``अगं ! जरा मला शाळा सुटल्यावर भेट. काम आहे.'' पाटील सर मला बोलून गेले आणि त्या क्षणापासून माझं मन हेलकावे खायला लागलंय. ह्यांचं काय काम असेल माझ्याकडे ? काय सांगणार असतील ? काय विचारणार असतील ?.... आणि शाळा सुटल्यावरच का ? आता नसते सांगू शकले ? इतकं काय महत्त्वाचं?....
माझ्या मनात प्रश्नांनी काहूर माजवलं. मी दहावीत शिकणारी एक मुलगी. अंजली अरविंद पाठारे. जास्त कधी कोणात न मिसळणारी. कोणाशी फारशी न बोलणारी. तशी शांत मुलगी. अभ्यासात जरा कच्ची असले तरी चित्रकला आणि गायनात दरवर्षी पारितोषिकं पटकावणारी. अभ्यास मला कधी तेवढा जमलाच नाही. काठाकाठानं पास होत दहावी गाठली. याचं काय ते माझ्या घरच्यांना अप्रूप. तशी घरची स्थिती बेताचीच. म्हणजे वडील अंकुर सोसायटीत वॉचमन आणि आई घरी पिनांची कामं करते. मी देखील तिला मदत करते. बावडेकर चाळीत आम्ही तिघंच राहतो. खोली एक आणि माणसं तीन.
आई आजकाल नेहमी सांगते, ``अंजू ! जरा व्यवस्थित राहावंे. स्वत:ला जपावं. तू दिसायला सुंदर आहेस. बघ बाई, मग नसती कटकट नको...'' माझ्या बाबतीत ती असमाधानी आणि थोडीशी संशयी बनलीय.
आता मी नेमकं काय करावं की आईचं समाधान होईल ? तिचा संशय , त्याचं मी काय करू ? असा मला नेहमी प्रश्न पडतो. त्यात माझे वडील, मी `भाऊ' म्हणते त्यांना, ते नेहमीच वैतागलेले. कंपनी बंद पडली म्हणून ही नोकरी. पगार कमी म्हणून वैताग घरच्यांवर. आजकाल तेही माझ्याशी तुटक वागतात. कडवट बोलतात. पूर्वी फार लाड करणारे भाऊ, माझा तिरस्कार तर करत नसावेत ?....
आजकाल नं ! मला काहीच कळेनासं झालंय. हे सगळं माझ्या बरोबरच का व्हावं ? अडकल्यासारखं होतं मला. मग मी एकांतात खूप रडते आतल्या आत.... आता हे पाटील सर. तसे दिसायला चारचौघांसारखे असले तरी बोलणं लोभस. गेल्याच वर्षी लग्न झालं म्हणे. आम्हाला गणित शिकवताना उदाहरण फळयावर लिहिलं की `कळलं का ?' म्हणताना मात्र माझ्याकडे पाहतात. काय विचित्र अवस्था हेाते माझी सांगू !...
