Skip to main content

आणि मी तिचा एक पंख कापला

``सुप्रिया, ही काय घरी येण्याची वेळ झाली?... रात्रीचे दहा वाजलेत.''
``दहा म्हणजे जास्त कां ? तिकडे मुंबईत बघ.... मुली रात्री बारा-एक वाजता घरी येतात....''
``ही मुंबई नाही.... आणि तू जरी सध्या शिकायला मुंबईत असलीस तरी मूळची कोल्हापूरची आहेस. हे विसरु नकोस...''
``आई, तुझी पण कमालेय हं... किती बाऊ करतेस. तरी मी फोन करून तुला सांगितलं होतं की, उशीर होईल म्हणून....''
``अगं, पण किती उशीर ? मला वाटलं आठ साडे आठ होतील...''
``आणि इकडे घड्याळाचा काटा जसा जसा वर जात होता ना.... तसं इकडे माझं बी. पी. वाढत होतं.... बाबापण चिडलेत. दहा वेळा विचारलं. कोणाबरोबर गेली.... कुठे गेली.... सुप्रिया, तू तिकडे मुंबईत काय करतेस ते बघायला आम्ही येत नाही... पण इकडे कोल्हापूरला आल्यावर तू संध्याकाळी लवकर घरी येत जा बाई.... बाबांना तुझं असं रात्री आठच्या पुढे हिंडलेलं अजिबात आवडत नाही....''
``पण आई, आम्ही काय लहान आहोत का ? सगळे किती दिवसांनी भेटले.... प्रत्येक जण आपापल्या कॉलेजविषयी सांगत होते. मग कसा वेळ गेला ते कळलंच नाही....''
``पण इतका वेळ कुठे बसला तुम्ही ? कोणाच्या घरी होता?..''
``छी! घरी काय बोलणार ? आम्ही सगळे रंकाळा तलावाकडे गेलो होतो. काय धमाल आली म्हणून सांगू.... इतके हसले ना मी.... तुला सांगते.... किती दिवसांनी इतकं हसले मी.... अगं, तो रोहन ना....''
``सुप्रिया, तू जेवणार का ? सगळयांची जेवणं झालीत. फक्त मीच थांबले तुझ्यासाठी....''
``नाही गं आई.... आम्ही भेळ, चटणीपुरी, रगडापॅटीस काय काय खाल्लं.... पोट असं गच्च भरलंय.....''
``सुप्रिया, नेहमी असं बाहेर खाणं चांगलं नाही गं.... इथे पंधरा-वीस दिवसांसाठी येतेस... वाटतं हे करून घालावं, ते करून घालावं. पण रोज आपलं तुझं बाहेर खाणं....
``आई, किती दिवसांनी आम्ही एकत्र येतो. परत सहा सहा महिने भेटी होत नाहीत....''
``भेटला नाहीत तर फोन होतच राहतात ना....?''
``फोनवर बोलणं वेगळं.... प्रत्यक्ष भेटणं वेगळं....''
``काय वेगळं आणि काय आगळं.... आम्हांला बाई काही कळतच नाही. पण तुझं हे असं वागणं, बाबांना अजिबात आवडत नाही.''
``आई, बाबासुद्धा इंजिनिअर आहेत. चांगल्या पोस्टवर आहेत. त्यांनाही माहीत आहे की आजकाल
सगळे कसे फ्रेंडली राहतात ते....''
``सगळयांचं मला माहीत नाही. पण आपल्या घरात जे आवडत नाही, ते करू नये माणसानं.... एवढं मला कळतं....''
``म्हणजे मीही तुझ्यासारखं मन मारतच जगलं पाहिजे असं म्हण की.... इथं असताना त्यांनी कधी कुठे जाऊ दिलं नाही. १०वी चं वर्ष, १२वी चं वर्ष करताकरता काही मनासारखं करू दिलं नाही. आमच्या वर्गातल्या मुली बघ किती एन्जॉय करतात ते. त्यांचे बाबापण खूप स्पोर्टली वागतात त्यांच्याशी. बारावीपर्यंतच त्यांनी इतकी मज्जा केली की, विचारू नकोस.... आता आम्हांला जरा करायला मिळते तर ह्यांची किरकिर चालू.''
