Skip to main content

नारी समता मंच

नारी समता मंच - रौप्यमहोत्सवी वाटचाल ---

सस्नेह नमस्कार,

आपण नारी समता मंचचे हितचिंतक आहात याचा आम्हाला आनंद व अभिमान वाटतो.२००६-०७ हे मंचाचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे.यानिमित्त काही विशेष कार्यक्रम घेण्याचे योजत आहोत,त्यासाठी आपले आर्थिक सहकार्य मिळाल्यास बहुमोल मदत होऊन कार्यक्रम यशस्वी होण्यास मदत होईल असं आम्हाला वाटतं.आपल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मंचाच्या पंचवीस वर्षाच्या वाटचालीविषयी अगदी थोडक्यात...

१९७५ हे वर्ष आंतरराष्टीय महिला वर्ष म्हणून युनोनं घोषित केलं आणि पुढं १९७५ ते १९८४ हे आंतरराष्टीय महिला दशक म्हणून घोषित केलं गेलं.त्यासुमारास हळूहळू महिला सार्वजनिक क्षेत्रात जास्त जास्त प्रमाणात दिसायला लागल्या.स्त्रियांवरील अन्याय अत्याचाराला वाचा फोडणं व तो दूर करण्यासाठी प्रयत्न करणं वगैरे विषय चर्चेत असले की सहसा या सर्वांची झोपडपट्टीत, खेड्यापाड्यात जरूर आहे असा मध्यमवर्गीय व उच्च्भ्रू समाजात सूर असायचा.मात्र पुणे शहरात १९८२ साली मंजुश्री सारडा आणि शैला लाटकर या उच्चिशक्षित,मध्यमवर्गीय घरातील स्त्रियांचा त्यांच्या पतीकडून अमानुष हत्या झाल्या आणि समाज मनातून हादरला.मध्यम आणि अतिउच्चभ्रू वर्गात स्त्रिया आपल्या घरात सुरक्षित आणि सुखात आहेत या मिथकाला या हत्याकांडामुळे जोरदार धक्का बसला.तसचं जगभर जात-धर्म-वंश-वर्ग-प्रदेशातील पातळयांवर स्त्रियांवर अन्याय अत्याचार होत आहेत हे कटु वास्तव पाश्चिमात्य आणि इतरही देशात चालू असलेल्या स्त्री चळवळींनी समोर आणलं होतं.

मंजुश्री सारडाच्या खुनानंतर 'मी एक मंजुश्री ' हे प्रदर्शन पुणे शहरात अनेक ठिकाणी आणि महाराष्टातील इतरही शहर गावांमध्ये दाखवून लोकांना बोलतं करण्याचा प्रयत्न नारी समता मंचनी केला.यानिमित्ताने स्त्रियांवरील अन्याय अत्याचाराविरूध्द आवाज उठवणं गरजेचं आहे हा संदेश विशेषत: .मध्यम आणि उच्च् वर्गात पोहोचवण्याचा प्रयत्न झाला.पत्रकार विद्या बाळ, डॉ.सत्यरंजन साठे,डॉ.निलम गोऱ्हे, आनंद करंदीकर,प्रा.नरेश व साधना दधिच,प्रा गीताली वि.मं. वगैरे मंडळी १९८२ पूर्वीपासून अनौपचारिकपणे आठवड्यातून एकदा एकत्र येऊन स्त्री प्रश्नावर चर्चा करत असत.मंजुश्री सारडा खुनानंतर नारी समता मंचच्या कामाला एक दिशा आणि गती मिळाली.मंजुश्री सारडा खून प्रकरणाच्या निकालाविरूध्द मंचानी review petition दाखल केले त्यासाठी रस्त्यावर उभं राहून सुमारे २०००० लोकांच्या सह्या गोळा केल्या.यासुमारास भारतातील इतर शहरातही हुंडाबळी विरोधात निदर्शने/मोर्चे निघत होते.माध्यमंपण या प्रश्नाला चांगली प्रसिध्दी देत होते.हुंडाबळी,बायकोला /सुनेला जाळून मारणं हा हिंसाचाराचा प्रकार एकमेवपणे भारतात आणि त्यातही हिंदु स्त्रियांना अनुभवावा लागतो असं राष्टीय व आंतरराष्टीय पातळीवर मानलं गेलं हे इथं खेदानं नमूद करावसं वाटतं.

