Skip to main content

नात्यातल्या सावल्या

दारासमोर रायवळ आंब्याचा रोपा वाढत चाललेला. त्याच्या फुगत चाललेल्या बुंध्यावर किसनीनं पानवेलीची वेल लावलेली. ती पण बुंध्याच्या साहाय्याने वाढत चाललेली तिला अनेक फुटवे फुटून आंब्याच्या आधारात आपली इवली इवली पालं घुसवून वर वर चाललेली. हाताच्या तळव्याएवढी पानं फुटलेली. हिरवी...हिरवी.....! तोंडाला पाणी सुटेल अशी पानं ! त्या पानांकडे बघून गुण्याला राहावायचं नाही. दिवसातून चारदा त्या झाडाजवळ जायचा. पानांवर अलगद हात फिरवायचा. आपल्या बायकोचं किसनीचं लक्ष नाही हे पाहून गुपचूप पानं खुंटायचा. शर्टाच्या आत लपवायचा. अशी पानं खुंटून खंुटून फक्त कोवळीच काय ती पानं राहिलेली ! संध्याकाळी किसनी येऊन बघायची तर पानं कुठे आहेत! तिचं आधीच फटकळ तोंड पावसासारखं सुटायचं ! त्याला नको नको ती बोलायची ! दुसऱ्या दिवशी सारी पानं बघून जायची. त्याला दम देत म्हणायची.
``ह्यातलं एक पान तोडलंस ना.. हुंबरट्यावर साकटीन... हां....'' तो गुमान दात चावीत बसायचा. ती कामाला गेली की कमरेवर तोल सावरीत कसातरी चालत जायचा. पानवेल बघायचा. त्यातल्या त्यात जुन पान तोडायचं. दिवसभर चघळत बसायचा ! पोटाला अन्न मिळताना मोताद तिथे दाताखाली चावायला पान, चुना, तंबाखू कुठला? संध्याकाळी आल्यावर किसनी त्याची बिनवस्तऱ्याने करायची. तो आपला दात चावीत बसे !
आपल्या नवऱ्याच्या हातून पानं काही सुटत नाही म्हणून तिने नामी युक्ती केली. खोपीत अडकवलेलं इरलं काढलं. ते पानवेलीवर बांधलं. बुंध्याला वरून सुंभाच्या जुन्या कोपऱ्यांनी घट्ट आवळून घेतलं ! इरल्यात पानवेल खुषीत बहरत होती ! पाने फुटत होती ! आठ दिवसांनी कधीतरी किसनी उघडायची. तयार पानं काढायची आपल्या नवऱ्याला द्यायची. एक एक पान अख्या दिवसभर पुरवायची ! पैशाएवढा तुकडा करून खायची. तोंडाची आग क्षणभर थांबायची !!
घरच्या दर्शनी भागाकडे लाकडी खिडक्यांवर गुण्यानं सायकल टांगून ठेवलेली. कित्येक वर्षे झाली तिथेच ती ! गंजत चाललेली. पण सोडत नव्हता. अंगणाच्या डाव्या बाजूला बैलांचा गोठा होता. त्याच्यात दोन बैल बांधलेले. गुण्यासारखेच म्हातारे झालेले. शिंगांचं ओझं पेलवत नव्हतं असे वाटत ! अंगावर मूठभर मांस नव्हतं ! पण तरीही शेतीची कामं करत पुढच्या दारात कायम बसलेला त्याचा कुत्रा असे. सारखा आत बाहेर नाचायचा. पण बसणार मात्र दरवाजातच ! शरीराचं वेटोळं करून कायम झोपलेला असायचा !
गुण्या साफ म्हातारा झालेला. घरातला कचरा तेवढा कसातरी बसून बसून काढायचा. दिवसभर समोरच्या अंगणात बसलेला असे. अंगात शर्ट असलाच तर...चुकून. तोही फाटकं.....विटकं...पुढची बटनं कधी लावलेली नसायची. दोन्ही बाजू हवेवर हालायच्या. त्याबरोबर किसन्याच्या बरगड्या हालताना दिसत. कंबरेला पट्टेवाली पँन्ट असे. तीसुद्धा शिलाईला फाटलेली. वापरून वापरून विटली होती !

काळाभोर गुण्या पण त्याला सरळ उभं राहायला यायचंच नाही. ताठ उभा राहिला तर कंबरेत पाठी झुकायचा. आता कोलमडून पडेल की काय असं वाटायचं ! पाठी तोल गेल्यासारखा दिसायचा! पाठ आणि पोट एक झालेली. कंबरेचा कणा तेवढा शेवरीच्या काठीसारखा दिसायचा ! पाय काळेकभिन्न नुकताच वाड्यातून रटरटीत शेण काढून आल्यासारखा वाटे. कायमचे शेणानं माखल्यासारखे त्याचे पाय. चेहऱ्यावरचं....अंगावरचं मांस हाडाला घट्ट चिकटलेलं ! त्यामुळे तोंडाचा जबडा खाली ओढल्यासारखा दिसे. त्यात कायम दात चावत बसलेला. करकर दात चावी. डोळयांची बुबुळं सतत लाल झालेली. आत्ताही अंगणात नुकताच येऊन टेकला होता. किसनीनं घरातून टोपला आणला. त्यात तिचा दुपारच्या जेवणाचा डबा होता. ती दुसऱ्याकडे कामाला निघाली होती. निघता निघताच म्हणाली. ``मी जाता हां....बैलांना पाणी दाखव. जेवान ठेवलंय झाकून. दुपारी खा.... बावडीवर पाणी आणायला जाव नको....नाहीतर आडवा होऊन डोक्यावरचा हांडा उरावर पाडशील. तिथंच मरशील. गुमान हिथं बसून राहा.....'' ती त्याच्याकडे न बघताच काम करता करता बोलत होती. गुण्या मात्र डोळे लाल करून तिच्याकडे बघत बसलेला.
