नाईन टू फाईव्ह
``आजकल दिल मेरा
मुझ से ये कह रहा
तू ख्वाब सजा % तू % जी ले जरा
है तुझे ये इजाजत, कर ले तू भी मोहब्बत
तू जी ले जरा % %''
तिच्या आवडतं रेडिओ मिरचीवर नेहमी नेहमी लागत असलेलं, गाणं लागलं तरी आज लक्षच नव्हतं तिचं ते एका खास मूडचं गाण ऐकायला - टीव्हीसमोरच्या कोचावर ओघळत कॉफीचा कप हातात धरून खिडकीबाहेरच्या खिन्न सांजेवर कुठेतरी तिची नजर हरवली होती. हॉलच्या खिडकीतनं दिसणारं एवढसं आभाळ भरभरून कोसळून विसावलं होतं. संध्याकाळच्या झाकोळल्या ढगाआडच्या मंद किरणांमधून थोडं थोडं टिपकत होतं. खिडकीच्या काचा कालच्या पावसाने स्वच्छ धुतल्यानं बाहेरचं जग स्पष्ट दिसत होतं. पण मुळातच धूसर हवेतलं मळभ बाहेरच्या धुतल्या जगाला झाकोळत होतं. ही खिडकी मुळातच नेहाच्या आवडीची. कारण टॉप फ्लोअरच्या तिच्या फ्लॅटची ही टेकडीमागची खिडकी. त्यामुळे कोचावरनं फक्त मोकळं आभाळ दिसायचं - उंच उंच - निळं - सावळं - कोवळं - जून - कधी खट्याळ - पटकन हातात येईलसं वाटणारं - तरीही कधीच डोळयांत न मावणारं - `क्षितिज' बिल्डिंगच्या टॉप फ्लोअरवरचा हा फ्लॅट या आभाळाच्या ओढीनंच तर तिनं घेतलेला. आईबाबा म्हणालेही होते ``अगं, सातवा मजला फारच
उंच नाही का - इथे लाईट सारखे जातात - जनरेटर बिघडला की अगदी हाल होतील जिन्यानं यायला.'' - पण नेहाला पटलं नव्हतं - या खिडकीपाशी आलं की समोर हिरवीकंच टेकडी - फारशी वर्दळ नसलेली - रानटी झाडाझुडपांची - मध्ये कुठलीच बिल्डिंग नसल्यानं समोरचा हिरवा गारवा - त्यावरचं क्षितिज आणि फक्त आभाळ - उंच उंच - तिच्यासारखंच एकटं तिच्यासारखंच मनस्वीसुद्धा.... त्या खिडकीतल्या आभाळाची आणि तिची या दीड-दोन वर्षांत अगदी घट्ट मैत्री झाली होती. कारण ते तिच्याच रंगात रंगायचं - ती खूश असली की रंगाच्या उधळणीत न्हाणारं - ती चिडली की अस्ताच्या सूर्याकडनं लाली घेऊन रक्ताळलेलं. ती हळवी झाली की मळभात हरवणारं आणि ती शांत असली की शुभ्र निळयाशार गूढ डोहासारखं
स्थरावलेलं. त्या खिडकीतल्या आभाळाला तिची सगळी गुपितं आपोआपच कळायची आणि तिलाही त्याच्याकडे गुपितं उघडी करायला आवडायचं.
डिसेंबरमध्ये ती या फ्लॅटमध्ये राहायला आली तेव्हा सुरुवातीला एकटेपणाची सोबतही त्यानेच केली होती. रात्रीच्या वेळी टेकडीवरून येणारी मंद वाऱ्याची झुळूक त्या आभाळातल्या शांत, शीतल चंद्राकडे पाहत अंगावर शहारताना मागे अनिरुद्धचा भास व्हायचा. चांद - चांदण्या - मंद वारा हे सगळं त्याच्या आवडीचं - हे सगळं बघताना तिच्यापेक्षा त्याला तर कित्ती आनंद झाला असता - त्या वाऱ्याला अंगावर घेत एक सिगरेट शिलगावत नेहाला जवळ ओढत छानसं गाणं ऐकणं - बेधुंद होणं - हे तर अनिरुद्धनं रोज केलं असतं !
म्हणून नकळत या आभाळाच्या घटांत हरवताना मध्येच तिला त्याच्या हाताचा विळखा तिच्या कमरेभोवती पडेलसं वाटायचं - आणि पुढच्याच क्षणी विस्कटलेले ढग जाणीव करून द्यायचे, अनिरुद्धबरोबर असतीस तर या फ्लॅटमध्ये कशाला असतीस ? मुंबईला पार्ल्याच्या त्या परांजपे स्कीमच्या तीन रूममध्ये असतीस ! तिथे ना आकाश - ना क्षितिज - ना वाऱ्याशी खेळणं - ना ढगांची उतरंड ! शेजारी - आसपास - पुढे - मागे - सगळीकडे फक्त सिमेंटच्या भिंती - माणसांची गर्दी - धडपडणारी, हरवलेली - घड्याळाबरोबर धावणारी - आणि अनिरुद्धसुद्धा तोच - हावरा - स्वत:त हरवलेला - स्वत:च्या गुर्मीत गुरफटलेला - तिच्या अस्तित्वाची दखलही न घेणारा - तिच्या करीअरच्या चढत्या कमानीची फक्त हेटाळणी करणारा - तिच्या कुठल्याही चुकांना कधीच माफ न करणारा - चुका न करूनही अपराधाचं खापर फोडणारा .
