास. बागेसाठी माळी, स्वयंपाकाला एक महाराज, गाडीवर ड्नयव्हर आणि एकदोन मोलकरणी, (जास्तीच्या मदतीला
लागली तर `बिसेसरकी बुढ्ढी !') इतका ताफा. सरंजामे आडनावाला शोभेसा.
बंगल्याच्या सर्वच खोल्यांचा आकार `हॉल' या सदरात जमा होईलसा. पुढेपासून मागेपर्यंत एक मोठा पॅसेज. अगदी दारात येऊन उभा राहिलेला माणूस आईला थेट मागीलदारी दिसावा असा. बडेदादाचं ऑफिस बंगल्याच्या पुढच्या भागात. त्याला स्वतंत्र प्रवेशद्वार. सकाळपासून तिथे पक्षकार किंवा इतर कोणी कोणी. तेवढा भाग सोडला तर आम्हांला कुठे मज्जाव नव्हता. ऑफिससमोर वर गच्चीत जायचा जिना. गच्चीला उंच कठडे असल्यामुळे आम्हांला तिथेही मुक्त प्रवेश. एकूण हे घर `आजोळ' ह्या नावाला साजेसं होतं.
सुट्टीसाठी जमणाऱ्या आम्हा भावंडांमध्ये बऱ्यापैकी एकोपा होता. जुजबी कुरबुरींपलीकडे भांडणं कधी जायची नाहीत. आम्ही सगळे एकत्र आलो की आईच्या हौशीपणाला भरपूर वाव मिळायचा. तिच्या हौशीला मर्यादा तर नव्हत्याच. त्यात स्वत:साठी जे हवं ते तर होतंच सारं, पण इतरांसाठी करण्याची, नाना प्रकार करकरून खायला घालण्याची हौस होती. आई होतीही सुगरण ! जाळीदार, हलक्या सुतरफेण्या हा तिचा हातखंडा होता. माझ्या वडिलांना त्या आवडतात म्हणून प्रचंड खटाटोपाचा हा पदार्थ ती आवर्जून करायची. खवा-रवा-बेसनाचे `राघवदास' अशा मजेदार नावाचे लाडू तिच्याच हातचे खावेत ! आमच्यासाठी ही रेलचेल डबे भरून ठेवलेली ! शिवाय संत्र्यांच्या मोसमात गेलो तर संत्री,सीताफळांच्या सीझनला मोठमोठाली सीताफळं !
आईच्या या खाद्ययात्रेत काहीही थोडं-मोजकं वगैरे नसे. `अतिरेकी' वाटावं अशा प्रमाणात हे सारं तिच्या घरात असायचं. आम्ही मुलं तर मुलंच होतो. पण तिचं स्वत:चं खाण्यावर अक्षरश: प्रेम होतं. तेही भरपूर, मनसोक्त. एकावेळी बसून अगदी `आता पुरे' असं वाटेपर्यंत खायला तिला आवडे. फळांच्या टोपल्या-करंड्याच पुढ्यात ओढून बसायचं. प्लेटमध्ये काढून नेमस्त खाणं तिच्या पठडीत बसलंच नाही कधी. अहमदाबादला आई आमच्याकडे आली की तिथलं प्रसिद्ध `हॅव-मोअर' आईस्क्रीम खायला तिच्याबरोबर जाणं ही मोठी पर्वणी ! कारण तीच एकापाठोपाठ एक इतकी आईस्क्रीम्स खायची की आम्हांला `आता पुरे' कोण म्हणणार ? तीच गोष्ट आम्ही कोल्हापूरला असताना आंब्याची. पिकलेल्या उत्तम हापूसची पेटीच समोर ओढून, साली-कोयींसाठी ताट पुढ्यात ठेवून सुरुवात ! तिच्या त्या छान ऐसपैस देहाला साजेसं तिचं हे आवडीचं खाणं असे. पण कधी त्यामुळे प्रकृतीला काही झालेलं ऐकलं नाही. कारण त्या तशा देहासकट ती इतक्या गोष्टी करायची दिवसभर की ते सर्व जिरूनच जात असेल, केव्हाच!