``दात चाऊन बघतोस काय माझ्याकं....'' किसनी.
``बघायला पण नको काय ? आ ?'' त्याचा घोगरा आवाज.
``हां, बघीत ऱ्हा हो. कधी बघितलंस नाय ना. घे बघून घे पॉटभर. देव मावळला. शिवाय दिसणार नाय ना...बघ मेल्या...जाता मी...'' पाठी न बघता तशीच तरातरा चालत निघाली. अंगणाच्या शेजारूनच लालमातीचा रस्ता. त्या रस्त्यावर पाय उमटवीत चालली. उंबरठ्यावर झोपलेला कुत्राही उठला. आणि तिच्या पुढे निघाला तशी एक शिवी हासडीत म्हणाली ``हाड मेल्या कशाला येतो माझ्या संग....''
तिची बोलण्याची पद्धतच तशी. शिवी अगदी सहजपणे द्यायची. शिवी देताना तिला काही वाटायचंच नाही. शिवीतला अर्थ तिला कधी कळलाच नव्हता वा त्या अर्थाशी तिचा काहीही संबंध नव्हता! फक्त जिभेवर येईल ते बोलत राहायचं बस्स ! गुण्याला ती एकेरी नावानेच संबोधायची ! अगदी पहिल्यापासूनच! त्याला एखाद्या दिवशी बोलली नाही.... शिव्या दिल्या नाहीत तर तो बैचेन व्हायचा!
गुण्याच्या मानानं किसनी तरणीताठी होती. सारखी काम करायची. काम करून करून कंबर नरम झालेली. चालणं ल्हाव्यासारखं! तुरुतुरू चालत असायची. सारखी तिची आपली घाई. कामाची गडबड सदानकदा तोंडाचा फटफटा चालूच. हात आणि तोंड चालूच असायचं! दोघांचं एकमेकावर खूप प्रेम होतं. संध्याकाळी तिला वेळ झाला तर गुण्या अख्ख्या अंगणभर फिरत वाटेकडे डोळे लावून बसे. तिला त्रास नको म्हणून पाणी भरत बसे. आत्ताही रिकामा हंडा घेऊन पाण्यावर निघाला डोक्यावरच्या हांड्यानं पाठी आणखीन तोल गेल्यासारखा वाटे. पाठी खूप झुकलेला दिसे ! पण तशाही स्थितीत पाणी भरीत होता. हंड्यातलं पाणी डचमळून उघड्या अंगावरून आेंघळत होतं. कंबरेवरच वस्त्र ओलं होत होतं! ते कितीही ओलं झालं तरी तिथेच सुकायचं !
संध्याकाळ झालेली. किसनी घरी आलेली. नेहमीप्रमाणेच कामाची आवराआवर करत होती. तोच कोणाच्या तरी हाकेचा आवाज आला म्हणून बाहेर आली. ``कोणं रं तां....'' बाहेर येता येता ओरडली.
``हां...मी .... संगीता भेटलेली. बरी आहे हं..''
तसी अगदी अंगणात आली. त्याचं तोंड दिसेल अशी उभी राहात म्हणाली ``आरं तात्या, कधी गेला होतास...''
``हा काय आत्ताच येतोय. बाजारात आली होती संगीता. बरी आहे...''
``व्हय ना. मजेत हाय न्हवं... जरा जाडबीड झालेय काय? किसनी. ''
``व्हय. तुकतुकी आलेय जरा...'' असं म्हणत तात्या रस्त्याने पुढे चालू लागला. तो कधीतरी शहरात जायचा. तेव्हा चुकून केव्हातरी संगीता भेटायची. निरोप यायचा. नाहीतर दीड दोन महिन्यांनी संगीता घरी यायचीच ! ``बाय बरीच हो गं माझ्या सोन्ये. सुखात आस तिथं... वाघजाय तुझं भलं करील... छत धरील गं माझ्ये सोन्ये....'' ती स्वत:शीच पुुटपुटली. संगीताचं नाव ऐकताच गुण्या आत गेला. चौकशी करू लागला.
संगीता ही गुण्याची नात होती. सोळा-सतरा वर्षांची होती. तात्याच्या ओळखीची एक हॉस्पिटलला नर्स होती. तिच्याकडे संगीता असायची. घरकाम करायची. मुलाला सांभाळायची. जेऊन खाऊन सहाशे रुपये द्यायची. दोन महिने झाले असतील तिथे राहिलेली. खुशीत होती !