तसं त्यांच्या संसाराच्या सुरुवातीची वर्षं नेहेमीसारखीच राजाराणीची - नवलाईची - त्याची सरकारी नोकरी - ती प्रायव्हेटमधली कॉम्प्युटर प्रोग्रॅमर - साधी नोकरी एक साडेचारशे फुटांचा छोटासा फ्लॅट. सकाळी सहाला उठून धावतपळत डबा करून आठला घर सोडायचं - ते संध्या. ७ ।। - ८ ला परत यायचं, आल्यावर पुन्हा स्वयंपाक. त्याचं टीव्ही बघून - मित्रमंडळींशी गप्पाटप्पा करून दीड तासाने आयतं पानावर येऊन बसणं. त्यातच अर्शितचा जन्म - दीड महिन्याच्या अर्शितला पाळणाघरात ठेवून नोकरीला जाणं जिवावर यायचं. पण प्रायव्हेट नोकरीत रजा किती मिळणार ? शिवाय घराचे हप्ते - नवं फेर्नचर - म्हणजे नोकरी करणं तर भागच होतं. अर्शितला पाळणाघरात ठेवताना ऊर भरून यायचा - ऑफिसात छातीही दुधाने भरायची. ती पिळून मोकळी करताना डोळेही अश्रू पाझरत मनाला मोकळी वाट करून देत - पण इलाज नव्हता.
अशीच चार वर्षं गेली -
नेहा आता सिनिअर झाली होती. तिच्या लीशरींर्ळींळींू लाही खूप ीलेशि होता. तिच्या ीळपलशीळींू मुळे भरभर प्रगती करत ती िेसीीरााशी म्हणून चांगलीच स्थिरावली. बघता बघता पगाराचे आकडे वाढत वाढत कल्पनेच्या पुढे गेले. अर्थात काम करण्याचं यश - जग - पैसा - या नात्याने रीीळसपाशपींी वाढत होत्या - वेळा अवेळा वाढत होत्या, लहरश्रश्रशपसशी वाढत होती. कामाचं रििशीलळरींळेप वाढत होतं - व्याप वाढत होता आणि बँक बॅलन्सही. खरं तर अनिरुद्ध तिच्यापेक्षा खूप हुषार होता. महत्त्वाकांक्षी होता - कलासक्तही होता - पण थोडा भ्याडही होता - हळवाही होता - कुठली वेगळी वाट जोपासायला आवडायचं नाही त्याला - म्हणजे बुद्धीच्या जोरावर मिळालेली सरकारी नोकरी - आईवडिलांनी रीतसर पत्रिका जमवून बघून पसंत केलेल्या मुलीशी लग्न - हनिमून म्हणजे बंगलोर - म्हैसूर - उटी - हं % तिथे उटीला हिरव्याकंच डोंगरासमोरच्या कॉटेजमध्ये धुक्यात गुरफटून सिगरेटच्या धुराची वलयं सोडत - आपल्या नवपरिणीत वधूबरोबरचं प्रणयाराधन - एखादी घोड्यावरची रपेट - १० दिवसाच्या हनिमूननंतर पुन्हा नोकरी - एक छोटं घर - एक संसार.
नेहालाही न आवडण्यासारखं विशेष नव्हतं. पण पुढे पुढे मात्र नेहाच्या करिअरची चढती कमान - अनिरुद्धच्या `सरकारी' नोकरीतले स्टॅग्नेशन - लायकी नसलेली कित्येक पदं ज्युनिअर आणि र्ीपिंर्रीश्रळषळशव असिस्टंटला प्रमोशन मिळाल्यावर `बॉस' म्हणून स्वीकारताना होणारी घुसमट - स्वत:ला दारूत बुडवणं आणि नेहाला येताजाता पाण्यात पाहणं - तिच्या तिप्पट पगाराशी सारखं `लढणं'. तिच्या प्रत्येक र्ीीललशीीर्षीश्र रीीळसपाशपीं वर कुजकट शेरे - टोमणे - तिच्या ऑफिसमधल्या कलिगशी बोलण्याचालण्याचे नको ते अर्थ काढत संशय घेणं - तिचा जास्तीत जास्त पाणउतारा करणं.
सुरुवातीला रडत - भांडत - रीर्सीश करत काही वर्षं नेहानं रेटली - पुढे मात्र अर्शितसमोरचं त्याचं पिणं - तिला शिवीगाळ करणं - क्वचित हातसुद्धा उगारणं - `यशाचा अर्थ' आणि चव कळल्यानंतर नेहाच्या सहनशक्तीपलीकडे गेलं - आणि तिनं वेगळं होण्याचा निर्णय घेतला. लकीली त्याचवेळी या नव्या कंपनीतल्या वेस्टर्न महाराष्ट्न् रिजनल ऑफिस डिव्हीजनसाठी पुण्यातल्या शुरिपीळेप श्रिरप मध्ये तिला क्षेल ेषषशी आली आणि तिनं पटकन ती स्वीकारली. आई-बाबा, दादा पुण्यातच होते. त्यांचा आधार होताच - त्यामुळे एका विषण्ण क्षणी हा धाडसी निर्णय घेतला आणि मागच्या डिसेंबरमध्ये ती पुण्याला ीहळषीं झाली. आईवडिलांबरोबर दादाच्या संसारात लुडबुडण्यापेक्षा `क्षितिज'मध्ये हा लक्झुरिअस फ्लॅट घेऊन तिथे राहणं पसंत केलं - ती, अर्शित, सुशिलाबाई - तिच्या घराची केअरटेकर आणि हे खिडकीतलं मोकळं आभाळ. तिचा पुन्हा
नवा संसार सुरू झाला - ती मात्र नवी नव्हती - नव्या फुंकरींनी जुन्या जखमा आणि हळव्या क्षणांना झाकायचा - विसरायचा प्रयत्न चालू होता - जमेल तसा - जमेल तितका - जमल्याची खोटी खोटी समजूत घालत मनाची.....
