Skip to main content

आज कितीतरी वर्षांनी तिची गाठ पडत होती. ती म्हणजे ऊर्मी. ऊर्मी मनोहर. माझी बाल मैत्रीण. मी तेजस देसाई. प्रभात रोडला शेजारी एकमेकांना लागून आमचे बंगले होते. खूप वर्षं शेजारी असल्याने दोन्ही कुटुंबात चांगलीच मैत्री होती. ऊर्मीचे डॅडी प्रख्यात सायकायस्ट्नीस्ट होते आणि आई प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर. माझी आई शाळेची मुख्याध्यापिका आणि वडील बिल्डिंग कॉन्ट्न्ॅक्टर. थोडक्यात, आम्ही तसे मॉडर्न हाय-फाय सोसायटीत वाढलो. आम्हांला (म्हणजे ऊर्मी, तिची बहीण व मी, माझी बहीण) दोन नोकराण्या होत्या. शाळेतून आलो की दूध, बिस्किटे खायला देऊन त्या आम्हांला कमला नेहरू पार्कमध्ये खेळायला न्यायच्या. तिथे आम्ही चौघं भरपूर धुमाकूळ घालायचो. आम्ही सेंट मेरीज् स्कूलमध्ये जात असू. त्यामुळे एकमेकांत फाड फाड इंग्लिशमध्ये बोलून इतर मुलांवर इंप्रेशन मारीत असू. आजूबाजूची मुलं आमच्यात खेळायला यायचा प्रयत्न करायची. आम्ही आमच्या लहरीप्रमाणे त्यांना खेळात घ्यायचो किंवा नाकारायचो. एका बाकड्यावर बसून आम्हांला सांभाळायला आलेल्या नोकराण्या गल्लीतल्या तमाम लफड्यांची चर्चा करीत आमच्यावर नजर ठेवायच्या. अभ्यासाच्या बाबतीत मात्र कडक धोरण होते. माझे आजोबा आम्हा साऱ्यांना एकत्र आणून अगदी तात्या पंतोजी स्टाईल अभ्यास करवून घेत. तेवढं सोडलं तर आमचं बालपण म्हणजे एक मुक्तांगण होतं. दोन्ही बंगले आमच्या धांगडधिंग्याच्या तालावरच चालत.
अगदी बारावीपर्यंत ह्या नित्यक्रमात कधी खंड पडला नाही. आम्हा साऱ्या मित्रमंडळीत उर्मी जरा वेगळी होती. इतर मुलींसारखं खुदुखुदु हसत नसे वा लचकत चालत नसे. तिचा सारा डायरेक्ट अॅप्रोच असायचा. तिचं हसणं खळखळणाऱ्या झऱ्याप्रमाणे मोकळं होतं. चालणं डौलदार पण ठाशीव होतं. विश्वासाने चमकणारे तिचे मधाळ डोळे जसे भावनांचे आरसे होते. राग असो की लोभ तिच्या डोळयांतून ओथंबून झिरपत असे. अगदी बारावीपर्यंत ती आमच्या क्रिकेटच्या टीमवर सर्वात पुढे असे. मैत्रिणींपेक्षा तिच्या मित्रांची संख्या मोठी असे. पुढे कॉलेजात गेल्यावर आमचे मार्ग थोडे अलग झाले. उर्मी सोशिऑलॉजी मेजरला गेली. मी इंजिनिअरींगला. अधूनमधून गप्पागोष्टी गाठीभेटी घडायच्या. कधी कधी ती आणि मी समोरच्या बागेत बाकावर गप्पा मारीत बसायचो. लहर आली तर ती मला कविता म्हणून दाखवायची. ह्या कवितांमधून भावनांचे ज्वालामुखी महत्त्वाकांक्षांची उत्तुंग आतषबाजी, निराशेचे घोर अंधकार असायचे. हे सारं माझ्या वास्तविक आकलनापलीकडे होतं. शेवटी एक दिवस मी तिला हटकलं.
