Skip to main content

परभूने मुलाच्या नोकरीसाठी केलेल्या अर्जाला दोन वर्षांनी उत्तर आले, त्यावेळी तो मरायला टेकला होता. अन् त्याचा मुलगा जय मॅट्नीकच्या वर्गात शिकत होता. त्याने आलेली भंग्याची नोकरी नाकारली, तशी त्याच्या विरुद्ध घरात नि बाहेर संतापाची लाट उसळली. अख्खी जमात त्याच्यावर उलटून उठली तरी तो आपल्या मनाशी दृढ होता. शिक्षण अधुरे सोडून भंगी व्हायला सांगणाऱ्या आईबापाविरुद्ध तो उठला होता. बापाच्या शब्दाची वाट पाहत प्रहार करायच्या पवित्र्यात उभा होता. शाळेत आणि वस्तीत भल्याभल्यांची दाणादाण उडविणाऱ्या आपल्या अमोघ शब्द सामर्थ्याने, मरायला टेकलेल्या बापाच्या तुच्छ इच्छेचा धुव्वा उडवू पाहत होता.
परभू खाटेवर निपचित पडून पायथ्याशी उभ्या असलेल्या क्रुद्ध मुलाच्या मनाचा अंदाज घेत होता. त्याच्या डोक्यातील पांढरपेेशेपणाचे वेड घालविण्यासाठी शब्द जुळवीत मुलाकडे बघत होता. त्याची सोळा सतरा वर्षाची सून शांती सासऱ्याचे पाय चेपीत बसली होती. डोईवरला पदर तिने छातीपर्यंत ओढला होता. आणि ती नेहमीप्रमाणे मनातल्या मनात नवऱ्यावर प्रखर प्रहार करीत होती. त्याने शिक्षण सोडून आपला आणि नोकरीचा स्वीकार करावा, संसार सांभाळावा असे तळमळून सांगत होती. आणि ही तिची मनोव्यथा तिने सासऱ्याच्या पायावर हात ठेवताच म्हाताऱ्याला जाणवली. तिच्या स्पर्शातून साहस घेऊन त्याने बोलायला सुरूवात केली -
`जय ....!'
आणि बापाला एक शब्दही बोलू न देता अंतरीच्या विद्रोहाने गुंग झालेला जय ओरडला -
`पिताजी, वाटेल ते झालं तरी मी शिक्षण सोडणार नाही. माझ्यावर बळे लादलेली ही भंग्याची नोकरी मी करणार नाही. उलट शिक्षण पुरे झाल्यावर सॉक्रेटीससारखा शहाणा झाल्यावर मी या अमानुष प्रथेचा, अस्पृश्यतेचा कराल काळ होऊन नाश करणार आहे...'
त्याचे हे उत्तर एखाद्या तीक्ष्ण तलवारीप्रमाणे त्या दोघांच्याही भावनांना भोसकून गेले.
मृत्यूपंथाला लागलेल्या बापावर गुरासारखा ओरडणारा, घरातील दु:ख, दैन्य न ओळखणारा आणि तारुण्यप्राप्ती झाल्यापासून बायकोकडे डोळा उघडूनही न बघणारा जय तिला बावळट, बेदर्द आणि अत्यंत स्वार्थी वाटू लागला. ती घुंगटमधून त्याच्याकडे पाहू लागली अन् त्याचे नेत्रदीपक शरीरसौंदर्य पाहून तिची नजर त्याच्यावर खिळून गेली. सासरा जवळ असताना मनात येऊ नये ते विचार मनात येताच ती शरमेनं चूर होऊन सासऱ्याचे पाय चेपू लागली.
सुनेची ही नम्र सेवा पाहून म्हाताऱ्याच्या काळजात खळबळ झाली. आपल्या मरणानंतर या पोरक्या पोरीचे हाल हाल होऊ नये, नवरा ढुंकून बघत नाही म्हणून कोणाच्या सांगीने ती पापाच्या वाटेने जाऊ नये म्हणून मुलाला बायकोचा आणि नोकरीचा स्वीकार करायला लावलेच पाहिजे असा विचार करून म्हातारा कडवटपणे म्हणाला -
`जय ! तुला आपल्या घरातील दैन्यदारिद््रय, तुझ्या आईचे हाल दिसत नाहीत ? तुझ्या बायकोचे नि:श्वास तुला ऐकू येत नाहीत....'
`केवळ याकरता मी भंगी होऊ ? शाळा, शिक्षण सोडून गावची घाण काढू ? डोक्यावर मैला घेऊ ? मला भंगीच करायचे होते तर शिकवलेत कशाला ? माझ्या मनात स्वाभिमानाचे, ज्ञानाचे, माणुसकीचे दीप पेटविलेत कशाला ?'
त्याच्या आर्त नादाने म्हाताऱ्याचे भडकलेले मन - सहानुभूतीने ओले होऊ लागले. मुलाचे दु:ख त्याला जाणवू लागले. आणि शांतीचे माथे त्याच्या तिरस्काराने फुटू लागले. नवरा निकामी आहे, असे तिला वाटू लागले. ती आपल्या नशीबाला दोष देत रडू लागली. आणि विद्रोहाने प्रक्षुब्ध झालेल्या जयचंदने आरोळी ठोकली -
