Skip to main content

स्वत:च्या रूपाला आरशात न्याहाळत, मंदिरानं मेकअप् उतरवायला सुरुवात केली, तसा फोन वाजला- किरकिरणाऱ्या बाळासारखा तो कितीतरी वेळ वाजत राहिला अन् थांबला. थोड्या वेळानं पुन्हा फोनची घंटा वाजल्याबरोबर, कुंदामावशी आपल्या बोंगा झालेल्या देहाचं ओझं घेऊन धावत आल्या. तटतटून फुगलेल्या फुग्याला पाय लावल्यासारखं त्यांचं पळणं पाहून, मंदिराला हसू आवरेना...
'हॅल्लो%% होय, अभिनेत्री मंदिराचंच घर आहे हे!... त्या जरा आराम करतायत- उद्या करू शकता का, आपण फोन?... आँ, काय म्हणता- जुनी ओळख?... 'जुनी ओळख अन् दाराशी धडक' असं नको व्हायला!... साहेब, आपलं नाव काय म्हणालात?... अग्गोबाई, विश्रामदादा होय!...'
विश्रामचं नाव ऐकल्याबरोबर मंदिरानं झटकन् पुढं होऊन, कुंदामावशींच्या हातचा रिसीव्हर काढून घेतला अन् स्वत:च घाई-घाईनं बोलायला सुरुवात केली.
'हॅलो, विश्राम, काय म्हणतोस?..' तिनं कोरड्या उत्सुकतेनं विचारलं.
'हॅलो, मंदिरा, तुझ्यासाठी एक नवीन संधी आहे- तुला क्रॅरॅक्टर अॅक्ट्न्ेसचा रोल करायला आवडेल?... खरं तर सगळं नाटक 'त्या' पात्राभोवतीच फिरतंय- एक अपंग, कुरूप पण अतिशय कर्तृत्ववान बाई, प्रतिभावंत कवयित्रीदेखील!... हिरॉईनही तीच- पण तुझ्या भाषेत 'क्रॅरॅक्टर अॅक्ट्न्ेस!..' सुंदर, तरुण- श्रीमंत असं कुठलंही विशेषण हिला लागू होत नाही...' झपाटल्यागत विश्राम बोलला.
'नॉन सेन्स!... त्यापेक्षा मी घरी बसेन पण असला फालतू रोल करणार नाही!... विश्राम, तू मुद्दामून...' मंदिराला पुढं बोलवेना-ती संतापानं अन् अपमानित झाल्याच्या भावनेनं एकदम गप्प झाली- पलीकडनं विश्रामनं फोन जोरात आपटला अन् मग तिनंही जोरात फोन आपटला आणि त्याच तिरिमिरीत जोराजोरात फेऱ्या घालायला सुरुवात केली- थोड्या वेळानं एकदम थकल्यासारखं वाटलं म्हणून तिनं बसकण मारली अन् आवेगानं कुंदामावशींना जोराजोरात हाक मारायला सुरुवात केली-
'मावशी%% मावशी%% मावशी%%...!'
धास्तावलेल्या कुंदामावशी धावत धावत तिच्यासमोर येऊन उभ्या राहिल्या; पण ते तिच्या लक्षातच आलं नाही- ती स्वत:शीच तावातावानं बोलू लागली-
'कोण समजतो, कोण स्वत:ला?... हरामखोर, मला क्रॅरॅक्टर अॅक्ट्न्ेसचा रोल देऊ करतो?.. तोही कुरूप, अपंग, म्हाताऱ्या बाईचा?... मी काय रस्त्यावर पडले की काय?..'
कुंदामावशींनी आवाजात मऊपणा आणत पण काहीशा जरबेनं म्हटलं-
'पण ताई, एव्हढा कशाला त्रास करून घ्यायचा आपण? आपले आपण मालक!.. सरळ 'नाही' म्हणायचं!.. काय?... बरं, चहा ठेवू?...' कुंदामावशींनी स्वयंपाकघरात वळता-वळता विचारलं.
'हं'- मंदिरानं कसबसं म्हटलं खरं; पण तिचं लक्षच नव्हतं.
