Skip to main content

खिडकीशी उभं राहून ती सारखी पक्ष्याांना बोलवत होती. ``अरे या, बघा, तुमच्यासाठी किती छान धान्य ठेवलं आहे. लेक हो तुमची मजा आहे. तुम्हांला बोलावून-बोलावून खायला घालतात. पिवळया रंगाचा माझा धिटुकला कुठे गेला ? आज तो रागावला की काय ? थांबा मी दुर्बिणीतून बघते. समोरच्या भगदाडात लपला असेल लबाड. हं तो बघा, तिथेच बसला आहे. आज त्याला यायचं नाही का ? काही कळत नाही. अर्थात मला सगळं कळायलाच हवं असं थोडंच आहे ? काहीही न कळता, समजता, माणूस म्हणून राहता येत असेलच ना ?''
``अरे बाबांनो, केवढं तापलंय, झाडावर एक पान दिसत नाही. त्यांना नको असलेलं टाकून देता येतं, की जातं आपोआप. गळून. गळाल्यावर काय वाटतं त्यांना ? तुम्हांला माहीत आहे ? नाही ना ? साधी एवढी माहिती नसावी ? तुम्ही त्यांच्या अंगा-खांद्यावर वाढता ना ? फुलता, फळता, तुमच्या संसाराची स्वप्नं त्या झाडावर बसूनच बघता ना ? तरीही त्याला एकट्यालाच सोडता ?''
प्रिय रेवा,
आपण परवा भेटलो, तेव्हा तू म्हणालीस माझ्या सर्व भावना तुला समजल्या, त्या कशा काय ? मी तर त्या बोललेच नाही. सगळं वरवरचं होतं गं ते. तू खूप समजावून सांगितलंस की, बाहेरच्या कामाशिवाय तू दुसरं काहीतरी कर. म्हणजे काय ? शिवण-टिपण, पापड-लोणची. हे तर माझ्या पिढीने पारच बाद करून टाकलंय. मग उरलं-सुरलं ट्युशन घेणं. तेही मला फारसं जमणार नाही. मला पोरांचीच आवड नाही. जी एक टक्का होती ती माझं पोर गेल्याबरोबरच गेली. आता परत त्या मुलांमध्ये आनंद वगैरे शोधायचा आणि डोळयांतून टिपूस गाळत राहायचं. हे जरा अतिरेकी वाटतंय. बाहेर रस्त्यावरून भरभर चालणारी माणसं पाहिली की मला त्यांचा फार हेवा वाटतो. काय काम असेल ग त्यांना ? इतकं घाईघाईने जाऊन करतात म्हणजे महत्त्वाचं असेल ना ? मग ते काम झाल्यावर ते निवांत बसतील माझ्यासारखे ? की दुसरं काम ? सततची लगबग, गाडी पकडण्याची धावपळ, भाजीवाल्याची पळापळ, दूधवाला, सगळे सगळे कामात आहेत आणि मी ?
तुझी ,
नली.
अरे बदामाच्या झाडाला एकही पान उरलं नाही. कशी पटापट गळाली पानं. आता काल-परवा तर मी लाल-चुटुक बदाम गोळा केले होते. अजून तर ते पुरते वाळलेही नाहीत. आता ते बदाम फोडण्याचं मोठ्ठं काम बाकी राहिलं. (मुद्दामहून मोठ्ठं) तसे झाडाला बारीक-बारीक कोंब फुटत आहेत. ते बघ. ते बघ. साळुंकीबाई तुम्ही जरा बाजूला होता का ? नाही ? बरं ठीक आहे. का गं आज धनेश दिसला नाही. लांबवरून त्याची शीळ ऐकू येते. हा आपला धनेश साधा आहे म्हणून बरं, तोच जर का रंगीबेरंगी असता तर? सगळे त्याला पाहायला आले असते. मग तो माणसांत राहिला असता का?
प्रिय रेवा,