माझी अस्वस्थता चेहऱ्यावर दिसली की उगाच खोल हसतात. ते असं का करत असावेत ? मी दिसायला चांगली आहे म्हणून ? की काही प्रेमबिम.... छे ! छे ! माझ्यापेक्षा निदान दहा बारा वर्षांनी तरी मोठे असतील ते. त्यांच्या मनात असं पाप नाही येणार. तो माणूस तसा नाही वाटत. पण प्रेमबिम म्हणजे पाप असतं ? प्रेम आणि पाप तसे विरुद्धार्थी शब्द. असं आमच्या मराठीच्या चौधरीबाई म्हणतात. जो प्रेम करतो तो पाप करूच शकत नाही आणि पापी मनुष्य प्रेमाच्या वाटेलासुद्धा जात नाही. अरेच्या ! मी हे काय भलतंसलतं आठवत बसलेय ? पाटील सर तसे नाहीत याची मला पक्की खात्री आहे. पण.... `तसे' म्हणजे कसे ? तसे म्हणजे साळवी आणि चौगुले सरांसारखे . त्यांची नजरच वाईट. साळवी सर आम्हाला पी .टी.ला आहेत. आहेत आपले ७वी पासून. तेव्हापासून आम्ही
मुली त्यांच्यावर लक्ष ठेवून आहोत. मुलींना हात लावण्याची एकही संधी सोडत नाही हा माणूस. शी %!... कवायत घेताना आपले हात ताठ असले तरी मुद्दाम मागे येऊन मुलींची कोपरं पकडणार. थोडी चूक मिळाली तरी मुलींच्या पाठीवर हळुवार धपाटे. यात कुरवाळणंच जास्त. क्रीडामहोत्सवाला मुली हाफपँट घालून कबड्डी-खोखो खेळायला मैदानावर उतरल्या की या माणसाची बुभुक्षित नजर पहावी. अशी माणसं शिक्षक का होतात ? केवळ नोकरी म्हणून की असे `चान्स' मारायला इथे भरपूर मुभा असते म्हणून.
मागचाच एक प्रसंग. मी नववीला होते. शंभर मीटर धावण्यात माझा पाय मुरगळला. मी जागीच बसले.भयंकर वेदना. मस्तकात सणक गेली. पण त्यानंतर लगेच आठवले साळवीसर, यासारखा चान्स ते कधी सोडतील. वेदनेपेक्षा या कल्पनेने अंगावर एक शिसारी आली. आणि ते खरंही ठरलं. साळवीसर आयोडेक्सची बाटली घेऊन हजर. माझ्या बाजूला मुलींचा हा घोळका.
``चला ! मुलींनो बाजूला सरा. बघू दे मला काय झालंय ते'' साळवी सर उतावीळ झालेले नुसते. पण मीही कमी शहाणी नव्हते. लगेच म्हटलं, ``काही नाही सर, असं होतं अधनंमधनं. मी ठीक आहे.''
``असं कसं पाठारे ? शिरेवर शीर चढली तर आताच उतरवायला नको का ? नाही तर वांदे व्हायचे. बघू बरं कुठं लागलंय ?'' त्यांची बोटे मला किड्याप्रमाणे वाटायला लागली. औषध लावण्याचा उदात्त हेतू, पण आत एवढा विकृत अंतस्थ हेतू ! मी पुढं काही बोलेपर्यंत त्यांची आयोडेक्सने माखलेली बोटं माझ्या गुडघ्यापासून ते पोटरीपर्यंत फिरायलासुद्धा लागली. हा कार्यक्रम पूर्ण पाच मिनिटं चालला. आता मला ते उचलून बाजूला नेण्याच्या विचारात असावेत.
``शिपाई पण अशा वेळी कुठं जातात ? आता या पोरीला इथंंच ठेवायचं कसं ? ए पोरींनो ! सरा बाजू. आता मलाच उचलायला पाहिजे.'' पण मी त्यांचा हा हेतू मात्र सफल होऊ दिला नाही. दोन-तीन मैत्रिणींच्या मदतीने कळा सोसत उभीसुद्धा राहिले. मनात प्रचंड राग, अंगात वेदना आणि समोर खुशाल आपल्या स्त्रीत्वावर हात फिरवणारा हा नराधम. माझ्यातल्या स्त्रीपणाचा भयंकर अपमान झाला. तो गिळता गिळवत नव्हता. मी म्हणते आमच्या शिक्षिका कुठे गेल्या होत्या. त्यांनी नको होतं का पुढे यायला. शेवटी एक मुलगी जखमी झालीय, मुलगा नाही. पण शाळेत हे कोण विचारात घेतं. सरांबद्दल काही बोलायची सोय नाही. शिक्षक म्हटलं की न मागताही आदर्शाचा बिल्ला त्याच्या कपाळावर आपणहून चिकटतोच. याला साळवीसर तरी कसे अपवाद आणि झाल्या प्रकाराची दाद तरी कोणाकडे मागू ? इतरांच्या दृष्टीने हा क्षुल्लक रुटीन प्रकार. तुझ्याच मनात वेडंविद्र, असं मला हे लोक सुनवायचे. त्यापेक्षा आपलं दु:ख तळघरात कोंडलेलंच बरं.