समाजातील स्त्रीच्या दुय्यमस्थानाचा आविष्कार तिच्यावर होणाऱ्या विविध प्रकारच्याअन्याय अत्याचारातून दिसून येतो.स्त्री अनुभवत असलेला वेगवेगळया पातळयांवरील हिंसाचार हे पुरूषप्रधान व्यवस्थेतील सामाजिक अंगच आहे असं वाटण्याइतका तो हिंसाचार सर्रास उघड अथवा छुपेपणानी होतांना दिसतो. म्हणूनच याविरूध्द कृती गरजेची आहे हे उत्तरोत्तर जास्त जाणवत जातं.

नारी समता मंच ही धर्मनिरपेक्ष,लोकशाहीप्रणाली मानणारी स्वायत्त स्त्री संघटना आहे.मंचाचे स्त्री व पुरूष सभासद स्त्री प्रश्नावर एकत्र काम करतात हे वैशिष्ट्य आहे.स्त्रिया आणि परिघावरील व्यक्तिंचा सहभाग नसलेल्या विकासाला मंच नाकारतो.(पुरूषप्रधान व्यवस्थेत हजारो वर्ष स्त्रियांवर अन्याय अत्याचार झाले म्हणून आता स्त्रियंना पुरूषांप्रमाणे खूप अधिकार बहाल करून स्त्रीप्रधान व्यवस्था आणण्याचेमंचाचे स्वप्न नाही.) मंचाला मानवतावादी,धर्मनिरपेक्ष,पर्यावरणप्रेमर्मीर्र्ण्िडीिीध्ु,ढद्धॅमर्ण्ींद्धत्त्ेंकॅ$,त्त्द्धॅर्द्गीिद्धणत्त्ॅद्धेंम शांतताप्रिय निरामय समाजाची आस आहे.आणि त्या दिशेनी मंचाचे काम चालू आहे.

नारी समता मंचच्या कामाचा भर स्त्रियांनी त्यांच्यावर व इतरांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविषयी बोलतं होऊन त्याविरूध्द कृती करण्यावर आहे.म्हणून १९८३ मध्ये बोलत्या व्हा केंद्र सुरू करण्यात आले.त्या केंद्रच्या उदघाटन प्रसंगी खा.मृणाल गोरे म्हणाल्या,र् अन्याय अत्याचार निमूटपणे सोसण्यात मोठेपणा आहे ही स्त्रियांमधील भावना गेली तरच समाज बदलेल.र् पुरूषप्रधान व्यवस्थेतील स्त्री व पुरूषांसाठी असणाऱ्या दुहेरी दुटप्पी मूल्यामध्ये मूलभूत बदल होऱ्याची गरज याप्रसंगी अधोरेखित झाली.मंचाच्या कामाचा पाया स्त्री पुरूष समता या मूल्यांवर आधारितच राहिला.त्याकाळात आठवड्यातील तीन दिवस बोलत्या व्हा केंद्र चालत असे , आठवड्यातून एकदा दर बुधवारी मंचाची सर्वांसाठीखुली असणारी बैठक होत असे.या बैठकीत राजकीय सामाजिक जाणीवा प्रगल्भ होण्याच्या दृष्टीने चर्चा,व्याख्याने आयोजित केली जात. मंचाचे महत्वाचे निर्णयही लोकशाही पध्दतीनं या बैठकीत घेतले जावेत अशी अपेक्षा असे.

मंचाच्या े बोलत्या व्हा केंद्राला उत्तम प्रतिसाद मिळाला.खरेतर बोलत्या व्हा केंद्रात स्त्रियांनी येऊन आपलं मन मोकळ करावं असा मर्यादित हेतु होता.परंतु प्रत्यक्षात अन्यायग्रस्त स्त्रिया जास्त प्रमाणात येत राहिल्या.स्त्रियांच्या दुखा:च्या कहाण्या फक्त ऐकून घेऊन स्वस्थ बसण शक्यच नव्हतं. अन्यायग्रस्त स्त्रियांना कायदेशीर सल्ला खङड ङरु उश्रिश्रशसशच्या लिगल एड सेंटरच्या मदतीनी घ्यायला सुरवात केली.आणि बघता बघता बोलत्या व्हा केंद्राचं रूपांतर स्त्री अत्याचार विरोधी केंद्रात झालं .अॅड.अजित अभ्यंकर ,श्री.नंदू सातवळेकर तेव्हा कायदेशीर सल्ला देत होते.