गुण्याला, किसनीला आपल्या नातीची आठवण झाली. एकच्या एक नात पोटाची खळगी भरायला दुसऱ्यांची धुणीभांडी, पोरांना सांभाळण्याचं काम करते. महिन्याच्या पगाराला किसनीकडे आजीकडे देते. तेवढाच पैसा काय तो बाहेरून येणारा. जीव म्हणून जपून ठेवते. पोरीचं लग्न करायला हवं. पैशाला पैसा जोडायला हवा. घराचं पाकं गळतं दुरुस्त करायला हवं. पैसा हवा. जपून वापरायला हवा. ती तिकडे काबाडकष्ट करीत असेल...`` तिच्या डोळयांच्या कडा ओल्या झाल्या.
भरभरून दिलं होतं परमेश्वराने, देताना दिलं तसं घेऊन पण गेला. मग दिलंच कशाला तरी. नुसता मनाला घोर! असह्य आठवणी. एक पोर होता. संगीताचा बाबा तुकाराम, कसला अंगापेरानं भरलेला माणूस. संगीता तेव्हा पाच-सहा वर्षांची आसंल...... एक दिवस
नेहमीप्रमाणे लावणीच्या कामासाठी शेतावर गेला होता. सगळी माणसं धों...धों...पाऊस कोसळत होता. सोसाट्याचा वारा वाहत होता. काय झालं कळलं नाही, पण संगीताची आई अचानक लावणी लावता लावता शेतात पडली.... चिखलात माखली. उठायची ताकदच नव्हती. तुकारामानं आपल्या दोन हातावरनं तिला घरी आणलं! पण वकतच दिला नाही तिनं! अंगाला ताप चढलेला निखाऱ्यासारखा! आणि बघता बघता तुकारामाच्या मांडीवरच डोळं फिरवलं आणि परान सोडला. तुकाराम धाय मोकलून रडला! माझी सून या भरल्या घरातनं गेली ! लेकीला सोडून गेली.
तिच्या जाण्याचा तुकारामानं धसकाच घेतला. तिचं जाणं त्याला मान्यच झालं नाही. सारखा तिला शोधत असायचा. सायकल काढून इकडे तिकडे फिरायचा. चांगला असला की घरी बसायचा. पण डोक्यात वारं शिरलं की सायकलवरून वाऱ्यासारखा फिरायचा. रात्री अपरात्री केव्हाही बाहेर पडे.
एकदा अशाच मध्यान्ही रात्री केव्हा बाहेर पडला कळलं नाही. सायकल घेऊन बाहेर पडला तो सकाळी आलाच नाही. शोधाशोध केलेली. तेव्हा नदीवर कपडे धुवायला गेलेल्या बायका धावत पळत गावात सांगायला आल्या. ``तुकारामाची सायकल नदीच्या काठावर हाय...आणि तुकाराम नदीतल्या ढवातल्या पाण्यात फुगून वर आलाय...'' बायकोसाठी वेडा पिसा झालेला पोर... सायकलवरून नदीत पडला तो कायमचा!
भळभळणाऱ्या जखमा उरात घेऊन जगायचं. जेव्हा डोकं शांत होतं तेव्हा हाच विचार... तेच चित्र डोळयांसमोर येतं! मग ती दोघंही मुक्यानं रडत देवाला दोष देत म्हणत,``असं मरान द्यायचं होतं तर पदरात घातलंसच का त्याला....''
चुलीत विस्तव रटरटत होता. तव्यावर भाकरी शेकत होती. आणि उरलेलं काळीज कणाकणानं जळत होतं ! सोन्यासारखी नात आहे. तिचं चांगलं व्हायला हवं तोवर तरी जगायला हवं !
तुकाराम गेला त्या वक्तापासनं सायकल घराच्या वाशांना बांधलेली आहे ती आजपर्यंत. अनेकजण मागायला येतात. पण गुण्या देत नाही ! तशीच टांगलेली. त्या वेळी आणलेलं त्याने कुत्र्याचं पिल्लू ! तोच हा कु त्रा ! केवढा झालाय ! त्याची आठवण म्हणून त्यांनी मोठ्या आनंदाने पाळला होता !
सकाळचा अंगणाचा कचरा गुण्या काढीत होता. नेहमी तोच काढतो. पायावर बसून एक हात जमिनीवर टेकून व दुसऱ्या हातात झाडू. ढुंगण घासीत पुढे ओढीत हळू हळू कचरा पुढे ढकली. कचरा काही साफ निघेना. पानं तेवढी निघत. किसनीची नेहमीचीच घाई. तुरुतुरू चालत बाहेर यायची. उंबऱ्यावर जवळ बसलेल्या कुत्र्यावर हात उगारीत ``हाड मेल्या, बाह्यर जातोस का....... हड..हड....'' करीत बाहेर आली. नवरा कचरा काढतोय... पण सगळा बारीक कचरा पाठीच हे बघून ती तडकन म्हणाली -
`` आरं मेल्या, पाठी बघ ऱ्हायला कचरा. कशाला काढतोस असा अर्धा मुर्दा...''
``नाय काढीत तू काढ धर...''तसाच बसून गुण्या मोठ्यानं बोलला. तशी झपकन तिनं झाडू घेतली आणि सप्..सप्.. वरून कचरा काढू लागली. गुण्या तसाच बसून !