नव्या ऑफिसमध्ये कामाचं प्रेशर खूप होतं. सर्व नवीन लेपींरलींी वर्शींशश्रेि करायचे होते, शुरिपीळेप िेक्षीशलीं लहरश्रश्रशपसळपस होतं, हशलींळल ही होतं. पण सर्व स्टाफ खूपच लेाशिींशपीं होता. पगारही भरपूर होते. मुख्य म्हणजे वेळी-अवेळी काम पूर्ण करताना संशय घेणारं कुणी घरी नव्हतं, टोमणे मारणारं नव्हतं - परत येण्याची घाई नसायची - प्रेशर नसायचं.
अर्शित नव्या शाळेत नव्या वर्गात रमला - नव्या घरात तिघंही स्थिरावले - कामाच्या व्यापात जुन्या जखमांवरच्या खपल्या स्थिरावल्या - उगीच कुरतडून जखमा ओल्या कराव्याशा वाटायच्या नाहीत - वेळही मिळायचा नाही - तसं र्षीीीींीरींळेप चे प्रसंगही विशेष येत नव्हते - पण तिच्या खिडकीतलं आभाळ एकटेपणाची जाणीव करून द्यायचं - डोकं टेकायला कुणाचा खांदा हवा होता, अशी चुटपूट लावायचं - खिडकीपाशी उभं राहून गारव्याची लकेर अंगावर येताना एखाद्या `पुरुषी' स्पर्शाची हुरहुर लागून जायची ! सुस्कारा सोडून अशा वेळी खिडकीचा पडदा ओढून त्या आभाळावर पडदा पाडणंच तिच्या हातात असायचं....
कंपनीत क्षेळप झाल्या झाल्या नवीनच तिची `त्याच्याशी' ओळख झाली. तो तिला बराच ीशपळेी होता. अलर्लेीपींी ीशलींळेप मध्ये गोरा - घारा - दाढीवाला - बघताक्षणी बुद्धीची जाणीव समोरच्याला होणारा - पण तरीही नजर बऱ्याचदा खाली नाहीतर दुसरीकडे बघत बोलण्याची पद्धत - थोडा लेपषळवशपलश कमी असावा नाही तर त्याच्या `बर्वे' आडनावाप्रमाणे मी बरा आणि माझं बरं - ऑफिसमध्ये सेक्शन वेगवेगळी असल्याने डायरेक्ट काम फारसं पडायचं नाही - पण लरलळप समोरासमोर असल्याने दृष्टादृष्ट कायमच व्हायची ! अर्थात त्याच्या डोळयांवर चष्मा - त्यात अगदी समोर भेटल्यावर `हॅलो'सुद्धा हा दुसरीकडे बघून म्हणणार ! नेहाला थोडासा `बाळू' वाटला सुरुवातीला !
पण ऑफिसमध्ये नवीन आल्या आल्या तो `बाळू'पणाच तिला जवळचा वाटत होता. मुंबईतलं राहणं - बोलणं थोडं इतरांना वेगळंच वाटतं. तशा तिच्या ऑफिसातल्या मुली मॉडच होत्या. पण तरीही मुंबईची कोणी तरी इथे येणार कळल्यावर सगळयांना उत्सुकता खूपच होती. काहीशी क्षशरर्श्रेीीूची किनारही असलेली.
त्यात नेहा दिसायला सुंदर नसली, तरी खूप आकर्षक होती. पूर्वीच्या ऑफिसमधल्या अधिकाराच्या जागेची आणि यशाची झलक तिचं चालणं - बोलणं - दिसणं - मॅनर्स यातून स्पष्ट दिसायची. मुळात ती फारशी बडबडी कधीच नव्हती - ५ वर्षांतल्या संसारातल्या कटकटींनी - अनिरुद्धच्या स्वभावाने तिला जास्तच अबोल बनवलं होतं. त्यामुळे हसणंसुद्धा ठरावीक
चाकोरीबद्ध, उकललेल्या ओठांचं! त्यामुळे ती सर्वांना खूपच ीशीर्शीींशव वाटायची ! चार्मिंग बाई त्यातही स्वभावाने ीशीर्शीींशव म्हटल्यावर ऑफिसमधल्या कलिग्जसाठी तर एक हमखास उत्सुकता ताणणारा `ळींशा'च झाली. तिचे सहकारी तिच्या आसपासच्या वयाचेच - असंसुद्धा पुरुषांचं वय ३० की ३५ आणि ४० की ४५ हे बऱ्याचदा कळत नाही आणि अगदी तिशीतले असो की पन्नाशीतले, `बाई' म्हटलं की पाघळले - ओघळले. त्यात नेहा डिव्होर्सी आहे, ही अजूनच उत्सुकतेची बाब - त्यामुळे जोशींपासून वर्मापर्यंत प्रत्येकजण या ना त्या कारणाने आल्या दिवसापासून तिची ओळख करून घ्यायला - तिला मदत करायला धडपडत असायचा. अपवाद फक्त `बर्व्यांचा'. बर्वेही तिला हळूच बघायचा पण इतरांसारखा पुढे पुढे करत - तिला उगीच मदत करायला पुढे यायचा नाही - बर्वे तसा परफेक्शनिस्ट ! ९ ते ५ म्हणजे ९ ते ५ - घड्याळ लावावं इतका वक्तशीर ! ९च्या ठोक्याला हजर आणि ५च्या ठोक्याला निघायला तयार ! अर्थात रलर्लेीपींी ही तसं शिीषशलीं च होत. कुणाला काही अडलं, ऋ.घ.बद्दल काही विचारायचं असलं - कुठला इंग्रजी शब्द अडला की त्याचं उत्तर हमखास बर्वे देणार, हे समीकरण होतं. तसा ऑफिसमधल्या त्याच्या सेक्शनमधल्या हरीश, संजय, विक्रम आणि अविनाशच्या टवाळक्यात तो थोडाफार सामील असायचा, पण इतरांच्या गप्पाटप्पात त्याची श्रवणभक्तीच जास्त - एकीकडे लेािीर्शींी चालू - मध्येच एखादी पण शिीषशलीं कॉमेंट करणार ! बस्स. बऱ्याचदा बरीच चावट ! तसा मुळातच मितभाषी. पण वेळ आली - लहर लागली तरच बोलणार. तेही खरं ळपींशश्रश्रशर्लींीरश्र ींरश्रज्ञ - पण उगीच निरर्थक बडबड - टीका - टवाळया कधीच नाहीत ! त्याला कवितांची विशेष आवड होती ! वाचनही खूप होतं, त्यामुळे बोलण्यातली वाङ्मयीन जाण नेहाला आवडायची. जप वशारपव गप्पांच्या मूडमध्ये जुन्या मराठी कवींच्या कविता धडाधड म्हणताना तो खूप भावुकही दिसायचा. पण हा दुर्लभ लाभच असायचा. कारण त्यासाठी खास मूड लागायचा.
