Skip to main content

शहराची सीमा ओलांडून ती मजबूत हिरवट जीप हायवेला लागली. रणरणते ऊन, तप्त डांबरी रोड, सुनसान रहदारी. मग काय त्या जीपला तुफानी वेग चढला. इतका की ती केव्हा त्या घनदाट अभयारण्याशी जाऊन थडकली ते कळलेही नाही.
त्या जंगलात प्रवेश करताच रानचा तो खरपूस ओला गंध नाका-तोंडात शिरला अणि सारे शरीर थरारून उठले. जीपमधले इतर सारेच पेंगत होते पण रेंजर ऑफिसर मिस. सीमा रानडे पूर्ण जागृत होती. आणि आता तर त्या मस्त रानगंधाने, त्या अद्भुत, प्रदूषणमुक्त हवेने तिचा उत्साह ओसंडत होता. तिचे कसबी हात स्टियरिंग व्हिलवर होते. त्या व्हिलला हवे तसे अन् हव्या त्या दिशेला वळवून नेण्यास ते समर्थ होते. फॉरेस्ट खात्याने नेमून दिलेल्या ड्नयव्हरची तिने मागे रवानगी केली होती. निमूट तंबाखू चोळत बसला होता बिचारा. करतो काय ?
पाहता पाहता पुरुषभर उंचीच्या भिंतीचे पक्के कुंपण असणारी, लाल विटांची इमारत जवळ आली. ऑफिसच्या त्या भक्कम लोखंडी गेटमधून जीप इतकी गर्रकन वळली की बाजूला बसलेला असिस्टंट पडता पडता वाचला. समोरच्या गॅरेजमध्ये शिरून जीप खाडकन थांबली. तशी वाट पाहाणारे सारे छोटेमोठे कर्मचारी लगबगीने पुढे धावले. त्यांचे स्वागत हसतमुखाने, किंचित मान झुकवून, मोठ्या ऐटीत सीमा तिच्या खास केबिनमध्ये दाखल झाली.
बाहेर उभे असणारे काही जण एकमेकांकडे पाहून उपरोधिक हसले. एक तर स्त्री जात, तीही म्हणे रेंजर ऑफिसर, बरं झाली तर झाली, तिनं मुकाट एखाद्या शहरी वनरक्षकाची जागा भूषवावी, पण नाही, धडकली
थेट, ऐन जंगलात, रेंजर ऑफिसरच्या धोकादायक पदावर. त्यातून तरुण, अविवाहित, दिसायला सुंदर, मग काय, काही खरं नाही तिचं.
फिरेल चार दिवसात परत. भल्या भल्या मर्दांना पंजात कुस्करणारे हे जंगल, या कोवळया कळीला तर ....
एक खानसामा, दोनचार सफाई कामगार, चार काँस्टेबल्स, दोन ऑफिसर्स असा लवाजमा होता आणि बाल्या नावाचा एक हरहुन्नरी भिल्ल, बॉडीगार्ड कम वॉचमन. मजबूत अंगकाठी, कोल्ह्यासारखा सावध अन् चित्त्याप्रमाणे चपळ असा चाळीस बेचाळीसचा हा रांगडा गडी म्हणजे एक चमत्कारच होता. साहेबदेखील वचकून असायचे याला.
पण या पोरगेल्या रेंजर ऑफिसर सीमाने पहिल्याच दर्शनात काय जादू केली कोण जाणे पण चक्क पितृवात्सल्यच जागे झाले या बाल्याच्या पाषाण काळजात, एकदम नरम पडला तो. आल्या आल्याच सीमाने चार्ज घेतला. संपूर्ण स्टाफशी परिचय करून झाल्यावर लगेच फायली चाळत बसली ती.
``बाई, लगी आज सम्द बगता की काय, अवं, परवासातून थकून आलायसा, काई आरामभिराम नकू?''
`तुला रे का पंचाईत', असं सीमा म्हणणार होती पण त्या वयस्कर माणसाच्या मायाळू स्वराने, प्रेमळ नजरेमुळे ती त्याला तोडू शकली नाही.
``खरंय तुझं, पण मला थकणं माहीतच नाही, शिवाय रेंजर ऑफिसर होण्याचं माझं स्वप्न पूरं झाल्याने आज मी खूप आनंदात आहे. शीण आलाच नाही बघ मला.''
``व्हय, व्हय, पन मी आता घरला जाऊन भाकरटुकडा खाऊन नाईट डिवटीवर हजीर व्हतो. येताना तुमच्या सोबतीला आयला घिऊन येतो. आनिक यक आजचं जेवान बी आयच आनंल. मग उद्या पासून शिदाबिदा जमवून इथला खानसामा सैपाक करत जाईल.''
एका तासातच आईला घेऊन बाल्या हजर झाला. ``हे बगा बाय, मी भरली गन घिऊन दारातच असतूया. पापनीला पापनी नाय लावत आपून. तेव्हा अजाबात घाबरू नकासा.'' या निर्भय वाघिणीला हा बुटबैंगण, बाल्या `घाबरू नका' म्हणतोय, छान ! सीमाला हसू फुटलं. बाकी जेवण रुचकर होतं. जाडजूड नाचणीची भाकरी, ठेचा अन् एक पालेभाजी. तिला जेवण आवडल्याचं पाहून बाल्याची आई खूष झाली. सकाळी घरी जाताना सीमाने आठवणीने घरच्या लेकराबाळांसाठी मोठाले बिस्किटपुडे, चॉकलेट्स दिली.
लय मोटं मन हाय नव्या बायसायबांच. ती गेल्यावर सीमा ऑफिसच्या आवारात आली. नुकताच सूर्योदय झालेला. टवटवीत सोनेरी गुलाबी सूर्यकिरणांनी सारा आसमंत न्हाऊन निघालेला. उंच उंच झाडां-वृक्षांतून ती आभा झिरपत होती. पाखरांची गोड किलबिल, पानांची सळसळ, ओलसर मृद्गंध आणि लपेटणाऱ्या गार गार वायुलहरी.
त्यातच खानसामा तुकोबाने आल्याचा वाफाळता चहा आणला. ``वा ! वा ! चहा मस्तच झालाय, आणि तू घेतलास का चहा?'' आजवर एवढ्या आपुलकीने त्या खानसाम्याला कुणी बोललं नव्हतं. एरवी सारेच साहेब, `ये होना, वो होना, ऐसा क्यूं नही किया ?, तुमको नोकरीपे किसने रखा ? इडियट, यूसलेस' अशा प्रकारचं सतत ओरडणं, रागावणं चाले. पण सायबीण आसूनबी पिरमानं बोलणारी ही पोर तुकोबाला भावून गेली. चहा घेऊन सीमाने ताजे वर्तमानपत्र हातात घेतले. तोच....पालापाचोळा, धुळीचे खकाणे, धुराचे डोंब उठवीत, कानठळया बसवणारा कर्कश आवाज करीत एक लालभडक स्कॉरपियो तिथे येऊन धडकली. त्यातून रेशमी झब्बा, गळयात जाडजूड चेन, पाची बोटात अंगठ्या अन् तोंडात पानाचा तोबरा असा सर्वगुण संपन्न माणूस उन्मत्तपणे हसत उतरला, तशाच लव्याजम्यासह.