'ह्याला हिंमत होतेच कशी?... आपला अपमान करण्याचा एक चान्स सोडत नाही हा!.. वळचणीला बसलेला नाग आहे नुस्ता!...' ती फूत्कारत राहिली... त्या तंद्रीत तिनं जोराजोरात फेऱ्या घातल्या. मधेच भिंतीवरच्या भल्यामोठ्या आरशात पुन्हा-पुन्हा स्वत:ला न्याहाळलं- पानं झडलेल्या बुच्च्या झाडासारखं दिसणारं आपलं रूप, आपल्या अंगावर आल्यासारखं तिला वाटलं- आपल्या सौंदर्याचे भग्नावशेष तिला पाहावेनात- तिनं आपला चेहेरा झाकून घेतला..
स्वत:ला सावरत ती अंथरुणावर येऊन पडली- एखाद्या खुनी माथेफिरूसारखे प्रश्न तिची वाट सोडेनात. त्यात पुन्हा सकाळीच विश्रामशी झालेलं बोलणं तिचा पाठलाग करायला लागलं- तिला खिंडीत गाठायला लागलं... विश्रामचं अन् तिचं बोलणं रंगात आलेलं- ती सहज म्हणाली-
'विश्राम, अरे, परवा 'निमित्त' पाहिलं- कालिंदीबाइंर्नी कितीही आव आणला तरी झेपेना त्यांना तो सीन; त्यांचे पायच लटपटायला लागले, डायलॉग बोलता-बोलता!.. शेवटी-शेवटी तर त्यांना डायलॉगच आठवेना...'
'कुठं थांबायचं ते कळायला नको का, ज्याचं त्याला?... भाकड गाईनं निमूटपणानं पांजरपोळात जायचं सोडून..'
मंदिरानं चमकून त्याच्याकडं पाहिलं- थंडगार बर्फावरून चालल्यासारखं बधिर करणारं विश्रामचं बोलणं तसं सवयीचंच; पण तरी ती आतल्या आत मिटून गेल्यासारखी झाली; मात्र त्या कोलाहलात बुडालेल्या मंदिराला एकदम पोरकं, निराधार झाल्यासारखं वाटायला लागलं... 'कालिंदीबाइंर्सारखं आपणही मोडीत निघायला लागलो का?... विश्रामला तेच तर म्हणायचं होतं का?...' ह्या कल्पनेनं तर तिला काही सुचेनाच.
'मावशी! मावशी!... मावशी!...' मंदिराचा आवाज अगदी टिपेत गेला. कुंदामावशी तिच्याकडं धावत येणार, तोच दाराची बेल वाजली.. मावशींनी धापा टाकतच दरवाजा उघडला-
'बाई, मॅडम आहेत का हो?..' कुणीतरी पुरुष आवाज. त्या आवाजात जरब अन् मऊपणा यांचं अजब रसायन! त्यांच्या दोघांतल्या कुजबुजत्या, चोरट्या आवाजातल्या संवादाची धून एखाद्या लाटेसारखी तिच्यापाशी आली; पण तिला पकडता नाही आली!...
दरवाजा बंद झाला अन् कुजबुज थांबली!... कुंदामावशी चपळपणानं स्वयंपाकघरात जाऊ लागल्या, तशी मंदिरानं तारस्वरात हाक मारली-
'मावशी...'
त्या भांबावून गेल्या- निमूटपणानं तिच्याजवळ आल्या अन् तिच्याकडं न बघता म्हणाल्या-
'चहा आणते...'
'चहा गेला खड्ड्यात; कोण आलं होतं?...'
'अं, गोपाळशेट...'
'का?...'
कुंदामावशींनी शब्द गोळा करायला सुरुवात केली; पण हाती लागेनात. शेवटी, त्यांनी नेट लावला-
' अगं ताई, दिवाळीला आणलेल्या साड्या...'
'हं, मग त्याचं काय?...'
'ते बिल थटलं म्हणून...'
'मग फेकायचे नाही का, तुम्ही पैसे त्याच्या तोंडावर..?'
'ताई, पण तेव्हढे पैसे...'
मंदिरानं कुंदामावशींकडं पाहिलं, तशी त्यांनी नजर वळवली.. तिनं घाईघाईनं कपाट उघडलं. आपल्या बँकेची सर्व पासबुक्स चाळली- पुन्हा, पुन्हा डोळे फाडून बघितलं अन् मग आवेगानं सर्व आतमध्ये ठेवून, धाडकन् कपाटाचा दरवाजा लावला अन् धापा टाकत खुर्चीवर येऊन बसली..