नेहाची आणि ऑफिसमधल्या बर्वेसह सर्व सहकाऱ्यांची ओळख सोनालीने करून दिली. सोनाली एकदम बिनधास्त पोरगी - खूप बोलकी - चालणं - बोलणं सगळं मोकळं-ढाकळं ! जे मनात ते थेट ओठावर - आत बाहेर काही नाही ! आत्तापर्यंत तिची चार अफेअर्स होऊन गेली होती म्हणे - त्यातली दोन तशी पासिंग अफेअर्स आणि दोन सिरिअस - त्यातलं एक मोडलं - दुसरं सध्या चालू. तिचा श्ररींशीीं बॉयफ्रेंड लरश्रश्र लशपींशी मध्ये कामाला होता. तिचे आईवडील दिल्लीला स्थायिक. ही नोकरीच्या निमित्ताने (हो % निमित्तच म्हणायचं कारण आईवडिलांबरोबर बंधनं पाळत जगणाऱ्यातली ती नव्हती) पुण्यात, घरची खूप श्रीमंती होती, पैशाची गरज नव्हती. पण हा क्षेल तिला मनासारखं वागता यायला म्हणून पुरेसा होता. तिचा बॉयफ्रेंड पण तिच्यासारखा ींरश्रश्र - षरळी - हरपवीेाश होता. तो कधीतरी तिला पिकअप करायला यायचा तेव्हा नेहाचीही ओळख झाली. दोघं अगदी बिनधास्त होते. दोघं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्यासारखे वागायचे - राहायचेसुद्धा - पण लग्नाला मात्र दोघांचा विरोध होता - सोनालीलासुद्धा `आत्ता - इतक्या लवकर नको ती लग्नाची कटकट' असंच वाटायचं !
अशी ही सोनाली - नेहा ऑफिसमध्ये क्षेळप झाल्याबरोबर सोनालीच तिची पहिली सोबती ठरली. स्वत:हून ``कळ ! ख'ा डेपरश्रळ'' म्हणून हलकासा ीहरज्ञश हरपव करीत गोड हसली आणि नेहाचं ींशपीळेप कमी झालं. तिनेच सगळयांशी तिची ओळख करून दिली. त्यातच बर्वेसुद्धा !
पहिले दोन - तीन महिने `हॅलो' `हाय' पेक्षा वेगळं कधीच बोलणं नव्हतं. त्या मानाने सेक्शनमधले इतर सगळे मात्र सारखं बोलायला धडपडायचे ! उरीव दे - फोनं. दे आणि घे - `काही लागलं तर सांगा' `अपू वळषषळर्लीश्रींू चरवरा ?' `मुलाच्या अॅडमिशनचं अडलं तर सांगा' पर्यंत काही ना काही निमित्ताने बोलायला पुढे ! बर्वे कधीच बोलायचा नाही. पण ती कामावर खिळलेली असताना मध्येच मान वर केल्यावर तो तिच्याकडे बघत होता, हे जाणवायचं. तिनं नवा ड्न्ेस घातला की त्याला आवडलाय, असं जाणवायचं - त्याच्याकडे बघून हसल्यास त्याच्या प्रतिहास्याबरोबर त्याच्या नजरेतही बरंच काही दिसायचं ! कुठल्याही स्त्रीला शेवटी पुरुषाच्या नजरेचा अर्थ कळतोच !
