Skip to main content

मी अशी घडले

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील देवूर गावची मी मंगला थोरात. माझ्या आई-वडिलांनी तेराव्या वर्षी माझं लग्नं केलं. मी सातवी शिकले होते. माझा नवरा त्याच्या आजीनं सांभाळला होता. साबणाच्या कंपनीत कामाला आहे, असं सांगितलं. लग्न झाल्यावर मी मुंबईला आले. वरळीला खोली होती. खोलीवर खूप कर्ज होतं, मग खोली विकली व लोकांचं कर्ज भागविलं. मानखुर्द स्टेशनजवळच्या माझ्या मावसमामाच्या मदतीनं झोपडपट्टीत राहायला आलो. वरळीच्या खोलीत मला दोन मुलं झाली होती. इथे आल्यावर एक मुलगी झाली. माझ्या मिस्टरांना दारूचं व्यसन आहे हे सांगितलं नाही. फसवून लग्न केलं. एकदा दारू पिऊन कामावर गेले असताना त्यांना हाकलून दिलं. मी जाऊन साहेबांना भेटले. त्यांनी परत नोकरीवर ठेवून घेतलं, पण परत दारू पिऊन पैशाचा काहीतरी घोळ केला म्हणून परत कामावरून काढलं. यावेळी साहेबांनी मला ``त्यांना कामावर घेणार नाही हे सांगितलंच, पण तुम्ही काम कराल का?'' असं विचारलं. पण मुलं लहान होती. मी गरोदर होते. म्हणून मी नाही म्हणून सांगितलं. नवरा आता घरीच राहिला. रोज पिणं चालूच होतं. मी चौथ्या मुलाला गरोदर राहिले. तेव्हा आईला सांगितलं. तिनं गावी बोलावून घेतलं. आईनं दवाखान्यात नेले. ``खाली करू व मग ऑपरेशन करू'' असं म्हणाली. पण यात बराच वेळ गेला. मग आई ``राहू दे'' म्हणाली. मी परत मुंबईत आले. बाळंत होऊन दोन महिने झाले. तीन लहान मुलं व मी उपाशी राहू लागलो. मला खूप राग आला. घरकाम करून महिना झाल्यावर पैसा मिळणार. त्यापेक्षा कचऱ्यावर जायचं ठरविलं. कचऱ्यावर जाणाऱ्या बायांना ``मला न्याल का?'' असं विचारलं. त्या प्रथम नाही म्हणाल्या. पण मी तशीच जायला लागले. मुलाच्या ओढीनं मी लवकर परतायची. यावेळी बायकांनी मला खूप मदत केली. कचरा वेचताना मदत करायच्या. ``तू लवकर घरी जा'' म्हणायच्या. आता पोरांना जेवायला मिळू लागलं. धाकटा मुलगा दोन वर्षांचा झाला. `प्रथम' संस्थेचे लोक आले होते. आजेसासूनं त्यांना सून सातवी झालीय म्हणून सांगितलं. त्यांनी मला बालवाडी व वाचनालयाचं काम दिलं. याचा मला महिन्याला पगार मिळायचा. शनिवार, रविवार मी कचऱ्यावर जायची. नंतर `स्त्री-मुक्ती संघटने'चे कार्यकर्ते २००० साली वस्तीत आले. बचत गटाची माहिती दिली. मी घरी नव्हते. चार दिवसांनी परत कार्यकर्ते आले. मी संघटनेच्या बचत गटात गेले. संघटनेनं मुलीच्या शिक्षणाला मदत केली. मी मीटींगला जायची. मीटिंगमध्ये चांगली माहिती मिळायची. गटाचं प्रशिक्षण घेतल्यावर मला एकदम विश्वास वाटला की मी काहीपण करू शकते. मी एक दिवस कचऱ्यावर गेले होते. शिक्षिका मुलांना शिकवीत होती. मी झोळी अडकवून, घाम पुसत उन्हात उभी होते. मी शिक्षिका व्हावं, असं मला वाटलं. मी मीटिंगमध्ये हा विचार मांडला. संघटनेच्या लोकांनी बाहेरून परीक्षा दे, असं सांगून सर्व माहिती दिली. मी परीक्षेला बसले. पहाटे ३ ते ५ या वेळात अभ्यास करायची. नवऱ्याला सांगितलं नाही. पण एक दिवस त्यानं पुस्तकं पाहिली व पैज मारली. चांगल्या चांगल्या लोकांना जमत नाही अन् तुला काय जमणार म्हणाला. पास झालीस तर १०० रुपये देईन. नापास झालीस तर तू द्यायचे. मी पास झाले. त्यांनी साऱ्या गल्लीत हे सांगितलं. माझं बघून गल्लीतली दोन मुलं बसली ती पास झाली.
अंगणवाडीचे फॉर्म्स निघाले. मी फॉर्म भरला. एका महिन्यानं मला कॉल आला. मला इंटरव्ह्यूला बोलावलं. पण दिल्ली बोर्डाची दहावी म्हणून माझी फाईल बाजूला ठेवली गेली. मग मी सरळ मंत्रालयात शिक्षणमंत्र्यांना जाऊन भेटले. माझी फाईल बघून त्यांनी ती पात्र असल्याचे सांगितले. ती चिठ्ठी इंटरव्ह्यूच्या साहेबांना दाखविली. त्यांनी वर कशाला गेलात, असं म्हणून इंटरव्ह्यू पण घेतला नाही. सात दिवसांनी पत्र आले. शिक्षिका बनायचं स्वप्न खरं झालं, असं वाटलं. हे काम करता करता संघटनेत सहयोगिनी म्हणून काम करू लागले. सकाळी अंगणवाडी व दुपारी संघटनेचं काम करू लागले.
सुरुवातीला नवरा व मुले काही काम करायची नाहीत. मुलांना कामं वाटून दिली. नवऱ्यालाही काम वाटून दिलं. मीटिंगला उशीर झाला तर नवऱ्याला डाळ-भात करा, मी आल्यावर भाकरी टाकेन असे सांगून ठेवले आहे. पूर्वी नवऱ्याला पाणी दिले नाहीतर तांब्या फेकून मारायचा. गल्लीतलं वातावरणही बदललेय. पत्ते, गोट्या, पैसे खेळायला लागले तर मी उचलते व फेकून देते. आज माझा एक मुलगा १३वी मध्ये व दुसरा ११वी मध्ये आणि मुलगी ७वी ला आणि शेवटचा मुलगा ४थी ला आहे.
नवऱ्याच्या स्वभावात बदल झाला आहे, पण आजही मुलं जेव्हा आईनं सर्व केलं, असं म्हणतात. तेव्हा मीच तिला मार्गदर्शन केलं, असं म्हणतात. २५,०००/- जमा केले. आंबेडकर वाल्मिकी घरकुल योजनेतून माझ्यासकट नऊ जणांना जागा मिळाली.आता मिस्टरांनाही मी स्वत:च्या घरासाठी काहीतरी करतेय असं वाटतंय. मुलानं संघटनेच्या मदतीनं कॉम्प्युटर कोर्स केला.
इथपर्यंत मी संघर्ष करीत आले. समाधान वाटते. लहान मुलांसाठी आज काम करतेय. वृद्ध माणसांसाठीही काम करावं, अशी इच्छा आहे. मुलं सांगेल ते काम ऐकतात. मुलांच्या हातात शक्यतो पैसा देत नाही. काय हवं ते आणून देते. आपला पैसा आपणच जपून ठेवायचा. गल्लीतली मुलंही सुधारायला लागली आहेत. `स्त्री-मुक्ती' संघटनेत आल्यापासून आधार व विश्वास वाटतो.