स्त्री अत्याचार केंद्राबराबरच मंचाचे समाज प्रबोधनाचे कामही हातात हात घालून चालूच होते.पुण्याच्या गणेशात्सवात ि स्त्रयांची छेडछाड केली जाते.या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी गणेशात्सवात इतर संघटनांबरोबर स्त्रियांच्या छेडछाडीविरूध्द पथनाट्य सादर केलं गेलं त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.मुलगा हवाय या मानसिकतेपोटी गर्भजल परीक्षा करत.स्त्री भृणहत्या मोठ्या प्रमाणावर होतात त्या थांबवण्यासाठी गर्भजलचिकित्सा विरोधी मोहिम पथनाट्य व परीसंवाद वगैरे माध्यमातून चाळवळी गेली. पुण्यातील महानगरपालिकांच्या शाळातील पाणी आणि स्वच्छतागृहांच्या सोईविषयीचा अभ्यास करून अहवाल सादर केला.नोकरी करणाऱ्या,लहानमुलं असणाऱ्या स्त्रियांना निशंकपणे काम करता याव म्हणून पाळणाघराची निकड लक्षात घेऊन त्याविषयी सर्वेक्षण केलं.पाळणाघर चालकांची बैठकही आयोजित करण्यात आली.

समाजात एकट्या रहाणाऱ्या स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोण निकोप नाही.अशा स्त्रियांना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागतं.त्यांच्या मनात एकप्रकारचा न्यूनगंडही तयार होतो तो घालवून त्यांचा आत्मसन्मान जागा करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचा एक प्रयत्न म्हणून एकट्यांची परिषद आयोजित केली होती त्याचं नाव मुद्दाम अपराजिता परिषद ठेवलं होतं.एकट्या रहाणाऱ्या स्त्रियांची अनुभवकथन,यानिमित्तानी एकत्र केली.पुढे अपराजितांचे निश्वास हे त्याआत्मकथनाचं पुस्तक,मंचाला बारा वर्ष पूर्ण झाली आणि मिळून साऱ्याजणी मासिकाला पाच वर्ष पूर्ण झाल्यावर आयोजित केलेल्या कुटुंबजीवन परिषदेत प्रसिध्द अभिनेते निळू फूलेंच्या हस्ते प्रकाशित केलं. या पुस्तकाची पहिली आवृत्ती खपून दुसरी आवृत्ती निघाली आहे हे सांगायला आनंद वाटतो.मार्च १९९४ मध्ये कुटुंबवर्षाचं औचित्य साधून ही परिषद आयोजित केली होती.स्त्री चळवळीवर कुटुंब मोडणाऱ्या या पध्दतीचे खोडसाळपणाचे आरोप केले जातात त्यालाही ही परिेषद हे एक ऊत्तर होतं.पुरूषप्रधानता हा पाया असणाऱ्या कुटुंबाऐवजी निकोप मैत्रीपूर्ण उतरंडहीन कुटुंबाचा विचार होण्यावर या परिषदेत भर दिला.वैवाहिक बंधन किंवा रक्ताच्या नात्याने एकत्र आलेला गट म्हणजे कुटुंब ही व्याख्या अधिक समर्पक आहे.असे विचार याप्रसंगी प्रा.कुमुद पोरेंनी मांडले.या परिषदेत कुटुंबांतर्गत लोकशाही, पुरूषांचा घरकाम व मुलांच्या संगोपनात सहभाग, कौटुंबिक कायदे,वृध्दांचे प्रश्न आदी विषयांवर शहरी व ग्रामीण भागातून आलेल्या सुमारे २५०-३०० सहभागींची चर्चा झाली. त्यातून विविध मागण्या पुढे आल्या१९८६ च्या सुमारास पुरूषउवाच हा विषेशांक तरूण असणाऱ्या मुलांचा गट स्थापन झाला.स्त्री पुरूष समतेसाठी पूरक काम करण्याची भूमिका घेऊन स्त्रीमुक्ती म्हणजे मानवमुक्ती असं म्हणणं विशेषत: पुरूषांमध्य ेस्त्री पुरूष समतेचा विचार पोहोचवण्याचा प्रयत्न हा गट करत होता.या गटाबरोबर मंचाचे संबंध सौहार्दपूर्ण होते.चिरंजिवी विकास हा मानवमुक्तीच्या दिशेनी जाणारा असल्यामुळे याविषयी एक शिबीर मंचाची पुरूष उवाच गटाबरोबर घेतलं. यात ज्येष्ठ विचारवंत वसंत पळशीकरांचे बहुमोल मार्गदर्शन लाभलं.स्त्रीप्रश्न आणि पर्यावरणांच नातं खूप जवळच आहे.मंचाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या साधना दधिच यांनी एक वर्ष नर्मदा बचाओ आंदोलनाचं काम पूर्ण वेळ केलं.मंचातील विद्या बाळ,श्रीकृष्ण साने,गीताली,जितेंद्र,मुकुंद व इतर काहीसहकारीही या आंदोलनाशी जोडलेले होते.यामुले विकास कशाला म्हणायचं,त्याची किंंमत कुणी द्यायची वगैरे मूलभूत प्रश्नांवर चर्चा घडवणारे कार्यक्रमही घेतले गेले. कुरूपपणांवरून चिडवल्यामुळे एका तरूणीनी पुण्यात आत्महत्या केली. त्यामुळे सौंदर्यसंकल्पना याविषयी तरूणांची मते जाणून घेण्यासाठी पुरूषउवाच बरोबर मंचाने एक महाविद्यालयीन विद्यार्थात सर्वेक्षण करून नंतर त्यावर एक परिसंवाद आयोजित केला.तसचं सौंदर्यस्पर्धेतील अर्थकारण,समाजकारण,राजकारण एका परिसंवादाद्वारेलोकांसमोर मांडले यात रा.प.नेनेंचे बहुमोल मार्गदर्शन झाले.