``बघ कसा कचरा काढलाय तो. नाय तर तुझी नक्षी...कशाला मरतोस...'' गुण्या तसाच बसून तिच्याकडे बघत राहिला. एकटक!
तो स्वत:शीच पुटपुटला. ``कित्ती तुझं तोंड फटकळ. `मेल्या' शब्दाशिवाय वाक्य सुरूच होत नाय काय ! काम खूप करतेस गो... पण बोलण्याची पद्धत तुझी...? आता नाय बदलायची.... विंचू डसल्यासारखं तुझं त्वांड... तेवढाच तुझ्यातला दोष किसने. नायतर लय भारी तू. एवढ्या प्रसंगात कधी कच नाय खाल्लीस. ताठ उभी रायलीस. पण हा तोंड हा तेवढा....आवरला आसतास तर...मला पण आता सवय झालेय... काय नाय वाटत बघ...'' तो तिथून उठला आणि आत जाणार तोच पाठीमागून हाक आली.
``मामानू....''
``हां. ये. बरी हायस ना....'' तिने वळून पाहिलं. संगीताची मावशी येत होती.
``सुजाता....'' ती आत येताच किसनीने पाणी पुढे केलं.
``मामी, कशी आहेस. बरी ना...''
``हाय बरंच म्हणायचं.....'' किसनी.
सुजाता ही संगीताची मावशी. आईच्या पाठची. उंचीपुरी, गोऱ्या
गोऱ्या रंगाची, दिसायलाही सुंदर होती. अंगापिंडाने भरलेली होती. त्यामुळे साडीत छान दिसायची. बोलणं चालणं अगदी सुडौल होतं. तिने आपलं लग्न स्वत:च प्रेम करून केलेलं. त्यामुळे नशीब उजळलं होतं. नवरा श्रीमंत होता. तिच्याकडे बघताक्षणीच श्रीमंतीची जाणीव व्हायची. त्यात कसल्या तरी संस्थेत समाजकार्य करायची. त्यामुळे प्रसिद्धही होती. बऱ्यापैकी ओळख होती. चांगली माहिती होती. बसायला देत किसनी म्हणाली -
``आज कशी काय आलीस ?''
``संगीताला न्यायला आलेय....'' सुजातामावशी.
``ती इथं कुठाय. कामाला ऱ्हायलेय. चार पैसे मिळतात. पोटं भरतं...''
``होय. पण माझ्याकडे होती ना ? मी दिले असते पैसे. मला नाय बोलायचं.. एवढी दिवस माझ्याकडे होतीच मागायचे पैसे...''
तीन चार वर्षे संगीता मावशीकडेच राहायला होती. सुजाताने मोठ्या प्रेमाने तिला नेलं होतं. आठवीपासून पुढचं शिक्षण देण्यासाठी आणि तिलाही मुलगी नव्हती म्हणून, मुलीसारखं सारं करण्यासाठी तिने नेलं होतं. पण झालं मात्र उलटच. तिला शिक्षण शिकवलं नाहीच; उलट घरातली सारी कामं तिलाच सांगायची. राब राब राबवून घ्यायची. लागेल असं बोलायची. संगीताने ते सारं सहन केलं. पण दोन महिन्यांपूर्वी आली ती गेलीच नाही. मावशीच्या छळाचा पाढा तिने आजीजवळ वाचला होता. त्यात तिला हेही समजलं होतं की, गावातील अर्धवट शिक्षण सोडलेल्या मुलींना ही मावशी शहरात नोकरदार, श्रीमंत माणसांकडे कामाला ठेवायची. आणि दीड- दोनशे रुपये प्रत्येक मुलीकडून दरमहा घ्यायची ! गरिबांच्या उत्पन्नावर वाढलेल्या या पिसवा ! बांडगूळ !
``मागून तू पैसे देणार व्हय गं. शिकवायला नेलीस ती घरकामाला ठेवलीस. आम्हांला पण थोडं समजतं, सुजा.....'' किसनी ताटकन बोलली.``मामी, तसं नाही. शिक्षणाचं म्हणशील तर आपल्या मुलींना काय करायचय एवढं शिकून ? लिहिता वाचता येतंयच की....हां बास ! आत्ता मी माझ्याकडे नेते आणि तुला दरमहा पैसे देते. तेवढेच .. अगं आता परक्यांकडे आहे. ना ओळख ना पाळख. आणि हा काळ कसा आहे माहीत आहे ना ? '' तिच्या युक्तिवादापुढे किसनी काय बोलणार ? चतुर सुजाताने तिच्याकडून नर्सच्या हॉस्पिटलचा पत्ता घेतला.
``सुजा, ती आली तर बघ ने तू. पण तुझ्याच बहिणीची पोरगी हाय. जरा प्रेमाने बघ... आयबापाविना पोर हाय ती...'' किसनी.
``ती काय तुझ्याकडं खुश नव्हती बा. मग नेतास गं कशाला. तिथं पोट भरतेय. भरूदे. ती हाय ती बरी हाय...''ओटीवरूनच गुण्या म्हणाला. ``बघते हं मी काय करायचं ते.....'' उठली. बाहेर निघता निघता म्हणाली.