``किरकिर काय म्हणतेस ? ते तुझ्या चांगल्यासाठीच सांगतात ना....?''
``अगं, पण किती चौकश्या ? कोणाबरोबर गेली होती ? त्याचं नाव काय, आडनाव काय ? परवा तर त्याची जातपण विचारली ? शी.... आम्ही काय जात, धर्म, गाव बघून मैत्री करतो का ? अगं, ते जुन्या विचाराचे आहेत. मुलींनी ना मुलाशी मैत्री जपूनच करावी. उद्या लग्न झाल्यावर त्रास व्हायला नको.''
``लग्नाचा आणि मैत्रीचा काय संबंध ?''
``छान, उद्या तुझं लग्न झाल्यावर तुझे हे मित्र घरी आले म्हणजे ?''
``त्यात काय, आले तर आले.... मी माझ्या नवऱ्याशी त्यांची ओळख करून देईन.''
``इतकं सोप्पं वाटलं तुला ? म्हणे ओळख करून देईन. अगं, नवरा कितीही शिकलेला असला तरी त्याला बायकोचे मित्र-बित्र चालत नाही बरं का ? नको त्या भ्रमात राहू नकोस....''
``तूच भ्रमात राहू नकोस.... मला त्याच्या मैत्रिणी चालतील. तर त्याला माझे मित्र का नाही चालणार ? आजकाल सगळं जग बदललंय... तुम्हीच अजून बदलला नाहीत....''
``बाकी कोण बदलले की नाही, ते मला माहीत नाही. पण तू मात्र नक्की बदललीस.... अजून खरंच वाटत नाही की बारावीला रात्री आठ वाजता ट्युशनहून येताना घाबरणारी सुप्रिया हीच का ती?''
``ती सुप्रिया आता विसर आई.... मुंबईला आम्हांला कधी कधी रात्री अकरा वाजतात घरी यायला. काही भीती वाटत नाही. भरपूर गर्दी असते रस्त्याने.... रुमवर आम्ही चौघी राहतो. पण रविवारशिवाय भेटत नाही एकमेकींना.... प्रत्येकीच्या वेळा वेगळया.... काय लाईफ आहे तिकडचं.... आणि काय लाईफ आहे इकडचं.... जमीन-अस्मानचा फरक.''
``बस, आता झोप. साडेदहा वाजायला आलेत. तू जेवणार की नाही ? मी बसते बाई जेवायला....'' असं म्हणून मी जेवायला बसले. इतक्यात हे आले....
``का ? सुप्रिया जेवणार नाही का ? का आजही बाहेर खाऊन आली.... मी तुला सांगतो, ही कार्टी वरचेवर जास्तच बिघडत चाललीय.... सगळे तुझे लाड.... दहादा सांगितलं. बाहेर हिंडू नकोस.... बाहेरचं खाऊ नकोस. पण ऐकेल तर शपथ. मुंबईला गेली म्हणजे आभाळाला हात लागले नाहीत. माझ्यापुढं कसले लाड चालणार नाहीत. ह्या घरात राहायचं असेल तर मी सांगीन तसं राहावं लागेल. नाही ते थेर चालणार नाही. अशानं एक दिवस कोणाचा हात धरून पळून जाईल. मग उघडतील डोळे तुमचे.... घर आहे का हॉटेल ? सकाळी उशिरा उठायचं, रात्री उशिरा झोपायचं, दिवसभर बाहेर हिंडायचं आणि फोनवर बोलायचं.... ही काय धर्मशाळा आहे ?''
``अहो..., किती बोलताहात.... बस्स ना. एकदा चिडलात ना की ऐकतच नाही कोणाला....''
``तू मला बोलू नकोस.... मला तिचं वागणं अजिबात आवडत नाही. तुझीच फूस तिला.... अशानं बिघडली ना, तर आवरणं कठीण होईल मग.... लोक शेण घालतील माझ्या तोंडात. आधीच मुंबईला ठेवू नका म्हणाले होते सगळेजण. पण त्यांचं ऐकलं नाही. ही कार्टी तोंडाला काळं फासणार एक दिवस....''