`मी ती नोकरी करणार नाही. कदापीही भंगी होणार नाही !'
भंगीकामाबद्दलची त्याच्या अंत:करणातील सारी चीड, जुगुप्सा त्याच्या या नकारातून वीज होऊन कडकडत बाहेर पडली. त्या आगीने शान्ती जळून खाक झाली अन् म्हाताऱ्याच्या भावनांना झळ लागली. तरी त्याने मुलाला कठोर वास्तवाची जाणीव सूर संयमित ठेवून करून दिली.
`... पण तू आहेस एका भंग्याचा मुलगा ! तुला ती नोकरी करायला हरकत नाही. ती मिळावी म्हणून लोक शंभर दीडशे रूपये भरतात. तुला ती फुकट मिळाली आहे... अन् तुझ्या नोकरीची आम्हाला गरज आहे. तू नोकरीला असतास तर माझा मृत्यू एवढा जवळ आला नसता ! तुझ्या आईचा असा सापळा झाला नसता...! या पोरीला वैऱ्याचा दिवस लोटावा लागला नसता...'
`...पण भंग्याच्या मुलाने भंग्याचीच नोकरी केली पाहिजे असे कोणी सांगितले आहे ?'
`आपल्या दु:ख दैन्याने, धर्माने अन् देशाने !'
`कोणता धर्म ? ... ज्याने माणसाला मोडून टाकले, पशू लेखले त्या धर्माने ? माणसांपेक्षा दगडाला महत्त्व देतो त्या देशाने ? त्यांचे ऐकायला मी तयार नाही. दैन्य आणि दु:ख या दोघांनीच दिले असल्यामुळे त्यांनाच धक्के देऊन दूर करायला सांगितले पाहिजे. पण ते दूर करणार नाहीत. मी करतो. मला परीक्षा पास होऊ द्या...'
`तोपर्यंत अन्न अन्न करीत ही माणसे वाट फुटेल तिकडे जातील.... पोटासाठी पाप करतील....'
`ज्यांना एवढाही धीर निघत नाही, त्यांना करू द्या पोटासाठी पाप !'
हे ऐकताच शांतीच्या डोळयातील झरणाऱ्या अश्रूंची राख झाली. ती सासऱ्याच्या पायावर हात ठेवून स्थिर बसून राहिली.
मुलाचे भंगीकामाच्या तिरस्काराने तीव्र झालेले मन असेच तापू दिले तर अपेक्षाभंगाने तो वेडा होईल, अत्यंत निराश होऊन जीव देईल हे उद्याचे भयंकर भविष्य दिसताच बाप न भडकता समजुतीच्या सुरात म्हणाला -
`दुसरी मिळेपर्यंत तरी ही धर. रात्रीची शाळा कर. पास झाल्यावर दुसरी मिळाल्यावर ही सोडून दे...'
`करणार नाही. वाटल्यास शाळा सोडतो, चोऱ्या दरोडे घालतो. पण ही नोकरी...'
`ते तुला भंगी काम देणार नाहीत. मुकादमाने साहेबाला विनवले आहे. तुझ्या आईने सर्वांचेच पाय धरले आहेत. जाऊन तरी बघ...'
`ते ऐकणार नाहीत. तो मोठा साहेब िख्र्चाश्न असला नि तो दुसरा मुसलमान असला तरी ते मला भंगीच मानतील. शिकलेला मानणार नाहीत.... पिताजी, शाळेतही मला विद्यार्थी न मानता भंगी म्हणतात सारेच. असा पावलोपावली छळ करून जगविणारा देश दुनियेत कुठेच नाही. सहन तरी करू किती ? गिळू तरी किती ? हा देश आहे, की बंदिशाला ? कैदखाना... अन् मी काहीही गुन्हा न करता हे गुन्हेगाराचे अपमानकारक यातनामय जीवन का
जगतो ? का जगतो ? या नरकयातना का भोगतो ? का...का...का?'
मुलाचे हे कानाचे पडदे फाडणारे कराल क्रंदन ऐकून म्हातारा रडू लागला. थरथरू लागला. त्याच्याकडे दीनवाण्या नजरेने पाहू लागला. आणि बापाचे अश्रू आणि त्याच्या अंगाचा चाललेला कंप पाहून जयचंद खाली बसला. त्याची छाती चोळू लागला. डोळे पुसू लागला. आणि त्याच्या स्वच्छ, सुकुमार बोटातील प्रेम पाहून म्हाताऱ्याने त्याचे डोके ओढून आपल्या छातीवर ठेवले. ते तो गोंजारू लागला. आणि गेल्या दोन चार पाच वर्षापासून घरात असूनही मानसिकदृष्ट्या एकाकी झालेला जय पितृप्रेमाचे सुख घेत तसेच डोके ठेवून बसला. उन्हात जळणारे शेत जसे कोसळणारा पाऊस पिऊन सुगंधू लागते, फुलू लागते, तसा तोही स्नेहस्निग्ध होऊन सुगंधू लागला. अपार जिव्हाळयाने रंगविलेली जीवन स्वप्ने बापाला सांगू लागला, -