'ताई, पाणी!.. पण मी म्हणते- एखाद्या वेळी उशीर झाला तर गोपाळशेटनं एव्हढा कांगावा कशाला करावा?.. दरवेळी देतोच ना आपण पैसे वेळेवर!.. तुला सूप आणू का थोडं, ताई?..
'हं..' कुंदामावशींकडं स्नेहल नजरेनं पाहात मंदिरा म्हणाली.
'ताई, चार दिवस बाहेरगावी जाऊन यायचं का?.. नाहीतरी, डॉक्टर..' कुंदामावशींना अडवत मंदिरा घाईघाईनं म्हणाली-
'काहीतरीच काय, मला काय धाड भरलीय?... आता तर केमोथेरपीची कटकट पण... मावशी, आता कामाला लागायला हवं...'
तेव्हढ्यात पुन्हा फोनची घंटा वाजली. मंदिरानं तत्परतेनं फोन उचलला-
'हॅलो, हो, मीच बोलतेय. मला विश्रामचा फोन आला होता- तो 'त्या' नाटकाबद्दल, रोलबद्दल बोलला..'
मंदिरा अडखळली. तिनं सहज कुंदामावशीकडं पाहिलं तर त्या तिच्याकडंच पहात होत्या... त्यांनी हसत तिच्याकडं बघून मान हलवली... तिनं निमूटपणानं बोलायला सुरुवात केली..
'हे बघा, माझी तब्येत अगदी चांगली आहे... त्यामुळं तालमीला उद्यापासूनसुद्धा यायची माझी तयारी आहे. कधी कळवाल?... उद्या करू फोन?... चालेल... थँक्स!...' फोन ठेवला अन् हरलेल्या योद्ध्यासारखी पाय ओढत चालत, चालत येऊन मंदिरा अंथरुणावर पडली..
त्या दिवशी कितीतरी वेळ तिला झोप आली नाही...
....
दुसऱ्या दिवशी सकाळीच विश्राम हजर! ती काहीशा घुश्श्यातच होती- विश्रामनं नाटकाचं बाड पुढं केलं अन् तिला म्हटलं- 'हा लँडमार्क होईल बघ, माझ्या करिअरमध्ये!.. काय बाई होती... कुठलीही गोष्ट फेव्हरेबल नसताना- एव्हढा लढा देते काय- एव्हढ्या सुंदर कविता करते काय...' त्याला अडवत ती म्हणाली,
'हं... तुझं झालं ना समाधान, मला 'अशा' बाईचा रोल देऊन?.. बाकी, अजून मला 'तू' 'भाकड' समजत नाहीस हेच माझं भाग्य म्हणायचं...' विश्राम नुस्ता हसला...
'परवा बाबा देवधर आले होते- म्हणाले, 'मंदिराबाई, तुम्ही आहे तश्शाच आहात!...यंग, ब्युटिफुल आणि चार्मिंग!...' ती म्हणाली. त्यानं तिच्याकडं रोखून पाहिलं- तिची नजर खाली वळली...
'बरं, हे बाड मी तुला संध्याकाळी पाठवते..मावशी..' मंदिरानं हाक मारेपर्यंत कुंदामावशी चहा घेऊन आल्यासुद्धा. त्यांनी दोघांच्यापुढं चहा ठेवला अन् त्या घाईनं निघून गेल्या.
चहा पिता-पिता कुणीच काही बोललं नाही मग चहाचा कप टेबलावर ठेवल्यावर मंदिरा विश्रामजवळ गेली अन् त्याच्या हातावर थोपटल्यासारखं करत म्हणाली-
'थँक्स!...'
विश्रामनं एकवार तिच्याकडं डोळे भरून पाहिलं- नाटकाचं बाड तिच्या हातात हळुवारपणे देत तो म्हणाला-
'बाय!...'
....
दुपारचं जेवण झालं अन् मंदिरानं नाटकाचं बाड वाचायला घेतलं- पार्श्वसंगीत दिल्यासारखा पाऊस एका लयीत कोसळत होता. सुरुवातीची चार-दोन पानं तिनं चाळली अन् मग तिला कंटाळा आला... पण ताटातला नावडता पदार्थ घाई-घाईनं संपवावा तसं तिनं ते बाड कसंबसं वाचून संपवलं, भली थोरली जांभई दिली अन् डोळे घट्ट मिटून पडून राहिली- कितीतरी वेळ!...