``अहो, काय बोलता ? ऐकेल ना ती.... तुम्ही ना सुतावरून अगदी स्वर्गाला जाता. मुलांशी बोलते म्हणजे काय पळून जाणार का ? उगाच काही तरी.... शांत व्हा.... डोक्यात राख घालून घेऊ नका.... मी सांगितलंय मघाशी तिला..... तुम्ही झोपा बघू.... मी समजावते तिला....''
``तू काय समजावणार आणि ती काय ऐकणार ? आत्ता पर्यंत कितीदा समजावलंस तिला. काय फरक पडला?.... बघ ती जर ऐकणार नसेल ना, तर तिचं शिक्षणबिक्षण सगळं बंद. शेवटची ताकीद दे तिला....''
``बरं. आता झोपा ना... जेऊ का नको मी....'' मला खरंच एकदम भडभडून आलं. अन्नाचा एक घास घशाखाली उतरेना.... ह्याचं एक म्हणणं. तर तिचं दुसरंच. ती म्हणते....
``आई, बाबांचाच माझ्यावर विश्वास नाही तर लोकांचा कसा बसणार ? आम्ही मित्रांशी बोलतो, म्हणजे काही लगेच त्यांच्या गळयात नाही पडत. आम्हांला काही कळत का नाही ? अगं, तिकडे तर पावला-पावलाला मुलांची मदत घ्यावी लागते. मी ह्याच्याशी बोलणार नाही, त्याच्याशी बोलणार नाही, असं करून नाही चालत. अगं, इथं मला सगळयांनी किती सांगितलं होतं की मुंबईत कसं राहायचं ते. त्यामुळेच मी कॉन्फिडन्टली राहते ना. बाबांना काही वाटतच नाही. कोणत्या युगात जगतात गं ते ?.... इतकी बंधनं घालायची होती तर मला शिकवायचंच नव्हतं.... एकीकडे म्हणतात, करीयर करा. आणि एकीकडे ह्याच्याशी बोलू नको, त्याच्याशी बोलू नको. बाबांशी कसं बोलायचं हा प्रॉब्लेमच आहे नुसता.... माझंच चुकलं. मी सुट्टीतसुद्धा इकडे यायलाच नको होतं. शी.... घरी यायचं म्हणून महिना महिना प्लॅन करायचे. आणि घरी आल्यावर ह्यांचं असं.... आई, आता मी पुढच्या सुट्टीत मुळीच येणार नाही. राहते तिकडेच... म्हणजे ह्यांची बोलणी तरी खायला नको.''
``सुप्रिया, काय बोलतेस तू.... तुझ्या काळजीपोटीच बोलतात ना ते.... लोकांच्या लेकरांना बोलतात का ? स्वत:च्या मुलीलाच बोलतात ना.... ते कोणत्या वातावरणात वाढले ते जरा समजून घे ना.... तुमच्या बापलेकीच्या भांडणात मधल्यामध्ये माझी गोची.... काय करावं कळतच नाही....''
खरंच या दोघांच्या वादात काय करावं. कसं वागावं तेच कळत नाही. ह्यांचं म्हणणं पण खरं वाटतं, आणि तिचं म्हणणही खरं वाटतं.... आत्ताच चार मुला-मुलीत हिंडली-फिरली तर उद्या शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीच्या ठिकाणी तिला अडचणी येणार नाहीत. मुलांशी मोकळेपणाने वागल्यावरच तिला चांगल्या वाईटाचा फरक कळेल ना ? आपण समजतो, त्यापेक्षा जास्त आजच्या मुलींना समजतं. ह्यांचंही एकीकडे पटतं... लग्न करताना मुलं, बोल्ड मुली निवडतच नाही. एखादी मुलगी, मोकळेपणाने बोलली तरी तिचं लफडं आहे. आगाऊ आहे. असं ठरवून मोकळे होतात. मुलींना काय