चौगुले सरही त्यातलेच. विज्ञान शिकवतात. प्रयोगशाळेत प्रयोग दाखवताना मुद्दाम मुलींच्या टेबलावर. त्यांचं अर्ध लक्ष परीक्षानळीत आणि अर्ध आजूबाजूच्या मुलींकडे. मुलांनी प्रयोग विचारला की वैतागलेच पण मुलींच्या अंगचटीस येण्यात त्यांना कसला असुरी आनंद मिळतो ? शेवटी पुरुषाचं शरीर आणि स्त्रीचं यात कितीसा फरक ? काही अवयवांचा आणि तरीही हे इतके पागल होतात आणि शाळेसारख्या पवित्र वास्तूत हे चाळे ? .... यांना शिक्षक बनवतं तरी कोण ? परीक्षेची वेळही हे सोडत नाहीत. सुपरव्हिजनला हे लोकं पेपरवर सही करताना स्पर्श करतात. ती किती टेन्शनची वेळ. एकतर आमचा अभ्यास हा असा. त्यात त्यांचा ताप. शी%! कसली शाळा नि कसले शिक्षक ! मला तर काही वेळा तिथून पळून जावंसंच वाटतं. पण नाही जात. तिथंच थांबते सगळं सहन करत मुकाटपणे. अबला वगैरे म्हणून नाही.ह्या परिस्थितीच्या चक्रात अडकले म्हणून. हा गाडा खेचायचा दहावीच्या शेवटच्या परीक्षेपर्यंत.
वाईट वर्तणूक, पराकोटीची मस्ती, मुलींची टिंगल, मुलीमुलींची प्रेमप्रकरणं, सिंगरेट-दारू-गुटख्यासारखी व्यसनं यावर शाळा लगेच विद्यार्थ्यांवर अॅक्शन घेते. पण या मास्तर लोकांचं काय ? ....बरं ! बरं ! सरांचंच असं नाही हं. आमच्याकडे एक दोन शिक्षिकाही असल्याच. जरा उंच पुरा देखणा मुलगा दिसला. जरा तरतरीत वाटला की तो ह्यांचा `आवडता विद्यार्थी.' आता तुम्हीच संागा. आठवीत दोन वेळा नापास झालेला सुनील नवाथे ह्याचा लाडका कसा ? तो काय अभ्यासात हुशार आहे की स्पर्धा खेळांमध्ये ? सारखं आपलं `सुनील ! सुनील !'... इतकं आकर्षण होतं मग शिक्षिका तरी कशाला झालात ? एखादं कॉलसेंटर पकडायचं.
पुरुष कसेही वागले तरी बाइंर्नी व्यवस्थित असावं. मला तरी असं वाटतं. काही वेळा असं वाटतं, या बायकाच पुरुषांना उपसवतात. नाहीतर पुरुषांची काय बिशाद असं वाह्यात वागण्याची? शाळेतल्या बाइंर्नी नीट राहावं. नीट वागावं. मेकअप, स्टाईलिश पंजाबी ड्न्ेस, फॅशनेबल ब्लाऊज कशाला ?... बाइंर्ची राहणी साधीच असावी. साधी साडी आणि लांब हाताचा ब्लाऊज, पूर्ण अंग व्यवस्थित झाकलं जाईल असा. वागणं दुसऱ्याला आदर निर्माण करायला लावणारं. मुलांच्या मनात प्रेमयुक्त भीती निर्माण व्हावी. चित्रपटात दाखवतात ना शिक्षिका अगदी तशा. चित्रपट आज कितीही बिघडले असले तरी त्यातले शिक्षक शिक्षिका अजून तसेच आहेत चारित्र्यवान. नशीब आमचं, नाहीतर शाळेत अजून काय काय पाहायला मिळालं असतं. परमेश्वर जाणे....
