Skip to main content

``ओ%%%% मा%%'' शिवा ढेरेनं दिली आरोळी. उजव्या हाताने चुटकी दिल्यावर सगळे एका सुरात हातगाडीला बिलगले. गाडीला नेट देऊन ओढू लागले. डेंग्या हुमणे खांद्याला पट्टा अडकवून दोन्ही हातांनी हॅन्डलवर जोर देऊन गाडी पुढं ओढू लागला. मागनं सगळे ओढू लागले. `ओ%%% मा%%%' कोरस.
भास्कर माईन, बबन सुतार, मारुती पैलवान, डेंग्या हुमणे, लाल्या रामचंदर अन् रम्या शिगवण. हातगाडीवर लादलेल्या हायजिनच्या सामानाचं ओझं ओढण्यात सगळयांना जोर चढला. वायरची वळी, कटर, काटा, कैची, बीम, नट, पान्हे मोठा हातोडा घण, शिवा ढेरेचा रेटा, ह्यांचा कोरस. रस्त्यातून जणू गायनपार्टी एका सुरात गाणी गातेय असं वाटू लागलं.
`गडीमाडू' `हय्यस्'
`कामकाडू' `हय्यस्'
`कामाची दैना' `हय्यस्'
गाडीनं वेग धरला. टेकडी वलांडली. गाडी धावू लागली. शिवा ढेरे अन् त्यांच्या शब्दांची शर्यत सुरू झाली.
`निघाली मैना' `हय्यस'
`मैना सवाई' `हय्यस'
`आला जावई' `हय्यस'
`जावई हुरा' `हय्यस'
`लावून तुरा' `हय्यस'
आता रोड सपाट लागला. शिवा ढेरे थांबला. गाडी गतीनं चालू लागली. खांद्याला हिसका कमी लागल्यानं डेंग्या हुमणे नेटानं चालू लागला. मागून एक दोघं गाडीला हात लावून चालू लागले. समोर पुन्हा टेकाड आलं तसा शिवा ढेरे ओरडला, `है रं गडी%%' सगळे सावध `हय्यस' पुन्हा गाडीला मागनं बिलगले. लोकांनी ह्यांना वाट मोकळी सोडली. शिवा ढेरेनं सूर धरला. `तुरान् बांगडी' `हय्यस्'
`उठाव तंगडी' `हय्यस्'
`तंगडी के अंदर' `हय्यस्'
`लाल कबुतर' `हय्यस्'
`खबुतर खोजा' `हय्यस्'
`बसव रोजा' `हय्यस्'
`रोजन् दारी' `हय्यस्'
`बहुमन दारी' `हय्यस्'
पुन्हा टेकडी ओलांडून गाडी धावू लागली. डेंग्याचे डोळे लालेलाल झाले. जणू रक्त उतरलंय. आता एम आय डी सी जवळ आली. शॉप नं. चौदा बरॅक चार गाठायचं होतं. शिवा ढेरे हुमण्याला म्हणला, `डेंग्या, गाडी आत वळव.'
गेटमधून गाडी आत गेल्यावर सगळं सामान उतरवून घेतलं. ह्याच वर्कशॉपच्या मागे फाऊंड्नी होती, तिथे तीस फुटांची चिमणी बसवायचं काम शिवानं घेतलं होतं. तीन भाग दहा-दहा फुटांचे एकत्र जोडून ती चिमणी उभी करून द्यायची होती. दुपारपर्यंत. तिन्ही तुकडे नट-बोल्टने फिट झाल्यावर दुपारचं जेवण उरकल्यावर थोडा वेळ सगळेच सावलीला लवंडले.
दुपारी दोनला शिवा ढेरे रम्या शिगवणला घेवून फौन्ड्नीच्या मागे गेला. चिमणी बसवायची जागा दाखवून, ``मिस्तरी, काम लवकर उरकाय पाहिजे. उद्याला बाकी ठिवू नगा, बरं का.'' रम्या शिगवण ह्या कामात पटाईत. गिरणीच्या संपाने नोकरी गेल्यावर गेल्या दहा वर्षांपासून रम्या शिगवण ही हायजीनची कामं करीत होता अन् आता त्यानं तो मास्टर झाल्यामुळे त्याला सगळेच मिस्तरी बोलू लागले.
एक नारळ फोडून, पेढे अबीर, गुलाल वाहून कामाची सुरुवात झाली.