``तू मला ह्या कवितांच्या प्रांतात का ओढतेस ? माझ्या डोक्यावरून जातंय हे सारं ! मला ह्यातली काही अक्कल नाही.''
आता ती खळखळून हसली. ``तुला खूप अक्कल आहे असा गैरसमज कुणी करून दिला तुझा ? अरे ! ह्या कविता माझ्या बुद्धिवान डोक्यातून पाझरल्या म्हणून तुला ऐकाव्या लागल्या. क्षमा करा, महाराज !'' ती हात जोडून म्हणाली.
``पण ह्या खाली कवी मनोहर लिहिलंय ते कसं ? सरळ उर्मी लिहावं की ?'' माझा अजाण प्रश्न.
``हीच तर गंमत. म्हणजे मी फार नम्र आहे नं ? त्याचा परिणाम.''
अशी ही ऊर्मी बी.ए.ला फर्स्ट क्लास फर्स्ट आली. तिच्या आई वडिलांनी मोठी पार्टी दिली. आता पुढे काय करणार विचारलं की तिचे खळखळणारे हसू चटकन म्हणायचे, ``पाहू काय होतं ते. वन् डे अॅट अ टाईम !'' एक दिवस मी घरातून बाहेर पडताना ती भेटली. स्कूटरला किक् मारीत होती. मात्र म्हणाली, ``तेजू, मी ब्लू डायमंडमध्ये जॉब घेतला, वेट्न्ेसचा !'' मला आश्चर्याचा धक्काच बसला. ती बोलतच होती. तिच्या आईला खूप राग आला होता. काळजी वाटत होती. पण डॅडी, मात्र तिच्या पाठीशी उभे राहिले. अनुभवाच्या पायावर उभे राहाते तेच खरे जीवन ही त्यांची धारणा त्यांनी खऱ्या अर्थाने पाळली होती. त्यांचा त्यांच्या धाडशी लेकीवर अपार विश्वास होता. तिचे जीवन तिनेच स्वतंत्रपणे घडवायचे होते. पडली झडली तर मलमपट्टी लावायला त्यांची तयारी होती. आई मात्र तडफडत राहिली की, पोरीला बिघडवली म्हणून.
आता ऊर्मी भेटली की हॉटेल जीवनातले, पंचतारांकित किस्से सांगायची. भारतीय चौकटीत न बसणारे. अरेबियन नाईट्ससारख्या अद्भुत आणि मनोरंजक कथा. हॉटेलच्या वेट्न्ेसला पगारापेक्षा टिप्सची कमाई जास्त असते हे आम्हांला तिच्याकडून कळले. जेमतेम वर्ष झालं असेल. कोणी गब्बर आसामीने तिच्याशी गैरवर्तणूक करण्याचा प्रयत्न केला. तिने मॅनेजरकडे तक्रार केली तेव्हा त्याने समजूत घातली. ``अशा जगात ह्या गोष्टी नेहमीच चालतात. त्यात तक्रार करण्यात काय अर्थ आहे ?'' ऊर्मी ताडदिशी घरी आली. डॅडींनी मलमपट्टी केली. ममीने ``तरी मी सांगतच होते''चं तुणतुणं लावलं.