सीमा एकदम नाराज झाली पण जागची उठली नाही. त्या व्यक्तीला पाहिल्याबरोबर सारे शिपाई अदबीने सलाम ठोकून पुढे झाले. लगबगीने आतून खुर्च्या आणून मांडल्या गेल्या ``नमस्कार रंेजर बायसाहेब, आपन आन्ना, अन्ना भांदरगे, सम्दे वळकून आसत्यात आमाला, हिथं जवळच आपला फार्म आहे. नवा हापिसर आला की आम्ची भेट ठरल्याली. फुडं कळलच सम्द, पैली आमची ही नम्र लहानसी भ्येट ग्वाड मानून घ्या'' तोवर नोकरांनी तीन चार करंड्या आणून ठेवल्या. अण्णा भांदरगेचे ते एकूण व्यक्तिमत्त्व, थाटमाट, डामडौल व गिफ्ट पाहून चाणाक्ष सीमाने सारा प्रकार लगेच ओळखला. तिने मनात झटपट काही विचार केला व तोंडावर हास्य खेळवत स्वागत केले. ``वा ! वा ! अलभ्य लाभ, आनंद वाटला! `आपल्यासारख्या' बड्या आसामीच्या भेटीनं. तुकोबा, पाहुण्यांसाठी काही चहा, पाणी..'' मोठाच चमत्कार. या समार्ट रेंजरबाईनं पटकन आपली भ्येट कबूल केली. न्हाईतर आपल्या सभ्य, हापिसर बाया लय तत्त्वाच्या, अबिमानाच्या, नकऱ्याच्या आसत्यात म्हनं. ठोकरतात, झगडतात, नस्त्या आबदा उब्या करतात. पन... हाय ही बाई झ्याक हाय... आसच हिला घोळात घेऊ या. म्हंजी आपून बिन घोर.
प्रचंड खूष होऊन अण्णापार्टी निघून गेली. सीमाने लगेच करंड्या उघडल्या. नोटांची बंडलं, सुका मेवा, फळफळावळ. तिने ती बंडलं नीट मोजून, नोंद करून, व्यवस्थित एका ब्रीफकेसमध्ये ठेवली. लॉक केली. फळं, मेवे साऱ्या शिपायांना वाटून टाकली, सारे खुलले. आनंदले, दूर जाऊन गप्पा रंगवत बसले. मनात प्रचंड वादळ घेऊनही सीमा शांतपणे केबिनमध्ये आली. पाहाते तो कोपऱ्यात बाल्या दु:खी होऊन उभा होता.``कां, तुझं काय बिनसलं ?'' ``काय बिन्सलं? अवं कालीज जलतं या सैतान अन्नाला बगून. आमच्या लेकारावानी जनावरास्नी हा मारतो, त्येंच मांस खातो, दातं, नखं, क्येस, कातडं, चरबी इकतो. पैस्यात लोळतो हा डोंब. हिरवं झाड उपाटतो, तोडतो. सम्दं रान वरपतो. तरीबी भूकतान भागत नाई या लांडग्याची. हिथं नवा सायेब आला रं आला की गळयापतूर
खाऊ, प्येऊ घातलं का, हा जंगाल भागलायला मोकळा. तसाच आज बी आला... पैलं तुमास्नी बगून वाटलं हुतं... तुमी येगळं असान, या आमच्या रानावर पडल्यालं हे गिरान उटवाल...पर....'' बोलता बोलता त्या रानवट पण अस्सल माणसाचे डोळे वाहू लागले. सीमाला मनापासून कौतुक वाटलं. तिनं इकडेतिकडे नजर टाकली. आजू-बाजूला कुणीही नव्हतं. ती हलकेच बाल्याजवळ गेली व बारीक आवाजात बरंच काही बोलली. ऐकता ऐकता बाल्याचा चेहरा पालटला, व तो एकदम हसू लागला व हसतच घरी गेला.
पौर्णिमेचा उत्सव असल्याने तिने साऱ्या स्टाफला सुट्टी दिली होती आज व ती निवांत फाईली चाळत बसली. काही वेळाने बाल्या हजर. सोबत कांही तरुण दोस्तमंडळी होती. आदिवासी.
``या आपल्या नव्या रंेजरबाई, तुमाला कायबाय सिकविणार हायत, जा, पाय शिवा त्येंचं.''
``नको नको, पायबिय धरू नका, सगळे आधी नीट बसून घ्या पाहू''. त्या कातकरी, भिल्ल, रानटी पोरांसाठी मोठं जाजम अंथरलं होतं. लगेच आतून तुकोबानं सर्वांसाठी गरमागरम चहा, बिस्किटं, केक्स आणले. सीमाने अगत्याने सर्वांना आग्रह केला.
आमा गरीब, अडानी, अदिवासी जमातीला आजवर कुणीच इकता मान द्येला नव्हता. ही नवी सायबीन लई मायाळू दिसतीया. बाल्याची ती दोस्तमंडळी पहिल्याच भेटीत आपलीशी झाली. त्यांच्याशी सीमा बरोबरीने गप्पा मारत बसली. स्वत: सीमा एक बुद्धिमान, सुशिक्षित व सन्माननीय अधिकारी होती खरी, पण ही अडाणी, अशिक्षित पोरंही चांगलीच चतुर आणि तैलबुद्धीची होती. दिवसभर गुराढोरामागं जंगल पालथं घालताना पान अन् पान, मोठं मोठे वृक्ष, हर प्रकारच्या वनस्पती, कंदमुळं, समस्त प्राणी त्यांची बिळं, गुहा, लपणं सारं सारं त्यांच्या अंगचंच झालेलं, प्राण्यांच्या पावलटीवरून, वासावरून माग काढणं तर हातचा मळच होता. आणि या सर्वापेक्षा महत्त्वाचं आणि मोलाचं होतं ते त्यांचं या जंगलावरचं, प्राणिमात्रावरचं प्रेम आणि याचाच उपयोग करून सीमा ती प्राण्याची निर्दय कत्तलं, वृक्षतोड व जंगलाचा विध्वंस थांबवू शकणार होती. पर्यावरण अबाधित राखणार होती.
