Skip to main content

बोलकं पत्र - मन करा रे प्रसन्न

मैत्रिणींनो नमस्कार,
मन करा रे प्रसन्न
सर्व सिद्धिंचे कारण !
हे संतवचन तुम्ही व मी खूप वेळा ऐकले आहे. या वचनाप्रमाणे जी माणसे वागतात त्यांना माझा सलाम !
पण ज्यांना सतत प्रसन्न राहाणे जमत नाही. मनात सतत भीती, क्रोध, चिडचिड, चंचलता या भावना वस्तीला असतात अशा माणसांसाठी माझा हा लेखनप्रपंच !
माणसाच्या मनाची उलघाल अनेक कारणांमुळे होते. अनेक कारणे म्हणजेच अनेक विचार ! हे विचार येतात ते संवादातून आणि संवाद होतो तो माणसाचा माणसाशी. पण हा संवाद ज्या शब्दांमुळे साधला जातो ते शब्दच जर बोचरे, टोचणारे असतील तर मात्र विसंवाद निर्माण होतो. ज्यामुळे माणसाच्या मनात िेळीींर्ळींश किंवा पशसरींर्ळींश विचार यायला सुरुवात होते.
मन प्रसन्न राहाण्यासाठी प्रत्येकालाच चांगल्या शब्दांची, सुसंवादाची गरज आहे. मात्र ज्या शब्दांमुळे संवाद निर्माण होतो ते शब्द प्रत्येक जण जपून वापरतो का ? हा प्रत्येकाने स्वत:च स्वत:शी घ्यायचा शोध आहे. यासाठी प्रत्येक वाचकाला नम्र विनंती.
मंडळी, शब्द जरा जपून टाका, नाहीतर, मनाचा उसवतो `टाका'.
मनाचा टाका, म्हणजेच मनातल्या विचारांचा टाका एकदा का उसवला, की तो शिवायला खूप कष्ट पडतात. कारण मन कित्येक निरर्थक विचारांनी भरून जातं. एकाकीपणाची भावना वाढीस लागते. जीवनात रसच वाटत नाही. कोण आपलं आणि कोण परकं तेच कळेनासं होतं.
पण हे सगळे विचार कोण करतं ? तर मी करते ? मी म्हणजे कोण ?
मी जेव्हा `मी' चा विचार करते तेव्हा मला वाटतं `मी' म्हणजे, एक नाणं आहे. या नाण्याची एक बाजू म्हणजे माझं शरीर व दुसरी बाजू म्हणजे माझं मन आहे. या दोन्ही बाजू एकमेकांशी इतक्या एकरूप झाल्या आहेत, की त्यांना वेगळं काढताच येत नाही.
पण एक मात्र खरं की शरीर निरोगी राहाण्यासाठी मनाला जपायला हवं. त्यासाठी मनातल्या चांगल्या व वाईट विचारांचा सतत मागोवा घ्यायला हवा. यासाठी चांगल्या विचारांची िंर्रीश्रळींू वाढवून वाईट विचारांची िंर्रीपींळींू कमी करायला हवी.
इतरांनी माझ्याशी कसा व कशाप्रकारे संवाद साधावा ते मी ठरवू शकत नाही. मात्र मी माझे विचार, मी इतरांशी कसा संवाद साधावा हे ठरवू शकते. ज्यामुळे माझ्या मनात माझ्याबद्दल कोणतंही 'र्सीळश्रींू षशशश्रळपस' राहाणार नाही, असा सुसंवाद प्रत्येक `मी' ने स्वत:शी साधायला हवा. ज्यामुळे मन प्रसन्न राहील.
यासाठी मनाचा प्रवास असा घडायला हवा
मन `मनात' नाही माझ्या.....
पण ....त्याचा रखवाला `माझ्याशिवाय' नाही कोणी दूजा.
नको त्या विचारांनी करते `मीच' मला `इजा', नकारांचं ओझं घेऊन होकारांना करते मी `वजा'. कळतं मला हे सगळं - तरीही
नकाराचा विचार करतेच मी पुन्हा एकदा `ताजा'
पण - लवकरच
नको त्या विचारांचं `गार्बेज'
फेकून देऊन
होणार .... मीच.....
माझ्या मनाचा `राजा'
- अनुराधा रवींद्र भिडे, ठाणे.

प्रतिसाद

The content of this field is kept private and will not be shown publicly.
Type the characters you see in this picture. (verify using audio)
Type the characters you see in the picture above; if you can't read them, submit the form and a new image will be generated. Not case sensitive.