Skip to main content

तेव्हा ती नवीनच लग्न होऊन या घरी आली होती. सासूबाइंर्ना सून म्हणून ती फारशी पसंत नव्हतीच. मुलाच्या आग्रहाखातर त्या तयार झालेल्या.
दिवस मंगळागौरीचा. तिला जवळच एका ठिकाणी पूजेला जायचं होतं. सासूबाई शेजारणींबरोबर बाजारात गेलेल्या. स्वयंपाक तिनेच केला. सासू-सासरे अन् नवऱ्यापुरतं सगळं केलं होतं. अगदी डावं-उजवं, वरण-भात सगळं व्यवस्थित. बटाट्याची कोरडी भाजी अन् दहा पोळया. (रात्रीचा स्वयंपाक या घरी ताजाच लागतो. तिच्या माहेरी....) जाण्यापूर्वी तिने तिघांच्या पानांची तयारी करून ठेवली. आठवणीनं बाबांना दुसरा चहा करून दिला. त्यांना खाण्याचंही विचारलं, पण ते नाही म्हणाले.
सगळं आटोपून, नटून-थटून उत्साहात ती पूजेला निघाली. आणि अगदी निघायच्या वेळी तिला बाबा स्वयंपाकघरात दिसले. चहाचा कप ठेवायला गेले असतील. आता ते हातातच एक पोळी आणि त्यावर भाजी घेऊन खात होते. ही त्यांची नेहमीचीच सवय होती. `वाढूनच देऊ का' असं त्यांना विचारायचं मनात आलं. पण पूजेला उशीर होईल म्हणून ती थांबली नाही.
ती घरी पोहोचली तेव्हा वातावरण अतिशय तापलेलं होतं. सासूबाई रागाने धुमसत पोळया करीत होत्या. नवरा घरी आलेला होता. तिला बघताच त्याने तोंडाचा पट्टा सुरू केला. तिची चूक अशी होती की, तिघांसाठी म्हणून तिने करून ठेवलेली भाजी-पोळी दोघांनाही पुरण्याएवढी नव्हती. बाहेरची कामे आटोपून येऊन त्याच्या आईलाच कामाला लागावं लागलं होतं. (आधीच तर तिला व्यवहारातलं काही कळत नव्हतं, तर आईलाच घरातलं-बाहेरचं सगळं बघावं लागत होतं, हेही त्यात होतंच)
तिने बाबांकडे पाहिलं. ते डायनिंग टेबलपाशी नुसते बसून होते. `मी खाल्ली मघाशी थोडी पोळी-भाजी' असं त्यांनी म्हणावं, असं तिला फार-फार वाटलं. तिलाही ते सांगायचं होतं. पण तिच्यात बोलण्याचं बळ आलं नाही. सगळयांच्या रागाची धग दुरूनही जाणवत होती. आणि बाबांच्या ज्या सवयी तिला काही महिन्यात कळल्या होत्या त्या त्यांनाही माहीत होत्याच.
ते तिचं घर नव्हतं. ती माणसं तिची नव्हती. कधीतरी उपयोगी पडू शकेल असं वाटणारं तिचं हुकुमाचं पान - तिचा नवरा-तोही तिच्या बाजूचा नव्हता. ती एकटी होती, हरलेली होती.
सासूबाई पंधरा दिवसांसाठी गावाला गेल्या होत्या. घरातली सगळी जबाबदारी आता तिलाच सांभाळायची होती. तिला ते सगळं नाही जमणार असा त्यांचा सूर, म्हणून ती आता एक परीक्षाच झाली होती. नवऱ्याचा डबा, कॉलेजला जाणाऱ्या नणंदेच्या वेळा, बाबांचं वेळच्या वेळी चहा-खाणं अन् शिवाय बाळाचीही कामं ! पण ती तयार होती. शरीरानं अन् मनानंही. जणू एक चॅलेंजच होतं ते.
घरातलं सगळं तर ती करतच होती. त्यात शेजारी लग्न ठरलेलं. त्यांच्याच घरात राहणाऱ्या भाडेकरूंच्या मुलीचं. त्यांच्याकडे पाहुणे. कामांची धांदल, तर तिथेही ही उत्साहात हजर.
थोडं थकल्यासारखं होत होतं; पण समाधान होतं की सगळं छान सांभाळलं आपण. लग्नाच्या आदल्या दिवशीच सासूबाई येणार होत्या. त्यांच्याकडून भरभरून कौतुकाची अपेक्षा तर नव्हतीच. निदान नाराजी तरी असायला नको एवढंच.