घरात नोकर-चाकर आहेत म्हणून ही सुस्तावून बसली आहे हे दृश्य कधीही दिसायचं नाही. थेट पुढच्या बगिच्यापासून मागच्या अंगणापर्यंत सर्वत्र हिचा अखंड संचार ! कामं उकरून काढायची. कधी तत्कालीक तर कधी साठवणीच्या पदार्थांच्या तयारीत किंवा ते बनवीत ही कायम कामात. तिची सर्व कामं `खुर्ची-पातळी'वर बसून चालत. म्हणजे असं की तिची स्वयंपाकाची चूल व कट्टा दोन्ही आपण खुर्चीवर बसतो त्या पातळीवर खास बनवून घेतलेला होता. कारण तिच्या केवळ लठ्ठपणामुळेच नव्हे तर बरीच वर्षं पोटात असलेल्या हार्नियामुळे जमिनीवर बसणं किंवा तिथून उठणं तिला जमणारं नव्हतं - आणि वजनामुळे खूप वेळ उभं राहाणंही !
स्वयंपाकघराखेरीज आई सकाळी दिसायची ती तिच्या देवघरात. हे देवघर म्हणजे एक स्वतंत्र मोठी खोली. त्यात एक अर्धी भिंत व्यापलेला मोठा, देखणा देव्हारा आणि त्यात होते असंख्य देव ? मूर्ती, तस्वीरी, पूजासाहित्य, उपकरणी - सगळा चांदीचा लखलखता देव-संसार ! पूजेसाठी तिला भरपूर फुलं लागायची. आणि ती सर्व तिच्या बागेत होती. एरव्ही ती स्वत: भल्या सकाळी फिरून ती गोळा करायची. आम्ही असलो की बागेत हुंदडायचं हे काम आम्हांला आवडायचं. बेल, तुळस, मरवा आणि तऱ्हेतऱ्हेची, रंगांची, वासांची फुलं यांनी तिची परडी भरून जायची.
आईचे उपास-तापासही असायचे. पण ते व्यवस्थित उपासाच्या पदार्थांसह `साजरे' व्हायचे. `पोटाला विश्रांती' वर्गातले ते नसत. आम्ही अशावेळी दोन्ही प्रकारच्या खाण्याचा समाचार घ्यायला तयार ! कारण हे पदार्थही थोडे, स्वत:पुरते हा प्रकार नाही. तिला काहीच थोडं, स्वत:पुरतं करणं जमलं नाही.
ह्या नियमात मग छानछान गोष्टी बनवणं, आणणं हेही आलं. कुठे प्रवासाला गेली तर तिथल्या खास वस्तू, साड्या, शाली जे असेल ते भरपूर आणायचं. चार हव्या असतील तर किमान चौदा साड्या आणायची आणि मग माहेरवाशिणी, सासुरवाशिणी, लेकी, सुना-नाती ज्या येतील, आठवतील त्यांना उत्साहाने वाटायची. आईकडे जाऊन आलं आणि छानशा वस्तूंची, कपड्यांची भर आपल्यापाशी पडली नाही, हे अशक्य !
ती स्वत: अप्रतिम शिवण, भरतकाम व विणकाम करायची. शोभेच्या, वापराच्या देखण्या वस्तू बनवणं हा तिच्या रिकाम्या (म्हणजे कोणत्या, कोण जाणे !) वेळेतला छंद होता. हे सर्व करायचं ते कोणाकोणाच्या नावचं. ह्याच्यासाठी-तिच्यासाठी-अमुकच्या मुलांसाठी आणि तमुकच्या नातींसाठी ! तिच्या हातच्या, नेटला रंगीत मण्यांच्या झिरमिळया लावलेल्या `डॉयलीज' कितीतरी वर्षं आमच्या घरी पाण्याच्या भांड्यांवर झाकलेल्या असत. तिच्या कलाकुसरीने बनवलेल्या वस्तूंनी तिचं घर भरलेलं असे. सगळं करणं सुबक, सुंदर, भरपूर ! कुठून एवढा उत्साह आणि ऊर्जा ती आणत होती, कोण जाणे !
खरं म्हणजे ही बाई स्वत:च मूर्तिमंत `ऊर्जा' होती. स्वस्थ बसणं माहीत नसलेली.घरातलं हे % एवढं सारं करून ती बाहेरच्या जबाबदाऱ्या अंगावर घ्यायची. भजनीमंडळात अनेक वर्षं जात होती. तिचा गळा गोड होता. बेडेकर नावाचे मास्तर ठेवून ती नाट्यसंगीत, भजन असे उपशास्त्रीय प्रकार रीतसर शिकली होती. तिच्या सासूबाई प्रवचनं करायच्या, तर ही मागे गाण्याची साथ करीत असे. एरवी सासूशी फारसं जमलं नाही कधी, पण इथे ही पाठीशी!