सेवाभावाचे बाळकडू स्त्रीला बालपणापासून दिले जाते.त्यामुळे संकटकाळी विधवा,परित्यक्ता,कुमारिका,घटस्फोटिर्िींर्ढिी,र्त्त्द्धींडॅद्गकॅर्डी,कुमीर्र्र्द्धींकी,ज्छ%ॅर्त्र्ैंछीं वगैरे एकट्या झालेल्या स्त्रिया आपल्या पायावर उभं रहाण्यासाठी नर्सिंगचा आधार घेतात. नर्सेसवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात ठाम उभं राहून तो दूर करण्यासाठी अनुराधा आठवलेे,सुमन टिळेकर त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी मिळून नर्सेस फेडरेशन सुरू केले.त्यांच्या रौप्यमहोत्सवी वर्षात विद्या बाळ यांचे प्रभावी भाषण झाले.मंच या फेडरेशनशी जोडलेला आहे.

पुरूषप्रधान व्यवस्थेतील स्त्रीच्या दुय्यम स्थानामुळे तिच्यावर होणाऱ्या अत्याचारामुळे बऱ्याचवेळेला स्त्रिया अगतिक होऊन अंधश्रध्देला बळी पडतात. मंचाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या नीता शहा या अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे काम करत असतात. त्यांच्या सहकार्याने यासंदर्भातले अंधश्रध्दा निर्मूलनाचे कार्यक्रम मंच घेत आला आहे. शनीशिंगणापूरच्या मंदिरात स्त्रियांना प्रवेश मिळण्यासंदर्भातील आंदोलनात विद्या बाळ वगैरे सहकारी सामील झाले होते.पुण्यात मंचाने यासंदर्भात एक परिसंवाद आयोजित केला होता.

स्त्री आयुष्यभर ,दिवसरात्र घरदार मुलंबाळ नवरा यांच्यासाठी खपत असली तरी व्यवहारात या पुरूषप्रधान व्यवस्थेत तिचा घरावर मालकी हक्क नसतो.यामुळे नवरा सासरच्या मंंडळींच्या मनात आलं तर ते अर्ध्या रात्रीसुध्दा स्त्रीला मुलाबाळांसह घराबाहेर काढून अक्षरश: उघड्यावर टाकतात हे विदारक वास्तव स्त्री अत्याचार विरोधी केंद्र चालवताना मंचाच्या समोर आलं. अशा उघड्यावर पडलेल्या स्त्रियांसाठी तातपुरता निवारा देण्याची निकड लक्षात घेऊन मंचानी आपले घर १९९३ मध्ये सुरू केलं.इतरत्र असणारी स्त्री आधार गृहे हे स्त्रियंाचे कोंडवाडे आहेत काय असं वाटण्यासारखी परीस्थिती होती म्हणून एक आदर्श आधारगृह सुरू कराव असं ठरलं. तिथं संकटग्रस्त स्त्रियंना मोकळं वातावरण असणारं उबदार घरकुल मिळावं या आकांक्षेनी प्रेरीत होऊन मंचाच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली.