आता धावाधाव करून ऊर्मीने वर्तमानपत्रात नोकरी मिळवली. शहरातल्या सनसनाटी बातम्यांवर प्रकाश पाडून त्यावर कॉलम लिहिण्याची जबाबदारी तिची होती. मला वाटतं हा तिचा सर्वात आवडता व्यवसाय असावा. कॉलम मनासारखा जमला की तिचा चेहरा सूर्यफुलासारखा उजळत असे. तिचा कॉलम खूप लोकप्रिय व्हायला लागला होता. स्वत:च्या कटु अनुभवाचा सल तिच्या मनात रुजला होताच. जरा कुठे अंधारी हालचाल दिसली की हिच्या लेखणीची धाव तिथे पोचत असे. नको नकोशा ठिकाणी जाऊन चिखल उपसावा तर तो ऊर्मीनेच. ती ज्या पंचतारांकित रेस्टॉरंटमध्ये काम करीत असे तिथे एक नाजूकशी देखणी अँग्लो इंडियन मुलगी काम करीत होती. एका सौदी अरेबियन ग्राहकाच्या मनात ही प्राजक्ताच्या फुलासारखी मुलगी भरली. तिला आपल्या खोलीत यायला लावून त्याने असभ्य चाळे सुरू केले. मॅनेजरचा खिसा आधीच गरम झाला होता त्यामुळे त्याचे तोंड बंद होते. ऊर्मी सारखी ती काम सोडून जाऊ शकत नव्हती. घरात आजारी आई व धाकटा भाऊ ह्यांची जबाबदारी होती. तिने ऊर्मीला फोन केला. विस्तवाशी नाही खेळली तर ती ऊर्मी कसली ? तिने सारे कौशल्य पणाला लावून कट रचला. त्या लिसाला त्या प्रसंगाची पुनरावृत्ती करायला लावून गुप्तपणे व्हिडीओ घेतला. कोर्टातच ह्या गोष्टीची रुजवात झाल्याने हॉटेल मॅनेजरला पर्याय नव्हता. साऱ्या शहरात खळबळ माजली. लिसाला नुकसानभरपाई तीन महिन्यांचा पगार आणि दुसरी नोकरी मिळाली. पण, वरच्या नेत्यांचा संपादकांवर दबाव आल्याने ऊर्मीची नोकरी गेली. उत्कृष्ट बातमीदार म्हणून सन्मान झाला तरी नोकरी जाण्याचे दु:ख अंतरात खुपत होतेच.
त्या नंतरचे चार सहा महिने मनस्तापाचे गेले. तिचे डॅडी पाठीशी ढालीसारखे उभे राहिले. शिवाय, जेवढा मनस्ताप जास्त तेवढी उर्मीची धडपड वाढत राहिली. आता तिने अमेरिकन विद्यापीठात फटाफट अर्ज करायला सुरुवात केली. ब्रँण्डाय युनिव्हर्सिटीची स्कॉलरशिप तिच्या हातात पडली तेव्हा ती आनंदाने उतू जात होती. ते पत्र घेऊन ती सरळ माझ्याकडे आली होती. मलाही खूप आनंद झाला की तिची मानापमानाने सुटली म्हणून. क्षणातच तिची नजर गंभीर झाली.
``तेजू, जायच्या अगोदर मला त्या हॉटेल मॅनेजर आणि संपादक साहेबांना चांगला धडा शिकवायचाय !'' ऊर्मी.
``आता चांगली स्कॉलरशिप मिळालीय तर सुखाने जा आता अमेरिकेला. त्याच पेपरमध्ये आपण तुझा फोटो छापवू. आता कशाला गाडलेले मुडदे उकरतेयस ?'' मी सुचवले.
``अरे ! ते मुडदे सडून वास यायच्या आधी उकरायलाच हवेत.'' ऊर्मी.
मग, रात्रंदिवस खपून तिने `दिव्याखाली अंधार' लिहून काढले. प्रकाशकांचे उंबरठे झिजवले. तिच्या डॅडींनी प्रुफं तपासली. त्या पुस्तकाचे प्रकाशन थाटामाटात करून ती दुसऱ्याच दिवशी अमेरिकेला रवाना झाली.