...
नाटकाच्या तालमींना सुरुवात झाली तेव्हा मंदिराला आपल्या भूमिकेची नेहमीसारखी नशाच चढेना- सुरुवाती-सुरुवातीला तर अनोळखी बाईला भेटावं अन् 'काय, कसं काय?...' म्हणावं इतपत 'त्या' पात्राची- कावेरीबाइंर्ची ओळख झाली... काही केल्या गळाभेट मात्र होईना- तिची अगदी चिड-चिड व्हायला लागली- एकदा तर तालमींहून परत आली अन् तिनं आल्या-आल्या विश्रामला फोन केला-
'हॅलो विश्राम, तू दुसऱ्या कुणाचा तरी विचार कर...'
'म्हणजे?..' विश्रामला ती काय म्हणतेय ते कळेनाच.
'मला नाही जमत हा रोल करायला?.. काय, चार्म आहे तिच्यात?.. तुला काय आवडली ती बाई, कोण जाणे!...'
विश्राम नुस्तं हसला- थोड्या वेळानं म्हणाला,
'हे बघ, अजून दोन-चारदा तालमी होऊ देत- मग ठरव...'
'हं!' म्हणून मंदिरानं फोन ठेवून दिला...
.....
मंदिरा घ्यायची तेव्हढी मेहनत घेतच होती- पाठांतर, शब्दफेक, अभिनयातले- हावभाव, डोळयांची हालचाल, लकबी, हाता-पायांच्या हालचाली विशेषत: फेंगड्या पायानं चालणं- शेवटी कावेरीबाइंर्ना अर्धांगवात झाल्यानंतर, त्यांचं चाकाच्या खुर्चीत सुरू झालेलं बंदिस्त जीवन... सगळं समजून घेऊन ते सर्व अंगीकारत होती.. आरशात बघून, संवादफेक करण्याची पद्धत तिची नेहमीची!.. कवायतीसारखं आखीव-रेखीव पद्धतीनं सारं होत होतं... पण सारं कुठंतरी काळजाला न भिडणारं, अगम्य वाटायचं... तिला वाटायचं, ही भूमिका आपल्यासाठी नाहीच...' घरी आल्यावर बाहेरचे कपडे बदलावेत अन् घरचे कपडे घालावेत तितक्या यांत्रिक सहजतेनं ते सारं व्हायचं- तालमीच्या वेळी 'कावेरीबाई' आणि तालीम संपली की, 'मंदिरा'!... कुठल्या वेदना नाहीत की कुठला आनंद नाही!... कधी कधी तिला वाटायचं 'एवढ्या आजारपणात आपण उभं राहिलो अन् अशी भूमिका आपल्या वाट्याला यावी?.. आपण उगाचंच 'हो' म्हणालो विश्रामला!.. त्यापेक्षा थोडी आणखी वाट पाहिली असती तर?... आपलं आता हसं होईल सगळीकडं!...'
त्यादिवशीही तालमीहून येऊन अशीच निराश होऊन ती बसली होती- तेव्हढ्यात फोन वाजला- तिनं उचलला- 'हॅलो, मी विश्राम! मंदिरा, कावेरीबाइंर्चा नातू भेटला होता..' तो अपेक्षेनं थांबला.
'हं!' मंदिरा.
'कावेरीबाइंर्च्या जन्मगावी त्यांची जन्मशताब्दी साजरी होतेय- आज त्याचा समारोप आहे- तिथल्या शाळेला कावेरीबाइंर्चं नाव देण्यात येणार आहे- शाळेत महाराष्ट्नचे शिक्षणमंत्री यायचेय आज! त्या कार्यक्रमात, तुम्ही आज नाटक सादर करू शकाल का?... असं विचारत होता तो. तो नातू त्या शाळेचा मुख्याध्यापक आहे...' विश्राम कधी नव्हे ते उत्साहानं बोलत होता..
'अरे पण!.. विश्राम, अरे, अजून रंगीत तालीम झाली नाही... अन् एकदम प्रयोग?...' तिला एकदम रागच आला त्याचा...
'अगं, पण वेळ साधायला हवी!... शिक्षणमंत्री यायचेत प्रमुख पाहुणे म्हणून!... शिवाय, त्यानं गळच घातली..'