सकाळीच त्या आल्या. त्यांची नजर घरावर, सगळया व्यवस्थेवर फिरली. ती जरा टेन्शनमध्ये होतीच. मागच्या अंगणात शेजारच्या नवऱ्या मुलीला आंघोळ घालण्याचा कार्यक्रम सुरू होता. आलेल्या सगळया पाहुण्या तिथे जमलेल्या. ह्या दोघींनाही त्यांनी हाक मारली. तिची आधीच सर्वांशी ओळख झालेली होती. सासूबाइंर्ना त्यांनी पाहिलेलं नव्हतं. एकीने लगेच विचारलंच `ह्या कोण' म्हणून. आणि ती काही बोलण्याआधी दुसऱ्या एका बाइंर्नी परस्पर उत्तर दिलं, ``ह्या घरमालकीणबाइंर्च्या सासूबाई!''
सारं आलबेल होतं आणि अचानक हा उलटा फासा पडला. सासूबाइंर्चा चेहरा ताणला गेला. कपाळावर आठ्या उमटल्या. मग तिथे लग्नघरी तिच्या मदतीचं, मेंदी काढण्याचं, गाण्याचं, रांगोळयांचं कशाकशाचं कौतुक झालं. पण त्या चार शब्दांनी सारा नूरच पालटला होता.
त्यांचं घर, त्यांचा संसार, त्यांनी इतकी वर्षं कष्ट करून सगळं मांडलेलं आणि ही काल आलेली मुलगी `घरमालकीण'? दिवसभर मग चिडचिड झाली, टोमणे मारून झाले. `आता घर देऊ ह्यांच्याकडे अन् आपण जाऊ राख फासून हिमालयात' इथून तर लगेच मृत्युपत़्र करून सगळया मुलांना सारखी वाटणी करून द्यायच्या गोष्टी !
बघता-बघता सगळं असं झालं. खूप अभ्यास करून सोप्या गेलेल्या पेपरमध्ये ती अचानक नापासच होऊन गेली. तिची चूक नसताना.
बाहेर जाणं सहसा होत नव्हतंच. गावातल्या गावात नातेवाइकांच्या, मैत्रिणींच्या फारशा भेटी होत नसत. तेव्हा तर धाकट्या दीराचं लग्न जवळ आलेलं. त्यामुळे कुठे जाण्या-येण्याचा प्रश्नच नव्हता. सगळा दिवस कामात जायचा.
पण एक दिवस नवरा ऑफिसला गेल्यावर जेवताना सासूबाइंर्नी अचानक विषय काढला. `कुठंच जाणं-येणं होत नाही गं तुझं. आज वेळ आहे तर जाऊन ये काकांकडे, ताईकडे.' `उद्या परवा जाईन' असं ती म्हणाली. पण त्यांच्या सुचवण्याचा मग आग्रहच झाला. नणंदेनंही त्यांची री ओढली. `आज वेळ आहे तर जाऊन या नं वहिनी. आता लग्नाची कामं सुरू झाली की होणारच नाही जाणं' वगैरे. तिने तरीही थोडं मागेपुढे केलं पण आपलं तेच खरं असं तिला जमत नव्हतं. आणि काकूला, आजीला, ताईला भेटण्याचा मोहही झालाच. तेव्हा घरी फोन नव्हता. नवऱ्याला ऑफिसमध्ये कळवायचा प्रश्नच नव्हता.
रिक्षा घेऊन ती काकूकडे पोचली. आजी गावाला गेली होती. नातं फारसं जवळचं नव्हतं आणि त्यांच्याशी तेवढे संबंध राखलेलेही नव्हते तिच्या घरच्यांनी. स्वागत थंडच झालं. छोट्याची तिथे कोणाशी ओळख नव्हती तर तोही खेळेना. रडून त्रास दिला त्यानं. जितक्या उत्साहात ती तिथे आली होती तो मग उरला नाही.
तिथून ती ताईकडे गेली, तर घरी फक्त तिची सासू. ताईला म्हणे महिनाभरापासून नोकरी लागली होती. ताईच्या सासूबाइंर्शी बोलायला काही खास विषय नव्हता. त्यात त्यांनी चहा केला, तर छोट्यानं `बोर्नव्हिटा हवा' म्हणून भोकड पसरलं. त्यांच्याकडचं दूध संपलेलं होतं. एकूण तिथूनही तिला लवकरच निघावं लागलं.
परतताना थोडा मूड गेला होता. तरीही मनात थोडं बरं वाटत होतं, की आज सासूबाइंर्नी किती आपलेपणाने `जाऊन ये' म्हटलं. (निघताना रिक्षासाठी पुरेसे पैसे आहेत नं हेही विचारलं!) अगदी या घरी रुळल्यासारखं वाटायला लागलं तिला.
अपेक्षेपेक्षा खूप लवकरच ती घरी पोचली. बघते तर घराला कुलूप ! किल्ली शेजारी ठेवलेली होती. सासूबाई अन् वन्सं अचानक कुठे गेल्या असतील याचा अंदाज ती करत राहिली. (तोपर्यंतही तिच्यात काही वेगळा विचार करण्याची चतुराई आलेली नव्हती!)