``माझ्याकडे नसेल राहायचं तर दुसरीकडे ठेवीन मग तर झालं ...'' त्यावर दोघेही काहीही बोलली नाहीत. ती आली तसीच निघाली.
सुजाता दिसेनासी होताच किसनी तडकलीच.
``काय मेली रांड. दोन - तीन वर्षे राबवून घेतलान. काय दिलान. हाल केलान माझ्या पोरीचे. तुझा पण देव तळपाट करील. बघ हां..... ''
``अशी तडतडू नको. त्या तात्याकं जा आणि म्हण त्याला. सुजा त्या हॉस्पिटलात जाणार हाय....संगीताला म्हणावं जाव नको तिच्याकडं... हाय्स तिथच ऱ्हा. जा. सांग तात्याला...'' गुण्या बोलला तरी किसनी त्याच्याकडे बघतच राहिली. ``हा तोल गेलेला नवरा हाय खरा..... पण अडचणीच्या वेळी नेमका बळ देतो. मार्ग सुचवतो. म्हातारा झालाय.... पण मनानं देव माणूस. उभ्या आयुष्यात एका शब्दानं दुखावलं नाय... का दुसऱ्याला तरास नाय. आपलं काम भला की आपण. आता ताकद कमी झाली.... थकलाय. तरीपण काम करतोच....''
कामावर जायला उशीर होत होता खरा तरीही पानवेलीची पानं काढली. अर्धी गुण्याला दिली. डोक्यावर टोपला घेऊन तरतरा चालत निघाली. जाताना तात्याला तेवढा फोन करून सांगायला सांगणार होती. तिला आपल्या चुलत दिराच्या मुलाची केशवची आठवण झाली. तो तिला मुंबईला न्यायला तयार झाला होता, चांगला होता तो. पण मुंबईला गेली तर कधी तरी वर्ष - सहा महिन्यांनी भेटनार. ती पुढ्यात असावी म्हणून किसनी तिला पाठवीत नव्हती. तरीही केशवने फोन नंबर देऊन ठेवला होता. `मुंबईला पाठवायची असेल तर सांग. न्यायला येतो.' म्हणत होता.
सुजाता हॉस्पिटलला पोहोचली. `पाटील नर्स' ची चौकशी करू लागली. पहिल्या मजल्यावर आली ती नेमकी तिलाच म्हणाली. ``पाटील नर्स कुठे आहेत हो....''
``का हो कशाला हव्यात त्या. काही विशेष ?....'' पाटील नर्स.
``अहो, त्यांनी आपल्या घरी काम करण्यासाठी ना... एका छोट्या मुलीला पळवून आणलंय... मी त्या मुलीची मावशी. तिचा शोध घेत आलेय. त्यांना भेटते.... समजावते. नाहीतर पोलीस केस करते. कुठे आहेत जरा सांगता. ?''
``मुलगी केवढी आहे हो?''
``असेल तेरा - चौदा वर्षांची. अडाणी आजीआजोबांना फसवून आणलय त्यांनी. भेटू दे कशी पोलीस स्टेशनात नेते बघा...'' सुजाता थोडी रागातच बोलली.
``असं ? मग ती पाटील नर्स म्हणजे मीच आहे. बोला...'' ह्या बरोबर ती थोडीसी चपापलीच पण स्वत:ला सावरीत म्हणाली.
``संगीताला पाठवा माझ्याबरोबर ....''
``ओ मॅडम. मी पळवून आणलेली नाही काही तिला. तिच्या आजी-आजोबांशी बोलून....चर्चा करून आणलेय. कळलं. जरा सावकाश बोला...'' पाटील नर्स.
``मी तुमच्यावर पोलीस केस करणार. बालकामगार या सदराखाली अटक करते की नाही बघाच. मला ओळखत नाही तुम्ही...''
नर्सनी ओळखलं, बाई चांगली शिकली सवरलेली आहे. कायद्याची
थोडीसी माहितीसुद्धा आहे.
``तुम्ही पोलीस केस खुशाल करा... पण ती बालकामगार वगैरे नाही हं. चांगली सोळा वर्षांची आहे मॅडम. त्यात ती स्वखुशीने आलेय. त्यामुळे तुम्ही म्हटलंत तरीही काही वाकडं करू शकत नाही.... कळलं....'' नर्ससुद्धा तापलीच होती. ``मी पाठवणार नाही. तुम्ही जाऊ शकता...'' अशी म्हणत पाटील आपल्या ड्युटीकडे वळली.
इतक्या सहजासहजी सोडेल तर ती सुजाता कसली. ती सुद्धा मुरलेली होती. चिवट होती. हॉस्पिटलला सारखी फोन करायची. फोनवर सुजाताचं, नर्सचं सारखं भांडण व्हायचं !
पण त्या सारख्या भांडणाला पाटील नर्स कंटाळली. ड्युटीवरचे व्याप, त्यात हे नवीन टेन्शन. त्यापेक्षा पाटील नर्सच म्हणाली -
``उद्या या आणि ती आलीच तर घेऊन जा. तुमच्या या बोलण्यानं, भांडणानं खूप कंटाळा आलाय हे रोज रोज वाजवण्यापेक्षा एकदा सोक्षमोक्षच लावू.....''