मी तरी आता हा सगळा विचार कशाला करत बसलेय ? काय झालंय मला ? वर्गात आजिबात लक्षच लागत नाहीये. इतिहासाचा तास सुरू होऊन सानेबाई `सशस्त्र क्रांतिकारकांच्या चळवळी'बद्दल सांगत होत्या.
``मला नेहमी नवल वाटतं इतिहासाच्या पुस्तकात सशस्त्र क्रांतिकार्याबद्दल फक्त तीनचार पानं बाकीचं सगळं पुस्तक गांधींच्या चळवळीनं भरलेलं. म्हणजे इतिहास काय तो गांधीजींनीच घडवला ? क्रांतिपर्व हे मान्यच नाही की काय पुस्तककर्त्यांला ?'' साने बाई गंभीरपणे बोलत होत्या.
``असं का बाई ?'' रघुनाथ मानेनं चटकन विचारलं. हा नेहमीच उगीच मध्येमध्ये चावी भरत असतो. पुढे-पुढे करण्याची विलक्षण खाज.
``राजकारण बाबा ! दुसरं काय....'' सानेबाईनंी उसासा टाकला. सानेबाई पक्क्या सावरकरवादी म्हणून शाळेत प्रख्यात... मग मी कोणवादी आहे ? की मला काहीच वाद नाही. बहुतेक तेवढी समज, अक्कल नसेल मला.
तो सातव्या बेंचवरचा शशी म्हात्रे. नेहमी माझ्याकडे बघत असतो. बोलतबिलत नाही, नुसता बघतो. का कोणास ठाऊक, तसा तो वर्गातला सर्वसाधारण मुलगा, अभ्यासात वगैरे ठीक. खेळबीळ माहीत नाही. पी .टी.च्या तासाला जाईल नि पाण्याच्या टाकीवर बसून मित्रांबरोबर गप्पा हाणीत बसेल. पण तसा हा निरुपद्रवी मुलगा. नववी `क'तला अंकुश देसाई मात्र महाभयंकर. तसा तो माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान. पण गेल्याच महिन्यात प्रार्थनेनंतर मला त्यानं खालच्या जिन्यात गाठलं आणि म्हणतोय कसा ``अंजू ! आय लव्ह यू'' मी उडालेच. म्हटलं `अरे ! वयाचा तरी विचार कर' तर लगेच `प्यार में उम्र का लिहाज कहाँ.' नंतर त्याच्याशी बोलायचं दूर, बघत देखील नाही मी त्याच्याकडे. त्या दिवशी बाजारात गेले होते मच्छी आणायला. तेव्हा झटकन सायकलवरून कट मारली मला आणि खि! खि!! हसत निघून गेला. तेव्हा एक गोष्ट जाणवली मला. मला मोठा भाऊ असायला हवा होता. त्याने चांगला झोडपला असता देसायाला. पण ती उणीवच राहिली माझ्या आयुष्यात घरची गरीबी अजून त्यात भर...
मुलगी सुंदर आणि परिस्थितीत गरीब, असहाय्य असेल तर लोकांना ऊत येतो. प्रत्येकाला मतलब साधायचा असतो एकच. फक्त ते वेगवेगळया रस्त्यानं प्रयत्न करतात. कोणी सहानुभूती दाखवतो तर कोणी मदतीचा हात मागितल्याशिवाय पुढे करतो. तर कोणी चेष्टा मस्करी करतो. अती जर बेफाम असेल तर डायरेक्ट प्रपोजल टाकतो - `येतेस का ?'.... काही वेळा असं वाटतं मी चारचौघींसारखीच दिसायला हवी होते. निदान ही कटकट तरी टळली असती. पण तसाही विचार व्यर्थ. इतर साधारण दिसणाऱ्या मुलींच्या वाट्यालाही हा त्रास कमी जास्त प्रमाणात आहेच. मुलगी म्हणजे वस्तू वाटते सगळयांना. प्रत्येकाला मिळवण्याचा खटाटोप.