'आणि तू 'हो' म्हणालास!... अरे, स्टेजवर 'मला' उभं राहायचंय... तुला काय?... मी खाते दगडं...' ती रागावून म्हणाली.
'मंदिरा, प्लीज, 'नाही' म्हणू नकोस. ह्या नाटकाला केवळ 'नाटक' म्हणून महत्त्व नाही... आपण आठशे विद्यार्थ्यांपर्यंत!..'
'तू ठरवलंच आहेस ना सगळं... मग झालं तर!... चल, आहे मी तयार!...' निरुपायानं मंदिरानं संमती दिली.
अर्ध्या तासात सगळी आवराआवर करून, ते सर्वजण गाडीत बसलेसुद्धा!... मंदिरा फारच अस्वस्थ होती- तिनं मेक-अप् करणाऱ्या अप्पा जाधवांना आपल्या शेजारी मुद्दाम बसवून घेतलं. आपल्या मेकअप्संबंधी जास्तीत जास्त सूचना दिल्या. प्रॉम्प्टरला कुठल्या अंकात, कुठल्या प्रवेशामध्ये जास्तीची मदत लागेल ते पुन्हा पुन्हा सांगितलं... फुलगाव आलं अन् जेवणाखाण्याची कुठलीही तमा न बाळगता, मंदिरा मेकअपरूमकडे पळाली...
अप्पा जाधवांनी तिच्या मेकअप्मध्ये कुठलीच कसूर ठेवली नाही... मेकअप् पूर्ण झाला अन् मंदिरानं आरशात पाहिलं- तशी ती जवळ-जवळ किंचाळलीच. तिच्या चेहेऱ्यावर तिच्या आखीव-रेखीव, वैभवशाली सौंदर्याच्या कुठल्याही खुणा राहिल्या नव्हत्या. तितक्यात विश्राम आत आला- त्यानं तिला निरखून पाहिलं. अप्पांना तो म्हणाला-
'अप्पा, काम फत्ते!...'
लगेचच प्रयोगाची घंटा वाजली- एकदा-दोनदा- तीनदा!.. ती विंगेत येऊन थांबली- तिच्याजवळ येऊन, विश्राम म्हणाला- 'कावेरीबाई हो'... मंदिरानं त्याच्याकडं पाहिलं- तो तिच्याकडं डोळे भरून पाहात होता.... हसायलाच पाहिजे म्हणून ती कसबसं हसली...
ती रंगमंचावर आली आणि समोर बसलेल्या बाल-प्रेक्षकांनी जोरात टाळया वाजवल्या- तिच्यावर प्रकाश केंद्रित झाला... तो एकच क्षण!... तिला संमोहित झाल्यासारखं झालं.. पुढं तीन तास काय झालं ते तिला कळलंच नाही...
नाटक संपलं अन् पुन्हा झालेल्या टाळयांच्या कडकडाटानं ती भानावर आली- अनेकजण तिला भेटायला येऊ लागले... थोड्या वेळानं एक जराजर्जर झालेल्या बाई तिच्याजवळ आल्या- त्यांनी तिला वाकून नमस्कार केला अन् थरथरत्या आवाजात म्हणाल्या- 'मी कावेरीबाइंर्ची धाकटी बहीण- नर्मदा!... तुम्ही अगदी शोभलात बरं; तस्संच रूप, वागणं- बोलणं... खूप वर्षांनी पुन्हा ती भेटली मला..' त्यांचा गळा दाटून आला.
- मंदिरालाही काय बोलावं ते सुचेना- तिनं त्यांचा राठ हात आपल्या हातात घेतला अन् स्वत:शीच पुटपुटत म्हणाली-
'मलाही ती खूप वेळांनी भेटली...' नर्मदाबाइंर्नी तिच्याकडं चमत्कारिकपणं पाहिलं अन् त्या डोळे पुसत पुसत निघूनही गेल्या...
'कावेरीबाई, मंदिराला ओळखता का?...' हळूच तिच्या जवळ येत, नाटकी गंभीरपणानं विश्रामनं विचारलं..
मंदिरा मिष्किलपणानं म्हणाली- 'मंदिरा? नाव कुठंतरी ऐकल्यासारखं वाटतं खरं!...'
दोघंही खळखळून हसले आणि आपली लय वाढवत, बाहेरचा पाऊसही त्या हसण्यात सामील झाला...