माहीत की प्रत्येक मुलगा नवरा झाल्यावर बदलतो ते.... त्यांना वाटतं आपण जसे तसेच जग.... काय करावं, कसं समजवावं या सुप्रियाला तेच कळत नाही. एकीकडे तिनं करिअर करावं..... खूप पुढं जावं असंही हे म्हणतात. अन् दुसरीकडे असं वागू नको तसं वागू नकोस, असंही बजावतात. परवा कोणा मित्राच्या मुलीचं उदाहरण देत होते. इंग्लंडला शिकायला एकटी चालली म्हणून कौतुक करत होते. मग आपल्या मुलीच्या बाबतीतच हा काय नियम ? मुळात काय करावं हेच मला समजेना. अंथरुणावर पडले तरी झोप येईना. जवळ सुप्रिया झोपली होती. किती निरागस दिसत होती. ह्यांना वाटतं की तिचं कोणावर प्रेम आहे की काय ? मला नाही तसं वाटत. अजून तरी मोकळेपणी बोलते.... पण.... छे, अभ्यासातून या मुलांना प्रेमबिम या गोष्टीचा विचार करायला वेळ असतो का ? तरी एकदा सहज म्हणून विचारलं, ``सुप्रिया, तुला कोणी प्रपोज केलं की नाही ?''
``हॅ%%, आई तू म्हणजे. प्रपोज करायला काय लागतं का? काही जण गंमत म्हणून विचारतात. लागला खडा तर बघावं.... आम्ही ह्या सगळया पोरांना ओळखून होत. तिथं लग्न करण्यासारखा कोणी नाही. त्याची काळजी तू करूच नकोस. आमची फक्त मैत्री. बाकी काही नाही.''
नसेलही. पण हिच्या बाबांच्या मनात एक गोष्ट शिरली की ते तिचा पिच्छाच पुरवतात. त्यापेक्षा सुप्रियालाच आवर घालावा. पण लगेच वाटलं, पोरींनी आईवडिलांकडे नाही मोकळेपणाने, मुक्तपणाने राहावं तर कुठे राहावं ? आपणच तिच्यावर विश्वास ठेवायला हवा. तिला हे छान आयुष्य मुक्तपणे भोगू द्यावं. कोणास ठाऊक सासर कसं मिळेल ? नवरा कसा असेल ! इकडंही बंधन, तिकडंही बंधनं. तिला तिच्या मनासारखं कधी जगूच द्यायचं नाही का ? आणि काय करते, तर सगळे मिळून गप्पा मारतात. खातात - पितात. पार्टी-बिर्टीला तर जात नाही ती.... चार दिवसाकरता येते तर तिला घरात ठेवायचं.... जे होईल ते होवो.... पण यातूनच प्रेम निर्माण होतं. आत्ताच नाही वचक ठेवला आणि उद्या खरंच लग्न ठरवलं तर.... मी तर कल्पनाच करू शकत नाही. नकोच ती कल्पनाही नको. विचार करता करता कधी झोप लागली ते कळलंच नाही....
असेच दिवस जात होते. सुप्रियाचे बाहेर जाणं थोडं कमी झालं होतं. चार दिवसांनी ती मुंबईला जाणार म्हणून आज सगळयांनी पार्टी करायची ठरवली. पार्टी म्हणजे हॉटेलात खाणं. तरी मी तिला बजावलं उशीर करू नकोस. जाताना गोंधळ नको. पण झाला, त्या दिवशी उशीर झाला. दहा वाजून गेले आणि सुप्रिया आली. बरं आली ती कोणा मुलाच्या गाडीवर बसून आली. तिने गाडी नेलीच नव्हती. जाताना कोणा मैत्रिणीबरोबर गेली होती. येताना ती मैत्रीण दुसऱ्याच मुलीला घेऊन गेली. मग हिला कोणी पीयूष नावाच्या मुलानं सोडलं आणि ते ह्यांनी पाहिलं. आधीच उशीर झालेला. त्यात मुलाबरोबर गाडीवर बसून आली. ही सुप्रिया म्हणजे अशी, घरापर्यंत त्या मुलाला कशाला आणायचं ? घराच्या बाजूला सोडायचं. सुप्रियाला बाबांना पाहताच अंदाज आला. ती भयंकर घाबरली. तिला पाहताच हे आले. आणि त्यांनी तिच्या खाडकन् थोबाडीत मारली....