अन्ना भांदरगेची सैतानी कृत्यं पाहून ही जंगलची लेकरं चवताळलेली होती. त्याच्या बंदुका, दारूगोळा, मोटारी, पिंजरे, सापळे या साऱ्यापुढे यांचा काय टिकाव लागणार. जिवाभावाच्या प्राण्यांची कत्तल, मायमाउलीसारख्या रानाचा विध्वंस उघड्या डोळयांनी पाहाताना उरात संताप, दु:ख मावेना त्यांच्या ``बायसाब, आमी लागंल ती मदत करू, काळीजसुदीक काडून ठेऊ, पन या आन्नाला गजाआड करा कसबी करून.''
``हे बघा, असं हातपाय गाळून दु:ख करत बसू नका. आपण आपले सर्व सामर्थ्य पणाला लावू या. त्यासाठी लागणारी सर्व साधन सामग्री मी मागवली आहे. त्या खर्चाचीही सोय `आपोआपच' झालेली आहे. फक्त या कानाचं त्या कानाला कळू देऊ नका म्हणजे झालं''. बाईचं खरखुरं आश्वासन ऐकून पोरं उत्साहात उड्या मारीत पळाली. चार दिवसात पार्सल आले. रात्री सामसूम झाल्यावर पोरं आली. बाल्या अर्थात पुढे होताच. केबिनच दार बंद करून पार्सल उघडलं. त्यातले गुप्त व्हिडीओ क्रॅमेरे, मायक्रोफोन्स, मोबाईल्स, टेपरेकॉर्डर्स, मोठ्या कात्र्या, सुरुंगाची दारू इ. सामाानाचे वाटप झाले. दोन तीन दिवस या साऱ्या वस्तू वापरण्याचे शिक्षण दिले गेले. पोरांचे ग्रुप्स पाडले. त्यातला एक गु्रप डायरेक्ट अण्णांच्या फार्मवर जाणार होता. डोक्याच्या मुंडाशात, कमरेच्या धोतराच्या कमळात या वस्तू लपवणे शक्य होते. ती पोरं तशी चतुर होती. कितीही झालं तरी फासेपारधी, कातकरी, बेरड, भिल्ल, वंजारी अशा ठकसेनांच्या जातीची, इरसाल.
अण्णांच्या फार्मवर आयतं खाणाऱ्यांचा लाचार गोतावळा बराच होता. तिथे हिकमतीने शिरकाव करणे अवघड नव्हते. पोळयावाली मावशी पाय घसरून पडली. तिचा धाकला भाव बदली आला. माळीबुवा आजारी झाले. पुतण्या कामावर हजर. म्हशीची धार काढणाऱ्या सदूच्या कमरत म्हशीने लाथ घातली. त्याचं पोरगं बसलं धारंला.
गटारी आवसेला अण्णानं जंगी पार्टी दिली. ``मान्लं अन्ना तुमास्नी. एका झटक्यात टाकली की रेंजरबाई खिस्यात'' ``आप्ल्या अन्नाच्या भारी नजरान्यानं गेलं की तिचं डोळं दिपून.'' अण्णा खरंच खूष झाला होता. ``व्हय रे गड्यानु, आपल्याला कोन्तीच आडकाठी रायली नाई आता पर रंभाजीराव, आसं निस्त खात प्येत बसून ऱ्हाऊ नगा, आपल्या आरडरी पुऱ्या करायला
लागा. ढिगानं पैका वता पर कसूर करू नका, समाजल नव्हं''.
हळू हळू पोरांनी बस्तान बसवलं. क्रॅमेरे बेमालूम बसवले. मायक्रोफोन्स लावून टाकले. मोबाईल्सचा मात्र एकदम मर्यादित वापर गोठ्यात किंवा मध्यरात्री गच्चीवर फक्त कॉन्टॅक्टसाठीच, रानातले ग्रुप्सही कामाला लागले. संधी मिळताच सुरुंग पेरणे, मोटारी पंक्चर करणे, सापळे निकामी करणे, जाळया कापणे, बिनबोभाट सुरू होते.
अण्णा आराम करीत असले की कार्यकर्ते तक्रारी घेऊन यायचे ``आजकाल मोट्नी नेमी पंक्चर हुत्यात बगा, अन्ना'' ``आज जाळंच कापल्यालं कुणीतरी, पकडलेलं वाघरू निसटलं'' ``आन् भुताटकी वाणी रानात कुटंबी सफोट फुटत्यात. आमी करावं तरी काय?'' इथंही पेरलेली गँग बसलेली असायची, दिशाभूल करायला. लगेच तत्परतेने उठून अण्णाचे पाय चेपणं, फळं कापून देणं, चालू करीत. ``अरे मव्हान्या, रानात कमी हैत का काटंकुटं, मोट्नी पंक्चर व्हनारच, तुमी बगून मोटरी हाना की, आम्च्या आन्नाला कामून ताप देता''. ``आनि रंभाजीभाऊ, जालं जुनं आसतं एकांद, कुटबी अडकून फाटलं तर कारागीराकडं जाऊन शिऊन घ्याचं, इथं आन्ना शिवतील व्हय रं?'' ``हे बगा पतंगराव, रानातली बिळं रिकामी झाली की तेच्यात पानी माती दबून दबूत बसती आनं त्याचात चाकं घुसली की बक्कन वर येतं समदं, आवाज करून, त्यो काय सफोट असुत्या व्हय, काय राव तुमी ?''
पोरांनी आसं परस्पर निस्तरल्यावर अण्णा कशाला डोक्याला नस्ता ताप घेतील. ते आपले निवांत घोरू लागत.
पण या साऱ्या अडथळयातूनही अण्णांची सैतानी गँग प्राणी पकडून आणतच होती. नुकती व्यालेली हरिण बेसावध पाहून घातली गोळी. शिजवली मेजवानीला. चिमणं पाडससुद्धा सोडला नाही राक्षसांनी. पोरांच्या कात्र्यातून सुटलेल्या जाळयात सापडला एक जंगलचा दिमाखदार राजा. बिचारा लाचार होऊन तडफडला. डोळयांदेखत त्याची वाघनखं, दात उपटले गेले, कातडी सोलली गेली. सैतानांना लॉटरी लागली पण या रानच्या पोरांचे, बाल्याचे, सीमाचे काळीज पिळवटून निघाले. पोळून गेले.