रम्यानं दोर घेवून कैची लावण्यासाठी बीम तयार करायला लावला. चाळीस फुटी बीम उभा करून रम्या शिगवणनं कैचीवर बीमला साखळीत नीट बांधली. पुन्हा कामाचं निरीक्षण केलं. कैचीच्या नाकातून साखळी ओढून खाली सोडली. दोर आवळून घेतला. चिमणीला एक गाठ मारून सगळया कामकऱ्यांना गोळा केलं. रम्या शिगवण तय्यार झाला. आता फक्त चिमणी उचलायची. ज्यानं त्यानं पान-तंबाखू मळून झाल्यावर कामाला जुंपून घेतलं.
मामा पळसकर, रामचंदर, भास्कर माईन, रामचंदर दोरी ओढायला भिडले.
रम्या शिगवणनं डेंग्या हुमणेच्या मदतीनं पहार-घण घेऊन जमिनीत पुरली. दोर वरच्या कैचीतून खालच्या कैचीत सैल सोडला. खालच्या चारी जणांनी दोर धरून ठेवला. रम्यानं इशारा केला. कामाला सुरुवात झाली. शिवा ओरडला, `हलो%%% रे%%'
सगळे कोरसमध्ये एकदम ओरडले, `हय्यस्'
खालच्या चिमणीचा दोर इंच-इंच ओढला जाऊ लागला. चिमणी आता वर उठू लागली. शिवाची ललकारी, सगळयांचा कोरस कामाला हुशारी आणीत होती.
`जबाब दे' `हय्यस्'
`जबाब जंगी' `हय्यस्'
`मानलाय धोबी' `हय्यस्'
`राजाची राणी' `हय्यस्'
`राजस स्थानी' `हय्यस्'
`हेमा मालनी' `हय्यस्'
`धरमेंद्र वानी' `हय्यस्'
`अमजद खानी' `हय्यस्'
चेव येत होता. काम जोरानं सुरू झालं. दोर खेचून खेचून इंच-इंच चिमणी वर उभी होत होती. शिवा ढेरे पुढचं सांभाळलं.
`च%%ल आवर' `हय्यस्'
`दिला जबाब' `हय्यस्'
`दिलाय मान' `हय्यस्'
`मान केला' `हय्यस्'
`वाया गेला' `हय्यस्'
`वाया रानी' `हय्यस्'
`काढून पानी' `हय्यस्'
`पानी खारं' `हय्यस्'
`लागू दे वारं' `हय्यस्'
`वाऱ्यानं दोरी' `हय्यस्'
`नाच गं पोरी' `हय्यस्'
`पोरीला सवं' `हय्यस्'
`झंपर नवं' `हय्यस्'
`घाल पोरी घाल' `हय्यस्'
`लुगडं नवं' `हय्यस्'
`भडकून चाल' `हय्यस्'
आता सारे शिवा ढेरेनं आरोळी थांबल्यावर थांबले. चिमणी उभी राहिली. दोरी ताठ झाली. जमिनीत रोवलेल्या पारीला दोरी घट्ट आवळून बांधली. संध्याकाळ झाली. दिवस भरला.
शिवा ढेरेला वाटलं, एखाद्या तासाचं काम. बाकी आहे तेवढं झटकन उरकून घेऊ. रम्या शिगवणला तो म्हणाला, `मेस्तरी, काम एकाद तासाचं बाकी हाय. काय करता ?'
रम्या शिगवण म्हणाला, `शेठ, मी बघतो.' तो वर चढला. चिमणी लेव्हलला आली होती. तरी कैची भिंतीपासून बरीच लांब होती. आता कैची सोडायची जबाबदारी त्याचीच. दोर ताणल्यामुळे साखळी सैल झाली होती. त्याला आता दोरीला लोंबकळून पुढे जाऊन फक्त गाठ सोडायची होती. त्यानं वरून एकवार खाली पाहिलं. `हलो%% मा%%' त्याला इशारा समजून सगळयांनी खालून `हलोमा%%%%' उत्तर दिलं. उत्तराला उत्तर दिलं. `हलोमा%%%' खालून उत्तर गेलं. `हैय्यस्'. आवाज आता चांगला घुमला. दोर सैल सुटू लागला.
शिवा ढेरेनं वरडायला सुरुवात केली. `घाल पोरी घाल'.
`लुगडं घाल' `हैय्यस्'
`भडकून घाल' `हैय्यस्'

