Skip to main content

काही घटना कालच घडल्यासारख्या आठवतात. वटपौर्णिमेला सुनंदाची आठवण आल्याशिवाय राहात नाही. अगदी अलीकडची तीन-चार वर्षांपूर्वीची, हजारो मैलांवरच्या देशात घडलेली; पण कोणत्याही क्षणी आठवली तरी रोमांच उभे करणारी घटना! चित्रपटात किंवा कल्पनेच्या विश्वात शोभावी अशी; पण अनेकांच्या साक्षीने प्रत्यक्षात घडलेली सत्यघटना!
वैवाहिक जीवनात सत्त्वपरीक्षा पाहणारे अनेक क्षण असतात. त्यांना सामोरे जाताना येणारा आत्मशक्तीचा प्रत्यय पतीपत्नीमधले बंध अधिक दृढ करतोच; पण त्यामुळे आपलीच आपल्याला वेगळी ओळखही होते.
मॉरिशस! भारताच्या वायव्येकडचं हिंदी महासागरातलं अत्यंत निसर्गरम्य पर्यटनस्थळ. नितळ निळाशार समुद्र, विविध रंगांची उधळण करणारं आकाश, जमिनीवर दूरवर पसरलेल्या गवताच्या हिरव्यागार लाद्या, निसर्गसौंदर्याने निथळणाऱ्या ह्या बेटाची पर्यटकांना मोहिनी पडली नाही तरच नवल!
श्रीरामपूर ह्या आमच्या छोट्याशा गावातून दरवर्षी अनेक हौशी पर्यटक देशाबाहेरच्या पर्यटनस्थळांना भेट देतात. इथल्या काही डॉक्टर्सनी मॉरिशसचं नितांतसुंदर वर्णन ऐकून ड.ज.ढ.उ. मार्फत मॉरिशस ट्नीपचा बेत आखला. ह्यावर्षी त्या ग्रुपमध्ये मुंदडा दांपत्यही सामील झाले. डॉ. कांतीलाल मुंदडा हे श्रीरामपूरमधले प्रथितयश रेडिओलॉजिस्ट. मुलांशिवाय ट्नीपला जायला त्यांची पत्नी सुनंदा हिने प्रथम थोडे आढेवेढे घेतले; पण घरात लक्ष द्यायला नातेवाईक आणि मुलंही तशी मोठी झालेली, त्यामुळे दोघांनाही मित्रपरिवाराचा आग्रह मोडवेना.
कर्तव्य, जबाबदाऱ्या सगळयांनाच असतात; पण अधनं-मधनं एखादी सहल केली, की जगण्यात पुन्हा एकदा नवेपण येते असे म्हणतात. मनावरचा सगळा गंज काढून टाकायला सहलीसारखा सुंदर दुसरा उपाय नाही.
आठवडाभराची ट्नीप! घरच्यांची आठवण काढत सगळेजण एअर मॉरिशसच्या विमानात बसले. दोघे एकत्र असल्यामुळे एक प्रकारचा निश्चिंतपणा होता आणि मित्रपरिवार बरोबर असल्यामुळे सुरक्षितही वाटत होतं. सुनंदाला मात्र मुलांच्या आठवणीने क्षणभर अस्वस्थ वाटलं; पण क्षणभरच! आपण कुठे कायमचे चाललोय? आठवडाभराचा तर प्रश्न! मुलांची काळजी घेणारे घरी आहेतच!... आपण दोघं तरी कधी गेलो होतो कितीतरी दिवसांत कुठे?... छानसा बदल होईल आपल्यालाही! आपलेच प्रश्न आणि आपणच दिलेली उत्तरं! विमानात बसलेल्या सुनंदाच्या मनातली! विचारांच्या वनात फिरता फिरता ४००० कि. मी. पार करून सहा-सात तास कधी संपले समजलंच नाही. आठवडाभरात पुन्हा सगळे भेटतीलच- अशा उबदार जाणिवेतच सगळेजण पोर्ट लुईसच्या 'रामगुलाम' विमानतळावर उतरले!
डॉ. मुंदडा आणि मित्रमंडळींचा खुद्द मॉरिशसमधला रहिवास फक्त चार दिवसांचा होता. पहिले दोन दिवस पॅम्प्लीमोसेस गार्डन, क्युअरपाईप सेंटर, गंगा लेख, सेव्हन कलर अर्थ हे पाहण्याबरोबरच अंडरसी वॉक, फास्ट बोटींग हे अनुभवण्यात छान गेले. दोन दिवसांतसुद्धा रोजचं रूटीन, तोच-तोचपणा ह्यांचा विसर पडला होता. तरीही उद्याचा दिवस गेला की परवा घरी जायला निघायचं आहे ह्याची सुखद जाणीव सर्वांच्या मनात होती.