``हेच हेच बघायचं राहिलं होतं. घरी रात्रीच्या वेळी पोराबरोबर बसून यायला लाज वाटत नाही. ह्यासाठी पाठवलं का तुला शिकायला ? घरी कशाला आलीस ? जायचं होतं सरळ निघून.''
``बाबा, काय बोलता हे तुम्ही ? पीयूष तुमच्या मित्राचा मुलगा. तोच म्हणाला मी सोडतो. त्याला नाही म्हटलं तर राग आला
असता म्हणून मी त्याच्याबरोबर आले.''
``पीयूष म्हणजे घरातला नाही. उद्या कोणी पाहिलं तर.... तुमची मुलगी रात्री-अपरात्री पोरांच्या गाडीवर हिंडते म्हणून.... अशी मुलगी दिसली तर आम्हीच नावं ठेवतो. आणि ही माझी पोरगी लाजलज्जा सोडून सरळ हिंडते....''
``बाबा, नुसतं गाडीवर आलं तर काय बिघडलं ?
``बघ बघ कशी उलट बोलतेय ? हिला आता कशाचंच काही वाटेनासं झालं. आज गाडीवर हिंडते, उद्या हात धरून पळून जाईल.''
``अहो, शांत व्हा बघू.... वयात आलेल्या मुलीवर हात टाकणं बरं दिसतं का ? सुप्रिया गप्प बस बघू. तुला कळतं का, तू काय बोलतेस ते ? आत जा आधी तू....''
``आई, बाबांचं हे नेहमी झालंय. मग मला शिकवताय कशाला ? कशाला ठेवलं घराच्या इतकं लांब?...''
``तेच, तेच चुकलं माझं. शेण खाल्लं मी. तुला मुंबईला ठेवून. आता ती चूक सुधारतो. तुझं शिक्षणच बंद करतो.''
``इथं आर्ट्सला घालतो. माझं डोकं भणभणायची वेळ आणली या कार्टीनं. कोणाचा धाकच उरला नाही हिला. अशी पोरगी असण्यापेक्षा नसलेली बरी.''
``अहो, काय बोलताय हे? जरा राग आवरा.''
``नाही बाबा. खरंच माझा जीव घ्या तुम्ही. मला जगणंच नको आणि तुमचं हे सारखं रागावणं नको. एकदा मारलं काय आणि कायमचं मारलं काय ? नाही आई, मला नाही जगायचं. मला नाही शिकायचं. बाबांना मी नकोशीच झालेय. मी... मला.... मारलं त्यांनी. आई कशासाठी जगू मी. मी राहतच नाही या घरात.''
``राहू नकोस, जा कुठं जायचं ते. इथं राहायचं तर मी सांगेन ते ऐकलं पाहिजे. कळलं...!'' असं म्हणून हे आत निघून गेले.
माझं सगळं अंग थंडगार पडलं होतं. सुप्रिया तर इतकी प्रचंड रडत होती की तिला रडताना श्वास घेता येत नव्हता. आयुष्यात ती इतकी रडली नव्हती. तिला कधी त्यांनी चार बोटांनी शिवलं नव्हतं. सुप्रिया नुसती थडथडत होती. तिला बाबांचा रागही आला होता. आणि स्वत:चाही.... मी तिला जवळ घेतलं. ह्यांना आवरू की तिला आवरू असं मला झालं. तरी मी शेवटी सुप्रियाजवळ थांबायचं ठरवलं. फारच रडली. तिचं रडणं ऐकून माझ्या पोटात कालवाकालव झाली.
``आई, मी या घरात नाही राहत. बाबांनी मला कधी नव्हे ते मारलं. पीयूष परका आहे का ? तूच सांग. रिक्षात तरी रात्रीची एकटी कशी येऊ ? म्हणून त्याच्याबरोबर आले. काय बिघडलं गं... आई.... सगळया मुली मित्रांबरोबर गाडीवर हिंडतात.... मी आजच आले... माझं काय चुकलं ? बाबांनी मला मारलं.'' सुप्रिया रडतच होती.