नागपुरात अनेक समाजकार्यांत आई सहभागी व्हायची. स्त्रियांसाठी कामं करणाऱ्या `अहिल्यामंदिर' या संस्थेच्या मावशी केळकरांचा ती उजवा हात होती. आपला वेळ, पैसा, शक्ती, कौशल्य मनापासून, भरभरून देण्याची तयारी ! त्यामुळे यमुताई सरंजामे या नावाला समाजात एक प्रतिष्ठा होती.
आईचं औपचारिक शिक्षण शाळेतच अर्ध्यावर सुटलं होतं. पण बुद्धिमत्ता आणि व्यावहारिक शहाणपण तिच्यापाशी उपजत होतं. माझे आजोबा गमतीने म्हणत, ``शिकली असती तर बॅरिस्टर होऊन मला घरी बसवलं असतं.''
ह्या जोडीने होती शिस्त, काटेकोरपणा, प्रामाणिकपणा आणि टापटीप. ही टापटीप काहीवेळा इतकी पराकोटीची की त्यावर हसायचं नाही म्हटलं तर जाचच व्हावा. रेल्वेतून प्रवास करायची पहिल्या वर्गाच्या `कूपे'मधून. डब्यात शिरलं की प्रथम स्वत:चं सामान अत्यंत शिस्तीने लावायची. मग समोर एखादं ऐसपैस पसाऱ्याचं कुटुंब दिसलं की त्यांचा पसारा आवरायला घ्यायची. आधी कुटुंबातल्या धनी-धनीणीला मुलाबाळांसकट `जरा बाहेर' थांबायला सांगायची. रात्रीसाठी आणि प्रवासात मुलांसाठी काय लागणार ते विचारून ते पुढे, हाताशी आणि बाकी सारं वर-खाली व्यवस्थित लावून झालं की मगच त्या पामरांना आत यायला मिळायचं. हिच्या वयाकडे आणि आकारमानाकडे बघून कोणी विरोध करायला धजावत नसणार !
असं हे सगळं ह्या प्रमाणात करणाऱ्या ह्या बाईला आपण काय काय करतो आणि करू शकतो याची पुरेपूर जाणीव होती. केलेल्याची जाण इतरांनी दाखवावी ही अपेक्षा होती. परतफेड नको होती कशाची, पण पावती, दाद हवी असे तिला. मजा म्हणजे तिची घरातल्या लोकांकडूनही तशी अपेक्षा असायची.
आम्ही नाती मोठ्या होत होतो आणि तिला आमच्या लग्नांचा (काही कारण नसताना) घोर पडायचा. चांगल्या शिकलेल्या सुसंस्कारी मुली होतो, घोर का पडावा ? पण हिचं आपल्या मुलींमागे, सुनेमागे हळूहळू तुणतुणं असायचं. आम्हा चार मोठ्या नातींमधल्या दोघी मवाळ, आज्ञाधारक वगैरे. दोघी जरा बंडवाल्या. त्यातलीच मी. आणि खरंतर आम्ही खोडसाळही होतो. त्या `शहाण्या' दोन नातींसाठी हिने स्वत: अंगावर जबाबदारी घेऊन छान `स्थळं' पाहिली, लग्नं जमवली आणि स्वत:च्या घरातून वाजत-गाजत त्यांची पाठवणी केली. साग्रसंगीत लग्नं. हिच्या सर्व हौशी पुरवणारी. उरलेल्या आम्ही दोघी भर लग्नघरात तिने सांगितलेली कामं करता करता मुद्दामच तिला, ``हे कशाला एवढं रुखवत ? केवढा तो खटाटोप ! कोण बघणारे नंतर त्याकडे ? आमच्या लग्नात नको हं एवढा घोळ !'' असं बोलून तिला डिवचत होतो. तिनेच आणलेले बनारसी शालू फलकारत तिलाच चिडवत होतो. अखेर तिची सहनशक्ती संपली. तिच्या करण्याची दाद-पावती सोडून हे काय भलतंच आमचं ? मग ती चिडलीच,
``मेल्यांनो, तुमच्या लग्नांना मला बोलावूसुद्धा नका. मी आलेच नाही म्हणजे `हा % ' खटाटोप करण्याचा प्रश्नच नाही ! शोधा आपापले नवरे आणि जा लंकेच्या पार्वत्या सासरी !''