दुसऱ्या दिवशी सुजाता आली. रूमवर आलीच आहे तर आदरातिथ्य म्हणून पाणी दिलं. संगीताला जवळ बोलावीत पाटील नर्सच म्हणाली,
``संगीता, तू तूझा निर्णय सांग काय तो, राहायची असशील तर स्पष्ट सांग. तुझ्या ह्या मावशीनं फोन करून करून बोअर केलंय. एकदा स्पष्टच तिच्या तोंडावर काय ते सांग....'' ती सुद्धा मावशीच्या जवळ आली आणि हलकेच म्हणाली. ``मी इथेच राहणार. इथे बरं वाटत मला...''
``अगं, मी मावशी आहे ना तुझी. चल माझ्या घरी.... चल तू....''
``मी नाही येणार..... जा तू....'' अशी म्हणत ती आतमध्ये पळाली. आता मात्र पाटीलचा पारा चढला. त्या तडफेने ताडकन बोलल्या -
``आता तुम्ही गेलात तरी चालेल. तुम्ही मावशी म्हणविता आणि वर फुकटचं राब राब राबवता. त्यापेक्षा इथेच मजेत आहे बरं ती. या तुम्ही...''
``बघतेच मी तुमची...''चडफडत लालेलाल होत बाहेर पडली. संगीताच्या वागण्याचा तिला राग आला. तिची उणी- दुणी काढत चाललेली!
पाटीलने संगीताच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. ``तू राहा हं इथे. मजेत राहा...'' तिलाही खूप बरं वाटलं!!
भात कापणीची कामं आटपली. गुरं मोकाट सुटायला लागली. पण गुण्या आपल्या बैलांना बांधूनच ठेवायचा. वाड्यातून अंगणात आणायचा. तिथेच पेंडा घाली. पाणी पाजी. बैल सुद्धा जरा मोकळया हवेत बसत. संध्याकाळी पुन्हा वाड्यात बांधी. त्यांच्यामागून सारखा फिरत असे. आता पानवेलही चांगली पालवायला लागली. फुटवे फुटत होते. इरल्याच्या बाहेर आली होती.
शरीर थकत चाललेलं. त्यात पोटभर भात तेवढाच. कधीतरी कधीतरी तेलाचा थेंब असला तरच. महागाई आभाळाला भिडत चाललेली. घरी पैसा येत नव्हता आणि महागाई वाढत चाललेली! जगण्यासाठी खायचं. त्याने शक्ती कुठली भरणारं ? मनाला बसलेले चटके... डोक्यात येणारे विचार... आणि अशक्तपणाने गुण्या आजारी पडला. अंथरुणाला खिळला. सारखा जीभ बाहेर काढायचा. धाप लागायची त्याला किसनी डोक्याशी बसून असायची. सारखी अश्रू ढाळायची. तो म्हणे, ``किसने, आता काय मी जगत नाय..... संगीताला तेवढी सांभाळ गो.... पोरीला रांकेला लाव नि मगं ये ... मला एक वस्तू आणून देशील काय ?'' गुण्या.
``सांग तरी. काय हवंय...''
``मला गुलाबजामून खावेशे वाटतित...''
तिने तो शब्द, पदार्थ प्रथमच ऐकला तरीही म्हणाली.
``कुठंसा भेटतो ? गावातल्या दुकानात असेल काय? सांग कुठं भेटतो ता काय सां...''
``हॉटेलात... बेकरीत भेटेल. पाच रुपयाचा आण माझ्या मुखात घाल.... तेवढीच इच्छा ऱ्हायलेय गो...'' तो बोलला आणि गप्प झाला. किसनीचं डोक चालायला लागलं. मनातल्या मनात तो शब्द पुन्हा पुन्हा आठवला. कनवटीला दहा रुपयं घेतले. तो शब्द विसरायला व्हईल म्हणून काहीही न बोलता आठवीत धावत वाडीतल्या रिक्षावाल्याकडे गेली. त्याच्या जवळ दहा रुपय देत म्हणाली.`` गुलाबजामून आणशील काय रं .... ह्यांनी त्याचा टावराच घेतलाय....''
``होय होय. गुलाबजाम.....''
ती तशीच पाठी फिरली. घरी आली. गुण्या तसाच लोळत होता. त्याच्या जवळ बसत म्हणाली ``सांगितलाय हो आणायला. आणील...''
परतच्या टि्न्पला त्याने प्लास्टिकच्या पिशवीतून गुलाबजाम आणले. किसनीने एक एक गुलाबजाम त्याच्या तोंडात सोडला. रस मुखात सोडीत होती. तो अगदी शांतपणे गुलाबजाम खात होता. सगळे खाऊन झाल्यावर अगदी तृप्त झाला. किसनीचा हात हातात घेतला आणि बघता बघता तिलाही कळलं नाही. त्याचा प्राण कधी गेला तो. अंग गार पडलं तेव्हा केवढ्याने-तरी बोंब ठोकली ! काळीज चिरून टाकणारी बोंब !
