वडसत्यवान
मला हवा आहे वडसत्यवान
`पत्नीव्रता' व्रत धरणारा
मी सावित्री नव्या युगाची !
बाबांनी दिली अस्त्रे जीवनसंघर्षाची
आईने, संस्कार संसाराचे
दुचाकीवर स्वार होणारी आणि
त्याहून अधिक वेगवान संगणकावर
हुकूमत गाजवणारी मी
कर्ती-करविती
कधी चुकून
कधी समजून उमजून
स्वीकारते राज्यभ्रष्ट, हतप्रभ अल्पायुषी सत्यवानाला
ठरवून मनाशी काही ठोकताळे
मोठ्या हिमतीने घेते ताब्यात
संसाररथाची सूत्रे
आधार देत घेत नेते यशोरेषेपार रथ
गतवैभव परत मिळविण्यासाठी
मिळवून देते नवे राज्य
सासू सासऱ्यांना दृष्टी
परत आणते यमराजाकडून प्राण-मान
मन पुन्हा मीच
का म्हणून व्रत धरावे सत्यवानासाठी ?
मातीचे घोडे बनविणाऱ्या
जंगलातून कंदमुळे गोळा करून जगणाऱ्या सत्यवानाला
प्राण आणि राज्यही का म्हणून मिळवून द्यावे ?
त्याला हवेच असेल गतवैभव
तर
किमान त्याला बनू द्या वडसत्यवान पत्नीव्रता !
सात जन्माचा घाट्यातला सौदा
साफ नामंजूर !!
मी सावित्री नव्या युगाची !!!
- जया गायकवाड, इस्लामपूर
प्रत्येक क्षणाचा
प्रत्येक क्षणाचा अन्वय सापडतोच, असे नाही
प्रत्येक ऊर्मीलां कवितेचे वस्त्र चढतेच, असे नाही
वाहत्या जखमेवरची फुंकर
म्हणजे खरं तर कविताच असते की
पण दिनचक्राच्या वेगात
सुटून-निसटून हरवून जाते ती !
मायेच्या मलमपट्टीत होते ती प्रेममयी....
प्रत्येक क्षणाचा....
आयुष्याच्या रखरखाटात
थकून भागून जातो श्वास
एखादी झुळूक, आगन्तु वळीव
हळुवारपणे रेखाटतो आरास
त्या अप्रूपाच्या स्वागतामध्ये गवसतेच ना काही....?
प्रत्येक क्षणाचा.....
काळाच्या आवर्तनातून
झडझडून गळून जातो शिशिर
ऋतूच्या आवेगातून पुन्हा
सरसरून फोफावते हिरवी हुरहूर
युगाच्या परीघाला मोकळयाच दिशा दाही...
प्रत्येक क्षणाचा ....
प्रत्येक क्षणाचा अन्वय सापडायलाच हवा का ?
पाण्याखालचा अष्टमांश बर्फ उपसायलाच हवां का ?
शब्दांपेक्षा अर्थ प्राचीन
म्हणून अर्थच भरावेत श्वासांत
वस्त्रापेक्षा त्वचेमधून
स्पर्श पोचतात देहात
शब्दांमधून मोकळे करून अर्थाला करावे प्रवाही...
प्रत्येक क्षणाचा ......
- आश्लेषा महाजन, पुणे
माहेरपण
वेदने, तू आहेस का अवधूत ?
इथे-तिथे असतेस फिरत
अलख-निरंजन म्हणत.
उपाशी-तापाशी
ह्याच्या त्याच्या दाराशी
कसली भिक्षा मागतेस ?
आपुलकी ? माया ? आस्था ?
श्रद्धा ? प्रेम माहेर ?
परसात उभ्या मला
ऐकू येते अंगणातून
तू दिलेली साद
`भिक्षाम् देहि !'
जाणीव नेणीवेला चिरत
आयुष्यभर घुमणारी.
मी येईपर्यन्त
तू थांबलीस तर
देईन तुला माहेरपण
- डॉ. विश्राम प्रामाणिक, जालना
ती
गेले ते दिवस विसते
आतां ती पोटभर जेवते
मुलांचे वडील पिऊन यायचे
घरांत फेकाफेकी करायचे
तिच्या अंगावर हात उगारायचे
घराबाहेर अन्न फेकायचे
सारे उपाशी झोपायचे
स्वप्नांत पोटभर जेवायचे
घरात तिला डांबून ठेवायचे
संशयाचे भूत डोक्यात भरायचे
सुखाचा जीव दु:खात घालायचे
दु:खात मुलाचे सुख शोधायचे.
हसऱ्या मुखवट्याने वावरायचे
कल्पनेत पोटभर जेवायचे
दारुने त्यांचा सत्यानाश केला
सारा संसार धुळीला मिळाला
अुपाशी राहून देह झिजला
त्यांचा दिवा लवकर विझला
आता ते ती मनामध्ये ठेवते
ती आतां पोटभर जेवते.