सुनंदा तशी कुटुंबवत्सल! आपलं घर, मुलं, संसारात मनापासून रमणारी. डॉक्टरांचा व्यवसाय, मुलं आणि नातेवाइकांची वर्दळ ह्यांच्या वेळापत्रकात स्वत:ला बांधून घेणारी! दोन-तीन दिवसच मुलांना सोडून राहूनही कधी एकदा घरी जाते असं तिला झालं होतं.
७ जुलै २००१! मॉरिशसमधल्या त्या प्रसन्न सकाळी एकमेकांशी गप्पा मारत, चेष्टामस्करी करत समुद्रावर पॅरासेलींगला जाण्यासाठी सगळेजण एका मोठ्या बोटीत बसले. बोट समुद्रात ६ कि. मी. आली. समोर शांत-अथांग सागर, वरती निळंभोर आकाश, हवेत मंदसा गारवा आणि पॅरासेलींगला अनुकूल हवामान ह्यामुळे सर्वजण खूश होते.
बोटीतले खलाशी सर्वांना सूचना देत होते. पॅरासेलींग म्हणजे स्पीडबोटीला दोराने बांधलेल्या प्रचंड छत्रीच्या साहाय्याने समुद्रात हवेत उंच तरंगणे. ह्यात स्पीडबोटीच्या मागे नायलॉनचे दोन दणकट दोर बांधून त्यालाच वर पॅराशूटसारखी मोठी छत्री बांधलेली असते. छत्रीच्या खालच्या बाजूला दोघांनी बसून पट्ट्याने पक्के बांधण्याची सोय असते. स्पीडबोट वेगाने पुढे धावली की पॅराशूटची छत्री हवेत उडायला लागते आणि पाण्यापासून दोन-अडीचशे फूट उंचावर छत्री आणि तिच्यातली माणसं तरंगायला लागतात. दहा-पंधरा मिनिटे उत्सुकता, धाडस, भीती, थरार आणि आनंद ह्यांचा संमिश्र अनुभव अविस्मरणीय असतो.
प्रथम डॉ. मुंदडांचे मित्र डॉ. दिलीप व सौ. सिंधू पडघन ह्यांनी पॅरासेलींग केले. दोनशे फूट उंच गेलेल्या पडघन दांपत्याचे पॅरासेलींग डॉ. मुंदडांनी खालच्या बोटीतून बघितले. पंधरा-वीस मिनिटे तो अभूतपूर्व अनुभव घेऊन पडघन दांपत्य बोटीवर सुखरूप उतरले. आता पाळी होती डॉ. मुंदडा आणि सुनंदाची! छत्रीच्या खाली असलेल्या खुर्चीत दोघेही लाईफ जॅकेट घालून, पट्टा व्यवस्थित बांधून बसले. 'पॅरासेलींगचं थ्रिलींग' अनुभवण्याची उत्सुकता आणि भीती दोघांनाही वाटत असली तरी एकमेकांचा आधार आणि बोटवाल्यांवरचा विश्वास ह्यामुळे दोघेही उत्साहाने पॅरासेलींगसाठी सज्ज झाले. स्पीडबोट वेगाने निघाली. त्याच वेगाने पॅराशूटची रंगीत छत्री उंच जाऊ लागली. उंचावरून खालची मजा बघत दोघेही आणखी उंच चालले होते. ह्या अविस्मरणीय अनुभवामुळे ट्नीपला आल्याचं सार्थक झाल्याचा आनंद दोघंही 'शेअर' करत होते. छत्री साधारण शंभर फूट उंचावर गेली- ''बघ सुनंदा, काय सुंदर वातावरण आहे! ह्या मित्रमंडळींच्या आग्रहामुळेच आपल्याला हे शक्य झालं!'' त्या सुंदर भावावस्थेत डॉ. मुंदडा सुनंदाशी बोलत असतानाच अचानक- अगदी अचानक खाड्कन काहीतरी तुटल्यासारखा आवाज आला आणि खुर्चीसह छत्री जोरात हिंदकळली. एका क्षणात दोघंही भानावर आले. खुर्ची स्पीडबोटीला ज्या दोन दोरांनी बांधली होती त्यापैकी एक दोर तुटला होता. तो फेलपाटणारा तुटका दोर, ती कोलमडणारी छत्री आणि तिच्याखालच्या खुर्चीत बसलेले मुंदडा दांपत्य ह्यांना ओढत स्पीडबोट सुसाट निघाली होती. इतका वेळ सुंदर भासणारा भोवतीचा समुद्र भेसूर दिसू लागला.
खुर्चीवरती बांधलेल्या अवस्थेतच मुंदडा दांपत्य तिरप्या दिशेने हळूहळू समुद्राकडे झेपावू लागले आणि सर्व काही आता संपल्याची जाणीव दोघांनाही झाली. खालच्या बोटीतल्या लोकांचं ह्या प्रकाराकडे दुर्दैवानं लक्षच नव्हतं. अगदी सहज डॉ. पडघन ह्यांचं लक्ष तिकडे गेलं आणि त्यांचा थरकाप झाला. मोठमोठ्याने ओरडून ते बोटवाल्यांना तिकडे लक्ष देण्याची सूचना करू लागले.