... पण पाटीलसरांनी मला का बोलावलं असेल ? आणि तेही शाळा सुटल्यावर ? त्या दिवशी भूमितीचं प्रमेय विचारायला शिक्षक खोलीत गेले त्यांना. नंतर बाहेर पडताना म्हणाले, ``पाठारे, जप स्वत:ला. फार वेगळी मुलगी आहेस.''
``म्हणजे ?'' मी बुचकळयात पडले. कारण मी इतरांहून वेगळी आहे हा साक्षात्कार मला एकदम नवीन.
``तुला नाही कळायचं, कस्तुरी मृगाला कुठं ठाऊक असतं त्याच्यापाशी सुगंधी कस्तुरी आहे ते. मला कधीही भेट. गणितासाठी; आणि इतर कोणत्याही अडचणीसंबंधीसुद्धा.'' ते आरपार बघत हसत बोलले.
त्यांचं `इतर कोणत्याही अडचणीसंबंधी' हे जरा मला बुचकळयात टाकणारं. हे काय माझ्या अडचणी सोडवणार ? आणि माझ्या अडचणी नेमक्या कोणत्या हेच जर मला माहीत नाही तर मी यांना काय सांगू ? हे सर नेहमी नं, असंच काहीतरी मोघम, अर्धा अर्थ असलेलं बोलतात. ते असं का वागतात तेच कळत नाही मला. मागे रस्त्यात भेटले तर बोलता बोलता माझा हातच पकडला, बोलले, `अंजू ! शाळा सोडल्यावर विसरू नको आम्हा शिक्षकांना' आणि स्वत:च्या घरचा फोन सोडून मोबाईल नंबर दिला. म्हणाले, `कधीही फोन कर. काही मदत लागली तर धावून येईल.' त्यांच्या अशा चमत्कारिक वागण्यानं किती भेदरले मी ! घरी येताना त्या मोबाईल नंबरच्या चिंध्या केल्या. रात्री झोपेतसुद्धा तो नंबर मला दिसत होता. आईला सांगावं तर तसं तिच्या दृष्टीने विशेष काही नाही. भाऊंना तर सांगण्याचीही सोय नाही. आणि त्या आठवड्यात त्यांची लागून नाईटड्युटी, झालं तो विषय तिकडेच संपला.
.....शेवटचा मराठीचा तास संपला. शाळेची घंटा झाली. `वन्दे मातरम्'सुद्धा संपले. तसे माझे पाय लटपटायला लागले. आता पाटील सर, बाप रे !.... पण लगेच सावरलं स्वत:ला. विवेकानंदांनी म्हटलंच आहे, `कधी जेव्हा अडचणी येतील तेव्हा पळू नका. वळा आणि त्यांचा सामना करा.' मला हा विचार दीपस्तंभासारखा वाटला. कधीतरी काहीतरी शिकलेलं असं कामाला येतं. अच्छा ! तेवढ्यासाठीच ते मूल्यशिक्षण बिल्यशिक्षण असतं तर....
शाळेच्या गेटमधून बाहेर पडले. बरोबरच्या मुली पांगल्या. कोणी आजूबाजूला दिसेना. म्हटलं सुटले सरांच्या तावडीतून. दोन पावलं पुढे जाते न जाते तोच एक रिक्षा कचकन ब्रेक दाबून बाजूला उभी. आणि आत पाटील सर. ``अरे, अंजू, मी तुला शाळेत बघत होतो. चल ! बस.''
``सर, असू दे सर, मी जाते. मला उशीर होतोय.'' पण माझे पाय हलेनात. सरांनी ते बरोबर जाणलं, म्हणाले, ``अगं अगदी पाचच मिनिटं काम आहे. तुला हवंतर रिक्शानं तुझ्या घरापर्यंत सोडतो. मग तर झालं.''