काल एका संस्थेत गेले होते. तुझ्या आग्रहावरून आणि माझ्या पायांना चालावसं वाटलं म्हणून. माझ्या पावलांना अनेक रस्तेच फुटले आहेत असंच वाटतं. ते सारखे धावायला पाहतात. लांबवरची स्वप्नं धरायला पाहतात. पण कितीतरी कारणांनी त्यांना मी गप्प बसवते. हं तर संस्थेतल्या लोकांनी विचारलं, कधीपासून काम करणार?
मी आनंदाने तत्परतेने म्हणाले, लगेच आत्तापासूनच.
मॅडम, तुमची आवड बघून मला खूप आनंद झाला. पण उद्यापासून आठ दिवस संस्थेला सुट्टी आहे. काही कार्यक्रम अरेंज केले आहेत. त्यामुळे आठ दिवसांनी मला फोन करा. चालेल ?
मला फार तिरसटासारखं बोलावसं वाटलं, नाही चालणार.
पण मी मधाळ हसून आठ दिवस कसे काढायचे या विचाराने घरी चालत आले. डोक्यावरचा सूर्य तापला होता. त्यालाही काम होतं. ते त्याला आवडत असणार ना गं; की तोही नावडीचं काम करत असेल ? कोणाशी फोन करून बोलायचं म्हटलं तरी मनावर खूप दडपण येतं. वाटतं पलीकडील व्यक्ती कुठल्या तरी महत्त्वाच्या कामात गंुतलेली असणार आणि मी रिकामपणाच्या गोष्टी केल्याने त्यांचा अमूल्य वेळ वाया जाणार.
तुझी ,
नली.
आज तुम्ही एकटेच ? बाकी पक्षी कोणीच नाही ? असा भेदभाव करायचा नाही, असं ठरलं होतं ना आपलं ? पोपट-मैना-राघू, कावळे, चिमण्या, धनेश, घारी, साळुंक्या या सर्वांची एकच जात, ती म्हणजे पक्षी. पक्ष्यांची जात. आमची नाही का मानव जात.
साळुंके, तुला खूप दिवसांपासून विचारीन म्हणते की तुमच्यात साळुंकी-पोपट, कावळा, कोकिळ अशी लग्नं होतात का गं ? नाहीतर एकमेकांबद्दल आकर्षण वगैरे. म्हणजे समजा पोपटाचा आवाज, रंग, कसलीशी ऐट बघून तू त्याच्या प्रेमात वगैरे पडलीस. असं कधी झालं आहे ? तुझ्या बाबतीत नाही तर इतर कोणाच्या बाबतीत. नाही ? मला तर ही फार अशक्य गोष्ट वाटते. अगं, असं व्हायला पाहिजे. ते नैसर्गिक आहे.
आज बाहेरच्या टपात पाणी ठेवलंय, तिकडेच प्यायला जा.
प्रिय रेवा,
मुलगा गेल्याने माझ्यात पोकळी निर्माण झाली, असं तुला वाटतं. सुरुवातीला मलाही तेच वाटायचं, की त्याची जागा कोणी भरून काढली की सगळं परत पूर्वीसारखं होईल. पण जसजसा बारीक विचार करते, प्रसंगाचं वर्गीकरण करते, तेव्हा वाटतं तो असता तरी किंवा तो असतानाही मी अशीच होते. जगायचं कशासाठी ? हा प्रश्न ठिकठिकाणी येऊन विचारतच होता. हे जीवन सुंदर आहे. मी निरनिराळया प्रकारे समजावून घेतच होते. आपलं घर आपल्याशिवाय चालणार नाही. ही भावना लग्न करतानासुद्धा व त्यानंतरही कधी माझ्या मनात नव्हती. खूप सगळं मनापासून करताना दुसरीकडे बाजूला उभी राहणारी, एकटी. तेव्हाच जाणवलं, फार फार सोसावं लागणार. कुठेतरी तळात घालून ठेवलंय मी स्वत:ला, असं तू म्हणतेस, पण वाटतं माझ्या आत काहीच नाही, घडणाऱ्या सर्व गोष्टी मला नवीन आहेत आणि त्यांचा माझ्यावर ओरखडाही पडत नाही. म्हणजे संवेदनाहीन झाले का मी ?
तुझी,
नली.