`पिताजी... ती परीक्षा पास झाल्यावर मी क्लार्कची नोकरी करीन... कॉलेज करीन... विद्येचा डॉक्टर होईन... तुम्हा सर्वांना सुखात, श्रीमंतीत ठेवीन... अन् जेव्हा तुम्हा दोघांपैकी एकाला स्वर्गाची आज्ञा येईल त्या वेळी वर्तमानपत्रवाले तुमच्यावर लेख लिहितील.... पिताजी...'
मुलगा चितारीत असलेले नितांत सुंदर सुखस्वप्न सहन करण्याची, ऐकण्याची त्याच्या दु:ख दारिद््रयाने डागलेल्या अंत:करणात शक्ती नव्हती. तो अश्रूंनी भरलेले डोळे मिटून मुलाचे डोके कुरवाळीत होता. गेल्या काही वर्षापासून दुराग्रहाच्या दगडाखाली दबलेला प्रेमप्रवाह उचंबळू लागला होता. आपला मुलगा आईतखाऊ बडबड्या नाही, तर त्याचे आम्हा सर्वांवर प्रेम आहे; त्याचे अंत:करण तेजाने, सद्गुणाने भरलेले आहे. अशा रत्नाची शिक्षण पुरे करण्याची ही मागणी आपण पुरी करू शकलो नाही; उलट त्याच्यावर तो भंग्याची नोकरी करत नाही म्हणून तुटून पडलो आहोत, याचे त्याला अनिवार दु:ख होऊन तो पुटपुटू लागला -
`तू माझ्या पोटी, या देशी जन्माला यायला नको होते. तुझ्या आत्म्याचे फार हाल झाले. तुझे मी लहानपणी लग्न केले. बांधून टाकले. पण तू या गरीब पोरीचे, सोन्यासारख्या शान्तीचे नुकसान करू नको...शिक्षण पुरे व्हावे म्हणून आज तिला दूर ठेवीत असलास तरी उद्या तिला दूर ठेवू नको.'
`...अन् तुझ्या आईशी असा वागू नकोस ! तू तिला कधी रस्त्यावर आई म्हणून हाक मारीत नाहीस ! तिच्याबरोबर कधी कुठे जात नाहीस ! तुझ्यासारखा सुदृढ शहाणा मुलगा आपल्या कामगार जोडीदारांना दाखविण्याची तिची किती इच्छा असते... पण तू रक्तपिती झालेल्या माणसासारखा तिला टाळतोस. ती बिचारी रडत कुढत असते. मनातले दु:ख मनी दाबीत असते. कधी ते अनावर झाले म्हणजे मला किंवा या पोरीला तुला सुधारावयास सांगते !... जय, तिला आईपण भोगू दे... तुझ्याशी आईपणाने वागू दे रे !'
हे बापाचे शब्द ऐकून त्याचे डोळे भरून आले. दाटलेल्या कंठाने तो बायकोच्या खांद्याला धरून म्हणाला -
`खरं ग शांते ?'
शान्तीने लज्जेने खाली मान घातली. तिला तारूण्यप्राप्ती झाल्यापासून आजच तो तिच्याशी बोलला होता. तिच्या अंगाला शिवला होता. त्यामुळे ती सुखावली होती. त्याच्याबद्दल तिच्या मनात निर्माण झालेली केवढी तरी चीड कमी झाली होती. त्याच्या मनात मात्र फार उलथापालथ चालली होती. नितांत निराशलेल्या आवाजाने तो बोलू लागला,
`कसली ही संस्कृती ? जिथे मुलगा जन्मदात्या आईस ती भंगीकाम करते म्हणून तुच्छ लेखतो ! तिचा द्वेष करतो. तिच्या हातचे अन्न खायला किळसतो. ह्या संस्कृतीने अस्पृश्यता निर्माण केली नसती तर मी स्वत:च्या वृद्ध मातेला प्रचंड पीडा देणारा दैत्य झालो नसतो. माँ !...'
त्याची कानउघाडणी करण्यासाठी परत आलेली आई बघताच त्याने तिच्या पायावर लोळण घेतली. तो तिच्या पायावर तोंड घाशीत रडत म्हणत होता - `माँ ! मला क्षमा कर ! क्षमा कर.'