लंचटाईम - कॉफी ब्रेकमध्ये पुढे पुढे तीही सर्व ग्रुपला क्षेळप होऊ लागली. थोड्या गप्पांमध्ये सहभागी होऊ लागली - जुनं विसरू लागली - नवं उभारू लागली - ऑफिसच्या विषयापेक्षा वेगळया टीव्ही सिरिअल - `चीनी कम'ची थीम - नवं आलेलं नाटक अशा गप्पा थोड्याफार रंगू लागल्या - तिची आणि बर्वेची आवड खूप सारखी होती. थोडंसं रलीींीरलीं आवडणारी - बर्वे त्याच्या घराबद्दल कधीच बोलायचा नाही - पण सोनालीनं सांगितलं होतं - त्याला एक मुलगी आहे - मुलीला क्लासला सोडायचं म्हणून तो ऑफिस अवर्सनंतर कधीच रेंगाळायचा नाही ! त्याची बायकोही सर्विस करत होती - शिवाय स्त्रीमुक्तीवादी गटात कामही करायची - बऱ्याचदा ग्रुपसह बाहेरही जायची. एकूण जरा अवघडच प्रकरण होतं म्हणे ! तशी ऑफिसमधल्या एका कलिगच्या घराच्या वास्तुशांतीच्या दिवशी तिची भेटही झाली. तीही त्याच्यासारखीच घारी - गोरी होती. पण अगदी कृश - शिवाय अॅक्टिव्हिस्ट असल्याने मंगळसूत्र म्हणजे बंधन - ते घालणार नाही - सर्व पारंपरिक प्रथा म्हणजे अवडंबर इ. इ. वर तिरकस बोलली ! या सर्व वूमन अॅक्टिव्हिस्ट बायांची नेहाला नेहमी गंमत वाटायची ! कायम `आम्ही पुरुषांच्या
बरोबरीने आहोत' हे दाखवायचा अट्टहास कशाला ? स्त्रीमुक्ती म्हणजे पुरुषांची बरोबरी, हे समीकरणच तिला मान्य नव्हतं - ती स्वत: मुक्तच होती - म्हणून तर एका कडेलोटाच्या क्षणी का होईना - तिने मुक्तीचा निर्णय घेतला होता - पण ती तिची इच्छा नव्हती - अशापेक्षा एकमेकांशी जुळवून घेत एकत्र राहणं तिला जास्त आवडणारं होतं ! अगदी नाईलाज म्हणून - मुख्य म्हणजे अर्शितच्या दृष्टीने तिने हा निर्णय घेतला होता. पण बर्वेची बायको जरा शललशपींीळल च वाटली होती !
तेव्हापासून नकळत तिला त्याच्याबद्दल थोडी आस्थाही वाटू लागली, `सौ. बर्व्यांचा' नवरा म्हणून - हळूहळू बघणं - बोलणं - एखादा फोन - क्वचित घरी फोन - हळूहळू त्यांच्यातलं अनोळखीपण कमी होत होतं. त्यांची खरी मैत्री झाली, ती ऑफिसच्या एकांकिकेच्या निमित्ताने. हौशी रंगभूमीतर्फे जेव्हा एकांकिका स्पर्धा जाहीर झाली, तेव्हा तिच्या सहकाऱ्यांनी भाग घ्यायचं ठरवलं. बर्वेनीच लिहिलेली एकांकिका `ती' - करायची ठरली - कंबरेखाली लुळया झालेल्या एका तरुण मुलीच्या एकाकी आयुष्यात काही क्षणांपुरत्या आलेल्या एका मोहाची ती कथा - बर्वेनी छानच लिहिली होती - नेहाला अगदी सूट करेल अशी होती. ऑफिसमधल्या सगळयांचा आग्रह - बर्वेची गळ - आईबाबांना विचारून तिने हो म्हटलं - मग ऑफिस सुटल्यावर तालमी सुरू झाल्या - प्रोफेशनल डायरेक्टर घेऊन ती आणि विक्रमची प्रॅक्टीस - बर्वेही न चुकता थांबायचा - जेमतेम २० मिनिटांची एकांकिका - १५ दिवसांत उत्तम बसली आणि स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस घेऊन गेली. तिला अभिनयाचं आणि बर्वेला लेखनाचंही बक्षीस मिळालं. नेहाच्या आयुष्यातलं हे अजून नवं धाडसच होतं - त्यात मिळालेल्या यशानं नेहाला खूप बरं वाटलं.
एकांकिका संपल्या संपल्या `उेपसीरींी' म्हणून बर्वेनं केलेला ीहरज्ञश हरपव तिला खूप सुखावून गेला. त्याहीपेक्षा `ख'श्रश्र लरश्रश्र र्ूेी रीं पळसहीं' या त्याच्या डचड मुळे त्याच्या फोनकडे तिचं लक्ष लागून राहिलं. रात्री ११ वाजता त्याचा फोन आला. ``नेहा ण रीश सीशरीं - तू अक्षरश: चीज केलंस माझ्या `ती' चं ! आणि खूप छान दिसलीस !'' अनपेक्षित चार - पाच वाक्य - तिला तिचा एकेरी उल्लेख - तिचं कौतुक - तिच्या आवडत्या मित्राकडून हवाहवासा वाटणारा अनपेक्षित धक्का - ती खूपच सुखावली - रात्रभर डोळयाला डोळा लागला नाही - ती आणि तो - मध्ये आता फारसं अंतर जाणवत नव्हतं.
दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये पाऊल टाकताच साहेबांजवळ सगळयांनी तिचं, विक्रमचं, बर्वेचं भरभरून केलेलं कौतुक - बुके - छोटीशी केक पार्टी आणि साहेबांनी वशलश्ररीश केलेली एक लोण्यावळयाची र्ेींशीपळसहीं ींीळि !
बर्वे अर्थातच शांत ! खुशीत असल्यावर शिट्टीवर गाणं म्हणणं नेहाला ठाऊक झालं होतं - पण तिच्या काळजाची धडधड, तिच्या श्वासाची गती वाढविणारे त्याचे हुरहुर लावणारे शब्द मात्र ओठाआड ! चष्म्याआडच्या डोळयांत `तो' भाव होता - पण बाकी दडलेलं !
ऑफिसमध्ये `मिस पंडित' म्हणूनच तिच्याशी नेमकं बोलणं - तरी घरी मात्र बहुधा रोज फोन असायचे - तीही त्याला फोन करायची - आत्ता लागलेलं गाणं - वाचलेलं पुस्तक - त्याच्या नवीन एकांकिकेसाठी थीम.... कधीकधी अर्धा अर्धा ताससुद्धा फोनवर गप्पा - क्वचित जनरल टॉकबरोबर ``आज तू निळया साडीमध्ये छान दिसत होतीस'' असं ऐकावं असं तिला वाटे - पण `सावळया मुलींना निळा रंग छान दिसतो' अशी ब्रॉड स्टेटमेंट्स `तिकडून' यायची, तेव्हा नेहाला हसू यायचं !