आणि त्या दोघी परत आल्या त्या लग्नाच्या साड्यांची खरेदी करूनच. नव्या सुनेच्या, देण्याघेण्याच्या. दोघींच्याही वागण्यात थंड उपेक्षा, अलिप्तता... नेहमीसारखी. तिला सकाळचा त्यांचा आग्रह आठवला. अपमान, राग, आपण अजूनही परक्या असल्याची करून दिली जाणारी जाणीव ह्यांनी तिला रडू फुटलं.
आपल्याला बरोबर न्यायचं नव्हतं तर सरळ तसं सांगायचं. पण तेवढ्यासाठी त्यांनी तिला असं बाहेर पाठवून दिलं होतं. अजूनही तिला त्यांच्या वागण्यातले डावपेच कळत नव्हते. ती पुन्हा पुन्हा आपली हरतच होती.
ह्या आणि अशा कितीतरी गोष्टी आता जुन्या झाल्यात. आता ते सगळं मागे पडलंय. काळाबरोबर स्वभावांचे कंगोरे झिजले. सगळेजण एकमेकांच्या सवयीचे झाल्यासारखे एका घरचे वाटतात. आता सगळयांना - म्हणजे नवऱ्याला, सासू-सासऱ्यांना, दीर-नणंदा-जावांना आणि मुलांनाही - वाटतं की घरात समजुतीचं, खेळीमेळीचं वातावरण असावं. आणि ती तसं राखतेही.
पण आजच्यासारखं घडतं कधीकधी. दुपारी तिची गावात राहणारी नणंद येऊन गेली. हिच्यासाठी साडी अन् भावासाठी कपडे घेऊन आली होती. त्यांच्या लग्नाचा पुढच्या आठवड्यात पंचविसावा वाढदिवस. रौप्यमहोत्सवी. त्यावेळी ती नेमकी ट्नीपला जाणार होती म्हणे. म्हणून आजच आहेर घेऊन आली होती.
मग हळूहळू कळलं की मुलं, दीर-जाऊ ह्यांनी त्या दिवसासाठी काय काय बेत ठरवलेत. अन् मुख्य म्हणजे मूळ कल्पना म्हणे सासूबाइंर्ची. पण तिच्या चेहऱ्यावर हासू उमटलं नाही, की तोंडून समाधानाचा उद्गार ! कपाळावर आठ्या उमटल्या, बोलण्याचा सूर वरच्या पट्टीत गेला. `काही नको उगीच नसती नाटकं,'
`पंचवीस वर्षं संसार केला म्हणजे असा कोणता जगावेगळा पराक्रम केला आम्ही' वगैरे मुक्ताफळं उधळून झाली. लग्नाचा पहिला वाढदिवस ती अजून विसरली नव्हती. उत्साहानं ठरवलेले बेत अन् त्यावर पडलेलं विरजण !
नणंदेच्या हातून तिने साडी काही आनंदाने घेतली नाही.
दुपारी मग हिचं पित्त वाढलं. डोकं जाम दुखायला लागलं, चक्कर यायला लागली. तिच्या लक्षात आलं, की कधीकधी कसे हरलो-जिंकलो संसारात ते विसरलो आहोत असं वाटतं. पण त्याचे व्रण मात्र अजून कायम आहेत मनावर. ते नितळ राहिलेलं नाही. खरं तर आठवणींच्या त्या जखमा भरलेल्या नाहीत. उलट त्या कुरवाळत, त्यांच्यावरच्या खपल्या काढत त्या भळभळत ठेवायची सवयच झाली आहे आपल्याला. आजच्या प्रत्येक गोष्टीशी समांतर अशी भूतकाळातली एक गोष्ट असते. तिचं भूत येऊन आजचा आनंद नासवून टाकतं.
भूतकाळाचं ओझं पाठीवर घेऊन वर्तमानात सरळ चालणं कठीणच. मग कधी कुजकट टोमणे मारले जातात, तर कधी कशावर निरुत्साहाचा बोळा फिरवला जातो. कोण आपल्याशी कधी कसं वागलं ह्याचे किस्से तर तोंडपाठ !
आता पंचेचाळिशीच्या आसपास छान समाधानी, सुखी असायचं, दिसायचं तर मधूनच एका कटकट्या, त्रस्त वयस्क स्त्रीचा चेहरा आपल्या आतून डोकावतो. मग आपण नकोशा ठरतो.
आजचं आयुष्य जगताना भूतकाळातल्या कडवटपणाचं शिंपण ती त्यात असं करत जात होती. आता कशातच निर्भेळ आनंद उरला नव्हता. आणि हीच तिची सगळयात मोठी हार होती. ती खरंच हरली होती.
- सुरेखा काळवीट, नाशिक.

