या वर्षी मिळून सार्याजणी हे मासिक वयाचा एक महत्वाचा टप्पा गाठत आहे. १९८९ मधे सुरु झालेलं हे मासिक या वर्षी 20 वर्ष पूर्ण करत आहे. म्हणूनच तारुण्याचा बहर आणि जबाबदारीचं भान पेलत नव्या जोमानं पावलं टाकण्याचं बळ समर्थपणे पेलण्यासाठी 'सार्याजणी' तयारीत आहे. स्वतःशी नव्यानं संवाद सुरू करून देणारं हे मासिक स्त्रियांपासून सुरुवात करून, पुरुषांसह सार्यांच्याच मिटलेल्या ओठांआड दडलेलं मन खोलू बघत आहे.
अशा या महत्वाच्या टप्प्यावर आम्ही 'मिळून सार्याजणी' ला वेबसाईटची भेट द्यायचं ठरवलं आहे. ही आहे एक नव्या तंत्रज्ञानानं हातात दिलेली चावी. जी सार्यांनाच बोलकं करण्याचं काम करता यावं यासाठी आपल्या हातात येत आहे. तेंव्हा, खूप बोलण्यासाठी, ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. तुमचं स्वागत आहे!