एव्हाना माझे इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण झाले होते. वडिलांच्या धंद्यात मी आता पूर्ण गुंतलो होतो. सरकारच्या ओपन मार्केट धोरणामुळे बांधकामाच्या धंद्याला आता चांगलीच बरकत आली होती. बांधकामाच्या मागण्या पुऱ्या करता करता चोवीस तास अपुरे पडू लागले. ऊर्मीची व माझी ई-मेल जरा मंदावली. कधी निमित्ताने दोन्ही कुटुंबाची गाठ पडे तेव्हा ऊर्मीची खुशाली कळत असे. तीन वर्षात तिने पोस्ट ग्रॅज्युएट व पीएच.डी. मिळवली होती. तिला मनासारखी सोशल रिसर्चमध्ये नोकरी मिळाली होती. इकडे माझा धंदा पण छोट्या बाळाच्या बाळशासारखा वाढत होता. एका सुरेख, श्रीमंत मुलीशी लग्नही झाले होते. पण संसारात लक्ष द्यायला सवड होती कुठे ? सारखे बिल्डिंग साईट व हिंडणे आणि व्यावसायिक अवाढव्य पसारा सावरणे ह्यात जर सर्वात जास्त दुर्लक्ष कोणाकडे होत असेल तर बायकोकडे. हक्काची असते ना ? माझी आई सारा जन्म असं जगली. पण सुवर्णा तशी नव्हती. तिला पैसा आणि नवरा दोन्ही हवे होते. ती घर सोडून गेली ती परत आलीच नाही. मला धंद्याची धुंदी चढली होती. समझोता
करण्याचा विचारही मनाला शिवला नाही. यश, पैसा, मान, कीर्ती ह्यांच्या जोडीला उंची हॉटेल्स, वाईन्स आणि तात्पुरत्या मैत्रिणी मला पुरेशा होत्या. नसती बंधने हवीत कशाला ? उगीचच दिलका दिवाना बनण्यात काय अर्थ?
हळू हळू माझ्या धंद्याचे स्वरूप आंतरराष्ट्नीय झाले होते. एकोणीसशे पन्नास ते साठ सालच्या सुमारास अमेरिकेत स्थायिक बरेचसे भारतीय आता रिटायर व्हायला आले होते. तिथल्या बर्फाळ हिवाळयांना कंटाळले होते. त्यांची मुलं आपापल्या घरट्यात नांदत होती. गाठीला अमाप पैसा होता. मायदेशाच्या जुन्या आठवणींची ओढ होती. अशा लोकांना इकडे अलिशान घरटी हवी होती. तेव्हा असा एखादा संकल्प हाती घेतला तर त्यात चांदीच चांदी दिसत होती. माझ्याजवळ हडपसरजवळ चाळीस एकर जमीन होती. पुण्यापासून अर्र्ध्या तासाचा रस्ता. अमेरिकन स्टाईल मॉडर्न अपार्टमेंट्सना योग्य जागा होती. माझ्या अमेरिकेत स्थायिक झालेल्या दोस्ताने एका बिझिनेस कॉन्फरन्सच्या निमित्ताने मला बोलावलेही होते.
माझं जायचं ठरल्यावर ऊर्मीची आठवण आली. मीटिंग बॉस्टनला होती. त्या निमित्ताने तिची गाठ पडेल. ती जवळच कुठेतरी राहात असेल अशा अंदाजाने मी ई-मेलवर निरोप पाठवला. तिचे लागलीच उलट उत्तर आले. अशा रीतीने सुरुवातीला सांगितलेला भेटीचा योग जुळून आला.
दिवसभराची मीटिंग आटपून मी वर आपल्या खोलीत आलो. आलिशान हॉटेलच्या विसाव्या मजल्यावरून समुद्राच्या किनाऱ्याचे दिवे सोन्याच्या हारासारखे चमकत होते. रात्रीचे आठ वाजले. ऊर्मीची येण्याची वेळ झाली तसे मन भूतकाळाची चित्रे पहायला लागले. अवखळ ऊर्मी आता कशी दिसत असेल. मन तरळत होते. एवढ्यात बझर वाजला. खालच्या प्रशस्त लॉबीतून सेक्रेटरी बोलत होती. ``ऊर्मी मनोहर इज हियर टू सी यू !''