किसनी आता एकटी एकटी पडली. वाड्यातल्या बैलांना चारापानी घालायची. कोंबड्यांना दाणा पाणी द्यायची. घरातलं सारं आवरायचं.... पाणी भरायचं! सारं करताना तिला गुण्याची आठवण यायची. `आयुष्यभर साथ दिली ती... अर्ध्यावर एकटीला सोडून पुढे गेलाय... नातीची काळजी घ्यायला सांगून गेलाय....पण जीव नाय रं रमत तुझ्याशिवाय. तू बाह्यर बसलेला असलास की तोंडाचा फटफटा तुझ्यावर सुटायचा. तोंड मोकळं व्हायचं. बरं वाटायचं. आत्ता तू नायस... कोणाला बोलायच? हक्काचं माणूस कुठाय रं ? ' त्याची आठवण दाटून आली. त्याच्या आठवणीबरोबर कधीही न विसरता येणारे प्रसंग आठवत आणि तिला भडभडून यायचं !
सारखं भडभडून बोलायची सवय...गुण्याला टोचून बोलायची
लागलेली सवय ! पण आत्ता कोणाला बोलणार ? शब्द गोठून गेले. गप्प गार झाली. डोक्यात सारे विचार....त्या विचाराने तिचं डोकं भनभनायचं सारे प्रसंग समोर दिसायचे मग रात्र रात्र झोप लागायची नाही गुमान ऐकून घेणारा गुण्या..... आपली वाट बघतो आहे.... नेहमी सारखंच....या आठवणीने तिला दाटून यायचं.
डोकं शांत झालं की प्रसंगाची असंख्य चित्र डोळयांसमोर तरळत. जा म्हणता जात नसत. कोणाजवळ बोलायचं ! काय सांगायचं!
रस्त्याने जाता येता एखाद दुसरा हाक मारी. `ओ' देण्यापलीकडे काही नाही. एखादी दुसरी बाई यायची. बसायची! तेवढंच मन मोकळं होई. नाहीतर आकाश पाऊस भरलेल्या ढगासारखं !
लोक म्हणायची, गुण्या मेला पण किसनीच्या तोंडाला कुलूप लागलं. तिचं आतल्या आत जळणं कुणाला दिसलं नाही!
सुजाता पाटील नर्सला वरचेवर फोन करत राहायची. काहीबाही बोलायची. तिला घरी पाठवायला सांगायची. पण तरीही पाटीलने ते धुडकावूनच लावलं ! पण तिला वाटलं, एखादा वाईट प्रसंग घडला....चूकून काही घडलं तर.... ही मावशी आपल्याला कामाला लावील, कशात तरी अडकवील. या नात्यातल्या सावल्या काही धड असतीलच असं नाही. तिच्याशी भांडून..... आपण कशाला अडचणीत या ? तिला मोकळंच करून टाकू......''
दुसऱ्या मुलीची व्यवस्था होताच पाटील म्हणाल्या.
``संगीता, तू जा बाई घरी. तुझ्या मावशीनं फोन करून करून मला हैरान केलंय...... तुमची नाती आणि तुम्ही.....बघा काय ते. उद्यापासून येऊ नकोस हं.....''
नात्यातल्या सावल्या बुजगावण्या म्हणून उभ्या राहिल्या ! ``आपल्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याईतपत मावशीला काय स्वारस्य आहे, हे त्या पोरीला कळलं नव्हतं ! आजीकडे येऊन, मावशीमुळे आपलं काम सुटलं हे सांगताच किसनीने तिच्या नावाने शंखनाद केला होता !!''
एक वर्ष सरायला आलं. गुण्याचं वर्षश्राद्ध होतं ! किसनीने आपल्या ऐपतीप्रमाणे आपल्या नवऱ्याचं वर्षश्राद्ध केलं ! सुजाता आली. चुलत दिराचा मुलगा केशव आला होता. इतर बरीच मंडळी आली होती. सुजाता घरी जायला निघाली. तशी संगीताला जवळ बोलवीत म्हणाली. ``मी दोन दिवसांनी येते हं तुला न्यायला. माझ्याकडेच राहा. तिथे जरा बरी होशील... सुधारशील... माझी लेक ग ती....''तिच्या डोक्यावरून हात फिरवला.
संगीता त्यावर काहीच बोलली नाही. किसनीच्या डोक्यात असंख्य विंचू डसल्यासारखे वाटले. पण तरीही तिने आपल्या तोंडाला आळा घालीत गप्प बसली. काय करायचं ते तिने मनोमन ठरवलं होतं !
दुसऱ्या दिवशी केशव मुंबईला जायला निघाला होता. बॅग भरता भरता किसनीला म्हणाला,``संगीताला पाठवतेस मुंबईला. राहील घरी. घरचं काम करील. तेवढीच आईला....पत्नीला मदत होईल.....पाठवणार?''
``बघू मागनं पुढनं.....'' किसनी !
पण तिला खरं म्हणायचं असतं, तुम्ही साऱ्या नात्यातल्या सावल्या स्वार्थाने बरबटलेल्या. तुम्हांला तुमच्या घरी काम करायला.... बायकोला.... आईला... मदत करायला संगीता हवेय.....सुजाताला तिचं घरचं फुकटचं काम करायला हवंय.... पण माझ्या पोरीकडे बघून तुमचा एवढा कसा स्वार्थ जागा होतो... नात्यातल्या सावल्या एवढ्या स्वार्थी कशा ? फुकटची राबवायला माझी पोर हवी सगळयांना.....नाही मिळायची. ती इथेच राहील. माझ्या पुढ्यात राहील...''