``बेटा, मी तुला हज्जारदा सांगितलं.... तरी तू ऐकलं नाहीस. एक तर इतका वेळ थांबायचं नाही. पार्टी नाही संपली तरी तसंच यायचं. कोणी काही का म्हणेना. बाबा संतापी आहेत हे तुला माहीत होतं ना ?''
``आई, मी काही लहान आहे का ?''
``हे बघ, मोठी झालीस म्हणूनच काळजी वाटते. रोज काही ना काही ऐकण्यात येतं. आता माझा कोणावरच विश्वास राहिला नाही. तू सरळ मुंबई सोड. इथल्या कॉलेजला सेकंड इयरला अॅडमिशन मिळते का ते पाहू. मला मुंबईचा भरवसाच राहिला नाही. काय चार पैसे जास्त द्यावे लागले तर लागू देत. पण उद्यापासून तुझे मित्र बंद. त्यांना भेटणं बंद. अजिबात बंद. कोणाला फोन नाही, काही नाही. नाही भेटलं तर काही बिघडत नाही. ते मित्र-मैत्रिणी काही जन्माला पुरणार नाहीत. आणि घर सोडून जाणार तर कुठे जाणार ? बाबांनी तुझ्यासाठी केलेले कष्ट आठव. काय केलं मित्र मैत्रिणीनं तुझ्यासाठी. असे दरवेळेस नवीन मित्र भेटतात. त्यांना जास्त महत्त्व द्यायचं नाही आणि मुख्य म्हणजे जास्त घराबाहेर पडायचंच नाही. संध्याकाळी आठनंतर, अजिबात नाही. कुठे जायचं नाही, यायचं नाही. आपण बरं, आपलं घर बरं. ही सवय लागली तर उद्या सासरी जड जाणार नाही. कालच बाबा म्हणत होते. इथंच शिकवू, काही नको मुंबई-बिंबई.''
``आई, अगं तिथल्या कॉलेजसारखं इथलं कॉलेज नाहीये. प्लीज तसं करू नकोस. बाबा तसे, तूही बाबांच्याच बाजूने. मग मी कोणाकडे सांगू. मला आधीच घालायला नको होतं.''
``सुप्रिया, तेच चुकलं आमचं. वयात आलेली मुलगी आईबापाच्या जीवाला घोर असते, कळलं ? आता इथंच शिकायचं, इथंच राहायचं.... बाबा म्हणतील तसं वागायचं'', असं म्हणून मी उठले. सुप्रिया रडतच राहिली. मीही देवाजवळ जाऊन खूप रडले.
माझी मुलगी हुशार आहे. धीट आहे. सर्वांशी प्रेमाने बोलते. म्हणून तिला मित्रमैत्रिणी जास्त आहेत. ती सगळयांचा विचार करते. पण हेच गुण आज मला त्रासदायक वाटतात. मला आजच्या वातावरणाची भीती वाटते. रोज टीव्हीवर बलात्कार, अत्याचार, फसवणूक हेच बघून वाटतं, आपली मुलगी याची शिकार तर होणार नाही ? त्यापेक्षा तिला पुढे जाऊच देऊ नये. काय शिकेल, ते शिकेल इथेच. पण मुंबईत राहिली असती तर फार प्रगती केली असती. अगदी गरुडझेप घेतली असती. पण त्यासाठी आकाशात मुक्तपणे सोडायला हवं. पिंजऱ्यात एक पाय ठेऊन नाही झेप घेता येत. पण ही झेप घेता घेता कोणी तिची शिकार केली म्हणजे ? त्यापेक्षा पिंजरा बरा. झेप नको.
दुसऱ्या दिवशी ह्यांनी तिला कोल्हापूरला कॉलेजमध्ये घातलं. सुप्रियाचं बाहेर हिंडणं, मित्र-मैत्रिणींना भेटणं, एकदम कमी केलं. मला सारखं वाटत राहिलं की, आपण हे काय केलंय ? तिला बंधनात घातलं आणि मी तिचा एक पंख कापला.
- प्रा. डॉ. श्रुतीश्री वडगबाळकर,
सोलापूर