लोणावळयाची ट्नीप ठरवायला मध्ये जवळजवळ दोन महिने गेले. नव्या कन्साईनमेंट्स - कामं - शेवटी - पहिल्या पावसातच जावं असं ठरलं आणि २५-२६ जून तारीख ठरली.
त्यांच्या लश्रळशपीं असलेल्या कंपनीचं लोणावळयाला गेस्ट हाऊस होतं. ऑफिसची काही मंडळी पूर्वी जाऊन आली होती. त्यांनी वर्णनं केली होती. बरोबर कळश्रर्श्रींळशु नावासारखं लोकेशन आहे. पाऊस सुरू झाल्याने सगळीकडे हिरवीगार झाडं म्हणजे अगदी नेत्रसुखच असणार ! त्यात शनि-रवि र्ेींशीपळसहीं म्हणजे नुस्ती धमाल. ह्या पुरुष मंडळींना वीळपज्ञी घेणं म्हणजे पर्वणीच ! त्यात लोणावळयासारख्या ठिकाणी मस्त पावसाळी हवा - गप्पा टप्पा - गाणी - जोक्स - सिगरेट धूर - स्कॉचची नशा आणि बेधुंदी - सगळेजण ींहीळश्रश्रशव होते. सोनाली, विक्रम, संजय आपापल्या मित्रमैत्रिणींना घेऊन येणार होते. नेहा जायला तयार नव्हती. सोनाली तशी डॅशिंग - थेट बोलणारी - गेल्या दोन - तीन महिन्यांत बर्वे नेहाशी आपणहून बोलतो - नेहाचे नवे ड्न्ेस आपणहून रििशीलळरींश करतोय - त्याची नजर बऱ्याचदा तिच्यावर खिळलेली असते - एकूण `बर्वे' बदललाय - हे तिच्या चांगलंच लक्षात आलेलं होतं. एकदा कॉफी पिताना तिनं विषयही छेडला होता - ``नेहा - बर्वे तुझ्यावर फिदा आहे बरं का !''
``सोनाली, काही तरीच काय ! बर्वे कुणावर फिदा होणारा आहे का ?''
``नाही - तसा तो नाही - पण तू मात्र भुलवलयंस हं त्याला. अगं, त्याला सगळेजण काहीबाही चिडवत असतात !''
``आता तू मागे नाही सरायचं !''
``सोनाली, कसं शक्य आहे ? मी - म्हणजे माझं.... म्हणजे अगं, माझी लरलज्ञर्सीेीपव.....''
तिचं बोलणं तोडत सोनाली म्हणाली ``कसली लरलज्ञर्सीेीपव ? अगं, मागचा विचार कशाला करायचा ? ते सगळं रिीीं - संपलं - गेलं - गंगेला मिळालं - तू आजचा विचार कर - उद्याची स्वप्नं बघ.''
``अगं, पण त्याला संसार आहे - बायको आहे - मुलगी आहे...''
``डे ुहरीं ? अगं वेडाबाई, तुम्हाला काय लग्न करायचं आहे का ? - र्गीीीं शपक्षेू - अगं, आयुष्यात बाकीचं सगळं काही असलं तरी हे वयच असं असतं - जेव्हा कोणीतरी स्वत:चं असावं - जवळचं असावंसं वाटतं. तू तरुण आहेस - तुझ्या मनाला - तुझ्या `आज'ला कुणाची तरी गरज आहे.''
``अगं - पण मला नाही हे बरं वाटणार ! आणि त्यानंही कधी ळपवळलरींश केलं नाही ! अगं, सगळे पुरुष बोलणारे नसतात - शिवाय तुझ्यासारख्या ीशीर्शीींशव मुलीशी थेट बोलणं - त्याला किती हिंमत लागणार - तसं वातावरण - तसा एकांत तरी कुठे मिळालाय कधी ?''
``अगं - पण त्याची बायको - त्याचा संसार....''
``अगं, तोच तर त्याचा प्रॉब्लेम आहे. त्याची बायको पाहिलीस ना ? तुला वाटतं बर्वे सुखी असेल ? त्याला काही ीशु श्रळषश असेल असं मला नाही वाटत. खप षरलीं मी पैज लावते - कश ळी ीींर्रीींळपस - तसा तोही फार मानी आहे - डि्न्ंक-बिंक नाही - मित्रही नाहीत. त्यामुळे नुसत्या षश्रळीींळपस साठी कुणी मुलीकडे पाहणार नाही गं ! पण तू नक्की आवडतेस त्याला. तुझ्यात ळर्पींेर्श्रींशव झालाय तो. तुलाही गरज आहे एका पुरुषाची - ऊेप'ीं वशपू ! खीं ळी र्र्ाीींीरश्र आणि हे बघ, ींहशीश ळी पेींहळपस ुीेपस ळप ळीं !''
नेहाला पटलं नव्हतं. अशी ीशश्ररींळेपी? आपल्या आसपास खूप रषषरळीी असतात. पण नेहाला नेहमी त्या कशातरीच वाटायच्या. त्यात थिल्लरपणा वाटायचा. संस्कारांचा अभाव वाटायचा. विशेषत: शुींीर - ारीळींरश्र.