आम्ही दोघी तिच्या तोंडावर हसतोय् आणि लग्नघरातल्या बाकीच्या बायका आम्हाला दटावत स्वत:ही चोरून हसताहेत. प्रत्यक्षात खरोखरच आमची दोघींची `पाठवणी' तिच्या घरातून सोडाच, तिच्या गावातूनही झाली नाही. आमची लग्न पुण्या-मुंबईत ! पण ``मेल्यांनो....'' म्हणून फणकारलेली आई पुन्हा साग्रसंगीत तयारी करून, ट्न्ंका भरून लग्नांना हजर ! प्रचंड हौसेने सर्व करणं, आणणं, वाटणं आणि त्याची दाद घेणं, कशात कमतरता नव्हती. स्वभावापुढे ती तरी काय करील बिचारी ?
आईचं व्यक्तिमत्त्व तसं प्रखरच म्हणायचं. सगळं टोकाचं. जितकं भरभरून करणं, तितकीच जीभही फटकळ. रागीटही होती. शिवाय तिची मर्जी एखाद्यावरून उतरली किंवा कोणाकडून दुखावली गेली की तिच्या मनातली अढी सहसा सुटत नसे. सावत्र आईवर राग म्हणून ही अनेक वर्षं म्हणे माहेरच्या गावी जाऊनसुद्धा वडिलांना भेटायला त्यांच्या घरी जात नसे.
हा एककल्ली राग जसा प्रखर, तसा दुसरीकडे एखाद्यावर जीव जडला की त्याच्यासाठी जीव पाखडेल ! असा तिचा जीव होता `आप्पा' म्हणजे कवी `अनिल' यांच्यावर ! अनिल-कुसुमावतींचा प्रेमविवाह ही त्या काळात साहित्यवर्तुळात एक कौतुकाची बाब होती. पण व्यावहारिक जगात - विशेषत: त्यांच्या
कुुटुंबामध्ये तिने खळबळ माजवली होती. दोन्ही घरांमधल्या प्रखर विरोधात या दोन प्रेमी जिवांच्या पाठीशी जी थोडी मंडळी होती त्यात आई आणि बडेदादा होते. `कुसुमला तुमची फूस आहे' म्हणत कुसुमावतींचे वडील बडेदादांसमोर बंदूक घेऊन ठाकले होते. पण कुसुमावतींना बडेदादांचे अभय होते आणि अनिलांच्या भावुक-हळव्या मनाला `यमुताइंर्चा' (म्हणजे आईचा)आधार होता. ही नाती वर्षानुवर्ष अभंग राहिली. अनिल-कुसुमावतींचा मोठा मुलगा किशोर अपघातात गेला तर घरची गाडी काढून त्यांच्यापाशी सर्वात प्रथम पोचली, ती आई ! १९६१ मध्ये कुसुमावतीबाई गेल्या तेव्हा आप्पा दिल्लीत होते. आई-बडेदादाही ह्या बातमीने हादरले. आई म्हणाली, ``कुसुमावती गेली, चला, आप्पांना भेटायला हवं.'' बडेदादांना हिम्मत होईना. हे पाहिल्यावर आई एकटीच अमरावतीहून उठली, नागपूरला पोचली, विमानात बसली आणि दिल्लीत आप्पांपाशी जाऊन पोहोचली. एवढे उंचेपुरे `अनिल'. लहान मुलासारखे जमिनीवर बसले आणि खुर्चीवर बसलेल्या आईच्या मांडीवर डोकं ठेवून लहान मुलासारखे रडले - ``यमूताई, माझी कुसुम गेली हो %...''
आईच्या स्वभावातल्या प्रखरतेचाच आणखी एक पैलू होता, तिच्या निर्भयतेचा. कशाची भीती म्हणून हिला कधी शिवली नाही.लहानपणी ज्या बेधडकपणाने तिने `आसेतुहिमाचल' प्रवास केला. स्वत:चं अवजड शरीर, त्यात वास करणारी अनेक दुखणी या सर्वांसकट ती कुठुनही कुठेही जाऊन धडकत असे. कुठलेही धोके पत्करत असे.