``ओके ! सेंड हर ओव्हर !'' मी उत्तर दिले. दोन मिनिटांत दारावर टकटक झाली. मी दार उघडले आणि तिच्या रूपाने सूर्यप्रकाशाचा एक झोतच आत आला. तिशीला आलेली ऊर्मी स्वत:च्याच अस्तित्वात झळकत होती. तिचा गव्हाळी वर्ण, मोगऱ्याच्या फुलासारखा हसरा चेहरा, गुलछडी वाऱ्यात झुलावी अशी डौलदार चाल ! पाच वर्षांच्या अमेरिकन आत्मविश्वासाने ती ओथंबत होती. दोघांच्या मध्ये असलेली ती अदृश्य दहा वर्षे जणू अत्तरासारखी उडून गेली. सुवासाचा शिडकावा ठेवीत. पूर्वीच्या आठवणी, आजच्या कथा आणि पुढची स्वप्नं ह्याची देवाण घेवाण करण्यात सूर्यास्ताची रात्र कधी झाली हे लक्षातच आले नाही. तिने एक दिवस तिच्या अपार्टमेंटवर जेवायला बोलावलं. चार्लस् नदीच्या तीरावर छोटीशी आधुनिक जागा. साधी पण नीटनेटकी सजावट. मोठ्या खिडकीतून तारांगण दिसत होतं. छोट्याशा फायर प्लेस नजीक घरच्या साऱ्यांचे फोटो. त्यातच माझा टेनिस कोर्टवरचा फोटो पाहून आनंद आणि आश्चर्याचा हेलकावा बसला. ``तुझ्या या अद्यावत सजावटीत माझा फोटो जरा विजोडच दिसतो.'' मी जरा गंमतीने म्हटले. पण ऊर्मीचा चेहरा मात्र एकदम गंभीर झाला. ``माझ्या अनमोल आठवणीत तूही जमा होतास.'' ती उद्गारली. माझ्या परत उड्डाणाची तारीख दोन दिवसांवर आली. आठवडाभर आम्ही दोघे सारा परिसर हिंडलो. कधी नाही ते माझे मन भावुक झाले होते. हुरहुरत होते. काही तरी खूप जवळ आले आहे पण पकडायला गेलो तर निसटते आहे असं वाटत होतं.
संध्याकाळी जवळच्या एका रेस्टॉरंटमध्ये आम्ही दोघांनी जेवण घेतले. वाईनचे ग्लासेस एकमेकांवर टेकवीत दोघंही एकदम बोललो, ``टू अवर फ्रेंडशिप.'' केवढ्या खुषीत दिसली ऊर्मी. तिच्या शनेल फाईव्हचा सुवास मंदपणे माझ्यापर्यंत पोचला होता.
``ऊर्मी, तुझा भारतात परत यायचा विचार आहे की नाही ?'' मी विचारले.
``का ? तुला आणखी डोकेदुखी हवीय का ?'' ऊर्मी.
एव्हाना माझ्या शरीरात जादूची कांडी फिरली होती. ``डोकेदुखी इतकी सुंदर असतो हे माहीत असतं तर मी तुला इकडे येऊनच दिलं नसतं.'' मी.
झटकन् तिचे दोन्ही हात हातात घेत मी म्हटलं, ``खरंच ! चल भारतात. आपण दोघं मिळून एकाच मार्गावर चालू या ! दोघांची वेगळी स्वप्नं एका पडद्यावर पाहू या !''