आता मला बोलायला वावच नव्हता. मुकाट्यानं रिक्षात बसले. सर मधल्या सीटवर बसलेले. तिथे सरकायला तयार नाहीत. त्यामुळे त्यांना चिकटूनच बसायला लागलं. अचानक त्यांनी मारलेल्या धुंद करणाऱ्या सेन्टचा वास दरवळला. हवाहवासा वाटणारा पण कधीच न परवडणारा. मी रिक्षानेही प्रवास करीत नाही. झेपत नाही असली चैन. आपली पायगाडी बरी. कधी पिनांचा माल आणायला बसले तर सगळं लक्ष त्या पैशांच्या मीटरकडे.... त्यात एकदा दहा पडले की वीस पडण्याची भीती मग तीस, चाळीस.... आम्ही गरीब माणसं अशीच मरायचो. नशीबात चैन नाही आणि जिंदगीत समाधान. शाळेत शिकल्या सवरल्या मध्यमवर्गीयांकडून मोठ-मोठ्या गोष्टी नुसत्या शिकायच्या त्याही फक्त दहावीपर्यंत.
रिक्षा एका भल्यामोठ्या शानदार हॉटेलसमोर थांबली. आम्ही हॉटेलमध्ये शिरून ए.सी. कक्षात जाऊन बसलो. एकमेकांसमोर थंड-कुंद वातावरण आजूबाजूला पाहिलं. बऱ्यापैकी श्रीमंत लोक त्यात प्रेमी युगुलंच जास्त. ते सगळं एकमेकांबरोबर गुलूगुलू हळू आवाजात बोलत होते. बारीक आवाजात एक गझल झंकारत होती.
हं ! जगजीत सिंगचीच बहुतेक.
``अंजू ! काय घेणार ?'' मेनूकार्ड घेऊन आलेल्या वेटरकडे बघत सरांनी विचारलं. हॉटेलातला पोऱ्या नि रेस्टॉरंटमधला वेटर यातला फरक मला त्याक्षणी समजला. `काहीही चालेल' मी पुरती गांगरलेले....
सरांनी ऑर्डर दिली. वेटर निघून गेला.
``अंजू ! फार महत्त्वाचं बोलायचं आहे मला.'' सर
``माझ्याशी ? माझ्याबद्दल ?....'' मी
``नाही. आपल्याबद्दल. आपल्या दोघांबद्दल'' सर.
मी पुरती चक्रावले. घाबरलेसुद्धा. आता हे काय बोलताहेत हे ऐकण्याशिवाय गत्यंतर नव्हतं.
``म्हणजे ?....'' मला आता थोडीशी उत्कंठा वाटायला लागलेली.
``मला कोड्यात बोलायची सवय नाही. आणि तुझ्याशी तर मुळीच नाही. अंजू ! माझ्याशी लग्न करशील ? मला तू खूप आवडतेस.'' सरांचा आवाज घोगरा झालेला.
``पण सर तुमचं लग्न झालेलं आणि.....'' मी
``तर काय ? माझी बायको इथे शहरात असते. मी शिक्षक असलो तरी इतर मास्तरांसारखा पैशाला महाग नाही. नाशिकला द्राक्षांचे मळे आहेत. मोठं घर आताच यावर्षी बांधलंय. घरी मी, आई आणि वडील. तू तिथे राहशील आणि पहिली बायको इथे. फक्त इथे कोणालाच कळता कामा नये.'' सर भराभर तोंडाला येईल ते पण मुद्देसूद बोलत होते. मी आता यांना काय सांगणार ? याला शहरात एक आणि गावाला एक अशा दोन बाहुल्यांची सोय करायची होती. म्हणजे दोन्हीकडे खेळायला मोकळे. स्त्रीला हे लोक काय खेळणं समजतात ? असतील पैसेवाले. मी असेन गरीब. म्हणून स्वत:चं सर्वस्व यांना देऊन टाकू केवळ ऐषआरामासाठी. सध्याच्या आयुष्यानं पीडलं यासाठीच ?.... मला त्यांना चांगलं सुनवायचं होतं. अगदी मनाच्या तळापासून. पण तोंडून शब्दच फुटत नव्हता.