माझे आजोबा काही सरकारी खटले चालवायला केरळात होते. तिथे मुक्काम काही महिने लांबल्याबरोबर ही एकटी उठून नागपूरहून कोचीनला पोचली. तशीच, फाळणीनंतरच्या ऐन धुमश्चक्रीत आपल्या जेमतेम सव्वावर्षाच्या नातीला आणायला नागपूर ते फिरोजपूर आणि ते एवढंसं पोर घेऊन परत नागपूर हा प्रवास करून आली. बरोबर फक्त बिसेसर ! हिला भय म्हणून ठाऊक नव्हतं.
प्रवासाचीही आईला आवड होती. आपल्याला झेपेल का? वाटेत काही झालं तर? यासारखे क्षुल्लक प्रश्न तिला पडत नसत. भाविक होती. त्यामुळे बनारस, हरिद्वार, हृषिकेश, द्वारका-सोमनाथसह चारीधाम यात्रा तर तिने केल्याच; पण वयाच्या साठी-पासष्ठीनंतर, एका मोठ्या दुखण्यानंतर एकदा नव्हे दोनदा ती नेपाळ-पशुपतीपर्यंत जाऊन आली. त्या काळात `टूरीझम'चं आजच्यासारखं वेड नव्हतं आणि आजच्या इतक्या सोयीही नव्हत्या. पशुपतीच्या वाटेवर चालताना हिच्या एकूण देहमानाकडे आणि वयाकडे बघून कोणी एक बिचारा पोटार्थी डोली घेऊन आला.
``माईजी डोली करेंगी?''
त्याला हिने दिलेलं उत्तर (तिने ते हिंदीतच दिलं - नागपूरची होती) ती आम्हाला सांगत होती. ही म्हणाली,``मेल्या माझ्या वजनाने तूच मरशील. देवाच्या वाटेवर चालताना माझी मी मेले तर स्वर्गात तरी जाईन. तुला मारण्याच्या पापाची कशाला धनी होऊ?''
तो बिचारा गेला असेल एवढंसं तोंड करून. पण हिचं धाडस केवढं !
हिच्या निर्भयतेचे किस्से घरात बरेच होते. असाच एक अफलातून किस्सा. स्वत:च्या नातवंडांना समोर बसवून आईनेच सांगितलेला -- आणि तोही मिश्किलपणे बडेदादांना ऐकू जाईल अशा बेताने ! दोन मुली आणि एक मुलगा अशा अपत्यांनंतर काही कारणाने आईचं गर्भाशय काढून टाकावं लागलं होतं. आईचं वय तेव्हा असेल तिशीचं आणि बडेदादांचं चाळीस. तो काळ वेगळा होता. बडेदादांना घरातली माणसं छुपे सल्ले देऊ लागली. ``एकच मुलगा आणि हे असं... आणखी एखादा तरी मुलगा नको? तू दुसरं लग्न कर,'' पहिली पत्नी जिवंत असताना (किंवा घटस्फोट झालेला नसताना) दुसरं लग्न करता न येण्याचा कायदा पुष्कळ पुढे आला. एरव्ही प्रखर मूल्य मानणारे बडेदादा कदाचित वडीलधाऱ्यांच्या दबावामुळे असेल, किंचितकाळ विचलित झाले असावेत. आईच्या हे लक्षात आल्यावर ही मुलांना घेऊन घरामागच्या विहिरीवर पोचली. बडेदादांना म्हणाली,``आधी या तीन मुलांना विहिरीत ढकलते, आणि मग मीही उडी घेते. त्यानंतर खुशाल करा दुसरं लग्न....'' बडेदादांच्या आसपासही त्यानंतर तो विचार फिरकला नसेल.