`चाल सवाई' `हैय्यस्'
दोन चालीनं कैचीची गाठ जरा जवळ सरकली. वरून रम्या शिगवण `हलो %% मा'.
शिवा ढेरेनं इशारा समजून हात वर केला. सगळे थांबले. दोर थरथरू लागला. काम थांबले. सगळे वर बघू लागले. रम्या शिगवण विचारात पडला. ही गाठ सोडायची कशी ? एक हात घालून तो पाय उचलून पुढं टाकला. एका हातानं दोर धरून दुसऱ्या हातानं कैचीला धरलं. चिमणी भिंतीला फिट् बसल्याचं पाहिलं. रम्या शिगवणचं निम्मं काम झालं. कैची आत्ता सोडली की काम पुरं.
`` हलो%%% मा%%%'' दिला इशारा.
``हलो%%% मा%%%' समजला इशारा. वर आवाज पोचला. पुन्हा सगळे दोरीला बिलगले. आता दोर ढिला लागू लागला. साखळी झरझर खाली निखळू लागली. कैचीची गाठ सोडायला रम्या शिगवण चिमणीच्या शिडीला उभा राहिला. त्यानं कैचीची गाठ सोडली. `हलो रे %%%' त्यानं खाली पाहून इशारा दिला. `हैय्यस्'. त्याला खालून वर इशारा मिळाला.... कैची ढिली झाली... कैचीची साखळी पटदिशी खाली खाली सरकू लागली. कैची निसटली. सारा बोजा घेवून रम्या शिगवण झटक्यात खाली पडला. मोठा धुरळा उडाला. धाप%%दिशी आवाज आला. आ वासलेले सारे चेहरे तसेच आ वासून उभे. सगळयांच्या डोळयांपुढं अंधारी आली. खबदाडीत बसलेल्या वटवाघळांनी एकच गलका केला. रम्या शिगवण उताणा पडून ठार झाला. कैची त्याच्या छाताडात घुसून बरगडी तोडून आत रुतली. नाका-तोंडातून रक्त बाहेर पडलं. डोक्याचा चेंदामेंदा झाला होता.
रम्या शिगवणचा लोळा-गोळा देह सेन्ट्न्ल दवाखान्यात नेऊन सगळे सोपस्कार पार पाडून स्मशानात आणला.
मामा पळसकर निरोप घेऊन गणेशनगर झोपडपट्टीत गेला होता. रम्या शिगवणची बायको अन् तिचं पोरगं रडत भेेकलत स्मशानात आले. तेवढ्या राती रम्या शिगवण ढणाणून पेटला. चार-चौघांनी दिलासा दिल्यावर रम्या शिगवणची बायको रडायची थांबली. ती मुकी होऊन सताड डोळयांनी त्या ज्वाळांकडे पाहू लागली. मेली नजर तिची, भविष्यातल्या ज्वाळा तिला जाळू लागल्या. तिचं पोरगं जोरानं टाहो फोडू लागलं, ``आय%%''
विदीर्ण करणारा प्रसंग. शिवा ढेरेला दया आली. त्यानं एक पुडकं मामाजवळ दिलं. पाचशे रुपयाचं ते पुडकं त्या बाईच्या हाती देऊन ते तिनं घेतल्यावर डोळे पुसता-पुसता मामा म्हणाला, `बाय, चल... घरी जायचंय आपल्याला.'
क्षणभर ती त्या नोटांकडे अन् आपल्या चिमुकल्याकडे पाहून मुकी झाली.
रघू डामसे, बदलापूर (पश्चिम)

cialis

cgqzocdc cialis 5639 alternatives to viagra 7781 viagra %-[[[ cialis >:-[ viagra 4133 discount tadalafil 4235

order cialis

vbcahinp order cialis 4218 buying viagra >:]] generic viagra JAPhf cialis uPTuh cialis and levitra >:-OOO viagra IiDpDK

viagra

uloeyi http://azbzdq.com/ zamvrwt [url=http://ykllww.com/]zamvrwt[/url]

viagra

bhmoyww http://dopjkh.com/ ysmujs [url=http://nydpdj.com/]ysmujs[/url]

viagra

jegawvo http://iknlsi.com/ duukkv [url=http://chcmzs.com/]duukkv[/url]

dbuymn

ydkdnd

boeuaa

nnmzdqsb