इकडे डॉ. मुंदडांनी अक्षरश: ठाव सोडला. 'धडाक' असा आवाज करून ते खुर्ची आणि छत्रीसह सागरात कोसळले आणि जिवाच्या आकांताने वाचण्याची धडपड करू लागले. डॉ. मुंदडांना पोहता येत नसल्यामुळे अत्यंत अगतिक होऊन ते सुनंदाला म्हणाले, ''मला धरू नकोस, मला सोडून दे!'' सुनंदाला पोहता येत असल्यामुळे ती मात्र एका हाताने डॉक्टरांना धरून दुसऱ्या हाताने पाण्यावर तरंगायचा केविलवाणा प्रयत्न करत होती. ''काहीही झालं तरी मी तुम्हाला सोडून जाणार नाही.'' मनातून प्रचंड घाबरलेली सुनंदा डॉक्टरांना उसनं अवसान आणून धीर देत होती. अतिशय असहाय्यपणे दोघंही स्वत:बरोबरच दुसऱ्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करू लागले.
आपण दोघंही बुडणार असल्याची जाणीव डॉक्टरांना झाली तरीही सुनंदाला पोहता येत असल्यामुळे आपल्यापेक्षा तिची वाचण्याची शक्यता अधिक असल्याचं लक्षात येऊन ते सुनंदाला म्हणाले, ''तू मला सोडून दे! तू तुला वाचव!''
''हे बघा, घाबरू नका! दोरी तुटली तरी हात सोडू नका- आपण थोडा वेळ जरी तग धरू शकलो तरी बोटीतले लोक आपल्याला वाचवतील!'' भीती, आश्चर्य आणि अनपेक्षितपणे झालेलं मृत्यूचं दर्शन ह्यामुळे सुनंदाला रडू कोसळलं. अथांग समुद्रात दोघंही जिवाच्या आकांताने हातपाय मारत होते- ''मला सोडू नका. मी तुम्हांला सोडणार नाही, घाबरू नका!'' असं सुनंदा वारंवार सांगूनही येणाऱ्या प्रत्येक लाटेसरशी दोघंही शेवटची घटका म्हणजे काय ह्याचा अनुभव घेत होते. पाण्यात एक जण वर आला की दुसरा बुडायचा- असा प्रकार चालू होता.
डॉ. पडघनांनी खूप आरडाओरडा केल्यामुळे बोटवाल्यांनी क्षणार्धात बोट तिकडे वळवली. मुंदडा दांपत्याची चाललेली प्राणांतिक धडपड बघून बोट त्यांच्याकडे वेगाने येऊ लागली. आता दोघांनाही श्वास व्यवस्थित घेता येत नव्हता. त्याही परिस्थितीत सुनंदा एका हाताने डॉक्टरांना धरून एका हाताने पोहायचा प्रयत्न करत होती. लाईफ जॅकेटमुळे त्यांना पाण्यावर तरंगता येत होतं. बोट जवळ आल्याबरोबर सुनंदाने ओरडून त्यांना सूचना केली- ''आधी त्यांना वाचवा- त्यांना बाहेर काढा- मला पोहता येतंय!'' दोघांनाही पाण्याबाहेर काढलं गेलं. दोघंही विलक्षण घाबरलेले होते. जीव वाचल्याच्या आनंदाने दोघंही अक्षरश: दिङ्मूढ झाले होते.
''माझं घर- माझं घर'' करणारी घरवेडी, कुटुंबवेडी, स्वत:च्या सर्व मर्यादांचं भान असलेली सुनंदा- घरापासून कित्येक कोस दूर घडलेल्या ह्या प्रसंगामुळे तिला तिचीच वेगळी ओळख झाली. इथे आल्यावर सुनंदाचं अभिनंदन केल्यावर मनमोकळं हसून ती म्हणाली, ''जिवावरचाच प्रसंग होता हे खरंय! पण माझ्याजागी कुणीही असतं तरी हेच केलं असतं आणि डॉक्टरांच्या जागी कुणालाही बुडताना बघूनही मी हेच केलं असतं!''
सावित्री- सत्यवान- वड- दोरे- फेरे- यम हे सगळे पुराणातले वानगी-दाखले! सगळं काल्पनिक असेल, संदर्भ आणि व्यक्ती वेगळया असतील, तपशीलही भाकड असतील पण ही वृत्ती-प्रवृत्ती? आपला मित्र, आपला सखा ह्याचं प्राण वाचवण्याचा स्त्रीमनाचा हा देखणा पैलू! हे तिचं आईपण! हे तिचं सावित्रीचं रूप!
प्रत्येक वटपौर्णिमेला मला सुनंदाची हमखास आठवण येते.