नारी समता मंच तोपर्यंत हितचिंतकांच्या देणग्या आणि कार्यकर्त्यांचा आर्थिक सहभागावर काम करत होता. फंडिंग घेतलं तर फंडिंग एजन्सीचा अजेंडाच पुढे न्यावा लागेल का? कामावर काही बंधन येतील का ? मंचाचं स्वायत्त संघटना हे स्वरूप धोक्यात येईल का ? अशा प्रकारच्या अनेक मुद्यांवर घनघोर चर्चा त्यावेळी मंचात घडल्या.कर्वे समाजसेवा केंद्राच्या प्रा. अंजली मायदेव यांची स्त्री प्रश्नाविषयी राजकीय सामाजिक परिप्रेक्षातून अभ्यासपूर्ण मांडणी करण्यासंदर्भात मंचाला नेहमीच मोलाचं मार्गदर्शन होत असतं.या चर्चेतही त्यांचा सक्रीय सहभाग होता.त्यावेळच्या तरूण, सळसळत्या विचारांच्या विणा पटवर्धन यांनीही या चर्चेत मोलाची भर घातली. शेवटी फंडिंग घेतल्याशिवाय आपले घर चालवण अशक्य आहे आणि आपले घर चालवल तर स्त्री प्रश्न सोडवण्यासंदर्घातील महत्वाचा टप्पा गाठता येईल असा साधकबाधक विचार करून नेदरलँडच्या हिवॉस संस्थेचे फंडिंग अॅड.लतिका साळगावकरांच्या अथक प्रयत्नातून मिळाले.आपले घर मध्ये येणाऱ्या स्त्रिया नवऱ्याचे व्यसन,लैंगिक छळ,घरीदारी मिळणारी वाईट वागणूक यामुळे नैराश्य आणि भविष्याविषयीच्या पराकोटीच्या चिंंतेनी ग्रासलेल्या असतात. या स्त्रियांना काम करण्यात उत्साह नसतो,आत्मविश्वासाचा अभाव असतो यामुळं यांना आपल्या पायावर उभं करणं हे अत्यंत जोखमीचं काम

असतं. पुष्पा रोडे,सोनल पटवर्धन,लतिका साळगावकर,उषा महाम्बरे,आशा देशपांडे,निर्मला गोखले वगैरे सहकाऱ्यांनी जीव ओतून कामं केलं हे नमूद करायला आनंद होत आहे.शहनाज फौजदार हिने अधीक्षकाचं काम बरेच वर्ष केलं.

लिंगसमभावावर आधारित सल्ला केंद्र हे मंचाचं वैशिष्ट्य आहे.व्यक्तिगत समस्या समजून घेताना राजकीय, सामाजिक परिस्थितीचं भान सुटु न देता जे जे व्यक्तिगत ते ते सामाजिक या स्त्री चळवळीतील घोषणेची आठवण जागी ठेवली जाते.स्त्री पुरूषांची लिंगभावाची जडण घडण हे सामाजिक घटीत आहे हे स्वत: लक्षात ठेवून समस्या घेऊन आलेल्या महिलांच्याही ते थोडपार तरी लक्षात आणून देण्याचा प्रयत्न आमचे समुपदेशक सतत करत असतात.आदर्श स्त्रीच्या स्वार्थत्यागाचे, सोशिकतेचे गोडवे गात तिला देवीत्वाला पोहचवून तिचे मानवी अधिकार हिरावून घेतले गेले अथवा उलट ती कनिष्ठ दुय्यम अबला आहे म्हणून दासी बनवून तिचे मानवी अधिकार नाकारली गेले.स्त्री ही देवी नाही आणि दासीही नाही.तिला माणूस म्हणून जगू द्या ही स्त्री चळवळीची मागणी किती गरजेची आहे याची प्रचिती मंचाकडे येणाऱ्या समस्याग्रस्त स्त्रिया बघता अधिकाअधिक जाणवत जाते.समस्याग्रस्त स्त्रियांचा आत्मविश्वास जागवून त्यांना स्वतंत्रपणे,वास्तवाचे भान ठेवत, निर्णय घेण्याची क्षमता यावी असा मंचाचा प्रयत्न असतो.समुपदेशक आणि मंचाकडे समस्या घेऊन आलेली महिला याचं समान पायावर व मोकळ नातं असाव असा मंचाचा प्रयत्न असतो. ज्येष्ठ कार्यकर्त्या कुसुम बेडेकर,शांता भट,पुष्पा रोडे,निर्मला गोखले यांनी सातत्यानी समुपदेशकाच काम केले.सध्या हेे काम क्रांती अग्निहोत्री बघत आहे.