where to buy tadalafil

viagra

bagilb http://puimlm.com/ nymscx [url=http://pnkkcp.com/]nymscx[/url]

viagra

qohrds http://zycyog.com/ amhrzcmg [url=http://febndh.com/]amhrzcmg[/url]

viagra

hqacvrdr http://vlcvzi.com/ xqxnvtyp [url=http://klquzt.com/]xqxnvtyp[/url]

fyihsvto

emwuovt

zmxuugz

puvczuwf

We at panache shoes make the

We at panache shoes make the UGG Australia available to you at your homes without any delivery charges. UGG Men you order, it is upon us to bring it you and get it hand delivered at your doorway. UK Ugg Sale has the most decent prices bringing it down and lighter on your pockets. Buying from us will get you a guaranteed bargain for we boast of some of the best classic ugg like Lulu Guinness, Radley, Baibella, Cosettini, Cheap UGG and Bulaggi, all at attention-grabbing discounts. Ugg discount, you can view the sample ugg bags and choose your favourite among the best. Therefore, hesitate ugg boots sale in thinking twice and order now!

खर

खर आहे.

अशाच हरत जात्तो आपण !! सासूबाई अन् वन्सं बाई नकोस करतात जगण !

पण मी ठरवल आहे -- सूनेबरोबर मस्त रहायच, तिला छान करायच सगळ

अगदी मनापासून ..............