सगळी आपआपल्या घरी निघून गेले. किसनी भाकऱ्या भाजीत होती. संगीता चुलीजवळ बसून पाटीलबाइंर्च्या इथल्या आठवणी सांगीत होती. बाहेरून कोणीतरी हाक मारली. ती उठून बाहेर येणार तोच. तो माणूस आत आला.
``तात्या, काय रं, कसा काय आज.......''
``आपल्या तालुक्याला संगीताला काम बघितलंय. डॉक्टरांच्या घरी. त्यांच्या मुलीला बघायचं......तसं बरं हाय पगार पण चांगला हाय......पाठवशील ? उद्या गाठ घालून देतो तुझी त्यांच्याशी......''
तिचा चेहरा भाकरीसारखा फुलला. संगीताही खुश झाली. किसनीने त्याला जेवून जाण्याचा आग्रह केला. पण तो तयार नव्हता. ``जेवून जाण्याइतकं मोठं काम नाही हे काकू. आपली ओळख होती. जाताजाता होऊन जातं....तुला तरी आधार कुठाय ? तेवढाच चार पैशाचा आधार....'' अगदी आला तसाच गेला.
पिठूर चांदण पडलं होतं, संगीता, किसनी अंगणात आली. आकाशात असंख्य चादंण्या फुलल्या होत्या. त्या चांदण्यांकडे पाहत संगीता म्हणाली, ``आजी आकाशात बघ. किती चांदण्या चमचमताहेत.... पाटीलबाई म्हणतात.... या चांदण्या म्हणजे आपले एकएक पूर्वज आहेत. ते वरून आपल्या चांगल्या कार्याचं कौतुक करीत असतात. जे खाली चांगलं काम करतात त्यांनाच वर आभाळात असं अढळपद मिळतं.... त्यांच्या कार्याकडे, त्या चांदण्यांकडे बघून दु:खाचे दिवस ढकलायचे असतात. आजी, माझे आई बाबा, आजोबा.....या चांदण्यातनं आपल्याला बघीत असतील ना?''
श्री. सुनिल तावडे,
रत्नागिरी

Office 2007 Rather than

Office 2007 Rather than fiddling Office 2010 Key with small proportion cheap microsoft office 2007 types of prepares Buy Office 2010 with the same download Office 2007 time and energy microsoft office 2010 professional plus to exercise difficulties Office 2007 Ultimate hardly achievable, at Microsoft Windows 7 .

无标题文档two watches that lasted

无标题文档two watches that lasted a lifetime. Things keep changed a oodles and the unique formation wants to advertise their watches. They be aware that the wear and watches Discount the latest tantrum in the the rage world. These watches play a joke on suit a favorite mould doodad to save both sexes. Today, more people are using these uk replica watches the dream of tons people, generally experts and pilots. Moreover, the be without of professionals also yen see in the interest of a splendid production in swiss replica watches addition to various convey strategies can ascendancy the supreme purchaser judicial proceeding. Different stores can suggest imitation watches at swiss replica watches satisfied with what they be experiencing and wearing. He not in a million years bothered to make off into details nor are interested in what they impair hermes handbags handbook winding men's unblemished gold is the most priceless and sumptuous pore over collecting.While watches Audemars Piguet Jules Audemars considered replica hermes something what the actual point that you tour today, if you crave to own Cartier dupe watches, it is undisturbed benefit of you to believe. Now, we can swiss replica watches only.Since watches are so universal take advantage of in the make available today, I do not call to mind a consider you inclination find some men and Wrist Watches Replica Watches Cartier Roadster is natural when you suborn Topreplicawatches4u.com. Topreplicawatches4u.com has limerick of the superlative selections online. replica watches they are elegantly designed. Once they are priced too cheaply, customers can doubt that they are of bad je sais quoi. Naturally, no ditty is zealous to swallow. replica chanel handbags to put their importance in association of approach.Tag Heuer Replica Watches-copied.com in the retail has infatuated the world by way of astonishment. chanel replica body overhead stage. All of these watches tend to be for that reason trendy and therefore glamorous, which is to be for certain then noticeable price uk replica watches to convert yourself and you deficiency to affect the women, strain Rolex watches, as before you know it as workable. Company offers discount likeness watches. watches Discount some data and analyze them with the 18 carats. Do your subdue to procure a banker credible on you to safeguard an trepidation ;antiquated what could be Discount Watches Replica, Breitling Replica, Gucci Replica, Omega Replica, Louis Vuitton Replica, Porsche Design Replica, Tag Heuer Replica and numerous more brands are supplied Watches For Sale but standard.Tag Heuer Watches band situation of the technique technology with cutting-edge designs. Tag Heuer watches are known suitable their Fake Louis Vuitton Omega Seamaster imitation watches are time-honoured watches that are of ripe value. Show your Omega Seamaster Replica Watch in your hand, tony offered by virtue of the online believe in at same credible prices. The duplicate watches are made aside professionals. The cardinal design of watches Discount