उगाच आकाशात लांब-लांब भराऱ्या मारायच्या. तारेवर उलटं टांगून घ्यायचं आणि आता आपण मरतो आहोत, या भावनेने आर्त कलकलाट करायचा. हे सगळं कशासाठी ? हे झाड नाहीतर ते झाड, या इमारतीचं भगदाड नाहीतर त्या, असं कारण नसताना फिरताना, तुमच्या मनात येत नाही का ? की आपण काय वेळ काढतो आहोत ? आजूबाजूचे लोक ज्यांना कामं आहेत ते काय म्हणतील ? घरची कामं करायला माणसं आहेत म्हणून असे रिकामे उद्योग सुचतात. असं म्हणण्याची तुम्हांला भीती नाही वाटत ? इतकं तुम्हांला तुमचं फिरणं, लटकणं, ओरडणं, खाणं महत्त्वाचं वाटतं.
प्रिय रेवा,
निसर्गत:च आपण एकटे असतो, समाजात राहून एकटे. अगं, या वाक्यापुरता मर्यादित नसतो तो एकटेपणा. मोठमोठी घरे आणि त्यांच्या लहान लहान खिडक्या, नाहीतर लहान घरात खचाखच भरलेली माणसं. तिथे एकटेपणा वळचणीला बसला तरी तो असतोच. कधी कधी हावरटासारखी माणसं गोळा करीत फिरतो आपण, तेव्हा एकटेपणा वाटण्याचा हेतू थोडाच असतो ? सर्वांमध्ये प्रिय होण्याच्या आकांक्षेने, लालसेनेही तसं करत असू नाही का ? पण असं स्वत:ला सगळयांमध्ये कुठं वाटता येतं ? शेजारच्या मेहतिनीसारखं मी बोलायला लागले तर मी आतल्या आत शोषले जाते आहे. असंच मला वाटेल. अगं, एकटेपणा मिरवायची का गोष्ट आहे ? तिचा अनुभव फार वाईट असतो. सगळयात असून दूर कुठेतरी स्वत:शीच किती काळ भांडणार असतो गं आपण ?
तुझी,
नली.
भारद्वाजाचा कुठे वाडा असतो का साळुंके ? कधीतरी त्याने तुला बोलावलं असेल ना ? हे काय तुम्ही एकमेकांना बोलवत नाही. म्हणजे दुसऱ्या पक्ष्यांशी तुम्ही बोलत नाही ? तुम्ही पुतळे उभारता का ? नाही ना? मला वाटलंच. माणसांनी उभारलेल्या पुतळयांवर घाण करणारे तुम्ही, पुतळयांचं, आदर्शांचं तुम्हांला काय कौतुक ? मग एकमेकांबद्दल वाटणारा आदर सन्मान कसा दाखवता, की तो दाखवायची जरूरच नाही तुम्हाला ? म्हणजे तुमच्याकडे कोणी महान कार्य वगैरे करतच नाही ? असं कसं ? गहू महागलाय बाई, म्हणून ज्वारी घालते, चालेल ना ? कावळा मासे खाऊन गेलाय. तो बघ समोरच्या बोडक्या झाडावर त्याचा संसार उभारलाय त्यानं.
प्रिय रेवा,
मला वाटतं, मी मेंढपाळांच्यातच जन्माला यायला हवी होते. मेंढ्यांंसाठी चारा-पाणी शोधत फिरायचं. त्या फिरण्याला काम म्हणायचं. खरंतर शिक्षणाची घोंगडी पटकन काढून फेकावी, अशीच जीर्ण झाली आहे. तिचा तसा काय उपयोग होणार ? जगाच्या पसाऱ्यात आपण कुठे आहोत याचा संदर्भ तपासून बघितला तरच कळणार ना आपल्याला ?
तुझ्या म्हणण्यानुसार जगाकडे उघड्या डोळयांनी बघायला शिकले पाहिजे. माझ्यापेक्षा अनेक समस्यांनी ग्रस्त माणसं असतात, त्यांच्याकडे बघून आपण सुखात आहोत हे मनाला पटवलं पाहिजे. खरं सांगू, समस्या असत्या तर त्या सोडविण्यासाठी मी माझं बळ वापरलं असतं. पण त्याही नाहीत. तू परत-परत मला मुलाच्या मृत्यूकडे नेते. जी समस्या आहे असं मला वाटतच नाही. असं विचित्र मातृत्व घेऊन मी आले; त्याचं मला दु:ख नाही आणि