एके दिवशी सीमाला पोरांनी, बडी पार्टी येणार असल्याची बातमी दिली. तारीख निश्चित झाली. पोरांनी टेप, क्रॅमेरे सज्ज केले. सीमाने डी.एस.पी. साहेबांना फोन लावला. सारी सिद्धता झाली. पाहाता पाहाता अलिशान कार्सचा तोफा फार्मवर येऊन ठेपला. बडी, बडी, टाय, सूट, गॉगलधारी मंडळी गालीचा तुडवत स्थानापन्न झाली. किंमती मद्याचा आस्वाद घेत बडे साहेब बोबड्या आवाजात बोलले. ``इस बार जिंदे जानवर बहुत कम है, क्युं अन्नासाब?'' ``बारिश नाही न साब, सुका पडेला है, चारापानीच नाही तो जानवर येतीलच कोठून'' अण्णाची धेडगुजरी हिंदी भाषा चालू झाली ``तुम बहाने बहुत बनाते हो, पैसा पूरापूरा लेकर भी काम मे कचराई करते, अब ऐसा नही चलेगा, क्या?''
``नही साब, ऐसे नाराज नही होना, जानवर कम पन नाखून चरबी, हिरनोंकी, बाघोंकी खाले, हात्ती के दात बहुत है ना'' सारा माल व्हॅन मध्ये लादला गेला. नोटांनी भरलेल्या ब्रीफकेसेस अण्णांना देऊन, जंगलचा खजिना घेऊन मंडळी निघणार तोच... आजूबाजूच्या दाट झाडीत लपून बसलेले शिपाई, इन्स्पेक्टर्स मशिनगन रोखत पुढे झाले. सशस्त्र घेराव पडला. क्रॅमेरात, टेपरेकॉर्डर्स मध्ये सारे पुरावे, बोलणी धडधडीत स्पष्ट चित्रीत झालेच होते.
अण्णा भांदरगे व सैतानी गँगला बेड्या पडल्या. समोर ऐटबाज युनिफॉर्ममधली निर्भय रेंजर ऑफिसर सीमा गालातल्या गालात हसत उभी ठाकली.
``काय आण्णा, आज बोलती एकदम बंद, का बरं ?'' आण्णा जागच्या जागी उसळला, तरफडला, ... पण.... त्या कोना चानक्याचीं बहीन म्हनायची की काय हिला. इकडे सीमा, बाल्या अन् पोरांचा जल्लोष चालू झाला. चोरमंडळींची तुरुंगात रवानगी करून खुद्द डी.एस.पी. धनंजय देशपांडे सीमाचं कौतुक करण्यासाठी थांबले होते. त्यांचे असिस्टंट ए.सी.पी. मि. वैभव देसाई यांच्या हातापायाला या झटापटीत जखमा झाल्याने, मलमपट्टी करून त्यांना आत झोपवले होते.
``मिस सीमा, नोकरीच्या सुरुवातीलाच एवढं मोठं यश, म्हणजे खरंच कमाल आहे. आय अॅम प्राऊड ऑफ यू. आणि तुमचे वॉचमन मि. बाल्या आणि रानची गँग यांचंही कर्तृत्व उत्तुंग आहे. सरकार त्यांनाही मोठं बक्षिस देणार आहे.''
यावर पुन्हा एकदा जल्लोष उसळला.
``चला निघतो आम्ही, ते वैभव देसाई तिकडे येतीलच एक दोन दिवसात, बाय, अगं, तो भामटा अण्णा म्हणत होता की त्याने म्हणे बरीच मोठी रक्कम .. पण छे, माझा मुळीच विश्वास बसला नाही त्याच्यावर, कितीही केलं तरी हलकट, भामटा तो. एनी वे...गुडलक अँड गुडबाय'' पोलिसांच्या गाड्या दिसेनाशा झाल्या.
एवढ्या मोठ्या साहेबांनी शाबासकी दिल्याने पोरं नाचत घराकडे परतली. उरले सीमा आणि बाल्या. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. हळूच हसून. पण दुसऱ्या क्षणी सीमाचा चेहरा उतरला. गंभीर झाला. ``पोरी अजाबात खंत करायची नाई, त्येचा पैका तेलाच जेलात डांबण्यासाठी वापरला, आपून सोतासाठी न्हाई ना ठिवला मंग जालं तर ह्ये बग, आता दोन घटका इसावा घे. लय राबलीस''.
मनकवड्या बाल्याचं हे बोलणं ऐकून सीमांच मन भरून आलं. दुसरे दिवशी वैभव देसाईसाहेब उठले. त्यांचं औषधपाणी, खाणं, पिणं एक कर्तव्य म्हणून सहजपणे सीमा पाहात होती. पण देखणा, तरणाबांड गडी, चक्क प्रेमातच पडला या निर्भय पोरीच्या.
एक दोन दिवसांत तो जाण्याइतपत बरा झाला. जेवणं आटोपून दोघं कॉफी घेत होती. आजूबाजूचं रमणीय वातावरण, एकांत, थंडगार वाऱ्यावर येणारा मृद्गंध अन् समोर ... सुंदर सीमा त्याला राहावेना. ``मॅडम सीमा, निघण्यापूर्वी मला काही
सर.'' ``सीमा... सीमा, कसं सांगू, वुईल यू अॅक्सॅप्ट मी, प्लीज ?'' हे ऐकलं मात्र चित्त्यासारखी गर्रकन वळली ती. ``यू आर क्रॉसिंग द लिमिट, नाऊ लिसन टू मी फेअरफुली, आय विल नॉट मॅरी यू, नो, नेव्हर, अँड प्लीज, बाय बाय फॉर एव्हर.'' जखमी वाघिणीसारखी झेपावत ती केबिनमध्ये शिरली. खाडकन दार बंद झाले. वैभवसाहेबांना निरोप देऊन बाल्या परत आला. सीमा नेहमीप्रमाणे बोलू लागली पण बाल्याला घुमा पाहून म्हणाली ``आता काय बिघडलं, बाबा?'' ``पोरी, तू त्या वैभव सायबाना कां तोडलंस ? कुटवर एकलं ऱ्हानार?'' ``हे पहा बाल्या, मला त्या भलत्या भानगडीत नाही पडायचं लग्नाच्या. अरे, मला माझ्या आईला थोडं तरी सुख द्यायचय. फार खस्ता खाल्ल्यात रे तिनं. आणि या रानाची खूप खूप सेवा करायचीय. अन् हे बघ, आता माझी आई येणार आहे. इथं, कळलं.'' ``आब्बा ! आयसाब येनार, किती ग्वाड बातमी हाय ही, चला बाबा, लय कामं पडल्याती''. बाल्या मोठ्या उत्साहाने कामाला लागला. सीमा तर लहान मुलाप्रमाणे अधीर झाली.