अचानक पावसाळी ढग दाटावेत तसे तिचे डोळे अंधारून आले होते. आपली पर्स उचलीत ती म्हणाली, ``चल, तुझ्या खोलीवर जाऊन बोलू या.'' ती उठून चालायलाही लागली. तिच्या मागे मी हिप्नॉटिक होऊन चालत राहिलो. दार बंद करून आम्ही सोफ्यावर एकमेकांसमोर बसलो. आम्ही दोन वेगळया व्यक्ती असूनही जणू एका अदृश्य वर्तुळात बांधले गेलो होतो. ऊर्मीने माझ्या दोन्ही खांद्यांवर हात ठेवले. मग, माझा उजवा हात आपल्या हाती घेत ती म्हणाली, ``तुला हो म्हणणं किती सोपं आहे, तेजू! पण ते आपल्या दोघांच्याही हिताचं नाही. आपण दोघांनीही बराच प्रवास एकट्याने केलाय वन वे स्ट्नीटवर. त्यातून तेजस, माझं तुझ्यावर खूप प्रेम नसतं ना तर मी तुला क्षणात `हो' म्हणून मोकळी झाले असते. ह्या एकाकी आयुष्याला रामराम ठोकला असता.'' ती उठली. समोरच्या मोठ्या खिडकीवरचे पडदे तिने दोरी खेचून उघडले. दूरवर सूर्य क्षणाक्षणाने नदीत वितळत होता. पाण्यावर सोन्याचा मुलामा चढला होता. दुरूनच ऊर्मी बोलत होती. ``तेजस, माझी एक खुळी समजूत आहे. ज्याच्यावर आपण खूप प्रेम करतो ना, त्याच्याशी लग्न करू नये. प्रेमात एक प्रकारची धुंदी आहे. त्यात उत्कटतेची परमावधी आहे. फॅसिनेशन ! लग्न या गोष्टीचा व्यवहार आला रे आला की ती धुंदी वाईन उतरावी तशी उतरते. मग उरतं रोटी, कपडा, मकान आणि पोरं ह्या साऱ्या गोष्टी माणसाच्या प्रेमाला कुरतडतात. लक्तरं होतात त्या प्रेमाची. उरतो तो फक्त हँग ओव्हर. खूप प्यायल्यावर दुसऱ्या दिवशी उरतो तसा. तेजू, तू आहेस तसाच माझ्या मनात जपायचाय मला. मग मी सतत म्हणत राहीन, तेजूचा केवढा आधार आहे मला ! हे माझं स्वप्नं जगायला मला तुझी मदत हवीय. लेट अस् बी फ्रेंडस फॉर एव्हर !'' मला भान यायच्या आत ऊर्मी निघूनही गेली. मी पुतळयासारखा बसलो होतो. काही तरी हरवलं होतं अन् काही तरी गवसलंही होतं. त्या अनुभवाचं गाठोडं पाठीशी घेऊन मी भारतात परतलो.
आता मात्र ती पूर्वीपेक्षा नियमितपणे ई-मेल संपर्क साधत होती. तिथे काम करून बराच पैसा तिने भारतात पाठवला होता. त्यातून तिला व्यसनमुक्ती संस्था काढायची होती. त्याचे कागदपत्र, अर्थव्यवस्था आणि पत्रव्यवहारही तिने माझ्यावरच सोपवला होता. इमारत खरेदी, सुरुवातीचा आराखडा तयार झाल्यावर ती सहा आठवड्यांसाठी भारतात आली. दिवाळीच्या मुहूर्तावर केंद्राचे उद्घाटन झाले. आईला अर्पण करून `प्रेमाश्रम' नाव ठेवले. हे सहा आठवडे तिच्या सहवासात खूप आनंदाचे गेले. तिची रजा संपली व आपले उत्तेजक अस्तित्व घेऊन ती परतली. फिरून शांतता पसरली. एकलेपणाच्या छाया पसरल्या. मला वाटतं माझ्या मनाला एव्हाना दूरदर्शनी प्रेमाची सवय झाली होती.
जेमतेम दीड वर्ष झाले असेल. आताशा वेळाचा हिशेब मनाला नीटसा जमत नाही म्हणा ना ! पण अकस्मात् ज्या संध्याकाळी ऊर्मीचा फोन आला ती संध्याकाळ मात्र मला पक्की आठवते. जरा थकल्या आवाजात ती म्हणाली, ``मी गुरुवारी परत भारतात येतेय.'' फ्लाईट नंबर व वेळ सांगून तिने फोन खाली ठेवला. जरा आश्चर्याचा धक्का बसला तरी आनंदाची शिरशिरी आली मी गाडी घेऊन तिला आणायला मुंबईला गेलो. माझ्या एअरपोर्टमध्ये बऱ्याच ओळखी असल्याने थोडे आतपर्यंत जाता आले. कस्टम्स चेक संपवून लोक बाहेर घरंगळत होते. आपापल्या नातलगांना धुंडीत होते. नेहमी उत्साहाच्या कारंज्यासारखी येणारी ऊर्मी केव्हा एकदा दिसते असे झाले हाते. माझे डोळे भिरभिरत होते. तेवढ्यात एका हमालाच्या जवळ बॅगा भरलेली हातगाडी आणि बरोबर व्हीलचेअरवर बसलेली स्त्री समोर आली. ती स्त्री ऊर्मी होती. विश्वासच बसेना. तिची हसणारी नजर आता सुकल्या निर्माल्यासारखी दिसत होती. तिला कसेबसे मागच्या सीटवर झोपवून मी ड्नयव्हरच्या जवळच्या सीटवर बसलो. जल्दी चल म्हणून ड्नयव्हरला सांगून मी सीटवर टेकलो. डोळे मिटून घेतले. गाडी रस्त्यावर सरकत होती. पण माझे मन मात्र एका जागी गोठले होते.