आपले घरला फंडिंग घेण्याचा निर्णय धोरणात्मक होता.त्यानंतर मंचात वेगवेगळया प्रकल्पांना फंडिंग घेण्याचं ठरलं.त्यामुळे मंचाचे काम अधिक जोमदारपणे पुढे गेले.फंडिंग घेण्याआधी मंचात काम करणाऱ्या बहुतांश स्त्रिया नोकरदार असल्यामुळे त्यांना कामाची उपलब्धी कमी होती. फंडिंग घेतल्यावर मात्र नवनवीन,तरूण प्रशिक्षित सहकारी काम सहभागी होऊ लागले.या काळात पगारी बिनपगारी सहकारी तसच तरूण प्रशिक्षित सहकारी आणि अनुभवी,कळकळीनी काम करणारे पण रीतसर प्रशिक्षण न घेतलेले ज्येष्ठ सहकारी यांच्यामध्ये अधूनमधून थोडेफार ताण-तणाव निर्माण झालेत्यावर वेळोवेळी चर्चा झडत राहील्या.या काळात मंचाच्या कामाची व्याप्ती आणि खोलीही वाढली हे निर्विवाद !

स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भात जाणीव जागृतीचे काम हा मुख्य उद्देश असणाऱ्या सख्य प्रकल्पाला फोर्ड फौंडेशनचे फंडिंग मिळाले. या प्रकल्पाचे काम शहरी वस्त्या,ग्रामीण भाग अशा ठिकाणी चाले.शिवाजीनगर जवळच्या वस्तीमधून विविध प्रबोधनाचे कार्यक्रम घेतले गेले.तर मरकळ गावात ग्रामीण स्त्रियांबरोबर काम केले.याच काळात अमृता देशपांडे इ. एकतर्फी प्रेमाच्या घटनातून खूनही झाल्यामुळे स्त्री पुरूष मैत्रीच नको असा विचार होताना दिसत होता.पण मैत्री असायला हवी,तिच्यात सत्तेचा शिरकाव नको,हिंंसा नका ेहा आग्रह धरला गेला. त्यातून दोस्ती झिंदाबाद हे अभियान घेतलं गेलं. लोकप्रिय अभिनेता आमिर खान याने या अभियानाची सांगता केली.जाने.२००० मध्ये वृत्तपत्र माध्यम आणि स्त्री प्रश्न यावर एक दिवसाचे चर्चासत्र घेतले.तसेच आत्मसन्मान परीषद हीअशीच एक मोठी परीषद घेतली.निर्णय प्रक्रियेत स्थान नाही,कुठला अधिकार नाही यामुळे बरेचदा स्त्रियांमध्ये आत्मसन्मानाचा अभाव जाणवतो.ही त्रुटी दूर करण्यासाठी विविध महिला मंडळे,गृहिणी ,नोकरदार स्त्रिया यांची आत्मसन्मान परीषद घेतली होती.ऑगस्ट ९७ रोजी सर्वोच्च् न्यायालयाने कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाची दखल घेऊन त्याबाबत प्रतिबंधात्मक आदेश दिले.यासंदर्भात विशाखा जाणीव जागृती अभियान राबवले गेले.या कायद्याने स्त्रियांचा कामाचा हक्क, सुरक्षितता हे अधोरेखित झालेच पण लैंगिक छळ हा केंद्रस्थानी आला.कामगार संघटना,उद्योजक यांचे मेळावे,कार्यशाळा घेतल्या.आजही मंचाचे प्रतिनीधी तक्रार समित्यांवर काम करतात.या प्रकल्पाचे काम पुष्पा रोडे,निर्मला गोखले,अरूंधती सरदेसाई,मंगला वाडेकर,शरयू गुर्जर,मोनिका वानखेडे व सहकाऱ्यांनी चोखपणे बजावले.कवयित्री व गायिक ा विमल लिमये या मंचाच्या जाहीर कार्यक्रमावेळी गाण्याची बाजू समर्थपणे सांभाळतात.