अखेर....अखेर....आली एकदाची आई... त्या मायलेकीची दृढ मिठी पडली तेंव्हा बाल्यासह सारेच गहिवरले. लगेच भानावर येऊन कामाला लागले.
कुणी ताजे विहिरीचे पाणी आणले. दुसऱ्याने गरमागरम चहा आणला, कुणी सामान नीट लावले तर एकाने बिछाना तयार करून स्वच्छ चादर अंथरली.
इकडे ऑफिसमध्ये फोनवर रुबाबात संभाषण चालले होते रेंजरबाइंर्चे. नंतर हाताखालच्या लोकांना ऐटीत रोजची कामे नेमून दिली. पुढे आलेल्या कागदपत्रावर लफ्फेदार सह्या ठोकल्या. पूर्वी याच पोरीनं खूप सोसलंय. बाप लवकर गेला, आई सतत चार पैसे मिळवण्याच्या घाईत. अडचणीला नातेवाईक सावधपणे दूर राहिले. आईची वणवण हालअपेष्टा पाहून पोर सतत खंतावलेली. रात्रीचा दिवस करून अभ्यास. आईला जमेल ती मदत, जिद्द पणाला लावली अन् एम.पी.एस.सी. पास झाली. प्रावीण्यासह. पण पुन्हा नोकरी मिळवण्यासाठी अग्निदिव्य, पायपीट, हालअपेष्टा. पण सारं सहन करून लेकरानं हे मोठं मानाचं पद मिळवलंच अखेरीला. आणि आज...आज... त्याच माझ्या लेकीचा हा रुबाब, मान, पान, थाट, पाहून डोळे निवले हो माझे. खरंच निवले. आई मनात सुखावत होती.
आयतं वाफेचं ताट समोर आलं अन् खाता खाताच् डोळें गपागपा मिटायला लागले. सुखाची पण सवय असावी लागते ना.
बऱ्याच दिवसांनी मिळालेल्या सुखाच्या गाढ झोपेनंतर पहाटे जेंव्हा जाग आली. अन् `अगंआई, किती हा उशीर' म्हणून आईने लगबगीने रोजच्या कष्टाच्या सवयीने पदर खोचला पण... पाठोपाठ जाग्या झालेल्या लेकीने तो पदर खट्याळपणे पुन्हा सोडला... आईच्या उबदार अंगाशी डोकं घुसळून लेक लाडिकपणे म्हणाली, ``ए आई, अगं आता सकाळी उठून कामाला जुंपणं संपलं बरं का, आता आपण मस्त चहा घेऊन फिरायला जाऊ या हं!'' चहा घेतला. पांढरा शुभ्र गाऊन, मोकळे केस सोडलेली सीमा, निळसर साडी नेसलेली आई. दोघींची जोडी खळखळून हसत हातात हात अडकवून फिरायला निघाली.
पहाटेपूर्वीचा मंद राखी रंगाचा उजेड त्या गच्च रानातल्या उंचच उंच वृक्षरांगांतून झिरपत होता. पायतळी पानांचा दाट गालिचा अंथरला होता. प्राण्यांची लगबग, खारींची धावपळ, पक्ष्यांची किलबिल असा मजेदार कोल्हाळ उठलेला. या साऱ्यांना लपेटणारा तो ओलसर रानगंध या दोघींनाही वेढून घेत होता. या साऱ्यांचा निवांत आस्वाद घेत ती मायलेकीची जोडी अबोलपणे चालत राहिली. झरा उसळून साचलेल्या जलाशयाकाठी झाडी गर्द झाली होती. त्यातून वाट काढत त्या निळसर जलाशयाच्या काठी आल्या व पाय अलगद पाण्यात बुडवले. तशी एक अनामिक चैतन्यमयी शिरशिरी अंगावर थरारली. रेंजर ऑफिसर सीमा वाकून पाणी उडवीत तुषारांशी खेळत बसली. पाहाता पाहाता सूर्योदय झाला. अन् जादूची कांडी फिरल्याप्रमाणे सारा आसंमत भरजरी, सोनेरी, गुलाबी प्रकाशाने न्हाऊन निघाला. जलाशया वरील लहान लहान लाटा हिरेमाणकाप्रमाणे लखलखू लागल्या. ते अनुपम निसर्गवैभव पाहून दोघींचेही भान हरपले.
``चल आई, तयार नाश्ता आपली वाट पाहात असेल.'' वापस येऊन नाश्ता करता करताच फोन वाजला. सीमाने कर्तव्यदक्षतेने चटकन फोन उचलला. ``येस सर...मी सारं काही नीट चेक केलं होतं... हो कां ?... बरं मी निघतेच पंधरा मिनिटात''.
``आई, मी सिटी ऑफिसला जाऊन येते. परवाच्या धाडीत काही महत्त्वाच्या पेपर्सवर सह्या करायच्या राहून गेल्यात. ते काम करून लगेच येते. आणि हे बघ. आता माझी काळजी करत बसू नकोस. आराम कर'' शिपायाने इकडे तोवर गॅरेजमधून जीप काढली. ``महादू, तू इकडंच थांब, इथं सेक्युरिटीची जास्त गरज आहे, मी एकटीच जाऊन लगेच येणार आहे.''
महादू काही म्हणणार पण त्या आधीच सीमाने जीप वळवूनही घेतली. रस्त्याला लागताच सहजतेने लीलया तिने जीपचा वेग वाढवला. फॉरेस्ट ऑफिसच्या वस्तीवरून शहर फारसे दूर नव्हते पण हमरस्ता येईपर्यंत दुतर्फा दाट झाडीचा सुनसान कच्चा रोड बराच मोठा होता. आरशातून तिने मागे पाहिले. चिटपाखरूही नव्हतं. निवांत ड्नयव्हिंग हा तर तिचा विक पाँईट होता.
एकदम ... समोर एक व्यक्ती आडवी आली. बहुतेक लिफ्ट हवी असणार, तिने जवळ जाऊन ब्रेक दाबला व खिडकीतून डोके बाहेर काढले. ``मॅडम, मला फार जरुरीच्या कामासाठी शहरात जायचंय. अचानक बाईक बंद पडली नायतर आपन कंदीच कुणाला तरास न्हाई देत.'' बाजूला बाईक उभी होती खरी. काळा, मजबूत गडी पण सभ्य वाटत होता. ``ठीक आहे चला''.
सीमाची अपेक्षा होती. तो मागे बसेल, पण तो इतक्या चटकन बाजूचे दार उघडून शेजारी बसला की ती काहीच बोलू शकली नाही. मुकाट्याने तिने गाडी सुरू केली. ``अवं, म्या