- मेधा टेंगशे, पुणे

Chilliwack,Canada Goose Down,Canada Goose Kensington,Cheap Canad

In some important occasion, people need a clothing to improve their social status. However, beside so many International brand in the world, it is hard to find a real suitable clothing. In frozen winter, the situation is more serious because the shortage of stylish jackets, especially different countries have different culture, when American prefer North Face Jackets, Italy purchase their money on Moncler Jackets, for Canadian, what they are interested in is Canada Goose Jackets.

Design ideals for warmth and comfort, Canada Goose Parka is a very stylish jacket after years development. Exposures in much more and much more magazines, Canada Goose Jacket distribute all much more compared to world. supplied that it employed to skiing, some ski also rental Canada goose jackets for people nowadays all much more compared to world. It has different sizes and colours for males and women, Canada Goose Chilliwack selling all much more compared to world. In some European countries, more youthful also go with on it for riding. With trendy design, they are able to show their character everywhere, imitate stars who hold Canada Goose Down Jacket within their shoulders, Canada Goose Kensington develop to be the synonym of masculinity. since the best shock for men, females can uncover their boyfriends much more handsome and charm. In some places, Canada goose jackets make trades as couples clothing. method to fashion, Canada Gose Online made females design supplied that 2001. retain up with fashion, Canada Goose sale for females use new perfect that slim women's figure. No issue how extra fat they are, Cheap Canada Goose Outlet with belt design and design make females slimmer and phone call back again their confidence.

canada goose jacken
Deutschland Outlet, canadian goose
parka
online über Verkaufspreise, verschiedene von
canad a goose Chilliwack
zu wählen, kostenloser Versand, schnelle Lieferung.

canada goose jacken
hat eine hohe Qualität gewesen, langlebig, praxiserprobte, innovative und
extreme Wetterbedingungen Favorit für mehr als 50 Jahren. Es gibt viele Folklore
darüber, wie diese kanadische Männer-und Frauen-Parkas, Jacken und andere
Produkte haben Artic Expeditions wurde im Winter verwendet werden, während die
Skalierung Mount Everest und durch Wissenschaftler in der Antarktis-und mehr als
wahrscheinlich, diese Geschichten wahr sind.
canada goose outlet
Kleidung ist nur über autorisierte Händler erhältlich.

Canada Goose Frauen|Canada Goose Månner|Canada Goose Zubehôr|Canada goose Chilliwack Parka|Canada goose Expedition Parka|Canada goose kensington Parka|Canada goose MonteBello Parka|Canada goose Solaris Parka|Canada goose Trillium parka|Canada Goose Expedition Parka|Canada Goose Månner Schloss Parka|Canada goose Schnee Mantra Parka|Canada Goose Yorkville Parka|Canada goose Gloves Frauen|Canada goose Gloves Månner.

http://www.canadagoosejacketsca.net
http://www.goosejacken.biz

We at panache shoes make the

We at panache shoes make the UGG Australia available to you at your homes without any delivery charges. UGG Men you order, it is upon us to bring it you and get it hand delivered at your doorway. UK Ugg Sale has the most decent prices bringing it down and lighter on your pockets. Buying from us will get you a guaranteed bargain for we boast of some of the best classic ugg like Lulu Guinness, Radley, Baibella, Cosettini, Cheap UGG and Bulaggi, all at attention-grabbing discounts. Ugg discount, you can view the sample ugg bags and choose your favourite among the best. Therefore, hesitate ugg boots sale in thinking twice and order now!

We at panache shoes make the

We at panache shoes make the UGG Australia available to you at your homes without any delivery charges. UGG Men you order, it is upon us to bring it you and get it hand delivered at your doorway. UK Ugg Sale has the most decent prices bringing it down and lighter on your pockets. Buying from us will get you a guaranteed bargain for we boast of some of the best classic ugg like Lulu Guinness, Radley, Baibella, Cosettini, Cheap UGG and Bulaggi, all at attention-grabbing discounts. Ugg discount, you can view the sample ugg bags and choose your favourite among the best. Therefore, hesitate ugg boots sale in thinking twice and order now!

Microsoft Office 2010 cosy

Microsoft Office 2010 cosy risks meant MS Office 2007 that paying customers microsoft office 2010 product key would typically exercise office 2007 product key a many process Office Professional Plus 2010 to exercise results office professional 2007 plus or for amend Office Professional 2010 the photo alone Win7 and not location Microsoft Office 2007 Enterprise .