गेले ते दु:खाचे दिवस विसते
मुलांना वेळेवर शाळेत पाठवते
मुलांचा भविष्याकाळ घडवते
नवऱ्याच्या बदली काम करते
ताजे अन्न मुलांना खाऊ घालते
आता स्वत: ती पोटभर जेवते
- सिंधू वसंत पाडळकर,
कुळगाव, बदलापूर
पोवळी
मेंदूच्या आजाराच्या काळात
मी भडाभडा बोलून टाकल्या
आपल्या दोघांतल्या
काही नाजुक आठवणी
मग लाटांनी फेकून दिला त्या
जनसागराच्या किनाऱ्यावर
नागडे झाले तेजाळ मोती,
दिमाखदार शंख आणि
अनाकलनीय आकारांचे
दोन-तीन शिंपले
पण पोवळयांना रंग
आणि आकार असलेल्या
आणखीही काही आठवणी
साठलेल्या आहेत मनात खोलवर
माझ्या सुखदु:खातले
समजून घेतलेले बारकावे,
खणून काढलेले अंतर्मनातले काही
जुळणाऱ्या बहुतेक आवडी,
आणि थोडे, मतभेदही
अस्सल, जातिवंत पोवळयांची
महागडी माळ
आवाक्यातही नाही माझ्या
पण तुझ्या माझ्यातच बंदिस्त असलेल्या
त्या नाजुक आठवणी, ती पोवळी
कुणालाच दाखवणार नाही मी ती
ओवणारही नाही धाग्यात
झोपेची गोळी घेऊनही उत्तर रात्री पर्यंत
जागी असते काही वेळा
तेव्हा समोरची भिंत बनते क्षितिज
त्या क्षितिजावर तो पोवळयांचा रंग
पसरत जातो पहाटेच्या किरणांसारखा
कासावीस होते मन
त्या छटा पाहाताना
डोळयांतून ओघळत राहातो
एकेक थेंब, त्या अश्रूंनाही
पोवळयांची रंगछटा प्राप्त होते
ती पोवळी आेंजळीत घेऊन
मी पिचत निद्रेच्या आधीन होते.
- रजनी परूळेकर,



cialis
uglimoj cialis 2792 cialis 2172 cialis OEjKGC viagra UyyHqz viagra rhNLB viagra >:-OOO
viagra
bnyufuxb http://ypyego.com/ zazbdd [url=http://btcovm.com/]zazbdd[/url]
Karen millen outlet, Karen millen 2011, Karen millen discount
The designer Karen millen dresses behind one of the most famous brands Karen Millen and Olivia, Karen Millen UK has rocketed to fame with Karen Millen 2011 fashion line up. Karen Millen sale is now a lifestyle One Shoulder Dress Karenmillen brand that attracts women viewed Shoulders Dress Karenmillen around the world because of Solid Colour Dress Karenmillen uniqueness, sophistication and fun. Multicolour Dress Karenmillen fashion line is diverse and includes Karen Millen Coats, pants, dresses Karen Millen Cute 1940s Coat Brown and accessories. Everything Karen Millen Leopard Print Trench Coat is beautiful in its simplicity, and you can wear Karen Millen Posh Cotton Coat every day. Even if you do not have a Karen Millen Wool Coat, I thought a closet together, you can mix and match Karen Millen Shoulders Dress Mix Black Yellow Red to your heart and still look chic, since most species of Karen Millen Strapless Flower Print Dress are neutral colors.
Every lady needs a beautiful dress to attend various important occasions, such as wedding, evening party, social contact, etc. World’s famous women’s brand Karen Millen Dress is a kind of elegant and luxury dress which won highly praised by ladies in the world. Founded in 1981, Karen Millen manufacturer specializing in exquisite tailoring, coats and eveningwear. With luxurious fabrics, wear Karen Millen Dress will perfectly show female’s body shapes. A variety of Karen Millen Dresses on sale in the Karen Millen UK online shop, you can easy to find Karen Millen Shoulders Dresses , Karen Millen One Shoulder , Karen Millen Solid Colour , Karen Multicolour Dresses , Karen Millen Coat , Karen Millen Dresses 2011 Newest , etc. All Karen Millen Sale here are at big discount now. As new year is coming, elegant Karen Millen discount must be your ideal choice for various public occasions.
http://www.karenmillendresses4uk.org
http://www.karenmillendresses1.org
kfutodm
lvxniyhv
Office 2007 Rather than
Office 2007 Rather than fiddling Office 2010 Key with small proportion cheap microsoft office 2007 types of prepares Buy Office 2010 with the same download Office 2007 time and energy microsoft office 2010 professional plus to exercise difficulties Office 2007 Ultimate hardly achievable, at Microsoft Windows 7 .