रंभाजीराव, आन्नाच्या फार्मवर सुपरवायजर म्हणून व्हतो. पन आन्ना जेलात गेला आन् आमी सोताच्या शेतीकडे वळलो.'' तरीच याला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटत होत खरं. सीमा डोळयांच्या कोपऱ्यातून त्याला अजमावत होती. एकाकी तो जवळ सरकला अन् उग्र सेंटच्या भपकाऱ्याने सीमाला घृणा आली. ``ओ मिस्टर, बिहेब युवर सेल्फ, कळलं'' पण तो उलट अजून जवळ सरकला. ठरवून तयारीनेच आला होता हा रंभाजी. अण्णाला जेलात टाकणारी. आमचा धुव्वा उडवणारी ही हापिसर बया डोळयांत सलत होती कवाची. त्यात पुन्ना चांगली रूपवान आन् तरणी, जमलं तर मज्जा करून घेयाची.. आन मंग...पत्ता कट. सीमा जळजळीत नजरेने पाहात होती. ``अरे वा ! ह्यो राग, संताप भारी सोभतोय की. एवडं छान दिसल्यावर आमी दूर कसं जाणार? उलट जवळ येणार येणार हे अस्सं,'' आता रंभाजी थेट खेटला तिला. ``रंभाजीराव, मी पुन्हा एकदा वॉर्निंग देतेय तुम्हांला. आधी दूर व्हा.'' ``आता दूर बीर काय न्हाई, आता जवळ जवळ, ते बी आस्स,'' असं लागट बोलत त्याने तिच्या स्टियरिंगवरील हातावर एक हात दाबला अन् दुसरा हात तिच्या कमरेवर घेतला. सीमाने झटकन् गाडी कडेला उभी केली. बाजूला शेतात पुरुषभर हिरवगार पीक डोलत होतं. छान आयताच आडोसा. धुंदावला रंभाजी, बेभानपणे त्याने दुसराही हात तिच्या कमरेभोवती टाकला. ``आता मस्त मोठ्ठी गंमत....'' रंभाजीच्या तोंडून गंमत हा शब्द पुरता निघण्याच्या आधीच तो एकाएकी, कसा कोण जाणे, धडामकन कोलांटी उडी घेऊन जीपच्या दुसऱ्या दारातून सरळ बाहेर फेकला गेला. पाठोपाठ चवताळलेली सीमा उडी घेऊनच पोचली. तो सांड उठून सावरायच्या आतच त्याच्या पायावर, पाठीपोटावर दणादण दणके बसले. बहुतेक काही हाडं तुटली असावीत... कारण त्याला उठताच येईना. त्याचं गाठोडं तसंच रस्त्याच्या कडेला विव्हळत ठेवून सीमा जीपकडे आली. तिने हात झटकले. बऱ्याच दिवसापासूनची तिची राहिलेली कराटेची प्रॅक्टिस आज होऊन गेली होती.
काहीच न घडल्याप्रमाण ेती शहरात ऑफिसला पोचली बॉसशी अदबीने बोलून चर्चा केली. कागदपत्रे नीट वाचून, ताडून पाहून सह्या केल्या व लगेच परत फिरली. रेंजर ऑफिसला तिच्या हातून घडलेल्या पराक्रमांची हकिकत येऊन पोचली होती. एका शेतातल्या राखणदाराकरवी. आईचा, बाल्याचाही ऊर अभिमानाने भरून आला होता. ``आयसाब, पैलं पोरीची दिठ काढून टाका बेगीनं.'' आकाश ठेंगणं झालेेल्या त्या माउलीनं दारात पाऊल ठेवलेल्या लेकीवरून लगोलाग मीठमोहऱ्या उतरवून टाकल्या. सारेच जण आनंदात होते पण... अधमाला पाणी पाजणारी सीमा.... स्वत: मात्र गंभीर होती. आईला कारण कळेना ``आई, मी त्या पाप्याला शिक्षा केली खरी, पण त्यानं माझ्या अंगावर हात टाकण्याची हिंमत केलीच कशी? मी एवढी थिल्लर आहे कां ग?'' ``छे गं सोन्या, तू तर समईच्या ज्योतीसारखी मंगल, पवित्र आहेस. आता पतंग, किडे आकर्षित होतातचं पण... त्या क्षुद्र गोष्टींचं मनाला एवढं लावून घेऊ नकोस, चल बरं जेवायला. मी पण थांबलेय.'' ``आई, अजून थांबलीस.'' छे! छे ! काही बरोबर नाही. आता सगळं सुरळीत झालय. उगीच नसत्या चिंता, खंत करून आईला मन:स्ताप देणे ठीक नाही. आता तिला आनंदात ठेवायंच व आपणही आनंदी राहायचं.
मंगळवारी बाजारचा दिवस उजाडला. ``आई, आपण शहरात जाऊ या आज, चल तयार हो चटकन,'' ``पण सीमे, आपलं जेवण, नाश्ता ?'' `` ते करू बाहेरच.'' लेकीचं ड्नयव्हिंगच कसब पाहात आई सीटवर रेलली, निळया काचेतून बाहेरची धावती दुनिया जादुई वाटत होती. आरशातून आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून सीमा कृतार्थ होत होती. एका संुंदर रेस्टॉरंट समोर गाडी थांबली. खमंग दोसा, खुसखुशीत वडा व कॉफीचा नाश्ता करून शॉपिंगला निघाल्या. आईसाठी मऊ मुलायम साड्या, आरामदायी चपला, स्वत:साठी साधे दिसणारे पण किंमती ड्न्ेसेस घेऊन आईच्या हाती भरलेली पर्स देऊन सीमाने तिला मोठ्या शॉपिंग मॉल मध्ये नेले. सुवासिक तांदूळ, साजूक तूप, सुके मेवे, हरतऱ्हेचे मसाले, फळे, ताज्या भाज्या, मनसोक्त खरेदी करून सहजपणे कोऱ्या नोटा दुकादाराला देताना आई खरेच सुखावली होती. जन्माची काटकसर आता संपली होती. चांगलंस जेवण घेऊन परतताना वाटेत गाडी थांबवून सीमाने मँगो आईस्क्रीमचा फॅमिली पॅक व क्रॅडबरीच्या लाद्या घेतल्या. ``सीमे, किती हा वायफळ खर्च'' न राहवून आई म्हणालीच. ``वायफळ मुळीच नाही. तुझ्या कर्तबगारीवर मिळवलेला हक्क आहे हा'' मायलेकींना खूष पाहून स्वामिभक्त बाल्याही खूष झाला. पण अजून एका कारणानेही तो आनंदित झाला होता. समोर एक प्रवासी बॅग, जेन्टस शूज दिसत होते. सीमाने पाहिले तो.... इन्स्पेक्टर वैभव देसाई.... आरामात बसून चहा पीत होता. त्याला तसा पाहून सीमा आश्चर्यचकित झालीच पण नकळत संतापलीही. तिला पाहाताच तो उभा राहिला.