Vous trouveriez des sacs à

Vous trouveriez des sacs à main et sacs à main de faible qualité de haute qualité, mais il ne serait pas possible pour vous de faire la différence entre une haute qualité et un sac à main de faible qualité si vous ne savez trucs et astuces spécifiques. Vous aurez besoin de conna?tre les replique sac astuces qui peuvent vous aider à repérer un sac à main de haute qualité. Tout d'abord, vous aurez besoin de conna?tre le taux des prix de l'réplique à main que vous désirez acheter. Si le prix du Sacs Christian Dior est la moitié du taux des prix du sac à main de marque d'origine, cela signifie que vous achetez un sac à main Sacs D&G de haute qualité. Par exemple, un sac à main haut de gamme de marque comme replique sacs à main sac vous co?tera environ 500 $ alors qu'un sac de haute qualité réplique vous co?terait environ 250 $ ou moins, qui est environ la moitié du prix original. La tendance des sacs à main est une chose éternelle. Beaucoup de femmes aiment à porter des Sacs Coach, mais pas seulement quelque chose qui est beau et unique. La beauté vient entre un peuple pense qu'il est une partie de leur personnalité. Si elles ne portent pas les sacs jolis et seuls les Sacs Fendi, ils pourraient ne pas chercher autant que gracieuse, ils peuvent et doivent. Donc, pour leur fournir les sacs uniques et jolie, les marques ont vu le jour. Et pas n'importe quelle marque, les marques les plus célèbres du monde, y compris sac de marque pas cher .Miu Miu a été la production de nombreux accessoires grand d'un temps long mais pas très longtemps. Quant à leurs sacs, je dois dire qu'elles produisent quelque chose de grand; leurs sacs à main sont sophistiqués et élégants. J'ai utilisé ce mot "sophistiqué" parce que pas beaucoup de marques produisent les trucs sophistiqués qui est moins criant et décente, mais jolie.

It is glad to see you in our

It is glad to see you in our amazing online shop. Our company specialize in wholesale cheap handbags,cheap designer handbags in the

world. We are free shipping over 190 countries. We are only focus on best quality, best service, and happy shopping.We are professional in doing the
cheap handbags. The Giant check series of burberry scarves are long and broad.This

is a stylish Burberry scarf in checked wool/cashmere blend. This Burberry scarf is loosely woven, light, soft and very

pleasant to wear.