साबणाने धुतलेल्या आपल्या हातचे अन्न न खाणारा हा मुलगा आज आपल्या धुळीने भरलेल्या पायाचे चुंबन घेतो आहे, हे आहे तरी काय ? हा वेडा तर झाला नाही ? हा संशय मनात येताच तिच्या काळजाने ठाव सोडला. ती लटालटा कापू लागली. बोलण्यासाठी टाळयाला अडकलेली जीभ सोडवू पाहू लागली.
`पडतील त्या...!' शान्ती घाबरून म्हणाली अन् पटकन ती शरमेच्या भाराने नम्र होऊन खाली मान घालून बसली.
`चल आई !' त्याने तिला उचलून बाहेर आणली.
`बेटा, तू नको जाऊ, शान्तीला पाठवू... बहूबद्दल विचारून पाहू.' म्हातारा सद्गदित होऊन म्हणाला.
`मग मला जेवण कोण करील ? कोण आपल्या हाताने भरवील...' आणि त्याने आईच्या कंबरेला हात घालून तिला चालवायला सुरवात केली. मुलगा आपल्यावर प्रेम करतो, आपला तिरस्कार करत नाही; म्हणून आनंदलेली भानी `कोण जेवण करील, आपल्या हाताने भरवील' या वाक्याने खिन्न झाली होती. ती मागे पाय ओढीत होती. तो तिला पुढे लोटीत नेत होता. अन् मुलगा केवळ आपण त्याच्या कोवळया, स्वप्नमय अंत:करणावर डागण्या दिल्यामुळे शहीदच्या शौर्याने हे धाडस करायला उठला आहे, या जाणीवेने म्हातारा पश्चात्तापाने जळू लागला. भानी तर पार कोसळून पडली होती. मुलाच्या आवेशपूर्ण गतीसंगे ती लोढण्यासारखी लडबडत चालली होती. असे ते ऑफिसच्या अंगणात येऊन उभे राहिले. कामाची वाटणी कामगारांना सांगत असलेल्या िख्र्चाश्न साहेबाने भानीबरोबर आलेल्या जयकडे बघितले अन् रोमन शैलीतील सुंदर, सबल तरूणासारखे त्याचे रुबाबदार रूप पाहून त्याने मुुकादमाला हाक मारली...
`मुकादम !'
`जी साब !' साहेबाच्या भानगडीत बाटूची कामगिरी करीत असलेल्या मुकादमाने नमस्कार केला.
`इसको गाडी देव !'
`गाडी ?'
`हां, गाडी ! त्याचा अर्ज मेहतरासाठी आहे !'
`गाडी ?' भानी हादरून उद्गारली.
`गाडीच. नव्या मेहतराची कामाची सुरूवात मी गाडीपासून सुरू करतो.' साहेबाने सिगारेट ओठात धरीत उत्तर दिले.
`तो मॅट्नीक शिकतो...' भानीने कसेबसे शब्द उच्चारले.
`शिकू दे. आहे मेहतर अन् आला मेहतरीसाठी. जाव.'
साहेबाने भानीशी बोलणे बंद करून टाकले. भंग्याची शिकलेली मुले गरीबीपायी जरी कामाला आली तरी गाडीचे भयंकर किळसवाणे काम पाहून पळून जातात. आणि तशा जागा साहेबाला चालवायला मिळतात. अशा दोन जागा साहेब चालवीत होता. शंभर रूपये घेऊन तो चार महिन्यासाठी एखाद्याला देत होता. आणि चार महिन्यानंतर पुन्हा शंभर रूपये घेऊन दुसरा माणूस भरीत होता. आता ही तिसरी जागा आली होती. साहेबाने ती मिळकत करून टाकली होती.
मुकादमासंगती जय मुकाट्याने चालला होता. त्याच्याच मागे उरात विक्राळ वेदना घेऊन भानी चालली होती. आत्मक्लेशाने तिला ज्वर चढला होता. चेहरा पांढरा पडला होता. घशाला कोरड पडली होती. अंगांतून घाम येत होता. पाय उचलवत नव्हता अन् आपण मुलाचा महान अपराध केला, हा विचार चाबूक होऊन तिच्या वात्सल्याने भरलेल्या हृदयाला फटके मारून त्याच्या चिंध्या करीत होता.
मुकादम आणि जय घाटकोपरच्या एका विभागात आले. तो भाग मोठा तंग आहे. तिथे म्हशीचे गोठे आणि छोटे छोटे कारखाने आहेत. तिथे लहान मोठ्या चाळीची आणि झोपड्यांची गर्दी आहे. अन् या अफाट लोकसंख्येची सोय बत्तीस संडासाने केली आहे. त्या संडासाजवळ थांबून मुकादम म्हणाला,-
`हे तुझं काम. इथे गाडी येईल त्यावेळी आत जाऊन आतले डब्बे गाडीत ओतायचे. साफ करून ठेवायचे. वरचे संडास, पायऱ्या आणि ही आजूबाजूची घाण धुवून काढायची. काम धड केलं नाही तर नोकरी साहेबाच्या खिशात जाईल. आज त्रास होईल, उद्या सुख येईल... जातो.' आणि मुकादम रुबाबात निघून गेला.