``जरा ऑफिेशयल काम होतं. हेडपर्टरच्या ऑर्डरप्रमाणे... त्यासाठी'' ``ठीक आहे'' सीमा चटकन आत गेली. हेडपर्टरकडून कुणीही अधिकारी येऊ शकत होता. इथल्या ऑफिसच्या इमारतीत बऱ्याच रूम्स होत्या. तशी थांबायची व्यवस्थाही होती. `लेट हिम डू हिज वर्क, दॅट इज नन ऑफ माय बिजनेस' काही वेळाने ती बाहेर आली. पाहाते तो... आई व तो मजेत गप्पा मारत बसले होते. हसत हसत. न बोलताच ती केबिनमध्ये जाऊन कामाला लागली. काही वेळाने वैभव जॉईन झाला. दोघांनी ऑफिसचे काम केले, रात्री नेमलेल्या साईटची पाहाणी करून तो सकाळी वापस जाणार होता.
मॅनर्स म्हणून सकाळी ती चहाला थांबली आई, ती व तो तिघांनी चहापान केले. आई रोजच्या गोळया घेण्यासाठी आत गेली. ``मॅडम, आईचा स्वभाव किती प्रेमळ आहे नाही ?'' ``खरंच, केवळ माझ्यावरच नाही तर इथल्या सर्वांवर माझी आई तेवढंच प्रेम करते. प्राण्यांवर, नोकरचाकरांवर...'' ``हो ना, हेच पहा ना, मी ओळखीचा ना पाळखीचा पण किती अगत्याने त्यांनी माझी विचारपूस केली.'' संभाषण सुरळीत चालल्याने
वैभवच्या आशा पालवल्या. त्यात पुन्हा ती रम्य पहाटवेळ, पक्ष्यांचा किलबिलाट, रानफुलांचा धुंद गंध, पानांची सळसळ अन् अनावर गार गार वायुलहरी. ही समोर बसलेली मोहक यौवना कितीही कर्तबगार असली तरी तिलाही जोडीदाराची गरज असेलच. नव्हे असणारच तेव्हा....चला अस्मादिक करा एकदा पुन्हा प्रयत्न. ``मॅडम, तुम्ही तुम्ही... विचार केलात कां ?'' ``कसला?'' सीमाला अंदाज आला होताचं. ``हाच, की ते ... आपलं.... माझ्या प्रमोजलचा'' सांगून टाकलं त्यानं ``मी तेव्हाच स्पष्ट उत्तर दिलं आहे'' ती ठामपण म्हणाली ``पण सीमा.... मी.... खरंच ... माझं....खरंच तुझ्यावर प्रेम आहे. ...स्वीकार ते, .... नाही म्हणू नकोस'' यावर सीमा शांतपणे उठली, उभी राहिली ``ते या जन्मी शक्य नाही. आजवर मी तुम्हा पुरुषांचा जो अनुभव घेतलाय तो पुरेसा आहे. लहानपणी आई बाहेर असताना शेजारच्या जर्जर म्हाताऱ्या आजोबांनी केलेली किळसवाणी लगट, शाळेत ड्नीलमास्तरांचा घाणेरडा स्पर्श, कॉलेजमधल्या श्रीमंत मवाली पोरांचे भ्रष्ट हेतू, दूरच्या काकामामांच्या लोभी नजरा. स्पर्धा परीक्षेत यश मिळवूनही... ओरलमध्ये... प्रत्यक्ष नेमणूक होइपर्यंत केलेल्या अप्रत्यक्ष अनैतिक मागण्या. या साऱ्या साऱ्या अग्निपरीक्षांतून सुखरूपपणे बाहेर पडताना मी पोळून गेलेय. खूप खूप चटके बसलेत. आत्ता कुठे जरा विसावते आहे... तो...तुम्ही....मानगुटीवर'' ``पण साऱ्यांना एकाच तराजूत तोलणं बरोबर आहे कां ? या जगात वाईटाबरोबर चांगले पुरुषही असतात. आहेतच ना.'' ``पण मला विषाची परीक्षा पाहायचीच नाही'' ``प्लीज, मला एकच संधी द्याल?... मी ...'' वैभवचा तो चिकटपणा, चिकाटी पाहून सीमाचा उरलासुरला संयम संपला. ती फूत्कारली, डोळयांतून ठिणग्याच उडाल्या जणू. ``मी लग्न करणार नाही, ही काळया दगडावरची रेघ आहे. लग्न म्हणजे सर्वस्व नव्हे. तो जीवनाचा एक छोटा सुखाचा भाग आहे. पण त्या छोट्याशा सुखासाठी मी इतर अनेक सुखाच्या वाटा बंद करणार नाही. माझ्यासाठीच जगलेेल्या माझ्या आईची उतारवयातील देखभाल. जरी नवरा ती करू देईल पण उपकार म्हणून तेच नकोय मला. माझ्या आयुष्याचं चाक माझ्याच या समर्थ हातात ठेवणार आहे मी. मला हवं तसं जगणार आहे, त्यासाठी मी एक छोटीशी किंमत मोजलीय, कोणती ? ती ऐकण्याची आहे हिंमत?'' वैभवने हताशपणे तिच्याकडे पाहिले. ``मीही एक माणूसच आहे. मलाही कधीकाळी मोह होईल, अन् त्या मोहामुळे मी माझं हे अनमोल स्वातंत्र्य, अथक प्रयत्नाने मिळवलेलं हे अत्यंत आवडतं करियर, हे आईचं संगतसुख, गमावणार नाही. हे सारं सारं मोलाचं, त्या एका मोहापायी...लग्नापायी घालवून बसू नये म्हणून मी..... मी... माझं एक ऑपरेशन करून घेतलंय.... नाही .... केवळ फॅमिली प्लॅनिंगचं नव्हे ... तर माझं युटेरसच रिमूव्ह करून टाकलंय मी... या इथे, या सन्मानाच्या पोस्टवर जॉईन होण्यापूर्वीच.''
एवढं बोलून सीमा बिजलीसारखी आत अंतर्धान पावली आणि इन्स्पेक्टर वैभव हळूहळू परतीच्या वाटेला लागला. तेवढंच आणि फक्त तेच होतं त्याच्या हातात.
संजीवनी रत्नाकर मंडलिक, पुणे.