धाडस आईपाशी स्वाभाविकपणेच होतं. माझ्या भावाच्या जन्माच्यावेळी माझी आई अमरावतीला माहेरी असताना एका रात्री घरात चोर शिरला. त्या भागात त्या काळी भुरटे-भटके चोर भुसावळ ते नागपूर रेल्वेलाईनला लागून असलेल्या गावांमध्ये चोऱ्या करत आणि रेल्वेने पळून जात. रात्री तीन-साडेतीनला माझ्या आईला चोर घरात असल्याचं कळलं. पण जवळ तान्हा मुलगा. आपण हालचाल केली आणि चोराला ते कळलं तर जिवाला धोका! म्हणून ती पहाटे पाच साडेपाचपर्यंत आई जागी होईपर्यंत चुपचाप पडून राहिली. पहाटे भावाला पहायला आई विछान्याशी आली तेव्हा माझ्या आईने हळूच खुणेने तिला चोर आपल्या पलंगाखाली लपला आहे हे सांगितलं. त्याबरोबर ही बाई उठली ती मोठंच्या मोठं घर ओलांडून थेट अंगणात. भराभर हाका मारून शेजारी पाजारी गोळा केले. आणि चोर अडकला. तो पकडला गेला तरी त्या चोराबरोबर आपली बाळंतीण मुलगी आणि तान्हा नातू घरात आहेत, त्यांना त्याने काही केलं तर?- हा विचार, ही भीती तिच्या मनाला शिवलीच नाही. हे वेडं धाडसच होतं, पण तिने केलं ते!
अशी ही `आई' माझं लहानपण व्यापून होती. पुढची वर्षं तिला भेटण्याची निमित्त कमी होत गेली. तिचं नागपुराबाहेर जाणं कमी होत गेलं. पण माझा मुलगा तिनं पाहिला.त्याच्या बारशाला पुण्यात येऊन पाहिला. घरातल्या, सग्या सोयऱ्यातल्या, गोतावळयातल्या सर्व कार्यांना ती हजर राहायची. ती येऊन पोचली की त्या कार्याचा घाट घातलेल्या यजमानीणबाईच्या मनावरचं अर्धं ओझं उतरायचं. आईचं सडेतोड फटकळ बोलणं, चिडणं, रागावणं यातलं काहीही मनावर न घेता तिच्या फक्त असण्याने माणसं आश्वस्त होऊन जात. हे सारंही मी मोठी होताहोता पाहात आले. वय होत गेलं तशी तीही `मवाळ' होत होती. पण तिच्या गोऱ्यापान चेहऱ्यावरची कांती, डोळयांतलं तेज कमी झालं नाही. तसे तिचे ग्रह-आग्रहही पुरते मावळले नाहीत.
पण मला ते कदाचित लहानपणीइतके टोचेनासे झाले असावेत. मी तिच्या फार जवळ जाण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. तिच्या शेवटच्या वर्षांमधे तिच्या दोन्ही मुली, सून आणि कुणी ना कुणी नाती यांनीच तिची सेवा केली, तिला सोबत केली. माझ्यावर ती वेळ कधी आली नाही आणि मी खोट्या भावुकतेने त्याबद्दल कधी हळहळलेही नाही. मी तिला आजारी, अंथरुणात पाहावी असा योग नसेल. मला ती आठवते ती हिंडती-फिरतीच!
आईला जाऊन आता तीसांहून अधिक वर्षं उलटली. हे एवढं जिच्याविषयी मनात भरून रहिलं होतं, तिच्याबद्दल लिहावं असं इतक्या वर्षांनी वाटल्यावर मला सर्वात आधी लहानपणचं तिचं ते वाक्य - त्यामागचा पक्षपात आणि त्या कोवळया वयात त्याने मनाला केलेली जखम हेच का आठवावं? मी थोडी मोठी झाल्यावर ती हे बोलली असती, तर कदाचित त्यापुढे तिचं तोंडही पाहणार नाही असं काही मी म्हटलं असतं. आणखी थोडी मोठी झाल्यावर बोलली असती तर मी माझं `गोरी नसणंच' तिच्यापुढे मिरवून तिची मजा बघितली असती.बरं झालं ती हे माझ्या अगदी लहानपणी म्हणाली. माझ्या तेव्हांच्या निरागस दु:खानंतरही किंवा दु:खासहितही मी तिच्यापासून लांब जाऊ शकले नाही. माझ्या हातात तेव्हा तसं काही करणं नव्हतंच. इतकी मी लहान होते. एका परीने हतबलही!