निर्मळवसा हा प्रकल्प मॅकआर्थर फौंडेशनंन पुरस्कृत केला.स्त्री आरोग्याचे सामाजिकत्व हा या प्रकल्पाचा मुख्य आशय होता.स्त्रीला केंद्रबिंदू मानून तिच्ेा व्यक्तिगत तसच सामाजिक आरोग्याबाबतची संकल्पना एक असली तरी प्रत्यक्षात आजूबाजूच्या भौगोलिक ,आर्थिक आणि शैक्षणिक परिस्थितीमुळे फरक पडू शकतो हे लक्षात घेऊन आदिवासी, ग्रामीण,अर्धग्रामीण भागात प्रौढ स्त्रियांसाठी तर शहरात पौगंडावस्थेतील मुलींबरोबर काम केले.आदिवासी व ग्रामीण भागातील स्त्रियांसाठी सार्वजनिक स्वच्छता,सोपी औषधे बनवणे,आरोग्य तपासणी शिबीर,मानसिक आरोग्य /कखत-अखऊड बाबत चर्चासत्र,दाइंर्च प्रशिक्षण या उपक्रमाबरोबरच अनेक सामाजिक प्रश्नही वेळोवेळी हाताळले गेले.महाविद्यालयीन तरूण तरूणींबरोबर लैंगिकते संदर्भातील गैरसमज दूर करण्यासाठी कार्यशाळा घेतल्या.या प्रकल्पात विद्या बाळ,साधना दधिच,डॉ.मोहन देशपांडे,सुजाता देशमुख,प्रीति करमरकर,मनोहर वा.पु.,शशी भाटे वगैरे मंडळींनी केलेल्या मनापासूनच्या प्रयत्नांमुळे प्रकल्प यशस्वीपणे राबवला गेला.

यालाच जोडून युवा जागर हा प्रकल्प फोर्ड फौंडेशनच्या मदतीने राबवला गेला.या प्रकल्पाचे काम शहरी व ग्रामीण या दोन्ही पातळयांवर चालू होते.. शहरी भागात तरूण तरूणींच्या गटांबरोबर लिंगसमभावावर आधारीत कार्यशाळा होत. लैंगिकता हे आपल्या व्यक्तिमत्वाचं अविभाज्य अंग असूनही त्याविषयी गुप्त्ता पाळली गेल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात.हे गैरसमज दूर व्हावेत म्हणून या कार्यशाळा घेतल्या गेल्या.- ग्रामीण भागात पंचायत राज टेनिंंग,किशोरी विकास,१० गुंठे शेतीचा प्रयोग,युवागट सक्षमीकरण यावर काम चाले. आंबेगावमध्ये आदिवासी क्षेत्रात तरूण स्त्री पुरूष ांचे गट बांधले होते.प्रत्येक गटाला व्यसनमुक्ती,कखत-अखऊड, स्त्री पुरूष समानता,शासकीय योजना,ग्रामपंचायत कायदा असे ्र्रप्रशिक्षण दिले गेले.हे गट स्वतंत्रपणे गावात जाऊन प्रबोधन कार्यक्रम घेत.गावात नेमकी माहिती मिळवणे अवघड असते.यासाठी गावात माहिती केंद्र स्थापन केले गेले.यात साधना दधिच,प्रिति करमरकर,सदाशिव कांबळे,परमेश्वर धसाडे हे कार्यकर्ते काम करत.

गा्रमीण महिला नेतृत्व विकास प्रकल्पाला जानकीदेवी बजाज ट्न्स्ट,स्वीस एड,व सेवा संस्थांनी फंडिंग दिले.गा्रमीण महिलांमध्ये नेतृत्व गुण निर्माण करण्यासाठी अनेक कार्यक्रम घेतले गेले.सुमारे १३५ बचत गट चालू करण्यात आले.या काळात ११६६ सभासदांना ४५,४४,६१२ रूपयांचे कर्जवाटप केलं गेलं.या प्रकल्पाचा भर नेहमीच नेहमीच लोकसहभागावर राहिला. १३०००० वर्गणी जमा करून मावळ महिला विकास संस्थेची दुमजली इमारत बांधली .या संस्थेच्या सक्षमीकरणासाठी खूप प्रयत्न केले गेले.युवक युवतींच्या गटांना वेगवेगळया कार्यक्रमांमधून सक्षम केले गेलं. मावळ प्रकल्पातील गा्रमीण भागातील कार्यकर्ते कार्यक्षम होऊन त्यांच्यात नेतृत्वगुण रूजवण्यात प्रकल्प प्रमुख नंदिनी दातार यांच मोलाचं योगदान आहे हे नोंदवायला हवं.या प्रकल्पात वर्षा मुऱ्हे,उषा महांबरे,भारती गायकवाड,वैशाली कांबळेे वगैरे मंडळींनी काम केले.