``सॉरी सर, मला शक्य नाही. मी जाते,'' मी समोरचा मसाला डोसा अर्धा टाकून उठले.
``अंजू ! बस. रागावू नकोस.'' सरांनी चक्क माझ्या दोन्ही खांद्यांवर हात ठेवून मला बसवलं. ``मला माहिती आहे, तू एक मानी मुलगी आहेस. म्हणून आवडतेस. मला तुला पुढे खूप शिकवायचंय. मोठं करायचंय. तू गैरसमज करून घेऊ नकोस. तुझ्यासारख्या टॅलेंटेड मुलीला दहावीनंतर तुझे आईवडील काय भविष्य देणार ?.... कोणत्या तरी कामाला जुंपतील नाहीतर मुलीच्या तरी कॉलेजात घालतील. तू संुदर आहेस त्यामुळे तुझ्या आजूबाजूला सतत कसल्या कसल्या मुलांच्या घिरट्या सुरू होतील. जे तुझ्यासाठी धोकादायक होईल राणी !..... मी विवाहित असलो तरी मनापासून प्रेम करतोय गं !.... म्हणून जीव जळतोय तुझ्यासाठी. जगणं असह्य झालंय तुझ्याशिवाय. मला फक्त तू हवी आहेस. फक्त तू.'' सरांच्या डोळयात चक्क पाणी.
मला सुचेना. सरांचं भाकित काही खोटं नव्हतं. पण हे खरं तर कशावरून स्त्रीचं नशीब पाचोळयात असतं. कधी बदलेल नाही सांगू शकत. इतकी का मी दुर्भागी आहे ? माझं पुढचं असणं हे परिस्थितीच्या हातात. माझ्या हातात काहीच नाही ? इतकी परस्वाधीनता !.... मी इतकी लाचार आहे की गुपचूप यांना सर्वस्व वाहून ?..... पण त्यात तरी काय वाईट आहे ? चांगलं घर, सुबत्ता. सरांसारखा वयानं दहाबारा वर्षांनी असला तरी सुविद्य पती. अजून स्त्रीला काय हवं असतं ?.... हे स्त्रीस्वातंत्र्य, संघर्ष पुस्तकात वाचायला ठीक. स्त्री तशी अबलाच आणि ती गरीब असेल तर तिचे हाल पाहायलाच नको. सर विवाहित असले म्हणून काय झालं ? आज कमी का लोकांनी दोन लग्नं केलीत ? त्यांना त्यांचंच एक पुरे मला इथे चांगलं आयुष्य मिळेलच याची काय गॅरेटी ?.... माझी अवस्था द्विधा झालेली.
``मी विचार करते सर,'' इतकं बोलून मी उठले. आणि चालतच घरी निघाले. मी विचार करते असं का म्हणाले ?..... मला स्वत:चीच कीव वाटायला लागली. रस्ता संपायला आला तरी विचार संपत नव्हते. तसं पाहायला गेलं तर मी एक शाळकरी मुलगी. लग्नाचा विचार एवढ्यात कशाला हवाय. यानंतर खरं तर मी कॉलेजचा, पुढच्या शिक्षणाचा विचार करायचा. त्यानंतर चांगली नोकरी आणि मग लग्नबिग्न.... पण हे केव्हा ? जर माझी कौटुंबिक स्थिती.... पण ती ही इतकी खालावलेली नाही. पण तितकीशी बरीही नाही. गरीबी हा शाप असतो असं म्हणतात तेही खरंच. आर्थिक सुबत्ता असती, शिकवणारे आईवडील असते, तर कशाला अशा पाटीलबिटीलनं मला असं विचारलं असतं. मग अशा पाटील सराने अभ्यासात मदत केली असती. घरी ट्युशनला पण आला असता.... पण आता माझी अवस्था पंख कापलेल्या पक्षिणीप्रमाणे. मनात असून उडू शकत नाही. शिकार होण्याची इच्छा नाही. पण मी करू तरी काय ?.... संकल्प माझे काहीही असले तरी ते सिद्ध व्हायला हवेत. संकल्प आणि सिद्धी यामधे नियती उभी असते. हे काही खोटं नाही. मी अनुभवतेय आज. असहाय्यतेनं, मनात इच्छा नसूनही...