जय तिथे उभा होता. लहान मुलांनी आजूबाजूला घाण करून ठेवली होती. ती घाण बघताच त्याच्या अंगावर काटा फुटला अन् अंत:करणात विद्रोह उठला. तो ताठ उभा राहून सर्वभर बघत होता.
ताठ उभ्या राहिलेल्या मुलाच्या रुबाबदार डौलावर अश्रूने भरलेले डोळे खिळवून शरमेने, संतापाने अन् आत्मनिंदेने विकल झालेली भानी मुलाजवळ येऊन उभी राहिली अन् अपराधी सुरात म्हणाली -
`बाळ, हे काम तू करू नको, घरी जा. जा.'
`का ?'
`हे काम तुझ्यासाठी नाही. ते आमच्यासारख्या अडाणी, मुडद्यांसाठी आहे... नाक, डोकं, मन, मान तोडून पडलेल्यांसाठी आहे.'
`जे तुझ्यासाठी, ते....'
`नको लेकरा, असं बोलू नको. तुझ्या आईला असं खेटरानं मारू नको. जा. जा, नको आम्हाला अशी नोकरी. तुझ्या मुडद्यावर उभं राहून नको आम्हाला सुख, आराम... जा तुझ्या पाया पडते.'
तो तिच्याकडे बघत होता. उसळून येणारा टाहो आतल्या आत दाबून टाकण्याच्या प्रयत्नाने तिचे गाल, ओठ थरथरत होते. डोळयांतून अश्रू घळघळत येत होते. अन् ते पाहून त्यालाही रडू येत होते. पण सर्व शरीरात पेटलेल्या विद्रोहाच्या वणव्याने आसू जळून जात होते. डोळयांच्या दारातून बाहेर पडत नव्हते. त्याचे विद्रोही मन धर्माशी, देशाशी जोरजोराने भांडत होते. तो देशाशी, धर्माशी वादविवाद करण्यात, प्रहार करण्यात तल्लीन झाला होता. आगडोंबातील लाल ज्वालेत पिवळी ज्वाला मिळून जशी धगधगत असते, तसा तो विचारात विरून धगधगत होता. आणि अशा वेळी मैला वाहून नेणारी गाडी येऊन थांबली अन् गाडीवानाने हाक दिली - `भानी, तू इकडे कशी ?'
तिने मागे वळून पाहिले. ती आत शिरू नये म्हणून जय भराभर पाठीला पाठ लावून असलेल्या सोळा सोळा संडासाच्या मधील बोळाकडे गेला. झरझर पायऱ्या उतरून खाली जाऊ लागला.
`जय !' आत्यंतिक दु:खाची वेदना जेव्हा अंत:करणाच्या ठिकऱ्या उडवून देते तेव्हा जो रक्त गोठून टाकणारा चित्कार उमटतो, तशीच तिची हाक होती. मुलाचा मृत्यू पाहणाऱ्या मातेच्या अंत:करणाची समग्र वेदना त्यात होती.
तसा बत्तीस संडासांच्या उग्र दुर्गंधाने त्याचा गळा घोटला. त्याचा जीव गुदमरू लागला. डोळे गप्कन झाकले गेले. डोळयांपुढे अंधार आला. नंतर डोळे जड झाल्याचे, दुखू लागल्याचे त्याला समजू लागले. तप्त वाळूवर फेकलेल्या मासोळीसारखा मेंदू डोक्यात तडफडतो आहे. रक्तवाहिन्यांचे जाळे तोडून कवटी छिन्न विन्न करून बाहेर पडतो आहे; कपाळाला, डोक्याच्या मागील बाजूला धडका देतो आहे, पोटात कोणी तरी रवी घालून जोरजोराने घुसळण करीत आहे, अन् पोटातील इंद्रिये तोंडावाटे बाहेर येऊ लागली आहेत, असे त्याला वाटू लागले. तसे त्याने ओठ दाबून घेतले. थरथरत्या पायात बळ ओतले अन् तो ताठ उभा राहिला. डोळे फाडफाडून पाहू लागला.
प्रत्येक संडासाच्या खाली असलेल्या डब्याकडे त्याचे डोळे वळत होते. प्रत्येक वेळी त्याच्या सर्वांगावर शहारे उठत होते. हिंव भरल्यासारखे वाटत होते. रक्त पेटत होते. मैल्याने भरलेले छत्तीस डब्बे, कुठे आजूबाजूला सडलेल्या घाणीत किड्यांचा बुजबुजाट, एकदोन ठिकाणी रक्ताने भरलेले कपडे नि कापसाचे बोळे, बँडेज, पट्ट्या बघून त्याचा जीव जुगुप्सेने फुटू लागला. अंगाचा थरकाप होऊ लागला अन् चेहरा घामाने डबडबून गेला.