पण गेल्या काही वर्षांत `लग्ना'चा अर्थ समजला - लग्नाचे रंग दिसले - लग्नातला `व्यवहार' समजला. त्यातला फोलपणाही दिसला. एकूणच स्वत:चं मोडलं म्हणून नाही तर ज्यांचं मोडलं नाही त्यांचंसुद्धा तडजोडी करणं - लपवणं - झाकणं - सगळं सगळं तोकडं वाटू लागलं होतं. समाजात राहायचं म्हणून - एकाच घरात - एका छताखाली राहणारे दोन विभक्त स्त्री आणि पुरुष - शरीरसंबंधांपुरता व्यावहारिक नात्याचा पाश - बाकी मनांना कुणी बांधायचं - सांधायचं - हा ज्याचा त्याचा प्रश्न - ज्याच्या त्याच्या अपेक्षा - ज्याची त्याची नाती - ज्याचे त्याचे प्रश्न - ज्याची त्याची उत्तरं...
प्रत्येकच पतिपत्नीतले असेच प्रश्न - अशीच नात्यांची वीण - काही धागे बांधलेले - काही उसवलेले - वर्षानुवर्षे उसवलेल्या धाग्यातल्या भोकांना ठिगळं लावायची - मनाची समजूत घालायची - सरावल्या जीवाच्या जखमांवर फुंकर घालायची - आणि हरिळिश्रू ारीीळशव असल्याचा आव आणत एका छताखाली वेगवेगळं राहायचं.... नातं जुळायला लग्नाचा औपचारीकपणाच कशाला हवा ? स्त्री आणि पुरुष - निसर्गानंच ठरवलेलं नातं पुरेसं नाही का ? त्याच नात्यानं मनं बांधली जातात - देहही जवळ येतात - हे घडू शकतं - ते स्वाभाविक असू शकतं - असंही घडतं आणि घडू शकतं.... ?
....तरी लोणावळयाला जायची तिची मनाची तयारी होत नव्हती - कदाचित काही घडेल की काय अशी भीती वाटत असावी - घडावंसं तिलाही वाटत होतं - तिच्या तनमनाचे ीळसपरश्री तिला जाणवत होते - पण तरीही....
आणि गुरुवारी रात्री ११ वाजता फोन खणखणला तसा जवळजवळ रोजच्यासारखाच आणि रोजच्यासारखाच त्याचा शांत, धीरगंभीर आवाज पलीकडून आला.
``नेहा %!''
``हो - मीच बोलतेय....''
``नेहा....'' पुढे एक मिनिट तो नि:शब्द - तीही शांत - सर्व प्राण जणू कानांत एकवटलेले - त्याचा आवाज किंचित घोगरा - थोडं घुटमळत - बोलू की नको अशा दुविधेतलं, किंचित खाकरणं - नेहाच्या हृदयाची धडधड खूपच वाढली होती.
``बोला ना - मी ऐकतेय...''
तिने त्याला कधीच एकेरी हाक मारली नव्हती. पण त्याचं एकेरी बोलावणं तिला खूप सुखवायचं !
``नेहा, तू येणारेस ना लोणावळयाला ?''
``म्हणजे नक्की नाही ठरवलं - खरं तर बहुतेक नाहीच वाटतं !''
``का ?''
``....'' ती गप्प.
``नाही म्हणजे मी अशी कधी परक्या मंडळींबरोबर र्ेींशीपळसहीं गेलेले नाही - म्हणून....''
``नेहा - माझी मिसेस गावाला गेलीय - मुलीला घेऊन - मी अगदी षीशश आहे. आणि फक्त तू आलीस तरच जाणार आहे....'' भरभर आपलं बोलणं त्याने संपवलं.
``येशील ना..?''
नेहाच्या अंगावर शहारा सरसरून गेला. त्यानं अजून बोलावसं वाटत होतं - पण त्याचा गहिरा स्वर - तिचा रोमांचित - चेहरा - नकळत तिने स्वत:च्या आेंजळीत झाकला....
लोणावळयाला जायला त्यांनी दोन टव्हेराच घेतल्या होत्या - रस्त्यात गात गात - खात खात - एक्सप्रेस वेच्या नीटस रस्त्यांवर शंभर सव्वाशेच्या स्पीडने जाताना रस्ता कधी संपला कळलंच नाही - तिचं मन तर कधीच पोचलं होतं.
लोणावळा हिलस्टेशन म्हणून मंडळींना फारसं नवलाईचं नसलं तरी ट्नीपची मजा वेगळी. एपक्षेू करणारा ग्रुप - धुक्यात ढगात हरवलेले दऱ्या आणि डोंगर, हिरवाईच्या असंख्य छटांमध्ये
ंगलेला निसर्ग - उंच उंच कातळांना हलकासा छेद देत खाली उतरणारे खट्याळ झरे - खळाळत्या उधाणाने आसपासचा आसमंत भिजवून टाकत कोसळणारे शुभ्र - फेसाळ धबधबे - कधीमधी होणारा शिडकावा - तर कधी कोसळणारी ओलीचिंब सर - सर्वांनी भिजण्याचा मनसोक्त आनंद घेतला - पावसाच्या खट्याळ सरींनी प्रेमी युगुलांना तर पागल केलं आणि आपापल्या `पार्टनर्स'ना घेऊन ते कधी ग्रुपमधून वेगळे झाले, ते लक्षातही आलं नाही.
जाता जाता सोनालीने नेहाला मागे ओढलं आणि तिथल्या धबधब्याच्या काठावरच्या दगडावर बसवलं - आणि पुढे जाऊन बर्वेला बॅचलर्सच्या ग्रुपमधून ``अहो, ते अमुक बोलावतायत'' म्हणून बाहेर बोलावलं !
बर्वे मागे आला - नेहाची त्याची दृष्टादृष्ट झाली, तेव्हा ``बाय अॅन्ड एन्जॉय'' म्हणत डोळा मारून सोनाली पळाली सुद्धा....