खंतही नाही. पण तुम्ही सर्वजण ते माझ्यावर लादायला बघता. मला झालेली जखम भळभळेल म्हणून गोड गोड बोलता, ते मला आवडत नाही. अगं, तुला कितीवेळा सांगितलं तो असता तरी जीवनात जगण्यासारखं काही राहिलंच नाही, असंच मला वाटलं असतं. तुला माहीत आहे, पक्षीही मरण येईपर्यंत आनंदाने जगतात. असं कुठे फार काम असतं त्यांना ? पण मूठभर धान्य गोळा करण्यासाठी त्यांना दिवस लागतो, त्यातच शत्रूपासून जपावेही लागते. माझा शत्रू कोण ? माहीत नाही ना ?
तुझी,
नली.
आज सकाळचा दूधवाला दिसलाच नाही. गेला का तो ? त्याची चालण्याची पद्धत फार मजेशीर आहे. त्याचे पाय एखाद्या घरी पोहोचण्याच्या आत त्याला घराघरात दूध द्यायचे असते. पण त्याला एवढं भरभर चालणं कसं शक्य आहे ? कोंगाड्या गेल्या का ? आज एकही दिसली नाही. मला खिडकीत यायला उशीर झाला वाटतं ? शी. आज काय करणार आता ? या साळुंकीबाई, आवरली का तुमची कामं ? तरीच पदराला हात पुसत पुसत उगवल्या. एवढं मकडायची काय जरूर आहे ? तुझं असंच रूप चांगलं दिसतं. तू जे वेगवेगळे आवाज करतेस ना ते मात्र अप्रतिम आहे. आवाजावरून कोणाला कळणारच नाही कोण आलं आहे ते ?
प्रिय रेवा,
झाडांवरची सगळी पानं गळून गेली. त्यांचा टवटवीतपणा पार सुकला. कोणी हात न लावता ती गळाली. आपल्याच मर्जीनं ? की हो तू म्हणते तसे कोंब फुटतील, फुटायलाच हवेत. जीवन आहे हे. सुधीर परगावी गेलाय. कोण कशासाठी थांबेल ? आणि का ? प्रत्येकाच्या वाटा ठरलेल्या असणार, कुठपर्यंत चालायचं हेही ज्याच्या-त्याच्या क्षमतेने ठरलेलं, पण मी कुठे चालायचं गं ? एका वादळाची मला नितांत गरज आहे, येईल का ते ? उद्ध्वस्त घालेलं जोडता जोडता तरी हा एकटेपणा संपेल. तुला काय वाटतं ?
तुझी,
नली.
- अश्विनी बर्वे, सोलापूर

buying viagra

viagra

pejvmqze http://ilgfwh.com/ tjfira [url=http://zvmmss.com/]tjfira[/url]

viagra

tmrtqoq http://fakrcp.com/ ewghwm [url=http://dglydp.com/]ewghwm[/url]

dvpvzt

gfesbo

We at panache shoes make the

We at panache shoes make the UGG Australia available to you at your homes without any delivery charges. UGG Men you order, it is upon us to bring it you and get it hand delivered at your doorway. UK Ugg Sale has the most decent prices bringing it down and lighter on your pockets. Buying from us will get you a guaranteed bargain for we boast of some of the best classic ugg like Lulu Guinness, Radley, Baibella, Cosettini, Cheap UGG and Bulaggi, all at attention-grabbing discounts. Ugg discount, you can view the sample ugg bags and choose your favourite among the best. Therefore, hesitate ugg boots sale in thinking twice and order now!