xwxMfioSMhE

buy klonopin online without - cheap klonopin

ywoowVePqjKYLQXzdQz

xanax buy online australia - buy cheap xanax us

OVYmInaYJZqqkN

buy zolpidem - where to buy ambien online

DYtXZcQbWeCYQPDt

order klonopin drug - online cheap buy klonopin

TcoRZybGOPsGXWyNg

buy xanax no prescription online - xanax online pharmacy no prescription

WgbnNqfGBve

online pharmacy no prescription - buy ambien online overnight

JnkKtEcGmnCWiL

tbcojh aiubxounqrsb, [url=http://hyfcfclzjhrx.com/]hyfcfclzjhrx[/url], [link=http://qmetdgimzdpm.com/]qmetdgimzdpm[/link], http://upihyhfzczqg.com/

eSJlgExVbLyfHKTTQe

Buy klonopin online usa - buy cheap klonopin

wVxZNcQvZL

Buy ambien uk - ambien online pharmacy

GufvHGIAZXic

Cheap canadian ambien - Buy cheap ambien usa

fCjdMNaRiOcQGtVnF

discount tramadol - buy tramadol overnight

VkhtVFmpTNaq

buy cheap tramadol - tramadol online pharmacy

oUPAXcQSDZLna

BNmplZioeZSxUptantD

buy cheap ambien - ambien cheap

gBEQeQjljUuS

klonopin to buy - Cheap klonopin usa

srETsBQqpfwMiPu

Cheap valium usa - generic valium online

SkbqIpYzhEDPtaNOkkU

valium buy online - Discount valium online

xfSjDdHtcasnSQk

tramadol buy online - buy tramadol cod

vMlNKNWzPvBpBzdD

buy tramadol online overnight - cheap tramadol online

csVWzirXfNZdLzJ

klonopin online pharmacy - Cheap canadian klonopin

sUzXYEadxBw

cheap valium online - Buy valium online wthout prescription

mthpdLeRUjtYi

valium drug - valium discount

wHuzdoBdaBrl

ambien no prescriptions - purchase ambien

bCEiGBWfdAvo

tramadol cheap - discount tramadol

PzwgVBeFFvQGEMIjis

buy discount tramadol - tramadol no prescription

tsvYyTAOIlinbjW

tramadol cheap - tramadol online 100 mg

yqdZiHraVH

online tramadol - buy tramadol online cod

WjcylQlkvEYZOgEQnx

buy ambien online - ambien online

iBCELEjLCmYXfAP

xanax discount - Cheap xanax pills

nhWHRHuQdJe

tramadol overnight - buy tramadol cod

ilwHhcXoLX

valium online - valium price

kCEjnPflTiTHTqJmW

order tramadol - cheap tramadol online

MbvJNdUyDadDvs

valium no prescription - valium price

knGRLEJtCWwLGeCFslx

Buy ambien uk - ambien buy

ibMJsdshrMbs

Canadian generic xanax - Best xanax price

ckwkYPFNYCOAs

tramadol without prescription - tramadol no prescription

pXVsKHpLXp

ambien online canada - ambien discount

rMUYQoDJsmIEsjOdzGO

Low price valium - purchase valium

epSwMVkTONBaEwynvzI

valium online order - Cost valium online

IXJhVwHmrFBDaPLx

Buy cheap valium usa - order valium

wOhfOqQRGgMJwz

valium online - valium online pharmacy

AEkXechraJhlGVKIblM

valium doses - valium abuse

LxxehtsQIvgh

valium lowest price - Cheap canadian valium

FbxLwzWvxGRAkoWvx

Canadian generic xanax - Cheap xanax usa

OueDxsgmZnGrpz

valium cod guaranteed - buy valium 10 mg

jJIPeqLXsLALtPnfo

where to buy valium online uk - valium online pharmacy

HFeukxEotKxRoFeAgyX

order valium online - valium lowest price

viagra

axkxdstk http://fpzvhu.com/ iwrpvxc [url=http://lerarb.com/]iwrpvxc[/url]

AWAKlazcoMSNdrWylmI

valium lowest price - Cheap valium usa

FCuehjCTpVvCnmOjBge

Discount xanax online - Generic xanax