आता आपण कोसळणार असे त्याला वाटू लागले. काहीतरी भयंकर, विध्वंसक करावे, असेही त्याच्या मनात येऊ लागले. चक्रव्यूहात सापडलेल्या अभिमन्यूसारखे सहस्र शत्रूंशी त्याचे मन लढू लागले. शरप्रहार करू लागले. असा कोण माणसांचा, मानवतेचा महाभयंकर शत्रू आहे, की केवळ या भारतात जन्म घेतल्याच्या गुन्ह्यापायी सबंध मानव कुळी नरकांत डुबवतो. आणि हा देशही एवढा दुष्ट, दांभिक कसा की काही रुपड्यांसाठी - पोटासाठी माणसासारख्या माणसाला हे अत्यंत घृणास्पद काम करायला सांगतो... अन् माणूसही एवढा गुडघ्यासारखा कसा, की दैन्याने फाटलेल्या संसाराला टाके घालण्यासाठी हे काम करतो... मनुष्य... ज्याने अवघ्या विश्वाचे नामकरण केले, देव धर्म धुंडाळून काढले. शून्यातून सुंदर सृष्टीला उभारले. मनुष्य... पंचमहाभूतापेक्षाही प्रचंड, प्रभावी तो हे काम करतो... का ?... का ?...कोणत्या दैत्याला घाबरून ? कोणती महाभयंकर दारू पिऊन ?....
जखमेतून जसे रक्त झरावे तसे त्यांच्या आत्म्यातून चिंतन झरत असताना वर मैल्याची वाट पाहून थकलेला, घाईत असलेला गाडीवान ओरडला -
`अरे तू आत झोपलास काय ? बेट्या, मला आख्ख्या गावाची घाण गोळा करायची आहे. आण... लवकर आण...'
वरून ओरडणाऱ्या माणसाकडे त्याने मागे वळून पाहिले. त्याचे पानाने रंगलेले ओठ, त्यावरील हसू पाहून जयाच्या घाऱ्या डोळयात हिंस्त्र चमक चमकली. तसा तो वरचा माणूस मागे सरकला - `दिवाना !'
मुलगा आत विचारात उभा असल्याचे ऐकून शरमेने, दु:खाने दगडाच्या पुतळीसारखी जड झालेली भानी मण मण वजनाचे पाय हळू हळू उचलीत मुलाजवळ येऊन अंगात होती नव्हती तेवढी शक्ती टाळूला चिकटलेल्या जीभेत आणून ओरडली - `ज...य !'
आणि ती धाड्कन खाली कोसळली, प्रेतासारखी पांढरी पडली आणि ती खाली जाऊ नये, म्हणून त्याने झडप घालून मैल्याने भरलेल्या डब्याला ओढले. तशी त्याची बोटे पचकन भरली. त्यामुळे त्याच्या अंगावर काटे फुटले. मन घृणेने चिरले तरी त्याने आवेगाने डबा खांद्यावर घेतला. आणि त्याच्या या आंधळया आवेगाने डबा डचमळला. अंगावर घाण बदबद करीत सांडू लागली. आणि सापाने पायाला वेढा घालून छातीवर फणा मारावी त्यावेळी माणूस जशी जीवाच्या आकांताने आरोळी ठोकतो, तशी त्याने आरोळी ठोकली - `आई !'
त्याची आरोळी ऐकून भानीला बसवीत असलेला गाडीवान खाली वाकून पाहू लागला. आणि नरकाने उभा भरलेला जय पाहून तो किळसेने शहारत म्हणाला - `बेवकुब !'
आणि हे ऐकल्याबरोबर विद्रोहाने अधिक विध्वंसक झालेला जय वेगाने धावत वर येऊ लागला. रागाने, घृणेने बेभान झाल्यामुळे अंगावर सांडत असलेल्या घाणीची त्याला शुद्ध नव्हती. वर येताच तो डब्बा फेकून त्याच्यावर झडप घालणार त्याच वेळी घामाने न्हाऊन निघालेली प्रेताप्रमाणे पांढरी पडलेली आई पाहून तो म्हणाला -
`पकड !'
`जा ! टाक. तिलाही गूघाण करू नकोस...' गाडीवानाने म्हातारीला स्नेहाने सावरीत तुच्छतेने म्हटले आणि त्याच्या या तुच्छतेने जयाच्या रंध्रारंध्रात खदखदणारा विद्रोह, घृणा, चीड भडकून उठली, त्याने वर आणलेला डब्बा हात जातील तिकडे भिरकावून दिला अन् गाडीवानाला दोन्ही हाताने अंगावर ओढून घेतला.
`जनावरा, मला शिकवतोस !... माझ्या जखमेवर मीठ चोळतोस ! मला हसतोस...?' असे म्हणत तो पावसाच्या धारेच्या गर्दीने हात पडेल तिथे त्याला हाणीत होता. उधाणलेला समुद्र जसा मचव्याला झिंजाटून झिंजाटून उध्वस्त करतो तसा तो त्याला करीत होता. आणि गाडीवान जीव वाचविण्यासाठी आकांत करीत होता - ! `बवाच !'
म्हशीची चाकरी करणारे भय्ये हातात दंडे धेऊन बाहेर पडले. आजूबाजूच्या चाळीतील लोक जमले. पण दोन माणसांची - मेहतरांची जीवघेणी झुंज ते रोखीत नव्हते. विटाळ होऊ नये म्हणून म्हशीचे चाकर हातातील दंडे घेऊन तसेच उभे होते. अन् अवघ्या गावाची घाण अंगाला लागू नये म्हणून बाकीचे लोक मध्ये जात नव्हते. नुसते पाहात होते. आणि तिकडे ते दोघेही एकमेकाचा जीव घेण्याच्या ईषेने झगडत होते.
आणि भानी मांजरीसारखी ओरडत त्या झुंजीभोवती फिरत होती. रडत होती. लोकांना सोडवायला विनवीत होती.
जेव्हा गाडीवान प्रेताप्रमाणे निर्जीव होऊन खाली कोसळला, त्यावेळी जयाच्या अंगातील आवेश ओसरला. आईच्या गळयात गळा घालून तो ओरडत होता, - `माँ, ही माझी बोटं तोडून टाक ! हात कापून टाक... अंग कुटून टाक. मला कापून टाक...'
अंगावर रॉकेल ओतून घेतलेला माणूस जळू होरपळू लागला म्हणजे जसे हृदयभेदक आर्त क्रंदन करतो तसा त्याचा आवाज होता.
आणि मुलगा वेडा झाला की काय या धसक्याने तिची दातखीळ बसली होती.
माणसे उभीच होती. परंतु जयच्या अंत:करणात भडकत असलेल्या विद्रेाहाची प्रचीती कोणालाच येत नव्हती. येऊ शकत नव्हती. कारण त्यांची मने मागेच मनूने मारून टाकलेली होती.
- बाबूराव बागूल