- संदिप गीध, मालाड, मुंबइ



viagra
avxxex viagra qdQLo cialis online 5975 buy cialis online :-O viagra 8]]] cialis without prescription KWSvnW viagra >:-[
cialis
wfdtwfc cialis >:-OOO cialis %-[[[ viagra alternatives :-O order viagra online joKtf cialis >:]] viagra 9964
viagra
ppggurjq http://yjojyp.com/ otvwsh [url=http://exjlqf.com/]otvwsh[/url]
viagra
ftfeeclv http://eaiaju.com/ vuwhydgc [url=http://lahihv.com/]vuwhydgc[/url]
viagra
rkrrihcx http://edmypy.com/ pwxhiora [url=http://jckqot.com/]pwxhiora[/url]
tvrpes
cqnrcmnj
mnhrrvgw
skecmuv
Attention, please. As there
Attention, please. As there are a large of moncler women jackets which beyond our expectation, so we moncler men vests the another Moncler sale on the Internet. If you do not choose what moncler down jackets in our store, you can check it in the Moncler shop online. We will put more kinds of Moncler clothing on it. moncler women coats customer. ”
” That is wonderful. Let’s go home and buy on cheap monclers.”We even could not get in the store. While we were facing a anxious waiting, a voice came out.“Wait a minute, i should take more money with me. I also Moncler kids Jackets Moncler clothing for families. You know, moncler online really really a golden opportunity.”
Michael Vick Authentic
Michael Vick Authentic Jersey
DeSean Jackson Authentic Jersey
Nnamdi Asomugha Authentic Jersey
Brent Celek Authentic Jersey
LeSean McCoy Authentic Jersey
DeSean Jackson Jersey
Michael Vick Jersey
Nnamdi Asomugha Jersey
Brent Celek Jersey
LeSean McCoy Jersey
Asante Samuel Jersey
Brandon Graham Jersey
Jeremy Maclin Jersey
Nathaniel Allen Jersey
Randall Cunningham Jersey
Reggie White Jersey
Stewart Bradley Jersey
Wes Hopkins Jersey
Dominique Rodgers-Cromartie Jersey
Customized
LaDainian Tomlinson Authentic Jersey
Darrelle Revis Authentic Jersey
Nick Mangold Authentic Jersey
Mark Sanchez Authentic Jersey
Dustin Keller Authentic Jersey
Jets Jersey
New York Jets Jersey
Cheap Jets Jersey
Antonio Cromartie Jersey
Bart Scott Jersey
Brett Favre Jersey
D'Brickashaw Ferguson Jersey
Darrelle Revis Jersey
Dennis Byrd Jersey
Dustin Keller Jersey
Dwight Lowery Jersey
Joe Klecko Jersey
Joe Namath Jersey
Kyle Wilson Jersey
LaDainian Tomlinson Jersey
Laveranues Coles Jersey
Leon Washington Jersey
Mark Gastineau Jersey
Mark Sanchez Jersey
Muhammad Wilkerson Jersey
Nick Mangold Jersey
Plaxico Burress Jersey
Santonio Holmes Jersey
Shonn Greene Jersey
Thomas Jones Jersey
Vernon Gholston Jersey
Wesley Walker Jersey