TOFpjEHQTp

online cheap generic klonopin - buy klonopin uk pharmacy

MhWLFNvLjQfTSXaDYWS

purchase xanax - buy alprazolam cheap

MOZJoOtCoArKMWiK

purchase ambien online consultation - can i order ambien online

TINLrrSPCAoVvqCgI

buy klonopin online affordable price - order klonopin cheap

OBrPLuDRTwVVJ

xanax delivered overnight - online canada buy cheap xanax

epxdLdSXEgmDDGy

ambien lowest price - purchase ambien online offers

LfiyuFXgOLvr

fPIKVs zfsrsfmvcdan, [url=http://dldpoocmodqc.com/]dldpoocmodqc[/url], [link=http://wqaccysksqwi.com/]wqaccysksqwi[/link], http://ewtdrrqcfcrq.com/

sxRNdFWmbUGTIbz

Cheap canadian klonopin - buy cheap klonopin

ymyDmbduruwnqcwxHZG

Buy klonopin online canada - klonopin discount

SgEIUxpoIvlf

ambien online - buy ambien

qYAYvnCrwUSd

ambien - order cheap ambien

OAgQjHZqjvOzuAPzIDg

Generic ambien overnight - ambien without prescription

uQckTxLUrmxddx

Cost ambien online - Cheap ambien pills

cBESDQptvvr

buy tramadol online cheap - buy tramadol online no prescription

pjjnOnAiAu

klonopin discount - klonopin no prescription

BmtjGxGwQE

tramadol cheap - buy discount tramadol

qsITzLRnvmtEa

VJudUeCmsfw

ambien to buy - Cheap ambien without a prescription

mqUSDZqiyxDfqELJNZH

ambien - ambien lowest price

cHQwhxXewJSlRITBZWl

klonopin online canada - Buy klonopin online canada

uZVuNsspQV

Low price valium - buy valium online

IPFYavwNDTkz

klonopin buy - klonopin online canada

ujUWlIIrMU

valium drug - valium online order

VDNDEHkmjGRMJMjdyq

buy tramadol no prescription - buy tramadol online no prescription

ZfsubWwhWB

buy tramadol - shop tramadol

gtJVTpAIhEFKjKn

klonopin - Buy klonopin online wthout prescription

fUwZFSpXbrlA

valium cheap - Cost valium online

JQoySYpHehkVcv

Cheap klonopin pills - Generic klonopin overnight

bzOpbQoatNjFfVJDiw

valium online pharmacy - order valium

RhoqBQWmZJWD

ambien buy online - buy ambien

ILPXbpllldRgVCYWT

tramadol hcl - tramadol cheap

mUaanDhnoYGkkN

buy ambien online - Generic ambien

xjInJKcJPeKDooABcR

tramadol buy online - tramadol online

nzcLIeGEQnHT

tramadol online - tramadol no prescription

ohRQvCKGPO

buy tramadol - buy tramadol no prescription

MXpjpUuHODJnocahCCN

buy ambien no prescription - Best ambien price

HaXFDnPBIF

Buy xanax online usa - buy xanax no prescription

TnPhYCZKUjBcyCwJyD

ambien no prescription - Buy cheap online ambien

FNhmLpFWSuDYK

Canadian generic xanax - xanax lowest price

jxSlsscmNXpaDhUQkFi

buy tramadol online overnight - buy tramadol no prescription

lgnoduUnBMmQzyJAl

valium online pharmacy - order valium online

zBAmjPiEtfVoUDHMGmc

buy tramadol overnight - tramadol online no prescription

PtfhUzlqqxepunJnOHx

cheap valium - valium online pharmacy

JUuIdRMJPUwgCJcsViH

buy cheap ambien - ambien online order

bCbjwfMiut

Generic xanax - Canadian generic xanax

ojkEyaaoQGU

Cheap canadian ambien - order cheap ambien

wogRJaXHZZqttqdD

Cheap canadian xanax - buy xanax no prescription

rBcHEGDXTKxOOQeVvuV

buy tramadol - buy tramadol online overnight

tDFrsQtLcWNsRCBEWgE

tramadol online order - buy tramadol online

ViccqIgrvhPEI

discount ambien - Buy cheap ambien usa