स्त्रियांच्या चळवळीने परीघावरील समूहांना साथी मानले.असेच आमचे साथी आहेत कातकरी. कमालीच्या दारिद्य्रात जगणारे हे समूह.महाराष्ट शासनाच्या कागदपत्रात पुण्यात कातकरीच नाहीत. या लाकांना जात प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी २/३ वर्षाचे दीर्घ परीश्रम करावे लागले.मंत्रालय ते ग्रामपंचायत अशा सर्व स्तरांवर प्रयत्न करून अखेर या समूहांना जात प्रमाणपत्र मिळाली.रेशनकार्डे मिळवून दिली,विटभट्ट्या सुरू करायला सहाय्य केले.आज ५ तालुक्यात कातकरी समाजाचे संघटन मंच करीत आहे. त्यांच्यावर होणारी हिंंसा व जगण्याच्या अधिकाराचे प्रश्न हे मोठे आव्हान आहे.या प्रकल्पाला स्वीस एड यांचे फंडिंग होते.यात प्रिती करमरकर,ज्ञानेश्वर इंदोरे काम करत .

महाराष्ट शासन व जर्मन बँक यांच्या सहकार्याने नारी समता मंच आपलं पाणी हा प्रकल्प पाणी पुरवठा व स्वच्छतेसंदर्भातला पुण्याजवळील सात गावांमध्ये राबवत आहे.गाव व महाराष्ट शासन यातील दुवा म्हणून मंच काम करतो.गावामध्ये गावाची पाणी पुरवठा योजना आणण्यासाठी गावाला सहाय्य करणे हे काम मंच करतो.पंचायत राज प्रशिक्षण,मेळावे,स्वच्छता अभियान वगैरे असंख्य कार्यक्रम यात झाले. या प्रकल्पावर साधना दधिच,प्रिती,प्रज्ञा शेंडे,रवि पाटील,श्रीकृष्ण साने,अनिल ललवाणी,आलम तांबोळी,रविंद्र कर्नावट,अर्चना पवार काम करत आहेत.

दर बुधवारी संध्यां.५ वा मंचाची मिटींग होते. मंचाचे कार्यकर्ते सक्रिय आहेत.अॅड.अंजली देसाई,संध्या जोशी,ललिता देशपांडे व २००० सालापासून मंचाच्या ऑफीसमध्ये पूर्णवेळ अकौंटंटची जबाबदारी अलका पोतनीस या चोखपणे बजावत आहेत.

रौप्यमहोत्सवी वाटचालीचा सविस्तर वृतंात तयार करून छापता आला तर भविष्यात स्त्री चळवळीचा ऐताहासिक दस्तावेज ठरेल असा आम्हाला विश्वास वाटतो.हा महत्वपूर्ण दस्तावेज तयार करण्यासाठी आपण आर्थिक सहकार्य करावे ही पुन्हा एकदा नम्र विनंती.

घरापासून विश्वाच्या वेशीपर्यंत आणि जन्मल्यापासून मृत्युपर्यंत धर्म,संस्कृती,जातपात,अण्वस्त्र धनसत्ता व राजसत्ता यांच्या अक्राळविक्राळ सावल्या आपल्याभोवती दाटल्या आहेत म्हणून हीच वेळ आहे अमनके रास्ते शोधण्याची .े अमनके रास्ते याशिर्षकाखाली मंचाने चार कार्यक्रम घेतले. अहिंंसा, गांधी विचार यावर डॉ.यशवंत सुमंत व इलाबेन भट यांची व्याख्याने झाली. भिवंडीत ीहंदू-मुस्लिम सलोख्यासाठी प्रसिध्द असलेले श्री.सुरेश खोपडे,आनंद पटवर्धन यांची वॉर अँड पीस ही फिल्म, महिला राजसत्ता आंदोलनातील स्त्रियांचा सत्कार व खुली मुलाखत असे कार्यक्रम घेतले.शांतीसंवाद हा रस्त्यावर घेतलेला असाच ठळक कार्यक्रम.पुढेही विश्वशांतीसाठी आपल्याला अमनके रास्ते शोधत रहायला हवं... यासाठी आपले सहभागी हात हवेत.

धन्यवाद !