Skip to main content

स्वागत!

या वर्षी मिळून सार्‍याजणी हे मासिक वयाचा एक महत्वाचा टप्पा गाठत आहे. १९८९ मधे सुरु झालेलं हे मासिक या वर्षी 20 वर्ष पूर्ण करत आहे. म्हणूनच तारुण्याचा बहर आणि जबाबदारीचं भान पेलत नव्या जोमानं पावलं टाकण्याचं बळ समर्थपणे पेलण्यासाठी 'सार्‍याजणी' तयारीत आहे. स्वतःशी नव्यानं संवाद सुरू करून देणारं हे मासिक स्त्रियांपासून सुरुवात करून, पुरुषांसह सार्‍यांच्याच मिटलेल्या ओठांआड दडलेलं मन खोलू बघत आहे.

अशा या महत्वाच्या टप्प्यावर आम्ही 'मिळून सार्‍याजणी' ला वेबसाईटची भेट द्यायचं ठरवलं आहे. ही आहे एक नव्या तंत्रज्ञानानं हातात दिलेली चावी. जी सार्‍यांनाच बोलकं करण्याचं काम करता यावं यासाठी आपल्या हातात येत आहे. तेंव्हा, खूप बोलण्यासाठी, ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. तुमचं स्वागत आहे!

ऑगस्ट वर्षारंभ प्रकाशन समारंभ

Date of event: 
Sun, 08/07/2011 - 22:30

ऐतिहासिक नगरीत ‘सार्‍याजणी’ ऑगस्टमध्ये!
स स्ने ह नि मं त्र ण !
‘सार्‍याजणी’च्या ऑगस्ट वर्षारंभ विशेषांकाचं प्रकाशन यंदा अहमदनगर सारख्या ऐतिहासिक नगरीत होतंय याचा आम्हाला खूप आनंद होतोय. या प्रकाशन समारंभासाठी तुम्हाला हे खास आमंत्रण!
ऑगस्ट वर्षारंभ प्रकाशन समारंभ
रविवार, ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता
तुषार गार्डन, टिळक पथ, अहमदनगर येथे.
प्रमुख पाहुणे ः ऍड. असीम सरोदे.
याच कार्यक्रमात सार्‍याजणीची अहमदनगरमधली प्रतिनिधी ऍड. प्रज्ञा हेन्द्रे - जोशी यांच्या ‘घरातल्या छळाला मनाई करणारा कायदा’ या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे.

प्रेम Possible !

सर्व व्यक्तींचा प्रेम करण्याचा अधिकार ' क्लेम ' करण्यासाठी व साजरा करण्यासाठी ' समतेसाठी आपण पुरुष ' या गटातर्फे ' Valentines Day ' च्या पूर्वसंध्येला १३ फेब्रुवारी २०१० रोजी दृकश्राव्य , संगीत , अभिवाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे .

विवाह परिषद (1) -३१ जानेवारी २०१० .

सस्नेह निमंत्रण .
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त - विवाह परिषद २०१० .
( मिळून साऱ्याजणी आणि विमेन्स नेटवर्क आयोजित )
सत्र पहिले - दुपारी २.३० वाजता
विवाह परिषदेचे प्रयोजन - डॉ. गीताली वि .म

Syndicate content