- हर्षदा पंडित, श्रीरामपूर

Mulberry Handbags has become

Mulberry Handbags has become the first line of the brand Mulberry Bags, and their success is not measured in Mulberry UK action, Mulberry Sale has had a long investigation and analysis, continuous Mulberry Handbags Sale improvement and enrichment has Mulberry Bags UK a huge trend Mulberry Alexa in the world as the most representative and Mulberry Bayswater critical success factors that Mulberry Clutch Bags pattern bags may not interchangeable, other Mulberry Cross Body Bags, and there's no doubt about Mulberry Hobo. Monogram bag has a recognizable Mulberry Shoulder Bags pattern combinations initials Mulberry Messenger Bags and floral patterns, everyone knows Light-Grey Mulberry Bayswater Anthracite Ostrich Holdalls Bag change that difference, regardless of the Mulberry Daria Clutch Purse Black and no matter what happens, Mulberry Slim Brynmore in Navy Smooth Touch is important to be ignored, and although there are a variety of styles, patterns Mulberry Handbags Charm Roomy Dark Orange is still the center of the design Mulberry Daria Soft Leather Cross Body Bag Purple that will be mainly divided into several obvious reasons.

Own more than 100 years history, Mulberry Bag is most people’s favorite for it’s real leather material and exterior originality. Fashion mulberry design with more pockets, buckles and more beautiful with practical with rivets, make the mulberry popularity worldwide. Specialized in the leather, forged by masterly craft, Mulberry Factory Shop sale Mulberry Handbags, Mulberry Alexa,Bags, Mulberry Bayswater Bags, Mulberry Clutch Bags, Mulberry Purse, Mulberry Hobo Bags,etc. Top quality Mulberry sale in the Mulberry UK Shop, combined with the practical, creating original and leather tactility, Mulberry Handbags UK try to be unique creative design. Full collection of Mulberry Bags with different leather materials and sizes in the Mulberry Bag online shop, mulberry calf leather bags, mulberry ostrich leather bags, mulberry buffalo leather bags,etc. Mulberry oversized, Mulberry big size, Mulberry small size,etc. Welcome to our store, mulberry outlet all kinds of high quality mulberry bags to you, free shipping!

To find a suitable handbags is very important to people’s image, and where to find the most suitable bag to enhance self image? Mulberry Factory shop have full collection of Mulberry Bags let you choose. Luxury British top brand Mulberry own more than 100 years history and has long been recognized for its highly crafted fine leather goods. Use different materials design various Mulberry Bags to meet different people’s need, mulberry calf leather bags, mulberry patent leather bags, Mulberry Buffalo leather bags, Mulberry ostrich leather bags,etc. From oversized mulberry bags to small size mulberry bags, Mulberry Bags are very popular around the world. All kinds of Mulberry leather Bags with stylish style and fashion season, Mulberry Alexa Bags , Mulberry Bayswater Bags , Mulberry Mitzy Hobo , Mulberry Clutch Bags , Mulberry Handbags , Mulberry Mens Bags ,etc. Mulberry bag always keep pace with the trends of the times, so take mulberry leather bag will let you never out of date.

 

We at panache shoes make the

We at panache shoes make the UGG Australia available to you at your homes without any delivery charges. UGG Men you order, it is upon us to bring it you and get it hand delivered at your doorway. UK Ugg Sale has the most decent prices bringing it down and lighter on your pockets. Buying from us will get you a guaranteed bargain for we boast of some of the best classic ugg like Lulu Guinness, Radley, Baibella, Cosettini, Cheap UGG and Bulaggi, all at attention-grabbing discounts. Ugg discount, you can view the sample ugg bags and choose your favourite among the best. Therefore, hesitate ugg boots sale in thinking twice and order now!

Microsoft Office 2010 cosy

Microsoft Office 2010 cosy risks meant MS Office 2007 that paying customers microsoft office 2010 product key would typically exercise office 2007 product key a many process Office Professional Plus 2010 to exercise results office professional 2007 plus or for amend Office Professional 2010 the photo alone Win7 and not location Microsoft Office 2007 Enterprise .