eaglesjer

Hermes Bags

Hermes HandBag

Cheap Hermes handbag

Hermes UK

Hermes Outlet

Hermes London

Hermes Kelly handbag

Hermes Kelly Bag

Hermes Lindy handbag

Hermes Lindy Bag

Hermes Birkin handbag

Hermes Birkin Bag

Hermes Constance handbag

Hermes Constance Bag

Hermes Jypsiere handbag

Hermes Jypsiere Bag

Hermes Victoria handbag

Hermes Garden Party handbag

Hermes Evelyne III handbag

Hermes Fish Stripe handbag

Hermes Scarf

Ray Lewis Jersey

Michael Oher Jersey

ed reed jersey

anquan boldin Jersey

Ray Rice Jersey

Willis Mcgahee Jersey

Ray Lewis Authentic Jersey

ed reed Authentic jersey

anquan boldin Authentic Jersey

Ray Rice Authentic Jersey

Willis Mcgahee Authentic Jersey

Haloti gata Jersey

Leron Mcclain Jersey

Terrell Suggs Jersey

Joe flacco jersey

Todd Heap Jersey

Michael Vick Jersey

Michael Vick Authentic Jersey

Nnamdi Asomugha jersey

Nnamdi Asomugha Authentic jersey

Desean Jackson Authentic Jersey

Desean Jackson Jersey

Asante Samuel Jersey

Jeremy Maclin Jersey

Ronnie Brown Jersey

Nathaniel Alen Jersey

Lesean Mccoy Jersey

Brandon Graham Jersey

Brent Celek Jersey

Donovan Mcnabb Jersey

Brandon Graham Jersey

Jeremy Maclin Jersey

Stewart Bradley Jersey

Ahmad Bradshaw Jersey

Jason Pierre-Paul Jersey

Victor Cruz Jersey

Brandon Jacobs Jersey

Eli Manning Jersey

Hakeem Nicks Jersey

Justin Tuck Jersey

Kevin Boss Jersey

Osi Umenyiora Jersey

Harry Carson Jersey

Danny Clark Jersey

Kenny Phillips Jersey

Mario Manningham Jersey

Mark Bavaro Jersey

Michael Strahan Jersey

PhilSimms Jersey

Plaxico Burress Jersey

Steve Smith Jersey

Tiki Barber Jersey

Patrick Kane Jersey

Antti Niemi Jersey

Bobby Hull Jersey

Brian Campbell Jersey

Jonathan Toews Jersey

Niklas Hjalmarsson Jersey

Nick Leddy Jersey

Dave Bolland Jersey

Duncan Keith Jersey

Patrick Sharp Jersey

Brent Seabrook Jersey

Adam Burish Jersey

Andrew Ladd Jersey

Ben Eager Jersey

Brent Sopel Jersey

Cristobal Huet Jersey

Dustin Byfuglien Jersey

Jeremy Roenick Jersey

John Madden Jersey

Keith Magnuson Jersey

Kris Versteeg Jersey

Marian Hossa Jersey

Martin Havlat Jersey

Stan Mikita Jersey

Tomas Kopecky Jersey

Tony Esposito Jersey

Troy Brouwer Jersey

cowboys

Drew Brees Jersey

Jimmy Graham Jersey

Darren Sproles jersey

Mark Ingram jersey

Drew Brees Authentic Jersey

Darren Sproles Authentic jersey

Mark Ingram Authentic jersey

Brett Keisel Jersey

Mike Wallace Jersey

Antonio Brown Jersey

Brett Keisel Authentic Jersey

Mike Wallaces Authentic Jersey

Antonio Brown Authentic Jersey

Maurkice Pouncey Jersey

Hines Ward Jersey

Troy Polamalu Jersey

James Farrior Jersey

James Harrison Jersey

NFL Shop Coupons

NFL Shop Coupon Codes

NFL Coupon Codes

Cheap Authentic jersey

Montreal Canadiens Jersey

Pittsburgh Penguins Jersey

Chicago Blackhawks Jersey

Cheap Cowboys Jersey

Demarcus Ware Jersey

Demarcus Ware Authentic Jersey

Miles Austin Jersey

Miles Austin Authentic Jersey

Dez Bryant Authentic Jersey

Dez Bryant Jersey

Jason Witten Jersey

Jason Witten Authentic Jersey

Marion Barber Jersey

Marion Barber Authentic Jersey

Adam Jones Jersey

Bill Bates Jersey

DeMarco Murray Jersey

Emmitt Smith Jersey

Felix Jones Jersey

Jay Novacek Jersey

Jay Ratliff Jersey

Michael Irvin Jersey

Mike Jenkins Jersey

Roger Staubach Jersey

Roy L. Williams Jersey

Roy Williams Jersey

Tashard Choice Jersey

Terence Newman Jersey

Terry Glenn Jersey

Tony Dorsett Jersey

Tony Romo Jersey

Troy Aikman Jersey

Tyron Smith Jersey

Zach Thomas Jersey

Aaron Rodgers Jersey

Clay Matthews Jersey

Aaron Rodgers Authentic Jersey

Clay Matthews Authentic Jersey

Charles Woodson Jersey

Greg Jennings Jersey

Donald Driver Jersey

Cheap Lions Jersey

Calvin Johnson Jersey

Calvin Johnson Authentic Jersey

Matthew Stafford Jersey

Jahvid Best Jersey

Barry Sanders Jersey

Ndamukong Suh Jersey

Nick Fairley Jersey

Matthew Stafford Authentic Jersey

Jahvid Best Authentic Jersey

Barry Sanders Authentic Jersey

Ndamukong Suh Authentic Jersey

Nick Fairley Authentic Jersey

Wholesale Cheap jewelry

Cheap Fashion jewelry

Cheap Tiffany Jewelry

Cheap Chanel Jewelry

Wholesale Tiffany Jewelry

Wholesale Chanel Jewelry

Wholesale pandora Jewelry

Wholesale D&G Jewelry

Cheap NFL Jewelry

Cheap Coach Jewelry

Wholesale LV Jewelry

Wholesale Bvlgari Jewelry

These simple color and

These simple color and comfortable wearing Moncler Jackets and Moncler vest will never out of fashion.Moncler Created in 1952 in Grenoble, France by Rene Ramillon, the brand name of Moncler is adapted from a small village named Monastier de Clermont near Grenoble. Over the years Moncler has grown significantly as a premium clothing brand that offers stylish and comfortable garments for men and women. it is no longer just for sportsmen but has been well-known and loved by more and more ordinary people. Everyone likes to have a warm