आज विचार करते आहे की माझ्या नाकळत्या वयात आणि तिच्या नकळत ती जे काही म्हणाली, त्यात काय होतं? तर त्यात फक्त `ती' होती. स्वच्छ, तळदर्शी `ती'! आपल्या टोकाच्या गुणदोषांसह तिचं तसं असणं अढळ होतं. तिला होतं गोरेपणाचं प्रामाणिक अप्रूप; आणि ते दाबून दडपून वेगळं काही बोलणं तिच्या कह्यात नव्हतं कदाचित ! त्या बोलण्याचा परिणाम वगैरेंचा विचार करण्याची तिला सवय नव्हती. तसा तिचा स्वभाव नव्हता. ती तेव्हा फक्त `ती' होती. म्हणजे कदाचित तिने ते माझ्याशी मुद्दाम मांडलेलं भांडण नव्हतंच. पण तिचे हे `ती' असणं कळायचं माझं वय नव्हतं. म्हणून माझ्याच मनाने इतकी वर्षं आत कुठेतरी मांडून ठेवलेलं ते भांडण होतं. ते असं सर्वात आधी वर आलं आणि आता बहुतेक वाहून गेलं.
ती माझी आजी आणि मी तिची नात हे सत्य त्यापलीकडेही उरलं. म्हणूनच आजोळी जमण्याच्या त्या `मांदियाळीत' मी वर्षानुवर्षं जात राहिले. तिने भरभरून (माझ्यासकट) सर्वांच्या केलेल्या हौशी-कौतुकांची, करण्या-देण्याच्या उत्सवांची भागीदार होत राहिले. तिच्या इतक्या-इतक्या रूपांची साक्षीदार होत राहिले. त्यावेळी तिच्यावर रागवता आलं नाही, पुढे तिने तशी संधीच दिली नाही, आणि आतातर तीच नाही.
आज माझ्याजवळ तिच्यासाठी एकमेव शब्द आहे - `जबरदस्त'! अशा या जबरदस्त आजीकडून माझ्यापाशी काय आलं? तिची उर्जा? तिचं दातृत्व? तिचं निर्भयपण? माझ्या मनातल्या तिच्या यापुढच्या आठवणीत काय असेल? या वरच्या गुणांपैकी काही असो-नसो, ते वाहून-निचरून गेलेलं भांडण नक्की नसेल.
डॉ. मनीषा दीक्षित, पुणे
Posted in



Casque Audio Dr Dre
La 3e place que vous devriez faire peut être à la recherche sur les rythmes
beats pro
dans les magasins près de chez vous. depuis le sans-fil ainsi que l'ingénierie sans fil peut être trouvé à être beaucoup plus standard récemment, il est casque beats solo maintenant beaucoup plus simple complète l'ensemble disponible pour que vous puissiez être trouvés à travers le beats by dre monster abordable. Il ya tellement une offre incroyable de magasins de détail sur ce marché ces battements par Dr Dre. Ainsi, vous pouvez être plus simple peut être trouvée à travers eux.La monster beat solo quatrième place que vous devriez faire peut être de produire petite enquête et une comparaison loin de votre beaucoup de magasins qui commercialisent ce type de battements casque by dre . Aussi, vous pouvez faire un effort pour coup aux magasins qui offrent faible coût pour ces monster beats solo hd . cela pourrait totalement soutien que vous pouvez être trouvée à travers les
beat by dr dre
produits qui peuvent être trouvés dans des prix beaucoup moins cher.