नंतरचे दोन तीन दिवस ऊर्मीला रुबी नर्सिंग होममध्ये अॅडमिट करण्यात गेले. ती दिवसेंदिवस कमजोर होत चालली होती. येताना तिने सारे मेडिकल रिपोर्ट्स आणले होते. तिची काळजी घेण्यातून उरलेला वेळ तिच्या ममी, डॅडींना धीर देण्यात जात होता. तिच्या केस मॅनेजमेंट मीटिंगलाही मीच गेलो. जबाबदार व्यक्ती म्हणून माझेच नाव तिने दिले होते. उकळते तेल कानात ओतावे तसे डॉक्टरांचे शब्द माझ्या कानावर पडत होते. तिला पॅन्क्रीयाचा क्रॅन्सर झाला होता. तिच्याजवळ अवधी फार कमी उरला होता. तिने जेव्हा माझ्याशी लग्न करायला नकार दिला तेव्हा मला वाईट जरूर वाटले होते. पण त्यात मला अपमान नव्हता वाटला. फक्त दुमत होते. मैत्रीला शिक्कामोर्तब करण्याचा अट्टाहास होता. आता ती स्वत:च स्वत:पासून निसटून चालली होती. आम्हा दोघांच्याही मनाविरुद्ध. ह्या नियतीच्या ठरावापुढे मान वाकवून तिचे जाणे सोपे करायचे होते. हसत हसत.
तिची गव्हाळ तेजस्वी कांती हरतऱ्हेच्या औषधांनी काळवंडली होती. डोळयांत पिवळी झांक आली होती. वजन इतके कमी झाले होते की अंथरुणात फक्त चेहराच दिसत होता. मात्र चेहऱ्यावरचे ते हसू अजूनही चमकत होते. स्वत:वरून विनोद करण्याची वृत्ती मावळली नव्हती. तिच्या पोटात काही टिकत नव्हते. मी तिला थोडं दूध पाजावे म्हणून दुधाचा पेला तिच्या समोर धरला.
``आयुष्यातला रोमान्स नाहीसा होऊ नये म्हणून मी तुला लग्नाला नाही म्हटलं. पण शेवटी तुझेच पाय धरावे लागले.'' ऊर्मी हसून बोलली.
``ऊर्मी, लग्न म्हणजे हवीहवीशी वाटणारी आफत आहे बघ ! त्यातून सुटका होईल असं कसं वाटलं तुला ?'' तिला दूध पाजवीत मी बोलत राहिलो.
ती माझ्याशी बोलतच राहिली. ``तेजस्! माझा वरचा व्हिसा जरा लवकर आला. वाईट वाटलं. काही स्वप्नं अर्धी राहिली म्हणून. पण माझं तीस वर्षांचं छोटं आयुष्य मी मनासारखं जगले. मजा केली. खूप अनुभव घेतले. चांगले वाईट अनुभव पचवले. मनासारखा पैसा मिळवला, कीर्ती मिळवली. तुला सुखी नाही केलं. पण माझ्या जीवनाशी मी प्रामाणिक आहे. तृप्त आहे. आता फक्त काळजी आहे `प्रेमाश्रमा'ची. तेवढं एकच मागणं मागायचं आहे तुझ्याजवळ. केंद्राच्या बोर्ड ऑफ ट्न्स्टीज म्हणून मी तुझ्या नावाचे पेपर्स केलेत. करशील एवढं माझ्यासाठी ? करशील सह्या पेपर्सवर ? माझ्याशी मैत्री... प्रेम केल्याचा टॅक्स म्हणून ?'' धाप लागल्याने तिचे बोलणे थांबले.