Moncler Jackets, wearing which will not looks bloated and can move with ease.If you are interested in this kind of product and put an order to our site, you could save as much as 70%. We promise you that we could offer you the lowest prize but with the high quality clothes in all Moncler designs.

The brand name of Moncler came from the abbreviation of Monestier de Clermon. It is a brand specialized in the production of outdoor sports equipments. As the secure and trusted Mincler materials are gradually recognized by the world, Moncler Down Jackets can be the one that meets your requirements, more than that, it can show your good figures as well as your unique styles when wearing Moncler Down Jacket. They help you to drive away the cold and bring you a good mood, and they are just exactly what you are looking for. Shopping Moncler Jacket on moncler online shop and Moncler Jackets uk online shop where different designers and different styles jackets are widely collected And I hope we could establish relationship in a long term on the basic.

आऽीच्ऽ टीगॅर्‍ ऽाळॅ

Asics Tiger From our online store, you can buy Asics Tiger Shoes with lowest price & higher quality. This Onitsuka Tiger are hot sale for mens and womens. If you buy 2 pairs of Asics Tiger Sale at our shop, you will won free shipping.Do you like this Asics Tiger Mexico 66 in this season? Onitsuka Tiger Mexico 66 first released in 1966, the first pair running shoes in Tiger Stripes.Onitsuka Tiger Mexico 66 Baja is first pair running shoes in Tiger Stripes,Onitsuka Tiger Mexico 66 Deluxe are showing delicate texturein traditional Japanese,Onitsuka Tiger Mexico 66 Lauta was Asics traditional style trainers.The Asics Gel Kayano 17,Asics Gel Virage 4 and Asics Gel Stratus 2.1 is one the highest spec structured support running shoes.Asics Tiger Mini Cooper well possess both beauty and durability into itself.Onitsuka Tiger Nippon Made features Leather and suede upper, textile insole, flexible EVA midsole, etc.We also recommend Asics Whizzer Lo to you.Come to buy a pair of Asics Running Shoes from http://www.asicstigersaler.com.

We offer Nike Shox and Nike Air max online at http://www.nikeshoxmaxsale.com/.The Nike Shox Deliver provides most great cushioning plan.Nike Shox O'Leven with modern design, inspired by running.New Arrival Nike Shox Agent provides great traction and cushioning for lasting comfort.Nike Shox NZ could be considered a type of shoes.We will remind Nike Shox R4 and some series which split from this style.Nike Shox Qualify are hot sale for the worldwide people who pursue high quality life.Nike Air Max 2012 is this kind running shoes make good use of innovative Fuse technology. Nike Air Max 2011 makes good use of high-end technology to combine with streamlined to make maximum comfort and cushioning for runners come true.Buy Cheap Nike Air Max and Nike Shox Online now, you will get big discount and free shipping.

We supplies series Nike Shox and Nike Air Max 2011 online,our Cheap Nike Shox is a kind of sports shoes. Nike Shox NZ is very impressed with the simple design.Nike Shox Experience will offer you a distinctive performance.The Nike Shox R4 becomes a hot product in our website.Nike Shox O'Leven for sale online when you try on them you will find they are super comfortable.Nike Shox Agent provides great traction and cushioning for lasting comfort.Nike Shox Deliver very sleek with best leather texture.Nike Shox TL1 series become a huge success in Nike Shox lineup.Nike Shox TL3 are very fashionable and won't go out of style.Kids Nike Shox designed for kids provide the best cushioning and resist the rigors of off-road running.Nike Shox Turbo OZ is very attractive at discount prices in our online shop.This Nike Shox R2 shoes belong to NIKE brand.Nike Shox Qualify looks so special!Six shox design.Nike Air Max 2012 is this kind running shoes make good use of innovative Fuse technology.Nike Air Max 2009 is top choice for you made your winter dress taste so luxury and pretty.Nike Air Max 2010 utilizing flexible rubber sole can help make your steps more vigor and more relaxed.Nike Air Max Griffey on sale not only very stylish.Nike Free Run 2 made with rich leathers detailed with a unique buckle and strap.

Vibram Five Fingers is a kind of Sports shoes for Running,Waters sports,Yoga,Travellingand Fitness. Vibram Five Fingers Sale from http://www.officialvibramfivefingers.com/,Vibram Five Fingers Komodo Sport features a seamless upper for reduced friction,Vibram Five Fingers Bikila LS uppers created using coconut fiber,Vibram Five Fingers Speed quite similar as sneaker, yea, a nice shoes for running,Vibram Five Fingers KSO prevent your feet in a cool and clean circumstance,Vibram Five Fingers Bikila as hot cake in 2011, a nice running shoes well collect coziness and flexibility on one fresh! buy Cheap Vibram Five Fingers from us, you will save more money.