http://www.hifibeat.com/
No amount how pandora jewelry
No amount how pandora jewelry abounding pieces of Pandora adornment you have, the cheap pandora basal assumption for autumn adornment is pandora sale adding them by the function, length, actual or the use buy pandora frequency. Lay out a average allotment of cheap pandora jewelry bland bolt and abstracted all the pandora jewelry sale adornment into groups on the bolt where to find pandora jewelry according your own principle. The pandora bracelets giver of the Pandora adornment charms ability cheap pandora bracelet additionally appetite to shop for one pandora bracelet sale for their own use. That is how discount pandora bracelets accepted the adornment is. It does not buy pandora bracelets amount who the allowance is for, what pandora jewelry bracelet affairs is that Pandora adornment will consistently pandora charms be appropriate and will consistently cheap pandora charms be popular. More and added women discount pandora charm became admiring to the Pandora charmed bracelet, affairs pandora charms sale in the masses because of the company's charms for pandora able-bodied anticipation out slogan, "one pandora beads agreeableness for every acclaimed cheap pandora beads and charmed moment in your life discount pandora bead Each Pandora bean and Pandora bracelets has its own different pandora beads sale identity, so it is not at all hasty pandora jewelry store why anyone pandora style would see Pandora's charms and bracelets as actual attractive. Do you apprehend www pandora jewelry that Pandora Adornment has produced what is pandora jewelry a cast fresh way to appearance where can i find pandora jewelry as able-bodied as adapt agreeableness bracelets? That Pandora Adornment has developed the about pandora jewelry abstraction of accouterment cheapest pandora bracelet you the absolute adventitious pandora cheap bracelets to appearance the actual own alloy which buy pandora charm conveys your alone style, image, or alike charms for pandora bracelet charmed moment? Indeed, it is true. Possibly pandora charms for bracelet you apprehend Pandora Adornment as the buy pandora bead Danish adornment band which catches all the memorable pandora bracelet beads moments in your life, and additionally the one that pandora style beads may about-face to fit the affection pandora necklaces and acquaint your alone cheap pandora necklaces persona. If you appetite to accomplish pandora agreeableness bracelet, there discount pandora necklace are altered shapes of Pandora charms you can mix pandora necklaces sale and bout back authoritative your buy pandora necklace own Pandora bracelet. There are charms shaped cheap pandora bangles like animals, fruits, vegetables, music discount pandora bangle notes, allowance boxes and ghosts. Added pandora bangles sale accepted shapes are that of moneybags, corpuscle phone, bear, heart, anchor, dice buy pandora bangle and snail.
You needn't consistently pandora jewelry give her very best good friend cheap pandora diamond jewelry that is made of genuine pandora sale stones. These days, there is a massive buy pandora amount of exceptional costume jewelry accessible cheap pandora jewelry that occur to be almost as exceptional since the genuine pandora jewelry sale ones, and therefore where to find pandora jewelry are not as costly.It is perfect pandora bracelets for all those people westerners cheap pandora bracelet who need the much better from the pandora bracelet sale two worlds, east as well as west, divine discount pandora bracelets jointly with aesthetical - additional or much buy pandora bracelets less all mixed in the tiny hold away from pandora jewelry bracelet craft. That hold out attached pandora charms with good fine art is Peace hint 925 silver earrings jewelry. There is also a range of cheap pandora charms stylish handmade earrings that you may discount pandora charm like to try at times. These are often made pandora charms sale with feathers and beads that are fashioned charms for pandora out with threads of different colors. They are successful pandora beads in making an impression that is equally cheap pandora beads unique. Although Pandora jewelry has already been pandora beads sale produced, consumers can aces and accept pandora glass bead the addition Pandora charms that they see in shops pandora murano bead and online. There are so abounding pandora full bracelets altered charms accessible that allotment swarovski crystal beads a aggregate that addition abroad pandora swarovski crystal beads already has is absolute actual unlikely. Bodies can where to buy pandora bracelets accordingly actualize their own appearance pandora bracelets with charms and personality aural the Pandora range. One affair that is important back pandora bracelet charms you are affairs your handmade artisan pandora charm bracelets adornment is to let bodies apperceive about it. Sure, you ability pandora complete bracelets accept told some of your accompany and ancestors pandora new charms and hopefully they accept told some pandora DIY people, but if you absolutely appetite pandora leather bracelets to accomplish chat advance fast you will appetite pandora diy bracelets to alpha a fizz in the online community. You can do pandora gold charm this several altered ways.Professional Pandora Jewellery can be found at pandora silver and gold charm this online shop. Here is a good place to access the pandora charm with stones latest new Pandora Jewellery for people. Our Pandora Jewellery e-shop pandora enamel charm sells Pandora Jewellery with large discount pandora birthstone charm price. Would you like to own them with pandora letter charm low price? If you like, welcome to visit our website pandora clip charms to choose what you want and please feel free to contact us.Use the great advantage pandora retired charms to be got from the modern charm bead bracelet in allowing you to express pandora wedding charms yourself with individually chosen Pandora style beads and bracelets. Show pandora Friendship Charms off your style and reflect your elegance pandora Sister Charms by creating your own beautiful jewelry. The interchangeable design pandora Animal Charms factor of the Pandora system allows for rearranging your own beads to pandora Number Charms create personalized charm Bracelets as well pandora Snowflake Charms as necklaces. The range and variety of charms means recreating pandora Christmas Charms your favourite childhood memories or family moments can have full scope.