मी कागद उचलले. खुणा केल्या होत्या तिथे सह्या केल्या. तिच्याकडे पाहिलं तर तिचा चेहरा आसवात न्हायला होता. पेपर्स तिच्या शेजारी ठेऊन मी म्हणालो, ``ओ. के. बॉस. लग्नानंतर नवऱ्याला हाताच्या बोटांवर नाचवणाऱ्या खूप बायका पाहिल्यात मी. पण, मैत्रीच्या जोरावर नाचायला लावणारी तू एकमेव गर्लफ्रेंड असशील.''
``लकी मी !'' ऊर्मी अस्पष्टशी बोलली. ओठांवर स्मित रेंगाळले. ती झोपी गेली. मी उठलो. एवढ्याशा श्रमाने झोपलेली ऊर्मी उठलीच नाही. तीच तिची माझी शेवटची भेट. ऊर्मी वादळवाऱ्यासारखी जगली आणि वादळासारखी नाहीशी झाली. मग सारं कसं शांत झालं. उरली फक्त वादळानंतरची शांतता.
दूर कुठे तरी दिवाळीची आतषबाजी आकाश रंगवीत होती.
- पुष्पा जोशी, अमेरिका

无标题文档two watches that lasted

无标题文档two watches that lasted a lifetime. Things keep changed a oodles and the unique formation wants to advertise their watches. They be aware that the wear and watches Discount the latest tantrum in the the rage world. These watches play a joke on suit a favorite mould doodad to save both sexes. Today, more people are using these uk replica watches the dream of tons people, generally experts and pilots. Moreover, the be without of professionals also yen see in the interest of a splendid production in swiss replica watches addition to various convey strategies can ascendancy the supreme purchaser judicial proceeding. Different stores can suggest imitation watches at swiss replica watches satisfied with what they be experiencing and wearing. He not in a million years bothered to make off into details nor are interested in what they impair hermes handbags handbook winding men's unblemished gold is the most priceless and sumptuous pore over collecting.While watches Audemars Piguet Jules Audemars considered replica hermes something what the actual point that you tour today, if you crave to own Cartier dupe watches, it is undisturbed benefit of you to believe. Now, we can swiss replica watches only.Since watches are so universal take advantage of in the make available today, I do not call to mind a consider you inclination find some men and Wrist Watches Replica Watches Cartier Roadster is natural when you suborn Topreplicawatches4u.com. Topreplicawatches4u.com has limerick of the superlative selections online. replica watches they are elegantly designed. Once they are priced too cheaply, customers can doubt that they are of bad je sais quoi. Naturally, no ditty is zealous to swallow. replica chanel handbags to put their importance in association of approach.Tag Heuer Replica Watches-copied.com in the retail has infatuated the world by way of astonishment. chanel replica body overhead stage. All of these watches tend to be for that reason trendy and therefore glamorous, which is to be for certain then noticeable price uk replica watches to convert yourself and you deficiency to affect the women, strain Rolex watches, as before you know it as workable. Company offers discount likeness watches. watches Discount some data and analyze them with the 18 carats. Do your subdue to procure a banker credible on you to safeguard an trepidation ;antiquated what could be Discount Watches Replica, Breitling Replica, Gucci Replica, Omega Replica, Louis Vuitton Replica, Porsche Design Replica, Tag Heuer Replica and numerous more brands are supplied Watches For Sale but standard.Tag Heuer Watches band situation of the technique technology with cutting-edge designs. Tag Heuer watches are known suitable their Fake Louis Vuitton Omega Seamaster imitation watches are time-honoured watches that are of ripe value. Show your Omega Seamaster Replica Watch in your hand, tony offered by virtue of the online believe in at same credible prices. The duplicate watches are made aside professionals. The cardinal design of watches Discount