बर्वे थोडासा हसला - नेहाने नजर वळवली. बर्वे तिच्या जवळ आला. जीन्स खालून फोल्ड करीत शूज काढत तिच्या शेजारच्या दगडावर बसला - एका अनामिक शिरशिरीने नेहा शहारली - धबधब्याचा आवाज घोंगावत होता - वाऱ्याची हलकीशी झुळूक भिजल्या अंगावर शहारा फुलवत होती. पावसाच्या सरीने चिंब झालेल्या तिच्या केसातून पाण्याचे थेंब ठिपकत होते. गालावरून ओघळणारी बट तिच्या गालावरच्या लालीला झाकत होती. भिजल्याने तिच्या काहीशा अपऱ्या नाकाचा शेंडा खूप लालबुंद झाला होता. दोन्ही हात कोपरात दुमडून छातीशी धरताना ती भिजलेले टरारलेले शरीराचे उठाव थोडेसे झाकत होती - एक अनामिक ओढ - एक हुरहुर - पुढच्या हळव्या क्षणी कदाचित होणाऱ्या त्याच्या स्पर्शासाठी आतुरली तिची गात्रं.... त्या अस्वस्थ क्षणांनी नकळत तिचे डोळे मिटले - त्याच्या नजरेला नजर देणं तिला शक्यच नव्हतं. पण आज इतक्या दिवसांनी कुठल्याही नात्यापलीकडच्या फक्त भावनिक बंधांच्या त्या अमूर्त ओढीमुळे ती खरच खूप शुलळींशव झाली होती. तो जवळ येईल - त्याचा स्पर्श - त्याचे उष्ण तळवे - तिच्या मानेवर खेळणारे त्याचे तापले निश्वास - तिच्या गालावर स्थिरावलेले त्याचे ओठ - त्याची टोचणारी मिशी आणि दाढी - त्याचा आवेग - त्याची मिठी - कशी असेल कल्पना करवत नव्हती. नेहाला स्वत:ला कसं झोकून द्यावं ते कळत नव्हतं - काहीतरी घडावं त्यासाठी ती कमालीची अस्वस्थ झाली होती... त्या अनिमिष भावाने भरलेल्या डोळयांनी त्याच्याकडे पाहणंही तिला जमत नव्हतं.
तो शांतपणे शेजारी बसला होता - धबधब्याकडे बघत - त्याच्या कोसळणाऱ्या आवेगाला आपल्या संयमाचे बांध घालत आपला निग्रह सिद्ध करीत ! तो शुभ्र धबधबा - तसाच शुभ्र - लख्ख गोरा त्याचा रंग - भिजल्याने अजूनच पांढरट झालेलं त्याचं नाक - ओल्या चष्म्याच्या काचा पुसण्यासाठी काढल्यावर जास्तच भेदक दिसणारे त्याचे निळे घारे डोळे - कुठलीही अस्वस्थता नसलेले - शांत - स्थिर - विरक्त ?....
अनेक क्षण असेच अस्वस्थ गेले. नि:शब्द - शांत - फक्त धबधब्याच्या कोसळत्या आवेगात हरवलेले..... आत्तापर्यंत थांबलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावली - थोडीशी भुरभुर सुरू झाली, तशी बसताना शेजारी काढून ठेवलेला रेनचिटर उचलून तिला देत तो म्हणाला ``निघू या ? - हा घाल म्हणजे भिजणार नाहीस.''
नेहाला अनपेक्षित असणाऱ्या या प्रश्नाच्या उत्तराची वाटही न बघता तो उभा राहिला व दोन पावलं पुढे आला. आज्ञाधारकपणे नेहाने रेनचिटर चढवला. त्याच्यामागे चालू लागली - आता ती हलकीशी सर - वाऱ्याची झुळूक - धबधब्याचे तुषार - ती हुरहुर - ती ओढ - तिला काहीच जाणवत नव्हतं - तिच्या दोन दिवसांपूर्वीच्या शुलळींाशपीं - तिची दिवास्वप्नं - सोनालीचा अंदाज - निसर्गाचं आव्हान - सगळं सगळं फोल ठरलं होतं.
बर्वेच्या `नाईन टू फाईव्ह' मेंटॅलिटीला तिच्याकडे म्हणण्यासारखं काही नव्हतं - त्याच्या सभ्यतेला नावं ठेवायला जागा नव्हतीच. पण तरीही तिला खूप तुटल्यासारखं वाटलं. तिच्या गालावरच्या अश्रूतून ओघळणारी तिची निराशा पावसाच्या सरींनी सामावून घेतली.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी घरी आल्यावर तिने हॉलची खिडकी उघडली - रेडिओ लावला - कॉफीचा मग हातात घेऊन ती कोचावर ओघळली.
बर्वेसारखी माणसं अशीच असतात का ? नाईन टू फाईव्ह मेंटॅलिटी - तीच चाकोरी - तेच मोजकं आयुष्य - त्याच मर्यादित अपेक्षा - अगदी हातात आलं तरी सुखसुद्धा जपून घेणार - ओरबाडायची इच्छा नाही - कदाचित हिम्मत नाही - फोनच्या पलीकडून चेहरासुद्धा दिसणार नाही तिथे फक्त त्यांचा मोकळेपणा - एरवी चारचौघात हसण्या - बघण्यातही काटकसर - आपल्या स्वत:च्या गरजाही मान्य न करणारे मध्यमवर्गीय संभावितपणाचे संस्कार.... त्याच्या व्यवहारात नसेना का त्याच्या कल्पनेत तरी स्थान देईल का मला ?.....
रित्या मनातले एकलकोंडे प्रश्न..... आणि सूर्यास्त व्हायचा असूनही मळभानं झाकोळलेलं खिडकीतलं खिन्न आभाळ.... नेहाला खूप एकटं एकटं वाटत होतं..... रिकामं रिकामं वाटत होतं....
- डॉ. वैजयंती पटवर्धन, पुणे


